mr_ulb/07-JDG.usfm

1000 lines
246 KiB
Plaintext

\id JDG
\ide UTF-8
\h शास्ते
\toc1 शास्ते
\toc2 शास्ते
\toc3 jdg
\mt1 शास्ते
\s5
\c 1
\s यहूदा व शिमोन वंशांतील लोकांचे पराक्रम
\p
\v 1 यहोशवाच्या मृत्यूनंतर, इस्राएल लोकांनी परमेश्वराला असे म्हणून विचारले, “कनानी लोकांशी लढण्यासाठी आम्ही जावू तेव्हा आमच्या वतीने पहिल्याने कोणी स्वारी करावी?
\v 2 परमेश्वर म्हणाला, “यहूदा तुमचे नेतृत्व करील; पाहा, हा देश मी त्याच्या हाती दिला आहे.”
\v 3 यहूदाच्या लोकांनी आपले भाऊ, शिमोन याच्या लोकांना म्हटले, आमच्याबरोबर आमच्या प्रदेशात वर या, म्हणजे आपण एकत्र मिळून कनान्यांविरूद्ध लढाई करू, त्याप्रमाणे तुमच्या प्रदेशात आम्हीही तुम्हामध्ये येऊ; तेव्हा शिमोनाचा वंश त्यांच्याबरोबर गेला.
\p
\s5
\v 4 मग यहूदाचे लोक वर चढून गेले याप्रकारे परमेश्वराने कनानी व परिज्जी ह्यांच्यावर त्यांना विजय दिला व त्यांनी बेजेक येथे त्यांच्या दहा हजार लोकांना ठार मारले.
\v 5 बेजेक येथे त्यांना अदोनी-बेजेक सापडला आणि तेव्हा त्यांनी त्याच्याशी लढाई केली व कनानी व परिज्जी यांचा पराभव केला;
\p
\s5
\v 6 पण अदोनी-बेजेक पळून गेला, तेव्हा त्यांनी त्यांचा पाठलाग करून त्याला पकडले आणि त्यांचा हाताचे व पायांचे अंगठे कापून टाकले.
\v 7 तेव्हा अदोनी-बेजेक म्हणाला, हाताचे व पायांचे अंगठे कापून टाकलेले सत्तर राजे माझ्या मेजाखाली अन्न वेचीत होते; जसे मी केले तसे देवाने माझे केले आहे. त्यांनी त्याला यरुशलेमेस आणले; तेथे तो मेला.
\p
\s5
\v 8 यहूदाच्या लोकांनी यरुशलेम नगराविरूद्ध लढाई करून ते घेतले, आणि तलवारीच्या धारेने त्यावर हल्ला करून व त्या नगराला आग लावली.
\v 9 नंतर यहूदाचे लोक डोंगराळ प्रदेश, नेगेब आणि पश्चिमेकडील डोंगर पायथ्याशी असलेल्या टेकडीचा प्रदेश राहणाऱ्या कनान्यांशी लढावयाला खाली गेले.
\v 10 मग हेब्रोनांत राहणाऱ्या कनान्यांविरूद्ध यहूदा पुढे चालून गेला. (हेब्रोनाचे पूर्वीचे नाव किर्याथ-आर्बा होते) आणि त्यांनी शेशय, अहीमन व तलमय यांचा पराभव केला.
\p
\s5
\v 11 तेथून यहूदाचे लोक दबीराच्या रहिवाश्यावर पुढे चालून गेले. (दबीराचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते)
\v 12 कालेब म्हणाला, जो कोणी लढून किर्याथ-सेफर काबीज करील त्याला मी आपली कन्या अखसा पत्नी म्हणून देईन.
\v 13 तेव्हा अथनिएल कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा पुत्र ह्याने दबीर नगर काबीज केले आणि म्हणून कालेबाने आपली कन्या अखसा त्याला पत्नी करून दिली.
\p
\s5
\v 14 ती आली तेव्हा आपल्या पित्यापासून काही शेतजमीन मागून घेण्यासाठी तिने त्याला गळ घातली. ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबाने तिला विचारले, मी तुझ्यासाठी काय करू शकतो?
\v 15 ती त्याला म्हणाली, मला आशीर्वाद द्या; तुम्ही मला नेगेब प्रदेशात स्थायिक केले आहे तेव्हा मला पाण्याचे झरेही द्या; आणि कालेबाने तिला वरचे व खालचे झरे दिले.
\p
\s5
\v 16 मोशेचा मेहुणा जो केनी त्यांचे वंशज यहूदाच्या लोकांबरोबर खजुरीच्या नगराहून अरादाजवळील यहूदातले (जे नेगेबात आहे) रान आहे तेथे चढून गेले; आणि तेथे जाऊन यहूदा लोक अराद जवळ त्या लोकांबरोबर राहिले.
\v 17 आणि यहूदाची माणसे त्यांचा भाऊ शिमोन ह्याच्या माणसांबरोबर गेली आणि त्यांनी सफाथ येथे राहणारे कनानी यांच्यावर हल्ला करून पूर्णपणे नाश केला; त्या नगराचे नाव हर्मा असे म्हटले होते.
\s5
\v 18 यहूदाच्या लोकांनी गज्जा व त्याच्या सभोवतालची जमीन, अष्कलोन व त्याच्या सभोवतालची जागा आणि एक्रोन व त्याच्या सभोवतालची जागा ही नगरे घेतली.
\v 19 यहूदाच्या लोकांबरोबर परमेश्वर होता आणि त्याने डोंगराळ प्रदेश ताब्यांत घेतला, पण खोऱ्यात राहणाऱ्या लोकांजवळ लोखंडी रथ असल्याने त्यांना घालवून देणे त्याला जमेना.
\s5
\v 20 मोशेच्या सांगण्याप्रमाणे हेब्रोन कालेबाला देण्यात आले व त्याने तेथून अनाकाच्या तिघा मुलांना घालवू दिले.
\v 21 पण बन्यामिनाच्या लोकांनी यरुशलेमेत राहणाऱ्या यबूसी लोकांना बाहेर घालवले नाही, म्हणून आजपर्यंत यबूसी लोक यरुशलेमेत बन्यामिनाच्या लोकांबरोबर राहत आहेत.
\p
\s5
\v 22 योसेफाच्या घराण्यानेही बेथेलावर हल्ला करण्याची तयारी केली; आणि परमेश्वर त्यांच्याबरोबर होता.
\v 23 योसेफाच्या घराण्याने हेरगिरी करण्यास बेथेल येथे माणसे पाठवली. त्या नगराचे पूर्वीचे नाव लूज होते.
\v 24 त्या हेरांनी नगरांतून एक मनुष्य बाहेर निघतांना पाहिला; आणि त्यांनी त्याला म्हटले आम्ही तुला विनंती करतो नगरात कसे जायचे आम्हाला दाखव म्हणजे आम्ही तुझ्यावर दया करू.
\s5
\v 25 तेव्हा त्याने त्यांना नगरांत जाण्याचा मार्ग दाखवला आणि त्यांनी त्या नगरावर तरवारीच्या धारेने मारले; पण त्या मनुष्याला व त्याच्या सर्व परिवाराला त्यांनी सुखरूप जाऊ दिले.
\v 26 त्या मनुष्याने हित्ती लोकांच्या देशात जाऊन एक नगर बांधले व त्याचे नाव लूज ठेवले. त्याचे नाव आजपर्यंत तेच आहे.
\p
\s5
\v 27 मनश्शेच्या लोकांनी बेथ-शान व त्याची खेडी, तानख व त्याची खेडी, दोर व त्याच्या खेड्यात राहणाऱ्यांना, इब्लाम व त्याची खेडी यात राहणाऱ्यांना आणि मगिद्दो व त्याची खेडी यात राहणाऱ्यांना बाहेर घालवून दिले नाही. कारण त्या कनान्यांनी त्या प्रदेशात राहण्याचा निश्चय केला.
\v 28 जेव्हा इस्राएल लोक सामर्थ्यवान झाले तेव्हा त्यांनी कनानी लोकांना कठोर परीश्रमाचे काम करायला लावले; पण त्यांना कधीच पूर्णपणे घालवून दिले नाही.
\s5
\v 29 एफ्राइमने गेजेर येथे राहणाऱ्या कनान्यांना घालवून दिले नाही, ते कनानी गेजेर येथे त्यांच्यामध्येच राहिले.
\s5
\v 30 जबुलूनाने कित्रोन व नहलोल येथील रहिवाश्याना घालवून दिले नाही; पण जबुलूनाने कनान्यांवर बळजबरी करून कठोर परीश्रमाच्या कामास नेमले.
\s5
\v 31 आशेराने अक्को यातले राहणारे आणि सीदोन व अहलाब व अकजीब व हेल्बा, अफीक व रहोब येथील रहिवाश्याना घालवून दिले नाही;
\v 32 म्हणून आशेराचे वंशज त्या देशाच्या कनानी रहिवाश्यांमध्ये राहिले; कारण त्यांनी त्याला घालवून दिले नाही.
\s5
\v 33 नफतालीच्या वंशजांनी बेथ-शेमेश व बेथ-अनाथ येथील रहिवाश्याना घालवून दिले नाही; नफताली त्या देशाच्या कनानी रहिवाश्यांमध्ये राहिले; पण बेथ-शेमेश व बेथ-अनाथ येथील रहिवासी नफताली लोकांची कठीण कष्टाचे कामे करू लागले.
\s5
\v 34 अमोरी लोकांनी दानाच्या वंशजांना डोंगराळ प्रदेशात राहण्यास भाग पाडले. ते त्यांना खाली मैदानात उतरू देईनात;
\v 35 अमोऱ्यांनी हेरेस डोंगरावर अयालोन व शालबीम येथे राहण्याचा निश्चय केला; पण योसेफाच्या घराणे प्रबळ झाल्यावर त्यांनी त्यांना जिंकले आणि कठीण कष्टाचे काम करण्यास त्यांना भाग पाडले.
\v 36 अमोऱ्यांची सीमा अक्रब्बीमाचा चढावापसून आणि सेला येथून डोंगराळ प्रदेशावर गेली होती.
\s5
\c 2
\p
\v 1 परमेश्वराचा दूत गिलगालाहून वर बोखीमास चढून आला आणि तो म्हणाला, मी तुम्हांला मिसरातून काढून आणि तुमच्या पूर्वजांना शपथेवर देऊ केलेल्या देशात आणले; तुमच्याशी केलेला माझा करार मी कधी मोडणार नाही;
\v 2 तुम्ही ह्या देशात राहणाऱ्याशी काही करार करू नका; तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका, पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. तुम्ही हे काय केले?
\s5
\v 3 आणि म्हणून मी देखील म्हणालो, मी कनानी लोकांना तुमच्यासमोरून घालवून देणार नाही; पण ते तुमच्या कुशीला काट्यासारखे होतील आणि त्यांचे देव तुम्हाला पाश होतील.
\v 4 परमेश्वराचा दूत जेव्हा सर्व इस्राएल लोकांस हे शब्द बोलला, तेव्हा त्यांनी मोठा आक्रोश केला आणि रडले
\v 5 त्यांनी त्या जागेचे नाव बोखीम असे ठेवले. तेथे त्यांनी परमेश्वराला यज्ञ अर्पण केले.
\s5
\v 6 जेव्हा यहोशवाने लोकांना निरोप देऊन पाठवून दिले तेव्हा इस्राएलाचे लोक देश आपल्या मालकीचा करून घ्यायला प्रत्येकजण आपल्या वतनास गेले.
\v 7 यहोशवाच्या सर्व दिवसांत, आणि यहोशवाच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांनी परमेश्वराने इस्राएलासाठी केलेली महान कामे पाहिली होती त्यांच्या सर्व दिवसात लोकांनी परमेश्वराची सेवा केली.
\v 8 परमेश्वराचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा हा एकशेदहा वर्षाचा होऊन मरण पावला.
\s5
\v 9 एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील गाश डोंगराच्या उत्तरेस तिम्नाथ-हेरेस येथे त्यांच्या वतनाच्या सीमेवर त्यांनी त्याला पुरले.
\v 10 ती सर्व पिढी पूर्वजास मिळाल्यानंतर जी दुसरी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कामाची ओळख नव्हती.
\s5
\v 11 इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून बआल देवांची सेवा करू लागले;
\v 12 आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर, ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्याचा त्यांनी त्याग केला व अन्य लोकांच्या देवाच्या नादी लागले, आणि त्यांच्या पाया पडले. त्यांनी परमेश्वराला क्रोधाविष्ट केले.
\v 13 परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बआल अष्टारोथ यांची उपासना केली;
\s5
\v 14 इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला, त्याने त्यांना लुटणाऱ्यांच्या हवाली केले, त्यांनी त्यांची मालमत्ता लुटली; त्याने त्यास त्यांच्या आसपासच्या शत्रूंच्या हाती गुलाम म्हणून विकले, म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना.
\v 15 परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे जेथे इस्राएल लढण्यास जात तेथे त्यांच्याविरूद्ध परमेश्वराचा हात पडून त्यांचा पराभव होई आणि ते फार संकटात पडत.
\s5
\v 16 मग परमेश्वर न्यायाधीश उभे करी, ते त्यांना त्यांची मालमत्ता लुटणाऱ्याच्या हातून सोडवीत;
\v 17 तरी ते आपल्या न्यायाधीशांचे ऐकत नसत; त्यांनी स्वतःला व्यभिचारी बुध्दीने अन्य देवाच्यामागे लागले आणि त्यांची उपासना केली. त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळून ज्या मार्गाने चालले होते तो त्यांनी त्वरित सोडून दिला आणि त्यांनी आपले पूर्वज करत असत तसे केले नाही.
\s5
\v 18 परमेश्वर जेव्हा त्यांच्यासाठी न्यायाधीश उभे करी तेव्हा त्या न्यायाधीशाबरोबर परमेश्वर असे आणि त्या न्यायाधीशाच्या सर्व दिवसात तो त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून बचावीत असे; कारण त्यांच्यावर जुलूम करणारे व त्यांना गांजणारे यांच्यामुळे ते कण्हत असत; म्हणून देवाला त्यांची दया येई.
\v 19 पण न्यायाधीश मरण पावला म्हणजे ते पुन्हा उलटून अन्य देवांची सेवा करीत व उपासना करीत व आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक बिघडत. ते आपला दुराचार व दुराग्रह सोडीत नसत.
\s5
\v 20 तेव्हा इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकून तो म्हणाला, मी ह्या राष्ट्राच्या पूर्वजांशी केलेला करार ह्याने मोडला आहे आणि माझी वाणी ऐकली नाही;
\v 21 म्हणून यहोशवाच्या मृत्यूसमयी उरलेल्या राष्ट्रांपैकी कोणालाही मी देखील येथून पुढे त्यांच्यासमोरून घालवून देणार नाही;
\v 22 पण त्यांच्याकरवी मी इस्राएलाची परीक्षा करीन आणि त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराचे जसे मार्ग पाळले तसे ते चालतात की नाही हे मी पाहीन.
\v 23 म्हणून परमेश्वराने त्या राष्ट्रांना घालवून देण्याची घाई केली नाही, त्यांना राहू दिले आणि त्यांना यहोशवाच्या हाती दिले नाही.
\s5
\c 3
\p
\v 1 इस्राएल लोकांना कनान देशांतील लढायांचा अनुभव नव्हता त्यांची परीक्षा पाहण्यासाठी परमेश्वराने काही राष्ट्रे देशात राहू दिली.
\v 2 इस्राएलाच्या नव्या पिढ्यांना, ज्यांना पूर्वी त्या लढायांविषयी काहीच माहित नव्हते त्यांना तिचे शिक्षण मिळावे म्हणून परमेश्वराने जी राष्ट्रे राहू दिली ती ही;
\v 3 पलिष्ट्यांचे पाच सरदार आणि सर्व कनानी, सीदोनी आणि बाल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या घाटापर्यंत लबानोन डोंगरात राहणारे हिव्वी.
\s5
\v 4 इस्राएलाच्या पूर्वजांना मोशेद्वारे दिलेल्या आज्ञा ते पाळतात की नाही ह्याची परीक्षा पाहावी म्हणून परमेश्वराने त्यांना मागे ठेवले होते.
\v 5 अशा प्रकारे इस्राएल लोक कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्यामध्ये राहू लागले.
\v 6 त्यांनी त्यांच्या मुली आपणास बायका करून घेतल्या व आपल्या मुली त्यांच्या मुलांना दिल्या आणि त्यांच्या देवांची सेवा केली.
\s5
\v 7 इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले, आपला देव परमेश्वर ह्याला ते विसरले आणि बाल व अशेरा यांची उपासना करू लागले;
\v 8 म्हणून इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याने त्यांना मेसोपटेम्याचा राजा कुशन-रिशाथईम ह्याच्या हाती विकत दिले, आणि इस्राएल लोकांनी आठ वर्षेपर्यंत कुशन-रिशाथईम ह्याची सेवा केली.
\s5
\v 9 इस्राएल लोकांनी परमेश्वराजवळ मोठ्याने आरोळी केली तेव्हा परमेश्वराने त्यांच्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याला इस्राएल लोकांच्या मदतीला उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली.
\v 10 त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व त्याने इस्राएलाचा न्याय केला; तो लढाईला निघाला तेव्हा परमेश्वराने अरामाचा राजा कुशन-रिशाथईम ह्याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले,
\v 11 त्यानंतर चाळीस वर्षे देशाला शांतता लाभली मग कनाजाचा मुलगा अथनिएल मृत्यू पावला.
\s5
\v 12 पुन्हा इस्राएल लोकांनी देवाच्या दृष्टीने वाईट ते करून आज्ञा मोडली; आणि त्यांनी काय केले ते त्याने पाहिले म्हणून परमेश्वराने मवाबाचा राजा एग्लोन इस्राएलावर सबळ केले कारण इस्राएलांनी जे वाईट ते केले होते याप्रकारे परमेश्वराने ते पाहिले होते.
\v 13 तेव्हा एग्लोनाने अम्मोनी व अमालेकी ह्याना आपल्याबरोबर घेऊन त्यांच्यावर चाल केली आणि इस्राएलांना पराभूत करून खजुरीचे नगर ताब्यात घेतले.
\v 14 इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्याची अठरा वर्षे सेवा केली.
\s5
\v 15 परंतु इस्राएल लोकांनी देवाकडे मोठ्याने आरोळी केली, तेव्हा परमेश्वराने गेराचा मुलगा एहूद ह्याला त्यांच्या मदतीला उभा केला; तो बन्यामीनी असून डावखुरा होता; त्याच्या हाती इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्याला भेट पाठवली.
\s5
\v 16 एहूदाने हातभर लांब दुधारी तरवार आपल्यासाठी बनवून आपल्या कपड्याखाली उजव्या बाजूला लटकावली
\v 17 त्याने मवाबाचा राजा एग्लोन ह्याच्यापुढे भेट सादर केली; एग्लोन हा फार लठ्ठ होता.
\v 18 भेट दिल्यानंतर त्याने भेट घेऊन आलेल्या लोकांना त्याने निरोप दिला;
\s5
\v 19 पण गिलगालाजवळील कोरीव मूर्तीपर्यंत गेल्यावर एहूद स्वतः परत मागे येऊन आणि तो म्हणाला, महाराज, मला आपल्याला काही गुप्त गोष्ट सांगायची आहे. राजा म्हणाला, गप्प राहा, तेव्हा त्याच्याजवळ उभे असलेले सगळे लोक बाहेर गेले.
\v 20 एहूद त्याच्याजवळ आला त्यासमयी तो हवेशीर माडीवर एकटा बसला होता. एहूद म्हणाला, मी आपणासाठी देवाचा संदेश आणला आहे तेव्हा तो आसनावरून उठला.
\s5
\v 21 मग एहूदाने आपल्या डाव्या हाताने उजव्या मांडीवरली तरवार काढून राजाच्या पोटात खुपसली;
\v 22 पात्यांबरोबर मूठही आत गेली, आणि चरबीत रूतून बसली त्याने त्याच्या पोटातून तरवार काढली नाही; ती पार्श्वभागी निघाली होती.
\v 23 मग द्वारमंडपाच्या बाहेर येऊन वर जाऊन एहूदाने माडीचे दरवाजे कुलूप लावून बंद केले.
\s5
\v 24 तो निघून गेल्यावर त्याचे दास येऊन पाहतात तो माडीचे दरवाजे बंद असल्याचे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना वाटले की, तो आपल्या हवेशीर खोलीच्या संडासात गेला असेल.
\v 25 त्यांना मोठी काळजी वाटू लागली आपल्या कर्तव्यात दुर्लक्ष करीत आहोत असे त्यांना वाटले, तो माडीचे दरवाजे उघडीत नाही असे पाहून त्यांनी किल्ली घेऊन ते उघडले आणि पाहतात तर त्यांचा स्वामी मरून भूमीवर पडला होता.
\s5
\v 26 सेवक तर आश्चर्य करीत काय करावे वाट पाहत होते तोपर्यंत एहूद निसटून पळून कोरीवमूर्तींच्या जागेच्या पलिकडे सईरा येथे जाऊन पोहचला.
\v 27 तेथे गेल्यावर त्याने एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले, तेव्हा त्याच्याबरोबर इस्राएल लोक डोंगराळ प्रदेशातून उतरले, आणि तो त्यांच्यापुढे चालला.
\s5
\v 28 तो त्यांना म्हणाला, माझ्या पाठोपाठ या कारण परमेश्वराने तुमचे मवाबी शत्रू तुमच्या हाती दिले आहेत. तेव्हा त्यांनी त्याच्या पाठोपाठ जाऊन मवाब देशाजवळचे यार्देनेचे उतार रोखून धरले आणि कोणालाही पार जाऊ दिले नाही.
