translationCore-Create-BCS_.../tq_JAS.tsv

25 KiB

1ReferenceIDTagsQuoteOccurrenceQuestionResponse
21:1hfmmयाकोबाने हे पत्र कोणाला लिहिले?याकोबाने हे पत्र बारा वंशांतील पांगलेल्या लोकांना लिहिले.
31:2zycmपरिक्षांना सामोरे जात असताना, याकोब आपल्या वाचकांना कोणती वृत्ती बाळगण्यास सांगतो?याकोब म्हणतो की जेव्हा परिक्षांना सामोरे जातो तेव्हा त्यास आनंद समजा.
41:3s4qdआपल्या विश्‍वासाच्या परिक्षेने काय उत्पन्न होते?आपल्या विश्‍वासाच्या परिक्षेने धीर उत्पन्न होते
51:5jk2mआपल्याला आवश्यकता असल्यास आपण देवाला काय मागावे?आपल्याला आवश्यकता असल्यास आपण देवाकडे ज्ञान मागितले पाहिजे.
61:6s23bसंशय धरणारा कसा असतो?जो संशय घेतो तो समुद्रातील लाटेसारखा असतो जो वाऱ्याने उचंबळल्या जातो..
71:7-8wg4zसंशयाने विचारणाऱ्याने काय मिळण्याची अपेक्षा करावी?जो कोणी संशयाने विचारतो त्याने आपल्याला प्रभूपासून काही मिळेल अशी अपेक्षा करू नये.
81:10u52hधनवानाने नम्र का असावे?धनवानाने नम्र असले पाहिजे कारण तो फुलांप्रमाणेच नाहीसा होईल.
91:11a2s9धनवानाची तुलना कशाबरोबर करता येईल?धनवानाची तुलना गवताच्या फुलाबरोबर केली जाऊ शकते जे कोमेजते, गळून जाते आणि नष्ट होते.
101:12od29विश्वासाच्या परिक्षेत खरे उतरणाऱ्यांना काय मिळणार?जे विश्वासाच्या परिक्षेत टिकतील त्यांना जीवनाचा मुकुट प्राप्त होईल.
111:14x6abमनुष्याला वाईटाचा मोह कशामुळे होतो?एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या वाईट इच्छांमुळे त्याला वाईट गोष्टींचा मोह होतो.
121:15vd5uपरिपक्व झालेल्या पापांचे परिणाम काय आहेत?परिपक्व झालेल्या पापांचे परिणाम म्हणजे मृत्यू होय.
131:17i17zप्रकाशाच्या पित्यापासून काय उतरते?प्रत्येक उत्तम देणगी आणि प्रत्येक परिपूर्ण दान हे प्रकाशाच्या पित्यापासून उतरते.
141:18eqtcदेवाने आपल्याला जीवन देण्यासाठी कोणत्या माध्यमाद्वारे निवडले?देवाने आपल्याला सत्याच्या वचनाद्वारे जीवन देण्यास निवडले.
151:19d5qwयाकोब आपल्याला आपले ऐकणे, बोलणे आणि भावनांबद्दल काय करण्यास सांगतो?याकोब आपल्याला ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमे आणि रागास मंद असण्यास सांगतो..
161:22cqtxआपण कशाप्रकारे स्वतःला फसवू शकतो असे याकोब म्हणतो?याकोब म्हणतो की जर आपण केवळ वचन ऐकणारे बनून त्याप्रमाणे न करणारे असलो तर आपण स्वतःला फसवू शकतो.
171:26gjxcआपण खऱ्या अर्थाने धर्मनिष्ठ बनण्याकरीता कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे?आपण खऱ्या अर्थाने धर्मनिष्ठ बनण्याकरीता जिभेवर नियंत्रण ठेवले पाहिजे.
181:27waeyदेवासमोर शुद्ध आणि निर्मळ धर्माचरण म्हणजे काय?देवासमोर शुद्ध आणि निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ आणि विधवांचा समाचार घेणे आणि जगाच्या भ्रष्टतेपासून स्वतःचे रक्षण करणे.
192:1shcxविश्वासणाऱ्यांनी कोणती वृत्ती बाळगू नये?त्यांच्याठायी पक्षपाताची वृत्ती नसावी.
202:3r2inविश्वासणारे त्यांच्या सभेत प्रवेश करणाऱ्या एका धनवान व्यक्तीला काय सांगत आहेत?ते त्याला समोर येऊन उत्तम ठिकाणी बसण्यास सांगत आहेत.
