mr_tn/rev/15/intro.md

2.6 KiB

प्रकटीकरण 15 सामान्य माहिती

स्वरूप आणि संरचना

या अधिकारात योहान स्वर्गात घडणाऱ्या घटना आणि चित्रे यांचे वर्णन करतो.

काही भाषांतरे वाचण्यासाठी सुलभ व्हावे म्हणून पद्याची प्रत्येक ओळ ही इतर मजकुरापेक्षा अधिक उजवीकडे ठेवतात. युएलटी ने हे 3-4 वचनात केले आहे.

या अधिकारातील विशेष संकल्पना

“श्वापदावर विजयी होणे”

हे लोक आत्मिकदृष्ट्या विजयी झाले. जरी बहुतांश आत्मिक युद्धे दिसत नाहीत, तरी प्रकटीकरणाचे पुस्तक आत्मिक युद्धाचे चित्रण असे करते की ते उघडपणे होत आहेत. (पहा: [[rc:///tw/dict/bible/kt/spirit]] आणि [[rc:///ta/man/translate/writing-apocalypticwriting]])

“साक्षीचा तंबू असलेले मंदिर स्वर्गात उघडले गेले”

वचने इतर ठिकाणी असे सूचित करतात की पृथ्वीवरील मंदिराने स्वर्गात देवाच्या निवास स्थानाची पूर्णपणे नक्कल केलेली आहे. येथे योहान देवाच्या स्वर्गीय निवासस्थानाचा किंवा मंदिराचा संदर्भ देत आहे. (पहा: [[rc:///tw/dict/bible/kt/heaven]] आणि [[rc:///ta/man/translate/writing-apocalypticwriting]])

गीते

प्रकटीकरणाचे पुस्तक बऱ्याचदा स्वर्गाचे वर्णन अशी जागा जेथे लोक गीत गातात असे करते. ते देवाची आराधना गीतांनी करतात. हे स्पष्ट करते की स्वर्ग एक अशी जागा आहे जेथे देवाची नेहमी आराधना होते.