mr_tn/mrk/front/intro.md

16 KiB

मार्ककृत शुभवर्तमानाचा परिचय

भाग 1: सामान्य परिचय

मार्ककृत शुभवर्तमानाची रूपरेषा

परिचय (1: 1-13)

  1. गालीलातील येशूची सेवा
  • आरंभिक सेवा (1: 14-3: 6)
  • येशू लोकांमध्ये लोकप्रिय झाला (3: 7-5: 43)
  • गालीलातून निघून जाताना आणि परत येत असताना (6: 1 -8: 26)
  1. यरूशलेमकडील वाटचाल, येशूने स्वत: च्या मृत्यूची भविष्यवाणीची पुनरावृत्ती केली. शिष्यांना गैरसमज आहे आणि येशू त्यांना अनुसरण करणे किती कठीण होईल हे शिकवतो (8: 27-10: 52)
  2. सेवेचे शेवटले दिवस आणि यरूशलेममधील अंतिम संघर्षांसाठी तयारी (11: 1-13: 37) 1.खिस्ताचा मृत्यू आणि रिकामी कबर (14: 1-16: 8)

मार्ककृत शुभवर्तमान काय आहे?

मार्ककृत शुभवर्तमान नवीन करारातील चार शुभवर्तमाना पैकी एक आहे जे येशू ख्रिस्ताचे जीवनाचे स्पष्टीकरण देते. शुभवर्तमानाच्या लेखकांनी येशू कोण होता आणि त्याने काय केले या वेगवेगळ्या पैलूंबद्दल लिहिले. वधस्तंभावर येशूने कसे दु:ख सहन केले आणि तो कसा मरण पावला याबद्दल मार्कने बरेच काही लिहिले आहे. छळ केला जात असणाऱ्या वाचकांना प्रोत्साहित करण्यासाठी त्याने असे केले आहे. मार्कने यहुदी रीतिरिवाज आणि काही अरामी शब्द देखील स्पष्ट केले. हे कदाचित त्याच्या पहिल्या वाचकांना बहुतेकांना विदेशी असल्याची जाणीव असावी असे चिन्हित केले आहे.

या पुस्तकाचे शीर्षक कसे भाषांतरित केले पाहिजे?

भाषांतरकार या पुस्तकाला त्याच्या पारंपरिक शीर्षकानुसार ""मार्ककृत शुभवर्तमान"" ""किंवा"" मार्कचे शुभवर्तमान. "" त्यांनी ""मार्कने लिहिलेले येशूबद्दलचे शुभवर्तमान"" असा एखादा शीर्षक देखील स्पष्ट देऊ शकतो. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

मार्कचे पुस्तक कोणी लिहिले?

पुस्तक लेखकाचे नाव देत नाही. तथापि, सुरुवातीच्या ख्रिस्ती लोकांच्या काळापासून, बहुतेक ख्रिस्ती लोकांनी विचार केला की लेखक मार्क होता. मार्क हा योहान मार्क म्हणून देखील ओळखला जात होता . तो पेत्राचा जवळचा मित्र होता. येशूने जे म्हटले व केले ते मार्कने पाहिले नाही. परंतु, अनेक विद्वानांचा असा विचार आहे की पेत्राने येशूविषयी जे काही सांगितले होते ते मार्कने लिहिले.

भाग 2: महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक संकल्पना

येशूची शिक्षण पद्धती काय होती?

लोक येशूला रब्बी मानतात. रब्बी देवाच्या नियमांचे शिक्षक आहेत. इस्राएलमध्ये इतर धार्मिक शिक्षकांसारखे येशू देखील शिकवत असे. तो जेथे गेला तिथे त्याच्या मागे विद्यार्थी होते. या विद्यार्थ्यांना शिष्य म्हणत. त्याने नेहमी दृष्टांत सांगितले. दृष्टांत हे नैतिक धडे शिकवतात. (पहा: [[rc:///tw/dict/bible/kt/lawofmoses]] आणि [[rc:///tw/dict/bible/kt/disciple]] आणि rc://*/tw/dict/bible/kt/parable)

भाग 3: महत्त्वपूर्ण अनुवाद समस्या

सारांशीत शुभवर्तमान काय आहेत?

मत्तय, मार्क आणि लूक यांच्या शुभवर्तमानांना सारांशीत शुभवर्तमान म्हणतात कारण त्यांच्यामध्ये अनेक समान परिच्छेद आहेत. ""सारांश"" शब्दाचा अर्थ ""एकत्र पहा"".

हे अध्याय दोन किंवा तीन शुभवर्तमानांमध्ये सारखेच किंवा जवळजवळ समान आहेत तेव्हा अध्याय ""समांतर"" मानले जातात. समांतर परिच्छेदांचे भाषांतर करताना, भाषांतरकारांनी समान शब्द वापरणे आवश्यक आहे आणि शक्य तितकेच ते तयार केले पाहिजे.

येशू स्वत: ला ""मनुष्याचा पुत्र"" म्हणून का म्हणतो?

शुभवर्तमानात, येशूने स्वतःला ""मनुष्याचा पुत्र"" असे संबोधले. "" हा दानीएल 7:13-14 चा संदर्भ आहे. या उत्तरामध्ये ""मनुष्याचा पुत्र"" म्हणून वर्णन केलेले एक व्यक्ती आहे. याचा अर्थ असा मनुष्य होता जो मनुष्यासारखा दिसत होता. देवाने सर्व राष्ट्रांवर राज्य करण्यासाठी मनुष्याच्या पुत्राला अधिकार दिला. आणि सर्व लोक त्याची सर्वकाळ आराधना करतील.

