mr_tn/rev/08/intro.md

2.1 KiB

प्रकटीकरण 08 सामान्य माहिती

या अधिकारातील विशेष संकल्पना

सात शिक्के आणि सात कर्णे

जेव्हा कोकऱ्याने सातवा शिक्का फोडला तेव्हा काय झाले याच्याने या अधिकाराची सुरवात होते. देव सर्व विश्वासणाऱ्यांच्या प्रार्थनेचा उपयोग पृथ्वीवर नाट्यमय घडामोडी घडवण्यासाठी करतो. नंतर योहान सात कर्ण्यापैकी देवदूत पहिल्या चार कर्ण्याचा नाद करतो तेव्हा काय घडते याचे वर्णन करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-apocalypticwriting)

या अधिकारातील महत्वाचे अलंकार

कर्मणी प्रयोग

योहान या अधिकारात अनेकदा कर्मणी प्रयोगाचा उपयोग करतो. यामुळे कृती करणारा लपून राहतो. जर भाषांतरकाराच्या भाषेत कर्मणी प्रयोग नसेल तर हे व्यक्त करणे अवघड होऊ शकते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

उपमा

8 व्या आणि 10 व्या वचनात, योहान दृष्टांतात पाहिलेल्या प्रतिमांचे वर्णन करण्यासाठी उपमांचा वापर करतो. तो त्या प्रतिमांची तुलना दररोजच्या जीवनातील गोष्टींशी करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)