mr_ulb/02-EXO.usfm

1860 lines
400 KiB
Plaintext
Raw Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

\id EXO
\ide UTF-8
\h निर्गम
\toc1 निर्गम
\toc2 निर्गम
\toc3 exo
\mt1 निर्गम
\s5
\c 1
\p
\v 1 याकोबाबरोबर जे इस्राएलाचे पुत्र व त्यांची कुटुंबे मिसर देशात गेली, त्यांची नांवे हीः
\v 2 रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा
\v 3 इस्साखार, जबुलून, बन्यामीन;
\v 4 दान, नफताली, गाद व आशेर.
\v 5 याकोबाच्या वंशाचे एकूण सत्तरजण होते. योसेफ हा अाधीच मिसरात होता.
\s5
\v 6 नंतर योसेफ, त्याचे भाऊ व त्या पिढीतील सर्व मरण पावले.
\v 7 इस्राएल लोक फलदायी होऊन त्यांची संख्या अतिशय वाढत गेली; ते महाशक्तीमान झाले आणि सर्व देश त्यांनी भरून गेला.
\s5
\v 8 नंतर मिसर देशावर नवीन राजा राज्य करु लागला. त्याला योसेफाच्या स्मरणाची काही काळजी नव्हती.
\v 9 तो आपल्या लोकांना म्हणाला, “इस्राएली वंशाच्या लोकांकडे पाहा, ते पुष्कळ अधिक आहेत व आपल्यापेक्षा शक्तीमानही झाले आहेत;
\v 10 चला, आपण त्यांच्याशी चतुराईने वागू, नाहीतर त्यांची निरंतर अधिक वाढ होईल आणि जर एखादा युद्धाचा प्रसंग आला तर हे लोक आपल्या शत्रूला जाऊन मिळतील; आणि मग ते आपल्याविरूद्ध लढतील आणि देशातून निघून जातील.”
\s5
\v 11 म्हणून त्याने त्यांना कामाच्या ओझ्याने जाचण्यासाठी त्यांच्यावर मुकादम नेमले. त्यांनी फारोकरता पिथोम व रामसेस ही दोन शहरे इस्राएल लोकांकडून बांधून घेतली;
\v 12 पण मिसऱ्यांनी त्यांना जसजसे जाचले तसतसे ते संख्येने अधिकच वाढत गेले व अधिकच पसरले, म्हणून इस्राएल लोकांची त्यांना भीती वाटू लागली.
\s5
\v 13 आणि मग मिसऱ्यांनी इस्राएलांवर अधिक कष्टाची कामे लादली.
\v 14 अशाप्रकारे त्यांनी इस्राएल लोकांचे जीवन फारच कठीण काबाडकष्टांचे व हाल अपेष्टांचे केले; त्यांनी त्यांना विटा बनविण्याची, बांधकामासाठी चुना बनविण्याची तसेच शेतीची व इतर अतिशय कठीण व कष्टाची कामे बळजबरीने करायला लावली.
\s5
\v 15 मग मिसराचा राजा इब्री सुइणींशी बोलला. त्यातल्या एकीचे नाव शिप्रा व पुवा असे होते.
\v 16 तो म्हणाला, “तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळंतपण करीत असता, त्या प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पाहा, आणि त्या स्त्रियांना मुलगी झाली तर तिला जिवंत ठेवा; परंतु त्यांना मुलगा झाला तर त्याला अवश्य मारून टाका.”
\v 17 परंतु त्या इब्री सुइणी देवाचे भय व आदर धरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या होत्या म्हणून त्यांनी मिसरी राजाची आज्ञा मानली नाही; तर त्यांनी जन्मणाऱ्या मुलांनाही जिवंत ठेवले.
\s5
\v 18 तेव्हा मिसराच्या राजाने त्या सुइणींना बोलावून विचारले, “तुम्ही असे का केले? तुम्ही जन्मलेल्या मुलांना का जिवंत ठेवले?”
\v 19 त्या सुइणी फारोस म्हणाल्या, “ह्या इब्री स्त्रिया मिसरच्या स्त्रियांपेक्षा फार ताकदवान आहेत; आम्ही सुइणी त्यांच्याकडे जाऊन पोहोंचण्यापूर्वीच त्या प्रसूत होतात.”
\s5
\v 20 त्याबद्दल देवाने त्या सुइणीचे कल्याण केले. इस्राएल लोक तर अधिक वाढून फार बलवान झाले.
\v 21 त्या सुइणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या म्हणून त्याने त्यांची घराणे वसवली.
\v 22 तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांना आज्ञा दिली, “जो प्रत्येक इब्री मुलगा जन्मेल त्याला तुम्ही नदीत फेकून द्या पण प्रत्येक मुलगी मात्र जिवंत ठेवा.”
\s5
\c 2
\p
\v 1 लेवी वंशातील एका माणसाने जाऊन लेवीच्या एका मुलीशी विवाह केला.
\v 2 ती स्त्री गरोदर राहिली व तिने मुलाला जन्म दिला; तो फार सुंदर आहे असे पाहून तिने त्याला तीन महिने लपवून ठेवले.
\s5
\v 3 पुढे आणखी तिला तो लपवून ठेवता येईना म्हणून तिने एक लव्हाळ्याची पेटी तयार केली; तिला राळ व डांबर लावले. तिने त्या बाळाला पेटीत ठेवून आणि ती पेटी नदीच्या तीरी लव्हाळ्यात नेऊन ठेवली.
\v 4 त्याची बहीण, त्याचे पुढे काय होते ते पाहण्यासाठी तेथून दूर बाजूला उभी राहिली.
\s5
\v 5 त्यासमयी फारोची मुलगी आंघोळ करण्यासाठी नदीवर आली. तिच्या दासी नदीच्या किनाऱ्यावर फिरत होत्या. तिने लव्हाळ्यात ती पेटी पाहिली; आणि एका दासीला तिकडे जाऊन ती पेटी आणण्यास सांगितले.
\v 6 तिने ती पेटी उघडली तेव्हा तिला तिच्यात एक लहान बाळ दिसले. ते बाळ रडत होते. तिला त्याचा कळवळा आला, ती म्हणाली, “खात्रीने हे इब्र्याच्या मुलापैकी आहे.”
\s5
\v 7 मग ती बाळाची बहीण फारोच्या मुलीस म्हणाली, “या बाळास दूध पाजण्यासाठी मी जाऊन तुझ्यासाठी इब्री स्त्रियांमधून एखादी दाई शोधून आणू का?”
\v 8 फारोची मुलगी तिला म्हणाली, जा. तेव्हा ती मुलगी गेली व त्या बाळाच्या आईलाच घेऊन आली.
\s5
\v 9 फारोच्या मुलीने त्या बाळाच्या आईला म्हटले, “ह्या बाळाला घरी घेऊन जा, व माझ्याकरिता त्याला दूध पाज; त्याबद्दल मी तुला वेतन देईन.” तेव्हा ती बाई बाळास घेऊन त्याला दूध पाजू लागली.
\v 10 ते मूल वाढून मोठे झाले. तेव्हा तिने त्याला फारोच्या मुलीकडे आणले; आणि तो तिचा मुलगा झाला; तिने त्याचे नांव मोशे ठेवले ती म्हणाली “कारण मी त्याला पाण्यातून बाहेर काढले.”
\s5
\v 11 काही दिवसानी असे झाले की, मोशे मोठा झाल्यावर आपल्या लोकांकडे गेला आणि त्यांने त्यांची कष्टाची कामे पहिली. कोणी एक मिसरी आपल्या इब्री माणसास मारत असताना त्याने पाहिले.
\v 12 तेव्हा आपल्याकडे पाहणारा आजूबाजूला कोणीही नाही हे जाणून मोशेने त्या मिसराच्या माणसाला जिवे मारले व वाळूत पुरुन टाकले.
\s5
\v 13 दुसऱ्या दिवशी तो बाहेर गेला तेव्हा पाहा दोन इब्री माणसे मारामारी करत होती. त्यांच्यामधील एक दोषी होता त्याला तो म्हणाला, “तू आपल्या सोबत्याला का मारत आहेस?”
\v 14 पण त्या माणसाने उत्तर दिले, “तुला आम्हावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? तू काल जसे त्या मिसऱ्यांस जिवे मारलेस, तसे मला मारावयास पाहतोस का?” तेव्हा मोशे घाबरला. तो विचार करीत स्वत:शीच म्हणाला, “मी काय केले ते आता खचित सर्वाना माहीत झाले आहे.”
\s5
\v 15 आणि फारोने याविषयी ऐकले तेव्हा त्याने मोशेला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु मोशे फारोपासून दूर पळून गेला. तो मिद्यान देशात गेला आणि तेथे एका विहिरीजवळ बसला.
\v 16 मिद्यानी याजकाला सात मुली होत्या; आपल्या बापाच्या कळपास पाणी पाजण्यासाठी त्या विहिरीवर आल्या. त्या हौदात पाणी भरत होत्या;
\v 17 परंतु काही मेंढपाळांनी त्यांना पाणी भरू न देता हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. पण मोशेने उठून त्यांना मदत केली. त्याने त्यांच्या कळपास पाणी पाजले.
\s5
\v 18 मग त्या मुली आपला बाप रगुवेल याच्याकडे गेल्या; तेव्हा त्यांचा बाप त्यांना म्हणाला, “तुम्ही आज इतक्या लवकर घरी कशा आल्या आहात?”