\v 29 त्यासमयी त्यांनी मवाब्यांचे सुमारे दहा हजार लोक मारले; ते सर्व धिप्पाड व शूर वीर होते; त्यांच्यातला कोणीही बचावला नाही.
\v 30 अशा प्रकारे मवाब त्यादिवशी इस्राएलाच्या सत्तेत आला. ह्यानंतर देशाला ऐंशी वर्षे विसावा मिळाला.
\s5
\v 31 एहूदानंतर अनाथाचा मुलगा शमगार न्यायाधीश झाला; त्याने सहाशे पलिष्ट्याना बैलाच्या पराणीने जिवे मारले; अशा प्रकारे त्यानेही इस्राएलाची संकटातून सुटका केली.
\s5
\c 4
\p
\v 1 एहूद मरण पावल्यावर इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट गोष्टी करून पुन्हा आज्ञा मोडली आणि त्यांनी काय केले हे त्याने पाहिले.
\v 2 तेव्हा परमेश्वराने कनानी राजा याबीन जो हासोरात राज्य करीत होता त्याच्या हाती त्यांना दिले; सीसरा नावाचा त्याच्या सैन्याचा सेनापति होता आणि तो विदेश्यांचे नगर हरोशेथ येथे राहत होता.
\v 3 त्याच्याकडे नऊशें लोखंडी रथ असून त्याने वीस वर्षे इस्राएल लोकांवर जाचजुलूम करून त्यांचा छळ केला, म्हणून इस्राएल लोकांनी मोठ्याने रडून परमेश्वराच्या मदतीकरिता धावा केला.
\s5
\v 4 त्यासमयी लप्पिदोथाची पत्नी दबोरा भविष्यवादीण ही इस्राएलाचा न्यायनिवाडा करीत असे.
\v 5 एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामा व बेथेल यांच्या दरम्यान दबोराच्या खजुरीच्या झाडाखाली तिची बैठक असे; इस्राएल लोक तिच्याकडे त्यांचा वाद सोडवण्यास येत असत.
\s5
\v 6 तिने अबीनवामाचा पुत्र बाराक ह्याला नफतालीच्या केदेशातून येथून बोलावणे पाठवून म्हटले, तू नफताली व जबुलून ह्यांच्यातले दहा हजार पुरुष आपणाबरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे जा अशी आज्ञा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने तुला केली आहे.
\v 7 तो म्हणतो, याबीनाचा सेनापती सीसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे कीशोन नदीपर्यंत येईल असे मी करीन, आणि त्याला तुझ्या हाती देईन.
\s5
\v 8 बाराक तिला म्हणाला, तू माझ्याबरोबर येशील तरच मी जाईन, पण तू माझ्याबरोबर येणार नसलीस तर मी जाणार नाही.
\v 9 ती म्हणाली, मी तुझ्याबरोबर अवश्य येईन पण ज्या मार्गाने तू जाणार आहे त्यात तुझा सन्मान होणार नाही कारण परमेश्वर सीसरा ह्याला एका स्रीच्या हाती देणार आहे. मग दबोरा उठली आणि बाराकाबरोबर केदेश येथे गेली.
\s5
\v 10 बाराकाने जबुलून व नफताली येथील पुरुषांना केदेश येथे एकत्रित बोलावले; मग त्याच्या मागोमाग दहा हजार पुरुष निघाले आणि दबोराही त्याच्याबरोबर गेली.
\s5
\v 11 मोशेचा सासरा होबाब याचे वंशज केनी त्यांच्यापासून केनी हेबेर हा वेगळा होऊन केदेशाजवळचे साननीम येथल्या एका एला वृक्षाखाली तळ देऊन राहिला होता.
\s5
\v 12 इकडे सीसरा ह्याला खबर लागली की, अबीनवामाचा मुलगा बाराक हा ताबोर डोंगर चढून गेला आहे,
\v 13 तेव्हा सीसरा ह्याने आपले एकंदर नऊशें लोखंडी रथ आणि आपल्याजवळचे सर्व सैन्य, विदेश्यांचे हरोशेथापासून कीशोन नदीपर्यंत बोलावून एकवट केले.
\s5
\v 14 दबोरा बाराकाला म्हणाली, ऊठ, आजच परमेश्वराने सीसरावर तुला विजय दिला आहे; देव तुझ्यापुढे निघाला आहे की नाही? मग बाराक व त्याच्या पाठोपाठ दहा हजार लोक ताबोर डोंगरावरून खाली उतरले.
\s5
\v 15 परमेश्वराने सीसरा व त्याचे सर्व रथ आणि त्याचे सैन्य ह्याना गोंधळून टाकले; आणि बाराकाच्या माणसांनी त्यावर तलवारींने हल्ला केला आणि तेव्हा सीसरा रथावरून उतरून पायीच पळून गेला.
\v 16 पण इकडे बाराकाने विदेश्याच्या हरोशेथपर्यंत रथाचा व सैन्याचा पाठलाग केला; आणि सीसराची सर्व सेना तलवारीच्या धारेने पडली; आणि त्यातला एकही वाचला नाही.
\s5
\v 17 सीसरा मात्र केनी हेबेर ह्याची पत्नी याएल हिच्या डेऱ्याकडे पायी पळून गेला; कारण हासोराचा राजा याबीन आणि केनी हेबेराचे घराणे यांचे सख्य होते.
\v 18 तेव्हा याएल सीसराला सामोरी येऊन त्याला म्हणाली, या स्वामी, या इकडे माझ्याकडे येण्यास भिऊ नका. तेव्हा तो तिच्याकडे डेऱ्यात गेला व तिने त्याला कांबळीखाली लपवले.
\s5
\v 19 तो तिला म्हणाला, मला थोडे पाणी प्यावयाला दे. मला तहान लागली आहे. तेव्हा तिने चामड्याची दुधाची पिशवी उघडून त्याला दुध प्यावयाला दिले व तिने त्याला पुन्हा झाकले.
\v 20 तो तिला म्हणाला, डेऱ्याच्या दाराशी उभी राहा आणि कोणी येऊन तुला विचारू लागला की, येथे एखादा पुरुष आहे काय? तर नाही म्हणून सांग.
\s5
\v 21 मग हेबेराची पत्नी याएल हिने डेऱ्याची मेख आणि हातोडा हाती घेऊन आली पाय न वाजविता त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात ती मेख ठोकली; ती आरपार जाऊन जमिनीत रूतली तो थकून गेल्यामुळे त्याला गाढ झोप लागली होती आणि तो तसाच मेला.
\v 22 बाराक सीसराचा पाठलाग करीत आला तेव्हा त्याला याएल सामोरी येऊन म्हणाली, चला, ज्या माणसाचा तुम्ही शोध करीत आहा तो मी तुम्हांला दाखवते. तो तिच्यासोबत आत जाऊन पाहतो तो सीसरा मरून पडला होता आणि त्याच्या कानशिलात मेख ठोकलेली होती.
\s5
\v 23 अशा प्रकारे त्यादिवशी कनानाचा राजा याबीन ह्याला देवाने इस्राएल लोकांपुढे पराजित केले.
\v 24 इस्राएल लोकांची सत्ता कनानाचा राजा याबीन ह्यांच्यावर अधिकाधिक वाढत गेली व शेवटी त्यांनी कनानाचा राजा याबीन ह्याचा नाश केला.
\s5
\c 5
\p
\v 1 त्यादिवशी दबोरा आणि अबीनवामाचा पुत्र बाराक ह्यानी गाइलेले गीत,
\v 2 इस्राएलाचे नेते पुढे चालले, लोक स्वसंतोषाने पुढे आले, म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा.
\s5
\v 3 राजानो, ऐका; अधिपतींनो लक्ष द्या, मी स्वतः परमेश्वराला गाईन; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची स्तोत्रे गाईन.
\v 4 हे परमेश्वरा, तू सेईराहून निघालास, अदोमाच्या प्रदेशातून कूच केलीस, तेव्हा पृथ्वी कंपायमान झाली; तसेच आकाशाने जलबिंदु गाळले; मेघांनीही जलबिंदु गाळले;
\s5
\v 5 परमेश्वरासमोर डोंगर थरथरा कापले, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर हा सीनाय देखील थरारला.
\v 6 अनाथाचा मुलगा शमगार ह्याच्याकाळी, याएलेच्या काळी राजमार्ग सुने पडले; वाटसरू आडमार्गानी प्रवास करीत.
\s5
\v 7 मी दबोरा पुढे येईपर्यंत, इस्राएलात माता म्हणून मी प्रसिद्ध होईपर्यंत, इस्राएलात कोणी पुढारी उरले नव्हते;
\v 8 लोकांनी नवे देव निवडले तेव्हा वेशीवेशीतून संग्राम झाला; इस्राएलांतील चाळीस हजारांमध्ये एकाजवळ तरी ढाल किंवा भाला दृष्टीस पडला काय?
\s5
\v 9 माझे मन इस्राएलाच्या अधिपतींकडे लागले आहे ते लोकांबरोबर स्वसंतोषाने पुढे आले; तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा.
\v 10 पांढऱ्या गाढवावर स्वारी करणाऱ्यांनो, अमूल्य गालिच्यावर बसणाऱ्यांनो, वाटेने चालणाऱ्यांनो, त्याचे गुणगान करा.
\s5
\v 11 पाणवठ्यावर पाणक्यांच्या स्वराने परमेश्वराच्या न्यायकृत्यांचे, इस्राएलावरील सत्ते संबंधाने त्याच्या न्यायकृत्यांचे लोक वर्णन करतात त्यासमयी परमेश्वराचे प्रजाजन वेशीवर चालून गेले.
\s5
\v 12 जागी हो, जागी हो दबोरे; जागी हो, जागी हो, गीत गा; बाराका ऊठ; अबीनवामाच्या पुत्रा, तू आपल्या बंदिवानांना घेऊन जा.
\v 13 त्यासमयी उरलेले सरदार खाली उतरले; परमेश्वराचे लोक माझ्याकरीता वीरांविरूद्ध सामना करावयास उतरले.
\s5
\v 14 अमालेकात ज्यांची पाळेमुळे पसरली आहेत ते एफ्राइमामधून आले; तुझ्यामागून बन्यामीन तुझ्या सैन्यात दाखल झाला; माखीराहून अधिपती व जबुलूनाहून दंडधारी अमलदार उतरून आले.
\s5
\v 15 इस्साखाराचे सरदार दबोरेबरोबर होते; इस्साखार बाराकाशी एकनिष्ठ होता; त्याच्या पाठोपाठ ते खोऱ्यात धावले रऊबेनाच्या पक्षामध्ये मोठी चर्चा झाली.
\s5
\v 16 खिल्लारांसाठी वाजविलेला पावा ऐकत तू मेंढवाड्यात का बसलास? रऊबेनाच्या पक्षाविषयी फार विचारविनिमय झाला.
\s5
\v 17 गिलाद यार्देनेपलीकडेच राहिला; दान हा आपल्या जहाजापाशीच का बसून राहिला? आशेर समुद्रकिनाऱ्यावर बसून राहिला, आपल्या धक्क्यावर बसून राहिला.
\v 18 जबुलून व नफताली ह्या लोकांनी आपल्या प्रांतांतील उंचवटयांवर मृत्यूची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घातला.
\s5
\v 19 राजे येऊन लढले, त्यासमयी कनानाचे राजे मगिद्दोच्या जलप्रवाहापाशी तानख येथे लढले; त्यांना रुप्याची काहीच लूट मिळाली नाही.
\v 20 आकाशांतून तारे लढले; त्यांनी आपआपल्या कक्षातून सीसराशी लढाई केली.
\s5
\v 21 कीशोन नदीने, त्या पुरातन नदीने, त्या कीशोन नदीने त्यांना वाहून नेले. हे जीवा, हिंम्मत धरून पुढे चाल.
\v 22 त्यासमयी घोडे भरधाव उधळले ते मस्त घोडे टापा आपटू लागले, त्यांच्या टापांचा आवाज झाला.
\s5
\v 23 परमेश्वराचा दूत म्हणतो, मेरोजला शाप द्या त्यांतल्या रहिवाश्याना मोठा शाप द्या; कारण परमेश्वराला साहाय्य करावयास वीरांविरूद्ध परमेश्वराला साहाय्य करावयास ते आले नाहीत.
\s5
\v 24 केनी हेबेर यांची स्री याएल ही सगळया स्त्रियांमध्ये धन्य! डेऱ्यात राहणाऱ्या सर्व स्त्रियांमध्ये ती धन्य!
\v 25 त्याने पाणी मागितले तो तिने त्याला दुध दिले; श्रीमंताना साजेल अशा वाटीत तिने त्याला दही आणून दिले.
\s5
\v 26 तिने आपला एक हात मेखेला आणि उजवा हात कारागिराच्या हातोडयाला घातला; तिने हातोड्याने सीसराला मारले, त्याचे डोके फोडून टाकले, त्याचे कानशील मेख ठोकून आरपार विंधले.
\v 27 तिच्या पायाखाली तो वाकला व पडला, निश्चल झाला; जेथे तो वाकला तेथेच तो मरून पडला.
\s5
\v 28 सीसराच्या आईने खिडकीतून बाहेर डोकावले तिने जाळीतून हाक मारली, त्याचा रथ यावयाला एवढा उशीर का झाला? त्याच्या रथाच्या चाकाना कोणी खीळ घातली?
\s5
\v 29 तिच्या चतुर सख्यांनी तिला उत्तर दिले हो, स्वतः तिनेच आपणास उत्तर दिले;
\v 30 त्यांना मिळालेल्या लुटीची ते वाटणी तर करून घेत नसतील ना? प्रत्येक वीराला एकएक किंवा दोन दोन कुमारिका; सीसरासाठी रंगीबेरंगी वस्रे, भरजरी रंगीबेरंगी वस्रे लूटीत मिळालेल्या कुमारिकांच्या गळ्यांत भुषण म्हणून पांघरण्यासाठी रंगीबेरंगी वस्रे मिळाली नसतील ना?
\s5
\v 31 हे परमेश्वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावोत; पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणाऱ्या सूर्यासमान होवोत. मग देशाला चाळीस वर्षे विसावा मिळाला.
\s5
\c 6
\p
\v 1 नंतर इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले, त्याने त्यांना मिद्यानाच्या नियंत्रणाखाली सात वर्षे ठेवले.
\v 2 तेव्हा मिद्यानाने इस्राएलावर अधिकाराने जुलूम केला; मिद्यान्यांमुळे इस्राएलाच्या लोकांनी आपल्यासाठी डोंगरातील भुयारे व गुहा व किल्ले यांचा आश्रय घेतला.
\s5
\v 3 आणि असे झाले की, जर इस्राएली पिकांची लागवड करीत, तर मिद्यानी व अमालेकी आणि पूर्वेकडले लोक त्यांवर हल्ला करीत.
\v 4 त्यांनी त्याच्याविरूद्ध सैन्याचा तळ देऊन गज्जापर्यंत भूमीच्या पिकांचा नाश केला आणि इस्राएलात काही अन्न आणि मेंढर किंवा गाय बैल किंवा गाढव असे काही एक शिल्लक ठेवले नाही.
\s5
\v 5 जेव्हा ते आपली जनावरे व तंबू घेऊन आले ते टोळांच्या थव्यासारखे आत आले आणि त्यांची व त्यांच्या उंटाची संख्या मोजणे अशक्य होते; असे ते देशावर आक्रमण करून नाश करावयास आले होते.
\v 6 तेव्हा मिद्यानामुळे इस्राएलाची कठीण दुर्बल अवस्था झाली आणि इस्राएल लोकांनी परमेश्वराकडे मोठ्याने रडून हाक मारली.
\s5
\v 7 जेव्हा इस्राएलाच्या संतानानी मिद्यान्यांमुळे परमेश्वराकडे मोठ्याने रडून हाक मारली तेव्हा असे झाले की,
\v 8 परमेश्वराने कोणी भविष्यवादी इस्राएलाच्या लोकांजवळ पाठवला; तेव्हा तो त्यास बोलला, इस्राएलाचा देव परमेश्वर असे म्हणतो, मी तुम्हास मिसरातून काढून वर आणले, दास्याच्या घरातून बाहेर काढून आणले;
\s5
\v 9 असे मी तुम्हास मिसऱ्यांच्या हातातून व तुमच्या सर्व जाचणाऱ्यांच्या हातातून सोडवले; आणि त्यास तुमच्यापुढून घालवून त्यांचा देश तुम्हास दिला.
\v 10 तेव्हा मी तुम्हास असे सांगितले की, मी तुमचा देव परमेश्वर आहे; ज्या अमोऱ्यांच्या देशात तुम्ही राहत आहा, त्यांच्या देवांना भिऊ नका; तरी तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही.
\s5
\v 11 आणखी परमेश्वराचा दूत येऊन अबियेजेरी योवाश याच्या अफ्रा येथील एला झाडाखाली बसला; तेव्हा त्याचा पुत्र गिदोन गहू मिद्यांन्यापासून लपवावा म्हणून द्राक्षकुंडात गव्हाची मळणी करत होता.
\v 12 आणि परमेश्वराचा दूत त्याला दर्शन देऊन त्याला बोलला, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.
\s5
\v 13 तेव्हा गिदोन त्याला बोलला, हे माझ्या प्रभू, जर परमेश्वर आम्हाबरोबर आहे तर हे सर्व आम्हाबरोबर का घडले? परमेश्वराने आम्हास मिसरातून बाहेर आणले आणि त्याच्या अद्भुत कृत्यांबद्दल आमचे पूर्वज आम्हाजवळ सांगत आले, परमेश्वराने आम्हास मिसरातून वर आणले की नाही? आता तर परमेश्वराने आमचा त्याग करून आम्हास मिद्यान्यांच्या हाती दिले आहे.
\s5
\v 14 मग परमेश्वराने त्याकडे बघितले आणि म्हटले, तू आपल्या या बळाने जा, आणि इस्राएलांस मिद्यान्यांच्या ताब्यातून सोडव; मी तुला पाठवले आहे की नाही?
\v 15 गिदोन त्याला बोलला, हे माझ्या प्रभू, मी इस्राएलांस कसा सोडवणार? पाहा, मनश्शेत माझे घराणे कमजोर आहे, आणि मी आपल्या पित्याच्या घरात कमी महत्वाचा आहे.
\s5
\v 16 परमेश्वर त्याला बोलला, खरोखर मी तुझ्याबरोबर राहीन, जसे एका माणसाला मारावे तसे तू एकजात सर्व मिद्यांन्यांना ठार करशील.
\v 17 गिदोन त्याला बोलला, तुझी कृपादृष्टी मजवर असली तर तूच माझ्याशी बोलत आहेस याविषयी मला काही चिन्ह दाखव.
\v 18 मी तुला विनंती करतो, मी तुझ्याकडे येईपर्यंत तू येथून जाऊ नको; म्हणजे मी आपली भेट आणून तुझ्यापुढे ठेवीन. तेव्हा तो बोलला, तू परत येईपर्यंत मी येथेच थांबतो.
\s5
\v 19 गिदोनाने जाऊन एक करडू व एफाभर सपिठाच्या बेखमीर भाकरी तयार केल्या; त्याने मांस टोपलीत घालून आणि रस्सा पातेल्यात घातले, मग त्याच्याजवळ एला झाडाखाली नेऊन सादर केले.
\v 20 तेव्हा देवाच्या दूताने त्याला सांगितले, तू मांस व बेखमीर भाकरी या खडकावर आणून ठेव, आणि त्यावर रस्सा ओत. मग गिदोनाने तसे केले.
\s5
\v 21 तेव्हा परमेश्वराच्या दूताने आपल्या हातातल्या काठीच्या टोकाने मांसाला व बेखमीर भाकरीला स्पर्श केला; मग खडकांतून अग्नी निघाला आणि त्याने ते मांस व बेखमीर भाकरी भस्म केल्या; परमेश्वराचा दूतही निघून गेला आणि यापुढे गिदोन त्याला पाहू शकला नाही.
\s5
\v 22 तेव्हा गिदोनाला समजले की तो परमेश्वराचा दूत होता; गिदोन म्हणाला, हाय हाय, हे प्रभू देवा! कारण मी परमेश्वराचा दूत समोरासमोर, पाहिला आहे!
\v 23 परमेश्वर त्याला म्हणाला, तुला शांती असो! भिऊ नको, तू मरणार नाहीस.
\v 24 तेव्हा गिदोनाने तेथे परमेश्वरासाठी वेदी बांधली, त्याचे नाव परमेश्वर शांती आहे, असे ठेवले; ती आजपर्यंत अबियेजेऱ्यांच्या अफ्रा येथे अजून आहे.
\s5
\v 25 आणि असे झाले की, त्याच रात्री परमेश्वराने त्याला सांगितले की, तू आपल्या पित्याचा गोऱ्हा घे आणि सात वर्षाचा दुसरा गोऱ्हा घे आणि आपल्या बापाची बाल देवासाठीची वेदी ती मोडून टाक आणि तिच्याजवळचे अशेरा कापून टाक.
\v 26 मग या खडकाच्या उच्चस्थानी आपला देव परमेश्वर यासाठी वेदी बांध आणि योग्य मार्गाने बांधनी कर. त्या दुसऱ्या गोऱ्ह्याचे होमार्पण, अशेराच्या तोडलेल्या लांकडाचा उपयोग करून कर.
