mr_tn/rev/07/intro.md

24 lines
2.6 KiB
Markdown

# प्रकटीकरण 07 सामान्य माहिती
## संरचना आणि स्वरूप
विद्वानांनी या अधिकारातील भागांचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लावला आहे. या अधिकारातील संकल्पनांचे अचूकपणे भाषांतर करण्यासाठी भाषांतरकारांना या अधिकाराचा अर्थ काय आहे हे पूर्णपणे समजण्याची गरज नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-apocalypticwriting]])
या अधिकारातील मोठ्या संख्यांचे अचूकपणे भाषांतर करणे गरजेचे आहे. 144,000 ही संख्या बारा हजाराच्या बारा वेळा आहे.
भाषांतरकार याबद्दल सावध असायला हवेत की, जसे सामान्यपणे जुन्या करारांमध्ये इस्राएलच्या बारा कुळांना सूचीबद्ध केले आहे तसे या अधिकारात केलेले नाही.
काही भाषांतरांनी पद्द्याची प्रत्येक ओळ ही उरलेल्या मजकुरापेक्षा अधिक उजवीकडे वाचण्यासाठी सुलभ व्हावी म्हणून ठेवलेली आहे. युएलटी ने हे 5-8 आणि 15-17 या वचनांमध्ये केले आहे.
## या अधिकारातील विशेष संकल्पना
### आराधना
देव त्याच्या लोकांना वाचवतो आणि त्यांना अडचणींपासून राखतो. त्याचे लोक त्याची आराधना करून त्याला प्रतिसाद देतात. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/worship]])
## या अधिकारातील महत्वाचे अलंकार
### कोकरा
हे येशूला संदर्भित करते. या अधिकारात, हे येशूसाठीचे शीर्षकदेखील आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])