\v 19 त्या म्हणाल्या, “एका मिसरी माणसाने आम्हाला मेंढपाळाच्या हातून सोडवले. त्याने आम्हासाठी पाणी देखील काढून कळपास पाजले.”
\v 20 तेव्हा तो आपल्या मुलींना म्हणाला, “तो कोठे आहे? तुम्ही त्या माणसाला का सोडले? त्याला बोलावून आणा म्हणजे तो आपल्याबरोबर भोजन करेल.”
\s5
\v 21 त्या माणसापाशी राहण्यास मोशे कबूल झाला. त्याने आपली मुलगी सिप्पोरा हिचा विवाह देखील त्याच्याशी करून दिला.
\v 22 तिला एक मुलगा झाला. मोशेने त्याचे नांव गेर्षोम ठेवले. तो म्हणाला “ मी परदेशात वस्ती करून आहे.”
\s5
\v 23 बऱ्याच काळानंतर मिसराचा राजा मरण पावला. तेव्हा इस्राएलांनी दास्यामुळे कण्हून आक्रोश केला. त्यांनी मदतीकरिता हाका मारल्या व दास्यामुळे त्यांनी केलेला आकांत देवापर्यंत वर जाऊन पोहचला;
\v 24 देवाने त्यांचे कण्हणे ऐकले आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराची त्याला आठवण झाली.
\v 25 देवाने इस्राएली लोकांना पाहिले आणि त्याला त्यांची परिस्थिती समजली.
\s5
\c 3
\p
\v 1 तेव्हा मोशे, आपला सासरा इथ्रो, जो मिद्यानी याजक, याचा कळप चारीत होता. मोशे रानाच्या मागे, देवाचा डोंगर होरेब येथवर आपला कळप घेऊन गेला.
\v 2 तेव्हा परमेश्वराचा दूताने त्याला एका झुडूपातून निघणाऱ्या अग्नीच्या ज्वालेत दर्शन दिले. मोशेने पाहिले की, झुडूप अग्नीने जळत होते परंतु ते जळून भस्म होत नव्हते.
\v 3 मोशे म्हणाला, “मी त्या बाजूला वळतो आणि हे मोठे आश्चर्य जाऊन पाहतो की, हे झुडूप जळून नष्ट का होत नाही.”
\s5
\v 4 मोशे झुडपाजवळ येत आहे हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा झुडूपातून देवाने त्याला हाक मारून म्हटले, “मोशे! मोशे!” आणि मोशे म्हणाला, “ हा मी इथे आहे.”
\v 5 देव म्हणाला, “तू इकडे जवळ येऊ नकोस, तर तुझ्या पायातल्या चपला काढ; कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे.
\v 6 तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव-अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे.” तेव्हा मोशेने आपले तोंड झाकून घेतले. कारण देवाकडे पाहण्यास तो घाबरला.
\s5
\v 7 परमेश्वर म्हणाला, “मिसरामध्ये माझ्या लोकांचा जाच मी खरोखर पाहिला आहे; आणि मुकादमांच्या त्रासामुळे त्यांनी केलेला आकांत मी ऐकला आहे; त्यांचे दु:ख मी जाणून आहे.
\v 8 त्यास मिसऱ्यांच्या हातून सोडवून त्यांना त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत, कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्या प्रदेशात घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.
\s5
\v 9 तर आता पाहा, मी इस्राएली लोकांचा आक्रोश ऐकला आहे आणि मिसरी ज्या जुलूमाने त्यांना जाचत आहेत तेही मी पाहिले आहे.
\v 10 तर आता, मी तुला फारोकडे माझ्या इस्राएली लोकांना मिसर देशामधून बाहेर काढण्यासाठी पाठवत आहे.”
\s5
\v 11 परंतु मोशे देवाला म्हणाला, “फारोकडे जाऊन इस्राएली लोकांना मिसर देशामधून काढून आणणारा असा मी कोण आहे?”
\v 12 देवाने उत्तर दिले, “खचित, मी तुजबरोबर असेन मी तुला पाठवत आहे याची खूण हीच असेल; तू इस्राएली लोकांना मिसरमधून बाहेर आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची उपासना कराल.”
\s5
\v 13 मग मोशे देवाला म्हणाला, “परंतु मी जर इस्राएली लोकांकडे जाऊन म्हणालो, ‘तुमच्या पूर्वजांचा देव याने मला तुमच्याकडे पाठवले आहे’ तर मग ते लोक विचारतील ‘त्याचे नाव काय आहे? मग मी त्यांना काय सांगू?”
\v 14 देव मोशेला म्हणाला, “जो मी आहे तो मी आहे. देव म्हणाला. तू इस्राएल लोकांना सांग, मी आहे याने मला तुम्हाकडे पाठवले आहे.”
\v 15 देव मोशेला असे म्हणाला, “तू इस्राएल लोकांस सांग तुमच्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुम्हाकडे पाठवले आहे. हेच माझे सर्वकाळचे नाव आहे. व हेच माझे स्मारक सर्व पिढ्यांना होईल;
\s5
\v 16 तू जाऊन इस्राएलाच्या वडीलजनांस एकत्रीत करून त्यांना सांग की, तुमच्या पूर्वजांचा देव म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब यांचा देव परमेश्वर, याने मला दर्शन देऊन म्हटले की, तुम्हाकडे खरोखर माझे लक्ष गेले आहे व मिसर देशात तुम्हासोबत काय घडले आहे हे मला कळले आहे.
\v 17 आणि मी तुम्हाला मिसऱ्यांच्या जाचातून सोडवीन व कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्या देशात दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात घेऊन जाईल, असे मी सांगितले आहे म्हणून त्यास कळव.
\v 18 ते तुझे ऐकतील मग तू व इस्राएलाचे वडीलजन मिळून तुम्ही मिसराच्या राजाकडे जा व त्याला सांगा, इब्री लोकांचा देव परमेश्वर आम्हांस भेटला आहे. आमचा देव परमेश्वर याच्यासाठी यज्ञ करण्यासाठी म्हणून आम्हाला तीन दिवसाच्या वाटेवर रानात जाऊ दे.
\s5
\v 19 परंतु मला माहीत आहे की, मिसराचा राजा तुम्हाला जाऊ देणार नाही. त्यास माझे बाहूबल दाखविले तरी तो तुम्हाला जाऊ देणार नाही;
\v 20 तेव्हा मी मिसर देशांत आपले बाहूबल दाखवून, ज्या अद्भुत कृति मी करणार आहे, त्यांचा मारा मी त्याजवर करीन. मग तो तुम्हाला जाऊ देईल;
\v 21 आणि या लोकांवर मिसऱ्यांची कृपादृष्टी होईल असे मी करीन. आणि असे होईल की, तुम्ही निघाल तेव्हा रिकामे निघणार नाही.
\v 22 तर प्रत्येक स्त्री आपल्या शेजारणीकडून व आपल्या घरात राहणाऱ्या स्त्रीकडून भेटवस्तू मागून घेईल व ते लोक तिला भेटवस्तू देतील; ते तुम्हा लोकांना सोन्यारुप्याचे दागिने व कपडे भेट म्हणून देतील. तुम्ही ती आपल्या मुलांच्या व मुलींच्या अंगावर घालाल. अशाप्रकारे तुम्ही मिसराच्या लोकांना लुटाल.”
\s5
\c 4
\p
\v 1 मग मोशेने उत्तर दिले, “ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत व माझे म्हणणे ऐकणार नाही; ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेलेच नाही.”
\v 2 परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझ्या हातात ते काय आहे?” मोशेने उत्तर दिले, “काठी आहे.”
\v 3 मग देव म्हणाला, “ती जमिनीवर टाक.” तेव्हा मोशेने तसे केले; आणि त्या काठीचा साप झाला. तेव्हा मोशे घाबरला व त्यापासून पळाला.
\s5
\v 4 परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात पुढे कर व त्याची शेपटी धर.” तेव्हा त्याने तसे केले, आपला हात पुढे करून त्याला धरले. तेव्हा त्याच्या हातात तो पुन्हा काठी झाला.
\v 5 “म्हणजे ह्यावरून ते विश्वास धरतील, त्यांचा पूर्वजांचा-अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने तुला दर्शन दिले आहे.”
\s5
\v 6 मग परमेश्वर त्याला आणखी म्हणाला, “तू तुझा हात तुझ्या छातीवर ठेव” तेव्हा मोशेने आपला हात आपल्या छातीवर ठेवला; मग त्याने आपला हात बाहेर काढला तेव्हा तो कोडाने बर्फासारखा पांढरा झाला;
\v 7 मग देव म्हणाला, “आता पुन्हा तुझा हात तुझ्या छातीवर ठेव.” तेव्हा मोशेने तसे केले. मग त्याने आपला हात छातीवरून काढला तेव्हा तो शरीराच्या इतर भागांप्रमाणे होऊन तो पुन्हा पूर्वीसारखा झाला.
\s5
\v 8 मग परमेश्वर बोलला, “जर ते तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. व ते पहिल्या चिन्हामुळे तुझा शब्द ऐकणार नाहीत तर ते दुसऱ्या चिन्हामुळे ते तुझ्यावर विश्वास ठेवतील.
