mr_tn/act/11/intro.md

1.6 KiB

प्रेषित 11 सामान्य टिपा

या अध्यायातील विशेष संकल्पना

""परराष्ट्रीय लोकांना देखील देवाचे वचन मिळाले होते""

जवळजवळ सर्वप्रथम विश्वासणारे यहूदी होते. लूकने या अध्यायात लिहिले आहे की अनेक परराष्ट्रीयांनी येशूवर विश्वास ठेवण्यास सुरवात केली. त्यांना विश्वास होता की येशूविषयीचा संदेश खरा आहे आणि म्हणूनच ""देवाचे वचन प्राप्त करणे"" सुरू झाले. यरुशलेममधील काही विश्वासणाऱ्यांनी असा विश्वास ठेवला नाही की, परराष्ट्रीय लोक खरोखरच येशूचे अनुकरण करू शकतील, म्हणून पेत्र त्यांच्याकडे गेला आणि त्याच्याबरोबर काय घडले हे त्यांना सांगितले की कसे परराष्ट्रीय लोकांनी देवाचे वचन प्राप्त केले आणि पवित्र आत्मा प्राप्त केला.