Door43-Catalog_mr_tn/2CO/04/01.md

2.2 KiB

आम्ही

"आम्ही" ह्या शब्दाचा संभाव्य अर्थ १) पौल आणि त्याचे सेवा

सहकारी किंवा २) पौल आणि इतर दुसरे प्रेषित किंवा ३) पौल आणि करिंथ येथील विश्वासणारे.

आमची ही सेवा आहे, आम्हाला दया प्राप्त झाली आहे

हे दोन्ही व्वाक्यांश देव आमची कशी काळजी घेतो आणि त्याच्यासारखे अधिक होण्यासाठी आमचे रुपांतर करण्याद्वारे आमच्यावर दया दाखवितो. (पाहा: समांतरवाद)

व्यर्ज्य केल्या आहेत

"आम्ही सोडून दिल्या आहेत"

लाजवीणाऱ्या गुप्त गोष्टीं

हे दोन शब्द एकाच विचारास व्यक्त करतात. AT: "लाजेत लपविलेले" (पाहा: विशेषण)

कपटाने जगणे

"फसवणूक करीत जगणे"

आम्ही देवाच्या वचनाविषयी कपट करीत नाही

हा वाक्यांश एक सकारात्मक गोष्ट व्यक्त करण्यासाठी दोन नकारात्मक गोष्टींचा उपयोग करते. AT: "आम्ही देवाच्या वचनाचा उचित प्रकारे उपयोग करतो" (पाहा: पर्यायोक्ती)

देवाच्या दृष्टीने

लेखकाच्या प्रामाणीकतेबद्दल देवाच्या समजुतीचा उल्लेख देवा त्यांना पाहात आहे असा केला आहे. (पाहा: वाक्प्रचार)