mr_tn/1pe/front/intro.md

6.3 KiB

1 पेत्राचा परिचय

भग 1: सामान्य परिचय

1 पेत्राची रूपरेषा

  1. परिचय (1:1-2)
  2. विश्वासणाऱ्यांच्या तारणाबद्दल देवाची स्तुती (1:3-2:10)
  3. ख्रिस्ती जीवन (2:11-4:11)
  4. त्रासाच्या काळात चिकाटी न सोडण्याबद्दल प्रोत्साहन (4:12-5:11)
  5. समाप्ती (5:12-14)

1 पेत्र हे पुस्तक कोणी लिहिले?

1 पेत्र हे पुस्तक प्रेषित पेत्राने लिहिले. त्याने हे पत्र आशिया मायनर मध्ये विखुरलेल्या परराष्ट्रीय ख्रिस्ती लोकांसाठी लिहिले.

1 पेत्र हे पुस्तक कशाबद्दल आहे?

पेत्राने सांगितले की त्याचा हे पत्र लिहिण्यामागचा हेतू “तुम्हाला प्रोत्साहन देणे आणि हीच देवाची खरी दया आहे याबद्दल साक्ष देणे” हा होता (5:12). त्याने ख्रिस्ती लोकांना त्यांचा छळ होत असताना सुद्धा देवाची आज्ञा पाळत राहण्यासाठी प्रोत्साहित केले. त्याने त्यांना असे करण्यास सांगितले कारण येशू लवकर परत येणार आहे. पेत्राने अधिकारी असलेल्या लोकांना समर्पित होण्याबद्दल सुद्धा ख्रिस्ती लोकांना सूचना दिल्या.

या पुस्तकाच्या शीर्षकाचे भाषांतर कसे केले जाऊ शकते?

भाषांतरकार या पुस्तकाला त्याच्या पारंपारिक नावाने “1 पेत्र” किंवा पहिले पेत्र” बोलावू शकतात. किंवा ते स्पष्ट शीर्षकाची निवड करू शकतात, जसे की “पेत्रापासूनचे पहिले पत्र” किंवा “पेत्राने लिहिलेले पहिले पत्र” (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

भाग 2: महत्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक संकल्पना

ख्रिस्ती लोकांना रोममध्ये कशी वागणूक दिली गेली?

पेत्र कदाचित रोममध्ये होता जेंव्हा त्याने हे पत्र लिहिले. त्याने रोमला “बाबेल” हे चिन्हित नाव दिले (5:13). हे असे दिसून येते की जेंव्हा पेत्राने हे पत्र लिहिले तेंव्हा रोमी लोक ख्रिस्ती लोकांचा अतोनात छळ करत होते.

भाग 3: महत्वाच्या भाषांतराच्या अडचणी

एकवचनी आणि अनेकवचनी “तु”

या पुस्तकात “मी” हा शब्द पेत्राला, दोन जागा सोडून संदर्भित करतो: 1 पेत्र 1:16 आणि 1 पेत्र 2:6. “तुम्ही” हा शब्द नेहमी अनेकवचनी आहे आणि तो पेत्राच्या श्रोत्यांना संदर्भित करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

1 पेत्र या पुस्तकातील मजकुरामधील मोठ्या समस्या काय आहेत?

*“तुम्ही तुमच्या आत्म्याला सत्याचे आज्ञापालन करण्याद्वारे शुद्ध बनवले आहे. हे प्रामाणिक बंधुप्रीतीच्या हेतूसाठी होते; म्हणून मनातील आस्थेने एकमेकांवर प्रेम करा” (1:22). युएलटी, युएसटी, आणि बऱ्याच इतर आधुनिक आवृत्त्या या प्रकारे वाचतात. काही जुन्या आवृत्त्या या प्रकारे वाचतात “तुम्ही आत्म्याच्या मदतीने सत्याचे आज्ञापालन करण्याद्वारे प्रामाणिक बंधुप्रीतीच्या हेतूसाठी तुमच्या आत्म्याला शुद्ध बनवले आहे, म्हणून मनातील आस्थेने एकमेकांवर प्रेम करा.”

जर सामान्य क्षेत्रामधील पवित्रशास्त्राचे भाषांतर अस्तित्वात असेल तर भाषांतरकारांनी त्या आवृत्त्यांमध्ये आढळणाऱ्या वाचनाला गृहीत धरावे. जर नसेल तर, भाषांतरकारांना सुचविले जाते की त्यांनी आधुनिक वाचनाचे अनुसरण करावे.

(पहा: rc://*/ta/man/translate/translate-textvariants)