\v 9 ही दोन्ही चिन्हे दाखवल्यावरही त्यांनी जर तुझ्यावर विश्वास ठेवला नाहीतर मग नदीचे थोडे पाणी घे आणि ते कोरड्या जमिनीवर ओत; म्हणजे तू नदीतून घेतलेल्या पाण्याचे कोरड्या भूमीवर रक्त होईल.”
\s5
\v 10 मग मोशे परमेश्वराला म्हणाला, “परंतु हे प्रभू, मी तुला खरे ते सांगतो; मी काही बोलका नाही; मी पूर्वीही नव्हतो आणि आता तुझ्याबरोबर बोलल्यानंतरही नाही. तुला माहीत आहे की मी तर मुखाचा व जिव्हेचाही जड आहे.”
\v 11 मग परमेश्वर त्याला म्हणाला, “माणसाचे तोंड कोणी केले? माणसाला मुका किंवा बहिरा, आंधळा किंवा डोळस कोण करतो? मी परमेश्वरच की नाही?
\v 12 तेव्हा मी सांगतो, तू आता जा. मी तुझ्या मुखास साहाय्य होईन व तू काय बोलावे हे मी तुला शिकवीन.”
\v 13 परंतु मोशे म्हणाला हे प्रभू! मी तुला विनंती करतो की, तुझ्या इच्छेस येईल त्याच्या हाती त्यास निरोप पाठव.
\s5
\v 14 मग परमेश्वर मोशेवर रागावला. तो त्यास म्हणाला, “लेवी अहरोन हा तुझा भाऊ आहे ना? त्याला चांगले बोलता येते हे मला माहित आहे. तो तुला भेटण्यास येत आहे. तुला पाहून त्याला मनात आनंद होईल.
\v 15 तू त्याच्याबरोबर बोलून त्याच्या मुखांत शब्द घाल. मी त्याच्या व तुझ्या मुखांस साहाय्य होईल आणि तुम्ही काय करावे हे तुम्हास शिकवीन.
\v 16 आणि तो तुझ्यासाठी लोकांशी बोलेल; तो तुझे मुख होईल आणि त्याने काय बोलावे हे सांगणारा तू त्याला देवासारखा होशील.
\v 17 तू आपल्या हाती ही तुझी काठी घे. हिच्या योगे तू चिन्हे करशील.”
\s5
\v 18 मग मोशे आपला सासरा इथ्रो याच्याकडे परत गेला. तो त्याला म्हणाला, “मला मिसरातल्या माझ्या भाऊबंदाकडे जाऊ द्या. ते अद्याप जिवंत आहेत की नाहीत ते मला पाहू द्या.” इथ्रो मोशेला म्हणाला, शांतीने जा.
\v 19 मिद्यान प्रांतत असताना परमेश्वर मोशेला म्हणाला, “आता मिसर देशात परत जा. जे लोक तुला ठार मारु पाहात होते ते आता मरण पावले आहेत.”
\v 20 तेव्हा मोशेने आपली बायको व आपल्या मुलांना गाढवावर बसवले व त्यांना घेऊन तो मिसर देशाला माघारी जावयास निघाला. तो देवाची काठी आपल्या हाती घेऊन चालला.
\s5
\v 21 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मिसरात परत जाशील तेव्हा पाहा, जे सर्व चमत्कार मी तुझ्या हाती ठेवले आहे ते तू फारोपुढे करून दाखव. तथापि मी त्याचे मन कठीण करीन, आणि तो लोकांना जाऊ देणार नाही.
\v 22 मग तू फारोला सांग की, परमेश्वर म्हणतो इस्राएल माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे.
\v 23 परमेश्वर म्हणतो, मी तुला सांगत आहे की “तू माझ्या पुत्राला माझी उपासना करण्याकरता जाऊ दे!” जर तू त्यास जाऊ देण्याचे नाकारशील तर मी तुझ्या ज्येष्ठ पुत्रास ठार मारीन.”
\s5
\v 24 मोशे प्रवासात असताना एके ठिकाणी मुक्कामासाठी थांबला. तेव्हा परमेश्वराने मोशेला त्याठिकाणी गाठून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
\v 25 परंतु सिप्पोराने एक गारगोटीची धारदार सुरी घेतली व तिने आपल्या मुलांची सुंता केली. मग तिने मुलांची अग्रत्वचा घेतली आणि ती मोशेच्या पायावर ठेवून ती त्याला म्हणाली, “खचित तू माझा रक्ताने मिळवलेला नवरा आहेस.”
\v 26 तेव्हा परमेश्वराने त्याला पीडण्याचे सोडले. रक्ताने मिळविलेला पती असे तिने सुंतेला उद्देशून म्हटले.
\s5
\v 27 मग परमेश्वराने अहरोनाला सांगितले, “मोशेला भेटायला रानांत जा.” तो गेला आणि देवाच्या डोंगरावर जाऊन मोशेला भेटला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले.
\v 28 परमेश्वराने त्याला जे सर्वकाही सांगून पाठवले होते ते, जी सर्व चिन्हे करून दाखवावयाची आज्ञा दिली होती ती मोशेने अहरोनाला सांगितली.
\s5
\v 29 मग मोशे व अहरोन यांनी जाऊन इस्राएली वंशजाचे सर्व वडीलजन एकत्र जमवले.
\v 30 नंतर परमेश्वराने मोशेला जे काही सांगितले होते ते सर्व अहरोनाने लोकांस कळवले; त्यास चिन्हे करून दाखवली.
\v 31 तेव्हा लोकांनी विश्वास ठेवला. परमेश्वराने इस्राएली घराण्याची भेट घेऊन त्यांचे दुःख पाहिले आहे हे त्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी नमन करून त्याची उपासना केली.
\s5
\c 5
\p
\v 1 या गोष्टी घडल्यानंतर, मोशे व अहरोन फारोकडे गेले व त्याला म्हणाले, “इस्राएली लोकांचा देव परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझ्यासाठी रानात उत्सव करावा म्हणून त्यांना जाऊ दे.”
\v 2 फारो म्हणाला, “हा परमेश्वर कोण आहे? मी त्याचा शब्द का ऐकावा आणि इस्राएलास जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वराला ओळखत नाही. म्हणून इस्राएलास मी जाऊ देणार नाही.”
\s5
\v 3 मग अहरोन व मोशे म्हणाले, “इब्री लोकांचा देव आम्हाशी बोलला आहे. म्हणून आम्हाला रानात तीन दिवसाच्या वाटेवर जाऊ द्यावे आणि तेथे आमचा देव परमेश्वर यास यज्ञार्पण करु द्यावे अशी आम्ही आपणाला विनंती करतो. आणि आम्ही जर असे केले नाहीतर तो मरीने किंवा तलवारीने आमच्यावर तुटून पडेल.”
\v 4 परंतु मिसराचा राजा फारो त्यांना म्हणाला, “हे मोशे, हे अहरोना, तुम्ही लोकांना काम सोडून जावयास का लावता? तुम्ही आपल्या कामावर माघारी चालते व्हा.
\v 5 फारो त्यांना असेही म्हणाला, येथे आता आमच्या देशात खूप इब्री आहेत आणि तुम्ही त्यांना काम करण्यापासून थांबवत आहात.”
\s5
\v 6 त्याच दिवशी फारोने मुकादमांना व नायकांना आज्ञा दिली.
\v 7 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही लोकांना विटा बनविण्याकरिता आजपर्यंत सतत गवत दिलेले आहे. परंतु आता त्यांना लागणारे गवत त्यांना स्वत: शोधून आणण्यास सांगा.
\v 8 तरी पूर्वी इतक्याच विटा त्यांनी बनविल्या पाहिजेत. त्यात काही कमी करून स्वीकारू नका. कारण ते आळशी झाले आहेत. म्हणूनच ते ओरड करून व म्हणतात, आम्हाला जाण्याची परवानगी दे आणि आमच्या देवाला यज्ञ करू दे.
\v 9 तेव्हा त्यांच्यावर अधिक काम लादून त्यांना सतत कामात ठेवा. म्हणजे मग खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत.”
\s5
\v 10 म्हणून लोकांचे मुकादम व नायक लोकांकडे जाऊन म्हणाले, “फारो असे म्हणतो, तुम्हाला विटा बनविण्यासाठी लागणारे गवत देणार नाही.
\v 11 तेव्हा तुम्हाला लागणारे गवत तुम्ही स्वत:च आणले पाहिजे. तुमचे काम काही कमी होणार नाही.”
\s5
\v 12 म्हणून मग लोक गवत शोधण्याकरता सर्व मिसर देशभर पांगले.
\v 13 त्यांच्यावर नेमलेले मुकादम त्यांच्याकडून अधिक काम करवून घेऊन पूर्वी इतक्याच विटा तयार करण्याकरता त्यांच्यामागे सतत तगादा लावीत.
\v 14 मिसराच्या मुकादमांनी इस्राएली लोकांवर नायक नेमले होते. त्यास फारोच्या मुकादमांनी मार देऊन विचारले की, “तुम्ही पूर्वी जेवढ्या विटा बनवीत होता तेवढ्या आता का बनवीत नाही.”
\s5
\v 15 मग इस्राएली नायक तक्रार घेऊन फारोकडे गेले व म्हणाले, “आम्ही जे तुमचे सेवक त्या आमच्याशी तुम्ही अशाप्रकारे का वागत आहा?
