mr_tn/act/16/intro.md

2.2 KiB

प्रेषित16 सामान्य नोंदी

या अध्यायातील विशेष संकल्पना

तीमथ्याची सुंता

पौलाने तीमथ्याची सुंता केली कारण ते यहूदी आणि परराष्ट्रीय लोकांना येशूचे संदेश सांगत होते. पौलाची इच्छा होती की यहूदी लोकांनी हे जाणून घ्यावे की त्याने मोशेच्या नियम शास्त्राचे पालन केले जरी यरुशलेममधील मंडळीच्या पुढाऱ्यांनी असे सुचविले होते की ख्रिस्ती लोकांची सुंता करण्याची गरज नाही.

एक स्त्री जिच्याकडे शकुण सांगण्याचा आत्मा होता

पुष्कळ लोकांना भविष्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते, परंतु मोशेच्या नियमात असे म्हटले आहे की मृत लोकांच्या आत्म्याबरोबर बोलून शकुण पाहणे हे पाप आहे. ही स्त्री भविष्याबद्दल खूप चांगले सांगू शकत होती. ती गुलाम होती आणि तिच्या मालकांनी तिच्या कामातून खूप पैसे कमावले. पौलाची इच्छा होती की तिने पाप करण्याचे थांबवावे, म्हणून त्याने आत्म्याला तिला सोडून देण्यास सांगितले. लूक असे म्हणत नाही की तिने येशूचे अनुकरण केले किंवा तिच्याबद्दल आम्हाला काही सांगत.