mr_tn/1jn/05/intro.md

22 lines
1.9 KiB
Markdown

# 1 योहान 05 सामान्य माहिती
## या अधिकारातील विशेष संकल्पना
### देवापासून जन्मलेली मुले
जेव्हा लोक येशूवर विश्वास ठेवतात, देव त्यांना त्याची मुले बनवतो आणि त्यांना सार्वकालिक जीवन देतो. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/believe]])
### ख्रिस्ती जीवन
जे लोक येशूवर विश्वास ठेवतात त्यांनी देवाची आज्ञा पाळली पाहिजे आणि त्याच्या मुलांवर प्रेम केले पाहिजे.
## या अधिकारातील भाषांतराच्या इतर शक्य अडचणी
### मृत्यू
जेव्हा योहान या अधिकारात मृत्यूबद्दल लिहितो, तो शारीरिक मृत्यूला संदर्भित करतो. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/other/death]])
### “संपूर्ण जग हे दुष्टांच्या अधिकारात आहे”
“दुष्ट” हा वाक्यांश शैतानाला संदर्भित करतो. देवाने त्याला जगावर राज्य करण्याची परवानगी दिली आहे, परंतु शेवटी प्रत्येक गोष्टीवर देवाचे नियंत्रण आहे. देव त्याच्या मुलांना दुष्टापासून सुरक्षित ठेवतो. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/satan]])