\s5
\v 27 तेव्हा गिदोनाने आपल्या चाकरातील दहा माणसे बरोबर घेऊन जसे परमेश्वराने त्याला सांगितले होते तसे केले; परंतु असे झाले की, दिवस असता ते करायाला तो आपल्या बापाच्या घराण्याला व त्या नगराच्या माणसांना घाबरला, यास्तव रात्री त्याने केले.
\s5
\v 28 मग सकाळी त्या नगराची माणसे उठली तर पाहा, बालाची वेदी मोडलेली होती तिच्याजवळचे अशेराही तोडलेले होते आणि बांधलेल्या वेदीवर दुसऱ्या गोऱ्ह्याचा होम केलेला होता.
\v 29 तेव्हा ती एकमेकांना म्हणाले, ही गोष्ट कोणी केली? मग त्यांनी विचारपूस व शोध केल्यावर म्हटले, योवाशाचा पुत्र गिदोन, याने ही गोष्ट केली आहे.
\s5
\v 30 नंतर त्या नगराच्या माणसानी योवाशाला सांगितले तू आपला पुत्र बाहेर आण, त्याला तर मारावयाचे आहे, कारण त्याने बालाची वेदी मोडून टाकली आणखी तिच्याजवळची अशेराची मूर्ति तोडून टाकली आहे.
\s5
\v 31 तेव्हा योवाश आपणावर जे उठले होते त्या सर्वांना म्हणाला, बालाचा कैवार तुम्ही घेता काय? तुम्ही त्याचा बचाव करू पाहता काय? जो त्याचा कैवार घेईल तो आज सकाळ आहे तोच मारला जावो; जर तो देव असला तर, ज्याने त्याची वेदी मोडली त्याच्याविरूद्ध त्याने स्वत:चा कैवार घ्यावा.
\v 32 तेव्हा त्याच दिवशी त्याने त्याला यरूब्बाल म्हटले, कारण की तो बोलला, बालानेच स्वतःसाठी बचाव करावा कारण त्याची वेदी गिदोनाने मोडून वेगळी केली.
\s5
\v 33 तेव्हा सर्व मिद्यानी व अमालेकी व पूर्वेकडले लोक एकत्र जमले, आणि त्यांनी यार्देन नदी ओलांडून येऊन आणि इज्रेलाच्या खोऱ्यात तळ दिला.
\s5
\v 34 परंतु परमेश्वराचा आत्मा गिदोनावर त्याला मदत करण्यासाठी आला; गिदोनाने कर्णा फुंकला, तेव्हा अबियेजेराचे वंशज त्याच्याजवळ अशाप्रकारे त्याच्यामागे जाण्यासाठी एकत्र आले.
\v 35 मग त्याने सगळ्या मनश्शेत जासुद पाठवले तेव्हा तेही त्याच्याजवळ एकत्र मिळाले; नंतर आशेर व जबुलून व नफतालीत त्याने जासुद पाठवले, तेव्हा ते त्यांच्याशी मिळायला चढून गेले.
\s5
\v 36 मग गिदोन देवास बोलला, जसे मला सांगितले तसा जर तू माझ्या हाताने इस्राएलांस तारणार असलास;
\v 37 तर पाहा, मी खळ्यात कातरलेली लोकर ठेवतो; जर लोकरीवर मात्र दहिवर पडेल आणि सर्व भूमी कोरडी राहील, तर मला कळेल की जसे मला सांगितले, तसा तू माझ्या हाताने इस्राएलाला तारशील.
\s5
\v 38 नंतर तसे झाले; म्हणजे सकाळी जेव्हा तो उठला, तेव्हा त्याने ती लोकर दाबून तीथले दहिवर पिळून वाटीभर पाणी काढले.
\s5
\v 39 मग गिदोन देवाला बोलला, तू माझ्यावर रागावू नको, मी आणखी एक वेळेस बोलतो; आता केवळ या वेळेस या लोकरीच्याव्दारे एक वेळ मी परीक्षा पाहतो: ही लोकर तेवढी कोरडी राहून बाकी अवघ्या जमिनीवर दहिवर पडेल असे कर.
\v 40 तेव्हा त्या रात्री देवाने तसे केले म्हणजे ती लोकर मात्र कोरडी राहिली आणि संपूर्ण भूमीवर दहिवर पडले.
\s5
\c 7
\p
\v 1 मग यरूब्बाल म्हणजे गिदोन आणि त्याबरोबरचे जे सर्व लोक त्यांनी सकाळी उठून हरोदा झऱ्याजवळ तळ दिला, आणि मिद्यानी यांची छावणी मोरे डोंगराच्या उत्तर खोऱ्यात होती.
\s5
\v 2 तेव्हा देव गिदोनाला म्हणाला, तुझ्याबरोबर जे सैन्य आहे ते मिद्यानावर मला विजय देण्यास फारच आहेत; अशाप्रकारे इस्राएल मजविरूद्ध अशी बढाई मारून म्हणतील की, आम्ही आमच्या सामर्थ्यानेच वाचलो.
\v 3 तर आता तू लोकांच्या कानी जाईल असे जाहीर करून सांग की, जो कोणी भित्रा आणि घाबरट आहे, त्याने गिलाद डोंगरावरून निघून परत माघारी जावे. तेव्हा लोकांतून बावीस हजार परत माघारी गेले आणि दहा हजार राहिले.
\s5
\v 4 मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, अद्याप लोक फार आहेत; तू त्यास खाली पाण्याजवळ ने, आणि तेथे मी त्तुझ्यासाठी त्यांची कसोटी घेईन. ज्याच्याविषयी मी तुला सांगेन, याने तुझ्याबरोबर यावे तो तुझ्याबरोबर जावो, आणि ज्या प्रत्येकाविषयी मी तुला सांगेन की, याने तुझ्याबरोबर न यावे, तो न जावो.
\s5
\v 5 मग त्याने लोकांस खाली पाण्याजवळ नेले; मग परमेश्वराने गिदोनाला सांगितले, जसा कुत्रा चाटून पाणी पितो, तसा जो कोणी आपल्या जिभेने चाटून पाणी पिईल त्याला तू एकीकडे ठेव; आणि जो कोणी पाणी पिण्यास आपल्या गुडघ्यावर टेकेल त्याला एकीकडे ठेव.
\v 6 तेव्हा जे आपला हात आपल्या तोंडाकडे नेऊन चाटीत प्याले, ते पुरुष मोजले, ते तीनशे होते, आणि बाकीचे सर्व लोक पाणी प्यावयास आपल्या गुडघ्यावर टेकले.
\s5
\v 7 नंतर परमेश्वराने गिदोनाला सांगितले, जे तीनशे पुरुष पाणी चाटून प्याले त्याकडून मी तुम्हास सोडवीन, आणि मिद्यानाला तुझ्या हाती देईन; यास्तव बाकीचे सर्व लोकांस आपल्या ठिकाणी जाऊ दे.
\v 8 तेव्हा त्या लोकांनी त्यांच्या हाती अन्नपुरवठा व त्यांची रणशिंगे घेतली, आणि त्याने इस्राएलाची बाकीची सर्व माणसे त्यांच्या तंबूकडे पाठवली; केवळ ती तीनशे माणसे ठेवली तेव्हा मिद्यानी तळ त्यांच्याखाली खिंडीत होता.
\s5
\v 9 आणि त्या रात्री असे झाले की परमेश्वराने त्याला सांगितले, तू उठून खाली तळावर जा, कारण मी तो तुझ्या हाती दिला आहे.
\v 10 आणि जर तुला खाली जायला भीति वाटत असली तर आपला सेवक पुरा यालाबरोबर घेऊन खाली तळाजवळ ने.
\v 11 मग ते जे बोलतील, ते तू ऐक; आणि मग तुझे हात बळकट होतील आणि तू उतरून तळावर जाशील. तेव्हा तळात जे हत्यारबंद होते, त्यांच्या काठापर्यंत तो आपला सेवक पुरा याला घेऊन खाली गेला.
\s5
\v 12 तेव्हा मिद्यांनी व अमालेकी व पूर्वेकडल्या सर्व प्रजा खिंडीत टोळाच्या दाट थव्याप्रमाणे पसरल्या होत्या, आणि त्यांचे उंट मोजता येणार नाही इतके जास्त होते; ते संख्येने समुद्राच्या काठावरल्या वाळूच्या कणाप्रमाणे असंख्य होते.
\s5
\v 13 मग गिदोन गेला आणि पाहा, कोणी आपल्या सोबत्याला असे स्वप्न सांगत होता की, पाहा, मी एक स्वप्न पाहिले, सातूची गोल भाकर मिद्यानी तळात घरंगळत येऊन एका तंबूपर्यंत आली आणि तिने असा जोराचा धक्का दिला की, तो तंबू पडला आणि उलटा झाला अशाप्रकारे तो सपाट झाला.
\v 14 तेव्हा त्याच्या सोबत्याने उत्तर दिले की, इस्राएली माणूस योवाशाचा पुत्र गिदोन याची ही तरवार तिच्याशिवाय हे काही नाही; देवाने मिद्यान व सर्व तळ त्याच्या हाती दिला आहे.
\s5
\v 15 तेव्हा असे झाले की गिदोनाने ते स्वप्न व त्याचा अर्थ ऐकल्यावर नमन करून प्रार्थना केली; मग तो इस्राएली तळास माघारा येऊन बोलला, तुम्ही उठा, कारण की परमेश्वराने मिद्यांनी तळ तुमच्या हाती दिला आहे.
\v 16 तेव्हा त्याने त्या तीनशे माणसांच्या विभागून तीन टोळ्या केल्या, आणि त्यांना सर्व कर्णे दिले आणि रिकामे मडके देऊन त्या मडक्यामध्ये दिवे दिले होते.
\s5
\v 17 तेव्हा त्याने त्यास सांगितले, तुम्ही माझ्याकडे पाहा आणि मी करतो तसे करा; आता पाहा, मी छावणीच्या काठी जातो, जसे मी करतो तसे तुम्ही करा.
\v 18 म्हणजे जेव्हा मी कर्णा वाजवीन, तेव्हा, मी आणि माझ्याबरोबर असणारे सर्व संपूर्ण छावणीच्या चहुकडे कर्णे वाजवीत म्हणा, परमेश्वरासाठी व गिदोनासाठी.
\s5
\v 19 तेव्हा गिदोन व त्याच्याबरोबर असणारे जे शंभर माणसे, ती मध्य प्रहराच्या आरंभी, नुकतेच मिद्यांनानी पहारेकरी बदली करत होते तेव्हा, छावणीच्या कडेला गेले; मग त्यांनी कर्णे वाजवले, आणि आपल्या हातातले मडके फोडले.
\s5
\v 20 असे त्या तिन्ही टोळ्यांनी कर्णे वाजवले, आणि मडके फोडले; मग दिवे आपल्या डाव्या हाती आणि वाजवायाची कर्णे आपल्या उजव्या हाती धरली, आणि परमेश्वराची तलवार व गिदोनाची तलवार, अशी गर्जना केली.
\v 21 तेव्हा ते छावणीच्या चोहोकडून आपापल्या ठिकाणी उभे राहिले; आणि छावणीतले सर्व मिद्यानी लोकांनी पलायन केले. ते मोठ्याने आरोळी मारीत आणि दूर पळाले.
\s5
\v 22 ती तीनशे माणसे तर कर्णे वाजवीत होती, याप्रकारे परमेश्वराने मिद्यानांच्या छावणीत प्रत्येकाची तरवार त्याच्या आपल्या साथीदारावर आणि सैन्याच्या विरूद्ध चालवली; आणि सरेरा येथल्या बेथ-शिट्टा तेथपर्यंत, आणि आबेल-महोलाच्या सीमेपर्यंत टब्बाथास छावणी पळून गेली.
\v 23 मग नफताली व आशेर व मनश्शे यातली इस्राएली माणसे एकत्रित येऊन त्यांनी मिद्यांन्यांचा पाठलाग केला.
\s5
\v 24 गिदोनाने एफ्राइमाच्या सर्वं डोंगराळ प्रदेशातून दूत पाठवून सांगितले, तुम्ही खाली मिद्यान्यांविरूद्ध जाऊन आणि बेथ-बारापर्यत यार्देन नदी तेथवर नियंत्रण करा आणि त्यांना थांबवा; अशी सर्व एफ्राइमी माणसे बोलावली असता. त्यांनी बेथ-बारा व यार्देन तेथवर येऊन पाण्याच्या वाटा रोखून धरल्या.
\v 25 आणि मिद्यान्याचे दोन अधिकारी ओरेब व जेब यांस त्यांनी धरले; तेव्हा ओरेबाला ओरेबाच्या खडकावर मारले; असे ते मिद्यान्याच्या पाठीस लागले, आणि त्यांनी आरेबाचे व जेबाचे डोके यार्देनेपार गिदोनाजवळ आणले.
\s5
\c 8
\p
\v 1 तेव्हा एफ्राइमी माणसे गिदोनास म्हणाली, तू हे आमच्याशी काय केले? तू मिद्यानाशी लढावयाला गेला तेव्हा आम्हाला का बोलावले नाही? असे ते त्याच्याशी जोरदारपणे वादविवाद करू लागले.
\s5
\v 2 तेव्हा तो त्यास म्हणाला, तुमच्या तुलनेत मी आता असे काय केले आहे की, त्याची तुलना तुमच्याशी करावी? एफ्राइमाच्या द्राक्षांचा सरवा हा अबियेजेराच्या द्राक्षांच्या पिकांपेक्षा चांगला नाही काय?
\v 3 मिद्यानाचे राजपुत्र ओरेब व जेब यांच्यावर देवाने तुम्हाला विजय दिला; मी तुमच्या तुलनेत काय साध्य केले आहे? तेव्हा तो अशी गोष्ट बोलल्यावर त्यांचा त्यावरला राग नाहीसा झाला.
\s5
\v 4 गिदोन व त्याच्याबरोबर जी तीनशे माणसे होती, ती यार्देन ओलांडून आली. ते दमलेले असतानाही त्यांनी त्यांचा पाठलाग केला.
\v 5 तेव्हा तो सुक्कोथांतल्या माणसांस म्हणाला, माझ्याबरोबरच्या लोकांस तुम्ही कृपाकरून भाकरी द्या; कारण ते दमलेले आहेत, आणि मिद्यानाचे राजे जेबाह व सलमुन्ना यांचा पाठलाग मी करत आहे.
\s5
\v 6 तेव्हा सुक्कोथाचे अधिकारी म्हणाले, काय, जेबाह व सलमुन्ना यांच्यांवर तू आधीच मात केली आहेस काय? आम्हाला माहित नाही आम्ही तुझ्या सैन्याला भाकर का द्यावी?
\v 7 तेव्हा गिदोन म्हणाला, जेव्हा परमेश्वर जेबाह व सलमुन्ना ह्यांच्यावर मला विजय देईल तेव्हा मी रानांतल्या काट्यांनी व कुसळ्यांनी तुमचे देह फाडीन.
\s5
\v 8 नंतर तो तेथून पनुएलास गेला आणि तेथल्या लोकांबरोबर त्याचप्रकारे बोलला, परंतु जसे सुक्कोथांतल्या माणसानी उत्तर दिले होते, तसेच पनुएलांतल्या माणसांनी त्याला उत्तर दिले.
\v 9 तेव्हा तो पनुएलांतल्या माणसांस असे म्हणाला, जेव्हा मी शांतीने माघारा येईन, तेव्हा मी हा बुरूज खाली ओढून टाकीन.
\s5
\v 10 तेव्हा जेबाह व सलमुन्ना कर्कोरांत होते, त्यांचे सैन्यही त्यांच्याबरोबर होते; पूर्वेकडल्या त्यांच्या अवघ्या सैन्यांतले जे उरलेले होते ते सर्व पंधरा हजार होते; त्याच्यातले जे लढणारे एक लाख वीस हजार पुरुष तरवारीने पडले होते.
\s5
\v 11 तेव्हा गिदोन नोबाह व यागबहा यांच्या वाटेने शत्रूच्या छावणीत पूर्वेस चढून गेला; आणि त्याने शत्रूच्या सैन्याचा बेसावध असताना त्यांच्यावर हल्ला केला.
\v 12 जेबाह व सलमुन्ना हे तर पळाले, परंतु त्याने त्यांचा पाठलाग करून हे मिद्यानाचे दोन राजे यांस पकडले, आणि त्यांच्या सर्व सैन्यात घबराहट पसरली.
\s5
\v 13 मग योवाशाचा पुत्र गिदोन हेरेस घाटावरून लढाईहून माघारा आला.
\v 14 तेव्हा त्याने सुक्कोथांतला एक तरुण माणूस धरला, आणि त्याच्याजवळ सल्ला मागितला. त्या तरुण माणसाने त्यांना सुक्कोथाचे अधिकारी आणि त्यातले वडील अशा सत्याहत्तर माणसांचे वर्णन लिहून दिले.
\s5
\v 15 मग तो सुक्कोथातल्या माणसांजवळ जाऊन बोलला, जेबाह व सलमुन्ना हे तुम्ही पाहा; याविषयी तुम्ही माझी थट्टा करीत बोलला, काय, जबाह व सलमुन्ना यांना आधीच जिंकले आहे काय? आम्हाला माहित नाही तुझ्या सैन्याला आम्ही भाकर का द्यावी?
\v 16 नंतर त्याने त्या नगराच्या वडीलांना धरले, आणि रानांतल्या काट्या व कुसळ्यांनी सुक्कोथातल्या माणसांस शिक्षा केली
\v 17 आणि त्याने पनुएलाचा बुरूज खाली ओढून टाकला, त्या नगरांतल्या माणसांना मारून टाकले.
\s5
\v 18 मग जेबाह व सलमुन्ना यांस तो म्हणाला, जी माणसे तुम्ही ताबोर येथे मारली ती कशी होती? तेव्हा ते बोलले, जसा तू आहेस तशीच ती होती; त्यातला प्रत्येकजण राजाच्या पुत्रासारखा होता.
\v 19 गिदोन म्हणाला, ते माझे भाऊ, माझ्या आईचे पुत्र होते; जर तुम्ही त्यास जिवंत वाचवले असते, जसा परमेश्वर जिवंत आहे, मी तुम्हाला मारले नसते.
\s5
\v 20 तेव्हा त्याने आपला ज्येष्ठ पुत्र येथेर याला सांगितले, तू उठून त्यास मार. परंतु त्या तरुणाने आपली तरवार काढली नाही; कारण अजूनपर्यंत तो लहानच होता, म्हणून तो घाबरला.
\v 21 तेव्हा जेबाह व सलमुन्ना म्हणाला, तू उठून आम्हास मार, कारण जसा पुरुष, तसे त्याचे सामर्थ्य आहे. यास्तव गिदोनाने उठून जेबाह व सलमुन्ना यांस मारले, आणि त्यांच्या उंटाच्या गळ्यांमध्ये ज्या चंद्राच्या आकाराचे दागिने होते ते काढून घेतले.
\s5
\v 22 तेव्हा इस्राएलातल्या माणसांनी गिदोनाला सांगितले, आम्हावर तुझ्या पुत्राने आणि तुझ्या नातवाने राज्य करावे कारण तू आम्हाला मिद्यानाच्या सत्तेतून सोडवले आहे.
\v 23 तेव्हा गिदोन त्यास बोलला, मी तुम्हांवर राज्य करणार नाही, माझा पुत्रही तुम्हांवर राज्य करणार नाहीतर परमेश्वर तुम्हांवर राज्य करील.
\s5
\v 24 तरी गिदोन त्यास बोलला, मी तुमच्याजवळ एक मागणे करीन की तुम्ही एकएकाने आपापल्या लुटीतले कुंडले मला द्यावे. त्यांत तर सोन्याची कुंडले होती, कारण ते इश्माएली लोक होते.
\v 25 तेव्हा ते बोलले, आम्ही देतोच देतो मग त्यांनी वस्त्र पसरले, आणि त्यांतल्या एकएकाने आपापल्या लुटीची कुंडले त्यावर टाकली.
\s5
\v 26 आणि जी सोन्याची कुंडले त्याने मागितली त्यांचे सोने एक हजार सातशे शेकेल वजनाचे होते; चंद्रकोरी व बिंदुरूप अलंकार व मिद्यांनी राजांची जांभळी वस्रे याखेरीज आणि त्यांच्या उंटांच्या गळ्यांतले हार यांखेरीज ते होते.
\s5
\v 27 तेव्हा गिदोनाने त्याचे याजकाचे एफोद केले, आणि आपले नगर अफ्रा यात ते ठेवले, मग सर्व इस्राएलानी तेथे त्याची उपासना करून व्यभिचार केला; असे ते गिदोनाला व त्याच्या घराण्याला पाशरूप झाले.
\v 28 मिद्यानांचा तर इस्राएलाच्या लोकांपुढे मोड झाला, आणि त्यांनी आपले डोके आणखी वर केले नाही; असे गिदोनाच्या दिवसात देश चाळीस वर्षे स्वस्थ राहिला.
\s5
\v 29 योवाशाचा पुत्र यरूब्बाल तर आपल्या घरी जाऊन राहिला.
\v 30 आणि गिदोनाला सत्तर पुत्र झाले; कारण त्याला पुष्कळ पत्न्या होत्या.
\v 31 आणि शखेमांत जी त्याची उपपत्नी होती तिच्यापासून त्याला पुत्र झाला, आणि त्याने त्याचे नाव अबीमलेख ठेवले.
\s5
\v 32 मग योवाशाचा पुत्र गिदोन चांगल्या म्हातारपणी मेला, आणि त्याला अबीयेजऱ्यांच्या अफ्रास आपला पिता योवाश याच्या कबरेत पुरण्यात.
