mr_tn/tit/front/intro.md

5.5 KiB

तिताची प्रस्तावणा

विभाग१

सामान्य विभाग

तिताच्या पत्राची बाह्यरेखा

  1. पौलाने तीताला देवभिरू पुढारी नेमण्याची सूचना केली(1:1-16)
  2. पौलाने तीताला लोकांना धार्मिकतेने जगण्याचे प्रशिक्षण देण्याची सूचना केली(2:1-3:11)
  3. पौल त्याच्या काही योजना सांगून आणि विविध विश्वासणाऱ्यांना शुभेच्छा पाठवून शेवट करतो(3:12-15)

तीताचे पुस्तक कोणी लिहिले?

पौलाने तीताचे पुस्तक लिहिले. पौल तार्सस शहरातील होता. त्याच्या सुरुवातीच्या काळातच तो शौल म्हणून ओळखला जात असे. ख्रिस्ती होण्यापूर्वी पौल परुशी होता. त्याने ख्रिश्चनांचा छळ केला. तो ख्रिस्ती झाल्यावर, त्याने येशूबद्दल लोकांना सांगत संपूर्ण रोमन साम्राज्यात बरेच वेळा प्रवास केला.

तीतास पुस्तक कशाविषयी आहे?

पौलाने हे पत्र त्याच्या सहकारी तीताला लिहिले. तो क्रेत बेटावरील चर्चचे नेतृत्व करीत होता. पौलाने त्याला चर्च पुढारी निवडण्याविषयी सूचना दिली. विश्वासणाऱ्यांनी एकमेकांबद्दल कसे वागावे हे देखील पौलाने स्पष्ट केले. त्याने सर्वांना देवाला संतोष देण्याच्या मार्गाने जगण्याचे प्रोत्साहन दिले.

या पुस्तकाच्या शीर्षकाचे भाषांतर कसे करावे?

अनुवादक या पुस्तकाचे पारंपारिक शीर्षक “तीतास” असे म्हणणे निवडू शकतात. किंवा ते “पौलाचे तीतास पत्र” किंवा “तीताला पत्र” असे स्पष्ट शीर्षक निवडू शकतात. (पाहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

विभाग 2: महत्त्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक संकल्पना

चर्चमध्ये लोक कोणत्या भूमिकेत काम करू शकतात?

तीत या पुस्तकात काही शिकवणी आहेत की एखादी स्त्री किंवा घटस्फोटित पुरुष चर्चमध्ये नेतृत्वाच्या ठिकाणी सेवा देऊ शकेल की नाही. या शिकवणीच्या अर्थाबद्दल विद्वानांचे एकमत नाही. या पुस्तकाचा अनुवाद करण्यापूर्वी या विषयांवर पुढील अभ्यास करणे आवश्यक असू शकते.

विभाग 3: महत्त्वपूर्ण अनुवाद समस्या

एकवचनी आणि अनेकवचनी तुम्ही या पुस्तकात, ** मी** हा शब्द पौलाला सूचित करतो. तसेच, **तुम्ही ** हा शब्द नेहमीच एकवचनी असतो आणि तीताचा संदर्भ देतो. याला अपवाद :15:१:15 आहे. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-exclusive]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-you]])

**आपला तारणारा देव ** चा अर्थ काय आहे? हे या पत्रातील एक सामान्य वाक्यांश आहे. पौलाने ख्रिस्तामध्ये त्यांच्याविरुद्ध केलेल्या पापांबद्दल त्यांना क्षमा केली याबद्दल वाचकांना त्यांचा विचार करायला लावायचा होता आणि जेव्हा तो सर्व लोकांचा न्याय करतो तेव्हा त्यांना क्षमा करण्याद्वारे त्याने त्यांना शिक्षेपासून वाचविले. या पत्रामधील एक समान वाक्यांश आहे आपला महान देव आणि तारणारा येशू ख्रिस्त.