mr_tn/act/09/intro.md

3.7 KiB

प्रेषित 09 सामान्य नोंदी

या अध्यायातील विशेष संकल्पना

""मार्ग""

निश्चितपणे कोणी हे सांगू शकत नाही की ज्याने प्रथम ""मार्गांचे अनुयायी"" असे म्हणण्यास कोणी सुरु केले. हे कदाचित बहुतेकदा विश्वासणाऱ्यांनी स्वतःला असे म्हटले असावे कारण पवित्र शास्त्रामध्ये वारंवार एखाद्या व्यक्तीबद्दल बोलले जाते जसे की ती व्यक्ती पायवाट किंवा त्या ""मार्गावर"" चालत होता. हे खरे असल्यास, विश्वासणारे देव संतुष्ट होत असलेल्या मार्गाने जगण्याद्वारे ""परमेश्वराच्या मार्गावर चालत"" होते.

""दिमिष्क येथील सभास्थानासाठी पत्रे""

पौलाने ""पत्रे"" मागितली होती ती कायदेशीर होती ज्यामध्ये त्याला ख्रिस्ती लोकांना तुरुंगात ठेवण्याची परवानगी देण्यात आली. दिमिष्क मधील सभास्थानातील पुढाऱ्यांनी या पत्रांची आज्ञा पाळली असेल कारण ती मुख्य याजकांनी लिहिली होती. जर रोमी लोकांनी हे पत्र पाहिले, त्यांनी शौलाला ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यास परवानगी दिली असती कारण त्यांनी यहुदी लोकांना त्यांच्या धार्मिक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना जे पाहिजे ते करण्यास परवानगी दिली होती.

या अध्यायामध्ये अन्य संभाव्य भाषांतर अडचणी

शौल जेव्हा येशूला भेटला तेव्हा त्याने काय पाहिले

ते स्पष्ट आहे की शौलाला एक प्रकाश दिसला आणि तो या प्रकाशाने ""जमिनीवर पडला."" काही लोक असा विचार करतात की शौलाला हे माहित होते की देव त्याच्याशी एक मानवी रुपामध्ये न दिसता बोलतो, कारण पवित्र शास्त्र बऱ्याचदा देवाविषयी प्रकाश असे बोलतो आणि प्रकाशात राहतो. इतर लोक विचार करतात की नंतर त्याच्या आयुष्यात तो असे म्हणू शकतो की , ""मी प्रभू येशूला पाहिले आहे"" कारण तो मानवी मनुष्य होता जो त्याने येथे पाहिला.