\v 33 तेव्हा असे झाले की, गिदोन मेल्यावर इस्राएलाच्या लोकांनी फिरून बाल देवामागे लागून व्यभिचार केला, आणि बाल-बरीथ आपला देव असा करून ठेवला.
\s5
\v 34 असे इस्राएलाच्या लोकांनी आपला देव परमेश्वर, ज्याने त्यास त्यांच्या चहुंकडल्या सर्व शत्रूच्या हातातून सोडवले, त्याची आठवण केली नाही.
\v 35 आणि यरूब्बाल जो गिदोन, त्याने इस्राएलावर जे अवघे उपकार केले होते, त्यांप्रमाणे त्याच्या घराण्यावर त्यांनी दया केली नाही.
\s5
\c 9
\p
\v 1 यरूब्बालाचा मुलगा अबीमलेख, याने शखेमास आपल्या आईच्या नातेवाईकांजवळ जाऊन त्यास आणि त्याच्या आईच्या घरातील सर्व परिवाराला म्हटले,
\v 2 तुम्ही कृपाकरून शखेमांतल्या सर्व माणसास सांगा म्हणजे ते ऐकतील, यरूब्बालाच्या सर्व सत्तर मुलांनी तुम्हांवर राज्य करावे किंवा एका मुलाने तुम्हांवर राज्य करावे? यांतून तुम्हाला कोणते चांगले वाटते? मी तुमच्या हाडाचा व मांसाचा आहे याची आठवण करा.
\s5
\v 3 तेव्हा त्याच्या आईचे नातेवाईक त्याच्याविषयी शखेमांतल्या सर्व माणसांशी बोलले, आणि त्यांनी अबीमलेखास अनुसरण्याचे मान्य केले, कारण त्यांनी म्हटले, तो आमचा भाऊ आहे.
\v 4 त्यांनी त्याला बाल-बरीथाच्या घरातून सत्तर शेकेल रुपे दिले, आणि अबीमलेखाने बेकायदेशीर व बेदरकार स्वभावाची माणसे भाडयाने ठेवली. यास्तव ती त्याच्यामागे चालली.
\s5
\v 5 तो अफ्रास आपल्या बापाच्या घरी गेला, आणि त्याने आपले भाऊ म्हणजे यरूब्बालाचे सत्तर मुले एका दगडावर मारले; तरी यरूब्बालाचा धाकटा पुत्र योथाम राहिला, कारण तो लपलेला होता.
\v 6 मग शखेमांतली सर्व पुढारी व बेथ मिल्लोतल्या सर्वांनी मिळून जाऊन शखेमामधल्या एलोन खांबाजवळ अबीमलेखाला राजा करून घेतले.
\s5
\v 7 नंतर लोकांनी योथामाला हे कळविले, तेव्हा तो गरिज्जीम डोंगराच्या शिखरावर जाऊन उभा राहिला. त्याने आपला स्वर उंच केला आणि त्यांना बोलला, शखेमाच्या पुढाऱ्यांनो, देवाने तुमचे ऐकावे म्हणून तुम्ही माझे ऐका.
\v 8 झाडे आपल्यावर अभिषेकाने राजा करायास निघाली; तेव्हा त्यांनी जैतूनाला म्हटले, तू आमचा राजा हो.
\s5
\v 9 तेव्हा जैतूनाने त्यास म्हटले, झाडांवर अधिकार करायास जावे म्हणून, ज्याने देवाचा व माणसाचा सन्मान करीतात, ते माझे तेल मी सोडून देऊ काय?
\v 10 नंतर त्या झाडांनी अंजिराला म्हटले तू चल, आमचा राजा हो.
\v 11 तेव्हा अंजिराने त्यास म्हटले, मी आपली गोडी व आपले चांगले फळ सोडून, झाडांवर अधिकार कारायास जावे की काय?
\s5
\v 12 नंतर त्या झाडानी द्राक्षवेलाला म्हटले, तू चल, आमचा राजा हो.
\v 13 तेव्हा द्राक्षवेलाने त्यास म्हटले, मी आपला ताजा रस जो देवाला व मनुष्यांस संतुष्ट करतो, तो सोडून झाडावर अधिकार करायास जावे की काय?
\v 14 नंतर त्या सर्व झाडानी काटेरी झुडुपाला म्हटले, तू चल, आमचा राजा हो.
\s5
\v 15 तेव्हा काटेरी झुडुपाने त्या झाडांस म्हटले, जर तुम्ही खरेपणाने मला अभिषेक करून राजा करीत असाल, तर येऊन माझ्या छायेचा आश्रय घ्या; नाहीतर काटेरी झुडुपातून विस्तव निघून लबानोनावरल्या गंधसरूस जाळून टाकील.
\v 16 यास्तव आता तुम्ही विचार करा की, खरेपणाने व प्रामाणिकपणाने वर्तणूक करून अबीमलेख राजा केले, आणि यरूब्बालासंबंधी आणि त्याच्या घराण्यासंबंधी जर तुम्ही बरे केले का आणि त्याच्या हातांच्या कृत्यांनुसार त्याला शिक्षा केली आहे काय?
\s5
\v 17 आणि विचार करा की, माझ्या बापाने तुमच्यासाठी लढाई केली, आपला जीव धोक्यात घालून तुम्हाला मिद्यानाच्या हातातून सोडवले आहे.
\v 18 परंतु तुम्ही आज माझ्या बापाच्या घरावर उठला, आणि त्याचे पुत्र सत्तर माणसे, यांस तुम्ही एका शिळेवर जिवे मारले, आणि त्याच्या दासीचा पुत्र अबीमलेख याला शखेमांतल्या माणसांवर राजा करून ठेवले, कारण तो तुमचा भाऊ आहे.
\s5
\v 19 तर तुम्ही आजच्या दिवशी यरूब्बालाविषयी व त्याच्या घराण्याविषयी खरेपणाने व प्रामाणिकपणाने जर वर्तणूक केली असेल, तर अबीमलेखामध्ये संतोष करा; त्यानेही तुम्हामध्ये संतोष करावा.
\v 20 परंतु जर तसे नाही, तर अबीमलेखांतून विस्तव निघून शखेमांतील व मिल्लोतील माणसांस जाळून टाको, आणि शखेमातल्या व मिल्लोतील माणसांतून विस्तव निघून अबीमलेखाला जाळून टाको.
\v 21 नंतर योथाम पळून गेला व आपला भाऊ अबीमलेख ह्याच्या भीती पोटी तो बैर येथे जाऊन राहिला.
\s5
\v 22 तेव्हा अबीमलेखाने इस्राएलावर तीन वर्षे राज्य केले.
\v 23 नंतर देवाने अबीमलेख व शखेमांतली माणसे यांमध्ये दुष्ट आत्मा पाठवला, यास्तव शखेमांतल्या माणसानी अबीमलेखाशी कपटाने वागु लागले;
\v 24 देवाने हे केले यासाठी की, यरूब्बालाच्या सत्तर पुत्रांच्या विरोधात केलेल्या हिंकाचाराचा बदला घ्यावा, व त्यांच्या रक्तपाताबद्दल त्यांचा भाऊ अबीमलेख दोषी ठरवला जावा; आणि त्याच्या भावांचा खून करण्यात त्याला मदत केली म्हणून, शखेमांतल्या माणसेही जबाबदार धरली जावीत.
\s5
\v 25 नंतर शखेमातल्या माणसानी त्याच्यासाठी डोंगरांच्या शिखरावर दबा धरणारे ठेवले, आणि त्यांनी आपल्याजवळून जो कोणी वाटेवर चालला, त्याला लुटले. हे कोणीतरी अबीमलेखाला सांगितले.
\s5
\v 26 मग एबेदाचा पुत्र गाल आपल्या भावांसहीत आला, आणि ते शखेमात आल्यानंतर शखेमांतल्या माणसानी त्याच्यावर विश्वास ठेविला.
\v 27 तेव्हा त्यांनी शेतात जाऊन आपल्या द्राक्षमळ्यांची खुडणी करून द्राक्षांचा रस काढला आणि ते उत्साह करीत आपल्या देवाच्या घरात गेले, आणि तेथे खाऊन पिऊन त्यांनी अबीमलेखाला शाप दिला.
\s5
\v 28 तेव्हा एबेदाचा पुत्र गाल बोलला, अबीमलेख कोण आहे की आम्ही त्याचे दास असावे? यरूब्बालाचा मुलगा व त्याचा कारभारी जबुल हे शखेमाचा बाप हमोर यांच्या कुळांतील लोकांचे दास असतील पण आम्ही अबीमलेखाची सेवा का करावी?
\v 29 आणि हे लोक माझ्या हाती असते तर किती बरे होते! म्हणजे मी अबीमलेखाला काढून टाकले असते. मी अबीमलेखाला म्हणेन, तू आपले सैन्य बाहेर बोलाव.
\s5
\v 30 त्या वेळेस त्या नगराचा अधिकारी जबुल याने, एबेदाचा पुत्र गाल याच्या गोष्टी ऐकल्या, आणि त्याचा राग पेटला.
\v 31 मग त्याने कपट करून अबीमलेखाजवळ दूत पाठवून असे सांगितले की, पाहा, एबेदाचा पुत्र गाला आपल्या भावांसोबत शखेमास आला आहे; आणि पाहा, ते तुझ्याविरूद्ध नगराला चिथावणी देत आहेत.
\s5
\v 32 तर आता, तू आपल्या जवळच्या लोकांसहीत रात्री उठून शेतात दबा धर.
\v 33 मग असे व्हावे की, सकाळी सूर्य उगवताच तू उठून नगरावर हल्ला करा; मग पाहा, तो आपल्या जवळच्या लोकांसुध्दा तुझ्याजवळ बाहेर येईल, तेव्हा जसे तुझ्या हाती येईल तसे तू त्याचे कर.
\s5
\v 34 यास्तव अबीमलेखाने आपल्याजवळच्या सर्व लोकांसहीत रात्री उठून चार टोळ्या करून शखेमावर दबा धरला.
\v 35 मग एबेदाचा पुत्र गाल, बाहेर येऊन नगराच्या वेशीजवळ उभा राहिला, आणि अबीमलेख आपल्याजवळच्या लोकांसोबत दबा सोडून उठला.
\s5
\v 36 तेव्हा गालाने त्या लोकांस पाहून जबुलाला म्हटले, पाहा, लोक डोंगरांच्या शिखरांवरून उतरतात. मग जबुल त्यास बोलला, तुला डोंगराची छाया मनुष्यांसारखी दिसते.
\v 37 तेव्हा गालाने फिरून असे म्हटले की, पाहा, देशाच्या उंचवटयावरून लोक उतरतात; आणि एक टोळी एलोन मौननीमाच्या वाटेवरून येत आहे.
\s5
\v 38 मग जबुल त्याला बोलला, तू आपल्या ज्या तोंडाने बोललास, अबीमलेख कोण की, आम्ही त्याची चाकरी करावी ते आता कोठे आहे? ज्या लोकांस तू तुच्छ केले, ते हेच की नाहीत? आता मी म्हणतो, तू बाहेर जाऊन त्यांच्याशी लढाई कर.
\v 39 मग गालाने शखेमांतल्या माणसांपुढे होऊन, बाहेर जाऊन अबीमलेखाशी लढाई केली.
\v 40 तेव्हा अबीमलेख त्याच्या पाठीस लागला असता तो त्याच्यापुढून पळाला, आणि वेशीच्या दारापर्यंत बहुत लोक जखमी होऊन पडले.
\s5
\v 41 मग अबीमलेख आरूम्यात राहिला, आणि गालाने व त्याच्या भावांनी शखेमांत न राहावे म्हणून जबुलाने त्यास घालवले.
\v 42 नंतर पुढल्या दिवशी असे झाले की लोक बाहेरल्या शेतांत गेले, आणि हे अबीमलेखाला कोणीतरी सांगितले;
\v 43 तेव्हा त्याने लोक मिळवून त्यांच्या तीन टोळ्या केल्या; मग शेतात दबा धरला, आणि त्याने न्याहाळले; तर पाहा लोक नगरांतून बाहेर आले होते, तेव्हा त्याने त्यावर चाल करून त्यास मारले.
\s5
\v 44 त्या वेळेस अबीमलेख आणि त्याच्या सोबतची जी टोळी, ती घाला घालून नगराच्या वेशीजवळ उभी राहिली, आणि दुसऱ्या दोन टोळ्यानी शेतात जे सर्व, त्यांवर घाला घालून त्यास मारले.
\v 45 अबीमलेखाने तर त्या सगळ्या दिवसांत नगराशी लढाई केली, आणि त्याने नगर घेतले व त्यांत, जे लोक होते त्यास जिवे मारले, आणि नगर उध्वस्त करून त्यावर मीठ पेरून टाकले.
\s5
\v 46 तेव्हा शखेमाच्या बुरूजांतल्या सर्व हे माणसानी ऐकले, आणि ते बरीथ देवाच्या घराच्या बुरूजात गेली.
\v 47 मग शखेमाच्या बुरूजातली सर्व माणसे एकवट झाली आहेत, असे अबीमलेखाला कोणी सांगितले.
\s5
\v 48 तेव्हा अबीमलेख आपल्याजवळच्या सर्व लोकांसहीत सलमोन डोंगरावर गेला, आणि अबीमलेखाने आपल्या हाती कुऱ्हाड घेऊन झाडाची फांदी तोडली, मग तिला आपल्या खांद्दावर उचलून घेऊन त्याने आपल्या जवळच्या लोकांस सांगितले, जे मी केले ते तुम्ही पाहिले, तसे माझ्यासारखे लवकर करा.
\v 49 तेव्हा सर्व लोकांतल्या एकएकाने फांदी तोडून घेतली, आणि ते अबीमलेखाच्यामागे चालले; मग त्यांनी, त्या फांद्या बुरुजाला लावल्या व ते लोक आत असता बुरूजाला आग लावली; अशी शखेमाच्या बुरुजातली सर्व पुरुष व स्त्रिया सुमारे एक हजार इतकी मेली.
\s5
\v 50 नंतर अबीमलेख तेबेसास गेला, आणि त्याने तेबेजावर तळ देऊन ते घेतले.
\v 51 परंतु त्या नगरात एक मजबूत बुरूज होता, आणि सर्व पुरुष स्त्रियांसुध्दा म्हणजे त्या नगरांतली सर्व माणसे त्यांत पळून गेली आणि आपल्यामागे दरवाजा बंद करून बुरूजाच्या धाब्यावर चढले.
\s5
\v 52 नंतर अबीमलेख त्या बुरूजाजवळ आला आणि त्याच्याविरूद्ध लढला, आणि बुरूजाला आग लावून जाळावयास त्याच्या दाराजवळ गेला.
\v 53 तेव्हा एका स्रीने अबीमलेखाची टाळू फोडण्यास त्याच्या डोक्यावर जात्याची वरची तळी टाकतो.
\v 54 तेव्हा त्याने घाई करून आपला हत्यारे वाहणारा जो तरुण त्याला हाक मारून सांगितले, तू आपली तरवार काढून मला जिवे मार, नाहीतर मजविषयी म्हणतील की बाईने त्याला मारले. यास्तव त्याच्या तरूणाने त्याला भोसकल्यावर तो मेला.
\s5
\v 55 मग अबीमलेख मेला हे पाहून इस्राएली माणसे आपापल्या ठिकाणी गेली.
\v 56 तर अबीमलेखाने जी दुष्टाई आपल्या सत्तर भावांस जिवे मारण्याने आपल्या पित्याविषयी केली होती, तिचा देवाने त्याच्यावर सूड घेतला.
\v 57 आणि शखेमांतल्या माणसांचीही सर्व दुष्टाई देवाने त्यांच्या मस्तकावर उलटून लावली; याप्रमाणे यरूब्बालाचा पुत्र योथाम याचा शाप त्यास भोवला.
\s5
\c 10
\p
\v 1 अबीमलेखा नंतर इस्राएलाच्या सुटकेसाठी दोदोचा पुत्र पुवा याचा पुत्र तोला, जो इस्साखारातला माणूस तो उभा झाला, आणि तो एफ्राइम डोंगराळ प्रदेशात शामीरात राहत होता.
\v 2 त्याने तेवीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला, मग तो मेला आणि शामीरात पुरला गेला.
\s5
\v 3 नंतर त्याच्यामागे गिलादी याईर उभा झाला, आणि त्याने बावीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला.
\v 4 त्याला तीस पुत्र होते; तीस गाढवावर ते बसत होते; आणि त्यास तीस नगरेही होती; आजपर्यंत त्यास हावोथ याईर म्हणतात; ती गिलादाच्या प्रांतात आहेत.
\v 5 मग याईर मरण पावल्यावर त्याला कामोन येथे पुरले.
\s5
\v 6 यानंतर इस्राएलाच्या लोकांनी फिरून देवाच्या दृष्टीने जे वाईट ते केले; कारण की त्यांनी बआल, अष्टारोथ, अरामाचे देव, सीदोनातले देव, मवाबांतले देव व अम्मोनी लोकांचे देव व पलिष्टयांचे देव, यांची उपासना केली; त्यांनी परमेश्वराला सोडले, आणि त्यानंतर त्याची उपासना केलीच नाही.
\v 7 यास्तव परमेश्वराचा राग इस्राएलावर भडकला, आणि त्याने त्यास पलिष्टयांच्या हाती व अम्मोनी लोकांच्या हाती दिले.
\s5
\v 8 त्यावर्षी, त्यानंतर अठरा वर्षे त्यांनी इस्राएलाच्या सर्व लोकांस छळले आणि यार्देनेच्या पलिकडे अमो-यांच्या देशातल्या गिलादात जे इस्राएली होते त्या सर्वांना जाचले.
\v 9 यहूदा व बन्यामीन व एफ्राइमाची घराणे यांच्याशीही लढायास अम्मोनी लोक यार्देन पार करून अलीकडे आले त्यामुळे इस्राएलावर फार मोठे दु:ख आले.
\s5
\v 10 तेव्हा इस्राएली लोकांनी परमेश्वराला मोठ्याने आरोळी मारीत म्हटले की, आम्ही तुझ्याविरूद्ध पाप केले आहे; ते असे की आम्ही आपल्या देवाला सोडून बालाची उपासना केली.
\v 11 तेव्हा परमेश्वराने इस्राएलाच्या लोकांस म्हटले. मिसऱ्यांपासून व अमोऱ्यांपासून व अम्मोन्यांच्या लोकांपासून व पलिष्ट्यांपासून मी तुम्हांस सोडवले नाही काय?
\v 12 आणि सीदोनी व अमालेकी व मावोनी यानी तुम्हांस जाचले, तेव्हा तुम्ही मला मोठ्याने हाक मारली, आणि मी तुम्हांस त्यांच्या हातातून सोडवले.
\s5
\v 13 तरी तुम्ही मला सोडून दुस-या देवांची उपासना केली; यास्तव मी यापुढे तुमचा बचाव करणार नाही.
\v 14 जा, आणि ज्या देवाची तुम्ही उपासना करता त्यांला हाक मारा; तुमच्या संकटाच्या वेळेस त्याने तुम्हास सोडवावे.
\s5
\v 15 तेव्हा इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वराला म्हटले, आम्ही पाप केले आहे; जे सर्व तुला चांगले वाटेल, त्याप्रमाणे तू आम्हास कर; आम्ही तुला विनंती करतो केवळ त्या दिवशी तू आम्हास सोडव.
\v 16 तेव्हा त्यांनी आपल्यामधून परके देव दूर करून परमेश्वराची उपासना केली, आणि इस्राएलाच्या दु:दुःखामुळे त्याच्या मनाला खेद झाला.
\s5
\v 17 अम्मोनी लोक तर एकत्र मिळून त्यांनी गिलादांत तळ दिला, आणि इस्राएलाच्या लोकांनी एकत्र जमून मिस्पात तळ दिला.
\v 18 तेव्हा गिलादातले लोक व अधिकारी एकमेकाला म्हणाले जो माणूस अम्मोनी लोकांशी लढू लागेल असा मनुष्य कोण आहे? तो गिलादांतल्या सर्व राहणाऱ्यांचा अधिकारी असा होईल.
\s5
\c 11
\p
\v 1 गिलादी इफ्ताह पराक्रमी वीर होता, परंतु तो इफ्ताह वेश्या स्रीचा पुत्र होता, आणि गिलाद त्याचा पिता होता.
\v 2 गिलादाच्या बायकोने त्यापासून दुसऱ्या पुत्रांना जन्म दिला, आणि जेव्हा त्या स्रीचे पुत्र मोठे झाले, तेव्हा त्यांनी इफ्ताहाला घालवून दिले आणि म्हटले, आमच्या बापाच्या घरी तुला वतन प्राप्त होणार नाही; कारण तू दुसऱ्या स्रीचा पुत्र आहेस.
\v 3 यास्तव इफ्ताह आपल्या भावांपुढून पळाला, आणि टोब देशांत जाऊन राहिला; तेव्हा रिकामटेकडी माणसे इफ्ताहाजवळ मिळून त्याच्याबरोबर चालली.
\s5
\v 4 मग काही वेळानंतर असे झाले की अम्मोनी लोकांनी इस्राएलाशी लढाई केली.
\v 5 जेव्हा अम्मोनी लोक इस्राएलाशी लढत असताना असे झाले की गिलादाचे वडील मंडळ इफ्ताहाला टोब देशांतून परत आणायला गेले.
\v 6 तेव्हा ते इफ्ताहाला म्हणाले, तू येऊन आमचा सेनापती हो, कारण आम्ही अम्मोनी लोकांशी लढत आहो.