212:3xoj5विश्वासणारे त्यांच्या सभेत प्रवेश करणाऱ्या एका गरीब व्यक्तीला काय सांगत आहेत?ते त्याला दूर उभे राहण्यास किंवा एका कमी दर्जाच्या ठिकाणी बसण्यास सांगत आहेत.
222:4xhf4विश्वासणारे आपल्या पक्षपातीपणामुळे काय बनले आहेत?ते दुष्ट विचारांचे न्यायाधीश झाले आहेत.
232:5zgpoदेवाने गरिबांना निवडल्यासंबंधी याकोब काय म्हणतो?याकोब म्हणतो की देवाने गरीबांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यासाठी आणि राज्याचे वारस होण्यासाठी निवडले.
242:6-7q92nधनवान लोक काय करत आहेत असे याकोब म्हणतो?याकोब म्हणतो की धनवान लोक बांधवांवर अत्याचार करीत आहेत आणि देवाच्या नावाची निंदा करीत आहेत.
252:10bb6bजो देवाच्या नियमांपैकी एक नियम मोडतो तो कशाविषयी दोषी आहे?जो कोणी देवाच्या नियमांपैकी एकाला मोडतो तो सर्व नियम मोडण्याबाबत दोषी आहे.
262:13er1aज्यांनी दया दाखवली नाही त्यांचे काय होईल?ज्यांनी दया दाखवली नाही त्यांचा दयेविना न्याय होईल.
272:14pr7gजे लोक विश्वास ठेवण्याचा दावा करतात, परंतु गरजूंना मदत करत नाहीत त्यांच्याविषयी याकोब काय म्हणतो?याकोब म्हणतो की जे लोक विश्वास ठेवण्याचा दावा करतात परंतु गरजूंना मदत करत नाहीत तर त्यांचा विश्वास त्यांना तारण्यास समर्थ नाही.
282:16gdhhएखाद्या गरीब व्यक्तीला उबदार व्हा आणि तृप्त व्हा असे म्हटले, परंतु त्यांना काहीही दिले नाही तर काय हे त्यांच्याकरिता मदत होईल?नाही, एखाद्या गरीब व्यक्तीला आपण उबदार होण्यास किंवा खाण्यास काही दिले नाही तर ती त्यांच्याकरिता सहाय्यता होणार नाही.
292:17fpr8विश्वासासह कार्य नसेल, तर ते स्वतःचं काय आहे?विश्वासासह कार्य नसेल तर ते स्वतःच निर्जीव असे आहे.
302:18r57zकशाप्रकारे आपण आपला विश्वास दाखवला पाहिजे असे याकोब म्हणतो?याकोब म्हणतो की आपण आपल्या कृतींद्वारे आपला विश्वास दाखवला पाहिजे.
312:19felvदुष्ट आत्मे आणि विश्वास धरण्याचा दावा करणारे दोघेही कशावर विश्वास ठेवतात?विश्वास धरण्याचा दावा करणारे लोक आणि दुष्ट आत्मे दोघेही एकच देव असल्याचे मानतात.
322:21cex0अब्राहामाने त्याच्या कृतींद्वारे त्याचा विश्वास कसा प्रदर्शित केला?अब्राहामाने वेदीवर इसहाकाचे अर्पण करण्याच्या त्याच्या कृतींद्वारे आपला विश्वास प्रदर्शित केला.
332:22mshqअब्राहामाचा विश्वास कसा परिपूर्ण झाला?अब्राहामाचा विश्वास त्याच्या कृत्यांनी परिपूर्ण झाला.
342:23fs91अब्राहामाच्या विश्वासाने आणि कृतींनी कोणते शास्त्रवचन पूर्ण झाले?“अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले” हे शास्त्रवचन पूर्ण झाले.
352:25eoxeराहाबने तिच्या कृतींमधून तिचा विश्‍वास कसा प्रदर्शित केला?राहाबने दूतांचे स्वागत करून त्यांना दुसऱ्या रस्त्याने पाठवले तेव्हा तिने तिच्या कृतीतून आपला विश्वास दाखविला.
362:26nfj5आत्म्याशिवाय शरीर काय आहेत?आत्म्याशिवाय शरीर हे मृत आहेत.
373:1v31bअनेकांनी शिक्षक होऊ नये असे याकोब का म्हणतो?अनेकांनी शिक्षक होऊ नये कारण त्यांना अधिक न्याय प्राप्त होईल.
383:2ef6yकोण अडखळतो आणि किती प्रकारे?आपण सगळेचं अनेक प्रकारे अडखळतो.
