mr_tn/act/07/intro.md

5.8 KiB

प्रेषित 07 सामान्य नोंदी

रचना आणि स्वरूप

काही भाषांतरांनी वाचण्यासाठी सुलभ व्हावे म्हणून पद्याची प्रत्येक ओळ ही उर्वरित मजकूरापेक्षा अधिक उजवीकडे मांडली आहेत. ULT हे पद्यासह करते जे जुन्या करारातून 7:42-43 आणि 49-50 मध्ये उद्धृत केले आहे.

असे दिसते की 8:1 हे या अध्यायाच्या कथेचा भाग आहे.

या अध्यायातील विशेष संकल्पना

""स्तेफन म्हणाला""

स्तेफनाने इस्राएलाचा इतिहास अगदी थोडक्यात सांगितला. देवाने ज्या लोकांना निवडले त्याच लोकांनी त्याला नाकारले होते त्या काळाकडे त्याने विशेष लक्ष दिले. कथा संपल्यावर त्याने म्हटले की ज्या यहूदी पुढाऱ्याशी बोलत होते त्यांनी येशूला नाकारले होते त्याप्रमाणेच दुष्ट इस्राएली लोकांनी देवाने नेमलेल्या पुढाऱ्यांना नेहमीच नाकारले होते.

""पवित्र आत्म्याने परीपूर्ण""

पवित्र आत्मा पूर्णपणे स्तेफनवर नियंत्रण ठेवत असे जेणेकरून त्याने केवळ देवाला काय सांगायचे ते सांगितले.

पुर्वाभास

जेव्हा एखादा लेखक त्या वेळी महत्त्वपूर्ण नसलेल्या गोष्टीविषयी बोलतो परंतु नंतर त्या महत्त्वपूर्ण असेल, याला पुर्वाभास म्हणतात. शौल ज्याला पौल म्हणून सुद्धा ओळखले या भागामध्ये तो महत्त्वाचा व्यक्ती नसला तरीही लूकने त्याचा उल्लेख केला. कारण पौल उर्वरित प्रेषितांच्या पुस्तकात महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे.

या अध्यायातील महत्त्वपूर्ण अलंकार

लागू माहिती

स्तेफन मोशेचे नियमशास्त्र माहीत असलेल्या यहूद्यांशी बोलत होता, म्हणून त्याने त्याचे ऐकणाऱ्यांना आधीच माहित असलेल्या गोष्टींची व्याख्या केली नाही. परंतु आपल्याला यापैकी काही गोष्टी समजावून सांगण्याची आवश्यकता असू शकेल जेणेकरून आपल्या वाचकांना हे समजेल की स्तेफन काय म्हणत आहे. उदाहरणार्थ, आपल्याला हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की जेव्हा योसेफाच्या भावांनी ""त्याला मिसरामध्ये विकले"" ([प्रेषितांची कृत्ये 7: 9] (../../प्रेषितांची कृत्ये/ 07/0 9. md)), योसेफ मिसरामध्ये गुलाम होणार होता. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

लक्षणा

स्तेफनाने ""मिसरावर"" आणि फारोच्या घराण्यावरील सर्वांवर योसेफने शासन केल्याचे सांगितले. याचा अर्थ असा झाला की योसेफाने फारोच्या घराण्यात, मिसरच्या लोकांमध्ये व लोकांच्या संपत्तीवर राज्य केले. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

या अध्यायामध्ये इतर संभाव्य अनुवाद अडचणी

पार्श्वभूमी ज्ञान

स्तेफन याने ज्या घटनांबद्दल सांगितले त्याबद्दल यहूदी पुढाऱ्यांना आधीच बरेच काही माहित होते. उत्पत्तीच्या पुस्तकात मोशेने जे लिहिले होते ते त्यांना ठाऊक होते. जर उत्पत्तीचे पुस्तक आपल्या भाषेत भाषांतरित केलेले नसेल तर आपल्या वाचकांना हे समजणे कठिण आहे की स्तेफनाने काय सांगितले.