\s5
\v 7 इफ्ताह गिलादाच्या वडील जनास बोलला, तुम्ही माझा द्वेष करून माझ्या पित्याच्या घरांतून मला घालवले की नाही? तर आता तुम्ही संकटात असता, माझ्याजवळ कशाला आला?
\v 8 तेव्हा गिलादाच्या वडीलांनी इफ्ताहाला म्हटले, आम्ही आता तुझ्याकडे यासाठी आलो आहो की तू आमच्याबरोबर येऊन अम्मोनी लोकांशी लढाई करावी, मग तू गिलादातल्या सर्व राहणाऱ्यांवर आमच्या अधिकारी असा होशील.
\s5
\v 9 तेव्हा इफ्ताह गिलादाच्या वडीलांस म्हणाला, जर तुम्ही मला अम्मोनी लोकांशी लढायास माघारी नेले, याप्रकारे परमेश्वराने ते माझ्या स्वाधीन केले, तर मी तुमचा अधिकारी असा होईन काय?
\v 10 तेव्हा गिलादातील वडीलजन इफ्ताहास बोलले, जर तुझ्या सांगण्याप्रमाणे आम्ही करीत नाही, तर आपल्यामध्ये परमेश्वर साक्षी होवो.
\v 11 मग इफ्ताह गिलादाच्या वडीलांबरोबर गेला, आणि त्या लोकांनी त्याला आपल्यावर अधिकारी व सेनापति असे करून ठेवले; तेव्हा इफ्ताह आपली सर्व वचने मिस्पांत परमेश्वरासमोर बोलला.
\s5
\v 12 मग इफ्ताहाने अम्मोनी लोकांच्या राजाजवळ वकील पाठवून म्हटले, माझ्यात आणि तुझ्यात काय भांडण आहे? तू माझ्याशी लढावयास सैन्य घेऊन माझ्या देशांत आमचा देश घेण्यास येत आहेस?
\v 13 तेव्हा अम्मोनी लोकांचा राजा इफ्ताहाच्या वकिलांस बोलला, कारण की जेव्हा इस्राएल मिसरांतून आले, तेव्हा त्यांनी आर्णोन नदीपासून याब्बोक व यार्देन ह्या नद्यापर्यंत माझा देश होता तो त्यांनी हिरावून घेतला; तर आता तो देश शांतीने परत दे.
\s5
\v 14 तेव्हा इफ्ताहाने पुन्हा दुसरे वकील अम्मोनी लोकांच्या राजाजवळ पाठवले.
\v 15 आणि त्याला म्हटले, इफ्ताह असे सांगतो की इस्राएलाने मवाबाचा देश व अम्मोनी लोकांचा देश घेतला नाही.
\v 16 परंतु जेव्हा इस्राएल मिसरांतून निघाले, तेव्हा ते सूफ समुद्राजवळच्या रानांतून तांबड्या समुद्रावरून कादेश येथे आले.
\s5
\v 17 मग इस्राएलानी अदोमी राजाजवळ वकील पाठवून म्हटले, तू कृपाकरून आपल्या देशावरून मला जाऊ दे; परंतु अदोमी राजाने ऐकले नाही, आणि मवाबी राजाजवळही पाठवले, परंतु तोसुद्धा मान्य झाला नाही; यास्तव इस्राएल कादेशात राहिले.
\v 18 आणि त्यांनी रानांत चालून अदोम देश व मवाब देश यांस फेरी घातली. असे सूर्याच्या उगवतीकडून मवाब देशास येऊन आर्णोनच्या कांठी तळ दिला परंतु ते मवाब सीमेत गेले नाहीत; कारण आर्णोन मवाबाची सीमा आहे.
\s5
\v 19 तेव्हा इस्राएलानी अमोऱ्यांचा राजा सीहोन याजवळ, म्हणजे हेशबोनांतल्या राजाजवळ वकील पाठवले, आणि इस्राएलानी त्याला म्हटले, तू कृपेने आपल्या देशावरून आम्हास आमच्या ठिकाणापर्यंत जाऊ दे.
\v 20 पण सीहोनाला इस्राएलावर विश्वास नव्हता म्हणून आपल्या सीमेवरून जाऊ देण्याविषयी तयार झाला नाही, परंतु सीहोनाने आपले सर्व लोक मिळवून आणि याहाजात तळ देऊन इस्राएलाशी लढाई केली.
\s5
\v 21 तेव्हा इस्राएलाचा देव परमेश्वर याने सीहोन व त्याचे सर्व लोक इस्राएलाच्या हाती दिले; यास्तव इस्राएलानी त्यांचा नाश केला, आणि त्या देशांत राहिलेले जे अमोरी त्यांचा सर्व देश वतन करून घेतला.
\v 22 असे त्यांनी आर्णोनपासून याब्बोकपर्यंत आणि रानापासून यार्देनेपर्यंत अमोऱ्यांचे सर्व प्रांत वतन करून घेतले.
\s5
\v 23 तर आता इस्राएलाचा देव परमेश्वर याने आपले लोक इस्राएल याच्यापुढून अमोऱ्यांस घालवले; आणि आता तू त्यांच्या देशाच्या मालमत्तेचा ताबा घेतोस काय?
\v 24 तुझा देव कामोश तुला जे वतन देतो, ते तू ठेवशील की नाही? तसे आमचा देव परमेश्वर याने ज्या लोकांस घालवून दिले त्यांच्या सर्व वतनावर आमचा ताबा असावा.
\v 25 तर आता सिप्पोरपुत्र बालाक मवाब राजा यापेक्षा तू चांगला आहेस की काय? इस्राएलाशी वाद करण्यास त्याने आव्हान दिले काय? त्याने त्याच्याशी कधी लढाई पुकारली काय?
\s5
\v 26 जेव्हा इस्राएल हेशबोनांत व त्याच्या गावांत, आणि अरोएर व त्याच्या गावांत, आणि आर्णोनच्या तीरावरल्या सर्व नगरांत तीनशे वर्षे राहिले, त्या वेळेमध्ये तुम्ही ती का काढून घेतली नाहीत.
\v 27 मी तर तुझा काही अपराध केला नाही, परंतु तू मजशी लढण्याने माझे वाईट करतोस; परमेश्वर जो न्यायाधीश तो आज इस्राएली लोक व अम्मोनी लोक यांमध्ये न्याय करो.
\v 28 तथापि अम्मोनी लोकांच्या राजाने आपल्याजवळ इफ्ताहाने जी चेतावणी पाठवली ती नाकारली.
\s5
\v 29 आणि परमेश्वराचा आत्मा इफ्ताहाला प्राप्त झाला, नंतर गिलाद व मनश्शे यात तो चहूकडे गेला, आणि गिलादी मिस्पा त्यात चहूकडे गेला, मग तेथून अम्मोनी लोकाकंडे गेला.
\v 30 इफ्ताहाने परमेश्वराजवळ नवस करून म्हटले जर तू माझ्या हाती अम्मोनी लोक देशील तर,
\v 31 असे होईल की मी अम्मोनी लोकांपासून शांतीने माघारी आलो तेव्हा मला भेटावयाला जे काही माझ्या घराच्या दाराबाहेर येईल, ते परमेश्वराचे होईल, आणि मी त्याचे होमार्पण यज्ञ करीन.
\s5
\v 32 तर इफ्ताह अम्मोनी लोकांविरूद्ध लढावयाला त्याकडे गेला, याप्रकारे परमेश्वराने त्याला विजय दिला.
\v 33 आणि अरबेरापासून मिन्नीथाजवळ येईपर्यंत त्यास मारून वीस नगरे घेतली, आणि द्राक्षमळ्यांच्या आबेल-करामीमपर्यंत त्यांची फार मोठी कत्तल केली; असे अम्मोनी लोक इस्राएल लोकांच्या स्वाधीन झाले.
\s5
\v 34 मग इफ्ताह मिस्पात आपल्या घरास आला; तेव्हा पाहा, त्याची कन्या त्याला भेटावयाला डफ व नाचणारे यांच्यासह बाहेर आली; ती तर त्याची एकुलते एक मूल होती; तिच्याशिवाय त्याला पुत्र किंवा कन्या नव्हती.
\v 35 तेव्हा असे झाले की त्याने तिला पाहताच आपली वस्त्रे फाडून म्हटले, हाय! माझ्या मुली! तू मला दु:खाने पिळून टाकले आहे, आणि मला दुःख देणारी यात तूही आहेस! मी परमेश्वराकडे शपथ वाहिली आहे; यास्तव मला वचनाविरूद्ध वळता येत नाही.
\s5
\v 36 तेव्हा ती त्याला बोलली, हे माझ्या बापा, तू परमेश्वराकडे नवस केला आहे, तर तू जे वचन दिले त्याप्रमाणे तू मजशी सर्वकाही कर; कारण परमेश्वराने तुझे शत्रू अम्मोनी लोक यांचा तुझ्यासाठी सूड घेतला आहे.
\v 37 आणखी तिने आपल्या बापाला म्हटले, मजसाठी ही एक गोष्ट करा की मला दोन महिन्यांची रजा द्या, म्हणजे मी आपल्या मैत्रीणीबरोबर डोंगरावर जाऊन आपल्या कुमारीपणाबद्दल शोक करेल.
\s5
\v 38 तेव्हा त्याने म्हटले, जा. असे त्याने तिला दोन महिने सोडले, आणि ती आपल्या मैत्रीणीबरोबर डोंगरांवर जाऊन आपल्या कुमारीपणाबद्दल रडली.
\v 39 मग दोन महिन्यांच्या शेवटी असे झाले की ती आपल्या बापाजवळ माघारी आली, नंतर त्याने आपण केलेल्या नवसाप्रमाणे तिचे केले. तिचा पुरुषाबरोबर कधीच शारीरीक संबंध आला नव्हता, आणि इस्राएलात अशी रित झाली की,
\v 40 प्रत्येक वर्षी इस्राएलातल्या मुलींनी इफ्ताह गिलादी याच्या कन्येचे स्मरण करायाला वर्षातील चार दिवस जात जावे.
\s5
\c 12
\p
\v 1 तेव्हा एफ्राइमी माणसे एकत्र मिळून आणि उत्तरेस जाऊन इफ्ताहाला म्हणाली, तू आम्हास बोलावल्याशिवाय अम्मोनी विरूद्ध लढावयाला का पलिकडे गेलास? आम्ही तुझ्यासह घराला आग लावून जाळून टाकू.
\v 2 तेव्हा इफ्ताह त्यास म्हणाला, अम्मोन्यांशी माझे व माझ्या लोकांचे फार भांडण होत होते; तेव्हा मी तुम्हास बोलावले, परंतु तुम्ही मला त्यांच्या हातातून सोडवले नाही.
\s5
\v 3 तेव्हा तुम्ही सोडवत नाही, हे पाहून मी माझा जीव धोक्यात घालून माझ्या स्वत:च्या सामर्थ्याने अम्मोनी लोकांविरूद्ध लढावयाला पलिकडे गेलो, याप्रकारे परमेश्वराने मला विजय दिला; तर आजच्या दिवशी तुम्ही लढावयाला मजवर का चढून आला?
\v 4 तेव्हा इफ्ताहाने गिलादाची सर्व माणसे एकत्र जमवून आणि एफ्राइमाशी लढाई केली, आणि गिलादी माणसानी एफ्राइमावर हल्ला केला, कारण ते म्हणाले होते, एफ्राइम व मनश्शे यांच्यामध्ये राहत आहा ते तुम्ही गिलादी एफ्राइमातले पळपुटे आहात.
\s5
\v 5 तेव्हा गिलाद्यांनी एफ्राइम्यांसमोर यार्देनेचे उतारे रोखून धरले, आणि असे झाले की, जेव्हा कोणी एफ्राइमी पळतांना बोलला, तुम्ही मला पार जाऊ द्या, तेव्हा गिलादी माणसे त्यास बोलत असत, तू एफ्राथी आहेस की काय? आणि तो नाही जर बोलला,
\v 6 तर ते त्याला म्हणत, आता तू शिब्बोलेथ असे म्हण; मग तो सिब्बोलेथ असे म्हणत (कारण त्यांना त्या शब्दाचा बरोबर उच्चार करता येत नव्हता) मग ते त्याला धरून यार्देनेच्या उताराजवळ जिवे मारत असत; तर त्या वेळेस एफ्राइमातली बेचाळीस हजार माणसे मारली गेली.
\s5
\v 7 इफ्ताहाने सहा वर्षे इस्राएलाचा न्याय केला; मग इफ्ताह गिलादी मेला, आणि गिलादातल्या एका नगरात त्याला पुरण्यात आले.
\s5
\v 8 मग त्याच्यामागे बेथलेहेमातल्या इब्सानाने इस्राएलाचा न्याय केला.
\v 9 तेव्हा त्याला तीस पुत्र व तीस कन्या होत्या; त्या त्याने बाहेर दिल्या आणि आपल्या पुत्रांसाठी बाहेरून तीस कन्या आणल्या; त्याने सात वर्षे इस्राएलाचा न्याय केला.
\s5
\v 10 नंतर इब्सान मेला, आणि बेथलेहेमात पुरण्यात आले.
\v 11 आणि त्याच्यामागे जबुलूनी एलोन इस्राएलाचा न्यायधीश झाला; त्याने तर दहा वर्षे इस्राएलाचा न्याय केला.
\v 12 नंतर तो जबुलूनी एलोन मेला, आणि त्याला जबुलून देशातल्या अयालोन येथे पुरण्यात आले.
\s5
\v 13 आणि त्यानंतर हिल्लेलाचा पुत्र अब्दोन जो पिराथोनी, तो इस्राएलाचा न्यायाधीश झाला.
\v 14 आणि त्याला चाळीस पुत्र व तीस नातू होते; ते सत्तर गाढवांवर बसत असत; त्याने आठ वर्षे इस्राएलाचा न्याय केला.
\v 15 मग तो पिराथोनी हिल्लेलाचा पुत्र अब्दोन मेला, आणि त्याला एफ्राइम प्रांतांतील अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात पिराथोनात पुरण्यात आले.
\s5
\c 13
\p
\v 1 तेव्हा इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते परत केले, यास्तव परमेश्वराने पलिष्ट्यांना त्यांच्यावर चाळीस वर्षे राज्य करण्याची परवानगी दिली.
\v 2 तेव्हा सरा येथला दानांच्या कुळाचा कोणी माणूस होता; त्याचे नाव मानोहा होते, आणि त्याची स्री वांझ होती, यास्तव तिला लेकरू झाले नव्हते.
\s5
\v 3 तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्या स्रीला दर्शन दिले, आणि तिला म्हटले, पाहा, तू गरोदर राहण्यास असमर्थ होतीस, म्हणून तू पुत्राला जन्म देऊ शकली नाहीस, परंतु आता तू गरोदर होऊन पुत्राला जन्म देशील.
\v 4 आता तू काळजीपूर्वक राहा मद्य किंवा मादक द्रव्य पिऊ नको, आणि जे नियमाप्रमाणे अशुध्द जाहीर केले ते अन्न खाऊ नको.
\v 5 पाहा, तू गरोदर होशील आणि तू पुत्राला जन्म देशील आणि त्याच्या डोक्याचे केस कापण्यासाठी कधीच वस्ताऱ्याचा उपयोग करू नको, कारण की, तो मुलगा गर्भावस्थेपासूनच देवाचा नाजीर होईल. आणि तो इस्राएलाला पलिष्टयांच्या जाचातून सोडवायास आरंभ करील.
\s5
\v 6 तेव्हा त्या स्रीने जाऊन आपल्या पतीला असे सांगितले की, देवाचा माणूस माझ्याजवळ आला, आणि त्याचे रूप देवाच्या दूताच्या रूपासारखे फार भयंकर होते. म्हणून, तो कोठला, हे मी त्याला विचारले नाही, आणि त्याने आपले नाव मला सांगितले नाही.
\v 7 परंतु तो मला म्हणाला, पाहा, तू गरोदर होशील, आणि तू पुत्राला जन्म देशील; तर आता तू दारू आणि मादक द्रव्य पिऊ नको आणि जे काही नियमाप्रमाणे अशुध्द जाहीर केले आहे ते अन्न खाऊ नको; कारण तो बाळ तुझ्या गर्भावस्थेपासून त्याच्या मरणापर्यंत देवाचा नाजीर होईल.
\s5
\v 8 तेव्हा मानोहाने परमेश्वराजवळ विनंती करून म्हटले, हे माझ्या प्रभू, माझे ऐक, जो देवाचा माणूस तू पाठवला होता, त्याने आमच्याजवळ पुन्हा यावे, आणि जो पुत्र जन्मेल, त्यासाठी आम्ही काय करावे, हे आम्हास शिकवावे.
\v 9 तेव्हा देवाने मानोहाचा शब्द ऐकला, यास्तव देवाचा दूत त्या स्रीजवळ ती शेतात बसली असता पुन्हा आला तिचा पती मानोहा तिच्यासोबत नव्हता.
\s5
\v 10 तेव्हा ती स्री त्वरीत पळाली आणि आपल्या पतीला म्हणाली, पाहा, जो पुरुष त्यादिवशी माझ्याजवळ आला होता, तो माझ्या दृष्टीस पडला आहे.
\v 11 मग मानोहा उठून आपल्या पत्नीच्यामागे चालून त्या पुरुषाजवळ गेला, आणि त्याला बोलला, जो पुरुष माझ्या पत्नीबरोबर बोलला होता, तो तूच आहेस काय? तेव्हा तो म्हणाला, होय मीच आहे.
\s5
\v 12 मग मानोहा म्हणाला, तुझे शब्द खरे ठरोत; परंतु त्या मुलासाठी काय नियम ठरवले आहेत आणि त्याचे काम काय असेल?
\v 13 तेव्हा परमेश्वराच्या दूताने मानोहाला म्हटले, जे मी या बाईला सांगितले, त्याविषयी हिने काळजीपूर्वक राहावे.
\v 14 द्राक्षवेलापासून जे येते त्यातले काहीही हिने खाऊ नये, आणि मद्य व मादक द्रव्य पिऊ नये, आणि नियमाप्रमाणे जे काही अशुध्द जाहीर केले आहे ते खाऊ नये; जे सर्व मी हिला आज्ञापिले त्याचे तिने पालन करावे.
\s5
\v 15 तेव्हा मानोहा परमेश्वराच्या दूताला म्हणाला, आम्ही तुला विनंती करतो थोडा वेळ थांब, तुझ्यासाठी करडू तयार करण्यास आम्हाला वेळ दे,
\v 16 परंतु परमेश्वराचा दूत मानोहाला बोलला, मी जरी थांबलो तरी, मी तुझे अन्न खाणार नाही; परंतु जर तू होमार्पण करशील, तर ते तुला परमेश्वर देवाला अर्पण करावे लागेल, (तेव्हा तो परमेश्वर देवाचा दूत होता, हे मानोहाला कळले नव्हते)
\s5
\v 17 मग मानोहाने परमेश्वराच्या दूताला म्हटले, तुझे नाव काय आहे, कारण की तुझे बोलणे खरे ठरल्यावर आम्ही तुझा आदर करू?
\v 18 तेव्हा परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, तू माझे नाव कशासाठी विचारतोस? ते आश्चर्यजनक आहे.
\s5
\v 19 मग मानोहाने अन्नार्पणासह करडू घेऊन, परमेश्वर, जो आश्चर्यकर्म करणारा त्याला खडकावर होमार्पण केले; तेव्हा मानोहा व त्याची पत्नी पाहत असताना,
\v 20 जेव्हा अग्नी वेदीवरून आकाशात चढला, तेव्हा परमेश्वराचा दूत त्या वेदीच्या अग्नीतून वर आकाशात चढला. मानोहा व त्याची पत्नी यांनी हे पाहिले आणि आपली तोंडे भूमीस लावून नमन केले.
\s5
\v 21 मग परमेश्वराचा दूत मानोहाच्या व त्याच्या पत्नीच्या दृष्टीस फिरून पडला नाही; तेव्हा मानोहाला कळले की, तो परमेश्वराचा दूत होता.
\v 22 मग मानोहा आपल्या पत्नीला म्हणाला, आपण खचीत मरू, कारण आपण देवाला पाहीले आहे.
\s5
\v 23 तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली, जर परमेश्वर देवाने आम्हास जिवे मारायास इच्छिले असते, तर त्याने आमच्या हातातून होमार्पण व अन्नार्पण स्वीकारले नसते, आणि ह्या सर्व गोष्टी आम्हास दाखवल्या नसत्या, आणि या वेळेसारखे वर्तमान आम्हास ऐकवले नसते.
\s5
\v 24 नंतर त्या स्रीला पुत्र झाला, आणि तिने त्याचे नाव शमशोन ठेवले; तो पुत्र वाढत गेला, याप्रकारे परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला.
\v 25 तेव्हा सरा व अष्टावोल यांच्या दरम्यान महने दानाच्या छावणीत त्याला परमेश्वराचा आत्मा प्रेरणा करू लागला.
\s5
\c 14
\p
\v 1 नंतर शमशोन खाली तिम्ना येथे गेला, आणि त्याने तिम्नामध्ये पलिष्ट्यांच्या मुलींमध्ये एक स्री पाहिली.
\v 2 तो जेव्हा माघारी आला तेव्हा त्याने आपल्या बापाला व आईला सांगितले, मी तिम्नात पलिष्ट्यांची एक मुलगी पाहिली आहे; तर आता तुम्ही ती मला बायको करून द्या.