येशूच्या काळातील यहूदियांनी ""मनुष्याचा पुत्र"" कोणासाठीही शीर्षक म्हणून वापरला नाही. म्हणूनच, तो खरोखरच कोण आहे हे समजून घेण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी येशूने स्वतःसाठी हे वापरले. (पहा: rc://*/tw/dict/bible/kt/sonofman)

बऱ्याच भाषांमध्ये ""मनुष्याचा पूत्र"" शीर्षक भाषांतर करणे कठीण होऊ शकते. वाचक एक शाब्दिक अनुवाद चुकीचे समजू शकतात. भाषांतरकार ""एक मानवी"" सारखे पर्याय विचारात घेऊ शकतात. शीर्षक स्पष्ट करण्यासाठी तळटीप समाविष्ट करणे देखील उपयोगी ठरू शकते.

मार्क थोड्या काळासाठी सूचित केलेल्या अटींचा वापर का करतो?

मार्कचा शुभवर्तमानात ""लगेचच"" हा शब्द चाळीस वेळा वापरण्यात आला आहे. घटनांना अधिक रोमांचक आणि जबरदस्त बनविण्यासाठी हे चिन्हांकित करा. हे वाचकांना एका घटनेपासून दुसऱ्या घटनेत वेगाने हलवते.

मार्क पुस्तकाच्या मजकूरातील मुख्य समस्या काय आहेत?

खालील वचने पवित्र शास्त्राच्या जुन्या आवृत्तीत आढळतात परंतु त्यामध्ये आधुनिक आवृत्त्यामध्ये बऱ्याच गोष्टीचा समावेश नाही. भाषांतरकारांना या वचनांचा समावेश न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तथापि, जर भाषांतरकारांच्या प्रदेशात पवित्र शास्त्राच्या जुन्या आवृत्त्या असतील तर यापैकी एक किंवा अधिक वचनांचा समावेश करा, भाषांतरकार त्यांना समाविष्ट करू शकतात. जर ते समाविष्ट केले गेले, तर ते मार्कच्या शुभवर्तमानात कदाचित मूळ नसल्याचे सूचित करण्यासाठी चौकोनी कंस ([]) मध्ये ठेवले पाहिजे.

  • ""जर कोणास ऐकू येत असेल तर ऐकू द्या."" (7:16)
  • ""जेथे त्यांचे किडे कधीही मरत नाहीत आणि आग कधीच विजत नाहीत"" (9:44)
  • ""जेथे त्यांचे किडे कधीही मरत नाहीत आणि आग कधीच विजत नाहीत"" (9:46)
  • ""आणि शास्त्रवचनात असे म्हटले होते की, ""त्याला अनीतिमान लोकांबरोबर गणण्यात आले"" ""(15:28)

सर्वात आधीच्या हस्तलिखितांमध्ये पुढील उतारा आढळलेला नाही. बहुतेक पवित्र शास्त्रामध्ये या उताऱ्याचा समावेश आहे, परंतु आधुनिक पवित्र शास्त्रामध्ये त्यास कंसामध्ये ([]) ठेवले आहे किंवा या मार्गाने मार्कच्या शुभवर्तमानात मूळ नसल्याचे सूचित केले आहे. भाषांतरकारांना पवित्र शास्त्राच्या आधुनिक आवृत्त्यांप्रमाणे काहीतरी करण्याची शिफारस केली जाते.

  • ""आठवड्याच्या पहिल्या दिवशी, जेव्हा तो उठला, तेव्हा तो प्रथम मरीया मग्दालियाला दिसला ज्यातून त्याने सात भुते काढली. ती गेली आणि त्यांने तिला जे म्हटले होते ते सर्वांना सांगितले. जेव्हा ते शोक करीत होते आणि रडत होते, तेव्हा त्यांनी ऐकले की, तो जिवंत आहे, आणि तिच्या द्वारे त्याला पाहण्यात आले आहे. परंतु त्यांनी विश्वास ठेवला नाही. नंतर या गोष्टी केल्यानंतर तो त्यांच्यापैकी दोन जणांना दिसला. ते जात असताना त्यांनी शिष्यांना सांगितले की, त्यांना इतर शिष्यांना सांगितले परंतु त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. नंतर येशू अकरा जणांना दिसला, ते मेजाजवळ बसले होते आणि त्यांने त्यांच्या अविश्वासाबद्दल आणि ह्रदयाच्या कठोरपणाबद्दल त्यांना धमकावले कारण तो मेलेल्यांतून उठल्यावर त्याला त्यांनी पहिले यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. ""तो त्यांना म्हणाला, 'संपूर्ण जगात जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्ता सांगा.' जो कोणी विश्वास ठेवतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास ठेवणार नाही त्याला दोषी ठरविले जाईल. जो विश्वास ठेवतो त्यांच्याबरोबर हि चिन्हे असतील: माझ्या नावात ते भुते काढतील. ते नवीन भाषेत बोलतील. ते आपल्या हाताने सांप उचलतील आणि जर त्यांनी काही प्राण घातक पदार्थ प्याले तर ते त्यांना बाधणार नाही. ते आजाऱ्यांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील.' प्रभूने त्यांना हे सांगितल्यानंतर, तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजूस बसला. शिष्य गेले आणि सर्वत्र उपदेश केला, प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करीत होता घडणाऱ्या चिन्हाद्वारे वचनाचे समर्थन करत होता. ""(16: 9 -20)

(पहा: rc://*/ta/man/translate/translate-textvariants)