\v 16 तुम्ही आम्हाला गवत देत नाही परंतु पूर्वी इतक्याच विटा बनविण्याचा हुकूम करता. आणि आता आपल्या दासास मार मिळत आहे. पण सारा दोष आपल्या लोकांचा आहे.”
\v 17 फारो म्हणाला, “तुम्ही आळशी आहात, तुम्ही आळशी आहात. म्हणूनच तुम्ही म्हणता, आम्हाला परमेश्वराला यज्ञ करण्यास जाऊ देण्याची परवानगी दे.
\v 18 आता आपल्या कामावर माघारी जा. तुम्हाला गवत काही मिळायचे नाही परंतु पूर्वी इतक्याच विटा तुम्ही केल्या पाहिजेत.
\s5
\v 19 आपण संकटात आहोत हे इस्राएली नायकांना समजले. कारण पूर्वी इतक्याच विटा व रोजचे काम त्यांना शक्य नव्हते.”
\v 20 फारोच्या भेटीनंतर परत जाताना त्यांना वाटेत मोशे व अहरोन भेटले;
\v 21 तेव्हा ते मोशे व अहरोनास म्हणाले, “परमेश्वर तुम्हाकडे पाहो व तुम्हास शिक्षा करो. कारण फारो व त्याचे सेवक यांच्या दृष्टीने तुम्ही आम्हास अपमानकारक केले आहे. आम्हास मारून टाकण्यास तुम्ही त्यांच्या हातात जणू तलवारच दिली आहे.”
\s5
\v 22 मग मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, प्रार्थना करीत म्हणाला, “प्रभू तू या लोकांस का त्रास देत आहेस? तू मला पहिल्या जागी का पाठवलेस?
\v 23 मी फारोकडे तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो तेव्हापासून तो या लोकांस त्रास देत आहे. आणि तू आपल्या लोकांस मुक्त तर मुळीच केले नाही.”
\s5
\c 6
\p
\v 1 तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी आता फारोला काय करतो ते तू बघशील; मी माझे बाहूबल त्याला दाखविले म्हणजे मग तो माझ्या लोकांना जाऊ देईल. कारण माझ्या बाहूबलामुळे तो त्यांना आपल्या देशातून बाहेर घालवून देईल.”
\s5
\v 2 मग देव मोशेशी बोलला व म्हणाला, “मी परमेश्वर आहे
\v 3 मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांस सर्वसमर्थ देव म्हणून प्रगट झालो; परंतु मी त्यांना परमेश्वर या माझ्या नावाने त्यांना माहीत नव्हतो.
\v 4 ज्या कनान देशात ते उपरी होते तो परदेश त्यांना वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे.
\v 5 ज्या इस्राएलास मिसऱ्यांनी दास करून ठेवले आहे त्यांचे कण्हणे ऐकून मी आपल्या कराराची आठवण केली आहे.
\s5
\v 6 तेव्हा इस्राएलास सांग, मी तुमचा परमेश्वर आहे; मी तुम्हाला मिसऱ्यांच्या दास्यातून सोडवीन आणि मी तुम्हाला त्यांच्या अधिकारातून मुक्त करीन, आणि मी आपले सामर्थ्य दाखवून व सामर्थ्यशाली निवाड्याची कृती करून तुम्हास सोडवीन.
\v 7 मी तुम्हाला आपले लोक करून घेईन आणि मी तुमचा देव होईन. मी तुम्हाला मिसऱ्यांच्या दास्यातून काढून आणतो तो मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हाला समजेल.
\s5
\v 8 जो देश मी अब्राहाम, इसहाक व याकोबाला देण्यास मी हात वर करून शपथ वाहिली होती त्यात मी तुम्हाला नेईन; व तो मी तुम्हाला वतन करून देईन. मी परमेश्वर आहे.”
\v 9 तेव्हा मोशेने हे सर्व इस्राएल लोकांना सांगितले. परंतु त्यांच्या बिकट दास्यामुळे ते नाउमेद झाल्यामुळे ते त्याचे म्हणणे ऐकेनात.
\s5
\v 10 मग परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
\v 11 “तू जाऊन मिसराचा राजा फारो याला सांग की इस्राएली लोकांस तुझ्या देशांतून जाऊ दे”
\v 12 तेव्हा मोशे परमेश्वराला म्हणाला, “इस्राएली लोकांनी माझे ऐकले नाही, तर फारो माझे कसे ऐकेल? कारण मी अजिबात चांगला वक्ता नाही.”
\v 13 परमेश्वराने मोशे व अहरोन यांस इस्राएल लोकांस मिसर देशातून बाहेर नेण्याविषयी आज्ञा देऊन इस्राएल लोकांकडे आणि तसेच मिसरी राजा फारो याजकडे पाठवले.
\s5
\v 14 मोशे व अहरोन यांच्या पूर्वजांपैकी प्रमुख पुरुषांची नावे अशीः इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन. त्याची मुले हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी. हे रऊबेनाचे कुळ.
\v 15 शिमोनाचे पुत्र यमुवेल यामीन, ओहद, याखीन, जोहर व (कनानी स्त्री पोटी झालेला शौल.) ही शिमोनाची कुळे.
\s5
\v 16 लेवीचे आयुष्य एकशे सदतीस वर्षाचे होते. लेवीच्या वंशावळीप्रमाणे त्याच्या पुत्रांची नांवे हीः गेर्षोन, कहाथ, व मरारी.
\v 17 गेर्षोनाचे पुत्र त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे हेः गेर्षोनाचे दोन पुत्र लिब्नी व शिमी.
\v 18 कहाथाचे मुलगे अम्राम. इसहार, हेब्रोन व उज्जियेल. कहाथाचे आयुष्य एकशे तेहतीस वर्षाचे होते.
\v 19 मरारीचे पुत्र महली व मूशी, लेवीची कुळे त्याच्या वंशावळीप्रमाणे ही होती.
\s5
\v 20 अम्रामाने आपली आत्या योखबेद हिच्याशी लग्न केले तिच्या पोटी त्याला अहरोन व मोशे हे दोन पुत्र झाले. अम्राम एकशे सदतीस वर्षे जगला.
\v 21 इसहाराची पुत्र कोरह, नेफेग व जिख्री.
\v 22 उज्जियेलाचे पुत्र: मिशाएल, एलसाफान व सिथ्री.
\s5
\v 23 अहरोनाने अलीशेबाशी लग्न केले. (अलीशेबा अम्मीनादाबाची कन्या व नहशोनाची बहीण होती) त्यांना नादाब, अबीहू, एलाजार व इथामार ही मुले झाले.
\v 24 कोरहाचे पुत्रः अस्सीर, एलकाना व अबीयासाफ; ही कोरहाची कुळे.
\v 25 अहरोनाचा पुत्र एलाजार याने पुटीयेलाच्या कन्येशी लग्न केले; तिच्या पोटी त्याला फिनहास हा पुत्र झाला. हे सर्व लोक म्हणजे इस्राएलाचा पुत्र लेवी याची वंशावळ होय.
\s5
\v 26 इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर घेऊन जा असे परमेश्वराने ज्यांना सांगितले होते ते अहरोन व मोशे ह्याच कुळातले.
\v 27 इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर जाऊ द्यावे असे मिसराचा राजा फारो याच्याशी जे बोलले तेच हे अहरोन व मोशे.
\s5
\v 28 मग मिसर देशात परमेश्वर मोशेबरोबर बोलला.
\v 29 परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी परमेश्वर आहे. मी तुला सांगतो ते सर्व तू मिसराचा राजा फारो याला सांग.”
\v 30 परंतु मोशेने परमेश्वरासमोर उत्तर दिले, “मी तर चांगला वक्ता नाही. फारो राजा माझे ऐकणार नाही.”
\s5
\c 7
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, मी तुला फारोचा देवच करतो; आणि तुझा भाऊ अहरोन हा तुझा संदेष्टा होईल;
\v 2 ज्या आज्ञा मी तुला करीन त्या सर्वकाही तू अहरोनाला सांग; मग तो फारोला सांगेल तू इस्राएल लोकांना हा देश सोडून जाऊ दे.
\s5
\v 3 परंतु मी फारोचे मन कठोर करीन. मग मी मिसर देशामध्ये आपल्या सामर्थ्याची अनेक चिन्हे व अनेक आश्चर्ये दाखवीन.
\v 4 तरीही फारो तुमचे काही ऐकणार नाही. तेव्हा मग मी आपला हात मिसरावर चालवीन आणि त्यास जबर शिक्षा करून मी आपली सेना, माझे लोक, इस्राएल वंशज यांस मिसर देशातून काढून आणीन.
\v 5 आणि मिसरावर मी हात उगारून त्यांच्यातून इस्राएली लोकांस काढून आणीन तेव्हा मिसऱ्यांस कळेल की मी परमेश्वर आहे.”
\s5
\v 6 मग मोशे व अहरोन यांनी तसे केले. परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले.
\v 7 ते फारोबरोबर बोलले तेव्हा मोशे ऐंशी वर्षाचा व अहरोन त्र्याऐंशी वर्षाचा होता.
\s5
\v 8 नंतर परमेश्वर मोशे व अहरोन यांस म्हणाला,
\v 9 “फारो तुम्हाला एखादा चमत्कार दाखविण्याविषयी विचारील तेव्हा अहरोनाला आपली काठी फारोच्या देखत जमिनीवर टाकण्यास सांग म्हणजे तिचा साप होईल.”
