mr_tn/2pe/01/intro.md

3.7 KiB

2 पेत्र 01 सामान्य माहिती

स्वरूप आणि संरचना

1-2 वचनात पेत्र औपचारिकरित्या या पत्राची ओळख करून देतो. पूर्वेकडील भागात प्राचीन काळी लेखक बऱ्याचदा पत्राची सुरवात या प्रकारे करत.

या अधिकारातील विशेष संकल्पना

देवाचे ज्ञान

देवाचे ज्ञान असणे म्हणजे त्याचे असणे किंवा त्याच्याबरोबर संबंध असणे. येथे “ज्ञान” हे मानसिकदृष्ट्या देव माहित असणे याच्यापेक्षा काहीतरी जसे आहे. हे ते ज्ञान आहे जे देवाला एखाद्या मनुष्याला वाचवावयास भाग पाडते आणि त्याला दया आणि शांती देते. (पहा: rc://*/tw/dict/bible/other/know)

दैवी जीवन जगणे

पेत्र शिकवतो की देवाने विश्वासणाऱ्यांना दैवी जीवन जगण्यासाठी ज्या कशाची गरज आहे ते सर्व दिले आहे. म्हणून, विश्वासणाऱ्यांनी देवाची आज्ञा अधिकाधिक पाळण्यासाठी ते करू शकतील ते सर्व काही केले पाहिजे. जर विश्वासणारे हे करत राहतील, तर ते त्यांच्या येशुबरोबर असलेल्या संबंधाद्वारे परिणामकारक आणि उत्पादक बनू शकतात. तथापि, जर विश्वासणारे दैवी जीवन जगत राहिले नाहीत तर, देवाने त्यांना वाचवण्यासाठी ख्रिस्ताद्वारे जे काही केले ते विश्वासणारे विसरले असे होईल. (पहा: [[rc:///tw/dict/bible/kt/godly]] आणि [[rc:///tw/dict/bible/kt/save]])

या अधिकारातील भाषांतराच्या इतर शक्य अडचणी

वचनाचे सत्य

पेत्र शिकवतो की या वचनात केलेल्या भविष्यवाण्या या मनुष्यांद्वारे केलेल्या नाहीत. पवित्र आत्म्याने देवाचे संदेश मनुष्यांवर प्रगट केले जे ते बोलले किंवा त्यांनी लिहून काढले. अजून, पेत्र आणि इतर प्रेषित लोकांना येशुबद्दल जे काही सांगतात त्या कथा त्यांनी बनवलेल्या नाहीत. येशूने जे काही केले ते त्याचे साक्षीदार आहेत आणि देवाने येशूला त्याचा पुत्र म्हणल्याचे त्यांनी ऐकले आहे.