mr_tn/1pe/03/intro.md

2.8 KiB

1 पेत्र 03 सामान्य माहिती

स्वरूप आणि संरचना

काही भाषांतरे पद्याची प्रत्येक ओळ ही वाचण्यासाठी सुलभ व्हावी म्हणून इतर मजकुरांपेक्षा अधिक उजवीकडे ठेवत. युएलटी ने हे जुन्या करारातील 3:10-12 या वचनात उधृत केलेल्या पद्यासह केले आहे.

या अधिकारातील विशेष संकल्पना

“बाहेरील दागिने”

बहुतांश लोकांची चांगले दिसण्याची इच्छा असते जेणेकरून इतर लोकांना ते आवडतील आणि ते चांगले आहेत असा विचार करतील. स्त्रिया विशेषकरून चांगले दिसण्यासाठी चांगले कपडे आणि दागिने घालण्याविषयी अधिक काळजी घेतात. पेत्र असे म्हणत आहे की, स्त्री काय विचार करते आणि काय बोलते आणि काय करते हे देवासाठी ती कशी दिसते यापेक्षा महत्वाचे आहे.

ऐक्य

पेत्राची इच्छा आहे की त्याच्या वाचकांनी एकमेकांशी सहमत असले पाहिजे. अधिक महत्वाचे, त्याची इच्छा आहे की, त्यांनी एकमेकांवर प्रेम केले पाहिजे आणि एकमेकांबद्दल सहनशील असले पाहिजे.

या अधिकारातील महत्वाचे अलंकार

रूपक

पेत्र स्तोत्राला उधृत करतो जे देवाचे वर्णन करते जसे की तो एक डोळे, कान आणि चेहरा असलेला मनुष्य आहे. तथापि, देव आत्मा आहे, म्हणून त्याला भौतिक डोळे किंवा कान किंवा भौतिक चेहरा नाही. परंतु लोक काय करतात हे त्याला माहित आहे आणि तो दुष्ट लोकांच्या विरुद्ध कृती करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)