\v 10 तेव्हा मोशे व अहरोन फारोकडे गेले आणि परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले. अहरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक यांच्यापुढे टाकली आणि त्या काठीचा साप झाला.
\s5
\v 11 तेव्हा फारो राजाने आपले जाणते व मांत्रिक बोलावले; तेव्हा मिसराच्या त्या जादुगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर तसाच प्रकार केला.
\v 12 त्यांनीही आपल्या काठ्या जमिनीवर टाकल्या तेव्हा त्यांचेही साप झाले परंतु अहरोनाच्या काठीने त्यांचे साप गिळून टाकले.
\v 13 तरी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे फारोचे मन कठोर झाले आणि त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही व इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.
\s5
\v 14 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोचे मन कठीण झाले आहे; तो इस्राएल लोकांना जाऊ देत नाही.
\v 15 उद्या सकाळी फारो नदीवर जाईल; तू साप झालेली काठी बरोबर घे आणि नदीच्या काठी त्याला भेटण्यास उभा राहा.
\s5
\v 16 त्याला असे सांग, ‘इब्र्यांचा देव परमेश्वर याने मला तुझ्याकडे पाठवले आहे व त्याच्या लोकांना त्याची उपासना करावयास रानात जाऊ दे, पण आतापर्यंत तू ऐकले नाहीस.
\v 17 परमेश्वर म्हणतो, की मी परमेश्वर आहे हे त्याला यावरून कळेल: मी नदीच्या पाण्यावर माझ्या हातातील काठीने मारीन तेव्हा त्याचे रक्त होईल.
\v 18 मग पाण्यातील सर्व मासे मरतील. नदीला घाण सुटेल आणि मिसराचे लोक नदीचे पाणी पिऊ शकणार नाहीत.
\s5
\v 19 परमेश्वराने मोशेला म्हटले, तू अहरोनास सांग की, आपली काठी घेऊन मिसरामधील नद्यांवर, नाल्यावर, त्यांच्या तलावावर व त्यांच्या सर्व पाण्याच्या तळ्यावर आपला हात उगार म्हणजे त्या सर्वांचे रक्त होईल, घरातील लाकडांच्या व दगडांच्या भांड्यात रक्तच रक्त होईल.”
\s5
\v 20 तेव्हा मोशे व अहरोन यांनी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले. अहरोनाने आपली काठी उचलून फारोच्या व त्याच्या अधिकाऱ्यासमोर पाण्यावर मारली. तेव्हा नदीतल्या सर्व पाण्याचे रक्त झाले.
\v 21 नदीतले मासे मेले व तिला घाण सुटली. त्यामुळे मिसरी लोकास नदीतील पाणी पिववेना. अवघ्या मिसर देशात रक्तच रक्त झाले.
\v 22 तेव्हा मिसराच्या जादुगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर तसेच केले. तेव्हा परमेश्वराने संगितल्याप्रमाणे फारोचे मन कठीण झाले.
\s5
\v 23 नंतर फारो मागे फिरला व आपल्या घरी निघून गेला. त्याने ह्याकडे लक्ष देखील दिले नाही.
\v 24 मिसराच्या लोकांना नदीचे पाणी पिववेना म्हणून त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी झरे खणले.
\v 25 परमेश्वराने नदीला दिलेल्या तडाख्याला सात दिवस होऊन गेले.
\s5
\c 8
\p
\v 1 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “जा आणि फारोला सांग, परमेश्वर असे म्हणतो की, ‘माझ्या लोकांना माझी उपासना करण्याकरता जाऊ दे.
\v 2 जर तू त्यांना जाऊ दिले नाहीस तर मी तुझा सारा देश बेडकांनी पीडीन.
\v 3 नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल. बेडूक नदीतून तुझ्या वाड्यात झोपण्याच्या खोलीत, अंथरुणात तसेच तुझ्या सेवकांच्या व अधिकाऱ्यांच्या घरात, तुझ्या भट्ट्यात आणि काथवटीत येतील.
\v 4 तुझ्या, तुझ्या सेवकांच्या व लोकांच्या अंगावर बेडूक चढतील.”
\s5
\v 5 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याच्या हातातील काठी नद्या, नाले तलाव यांच्या जलावर लांब कर म्हणजे मग बेडूक मिसर देशावर चढून येतील.”
\v 6 मग अहरोनाने आपला हात मिसराच्या जलाशयावर लांब केला तेव्हा बेडूक बाहेर आले आणि त्यांनी अवघा मिसर देश व्यापून टाकला.
\v 7 तेव्हा जादुगारांनी मंत्रतंत्राच्या योगे तसेच केले आणि मिसर देशावर आणखी बेडूक आणले.
\s5
\v 8 मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. फारो त्यांना म्हणाला, “हे बेडूक माझ्यापासून, व माझ्या लोकांपासून दूर करण्याकरिता तुमच्या परमेश्वराला विनंति करा. मग तुमच्या परमेश्वराची उपासना करण्याकरिता मी तुम्हा लोकांना जाऊ देईन.”
\v 9 मोशे फारोला म्हणाला, “मग बेडूक तुम्हापासून व तुमच्या घरातून दूर होतील आणि फक्त नदीत राहतील. मी तुमच्यासाठी, तुमच्या लोकांसाठी व तुमच्या सेवकांसाठी कोणत्यासमयी प्रार्थना करावी हे सांगण्याचा मान माझ्याऐवजी तुला असो.”
\s5
\v 10 फारोने उत्तर दिले, “उद्या.” तेव्हा मोशे म्हणाला, “तुमच्या म्हणण्याप्रमाणे होईल अशाप्रकारे तुम्हाला समजेल की आमच्या परमेश्वरासारखा कोणीच देव नाही.
\v 11 बेडूक तुम्हापासून तुमच्या घरातून, तुमचे सेवक व तुमचे लोक याच्यापासून निघून जातील; ते फक्त नदीत राहतील.”
\v 12 मग मोशे व अहरोन फारोपासून निघून गेले आणि फारोवर बेडूक आणले होते त्याविषयी मोशेने परमेश्वराला प्रार्थना केली.
\s5
\v 13 मग परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले. तेव्हा घरादारात, अंगणात व शेतात होते ते सर्व बेडूक मरून गेले.
\v 14 लोकांनी ते गोळा करून त्यांचे ढीग केले आणि त्यामुळे सर्व देशात घाण वास येऊ लागला.
\v 15 बेडकांची पीडा दूर झाली हे फारोने पाहिले आणि त्याचे मन पुन्हा कठीण झाले. त्याने त्यांचे ऐकले नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच हे झाले.
\s5
\v 16 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याची काठी जमिनीवरील धुळीवर मारण्यास सांग म्हणजे मग अवघ्या मिसर देशभर धुळीच्या उवा बनतील.”
\v 17 त्यांने तसे केले. अहरोनाने आपल्या हातातली काठी जमिनीवरील धुळीवर मारली, आणि त्यामुळे सगळ्या मिसर देशात धुळीच्या उवाच उवा बनल्या; त्या पशूवर व माणसांवर चढल्या.
\s5
\v 18 जादुगारांनी त्यांच्या मंत्रतत्रांच्या जोरावर उवा उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला परंतु धुळीतून त्यांना उवा बनविता आल्या नाहीत; पशू व मनुष्य उवांनी भरून गेले.
\v 19 तेव्हा जादुगारांनी फारोला सांगितले की, “यात देवाचे बोट आहे.” परंतु फारोने मन कठीण केले व त्यांने त्यांचे ऐकायचे नाकारले. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच तसे झाले.
\s5
\v 20 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “सकाळी लवकर ऊठ आणि फारो नदीवर जाईल तेव्हा त्याच्यापुढे उभा राहा. त्याला असे सांग की परमेश्वर म्हणतो, माझी उपासना करण्यासाठी माझ्या लोकांना जाऊ दे.
\v 21 जर तू त्यांना जाऊ देणार नाहीस तर मग तुझ्या घरात, तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर गोमाशा येतील. अवघ्या मिसर देशातील घरे गोमाशांच्या थव्यांनी भरून जातील. गोमाशांचे थवे अंगणात व जमिनीवरही येतील.
\s5
\v 22 तर ज्या गोशेन प्रातांत माझे लोक राहतात, तो मी त्यादिवशी वेगळा करीन, तेथे गोमाश्यांचे थवे जाणार नाहीत. यावरून पृथ्वीवर मीच परमेश्वर आहे हे तुला समजेल.
\v 23 तेव्हा उद्या माझ्या लोकांशी वागताना आणि तुमच्या लोकांशी वागताना मी भेद करीन. उद्या हा चमत्कार होईल.”
\v 24 अशा रीतीने परमेश्वराने केले. मिसर देशात गोमाशांचे थवेच्या थवे आले. ते फारोच्या घरात व त्याच्या सेवकांच्या घरात व ते सगळ्या मिसर देशात गोमाशाचे थवेच्या थवे आले. गोमाश्यांच्या ह्या थव्यांनी मिसर देशाची नासाडी केली.
\s5
\v 25 म्हणून मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, “तुम्ही तुमच्या देवाला आमच्या येथेच म्हणजे आमच्या देशातच यज्ञ करा.”