393:2ns4xकोणत्या प्रकारची व्यक्ती आपल्या संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहे?जो व्यक्ती आपल्या शब्दांत अडखळत नाही तो त्याच्या संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहे..
403:3sfjtजहाज चालकाला जिथे जायचे आहे तिथे मोठ्या जहाजाला वळविण्यास कोणती छोटी गोष्ट सक्षम आहे?एक लहान सुकाणु मोठ्या जहाजाला वळविण्यास सक्षम आहे.
413:4s8n4कोणती छोटी गोष्ट अरण्यास मोठी आग लावू शकते?एक लहानशी आग अरण्यास मोठी आग लावण्यास समर्थ आहे.
423:6ebm5पापमय जीभ संपूर्ण शरीराचे काय करू शकते?पापमय जीभ संपूर्ण शरीराला मलिन करण्यास सक्षम आहे.
433:8yjfdमनुष्यांपैकी कोणालाच काय काबूत ठेवता आले नाही?जिभेवर नियंत्रण ठेवण्यास मनुष्यांपैकी कोणीही सक्षम नाही.
443:9av25लोक देवाबरोबर आणि माणसांबरोबर कोणत्या दोन मार्गांद्वारे त्यांच्या जिभेने व्यवहार करतात?एकाच जिभेने ते देवाला स्तुती देतात आणि माणसांना शाप देतात.
453:11id89झऱ्यातून कोणत्या दोन गोष्टी निघू शकत नाही?एकचं झरा गोड आणि कडू हे दोन्ही पाणी देऊ शकत नाही.
463:13gkvcएखादी व्यक्ती ज्ञान आणि समंजसपणा कसे दाखवतील?एखादी व्यक्ती नम्रतेने केलेल्या आपल्या कृतींद्वारे ज्ञान आणि समंजसपणा दाखवतील.
473:15ci1jकोणत्या प्रकारचे ज्ञान एखाद्या व्यक्तीला मत्सर आणि महत्वाकांक्षी आणि खोटे बोलण्यास प्रवृत्त करते?ऐहिक, आत्मीय आणि सैतानाकडले ज्ञान माणसाला मत्सर आणि महत्त्वाकांक्षी आणि खोटे बोलण्यास प्रवृत्त करते.
483:16aj54मत्सर आणि महत्त्वाकांक्षेचे काय परिणाम होतात?मत्सर आणि महत्वाकांक्षा अस्वस्थता आणि प्रत्येक दुष्ट कृत्यास कारणीभूत ठरते.
493:17skgeवरून येणारे ज्ञान कोणती वृत्ती दर्शविते?शांतिप्रिय, सौम्य, मनमिळावू, दया आणि चांगल्या फळांनी परिपूर्ण, अपक्षपाती आणि प्रामाणिक असलेल्या व्यक्तीला वरून येणारे ज्ञान आहे.
504:1fjgfयाकोब म्हणतो की विश्वासणाऱ्यांमध्ये भांडण आणि वाद कशाद्वारे निर्माण होतात?त्यांच्यामध्ये युद्ध करणार्‍या वाईट इच्छा या गोष्टींचा स्त्रोत आहे.
514:3oharविश्वासणाऱ्यांना देवाकडे केलेल्या मागण्या का प्राप्त होत नाहीत?त्यांना मिळत नाही कारण ते त्यांच्या दुष्ट इच्छांवर खर्च करण्यासाठी अयोग्य प्रकारे गोष्टी मागतात.
524:4cwrcजर एखाद्या व्यक्तीने जगाचा मित्र होण्याचे ठरविले तर त्या व्यक्तीचा देवाबरोबर कोणता संबंध आहे?जो व्यक्ती जगाचा मित्र होण्याचे ठरवितो तो स्वतःला देवाचा वैरी बनवतो.
534:6yy3hदेव कोणाचा विरोध करतो आणि तो कोणावर कृपा करतो?देव गर्विष्ठांचा विरोध करतो, परंतु नम्र लोकांवर कृपा करतो.
544:7gzweजेव्हा एखादा विश्वासू व्यक्ती स्वतःला देवाच्या अधीन करतो आणि सैतानाला अडवतो तेव्हा सैतान काय करेल?सैतान पळून जाईल.
554:8c3frजे देवाजवळ येतात त्यांच्याकरीता तो काय करणार?जे देवाजवळ येतात त्यांच्या जवळ तो येईल.
