mr_tn/1jn/front/intro.md

12 KiB

1 योहानचा परिचय

भाग 1:सामान्य परिचय

1 योहानाच्या पुस्तकाची रूपरेषा

1.. परिचय (1:1-4)

  1. .ख्रिस्ती जीवन (1:5-3:10)
  2. एकमेकांवर प्रीती करण्याची आज्ञा (3:11-5:12)
  3. निष्कर्ष (5:13-21)

1 योहान हे पुस्तक कोणी लिहिले?

हे पुस्तक लेखकाचे नाव सांगत नाही, तथापि, सुरूवातीच्या ख्रिस्ती काळापासून, बहुतांश ख्रिस्ती लोक असा विचार करतात की, प्रेषित योहान हाच लेखक आहे. त्याने योहानकृत शुभवर्तमान सुद्धा लिहिले.

1 योहान हे पुस्तक कश्याबद्दल आहे?

योहानाने हे पत्र ख्रिस्ती लोकांना लिहिले जेव्हा खोटे शिक्षक त्यांना त्रास देत होते. योहानाने हे पत्र लिहिले कारण विश्वसणाऱ्यांना पापापासून परावृत्त करावे अशी त्याची इच्छा होती. तो विश्वसणाऱ्यांचे खोट्या शिक्षणापासून रक्षण करू इच्छित होता, आणि त्याला त्यांना खात्री द्यायची होती की, त्यांचे तारण झाले आहे

या पुस्तकाच्या शीर्षकाचे भाषांतर कसे केले जाऊ शकते?

भाषांतरकार या पुस्तकाला त्याच्या पारंपारिक नावाने “1 योहान” किंवा “पहिला योहान” असे संबोधित करण्याची निवड करू शकतात. किंवा ते अधिक स्पष्ट शीर्षकाची निवड करू शकतात, जसे की, “योहानापासूनचे पहिले पत्र” किंवा “योहानाने लिहिलेले पहिले पत्र.” (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

भाग 2: महत्वाच्या धार्मिक आणि सांकृतिक संकल्पना

योहान ज्यांच्या विरुद्ध बोलला ते कोण लोक होते?

ज्या लोकांच्या विरुद्ध योहान बोलला ते कदाचित अज्ञातवासी म्हणून ओळखले गेले असावे. या लोकांचा विश्वास होता की भौतिक जग दुष्ट आहे. म्हणून त्यांनी विश्वास ठेवला की येशू दैवी होता, त्यांनी तो खरोखर मनुष्य होता हे नाकारले. याचे कारण त्यांना असे वाटले की देव मनुष्य बनणार नाही, कारण भौतिक शरीर हे दुष्ट आहे. (पहा: rc://*/tw/dict/bible/kt/evil)

भाग 3: भाषांतराच्या महत्वाच्या समस्या

1 योहान मधील “राहतील,” “राहणे” आणि “वस्ती करणे” या शब्दांचा अर्थ काय होतो?

योहान बऱ्याचदा “राहतील,” “राहणे’ आणि “वस्ती करणे” या शब्दांचा रूपक म्हणून उपयोग करतो. जर येशूचे वचन एखाद्या विश्वासूमध्ये राहिले, तर त्याचा येशूवरील विश्वास अधिक वाढत जातो आणि तो येशूला जवळून ओळखू लागतो असे योहान सांगतो. आणखी योहान एखादा आत्मिकदृष्ट्या दुसऱ्याशी जोडला जातो, जसे की तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीमध्ये “राहतो” हे सुद्धा सांगतो. ख्रिस्ती लोकांना ख्रिस्तामध्ये आणि देवामध्ये “राहण्यास” सांगितले आहे. पिता पुत्रामध्ये “राहतो” आणि पुत्र पित्यामध्ये “राहतो” असे देखील सांगितले आहे. पुत्र विश्वासणाऱ्यांच्यामध्ये “राहतो” असे सांगितले आहे. पवित्र आत्मा सुद्धा विश्वासणाऱ्यांच्यामध्ये “राहतो” असे सांगितले आहे.

अनेक भाषांतरकारांना या संकल्पनांना त्यांच्या भाषेत अगदी त्याच प्रकारे व्यक्त करणे अशक्य वाटू शकते. उदाहरणार्थ, जेव्हा योहान म्हणतो की, “जो असे म्हणतो की तो देवामध्ये राहतो” (1 योहान 2:6) तेव्हा त्याचा हेतू ख्रिस्ती लोक आत्मिकदृष्ट्या देवाबरोबर राहतात हे व्यक्त करण्याचा होता. यूएसटी असे सांगते की, “जर आपण असे म्हणतो की आपले देवाबरोबर ऐक्य आहे,” परंतु भाषांतरकारांकडे या संकल्पनेला व्यक्त करण्यासाठी बऱ्याचदा इतर अभिव्यक्ती मिळू शकतात.