\v 26 परंतु मोशे म्हणाला, “तसे करणे योग्य होणार नाही कारण आमचा देव परमेश्वर ह्याला आम्ही जो यज्ञ करणार आहो तो यज्ञ तुम्हा मिसराच्या लोकांच्या दृष्टिने किळसवाणा असेल त्यामुळे आम्ही तो मिसराच्या लोकांसमोर केला तर ते आम्हावर दगडफेक करायचे नाहीत काय?
\v 27 तर आम्हास रानात तीन दिवसाच्या वाटेवर जाऊ द्या. आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हाला सांगेल त्याप्रमाणे त्याला यज्ञ करू.”
\s5
\v 28 तेव्हा फारो म्हणाला, “मी तुम्हाला तुमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करण्याकरिता रानात जाऊ देण्याची परवानगी देतो. केवळ तुम्ही फार दूर जाऊ नका. माझ्यासाठी प्रार्थना करा.”
\v 29 मोशे म्हणाला, “पाहा, मी तुमच्यापासून जातो आणि फारो व त्याचे सेवक या सर्वापासून उद्या गोमाशांचे थवे दूर करण्याकरिता परमेश्वराला विंनती करतो. परंतु परमेश्वरासाठी यज्ञ करण्यास जाणाऱ्या आमच्या लोकांना तुम्ही पुन्हा फसवू नये.”
\s5
\v 30 तेव्हा मोशे फारोपासून निघून गेला आणि त्याने परमेश्वराची प्रार्थना केली.
\v 31 याप्रकारे परमेश्वराने मोशेची विनंती मान्य केली व त्याने फारो, त्याचे सेवक व त्याचे लोक यांच्यापासून सर्व गोमाशाचे थवे दूर केले. तेथे एकही गोमाशी राहिली नाही.
\v 32 परंतु फारोने पुन्हा आपले मन कठोर केले आणि त्याने इस्राएली लोकाना जाऊ दिले नाही.
\s5
\c 9
\p
\v 1 नंतर परमेश्वराने मोशेला फारोकडे जाऊन असे बोलण्यास सांगितले, “इब्र्यांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांना जाऊ दे.
\v 2 जर तू त्यांना जाण्यापासून सतत असाच नाकारीत राहशील व जर तू त्यांना मागे ठेवून घेशील.
\v 3 तर पाहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे व शेरडेमेंढरांचे कळप, ही जी तुझी जनावरे रानांत आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल. भयंकर मरी उद्भवेल.
\v 4 परंतु परमेश्वर इस्राएलाची व मिसराची गुरेढोरे यात भेद करील; इस्राएली लोकांचे एकही जनावर मरणार नाही.”
\s5
\v 5 याकरता परमेश्वराने वेळही नेमलेली आहे. “ह्या देशात उद्या हे सर्व घडून येईल.”
\v 6 दुसऱ्या दिवशी परमेश्वराने ही गोष्ट केली आणि मिसरमधील सर्व गुरे मेली. परंतु इस्राएल लोकांच्या गुरांपैकी एकही मेले नाही.
\v 7 फारोने बारकाईने चौकशी केली आणि पाहा, इस्राएल लोकांच्या जनावरापैकी एकही मेले नव्हते. तरीपण फारोचे मन कठीणच राहिले. त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.
\s5
\v 8 नंतर परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, “मोशेने ओंजळभर भट्टीची राख घेऊन फारो देखत आकाशाकडे उधळावी.
\v 9 त्या राखेचे बारीक कण सगळ्या मिसरभर पसरेल आणि त्याच्या स्पर्शाने माणसांना व पशुंना फोड येऊन गळवे येतील.”
\v 10 तेव्हा मोशे व अहरोन यांनी भट्टीतून राख घेतली व ते फारो राजासमोर उभे राहिले. मोशेने ती राख हवेत उधळली आणि त्यामुळे माणसांना व पशुंना फोड व गळवे आले.
\s5
\v 11 गळव्यामुळे जादुगारांना मोशेपुढे उभे राहवेना. कारण जादुगारांना व सर्व मिसरी लोक यास गळवे आली होती.
\v 12 परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही, व लोकांना जाऊ दिले नाही. परमेश्वराने मोशेला असे सांगितलेच होते.
\s5
\v 13 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू पहाटेस उठून फारोपुढे उभा राहा; आणि त्याला सांग की इब्र्यांचा देव परमेश्वर असे म्हणतो, माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांना जाऊ दे.
\v 14 कारण या वेळेस मी आपल्या सर्व पीडा तुझ्या स्वतःवर, तुझ्या सेवकांवर व तुझ्या लोकांवर पाठवीन म्हणजे सर्व पृथ्वीवर माझ्यासारखा कोणी देव नाही. यावरून तुला हे कळेल.
\s5
\v 15 मी आपला हात उगारून तुझ्यावर व तुझ्या लोकांवर मरीचा प्रहार केला असता तू पृथ्वीवरून नष्ट झाला असता.
\v 16 परंतु मी तुला एका हेतूने ठेवले आहे की मी तुला माझे सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर विख्यात व्हावे यासाठीच मी तुला राखले आहे.
\v 17 तू अजूनही माझ्या लोकांविरूद्ध आहेस. तू त्यांना जाऊ देत नाहीस.
\s5
\v 18 म्हणून उद्या ह्याच वेळेस मी गारांचा असा काही वाईट वादळी वर्षाव मिसरावर आणीन की असा गारांचा वादळी वर्षाव मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून कधी आला नाही.
\v 19 तर आता माणसे पाठवून रानांतून तुझी गुरेढोरे व दुसरे जे काही रानात असेल ते आण. कारण जर एखादा माणूस किंवा पशू शेतात राहील तर तो मारला जाईल. जे जे तुम्ही तुमच्या घरात गोळा करून ठेवणार नाही त्यावर गारांचा भडीमार पडेल.”
\s5
\v 20 फारोच्या सेवकापैकी काहींना परमेश्वराच्या संदेशाची भीती वाटली त्यांनी लगेच आपली गुरेढोरे व गुलाम यांना आसऱ्याला घरी आणले व सुरक्षित जागी ठेवले.
\v 21 परंतु इतर सेवकांनी परमेश्वराच्या संदेशाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे रानांतील त्यांचे सर्व दास व गुरेढोरे, रानात राहू दिली.
\s5
\v 22 परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपले हात आकाशाकडे उगार आणि मग सर्व मिसरभर गारांच्या वर्षावाला सुरवात होईल. गारांचा मारा सर्व लोकांवर, गुरांवर आणि मिसर देशातील सर्व शेतांवर होईल.”
\v 23 तेव्हा मोशेने आपली काठी आकाशाकडे उगारली आणि मग परमेश्वराने मेघगर्जना, लखलखणाऱ्या विजा व गारा यांचा पृथ्वीवर वर्षाव केला. अशाप्रकारे परमेश्वराने मिसर देशावर भडीमार केला.
\v 24 गारांचा मारा व त्यासोबत विजांच्या अग्नीचा लोळ जमिनीवर आला. मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून गारांचे असे भयंकर व वाईट वादळ मिसरावर कधी आले नव्हते.
\s5
\v 25 त्या गारांच्या वादळाच्या माऱ्याने मिसर देशात, मनुष्ये, गुरेढोरे वगैरे जे काही, वनात होते त्या सर्वांवर गारांचा मारा झाला. शेतातील सर्व वनस्पतीवर मारा झाला. तसेच वनातील सर्व मोठमोठी झाडे मोडून पडली.
\v 26 गोशेन प्रांतात इस्राएल लोक राहत होते तेथे गारांचा मुळीच वर्षाव झाला नाही.
\s5
\v 27 फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, “ह्यावेळी मी पाप केले आहे. परमेश्वर न्यायी आहे; मी व माझे लोक, आम्ही अपराधी आहोत.
\v 28 तुम्ही परमेश्वराकडे विनवणी करा. हा झालेला गारांचा मारा व मेघांचा गडगडाट फार भयंकर झाला तेवढे पुरे, मी तुम्हाला जाऊ देतो. तुम्ही यापुढे राहणार नाही.”
\s5
\v 29 मोशेने फारोला सांगितले, “जेव्हा मी हे शहर सोडून जाईन तेव्हा माझे हात पसरून मी परमेश्वरापुढे विनंती करीन आणि मग ही मेघगर्जना व हा गारांचा मारा थांबेल; तेव्हा तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे.
\v 30 परंतु तू व तुझे सेवक अजूनही परमेश्वर देवाचे भय बाळगीत नाहीत हे मला माहीत आहे.”
\s5
\v 31 यावेळी सातूचे दाणे तयार होऊन तो कापणीला आला होता व जवसाला बोंडे आली होती. ह्या पिकांचा आता नाश झाला.
\v 32 परंतु साधा गहू व काठ्या गहू इतर धान्यापेक्षा उशीरा पिकतात; त्याची उशीरा पेरणी झाल्यामुळे ते अजून उगवले नव्हते, म्हणून त्यांचा नाश झाला नाही.
\v 33 मोशे फारोपुढून निघून नगराबाहेर गेला. त्याने परमेश्वराकडे हात पसरून प्रार्थना केली. आणि मेघगर्जना व गारांचा वर्षाव थांबला आणि पृथ्वीवर पाऊस पडणे बंद झाले.
\s5
\v 34 पाऊस, गारा व मेघांचा गडगडाट बंद झाल्याचे फारोने पाहिले तेव्हा फारो व त्याचे सेवक यांनी मन कठोर करून पुन्हा पाप केले.
