mr_tn/mat/10/intro.md

31 lines
3.3 KiB
Markdown

# मत्तय 10 सामान्य नोंदी
## या धड्यातील विशेष संकल्पना
### बारा शिष्यांना पाठविणे
या अध्यायातील अनेक वचने येशूने बारा शिष्यांना कसे पाठविले हे वर्णन करतात. त्याने त्यांना स्वर्गाच्या राज्याविषयी आपला संदेश सांगण्यास पाठवले. ते फक्त इस्राएलमध्ये आपला संदेश सांगत असत आणि परराष्ट्रीयांना सांगत नसत.
## या अध्यायात अन्य संभाव्य अनुवाद अडचणी
### बारा शिष्य
खालील बारा शिष्यांची यादीः
मत्तयमध्ये
शिमोन (पेत्र), आंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब, जब्दीचा मुलगा योहान, फिलिप्प, बर्थलमय, थोमा , मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन झीलोत आणि यहूदा इस्कर्योत.
मार्कमध्ये:
शिमोन(पेत्र), आंद्रीया, जब्दीचा मुलगा याकोब व जब्दीचा मुलगा योहान (यांना त्याने बेनेरेगेश, ज्याचा अर्थ ""गर्जनेचे पुत्र"" हे नाव दिले.) फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय,शिमोन झीलोत आणि यहूदा इस्कर्योत.
लूक:
शिमोन (पेत्र), अंद्रिया, याकोब, योहान, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन (ज्याला झीलोत म्हणत) ), याकोबाचा पुत्र यहूदा आणि यहूदा इस्कर्योत.
तद्दय कदाचित यहूदा असावा, याकोबाचा पूत्र.
### ""स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे""
जेव्हा योहानाने हे शब्द उच्चारले तेव्हा कोणास ठाऊक नव्हते ""स्वर्गाचे राज्य"" अस्तित्वात होते किंवा येत आहे. इंग्रजी अनुवाद अनेकदा ""हाताशी"" या वाक्यांशाचा वापर करतात परंतु हे शब्द भाषांतर करणे कठीण होऊ शकतात. इतर आवृत्त्या ""जवळ येत आहे"" आणि ""जवळ आले आहेत"" वाक्यांश वापरतात