या परिच्छेदात, “देवाचे वचन तुमच्यामध्ये राहते” (1 योहान 2:13), यूएसटी या संकल्पनेला “तुम्ही देवाने दिलेल्या आज्ञांचे पालन करणे सुरु ठेवा” असे व्यक्त करते. अनेक भाषांतरकारांना या भाषांतराचा एक आदर्श म्हणून उपयोग करणे शक्य वाटू शकते.

1 योहान या पुस्तकाच्या मजकुरातील मोठ्या समस्या कोणत्या आहेत?

खालील वचनांसाठी, पवित्र शास्त्राच्या काही आधुनिक आवृत्त्या जुन्या आवृत्त्यांपेक्षा वेगळा अर्थ सांगतात. यूएलटी मजकुरात आधुनिक वाचन आहे आणि जुने वाचन त्यांनी तळटीपमध्ये दिलेले आहे. जर सामान्य क्षेत्रामध्ये पवित्र शास्त्राचे भाषांतर उपलब्ध असेल, तर भाषांतरकार त्या प्रकारच्या आवृत्त्यांचे वाचन करण्याचा विचार करू शकतात. जर नसेल, तर भाषांतरकारांनी आधुनिक वाचनाचे अनुसरण करावे.

  • “आणि आम्ही तुम्हाला या गोष्टी लिहिल्या जेणेकरून आमचा आनंद परिपूर्ण व्हावा” (1:4). काही जुन्या आवृत्त्यांमध्ये, “आणि आम्ही या गोष्टी तुम्हाला लिहित आहोत जेणेकरून तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा” असे आढळते.
  • “आणि तुम्ही सर्व सत्य जाणाल” (2:20). इतर आधुनीक आवृत्त्यांमध्ये “आणि तुम्हा सर्वांकडे ज्ञान असेल” असे आढळते. काही जुन्या आवृत्त्यांमध्ये “आणि तुम्हाला सर्व गोष्टी माहित होतील” असे आढळते.
  • “आणि आम्ही असे आहोत!” (3:1). यूएलटी, यूएसटी, आणि बहुतेक आधुनिक आवृत्त्या असेच वाचतात. काही जुन्या आवृत्त्या या वाक्यांशाला वगळतात.
  • “आणि प्रत्येक आत्मा जो येशूला स्वीकारत नाही तो देवापासून नाही” (4:3). यूएलटी, यूएसटी, आणि बहुतेक आधुनिक आवृत्त्यांमध्ये असेच वाचायला मिळते. काही जुन्या आवृत्त्यांमध्ये “आणि प्रत्येक आत्मा जो येशू शरीरामध्ये आला हे स्वीकारत नाही तो देवापासून नाही” असे वाचायला मिळते.

खालील परीछेदासाठी, भाषांतरकारांना असे सुचवले जाते की, याचे भाषांतर जसे यूएलटी ने केले असे तसेच करावे. तथापि, जर भाषांतरकाराच्या क्षेत्रामध्ये, पवित्र शास्त्राच्या जुन्या आवृत्त्यांनी हा परिच्छेद समाविष्ट केला असेल तर, भाषांतरकार सुद्धा समाविष्ट करू शकतात. जर याला समाविष्ट केले, तर त्याला चौकोनी कंसात ([]) ठेवावे, हे दर्शवण्यासाठी की, हा मजकूर कदाचित 1 योहानच्या मूळ आवृत्तीमध्ये नाही.

  • “कारण तेथे तीन जण आहेत जे साक्ष देतात: आत्मा, पाणी आणि रक्त. हे तीन एकमतात आहेत.” (5:7-8). काही जुन्या आवृत्त्यांमध्ये “कारण तेथे तीनजण आहेत जे स्वर्गात साक्ष देतात: पिता, वचन, आणि पवित्र आत्मा; आणि हे तीन एक आहेत आसे आढळते. आणि हे तीन पृथ्वीवर साक्ष देतात: आत्मा, पाणी व रक्त, आणि हे तीन जसे एकच आहेत.”

(पहा: rc://*/ta/man/translate/translate-textvariants)