\v 35 फारोने आपण दिलेल्या वचनाप्रमाणे करण्याचे नाकारले व इस्राएल लोकांना मोकळे करून त्याने जाऊ दिले नाही. परमेश्वराने मोशेद्वारे सांगितल्याप्रमाणेच हे झाले.
\s5
\c 10
\p
\v 1 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू फारोकडे जा. मी त्याचे मन व त्याच्या सेवकांची मने मीच कठीण केली आहेत. हे यासाठी केले की, माझ्या सामर्थ्याची चिन्हे त्यांच्यामध्ये दाखवावी.
\v 2 मी हे यासाठी केले की, तुम्ही तुमच्या मुलांना व नातवांना सांगावे मी मिसऱ्यांना कसे कठोरपणे वागवले आणि त्यांच्यामध्ये अनेक सामर्थ्याची चिन्हे दिली. याप्रकारे मी परमेश्वर आहे हे तुम्हाला कळेल.”
\s5
\v 3 मग मोशे व अहरोन फारोकडे गेले. त्यांनी त्याला सांगितले, “इब्र्यांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘तू माझ्यापुढे नम्र होण्यास कोठवर नाकारशील? माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांना जाऊ दे.
\v 4 जर तू माझ्या लोकांना जाऊ देण्याचे नाकारशील तर उद्या मी तुझ्या देशावर टोळधाड आणीन.
\s5
\v 5 ते टोळ सर्व जमीन झाकून टाकतील. ते इतके असतील की तुला जमीन दिसणार नाही. गारा व पावसाच्या तडाख्यातून जे काही वाचले असेल त्याला टोळ खाऊन टाकतील. शेतातील सर्व झाडांचा पाला ते खाऊन फस्त करतील.
\v 6 ते टोळ तुझी घरे, तुझ्या सेवकांची घरे, व मिसरमधील घरे, ते व्यापून टाकतील. तुझ्या वाडवडिलांनी आजपर्यंत पाहिले नसतील त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक ते असतील.” नंतर फारोसमोरून मोशे निघून गेला.
\s5
\v 7 फारोचे सेवक फारोला म्हणाले, “हा माणूस आम्हावर कोठपर्यंत संकटे आणणार आहे? या इस्राएलांना आपला देव परमेश्वराची उपासना करण्याकरिता जाऊ द्यावे. मिसराचा नाश झाला आहे हे तुला अजून कळत नाही काय?”
\v 8 मोशे व अहरोन यांना पुन्हा फारोकडे आणले, तो त्यांना म्हणाला, “जा व तुमचा देव परमेश्वर याची उपासना करा. परंतु कोण कोण जाणार आहेत?”
\s5
\v 9 मोशेने उत्तर दिले, “आमची तरुण व वृध्द मंडळी तसेच आम्ही आमचे मुले व कन्या, आमचे शेरडामेंढरांचे कळप व गुरेढोरे या सर्वास आम्ही घेऊन जाणार. कारण आम्हाला परमेश्वराचा उत्सव करायचा आहे.”
\v 10 फारो त्यांना म्हणाला, “तुम्ही व तुमची मुलेबाळे यांना मिसरमधून जाऊ दिले तर परमेश्वराची शपथ सांभाळा, पाहा, तुमच्या मनात काहीतरी वाईट आहे.
\v 11 नाही! फक्त तुमच्यातील पुरुषांनी तुमच्या परमेश्वराची उपासना करावयास जावे. कारण तेच तर तुम्हाला पाहिजे आहे.” त्यानंतर त्यास फारोपुढून घालवून दिले.
\s5
\v 12 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “आपली काठी मिसर देशावर उगार म्हणजे टोळधाड येईल! ते टोळ मिसर देशभर पसरतील आणि पाऊस व गारा यांच्या सपाट्यातून वाचलेल्या वनस्पती खाऊन टाकतील.”
\v 13 मग मोशेने आपल्या हातातील काठी मिसर देशावर उगारली तेव्हा परमेश्वराने एक दिवसभर व रात्रभर पूर्वेकडून वारा वाहविला, तेव्हा सकाळी वाऱ्याबरोबर टोळच टोळ आले.
\s5
\v 14 ते उडत आले व अवघ्या मिसर देशभर जमिनीवर पसरले. इतके टोळ ह्यापूर्वी मिसर देशावर कधी आले नव्हते व इतके येथून पुढेही कधी येणार नाहीत.
\v 15 त्या टोळांनी सर्व जमीन झाकून टाकली, आणि त्यांच्या आकाशात उडण्यामुळे सर्व देशभर अंधार पडला. गारांच्या तडाख्यातून वाचलेल्या वनस्पती आणि झाडावरील वाचलेली फळे त्यांनी खाऊन फस्त केली; आणि मिसरातील कुठल्याच झाडांझुडपांवर एकही पान राहिले नाही.
\s5
\v 16 फारोने तातडीने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. तो म्हणाला, “तुमचा देव परमेश्वर याच्याविरूद्ध व तुम्हाविरुध्द मी पाप केले आहे.
\v 17 तेव्हा ह्यावेळी माझ्या पापाबद्दल मला क्षमा करा आणि हे टोळ माझ्यापासून दूर करण्याकरिता तुमचा देव परमेश्वर याकडे प्रार्थना करा.”
\v 18 मोशे फारोसमोरून निघून गेला व त्याने परमेश्वराची प्रार्थना केली.
\s5
\v 19 तेव्हा परमेश्वराने त्याने पश्चिमेकडून जोराचा वारा वाहविला तेव्हा त्या वाऱ्याने सर्व टोळास उडवून तांबड्या समुद्रात लोटले. मिसरमध्ये एकही टोळ राहिला नाही.
\v 20 तरी परमेश्वराने फारोचे मन पुन्हा कठीण केले आणि त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.
\s5
\v 21 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशात उंच कर म्हणजे अवघा मिसर देश अंधारात गडप होईल तो अंधार इतका दाट असेल की तुम्हाला चाचपडत जावे लागेल.”
\v 22 तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे उभारिला आणि तीन दिवस सर्व मिसर देशात निबिड अंधकार झाला.
\v 23 कोणालाही काहीही दिसेना आणि म्हणून कोणीही उठून तीन दिवस आपले घर सोडून गेले नाही; परंतु जिथे इस्राएली लोकांची वस्ती होती तेथे प्रकाश होता.
\s5
\v 24 तेव्हा फारोने मोशेला बोलावले. तो म्हणाला, “तुम्ही जा व तुमच्या परमेश्वराची उपासना करा. तुम्ही तुमची मुलेबाळेही बरोबर न्या. परंतु तुमचे कळप व गुरेढोरे येथेच राहिली पाहिजेत.”
\v 25 मोशे म्हणाला, “आमचा देव परमेश्वर याच्यासाठी यज्ञ करण्यास यज्ञपशू व होमबली तू आमच्या हाती दिले पाहिजेत.
\v 26 यज्ञ व होमार्पणासाठी आम्ही आमचे गुरेढोरेही आमच्याबरोबर नेऊ. एक खूरही आम्ही मागे ठेवणार नाही. आमचा देव परमेश्वरा याला यज्ञ व होमार्पण करण्यासाठी यातूनच घ्यावे लागेल आणि परमेश्वराची सेवा करण्यास आम्हाला काय लागेल ते आम्ही तेथे पोहोचेपर्यत सांगता येणार नाही;”
\s5
\v 27 परमेश्वराने फारोचे मन पुन्हा कठीण केले. तेव्हा फारो इस्राएली लोकांना जाऊ देईना.
\v 28 मग फारो मोशेवर ओरडला व म्हणाला, “तू येथून चालता हो! आपले तोंड मला पुन्हा दाखवू नकोस! यानंतर तू आपले तोंड मला दाखवशील त्यादिवशी तू मरशील!”
\v 29 मोशे म्हणाला, “तू बरोबर बोललास, मी तुझे तोंड पुन्हा कधीही पाहणार नाही!”
\s5
\c 11
\p
\v 1 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “मी फारोवर व मिसरावर आणखी एक पीडा आणीन. त्यानंतर फारो तुम्हाला येथून जाऊ देईल; तो तुम्हाला जाऊ देईल तेव्हा तो तुम्हाला सर्वस्वी ढकलून काढून लावील,
\v 2 तू लोकांच्या कानांत सांगून ठेव की, प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजाऱ्यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्याचांदीचे दागिने मागून घ्यावे.”
\v 3 मिसरी लोकांची इस्राएली लोकांवर कृपादृष्टी होईल असे परमेश्वराने केले. मिसराचे सर्व लोक आणि फारोचे सेवक यांच्या दृष्टीने मोशे फार महान पुरुष होता.
\s5
\v 4 मोशे लोकांना म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, मध्यरात्री मी मिसरातून फिरेन
\v 5 आणि तेव्हा मिसराच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या फारोपासून तो जात्यावर बसणाऱ्या दासीपर्यंत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचे प्रथम वत्सदेखील मरतील.
\s5
\v 6 मिसर देशात पूर्वी कधीही झाला नव्हता आणि भविष्यात कधीही होणार नाही असा मोठा आकांत होईल.
\v 7 परंतु इस्राएल लोकांवर किंवा त्यांच्या जनावरांवर कुत्रा देखील भुकणार नाही यावरून मी परमेश्वर इस्राएली व मिसरांच्यामध्ये कसा भेद ठेवतो हे तुम्हास कळून येईल.
