Door43-Catalog_mr_tn/2CO/02/16.md

2.3 KiB

मृत्यूचा मरणसूचक गंध

ख्रिस्ताच्या ज्ञानाचा उल्लेख करण्यासाठी "गंध" ह्या शब्दाचा उपयोग करण्यांत आला आहे. जे आध्यात्मिकरित्या मरण पावलेले आहेत, त्यांच्यासाठी ख्रिस्ताचे ज्ञान हे एखाद्या मृत कुजलेल्या शरीराच्या दुर्गंधासारखे आहे. AT: "जे मेलेले आहेत त्यांच्यासाठी मृत्यूचे ज्ञान." (पाहा: रूपक)

जीवनाचा जीवनसूचक गंध

ख्रिस्ताच्या ज्ञानाचा उल्लेख करण्यासाठी "गंध" ह्या शब्दाचा उपयोग करण्यांत आला आहे. जे आध्यात्मिकरित्या जिवंत आहेत, त्यांच्यासाठी ख्रिस्ताचे ज्ञान हे सुगंधा सारखे आहे. AT: "जे जिवंत आहेत त्यांच्यासाठी जीवनाचे ज्ञान." (पाहा: रूपक)

हे करावयास कोण लायक आहे?

ख्रिस्ताचे ज्ञान हे देवापासून येणारे दान आहे ज्यासाठी कोणीहि पात्र नाही हे व्यक्त करण्यासाठी पौल ह्या प्रश्नाचा उपयोग करतो AT: "हे करावयास कोणीहि पात्र नाही." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

हेतूची शुद्धता

"प्रामाणिक इच्छा"

आम्ही ख्रिस्ताच्या ठायी बोलतो

"ख्रिस्ताच्या ठायी आमचा विश्वास आहे म्हणून आम्ही बोलतो"