mr_tn/act/08/intro.md

3.2 KiB

प्रेषित 08 सामान्य नोंदी

रचना आणि स्वरूप

काही भाषांतरांनी वाचण्यासाठी सुलभ व्हावे म्हणून पद्याची प्रत्येक ओळ ही उर्वरित मजकूरापेक्षा अधिक उजवीकडे मांडली आहेत. ULT हे पद्यासह करते ज्याला 8:32-33 मध्ये जुन्या करारातून उद्धृत केले आहे.

वचन 1 मधील पहिले वाक्य अध्याय 7 मधील घटनांचे वर्णन समाप्त करतो. लूक त्याच्या इतिहासाचा एक नवीन भाग शब्दांद्वारे सुरु करतो. ""तर मग सुरुवात झाली.""

या अध्यायातील विशेष संकल्पना

पवित्र आत्मा प्राप्त करणे

या अध्यायात प्रथमच लूक पवित्र आत्मा प्राप्त करणाऱ्या लोकांविषयी बोलतो (प्रेषितांची कृत्ये 8:15-19). पवित्र आत्म्याने विश्वासू लोकांना निरनिराळ्या भाषा बोलण्यास, आजाऱ्यांना बरे करण्यास आणि समुदाय म्हणून जगण्यास सक्षम केले होते आणि त्याने स्तेफनाला भरले होते. पण जेव्हा यहूदी विश्वासणाऱ्यांना तुरूंगात टाकू लागले तेव्हा जे विश्वासणारे यरुशलेम सोडू शकत होते ते सोडून गेले आणि जेव्हा ते गेले, तेव्हा त्यांनी लोकांना येशूविषयी सांगितले. ज्यांनी येशूविषयी ऐकले त्या लोकांना पवित्र आत्मा मिळाला, मंडळीच्या पुढाऱ्याना हे माहित होते की ते लोक खरोखरच विश्वासू बनले आहेत.

घोषित केलेले

हा अध्याय इतर कोणत्याही पुस्तकापैकी विश्वासणारे वचन घोषित करत आहेत , सुवार्ता घोषित करीत आहेत आणि येशू हा ख्रिस्त आहे याबद्दल सांगतो. ""घोषणा"" हा शब्द ग्रीक शब्दाचा अनुवाद करतो ज्याचा अर्थ काहीतरी चांगली बातमी सांगणे होय.