mr_tn/1jn/03/intro.md

2.7 KiB

1 योहान 03 सामान्य माहिती

या अधिकारातील विशेष संकल्पना

देवाची मुले

देवाने सर्व लोकांना निर्माण केले आहे, परन्तु जे लोक येशूवर विश्वास ठेवतात त्यांनाच फक्त देवाची मुले बनता येते. (पहा: rc://*/tw/dict/bible/kt/believe)

काईन

काईन हा आदम या पहिल्या मनुष्याचा आणि हव्वा या पहिल्या स्त्रीचा मुलगा होता. त्याने त्याच्या भावाचा द्वेष करून त्याला मारून टाकले. जर वाचकांनी उत्पत्ती वाचले नसेल तर त्यांना काईन कोण होता हे कळणार नाही. जर तुम्ही त्यांना याचे स्पष्टीकरण दिले तर त्यांना समजण्यास मदत होईल.

या अधिकारातील इतर भाषांतराच्या अडचणी

“माहित असणे”

“माहित असणे” हे क्रियापद दोन वेगवेगळ्या प्रकारे या अधिकारात वापरण्यात आलेले आहे. काहीवेळा याचा वापर तथ्य माहित असण्यासाठी केला आहे, जसे की 3:2, 3:5, आणि 3:19 मध्ये. काहीवेळा याचा अर्थ एखाद्याला किंवा एखाद्या गोष्टीला समजणे किंवा अनुभव करणे असा होतो, जसे की 3:1, 3:6, 3:16, आणि 3:20 मध्ये. काही भाषेमध्ये या वेगवेगळ्या अर्थासाठी वेगवेगळे शब्द असू शकतात.

“जो देवाच्या आज्ञा पाळतो तो त्याच्यामध्ये राहतो, आणि देव त्याच्यामध्ये राहतो”

काही विद्वान याचा अर्थ देवाच्या इच्छेमध्ये राहणे आणि तरीपण वाचले न जाणे असा लावतात. (पहा: [[rc:///tw/dict/bible/kt/eternity]] आणि[[rc:///tw/dict/bible/kt/save]])