\s5
\v 3 परंतु त्याचे आई व बाप त्याला म्हणाले, तुझ्या नातेवाईकात किंवा तुझ्या लोकांत कोणी मुली नाहीत काय, म्हणून तू बेसुंती पलिष्ट्यांतली बायको करून घ्यायला जात आहेस? तथापि शमशोन आपल्या बापाला म्हणाला, तीच मजसाठी मिळवून द्या; कारण जेव्हा मी तिच्याकडे बघितले तेव्हाच मला ती पसंत पडली आहे.
\v 4 परंतु ही तर परमेश्वराची इच्छा होती की पलिष्ट्यांबरोबर परस्पर विरोध व्हावा, त्याच्या आई आणि बापांस हे समजले नव्हते; कारण त्या वेळेस पलिष्टी इस्राएलावर राज्य करत होते.
\s5
\v 5 यानंतर शमशोन आणि त्याचे आईबाप खाली तिम्नास जात होते, आणि तिम्नातल्या द्राक्षमळ्यांपर्यंत पोहंचले, आणि तेथे तरुण सिंह गर्जना करून आला आणि त्याच्या अंगावर येऊ लागला.
\v 6 तेव्हा परमेश्वराचा आत्मा अचानक त्याच्यावर आला, आणि त्याच्या हाती काही नसताही त्याने जसे करडू फाडावे, तसे सिंहाला सहजरीत्या फाडून टाकले; परंतु त्याने जे केले होते ते त्याने आपल्या आईबापांस सांगितले नाही.
\s5
\v 7 तो गेला आणि जाऊन त्या स्त्रिसोबत बोलला; आणि जेव्हा त्याने तिच्याकडे पाहिले, तेव्हा शमशोनाला ती पसंत पडली.
\v 8 काही दिवसानंतर तो तिच्याशी लग्न करण्यास परत गेला, तेव्हा तो त्या सिंहाचे मृत शरीर पाहण्यास बाजूला वळला; आणि त्या सिंहाच्या मृत शरीरात मधमाश्यांचा थवा व मध तेथे त्याने पाहिला.
\v 9 त्याने तो मध आपल्या हाताने वर काढून घेतला आणि तो चालता चालता खात गेला, जेव्हा आपल्या आईबापाकडे आला तेव्हा त्याने त्यांसही त्यातला काही दिला, आणि त्यांनी तो खाल्ला; परंतु त्यांना तो मध त्या सिंहाच्या मृत शरीरातून घेतला आहे हे त्यांने सांगितले नाही.
\s5
\v 10 नंतर शमशोनाचा बाप ती स्री जिथे होती तिथे उतरून खाली गेला, आणि शमशोनाने तेथे मेजवानी दिली, कारण तरुण पुरुषांमध्ये तशी रुढी होती.
\v 11 तिच्या नातेवाईकांनी त्याला पाहताच त्याच्याबरोबर राहण्यासाठी त्याला तीस मित्र आणून दिले.
\s5
\v 12 मग शमशोन त्यांना म्हणाला, आता मी तुम्हाला कोडे सांगतो; मेजवानीच्या सात दिवसात जर तुम्हातील कोणी एकाने त्याचे उत्तर शोधून मला सांगितले, तर मी तुम्हाला तागाचे तीस झगे व कपड्यांचे तीस संच जोड देईन.
\v 13 परंतु जर तुम्हाला त्याचे उत्तर मिळाले नाहीतर, तुम्ही मला तागाचे तीस झगे व कपड्याचे तीस संच जोड द्यावे. तेव्हा ते त्याला म्हणाले, तुझे कोडे आम्हाला सांग, म्हणजे आम्ही ते ऐकू.
\s5
\v 14 तो त्यास म्हणाला, खाणाऱ्यामधून खाण्याजोगे काही बाहेर निघते, बळकटातून काहीतरी गोड बाहेर निघते. परंतु तीन दिवसांत तर त्याच्या पाहुण्यांना त्याचे उत्तर मिळाले नाही.
\s5
\v 15 नंतर चौथ्या दिवशी ते शमशोनाच्या बायकोला म्हणाले, तू आपल्या नवऱ्याकडून युक्तीने कोड्याचे उत्तर मिळवून आम्हाला सांग, नाहीतर आम्ही तुला व तुझ्या बापाच्या कुटुंबाला जाळून टाकू; तुम्ही आम्हाला दरिद्री करण्यासाठी म्हणून बोलावले आहे काय?
\s5
\v 16 तेव्हा शमशोनाची बायको त्याच्यासमोर रडून म्हणू लागली, तुम्ही केवळ माझा द्वेष करता! माझ्यावर प्रीति करतच नाही. तुम्ही माझ्या लोकांना तर कोडे सांगितले आहे, परंतु त्याचे उत्तर मला सांगितले नाही. परंतु शमशोन तिला म्हणाला, पहा, मी आपल्या आईबापाला ते सांगितले नाही, तर तुला कसे सांगू?
\v 17 मेजवाणीच्या सातही दिवसांपर्यंत ती त्याच्याकडे रडतच होती; आणि सातव्या दिवशी त्याने तिला त्याचे उत्तर सांगितले, कारण तिने त्याच्यावर खूप दबाव आणला होता. मग तिने त्या कोड्याचे उत्तर तिच्या लोकांच्या नातेवाईकांना सांगितले.
\s5
\v 18 आणि सातव्या दिवशी सूर्य मावळण्यापूर्वी त्या नगरातल्या माणसांनी त्याला म्हटले, मधापेक्षा गोड ते काय? सिंहापेक्षा बळकट काय आहे? तेव्हा शमशोन त्यास म्हणाला, जर तुम्ही माझ्या कालवडीला नांगराला जुंपले नसते, तर तुम्हाला माझे कोडे उलगडता आलेच नसते.
\s5
\v 19 नंतर परमेश्वराचा आत्मा एकाएकी सामर्थ्याने त्याच्यावर आला. शमशोन अष्कलोनास खाली गेला आणि त्याने त्यातले तीस पुरुष मारले, त्यांना लुबाडून घेतले आणि त्याच्या कोड्याचे उत्तर सांगणाऱ्यांना त्याने ते कपड्यांचे जोड दिले; त्याला खूप राग आला होता, आणि तो त्याच्या बापाच्या घरी निघून गेला.
\v 20 इकडे शमशोन ज्या एका सोबत्याशी मित्रभावाने वागला होता त्यास त्याची बायको त्याच्याजवळच्या मित्राला देऊन टाकण्यात आली.
\s5
\c 15
\p
\v 1 काही दिवसानंतर गव्हाच्या हंगामात शमशोन एक करडू घेऊन आपल्या पत्नीला भेटण्यास गेला; तेव्हा तो स्वत:शी म्हणाला, मी माझ्या पत्नीच्या खोलीत जाईन; परंतु तिच्या पित्याने त्याला आत जाऊ दिले नाही.
\v 2 तिचा पिता म्हणाला, मला वाटले तू तिचा अगदी द्वेष करतोस, म्हणून मी तिला तुझ्या मित्राला देऊन टाकली; तिची लहान बहीण तिच्यापेक्षा सुंदर आहे, आहे की नाही? तिच्याऐवजी तिला घे.
\s5
\v 3 तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला, या वेळेस मी पलिष्ट्यांची हानी केली, तरी त्यासंबधी मी निर्दोष राहीन.
\v 4 शमशोन गेला आणि त्याने जाऊन तीनशे कोल्हे पकडले, आणि शेपटाला शेपूट अशी एकएक जोडीच्या बांधली. नंतर त्याने मशाली घेऊन प्रत्येक जोडीच्या शेपटांमध्ये बांधल्या.
\s5
\v 5 मग मशाली पेटवून त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या उभ्या पिकात सोडले, आणि त्यांनी दोन्ही उभे पिक आणि धान्याच्या रचलेल्या सुडयासुध्दा जाळले आणि त्याबरोबर जैतूनाचे मळेही जाळले.
\v 6 तेव्हा पलिष्ट्यांनी विचारले, हे कोणी केले? नंतर त्यांनी म्हटले, तिम्नाकराचा जावई शमशोन याने केले, कारण त्याने त्याची पत्नी घेऊन त्याच्या मित्राला दिली. मग पलिष्ट्यानी जाऊन तिला व तिच्या पित्याला आग लावून जाळून टाकले.
\s5
\v 7 शमशोन त्यांना म्हणाला, जरी तुम्ही हे केले, तरी त्याचा मी तुमच्याविरूद्ध सूड घेईन, आणि ते केल्यानंतरच मग मी थांबेन.
\v 8 नंतर त्याने त्यांना मांडीवर व कंबरेवर मारून त्यांचे तुकडे तुकडे करून मोठी कत्तल केली. नंतर तो खाली गेला आणि उंच कड्याच्या एटाम दरीत गुहेमध्ये जाऊन राहिला.
\s5
\v 9 मग पलिष्ट्यी बाहेर आले आणि त्यांनी यहूदामध्ये येऊन लढाईची तयारी केली, आणि त्यांनी लेहीत त्यांच्या सैन्याची व्यूहरचना केली.
\v 10 तेव्हा यहूदी माणसे म्हणाली, तुम्ही आम्हावर का हल्ला केला आहे? तेव्हा ते म्हणाले, शमशोनाला पकडण्यासाठी म्हणून आम्ही हल्ला केला आहे; त्याने आमच्याशी जसे केले, तसेच त्याच्याशी करण्यासाठी आम्ही आलो आहो.
\s5
\v 11 नंतर यहूदातली तीन हजार माणसे खाली एटाम दरीच्या उंच कड्याजवळ जाऊन शमशोनाला म्हणाली, पलिष्टी आम्हावर राज्य करतात, हे तुला माहित नाही काय? तर तू हे काय केले? शमशोन त्यांना म्हणाला, जसे त्यांनी माझे केले, तसे मी त्यांचे केले आहे.
\s5
\v 12 ते शमशोनाला म्हणाले, आम्ही तुला बांधून पलिष्ट्यांच्या हाती देण्यासाठी आलो आहोत. तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला, तुम्ही स्वत: मला मारून टाकणार नाही, अशी माझ्याजवळ शपथ घ्या.
\v 13 मग त्यांनी त्याला सांगितले की, नाही, आम्ही फक्त तुला दोरीने बांधू आणि तुला त्यांच्या हाती सोपवू. आम्ही तुला वचन देतो, आम्ही तुला मारून टाकणार नाही. तेव्हा त्यांनी दोन नव्या दोरांनी त्याला बांधून खडकातून वर नेले.
\s5
\v 14 जेव्हा तो लेहीस पोहचला, तेव्हा पलिष्ट्यांनी त्याला पाहून आनंदाने ओरडू लागले; आणि परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला आणि त्याच्या हातांना बांधलेले दोर ताग जळतो तसे झाले आणि दोर हातातून गळून पडले.
\s5
\v 15 नंतर त्याला गाढवाचे ताजे जाभाड सापडले आणि त्याने ते उचलले आणि त्याच्याने एक हजार माणसे मारली.
\v 16 शमशोन म्हणाला, गाढवाच्या जाभाडाने ढिगावर ढिग, गाढवाच्या जाभाडाने मी हजार माणसे मारली.
\s5
\v 17 शमशोनाने बोलणे संपवल्यावर, आपल्या हातातून ते जाभाड फेकून दिले, यावरून त्या ठिकाणाचे नाव रामाथ-लेही ठेवले.
\v 18 तेव्हा शमशोनाला फार तहान लागली आणि त्याने परमेश्वराला हाक मारून म्हटले, तू आपल्या सेवकाला हा मोठा विजय दिला आहे; परंतु आता मी तहानेने मरत आहे आणि न्यायासाठी बेसुंतीच्या हाती पडत आहे.
\s5
\v 19 आणि देवाने लेहीमधील खोलगट जागा दुभंगून फोडली, आणि त्यातून पाणी निघाले; जेव्हा तो ते प्याला, तेव्हा त्याला परत शक्ती आली आणि त्याच्या जीवात जीव आला. यावरून त्या जागेचे नाव एन-हक्कोरे पडले; ती जागा आजपर्यंत लेहीमध्ये आहे.
\v 20 शमशोनाने पलिष्ट्यांच्या दिवसात इस्राएलाचा वीस वर्षे न्याय केला.
\s5
\c 16
\p
\v 1 शमशोन गज्जात गेला आणि तेथे त्याने एक वेश्या पाहिली आणि तो तिच्याजवळ गेला.
\v 2 गज्जेकरास सांगण्यात आले की, शमशोन तिथे आला आहे. गज्जकरांनी ती जागा घेरून टाकली आणि नगराच्या वेशीच्या दाराजवळ त्याच्यासाठी गुप्तपणे दबा धरून ते सारी रात्र वाट पाहत राहिले. त्यांनी रात्रभर काही हालचाल केली नाही. ते म्हणाले, सकाळी उजेडेपर्यंत आपण वाट पाहू या आणि मग आपण त्याला जिवे मारू.
\s5
\v 3 शमशोन मध्यरात्रीपर्यंत बिछान्यात पडून राहिला. मग मध्यरात्री त्याने उठून आणि नगराच्या वेशीची दरवाजे, त्याचे अडसर आणि सर्व, दोन्ही दारबाह्यांसह धरले आणि जमिनीतून उखडून ओढून काढले, आणि ते आपल्या खांद्यावर घेऊन हेब्रोनाच्यासमोर डोंगराच्या शिखरापर्यंत वर नेले.
\s5
\v 4 त्यानंतर असे झाले की, तो सोरेक खोऱ्यात राहणाऱ्या एका स्त्रिवर प्रेम करू लागला; तिचे नाव तर दलीला होते.
\v 5 पलिष्ट्याचे राज्याधिकारी तिच्याजवळ येऊन तिला म्हणाले, शमशोनाचे महान सामर्थ्य कशात आहे आणि आम्ही त्याच्या शक्तीवर कशी मात करून त्याला बांधू, कशा प्रकारे आम्ही त्याला नमवू आणि त्याच्यावर वरचढ होऊ शकू ते युक्तीने विचार. तू हे करशील तर आम्ही प्रत्येकजण तुला अकरा अकराशे चांदीची नाणी देऊ.
\s5
\v 6 आणि त्यामुळे दलीला शमशोनाला म्हणाली, मी विनंती करते तुझे महान बळ कशांत आहे, आणि तुला कोणीही कशाने बांधले म्हणजे तू शक्तिहीन होशील, ते मला सांग.
\v 7 तेव्हा शमशोनाने तिला सांगितले, धनुष्याच्या न सुकलेल्या अशा सात हिरव्या वाद्यांनी, जर त्यांनी मला बांधले, तर मी अशक्त होऊन सामान्य माणसासारखा होईल.
\s5
\v 8 नंतर पलिष्ट्यांच्या अधिकाऱ्यांनी सात सालपटे जी सुकली नव्हती, अशी ते घेऊन दलीलाकडे आले, आणि तिने त्याला त्यांनी बांधले.
\v 9 तेव्हा तिच्या आतल्या खोलीत गुप्तपणे माणसे दबा धरून बसली होती, आणि तिने त्याला म्हटले, शमशोना, पलिष्टी तुजवर चालून आले आहेत! परंतु त्याने जसा तागाचा दोरा अग्नी लागताच तुटून जातो तशा धनुष्याच्या त्या सात हिरव्या वाद्यां तोडून टाकल्या. आणि त्याच्या बळाचे रहस्य त्यांना समजू शकले नाही.
\s5
\v 10 दलीला, शमशोनाला म्हणाली, पाहा, तुम्ही मला फसवले आणि माझ्याशी लबाडी केली. तुमच्यावर कशाने मात करता येईल ते, मी विनंती करते, मला सांग.
\v 11 तेव्हा त्याने तिला सांगितले, जे कधी कामात वापरले नाहीत अशा नव्या दोरांनी जर त्यांनी मला बांधले, तर मी अशक्त होऊन सामान्य माणसासारखा होईन.
\v 12 तेव्हा दलीलाने नवे दोर घेऊन त्याने त्याला बांधले, आणि त्याला म्हटले, शमशोना, पलिष्टी तुझ्यावर चालून आले आहेत. तेव्हा ते आतल्या खोलीत वाट पाहत बसले होते. परंतु शमशोनाने त्याच्या दंडाला बांधलेले दोर धाग्याच्या तुकड्यासारखे तोडून टाकले.
\s5
\v 13 दलीला शमशोनाला म्हणाली, आतापर्यंत तुम्ही मला फसवत आणि माझ्याशी लबाडयाच करत आला आहात. तुमच्यावर कशाने मात करता येईल, हे मला सांग. तेव्हा त्याने तिला सांगितले, जर तू माझ्या डोक्याच्या केसांच्या सात बटा मागाबरोबर विणशील आणि नंतर विणकाराच्या फणीच्या नखात वळवशील तर मी इतर माणसासारखा होईन.
\v 14 तो झोपला तेव्हा तिने त्याचे केस विणकाराच्या फणीमध्ये धाग्यांबरोबर ताणून बांधले आणि नंतर मागावर विणले; आणि ती त्याला म्हणाली, शमशोना, पलिष्टी तुझ्यावर चालून आलेत! तेव्हा तो आपल्या झोपेतून जागा झाला आणि त्याने विणकराची फणी व मागसुद्धा उखडून काढला.
\s5
\v 15 ती त्याला म्हणाली, तुमचे रहस्य जर तुम्ही मला सांगत नाहीतर, मी तुझ्यावर प्रेम करतो, असे तुम्ही कसे म्हणू शकता? तीन वेळा तुम्ही माझी थट्टा केली, आणि आपले महान बळ कशात आहे हे मला सांगितले नाही.
\v 16 तिने आपल्या बोलण्याने त्याच्यावर दडपण आणले आणि कटकट करून त्यावर असा दबाव आणला की, त्याला मरून जावेसे वाटू लागले.
\s5
\v 17 म्हणून शमशोनाने तिला सर्वकाही सांगितले, आणि म्हणाला माझ्या डोक्यावरचे केस कापण्यासाठी कधीच वस्तरा फिरविला गेला नाही; कारण मी आपल्या आईच्या गर्भात असल्यापासून देवाचा नाजीर आहे; जर माझे मुंडन झाले, तर माझे बळ मजपासून जाईल, आणि मी अशक्त होऊन इतर माणसासारखा होईन.
\s5
\v 18 जेव्हा दलीलाने पाहिले त्याने आपले सर्वकाही सत्य सांगितले तेव्हा; तिने पलिष्ट्यांच्या अधिकाऱ्यांस बोलावणे पाठवले म्हणाली, पुन्हा या, कारण त्याने मला सर्वकाही सांगितले आहे. तेव्हा पलिष्टयांचे अधिकारी आपल्या हाती रुपे घेऊन तिच्याकडे गेले.
\v 19 मग तिने त्याला आपल्या मांडीवर गाढ झोपवले. नंतर तिने माणसाला बोलावून त्याच्या डोक्याच्या सात बटा कापल्या. तिने त्याला ताब्यात आणण्यास सुरवात केली, आणि त्याचे बळ त्याच्यातून निघून गेले.
\s5
\v 20 ती म्हणाली, हे शमशोना, पलिष्टी तुजवर आले आहेत. तेव्हा तो आपल्या झोपेतून जागा होऊन उठला म्हणाला, मी पहिल्या वेळेप्रमाणे बाहेर जाईन आणि अंग हालवून सुटेल. परंतु परमेश्वराने त्याला सोडले होते, हे त्याला कळले नाही.
\v 21 पलिष्ट्यांनी तर त्याला धरून त्याचे डोळे फोडून टाकले; नंतर याला खाली गज्जात नेऊन पितळेच्या बेड्यांनी जखडले. मग तो बंदिशाळेत धान्य दळीत असे.
\v 22 तथापि त्याचे मुंडन झाल्यांनतर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले.
\s5
\v 23 मग पलिष्ट्यांचे अधिकारी आपला देव दागोन याजवळ मोठा यज्ञ अर्पण करण्यास करावयास एकत्र जमले; कारण ते म्हणाले, आमच्या देवाने आमचा शत्रू शमशोन आमच्या हाती दिला आहे.
\v 24 तेव्हा लोकांनी त्याला पाहून त्यांच्या देवाची स्तुती केली; त्यांनी असे म्हटले की, आमच्या देवाने, जो आमचा शत्रू त्यावर, विजय मिळवला आहे आणि देशात आमचा नाश करणारा, ज्याने आमच्यांतल्या पुष्कळांना मारले, त्याला आमच्या देवाने आमच्या हाती दिले आहे.
\s5
\v 25 आणि ते जेव्हा आनंद सासरा करत होते तेव्हा ते म्हणाले, तुम्ही शमशोनाला बोलवा, म्हणजे तो आमची करमणूक करील. तेव्हा त्यांनी शमशोनाला बंदिवानांच्या घरांतून बोलावले, आणि तो त्यांच्यापुढे थट्टेचे पात्र झाला, आणि त्यांनी त्याला खांबांच्यामध्ये उभे केले होते.
\v 26 शमशोन त्याचा हात धरणाऱ्या मुलाला म्हणाला, ज्या खांबांचा इमारतीला आधार आहे, ते मी चापसावे म्हणून तू मला त्यांजवळ ने, म्हणजे मी त्यांवर टेकेन.
\s5
\v 27 ते सभागृह तर पुरुषांनी व स्त्रियांनी भरलेले होते, आणि पलिष्ट्यांचे सर्व अधिकारी तेथे होते; सुमारे तीन हजार स्त्री-पुरूष गच्चीवरून शमशोनाची गंमत पाहत होते.
\s5
\v 28 तेव्हा शमशोनाने परमेश्वर देवाला हाक मारीत म्हटले, हे प्रभू देवा, कृपाकरून माझी आठवण कर, आणि हे देवा, या वेळेस एकदाच मात्र कृपाकरून मला बळकट कर; म्हणजे मी आपल्या दोन डोळयांविषयी पलिष्ट्यांचा एकदम सूड उगवून घेईन.
