Door43-Catalog_mr_tn/1TH/01/04.md

1.9 KiB
Raw Permalink Blame History

बंधुंनो

‘’सहकारी बंधुजन’’

तुमची झालेली निवड आम्हास ठाऊक आहे

‘’देवाने तुम्हाला त्याचे लोक होण्यासाठी निवडले हे आम्हाला ठाऊक आहे’’ (युडीबी), किंवा ‘’विशेष रीतीने देवाने तुम्हाला त्याची सेवा करण्यासाठी निवडले हे आम्हाला ठाऊक आहे.

आम्हाला ठाऊक आहे

‘’आम्हाला’’ ह्या शब्दाचा संदर्भ पौल, तीमथ्य आणि सिल्वानशी आहे थेस्सलनीकाकर विश्वासणाऱ्यांशी नाही. (पहा: निवडक)

तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने

शक्य अर्थ म्हणजे १) ‘’पवित्र आत्म्याने सहाय्य मिळवून पौल आणि त्याचे सहकारी हे सामर्थ्यशाली रीतीने उपदेश देतात’’ किंवा २) ‘’पवित्र आत्म्याच्या जाणीवेच्या कार्याच्या द्वारे शुभवर्तमानाचा विश्वासणाऱ्यांवर जबरदस्त प्रभाव आहे.

पूर्ण निर्धाराने

‘’तशाच रीतीने’’ (युडीबी)

कसे वागलो

‘’आम्ही स्वतःला कसे वागवले’’ (युडीबी)