Door43-Catalog_mr_tn/1CO/10/01.md

2.0 KiB

आपले पूर्वज

पौल निर्गमाच्या पुस्तकातील मोशेच्या वेळेचा उल्लेख करीत आहे जेव्हा मिसर देशाचे सैन्य इस्राएल लोकांचा पाठलाग करीत होते तेव्हा ते तांबड्या समुद्रातून पळाले होते. "आपल्या" हे समावेशीकरण आहे. AT: "सर्व यहूदी लोकांचे पूर्वज" (पाहा: समावेशीकरण)

मोशेमध्ये सर्वांचा बाप्तिस्मा झाला

AT: "त्या सर्वांनी मोशेचे अनुसरण केले आणि ते सर्व मोशेशी वचनबद्ध होते."

समुद्रातून पार गेले

मिसर सोडल्यानंतर त्यां सर्वांनी मोशेबरोबर तांबडा समुद्र पार केला.

मेघाखाली

दिवसभरांत इस्राएल लोकांचे मेघाद्वारे मार्गदर्शन केले गेले, तो मेघ देवाच्या उपस्थितीचे प्रतिनिधित्व करतो.

तो खडक तर ख्रिस्त होता

तो "खडक" ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली शक्तीचे प्रतिनिधित्व करतो जो संपूर्ण प्रवासांत त्यांच्याबरोबरच होता; ते त्याच्या संरक्षण आणि समाधानावर अवलंबून राहू शकत होते. (पाहा: रूपक)