mr_tn/rev/20/intro.md

28 lines
3.7 KiB
Markdown

# प्रकटीकरण 20 सामान्य माहिती
## या अधिकारातील विशेष संकल्पना
### ख्रिस्ताने हजार वर्षे राज्य करणे
या अधिकारात, येशूने हजार वर्षे राज्य केले असे म्हंटले आहे, त्याच वेळी शैतान बांधलेला होता. याचा संदर्भ भविष्यातील काळाशी आहे किंवा येशू आता स्वर्गातून राज्य करत आहे यावर विद्वानांमध्ये मतभेद आहेत. या परिच्छेदाचे अचूक भाषांतर करण्यासाठी याला समजून घेणे गरजेचे नाही. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/prophet]])
### शेवटची बंडखोरी
हा अधिकार हजार वर्षे संपल्यानंतर काय होईल याचेदेखील वर्णन करतो. या काळादरम्यान शैतान आणि अनेक लोक येशूविरुद्ध बंडखोरी करण्याचा प्रयत्न करतील. याचा परिणाम देवाचा पाप आणि दुष्ट यांच्यावर अंतिम आणि शेवटचा विजय असा होतो. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/sin]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/evil]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/eternity]])
### मोठे पांढरे सिंहासन
या अधिकाराचा शेवट जे लोक कधीकाळी जिवंत होते त्यांच्या न्यायाने होतो. देव ज्या लोकांनी येशूवर विश्वास ठेवला होता त्यांना ज्यांनी त्याच्यावर विश्वास नाही ठेवला त्या लोकांतून वेगळे केले. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/judge]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/heaven]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/faith]])
## या अधिकारातील महत्वाचे अलंकार
### जीवनाचे पुस्तक
हे सार्वकालिक जीवनासाठीचे रूपक आहे. ज्यांनी सार्वकालिक जिवंत प्राप्त केले आहे त्या सर्वांची नावे त्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली होती. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
## या अधिकारातील भाषांतराच्या इतर अडचणी
### नरक आणि अग्नी सरोवर
या दोन वेगळ्या जागा अशा प्रकट होतात. या दोन जागांचे भाषांतर वेगवेगळे कसे करता येईल हे निर्धारित करण्यासाठी भाषांतरकार इच्छा असल्यास आणखी संशोधन करू शकतो. भाषांतरामध्ये त्यांचे एकमेकांसारखे समान भाषांतर असे नये. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/hell]])