mr_tn/act/15/intro.md

22 lines
3.5 KiB
Markdown

# प्रेषित 15 सामान्य नोंदी
## रचना आणि स्वरूप
काही भाषांतरांनी वाचण्यासाठी सुलभ व्हावे म्हणून पद्याची प्रत्येक ओळ ही उर्वरित मजकूरापेक्षा अधिक उजवीकडे मांडली आहेत. यूएलटी हे पद्यासह 15: 16-17 करते ज्यांना जुन्या करारामधून उद्धृत केले आहे.
या अध्यायात लूकने वर्णन केलेल्या बैठकीस सामान्यपणे ""यरुशलेम परिषद"" म्हणतात. हाच एक काळ होता जेव्हा अनेक मंडळीचे पुढारी मोशेच्या संपूर्ण नियमशास्त्राचे पालन करायचे होते का हे ठरविण्याकरिता एकत्र आले होते.
## या अध्यायातील विशेष संकल्पना
### बंधू
या प्रकरणात लूक ""बंधू"" या शब्दाने सहकारी यहूद्यांच्या ऐवजी सहकारी ख्रिस्ती लोकांना उल्लेख करतो.
### मोशेच्या नियमांचे पालन करणे
काही विश्वासणाऱ्यांना असे वाटत होते की परराष्ट्रीय ख्रिस्ती लोकांनी सुंता करावी कारण देवाने अब्राहामाला व मोशेला सांगितले होते की प्रत्येकजण जो त्याच्याशी संबंधित आहे त्याची सुंता केली पाहिजे आणि हा असा नियम होता जो नेहमीच अस्तित्वात होता. पण पौल व बर्णबा यांनी पाहिले की, देवाने सुंता न केलेल्या परराष्ट्रीय लोकांना पवित्र आत्म्याचे दान दिले, म्हणून यहूदीतर लोकांची सुंता करावी अशी त्यांची इच्छा नव्हती. त्यांनी काय करावे हे मंडळीच्या पुढाऱ्यानी ठरवावे म्हणून दोन्ही गट यरुशलेमला गेले.
### ""मूर्ती, रक्त, गुंतागुंतीची वस्तू आणि लैंगिक अनैतिकतांकडून बलिदान असलेल्या गोष्टींपासून दूर राहा""
हे शक्य आहे की मंडळीच्या नेत्यांनी या कायद्यांनुसार हे ठरवले असेल जेणेकरून यहूदी व परराष्ट्रीय लोक एकत्र राहू शकतील आणि तेच अन्न सुद्धा एकत्र खाऊ शकतील.