564:11e4nrयाकोब विश्वासणाऱ्यांना काय करू नये असे सांगतो?याकोब विश्वासणाऱ्यांना एकमेकांविरुद्ध बोलू नका असे सांगतो.
574:15wedjभविष्यात काय घडणार आहे याविषयी याकोब विश्वासणाऱ्यांना काय बोलण्यास सांगतो?याकोब विश्वासणाऱ्यांना असे बोलण्यास सांगतो की जर प्रभूने अनुमती दिली तर आपण जगू आणि अमुक अमुक करू.
584:16iiz3जे आपल्या योजनांबद्दल फुशारकी मारतात त्यांच्याविषयी याकोब काय म्हणतो?याकोब म्हणतो की जे आपल्या योजनांबद्दल फुशारकी मारतात ते वाईट करीत आहेत.
594:17gy3yएखाद्याला चांगलं करायचे कळत असून जो ते करीत नाही तर ते काय आहे?जर एखाद्याला चांगले करणे कळत असून ते तो करीत नाही तर ते पाप आहे.
605:3aksoधनवान, ज्यांच्याविषयी याकोब बोलत आहे, त्यांनी शेवटल्या दिवसांसाठी काय केले आहे जे त्यांच्याविरुद्ध साक्ष देईल?धनवानांनी आपली संपत्ती साठविली आहे.
615:4l7o1हे धनवान आपल्या कामगारांशी कसे वागले?या धनवानांनी आपल्या कामगारांना मजुरी दिलेली नाही.
625:6add4या धनवानांनी नीतिमान लोकांना कसे वागवले आहे?या धनवानांनी नीतिमान लोकांची निंदा करून ठार केले आहे.
635:7h3jrयाकोब म्हणतो की प्रभूच्या येण्याकडे विश्वासणाऱ्यांचा दृष्टिकोन काय असावा?विश्वासणाऱ्यांनी प्रभूच्या येण्याची धीराने वाट पहावी.
645:8tl7nविश्वासणाऱ्यांनी प्रभूच्या येण्याची धीराने वाट पाहत त्यांचे अंतःकरणे बळकट का करावे?त्यांनी आपली अंतःकरणे बळकट करावेत कारण प्रभूचे आगमन जवळ आले आहे.
655:10htucजुन्या करारातील संदेष्ट्त्यांचे दुःख सहन आणि धीर आपल्यासाठी काय असले पाहिजे?जुन्या करारातील संदेष्ट्त्यांचे दुःख सहन आणि धीर आपल्यासाठी एक उदाहरण असले पाहिजे.
665:11mdqnईयोबाने कोणते सकारात्मक वैशिष्ट्य दाखविले?ईयोबाने धीराचे प्रदर्शन केले.
675:12n35bयाकोब विश्वासणाऱ्यांच्या “होय” आणि “नाही” च्या विश्वासनीयतेबाबत काय म्हणतो?विश्वासणाऱ्यांच्या “होय” चा अर्थ “होय” असावा आणि त्यांच्या “नाही” चा अर्थ “नाही” असावा.
685:14fdupजे आजारी आहेत त्यांनी काय करावे?आजारी व्यक्तीने वडिलधाऱ्यांना बोलावले पाहिजे जेणेकरून ते त्याला तेलाने अभिषेक करून त्याच्यासाठी प्रार्थना करू शकतील
695:16zww3विश्वासणाऱ्यांनी बरे होण्यासाठी एकमेकांबरोबर कोणत्या दोन गोष्टी केल्या पाहिजेत असे याकोब म्हणतो?विश्वासणाऱ्यांनी एकमेकांबरोबर आपली पातके कबूल करावे आणि एकमेकांसाठी प्रार्थना केली पाहिजे.
705:17h5vgएलीयाने पाऊस पडू नये अशी प्रार्थना केली तेव्हा काय झाले?साडेतीन वर्षे जमिनीवर पाऊस पडला नाही.
715:18ws26एलीयाने पुन्हा एकदा पावसासाठी प्रार्थना केली तेव्हा काय झाले?जेव्हा त्याने पुन्हा प्रार्थना केली तेव्हा आकाशाने पाऊस पाडला आणि पृथ्वीने फळ उपजवले.
725:20c28qपापी माणसाला त्याच्या चुकीच्या मार्गांतून बाहेर काढणारा व्यक्ती काय साध्य करतो?जो व्यक्ती पापी माणसाला त्याच्या चुकीच्या मार्गांतून बाहेर काढतो तो त्याच्या जीवाला मृत्यूपासून वाचवतो आणि अनेक पापांना झाकतो.