mr_tn/rev/09/intro.md

4.8 KiB

प्रकटीकरण 09 सामान्य माहिती

स्वरूप आणि संरचना

या अधिकारात, जेव्हा देवदूत सात तुतारी वाजवतात तेव्हा काय घडते याचे वर्णन योहान करत राहतो. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-apocalypticwriting)

अनर्थ

योहान अनेक अनर्थांचे वर्णन प्रकटीकरणाच्या पुस्तकात करतो. या अधिकाराची सुरवात 8 व्या अधिकाराच्या शेवटी घोषित केलेल्या 3 “अनर्थांच्या” वर्णनाने होते

या अधिकारातील विशेष संकल्पना

प्राण्यांच्या प्रतिमा

या अधिकारामध्ये अनेक प्राण्यांचा समवेश केला आहे: टोळ, विंचू, घोडे, सिंह, आणि साप.प्राणी वेगवेगळे गुण किंवा लक्षण व्यक्त करतात. उदाहरणार्थ, एक सिंह हा शक्तिशाली आणि धोकादायक असतो. शक्य असल्यास भाषांतरकारांनी भाषांतरामध्ये त्याच प्राण्यांचा वापर करावा. जर प्राणी अज्ञात असेल तर, समान गुण किंवा लक्षण असलेल्या इतर प्राण्याचा वापर करावा.

अथांग डोह

ही प्रतिमा प्रकटीकरणाच्या पुस्तकात अनेकदा पाहायला मिळते. हे नरकाचे एक चित्र आहे जे अटळ आणि स्वर्गाच्या विरुद्ध दिशेस आहे. (पहा: rc://*/tw/dict/bible/kt/hell)

अबद्दोन आणि आपल्लूओन

”अबद्दोन” हा इब्री शब्द आहे. “अपुल्लोओन” हा ग्रीक शब्द आहे. दोन्ही शब्दांचा अर्थ “विनाश करणारा” असा होतो. योहानाने इब्री शब्दाच्या आवाजाचा वापर केला आणि त्याला ग्रीक अक्षरामध्ये लिहिले. युएलटी आणि युएसटी दोन्ही शब्दांना इंग्रजी अक्षराच्या आवाजासह लिहितात. भाषांतरकारांना या शब्दांचे भाषांतर लक्षित भाषेच्या अक्षरांचा वापर करून करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. मूळ ग्रीक वाचकांना हे समजते की “अपुल्लोओन” या शब्दाचा अर्थ “विनाश करणारा” असा होतो. म्हणून भाषांतरकार मजकूर किंवा तळटीपमध्ये याचा अर्थ काय आहे ते देऊ शकतात. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-transliterate)

पश्चात्ताप

मोठे चिन्ह होऊनसुद्धा, लोकांचे वर्णन त्यांनी पश्चात्ताप केला नाही आणि त्यांच्या पापात राहिले असे केले आहे. लोकांनी पश्चात्ताप करण्यास नकार दिला असे सुद्धा 16 व्या अधिकारात सांगितले आहे. (पहा: [[rc:///tw/dict/bible/kt/repent]] आणि [[rc:///tw/dict/bible/kt/sin]])

या अधिकारातील महत्वाचे अलंकार

उपमा

योहान या अधिकारात अनेक उपमांचा वापर करतो. त्यांच्या उपयोग त्याने दृष्टांतात पाहिलेल्या प्रतिमांचे वर्णन करण्यासाठी होतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)