\v 29 नंतर ज्या दोन मधल्या खांबांवर ते सभागृह उभे राहिलेले होते, आणि ज्यांचा त्याला आधार होता, त्यांतला एक शमशोनाने आपल्या उजव्या हाताने आणि दुसरा आपल्या डाव्या हाताने धरला.
\s5
\v 30 तेव्हा शमशोन म्हणाला, पलिष्ट्यांच्या बरोबर माझाही जीव जावो! मग त्याने सर्व बळ एकवटून ते खांब ढकलले, आणि ते सभागृह त्या अधिकाऱ्यांवर व त्यांतल्या सर्व लोकांवर पडले. अशा रीतीने तो जिवंत असताना त्याने जितके मारले होते, त्यांपेक्षाही त्याच्या मरणाच्या वेळी त्याने जे मारले ते अधिक होते.
\v 31 नंतर त्याचे भाऊ व त्याच्या पित्याचे घरचे सर्व लोक यांनी खाली जाऊन त्याला उचलून आणले, आणि त्याला नेऊन सरा व अष्टावोल यामध्ये त्याचा पिता मानोहा याच्या कबरेत पुरले; त्याने तर वीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला होता.
\s5
\c 17
\p
\v 1 एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात एक माणूस होता; त्याचे नाव मीखा.
\v 2 आणि त्याने आपल्या आईला म्हटले, जी अकराशे शेकेल रुप्याची नाणी तुझ्याजवळून घेतली गेली होती, आणि ज्यामुळे तू शाप उच्चारला होता, आणि तो मी ऐकला! पाहा ती रुप्याची नाणी माझ्याजवळ आहेत; मीच ती चोरून घेतली होती. त्याची आई म्हणाली, माझ्या मुला, परमेश्वर तुला आशीर्वाद देवो!
\s5
\v 3 मग त्याने ती अकराशे शेकेल रुपे आपल्या आईला परत दिली; तेव्हा त्याच्या आईने म्हटले, मी माझ्या मुलासाठी कोरीव लाकडी मूर्ति व ओतीव धातूची मूर्ति करण्यासाठी आपल्या हाताने हे रुपे परमेश्वराला अर्पण म्हणून वेगळी करते. तर आता मी ही तुला परत देते.
\v 4 त्याने ती रुप्याची नाणी आपल्या आईला परत दिली. मग त्याच्या आईने दोनशे शेकेल रुपे घेऊन ते सोनाराला दिली, आणि त्याने त्याची कोरीव व ओतीव मूर्ति केली. नंतर ती मीखाच्या घरी ठेवली.
\s5
\v 5 मीखा ह्या माणसाचे एक मूर्तीचे देवघर होते, आणि त्याने याजकाचे एफोद व कुलदेवता केल्या होत्या; आणखी त्याने आपल्या एका मुलाचे याजक म्हणून समर्पण केले होते.
\v 6 त्या दिवसांत इस्राएलावर कोणी राजा नव्हता; प्रत्येकाने आपापल्या दिसण्यांत जे योग्य, ते केले.
\s5
\v 7 तेव्हा यहूदातील बेथलेहेमातला यहूदी घराण्यातला तरुण लेवी तेथे आपले कर्तव्य पार पाडत राहत होता.
\v 8 नंतर तो माणूस यहूदातल्या बेथलेहेम नगरांतून निघाला, आपल्याला राहण्यास कोठे जागा मिळेल ते शोधू लागला. प्रवास करत एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरापर्यंत आला.
\v 9 मग मीखा त्याला म्हणाला, तू कोठून आलास? तेव्हा तो माणूस त्याला म्हणाला, मी बेथलेहेमतला यहूदी लेवी आहे; आणि मला राहण्यासाठी जागा मिळावी म्हणून मी प्रवास करत आहे.
\s5
\v 10 तेव्हा मीखा त्याला म्हणाला, तू माझ्याबरोबर राहा आणि माझा सल्लागार व याजक असा हो. म्हणजे मी तुला प्रती वर्षी दहा रुप्याची नाणी (तुकडे) व एक पोशाख व तुझे अन्न देईन. मग तो लेवी आत गेला.
\v 11 तो लेवी त्या माणसाबरोबर राहण्यास तयार झाला, आणि तो तरुण त्याच्याजवळ त्याच्या एका पुत्रासारखा झाला.
\s5
\v 12 आणि मीखाने त्या लेवीला पवित्र कर्तव्य करण्यास वेगळे केले, आणि तो तरुण त्याचा याजक झाला आणि तो मीखाच्या घरी राहिला.
\v 13 नंतर मीखा बोलला, आता मला कळले की, परमेश्वर माझे चांगले करील, कारण हा लेवी माझा याजक झाला आहे.
\s5
\c 18
\p
\v 1 त्या दिवसांत इस्राएलावर कोणी राजा नव्हता, आणि त्या दिवसांत दानाचा वंश वस्ती करण्यासाठी आपले वतन मिळवायाला पाहत होता; कारण त्या दिवसापर्यंत त्यास इस्राएलाच्या वंशांमध्ये वतनातला भाग मिळाला नव्हता.
\v 2 दानाच्या लोकांनी आपल्या सगळ्या वंशातून, सरा व अष्टावोल यांतून अनुभवी असे पांच शूर योध्दे पुरुष निवडून त्यांना देशाची टेहाळणी व पाहणी करण्यास पाठवले; तेव्हा त्यांनी त्यास सांगितले, जा आणि तो देश पाहा. मग ते एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरापर्यंत आले आणि त्यांनी रात्र तेथे घालवली.
\s5
\v 3 ते मीखाच्या घराजवळ होते, तेव्हा त्यांनी त्या तरुण लेव्याचा शब्द ओळखला; यास्तव ते तिकडे वळून त्याला बोलले, तुला इकडे कोणी आणले? आणि तू ह्या ठिकाणी काय करतोस? तू येथे का आहेस?
\v 4 तो त्यास म्हणाला, मीखाने माझ्यासाठी जे काही केले ते असे आहे, आणि मला मोलाने नियुक्त केले आणि मी त्याचा याजक झालो आहे.
\s5
\v 5 तेव्हा त्यांनी त्याला सांगितले, तू कृपाकरून देवाला सल्ला विचार, की आम्ही जो प्रवास करत आहोत तो सफल होईल किंवा नाही.
\v 6 तेव्हा तो याजक त्यास बोलला, तुम्ही शांतीने जा; ज्या मार्गाने तुम्हाला जायचे आहे, त्यात परमेश्वर देव तुमचे मार्गदर्शन करील.
\s5
\v 7 मग ती पाच माणसे निघाली आणि लईश येथे आली, आणि त्यांनी पाहिले की, ज्याप्रकारे सीदोनी अबाधित व सुरक्षित राहत होते; तसेच त्यात राहणारे लोक हे तेथे सुरक्षित आहेत. आणि देशांत त्यांना कशा प्रकारेही त्रास देणारा किंवा त्यांच्यावर अधिकार गाजवणारा एकही जण तेथे नव्हता. ते सीदोन्यांपासून फार दूर रहात होते, आणि त्यांचे कोणाबरोबरही व्यवहारीक संबंध नव्हते.
\v 8 नंतर ते सरा व अष्टावोल तेथे आपल्या वंशाजवळ आले; तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी त्यास विचारले, तुमचा अहवाल काय आहे?
\s5
\v 9 ते म्हणाले, चला! आपण त्यांच्यावर हल्ला करू! कारण आम्ही तो देश पाहिला आणि तो फार चांगला आहे. तुम्ही काहीच करणार नाही का? तुम्ही तो देश जिंकण्यासाठी आणि त्यावर चढाई करून ताब्यात घेण्यासाठी कंटाळा करू नका.
\v 10 तुम्ही तेथे जाल, तेव्हा तुम्ही अशा लोकांकडे याल जे असा विचार करतात आम्ही अगदी सुरक्षित आहोत आणि त्यांचा देश विस्तीर्ण आहे. देवाने ते तुम्हाला दिले आहेत. ती जागा अशी आहे की पृथ्वीवरील कोणत्याही गोष्टीची उणीव तेथे नाही.
\s5
\v 11 मग तेथून, म्हणजे सरा व अष्टावोल यांतून दानाच्या कुळांतले सहाशें पुरुष लढाईसाठी शस्त्रे घेऊन निघाले.
\v 12 तेव्हा त्यांनी जाऊन यहूदातल्या किर्याथ-यारीम जवळ तळ दिला; यास्तव आजपर्यंत त्या ठिकाणाला महाने-दान, दानाची छावणी असे म्हणतात; ते किर्याथ-यारीमाच्या पश्चीमेस आहे.
\s5
\v 13 मग ते तेथून पुढे एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात गेले आणि मीखाच्या घरापर्यंत आले.
\v 14 तेव्हा जी पाच माणसे लईश प्रदेश हेरावयास गेली होती, त्यांनी आपल्या नातेवाईकास असे सांगितले की, या घरामध्ये याजकाचे एफोद व कुलदेवता, आणि कोरीव मूर्ति व ओतीव धातूची मूर्ति आहेत; हे तुम्हाला माहित आहे काय? तर आता काय करायचे ते तुम्ही ठरवा.
\s5
\v 15 मग त्यांनी तिकडे वळून मीखाच्या घरी त्या तरुण लेव्याच्या घरात जाऊन त्याचे क्षेमकुशल विचारले.
\v 16 नंतर जी दानाच्या वंशातली सहाशे माणसे ती आपल्या लढाईची शस्त्रे घेऊन प्रवेशव्दाराशी उभी राहिली.
\s5
\v 17 आणि जी पांच माणसे देश हेरायला गेली होती, त्यांनी आत शिरून, ती कोरीव मूर्त्ति, एफोद, कुलदेवता व ओतीव मूर्ति घेतली; तेव्हा तो याजक लढाईची शस्त्रे घेतलेली जी सहाशे माणसे होती त्याच्याबरोबर दरवाज्यापुढे उभा होता.
\v 18 तर त्यांनी मीखाच्या घरांत जाऊन ती कोरीव मूर्ति व ते एफोद व ते कुलदेवता व ती ओतीव धातूची मूर्ति घेतली असता, तो याजक त्यांना म्हणाला, तुम्ही हे काय करत आहात?
\s5
\v 19 त्यांनी त्याला म्हटले, तू शांत राहा! आपला हात आपल्या तोंडावर ठेव आमच्याबरोबर चल, आणि आमचा बाप व आमचा याजक हो. एका मनुष्याचा याजक होऊन राहणे बरे की एका वंशाचा, आणि इस्राएलाच्या कुळाचा याजक व्हावे हे बरे? कोणते बरे?
\v 20 तेव्हा त्या याजकाच्या मनास आनंद झाला; यास्तव तो, ते एफोद व ते कुलदेवता व ती कोरीव मूर्ति घेऊन त्या लोकांबरोबर गेला.
\s5
\v 21 अशा रीतीने ते तेथून वळाले आणि दूर गेले. लहान मुलेबाळे, गुरेढोरे व त्यांची मालमत्ता ते आपल्यापुढे घेऊन चालले.
\v 22 मीखाच्या घरापासून ते बरेच अंतर दूर गेल्यावर, ज्यांची घरे मीखाच्या घराजवळ होती, त्यांनी माणसे एकत्र बोलावली आणि ते दान वंशाच्या लोकांच्या पाठीस लागले.
\v 23 त्यांनी दानाच्या लोकांस हाक मारली; तेव्हा ते मागे वळून मीखाला म्हणाले, तुला काय झाले म्हणून तू समुदाय घेऊन आलास.
\s5
\v 24 तो म्हणाला, मी केलेले देव तुम्ही चोरले आणि याजक तुम्ही घेऊन चालला, आणि आता मला दुसरे काही राहिले आहे काय? तर तुला काय झाले हे तुम्ही मला कसे विचारू शकता?
\v 25 मग दानाच्या लोकांनी त्याला म्हटले, तू आपला आवाज आम्हास ऐकू देऊ नको; नाहीतर आमच्यातली फार रागीट माणसे तुझ्यावर हल्ला करतील, आणि तू व तुझ्या घराण्याला मारून टाकतील.
\v 26 मग दानाचे लोक आपल्या मार्गाने गेले, आणि मीखाने पाहिले की आपल्यापेक्षा ते बलवान आहेत, यास्तव तो माघारी फिरून आपल्या घरी गेला.
\s5
\v 27 मीखाने ज्या मूर्ति केल्या होत्या त्या आणि त्याचा जो याजक होता, त्याला त्यांनी घेतले; मग लईशावर, शांत राहणा-या लोकांवर जाऊन त्यास तलवारीने मारले, आणि नगराला आग लावून जाळले.
\v 28 तेव्हा त्यांना कोणी सोडवणारा नव्हता, कारण ते सीदोनापासून दूर होते, आणि त्यांचा कोणाशीही व्यवहार नव्हता; ते नगर बेथ-रहोबच्या खोऱ्याजवळ होते. दानी लोकांनी तेथे पुन्हा नगर बांधले आणि ते त्यांत राहिले.
\v 29 त्यांनी आपला पूर्वज दान, जो इस्राएलाचा एक पुत्र होता त्याचे नाव त्या नगराला दिले, परंतु पहिल्याने त्या नगराचे नाव लईश होते.
\s5
\v 30 नंतर दानाच्या लोकांनी आपल्यासाठी ती कोरीव मूर्ति केली; आणि मनश्शेचा पुत्र गेर्षोम याचा वंशज योनाथान तो व त्याची मुले, देश बंदीवासात जाऊपर्यंत दानाच्या वंशाचे याजक होती.
\v 31 देवाचे मंदिर शिलोमध्ये होते, तोपर्यंत त्यांनी आपल्यासाठी मीखाची कोरीव मूर्ति जी त्याने केली होती तिची उपासना केली.
\s5
\c 19
\p
\v 1 त्या दिवसात जेव्हा इस्राएलावर कोणी राजा नव्हता, तेव्हा असे झाले की कोणी लेवी एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशाच्या सर्वात दूरच्या भागात राहत होता आणि त्याने आपल्याला यहूदातील बेथलेहेम येथील एक बाई, उपपत्नी करून घेतली होती.
\v 2 परंतु त्याची उपपत्नीने त्यास सोडून व्यभिचार केला, आणि ती त्याला सोडून आणि यहूदातील बेथलेहेमात आपल्या बापाच्या घरी परत गेली, आणि तेथे चार महिने राहिली.
\s5
\v 3 तेव्हा तिचा नवरा उठून तिचे मन वळवून तिला माघारी आणावे म्हणून गेला. त्याच्याबरोबर त्याचा नोकर होता व गाढवांची जोडी होती, तेव्हा तिने त्याला आपल्या बापाच्या घरात नेले, आणि त्या मुलीच्या बापाने त्याला पाहिले, त्याला भेटून तो आनंदित झाला.
\v 4 त्याच्या सासऱ्याने म्हणजे त्या मुलीच्या बापाने त्याला फार आग्रह केला; म्हणून तो त्याच्याकडे तीन दिवस राहिला, आणि तो खाऊन पिऊन तेथे वस्तीस राहिली.
\s5
\v 5 मग चवथ्या दिवशी असे झाले की तो सकाळी लवकर उठला आणि तो जाण्यास तयार झाला, परंतु त्या मुलीच्या बापाने आपल्या जावयाला म्हटले, तू आपल्याला भाकरीच्या तुकड्याचा आधार कर, आणि मग तुम्ही जा.
\v 6 त्या दोघांनी एकत्र बसून खाणेपिणे केले; नंतर त्या मुलीच्या बापाने म्हटले. कृपाकरून तू एक रात्र राहण्यास तयार हो, आणि चांगला समय घालव.
\s5
\v 7 जेव्हा लेवी जाण्यास उठला, तेव्हा तरुण मुलीच्या बापाने त्याला पुन्हा राहण्याचा आग्रह केला, म्हणून त्याने त्याची जाण्याची योजना बदलली आणि पुन्हा तेथे रात्र घालवली.
\v 8 नंतर पाचव्या दिवशी सकाळी लवकर जायला उठला, परंतु त्या मुलीच्या बापाने म्हटले तू आपल्या पोटाला आधार कर दुपारपर्यंत थांब. तेव्हा त्या दोघांनी जेवण केले.
\s5
\v 9 जेव्हा लेवी, त्याची उपपत्नी व त्याचा नोकर जायला उठली, तेव्हा त्याचा सासरा त्याला बोलला, आता पाहा मावळतीकडे दिवस उतरला आहे, तुम्ही आज रात्री येथेच राहा; पाहा, दिवस थोडाच राहिला आहे, येथे वस्ती करून तुमच्या मनाला उल्ल्हास होवो; मग सकाळी उठून आपल्या मार्गाने आपल्या घरास जा.
\s5
\v 10 परंतु लेवी ती रात्र घालवायला तयार झाला नाही. तो उठला आणि निघून गेला, मग यबूस म्हणजे यरुशलेमेच्या जवळ आला; तेव्हा त्याच्याबरोबर खोगीर घातलेल्या गाढवांची जोडी, आणि त्याची उपपत्नी होती.
\v 11 जेव्हा ते यबूसजवळ होते तेव्हा दिवस फार उतरला होता, म्हणून त्याच्या नोकराने आपल्या धन्याला म्हटले, चला, आपण बाजूला वळून यबूसी यांच्या नगराकडे जाऊ आणि त्यात रात्र घालवू.
\s5
\v 12 त्याचा धनी त्याला म्हणाला, जे इस्राएलाचे लोक नाहीत अशा परक्यांच्या नगरात आम्ही वळणार नाही; तर गिबा तेथवर जाऊ.
\v 13 लेवीने आपल्या नोकराला सांगितले, चल, आपण गिबा किंवा रामा या जागांपैकी एका ठिकाणी पोहचू आणि त्यांत रात्र घालवू.
\s5
\v 14 मग ते पुढे चालत गेले; आणि बन्यामिनाचा प्रदेश जो गिबा त्याच्याकडे आल्यावर सूर्य मावळला.
\v 15 तेव्हा गिब्यांत वस्ती करायाला ते तिकडे वळले, नंतर तो जाऊन नगराच्या चौकात बसला, परंतु त्यास रात्री राहावयास कोणी आपल्या घरी घेऊन गेला नाही.
\s5
\v 16 परंतु पाहा, संध्याकाळी एक म्हातारा माणूस शेतांतून आपल्या कामावरून येत होता; तोसुद्धा माणूस एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातला होता, परंतु गिब्यांत उपरा होता आणि त्या ठिकाणांतली माणसे बन्यामीनी होती.
\v 17 त्याने तर आपली दृष्टी लावून नगराच्या चौकात तो वाटसरू माणूस पाहिला; तेव्हा तो म्हातारा माणूस म्हणाला, तू कोठे जात आहेस? तू कोठून आला आहेस?
\s5
\v 18 तेव्हा तो त्याला म्हणाला, आम्ही यहूदाच्या बेथलेहेमाहून आलो आहोत, आणि एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशाच्या पलीकडच्या बाजूस जायचे आहे; तेथला मी आहे; यहूदातील बेथलेहेम येथे गेलो होतो, आणि मला परमेश्वर देवाच्या मंदिराकडे जावयाचे आहे; परंतु कोणी मला त्यांच्या घरात घेत नाही.
\v 19 आमच्या गाढवांसाठी वैरण व दाणाही आहे, आणि मजसाठी व तुझ्या दासीसाठी आणि तुझ्या सेवकाच्या बरोबर जो तरुण नोकर आहे त्याच्यासाठी भाकर व द्राक्षरसही आहे, कोणत्याही गोष्टीची उणीव नाही.
\s5
\v 20 तेव्हा त्या म्हाताऱ्या माणसाने त्यास अभिवादन केले, तुझ्याबरोबर शांती असो! मी तुझ्या सर्व गरजांची काळजी घेईल. फक्त चौकात रात्र घालवू नको.
\v 21 तेव्हा त्या माणसाने लेवीला आपल्या घरी नेले, आणि गाढवास वैरण दिली, नंतर त्यांनी आपले पाय धुऊन खाणेपिणे केले.
\s5
\v 22 ते आनंदात वेळ घालवत असताना, त्या नगरांतल्या दुष्ट लोकांनी, घराला वेढून आणि दारावर ठोकून, त्या म्हाताऱ्या घरधन्याला म्हणू लागले की, जो माणूस तुझ्या घरात आला आहे, त्याला तू बाहेर काढ, म्हणजे आम्ही त्याच्याबरोबर समागम करू.
\v 23 मग तो माणूस, त्या घराचा धनी बाहेर त्यांच्याजवळ जाऊन त्यास बोलला, नाही, माझ्या भावांनो मी विनंती करतो अशी वाईट गोष्ट करू नका; हा माणूस माझ्या घरी पाहुणा म्हणून आला आहे, तर तुम्ही हा दुष्टपण करू नका.
\s5
\v 24 पाहा, माझी कुमारी कन्या व याची उपपत्नी येथे आहेत. मी तिला आता बाहेर आणतो; मग तुम्ही तिची आब्रू घ्या व तुम्हाला जे बरे वाटते तसे तुम्ही तिच्याशी करा; परंतु या मनुष्याशी असे दुष्टाईचे कृत्य करू नका.
\v 25 तथापि ती माणसे त्याचे ऐकायला तयार झाली नाहीत; तेव्हा त्या माणसाने आपली उपपत्नी घेऊन आणि बाहेर त्यांच्याजवळ आणली. मग त्यांनी तिच्यासोबत कुकर्म केले आणि सारी रात्र वाईट रीतीने वागवले आणि पहाट झाली असता तिला सोडले.
