mr_tn/rev/01/intro.md

42 lines
5.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# प्रकटीकरण 01 सामान्य माहिती
## संरचना आणि स्वरूप
हा अधिकार योहानाला पात्म बेटावर मिळालेल्या दर्शनाची नोंद कशी प्रकटीकरणाच्या पुस्तकात केली आहे हे स्पष्ट करतो.
काही भाषांतरांनी जुन्या करारातील अवतरणे वाचण्यास सुलभ व्हावी म्हणून पृष्ठ भागाच्या उजवीकडे दिलेली आहेत. युएलटी ने हे 7 व्या वचनातील शब्दांसाठी अवतरण केले आहे.
## या अधिकारातील विशेष संकल्पना
### सात मंडळ्या
योहानाने हे पुस्तक आशिया मायनर जो सध्याचा तुर्की हा देश आहे त्यामधील वास्तविक सात मंडळ्याना लिहिले आहे.
### शुभ्र
पवित्र शास्त्र सहसा अशा गोष्टीविषयी बोलते जी एखाद्या व्यक्तीची आहे जसे की “शुभ्र” बनणे. हे त्या व्यक्तीसाठी एक रूपक आणि लक्षण आहे जो यथायोग्य आणि देवाला प्रसन्न करत जगतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/righteous]])
### ”जो आहे, आणि जो होता, आणि जो येणार आहे”
देव आता अस्तिवात आहे. तो नेहमीच अस्तित्वात होता. तो नेहमी अस्तित्वात राहील. तुमच्या भाषेमध्ये असे सांगण्याची वेगळी पद्धत असू शकते.
## या अधिकारातील महत्वाचे अलंकार
### रक्त
रक्त हे मृत्यूसाठी लक्षण आहे. येशूने “त्याच्या रक्ताद्वारे आपल्याला आपल्या पापापासून सोडवले आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
## या अधिकारातील इतर शक्य भाषांतराच्या अडचणी
### “तो मेघांबरोबर येणार आहे”
येशू देवाने त्याला मेलेल्यातून उठवल्यानंतर स्वर्गामध्ये उचलला गेला तेव्हा तो मेघांमध्ये गेला. जेव्हा येशू परत येईल तेव्हा तो “मेघांबरोबर असेल.” तो मेघांवर आरूढ होऊन किंवा त्यावर बसून किंवा मेघातून किंवा इतर कोणत्या तरी मार्गाने “मेघांबरोबर” येईल हे स्पष्ट नाही. तुमचे भाषांतर याला अशा शब्दात व्यक्त करू देत की ते तुमच्या भाषेत स्वाभाविक वाटावे.
### “मनुष्याच्या पुत्रासारखा कोणीएक”
हे येशूला संदर्भित करते. तुम्ही “मनुष्याचा पुत्र” या शब्दाला त्याच शब्दांनी भाषांतरित करायला हवे, ज्या शब्दांनी तुम्ही शुभवर्तमानामध्ये भाषांतर केले आहे, जेव्हा येशू स्वतःला “मनुष्याचा पुत्र” असे संबोधित करतो.
### “सात मंडळ्यांचे दूत”
## येथे “दूत” या शब्दाचा अर्थ “संदेशवाहक” असासुद्धा होतो. हे कदाचित स्वर्गीय अस्तित्वाला, किंवा संदेशवाहकाला, किंवा सात मंडळ्यांच्या पुढाऱ्यांना संदर्भित करू शकते. योहान “दूत” (एकवचन) ये शब्दाचा उपयोग पहिल्या वाचनात आणि पुस्तकात इतर अनेक ठिकाणी करतो. तुमच्या भाषांतरामध्ये सुद्धा त्याच शब्दाचा उपयोग करा.