mr_tn/rev/04/intro.md

32 lines
4.6 KiB
Markdown

# प्रकटीकरण 04 सामान्य माहिती
## संरचना आणि स्वरूप
काही भाषांतरांनी पद्द्याची प्रत्येक ओळ ही उरलेल्या मजकुरापेक्षा अधिक उजवीकडे वाचण्यासाठी सुलभ व्हावी म्हणून ठेवलेली आहे. युएलटी ने हे 8व्या आणि 11व्या वचनाबरोबर केले आहे.
योहानाने मंडळ्यांना पत्रांचे वर्णन करणे संपवले. आता तो देवाने त्याला दाखवलेल्या दृष्टांताचे वर्णन करण्यास सुरवात करतो.
### या अधिकारातील विशेष संकल्पना
### यास्फे, सर्दी, आणि पाचू
या शब्दांचा संदर्भ एक विशिष्ठ प्रकारच्या दगडांशी येतो, ज्यांना लोक योहानाच्या काळात मौल्यवान समजत होते. जर तुमच्या संस्कृतीतील लोक विशिष्ठ प्रकारच्या दगडांना मौल्यवान समजत नसतील तर याचे भाषांतर करणे तुमच्यासाठी कठीण जाऊ शकते.
### चोवीस वडील
वडील हे मंडळींचे पुढारी आहेत. चोवीस वडील हे कदाचित युगातील संपूर्ण मंडळींचे सूचक असू शकतील. जुन्या करारामध्ये इस्राएलची बारा कुळे होती आणि नवीन करारामध्ये बारा प्रेषित होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-apocalypticwriting]])
### देवाचे सात आत्मे
हे आत्मे [प्रकटीकरण 1:4](../01/प्रक/01/04.md) मधील सात आत्मे आहेत.
### देवाला गौरव देणे
देवाचे गौरव हे देवाकडे असणारे मोठे सौंदर्य आणि तेजस्वी ऐश्वर्य हे आहे कारण तो देव आहे. पवित्र शास्त्राच्या इतर लेखकांनी याचे वर्णन अतिशय चमकदार असा प्रकाश ज्याकडे कोणालाही पाहता येणे शक्य नाही असे केले आहे. कोणीही देवाला अशा प्रकारचे गौरव देऊ शकत नाही, कारण ते आधीपासून त्याचेच आहे. जेव्हा लोक देवाला गौरव देतात किंवा जेव्हा देव गौरव प्राप्त करतो, तेव्हा लोक बोलतात की देवाकडे गौरव आहे जे त्याचेच आहे, ते गौरव देवाकडे असणे हे त्याला योग्य आहे, आणि त्या लोकांनी देवाची आराधना केली पाहिजे, कारण देवाकडे ते गौरव आहे. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/glory]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/worthy]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/worship]])
## या अधिकारातील इतर शक्य अडचणी
### अवघड प्रतिमा
अशा गोष्टी जसे की सिंहासनामधून निघणारी विजेची कडी, दीप जे आत्मे आहेत, आणि सिंहासनाच्या समोर असलेला समुद्र याची कल्पना करणे कदाचित अशक्य आहे, आणि म्हणून त्याच्यासाठीच्या शब्दांचे भाषांतर करणे अवघड आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-apocalypticwriting]])