mr_tn/jud/front/intro.md

3.3 KiB

यहुदाचा परिचय

भाग 1: सामान्य परिचय

यहुदाच्या पुस्तकाची रूपरेषा

  1. परिचय (1:1-2)
  2. खोट्या शिक्षकांच्या विरुध्द इशारा (1:3-4)
  3. जुन्या करारातील उदाहरणे (1:5-16)
  4. योग्य प्रतिसाद (1:17-23)
  5. देवाची स्तुती (1:24-25)

यहुदाचे पुस्तक कोणी लिहिले?

लेखक स्वतःची ओळख यहूदा याकोबाचा भाऊ अशी करून देतो. यहूदा आणि याकोब हे दोघेही येशूचे सावत्र भाऊ होते. हे पत्र एखाद्या विशिष्ठ मंडळीसाठी लिहिले आहे का ते माहित नाही.

यहूदाचे पुस्तक कशाबद्दल आहे?

यहुदाने हे पत्र विश्वासू लोकांना खोट्या शिक्षकांपासून सावध करण्यासाठी लिहिले. हे कदाचित असे सूचित करते की, यहूदा हे यहुदी ख्रिस्ती श्रोत्यांना लिहित होता. या आणि पेत्राच्या दुसऱ्या पात्राचा विषय समान आहे. हे दोन्ही पत्र देवदूत, सदोम आणि गमोरा, आणि खोटे शिक्षक यांच्याबद्दल बोलतात.

या पुस्तकाच्या शीर्षकाचे भाषांतर कसे केले जाऊ शकते?

भाषांतरकार या पुस्तकाला त्याच्या “यहूदा” या पारंपारिक नावाने बोलवू शकतात, किंवा ते स्पष्ट शीर्षक निवडू शकतात, जसे की, “यहूदाचे पत्र” किंवा “यहुदाने लिहिलेले पत्र.” (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

भाग 2: महत्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक संकल्पना

यहूदा ज्या लोकांच्या विरुद्ध बोलला ते कोण होते?

यहूदा ज्या लोकांच्या विरुद्ध बोलला ते लोक अज्ञातवासी म्हणून ओळखले गेले असावे हे शक्य आहे. या शिक्षकांनी स्वतःच्या फायद्यासाठी वचनांच्या शिक्षणाला विकृत केले. ते अनैतिक मार्गांनी जीवन जगले आणि इतरांना सुद्धा त्यांनी असेच जगण्यास शिकवले.