mr_tn/rev/06/intro.md

3.0 KiB

प्रकटीकरण 06 सामान्य माहिती

संरचना आणि स्वरूप

कोकऱ्याने पहिल्या सहा शिक्क्यातील प्रत्येक शिक्का फोडल्यानंतर काय झाले याचे वर्णन लेखक करतो. कोकरा सातवा शिक्का 8 व्या अधिकारापर्यंत फोडत नाही.

या अधिकारातील विशेष संकल्पना

सात शिक्के

योहानाच्या काळात राजे आणि महत्वाचे लोक महत्वाची कागदपत्रे कागदाच्या मोठ्या तुकड्यावर किंवा प्राण्यांच्या कातड्यावर लिहित असत. नंतर ते त्याची गुंडाळी करून त्याला मेणाने बंद करत असत जेणेकरून ते तसेच राहील. ज्या व्यक्तीला उद्देशून ते कागदपत्र लिहिले आहे फक्त त्यालाच तो शोक्का फोडून गुंडाळी उघडण्याचा अधिकार होता. या अधिकारात, कोकरा शिक्के फोडतो. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-apocalypticwriting)

चार घोडेस्वार

जसे कोकऱ्याने पहिल्या चार शिक्क्यातील प्रत्येक शिक्का उघडला, लेखक घोडेस्वारांनी वेगवेगळ्या रंगाच्या घोड्यावर स्वर झाल्याचे वर्णन करतो. घोड्यांचे हे रंग प्रतीकात्मक असावेत की कसे घोडेस्वार पृथ्वीला अपय करतील.

या अधिकारातील महत्वाचे अलंकार

कोकरा

हे येशूला संदर्भित करते. या अधिकारात हे येशूसाठीचे शीर्षकदेखील आहे. (पहा: [[rc:///tw/dict/bible/kt/lamb]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-explicit]])

उपमा

12-14 या वचनात लेखक अनेक उपमांचा वापर त्याने दृष्टांतात बघितलेल्या प्रतिमांच्या वर्णनासाठी करतो. तो त्या प्रतिमांची तुलना दररोज दिसणाऱ्या गोष्टींशी करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)