\v 26 तेव्हा पहाटेच्या वेळेस ती बाई येऊन जेथे आपला धनी होता, त्या माणसाच्या घराच्या दाराजवळ उजेड होईपर्यंत पडून राहिली.
\s5
\v 27 जेव्हा सकाळी तिच्या धन्याने उठून घराची दारे उघडली, आणि आपल्या मार्गाने जायला तो बाहेर निघाला; तर पाहा, ती त्याची उपपत्नी घराच्या दाराजवळ पडलेली आणि तिचे हात उंबऱ्यावर होते.
\v 28 तेव्हा लेवीने तिला म्हटले, ऊठ, म्हणजे आपण जाऊ. परंतु तिने उत्तर दिले नाही; नंतर तो पुरुष तिला गाढवावर घालून निघाला आणि आपल्या ठिकाणी गेला.
\s5
\v 29 मग आपल्या घरी पोहोचल्यावर त्याने सुरी घेतली, आणि आपल्या उपपत्नीला घेऊन कापले, तिचा एकएक अवयव कापून बारा तुकडे केले, आणि ते इस्राएलाच्या प्रत्येक ठिकाणी पाठवून दिले.
\v 30 ज्या प्रत्येकाने ते पाहिले, त्यांनी म्हटले, मिसर देशांतून इस्राएल लोक पुन्हा आले, त्यादिवसापासून आजपर्यंत यासारखी गोष्ट घडली नाही, आणि कधी दृष्टीस पडली नाही; याविषयी तुम्ही विचार करा! आम्हाला सल्ला द्या! काय करावे ते आम्हाला सांगा!
\s5
\c 20
\p
\v 1 नंतर दानापासून बैर-शेबापर्यंतचे आणि गिलाद देशातले सर्व इस्राएली लोक बाहेर येऊन आणि एक मनीचे होऊन परमेश्वराजवळ मिस्पात एकत्र जमा झाले.
\v 2 इस्राएलाच्या सर्व वंशांच्या लोकांचे पुढारी, यांनी देवाच्या लोकांच्या मंडळीत आपले स्थान घेतले, सुमारे चार लाख पायदळ, जे तलवारीने लढण्यास तयार होते.
\s5
\v 3 आता बन्यामीनी लोकांनी ऐकले की, इस्राएल लोक मिस्पात जमले आहेत. तेव्हा इस्राएलाचे लोक म्हणाले, आम्हाला सांगा, ही वाईट गोष्ट कशी घडली?
\v 4 तो लेवी, ज्याच्या पत्नीचा खून झाला होता तिच्या पतीने उत्तर देऊन म्हणाला, मी आणि माझी उपपत्नी बन्यामिनाच्या प्रदेशातील गिबा येथे रात्र घालवण्यासाठी येऊन उतरलो.
\s5
\v 5 गिबातल्या लोकांनी रात्री माझ्यावर हल्ला करण्यासाठी घराच्या सभोवताली वेढा दिला आणि मला मारण्याचा त्यांचा हेतू होता. त्यांनी माझ्या उपपत्नीवर बलात्कार केला आणि ती मेली.
\v 6 मी आपल्या उपपत्नीला घेऊन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले, आणि ते इस्राएलाच्या वतन भागातील सर्व प्रांतात पाठवले, कारण, त्यांनी इस्राएलात दुष्टपणा आणि बलात्कार केला आहे.
\v 7 आता तुम्ही, सर्व इस्राएली लोकांनो, बोला आणि तुमचा सल्ला द्या आणि ह्याकडे लक्ष द्या.
\s5
\v 8 सर्व लोक एक मन होऊन एकत्र उठले आणि ते म्हणाले, आमच्यातला कोणीही आपल्या तंबूकडे जाणार नाही आणि कोणी आपल्या घरी परतणार नाही.
\v 9 परंतु आता आम्ही गिब्याचे हे असे करणार आहोत. आम्ही चिठ्या टाकून मार्गदर्शन घेतल्यावर हल्ला करायच ठरवू.
\s5
\v 10 आम्ही इस्राएलाच्या सर्व वंशांतून शंभरातले दहा माणसे व हजारांतले शंभर, व दहा हजारांतले एक हजार, इतकी माणसे निवडू ती या लोकांसाठी अन्नसामग्री आणतील, म्हणजे मग ते जाऊन बन्यामिनाच्या गिब्याने इस्राएलात जे दुष्टपण केले, त्यानुसार त्यांना शिक्षा करतील.
\v 11 मग इस्राएलातले सर्व सैन्य एका उद्देशाने एकत्र येऊन त्या नगराविरूद्ध जमले.
\s5
\v 12 तेव्हा इस्राएल लोकांनी बन्यामिनाच्या सर्व वंशांत माणसे पाठवून विचारले, तुमच्यामध्ये हे काय दुष्टपण घडले आहे?
\v 13 तर आता तुम्ही गिब्यांतली जे दुष्ट लोक आहेत ते आम्हाला काढून द्या, म्हणजे आम्ही त्यास जीवे मारू आणि इस्राएलातून दुष्टाई पूर्णपणे काढून टाकू. परंतु बन्यामीनी लोकांनी आपले भाऊबंद इस्राएली लोक यांचे ऐकले नाही.
\v 14 आणि बन्यामीनी लोक इस्राएली लोकांविरूद्ध लढण्यास आपल्या नगरांतून गिब्याजवळ तयार झाले.
\s5
\v 15 त्यादिवशी बन्यामीनी लोकांनी आपल्या नगरांतून तलवारीने लढाई करण्याचे शिक्षण घेऊन तयार झालेले सव्वीस हजार सैन्य बरोबर घेतले; त्यात गिब्यांत राहणारे त्या सातशे निवडक पुरुषांची भर घातली.
\v 16 त्या सर्व लोकांतले हे सातशे निवडलेले पुरुष डावखुरे होते; त्यांच्या प्रत्येकाचा गोफणीच्या गोट्याचा नेम एक केसभर देखील चुकत नसे.
\s5
\v 17 बन्यामीनी सोडून, एकंदर इस्राएली सैन्य चार लाख माणसे, तलवारीने लढण्याचे शिक्षण घेऊन तयार झालेले होते. ते सर्व लढाऊ पुरुष होते.
\v 18 मग इस्राएल लोक उठून बेथेलापर्यंत गेले, आणि त्यांनी देवापासून सल्ला विचारला. त्यांनी विचारले, बन्यामीनी लोकांशी लढावयाला आमच्यातून पहिल्याने कोणी जावे? परमेश्वर देवाने सांगितले, यहूदाने पहिल्याने जावे.
\s5
\v 19 इस्राएली लोक सकाळी उठले आणि त्यांनी गिब्यासमोर लढाईची तयारी केली.
\v 20 मग इस्राएली सैन्य बन्यामिन्या विरूद्ध लढावयाला बाहेर गेले, त्यांनी त्यांच्या विरूद्ध गिबा याठिकाणी लढाईची व्यूहरचना केली.
\v 21 तेव्हा बन्यामीनी सैन्याने गिब्यांतून निघून आणि त्यादिवशी इस्राएली सैन्यांतील बावीस हजार माणसांस मारले.
\s5
\v 22 तथापि इस्राएली सैन्याने पुन्हा शक्तीशाली होऊन जेथे त्यांनी पहिल्या दिवशी लढाई लावली होती, त्या ठिकाणीच व्यूहरचना केली.
\v 23 आणि इस्राएली लोक वर गेले आणि परमेश्वरासमोर संध्याकाळपर्यंत रडले. आणि त्यांनी परमेश्वराला विचारले, आमचा बंधु बन्यामीन याच्या लोकांशी लढण्यास मी पुन्हा जावे काय? परमेश्वर म्हणाला त्यांवर हल्ला करा.
\s5
\v 24 म्हणून दुसऱ्या दिवशी इस्राएली सैन्य बन्यामीनी सैन्याविरूद्ध चालून गेले.
\v 25 दुसऱ्या दिवशी, बन्यामीनी लोक गिब्यांतून त्यांच्याविरूद्ध बाहेर आले, आणि त्यांनी इस्राएली सैन्यातील अठरा हजार माणसांस मारले, हे सर्व तरवारीने लढाईचे शिक्षण घेतलेले होते.
\s5
\v 26 नंतर सर्व इस्राएली सैन्य आणि सर्व लोक चढून बेथेल येथे गेले आणि रडले, आणि त्यांनी तेथे परमेश्वर देवासमोर बसले आणि त्यादिवशी संध्याकाळपर्यंत उपास केला, आणि परमेश्वरास होमार्पण व शांत्यर्पणे अर्पण केले.
\s5
\v 27 आणि इस्राएली लोकांनी परमेश्वर देवाला विचारले, कारण त्या दिवसांत देवाच्या कराराचा कोश तेथे होता.
\v 28 आणि अहरोनाचा पुत्र एलाजार याचा पुत्र फिनहास त्या दिवसांत त्याची सेवा करत होता. आम्ही आपला बंधु बन्यामीन याच्या लोकांविरूद्ध लढण्यास परत जावे काय किंवा थांबावे? तेव्हा परमेश्वर देव म्हणाला, तुम्ही चढून जा; कारण उद्या मी तुम्हाला त्यांचा पराजय करण्यास मदत करीन.
\s5
\v 29 मग इस्राएल लोकांनी गिब्याच्या भोवताली गुप्तस्थळीं माणसे ठेवले.
\v 30 मग तिसऱ्या दिवशी इस्राएली लोक बन्यामिनाच्या लोकांविरूद्ध लढले, आणि पूर्वीप्रमाणे त्यांनी गिब्याजवळ व्यूहरचना केली.
\s5
\v 31 तेव्हा बन्यामीनी लोक गेले आणि इस्राएल लोकांविरूद्ध लढले आणि त्यांना नगरापासून काढून घेऊन दूर नेण्यात आले. त्यांनी काही लोकांस मारण्यास सुरवात केली. त्यातला एक रस्ता बेथेलास आणि दुसरा गिब्याकडे जातो, त्यात इस्राएलांपैकी सुमारे तीस पुरुष शेतात त्यांनी मारले;
\s5
\v 32 यास्तव बन्यामीनी लोकांनी म्हटले त्यांचा पराजय झाला आहे आणि पहिल्यासारखे ते आमच्यापुढून पळून जात आहेत. परंतु इस्राएली सैन्य म्हणाले आम्ही मागे पळू आणि त्यांना नगरांतल्या रस्त्या पासून दूर काढून आणू.
\v 33 सर्व इस्राएली सैन्य त्यांच्या जागेवरून उठले आणि बाल-तामार येथे लढाईसाठी व्यूहरचना केली. नंतर जे इस्राएली सैन्य गुप्तस्थळीं लपून बसले होते ते आपल्या जागेवरून, मारे गिबा येथून अचानक उठले.
\s5
\v 34 सर्व इस्राएलातले निवडलेले दहा हजार पुरुष गिब्यापुढे आले आणि भयंकर लढाई झाली, तथापि बन्यामिन्यांना समजले नव्हते की, आपत्ती आपल्याजवळ येऊन ठेपली आहे.
\v 35 तेव्हा परमेश्वर देवाने बन्यामिनाला इस्राएलापुढे पराजित केले. त्यादिवशी बन्यामिन्यांची पंचवीस हजार शंभर पुरुष मारले गेले. त्या सर्वांना तलवारीने लढण्याचे शिक्षण देण्यात आले होते.
\s5
\v 36 बन्यामीनी लोकांनी पाहिले की आपण पराजित झालो आहोत. हे असे झाले की इस्राएली मनुष्यांनी गिब्यावर जे दबा धरून ठेवले होते, त्यांचा भरवसा धरला म्हणून ती बन्यामीनी माणसांपुढून बाजूला झाली.
\v 37 नंतर दबा धरून बसणारे उठले आणि पटकन आणि ते गिब्यात गेले आणि त्यांनी त्यांच्या तलवारीने नगरात राहणाऱ्या प्रत्येकाला ठार मारले.
\v 38 आता दबा धरणारे आणि इस्राएली सैन्यात सांकेतिक खूण ठरली होती की त्यांनी नगरांतून उंच धूराचा लोळ चढवावा.
\s5
\v 39 आणि इस्राएली सैन्य लढाईत मागे फिरू लागले; आता बन्यामिन्याने हल्ल्यास सुरवात केली आणि इस्राएलांतली सुमारे तीस माणसे मारले आणि त्यांनी म्हटले, खात्रीने पाहिल्या लढाईसारखे ते आमच्यापुढे पराजित झालेत.
\s5
\v 40 परंतु नगरांतून धुराचा लोळ उंच चढू लागला, तेव्हा बन्यामिनानी आपल्या पाठीमागे वळून पाहिले आणि संपूर्ण नगरातून धुराचा लोळ आकाशांत चढत आहे.
\v 41 नंतर इस्राएली सैन्य मागे फिरून त्यांच्याविरूद्ध उलटले. बन्यामीनी माणसे फार घाबरली, कारण त्यांनी पाहिले की, आपल्यावर अरिष्ट आले आहे.
\s5
\v 42 यास्तव ते इस्राएलाच्या सैन्यापुढून रानाच्या वाटेने निसटून पळाले; तथापि लढाईने त्यांना गाठले. इस्राएलाच्या सैन्याने बाहेर येऊन, जेथे कोठे ते गावातून बाहेर निघाले होते तेथे त्यांना मारले.
\s5
\v 43 त्यांनी बन्यामिन्यांना चोहोकडून वेढले आणि नोहा येथपासून ते त्यांच्या पाठीस लागले; त्यांनी गिब्यासमोर पूर्वेकडे त्यांना पायदळी तुडवून मारले.
\v 44 बन्यामिनातले अठरा हजार सैनिक मारले गेले; ती सर्व माणसे लढाईत पटाईत होती.
\s5
\v 45 जे मागे फिरले ते रानात रिम्मोन खडकाकडे पळून गेले. तथापि त्यांनी त्यांतले पांच हजार पुरुष रस्त्यावर वेचून मारले, आणि गिदोमापर्यंत त्यांचा पाठलाग करून त्यांतले दोन हजार पुरुष आणखी मारले.
\v 46 त्यादिवशी बन्यामिनांतले जे सर्व पडले ते तलवारीने लढाईचे शिक्षण घेतलेले आणि अनुभवी असे पंचवीस हजार पुरुष होते; ते सर्व लढाईत प्रसिद्ध शूर लोक होते.
\s5
\v 47 परंतु सहाशे पुरुष फिरून रानांत रिम्मोन खडकावर पळून गेले. आणि ते रिम्मोन खडकावर चार महीने राहिले.
\v 48 नंतर इस्राएली सैन्यांनी मागे फिरून बन्यामीन लोकांच्याविरूद्ध जाऊन हल्ला केला आणि नगरातली सर्व माणसे व गुरेढोरे आणि जे काही त्यांना सापडले ती प्रत्येक गोष्ट त्यांनी तलवारीने मारली, आणि त्यांच्या मार्गातील प्रत्येक नगर त्यांनी आग लावून आग लावून जाळून टाकले.
\s5
\c 21
\p
\v 1 आता इस्राएली माणसानी मिस्पात अशी शपथ वाहिली होती की, आमच्यांतला कोणीही आपल्या मुली बन्यामिनाला लग्नासाठी देणार नाही.
\v 2 नंतर लोक बेथेलास गेले आणि संध्याकाळपर्यंत देवापुढे बसून राहिले, आणि मोठ्याने आवाज करून फार दु:खाने रडले.
\v 3 ते मोठ्याने म्हणाले, हे इस्राएलाच्या देवा परमेश्वरा, इस्राएलात असे का झाले की आज इस्राएलातून एक वंश नाहीसा झाला आहे.
\s5
\v 4 नंतर दुसऱ्या दिवशी लोकांनी पहाटेस लवकर उठून तेथे वेदी बांधली, आणि होमार्पण व शांत्यर्पण यज्ञ केले.
\v 5 इस्राएली लोक म्हणाले, सर्व इस्राएली वंशांतला जो कोणी मंडळीत परमेश्वराजवळ चढून आला नाही, असा कोण आहे? कारण जो कोणी परमेश्वराजवळ मिस्पात चढून आला नाही. त्याविषयी अशी महत्वाची शपथ केली होती की, ते म्हणाले, जे कोणी आले नाहीत त्यांना अवश्य जिवे मारावे.
\s5
\v 6 इस्राएलाच्या लोकांनी आपला भाऊ बन्यामीन याविषयी कळवळा करून म्हणाले, आज इस्राएलातून एक वंश कापला गेला आहे;
\v 7 जे उरलेले आहेत त्यांच्यासाठी कोण पत्नीची तरतूद करील? कारण आम्ही परमेश्वराजवळ शपथ वाहिली की, आम्ही आपल्या कन्यातल्या कोणीही त्यास लग्नासाठी देणार नाही.
\s5
\v 8 त्यांनी म्हटले, इस्राएलाच्या वंशांतला जो कोणी मिस्पात परमेश्वर देवा जवळ चढून आला नाही; असा कोण आहे? तेव्हा याबेश गिलादांतला कोणीही मंडळीत आला नव्हता हे त्यांना कळाले.
\v 9 कारण लोकांची मोजणी घेतली गेली, तेव्हा पाहा, याबेश गिलादाच्या तेथल्या राहणाऱ्यापैकी कोणी तेथे आला नव्हता.
\v 10 मंडळीने शूर असे बारा हजार पुरुष सूचना देऊन याबेश गिलादाकडे पाठवले, आणि तुम्ही जाऊन त्यांच्यावर हल्ला करा आणि स्त्रियांना व पुत्रांनासुद्धा तलवारीने मारा.
\s5
\v 11 हे करा, तुम्हाला जे करायचे ते हेच की सर्व पुरुष आणि जिचा पुरुषाशी लैंगिक संबंध आला आहे ती प्रत्येक स्री, त्यांचा नाश करावा.
\v 12 तेव्हा याबेश गिलादाच्या राहणाऱ्यांमध्ये ज्यांचा पुरुषाशी संबंध आला नव्हता, अशा चारशे कुमारी त्यास मिळाल्या आणि त्यांनी त्यास कनान देशांत शिलो छावणीत आणले.
\s5
\v 13 तेव्हा सर्व मंडळीने रिम्मोन खडकावर जे बन्यामीनी लोक रहात होते त्यांच्याकडे निरोप पाठवून त्यांच्याशी शांतीचे बोलणे केले.
\v 14 तेव्हा बन्यामीनी माघारी आले, आणि त्यांनी याबेश गिलादांतल्या स्त्रिया त्यास पत्न्या करून दिल्या; परंतु त्या सर्वांस त्या पुरल्या नाहीत.
\v 15 लोकांना बन्यामिनाविषयी दु:ख वाटले कारण की, परमेश्वराने इस्राएलाच्या वंशांत फाटाफूट केली होती.
\s5
\v 16 यास्तव मंडळीच्या वडीलांनी म्हटले, जे उरलेले त्यास पत्नी मिळण्याविषयी आम्ही काय करावे? कारण त्यांनी बन्यामीनी स्त्रियांना मारून टाकले होते.
\v 17 आणखी त्यांनी म्हटले, इस्राएलापासून एक वंश नाश होऊ नये, म्हणून बन्यामिनाच्या उरलेल्यांस वतन मिळावे.
\s5
\v 18 आम्ही आपल्या कन्येतून त्यास स्त्रिया करून देऊ शकत नाही. कारण इस्राएलाच्या लोकांनी अशी शपथ वाहिली होती की, जो बन्यामिनाला बायको करून देतो, तो शापित होईल.
\v 19 नंतर ते म्हणाले, शिलोमध्ये परमेश्वर देवासाठी दरवर्षी सण असतो, ते बेथेलच्या उत्तरेस, जो रस्ता बेथेलापासून शखेमास चढून जातो, त्याच्या पूर्वेकडे आणि लबानोच्या दक्षिणेस आहे.
\s5
\v 20 त्यांनी बन्यामीनी लोकांस अशी आज्ञा दिली की, तुम्ही द्राक्षमळ्यांमध्ये जा आणि लपून राहा.
\v 21 मग जेव्हा शिलोतल्या मुली नाचावयाला निघतील, तेव्हा तुम्ही द्राक्षमळ्यांतून बाहेर निघून प्रत्येकाने आपल्यासाठी शिलोतल्या कन्येतून पत्नी करून घ्यावी, आणि मग बन्यामिनाच्या देशास परत मागे जावे.
\s5
\v 22 जेव्हा त्यांचे वडिल किंवा त्यांचे भाऊबंद एक होऊन आमच्याजवळ निषेध करण्यास येतील, तेव्हा आम्ही त्यास सांगू, तुम्ही त्यांना राहू द्या आम्हावर कृपा करा! कारण लढाईत आम्हाला त्यांतील एकएकासांठी पत्नी मिळाली नाही. आणि तुम्ही शपथेविषयी दोषी नाहीत, कारण तुम्ही स्वतः त्यास तुमच्या मुली दिल्या नाहीत.
\s5
\v 23 यास्तव बन्यामिनाच्या लोकांनी तसे केले, आणि आपल्या संख्येप्रमाणे कन्या पकडून पत्नी करून घेतल्या. नंतर ते माघारी आपल्या वतनावर गेले, आणि तेथली नगरे बांधून त्यांत राहिले.
\v 24 त्यानंतर इस्राएली लोक तेथून आपापल्या वंशाकडे व आपापल्या वतनावर परत गेले.
\s5
\v 25 त्या दिवसांत इस्राएलावर कोणी राजा नव्हता. प्रत्येकजण आपल्या दिसण्यास जे बरे ते करीत होता.