mr_tn/mat/17/intro.md

2.1 KiB

मत्तय 17 सामान्य नोंदी

या अध्यायातील विशेष संकल्पना

एलीया

जुन्या करारातील संदेष्ट्या मलाखी येशूच्या जन्मापूर्वी अनेक वर्षे जगला. मसीहा येण्याआधी एलीया नावाचा एक संदेष्टा परत येईल असे सांगितले होते. येशूने सांगितले की मलाखी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल बोलत आहे. येशू असे म्हणाला कारण एलीया काय करेल हे मलाखीने म्हटल्याप्रमाणे योहान बाप्तिस्मा करणाऱ्याने केले होते. (पहा: [[rc:///tw/dict/bible/kt/prophet]] आणि [[rc:///tw/dict/bible/kt/christ]])

""रूपांतरित""

पवित्र शास्त्र नेहमीच देवाच्या वैभवाचा एक महान, तेजस्वी प्रकाश म्हणून बोलते. जेव्हा लोक हा प्रकाश पाहतात तेव्हा ते घाबरतात. या अध्यायात मत्तय म्हणतो की येशूच्या शरीराने या तेजस्वी प्रकाशासह चमक दाखविली आणि त्याच्या अनुयायांनी हे पाहिले की येशू खरोखरच देवाचा पुत्र होता. त्याच वेळी देवाने त्यांना सांगितले की येशू त्याचा पुत्र आहे. (पहा: [[rc:///tw/dict/bible/kt/glory]] आणि [[rc:///tw/dict/bible/kt/fear]])