mr_tn/2pe/front/intro.md

8.5 KiB

2 पेत्र याचा परिचय

भाग 1: सामान्य परिचय

2 पेत्र या पुस्तकाची रूपरेषा

  1. परिचय (1:1-2)
  2. परिचय (1:1-2)
  3. चांगले जीवन जगण्याची आठवण करून दिली कारण देवाने त्यासाठी आपल्याला सक्षम केले आहे (1:3-21)
  4. येशूच्या दुसऱ्या आगमनासाठी तयार राहण्यासाठी प्रोत्साहन (3:1-17)

2 पेत्र हे पुस्तक कोणी लिहिले?

लेखक स्वतःची ओळख शिमोन पेत्र अशी करून देतो. शिमोन पेत्र हा प्रेषित होता. त्याने 1 पेत्र हे पुस्तक सुद्धा लिहिले. कदाचित पेत्राने हे पत्र तुरुंगात असताना त्याच्या मरण्याच्या थोडे अगोदर लिहिले असावे. पेत्र या पत्राला दुसरे पत्र म्हणतो म्हणून याची तारीख आपण पहिल्या पत्रानंतरची समजू शकतो. त्याने हे पत्र त्याच श्रोत्यांना संबोधित करण्यासाठी लिहिले जे पहिल्या पत्राचे श्रोते होते. हे श्रोते कदाचित आशिया मायनरमध्ये विखुरलेले ख्रिस्ती लोक असावेत.

2 पेत्र हे पुस्तक कश्याबद्दल आहे?

पेत्राने हे पत्र विश्वासणाऱ्यांना चांगले जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी लिहिले. त्याने श्रोत्यांना खोट्या संदेष्ट्यांबद्दल जे म्हणतात की येशूला परत येण्यासाठी खूप वेळ लागणार आहे त्याबद्दल चेतावणी दिली. त्याने त्यांना सांगितले की येशू परत येण्यामध्ये आवकाश नाही. त्याऐवजी, देव त्यांना पश्चात्ताप करण्याची संधी देत आहे जेणेकरून ते वाचले जातील.

या पुस्तकाच्या शीर्षकाचे भाषांतर कसे केले जाऊ शकते?

भाषांतरकार या पुस्तकाचे भाषांतर त्याच्या पारंपारिक शीर्षकाने “2 पेत्र” किंवा “दुसरे पेत्र” याने करू शकतात. किंवा ते स्पष्ट शीर्षकाची निवड करू शकतात, जसे की “पेत्राचे दुसरे पत्र” किंवा “पेत्राने लिहिलेले दुसरे पत्र.” (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

भाग 2: महत्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक संकल्पना

पेत्र ज्यांच्याविरुद्ध बोलला ते लोक कोण होते?

ज्या लोकांच्या विरुद्ध पेत्र बोलला ते कदाचित अज्ञातवासी म्हणून ओळखले गेले असावे. या शिक्षकांनी स्वतःच्या फायद्यासाठी वचनांच्या शिक्षणाला विकृत केले. ते अनैतिक मार्गाने जगले आणि त्यांनी इतरांना सुद्धा तसेच जगायला शिकवले.

देव प्रेरित वचन याचा अर्थ काय?

वचनांचे तत्व हे खूप महत्वाचे आहे. 2 पेत्र वाचकांना हे समजण्यासाठी मदत करते की जरी प्रत्येक वचन लिहिणाऱ्या लेखकाची स्वतःची वेगळी पद्धत असते, तरी देव हा वचनाचा खरा लेखक आहे (1:20-21).

भाग 3: भाषांतराच्या महत्वाच्या समस्या

एकवचनी आणि अनेकवचनी “तु”

या पुस्तकात “मी” हा शब्द पेत्राला संदर्भित करतो. आणि “तुम्ही” हा शब्द नेहमी अनेकवचनी आहे आणि तो पेत्राच्या श्रोत्यांना संदर्भित करतो. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-exclusive]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-you]])

2 पेत्राच्या पुस्तकाच्या मजकुरांमध्ये महत्वाच्या कोणत्या समस्या आहेत?

खालील काही वचनांसाठी, पवित्रशास्त्राच्या काही नवीन आवृत्त्या जुन्या आवृत्त्यांपेक्षा वेगळ्या आहेत. युएलटी मजकुरामध्ये आधुनिक वाचन आहे आणि जुने वाचन तळटीप मध्ये ठेवलेले आहे. पवित्र शास्त्राचे भाषांतर सामान्य क्षेत्रामध्ये अस्तित्वात असेल तर भाषांतरकारांनी त्या आवृत्त्यांमध्ये मिळणाऱ्या वाचनाचा विचार करावा. जर नसेल तर भाषांतरकारांनी आधुनिक वाचनाचे अनुसरण करण्याचे सुचवले जाते.

  • “न्याय होईपर्यंत खाली अंधारात कैदेत ठेवले” (2:4). काही नवीन आवृत्त्यांमध्ये आणि जुन्या आवृत्त्यांमध्ये “न्याय होईपर्यंत डोहाच्या खालील अंधारामध्ये ठेवले” असे आहे.
  • “ते तुमच्याबरोबर सण साजरे करत असताना त्याची कपटाची कृत्ये उपभोगतात” (2:13). काही आवृत्त्यांमध्ये “तुमच्याबरोबर प्रेमाच्या सणातील सण साजरे करत असताना ते त्यांच्या कृत्यांचा उपभोग घेतात” असे आहे.
  • “बौर” (2:15). काही इतर आवृत्त्या “बोसोर” असे वाचतात.
  • “सृष्टीतत्वे अग्नीद्वारे जाळली जातील आणि पृथ्वी आणि तिच्यातील कृत्ये प्रगट होतील” (3:10).इतर आवृत्त्यांमध्ये “सृष्टीतत्वे अग्नीद्वारे जाळली जातील आणि पृथ्वी आणि तिच्यावरील कृत्ये सुद्धा जाळली जातील” असे आहे.

(पहा: rc://*/ta/man/translate/translate-textvariants)