mr_tn/3jn/front/intro.md

5.4 KiB

3 योहानचा परिचय

भाग 1: सामान्य परिचय

3 योहानच्या पुस्तकाची रूपरेषा

1.a परिचय (1:1) . आदरातिथ्य दाखवण्या विषयीच्या सूचना आणि प्रोत्साहन (1:2-8)

  1. दियत्रेफस आणि देमेत्रिय (1:9-12)
  2. निष्कर्ष (1:13-14)

3 योहान हे पुस्तक कोणी लिहिले?

हे पत्र त्याच्या लेखकाचे नाव सांगत नाही. लेखक स्वतःची “वडील” म्हणून ओळख करून देतो (1:1). हे पत्र कदाचित प्रेषित योहानाकडून त्याच्या आयुष्याच्या शेवटी लिहिण्यात आले असावे.

योहानाने हे पत्र गायस नावाच्या एका विश्वासणाऱ्याला लिहिले. त्याने गायसला सूचना दिली की, जे त्याचे सहकारी विश्वासू त्याच्या भागातून प्रवास करतील त्यांचे आदरातिथ्य करणारा बन.

या पुस्तकाच्या शीर्षकाचे भाषांतर कसे केले जाऊ शकते?

भाषांतरकार या पुस्तकाला त्याच्या “3 योहान” किंवा “तिसरे योहान” या पारंपारिक नावाने संबोधण्याची निवड करू शकतात. किंवा ते स्पष्ट शीर्षकाची निवड करू शकतात, जसे की “योहानापासूनचे तिसरे पत्र” किंवा “योहानाने लिहिलेले तिसरे पत्र.” (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

भाग 2: महत्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक संकल्पना

आदरातिथ्य म्हणजे काय?

प्राचीनांमध्ये पश्चिमी भागाच्या जवळ आदरातिथ्य ही एक महत्वाची संकल्पना होती. परदेशी किंवा बाहेरच्या लोकांच्या बरोबर स्नेहपूर्ण रीतीने वागणे आणि गरज असल्यास त्यांना मदत करणे महत्वाचे होते. 2 योहानमध्ये, योहान ख्रिस्ती लोकांना खोट्या शिक्षकांचे आदरातिथ्य करण्यापासून परावृत्त करतो. 3 योहानमध्ये, योहान ख्रिस्ती लोकांना विश्वासू शिक्षकांचे आदरातिथ्य करण्यास प्रोत्साहित करतो.

भाग 3: महत्वाच्या भाषांतराच्या समस्या

या पत्रामध्ये लेखक कौटुंबिक नातेसंबंधांचा उपयोग कसा करतो?

लेखक “बंधू” आणि “मुले” या संज्ञांचा उपयोग ज्या प्रकारे करतो ते गोंधळात टाकणारे आहे. वचने “बंधुंनो” या संज्ञेचा उपयोग सहसा यहुद्यांना संदर्भित करण्यासाठी करतात. परंतु या पत्रामध्ये योहान त्याचा उपयोग ख्रिस्ती लोकांना संदर्भित करण्यासाठी करतो. तसेच योहान काही विश्वासू लोकांना “मुले” म्हणून संबोधतो. हे ते विश्वासू आहेत ज्यांना त्याने ख्रिस्ताचे अनुसरण करण्यास शिकवले.

योहान “परराष्ट्रीय” या संज्ञेचा सुद्धा उपयोग ज्या प्रकारे करतो, ते गोंधळात टाकणारे आहे. वचने “परराष्ट्रीय” या संज्ञेचा उपयोग सहसा यहुदी नसलेल्यांना संदर्भित करण्यासाठी करतात. परंतु या पत्रामध्ये योहान त्याचा उपयोग ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला नाही त्यांना संदर्भित करण्यासाठी करतो.