mr_tn/tit/02/intro.md

1.9 KiB

तीतास पत्र 02 सामान्य टिपा

या अध्यायातील विशिष्ट संकल्पना

लिंगाच्या भूमिका

हा उतारा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भात कसा समजला जावा यावर विद्वान विभागले गेले आहेत. काही विद्वानांचा असा विश्वास आहे की सर्व गोष्टींमध्ये पुरुष आणि स्त्रिया समान आहेत. इतर विद्वानांचा असा विश्वास आहे की देवाने पुरुष आणि स्त्रिया यांना विवाह आणि चर्चमधील भिन्न भिन्न भूमिकांमध्ये सेवा देण्यासाठी निर्माण केले. अनुवादकांनी त्यांना हा प्रश्न कसा समजेल ते या उताऱ्याचे भाषांतर कसे करतात यावर परिणाम होऊ नये याची खबरदारी घ्यावी.

गुलामी

गुलामी या अध्यायात गुलामगिरी चांगली आहे की वाईट याबद्दल लिहित नाही. पौलाने गुलामांना आपल्या मालकांची विश्वासूपणे सेवा करण्यास शिकवले. तो सर्व विश्वासणाऱ्यांना देवभिरू आणि प्रत्येक परिस्थितीत योग्यरित्या जगण्यास शिकवतो.