\v 8 मग हे सर्व तुमचे दास म्हणजे मिसरी लोक माझ्या पाया पडून माझी उपासना करतील. ते म्हणतील, तुम्ही तुमच्या सर्व लोकांसह व परिवारासह येथून निघून जा.” मग त्यानंतर रागाने संतप्त होऊन मोशे फारोला सोडून निघून गेला.
\s5
\v 9 मग परमेश्वर मोशेला म्हणाला होता की, फारो तुमचे ऐकणार नाही. हे यासाठी की, “मी मिसर देशामध्ये पुष्कळ आश्चर्यकारक गोष्टी कराव्या.”
\v 10 आणि मोशे व अहरोन यांनी सर्व आश्चर्ये फारोपुढे केली; परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने त्याच्या देशातून इस्राएल लोकांना बाहेर जाऊ दिले नाही.
\s5
\c 12
\p
\v 1 मग मोशे व अहरोन मिसर देशामध्ये असताना परमेश्वर त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला,
\v 2 “हा महिना तुम्हास आरंभीचा महिना व्हावा. तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा.
\s5
\v 3 इस्राएलाच्या सर्व मंडळीस सांग की या महिन्याच्या दहाव्या दिवशी प्रत्येक माणसाने आपल्या कुटुंबातील लोकांकरता एक कोकरू घ्यावे.
\v 4 आणि एक कोकरू, खाण्यासाठी घरातील माणसे थोडी असली तर त्याने आपल्या शेजाऱ्याच्या संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती माणसास पुरेल याचा अंदाज घ्यावा.
\s5
\v 5 तो कोकरा, एक वर्षाचा नर असावा व तो पूर्णपणे निर्दोष असावा तो कोकरा मेंढरातला किंवा बोकडातला असावा. तुम्हास वाटेल तो घ्यावा.
\v 6 ह्या पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत राखून ठेवावा. संध्याकाळी इस्राएली मंडळीतील लोकांनी त्याला वधावे.
\v 7 त्यांचे रक्त घेऊन ते ज्या घरात त्याचे मांस खाणार आहेत त्याच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीवर लावावे.
\v 8 त्याच रात्री त्याचे मांस विस्तावावर भाजून आणि कडू भाजी व बेखमीर भाकरीबरोबर ते खावे.
\s5
\v 9 तुम्ही त्याचे मांस कच्चेच किंवा पाण्यात शिजवून खाऊ नये तर विस्तवावर भाजून खावे; त्याची मुंडी, पाय व आतडी ही सुद्धा खावीत.
\v 10 त्यातले काहीही सकाळपर्यंत ठेवू नये आणि सकाळपर्यंत काही उरलेच तर ते आगीत जाळून टाकावे.
\v 11 ते तुम्ही याप्रकारे खावेः तुमच्या कमरा कसून, पायांत जोडे घालून आणि हातात काठी घेऊन, ते घाईघाईने खावे; हा परमेश्वराचा वल्हांडण सण आहे.
\s5
\v 12 आज रात्री मी मिसर देशात फिरेन आणि त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन, आणि मिसर देशातील सर्व दैवतांना शिक्षा करीन. मी परमेश्वर आहे.
\v 13 परंतु तुमच्या घरांच्या दारावरील रक्त ही एक खूण असेल. मी जेव्हा रक्त पाहीन तेव्हा तुम्हास ओलांडून मी पुढे जाईन. मी मिसर देशाला मारीन तेव्हा कोणताही अनर्थ तुम्हावर येणार नाही व तुमचा नाश होणार नाही
\v 14 हा दिवस तुम्हास आठवणी दाखल होईल, हा दिवस परमेश्वरासाठी तुम्ही विशेष उत्सवाचा सण म्हणून पाळावा. तुमच्या वंशजांनी येथून पुढे हा सण पिढ्यानपिढ्या कायमचा विधी समजून पाळावा.
\s5
\v 15 सात दिवस बेखमीर भाकर खावी; पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे. तुम्हातील जर कोणी खमीर घातलेली भाकर खाईल तर त्याला तुम्ही इस्राएल लोकांमधून बाहेर टाकावे.
\v 16 या सणाच्या पहिल्या व शेवटल्या म्हणजे सातव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; ह्या दोन्ही दिवशी काही काम करू नये. फक्त खाण्यापिण्याच्या कामाशिवाय इतर कोणतेही काम करु नये.
\s5
\v 17 याप्रकारे बेखमीर भाकरीच्या सण पाळावा. कारण याच दिवशी मी तुम्हा सर्वाना मिसर देशातून बाहेर काढून आणले. म्हणून हा दिवस पिढ्यानपिढ्या कायमचा विधि म्हणून पाळावा.
\v 18 तेव्हा पहिल्या महिन्यातील चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून ते त्या महिन्याच्या एकविसाव्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही बेखमीर भाकरी खाव्या.
\s5
\v 19 ह्या सात दिवसात तुमच्या घरात खमीर नसावे; कारण जो कोणी एखादी खमीराची वस्तू खाईल मग तो परदेशी असो किंवा स्वदेशी असो त्याला इस्राएलाच्या मंडळीतून बाहेर टाकावे.
\v 20 त्या दिवशी कोणीही खमीर खाऊ नये; तुम्ही घरोघरी बेखमीर भाकरच खावी.”
\s5
\v 21 मग मोशेने इस्राएली लोकांच्या सर्व वडीलधाऱ्या लोकांना एकत्र बोलावले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एकएक कोकरू घ्यावे; आणि वल्हांडण सणाच्या यज्ञाकरिता त्याचा वध करावा.
\v 22 मग एजोब झाडाची जुडी घेऊन त्या पात्रातील कोकराच्या रक्तात बुचकाळावी आणि त्याचे रक्त दाराच्या दोन्ही बाजूंच्या चौकटींना व कपाळपट्टीवर लावावे. आणि सकाळपर्यंत कोणीही घराबाहेर जाऊ नये.
\s5
\v 23 कारण त्यावेळी परमेश्वर मिसरामधील प्रथम जन्मलेल्यांना ठार मारण्यासाठी फिरणार आहे; तो जेव्हा घराच्या दारावरील कपाळपट्टीवर व दाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला लावलेले रक्त पाहील तेव्हा तो ते ते दार ओलांडून जाईल; नाश करणाऱ्याला तुमच्या घरात जाऊ देणार नाही.
\s5
\v 24 हा विधी तुम्हाला व तुमच्या पुत्रपौत्राला निरंतरचा आहे असे समजून तो पाळावा.
\v 25 परमेश्वर त्याच्या वचनानुसार जो देश तुम्हाला देणार आहे त्यात तुम्ही जाल तेव्हा तुम्ही हा उपासनेचा प्रकार म्हणून पाळावा.
\s5
\v 26 जेव्हा तुमची मुलेबाळे तुम्हाला विचारतील की ह्या उपासनेचा अर्थ काय आहे?
\v 27 तेव्हा तुम्ही त्यांना सांगा, हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; कारण आम्ही जेव्हा मिसरमध्ये होतो तेव्हा त्या दिवशी परमेश्वराने मिसराच्या लोकांना मारले व आपल्या घरांला वाचवले त्यासमयी तो मिसरांतील इस्राएलांची घरे ओलांडून गेला हे ऐकून लोकांनी नतमस्तक होऊन दंडवत घातले.
\v 28 परमेश्वराने मोशे व अहरोन यांना आज्ञा दिली होती म्हणून इस्राएल लोकांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे केले.
\s5
\v 29 मध्यरात्री असे झाले की मिसर देशातील सिंहासनारूढ असलेल्या फारोच्या ज्येष्ठ पुत्रापासून तर तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या ज्येष्ठ पुत्रापर्यंत सर्व आणि तसेच गुराढोरांपैकी सर्व प्रथम वत्स परमेश्वराने मारून टाकले.
\v 30 रात्रीच्या समयी फारो, त्याचे सर्व सेवक आणि सगळे मिसराचे लोक जागे झाले आणि मिसर देशात मोठा हाहा:कार उडाला, कारण ज्यांत कोणी मेले नाही असे एकही घर राहिले नाही.
\s5
\v 31 तेव्हा रातोरात फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले, फारो त्यांना म्हणाला तुम्ही व तुमचे सर्व इस्राएल लोक माझ्या लोकांतून निघून जा आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन तुमच्या परमेश्वराची उपासना करा.
\v 32 आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमचे कळप, व गुरेढोरे ही तुमच्याबरोबर घेऊन चालते व्हा. आणि जाताना मलाही आशीर्वाद द्या.
\v 33 लोकांनी देशांतून तात्काळ निघून जावे म्हणून मिसरी लोकांनी त्यांच्यामागे तगादा लाविला; कारण ते म्हणाले, आम्ही सर्वजण मेलोच आहोत.”
\s5
\v 34 इस्राएल लोकांनी आपल्या मळलेली कणीक खमीर न घालता तशीच काथवटीसहीत कापडात गुंडाळून आणि आपल्या खांद्यावर घेतली.
\v 35 इस्राएली लोकांनी मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे आपल्या मिसऱ्याजवळ जाऊन कपडे. सोन्यारुप्याचे दागदागिने मागून घेतले.
\v 36 मिसरी लोकांची कृपादृष्टि इस्राएल लोकांवर होईल असे परमेश्वराने केले आणि म्हणून त्यांनी जे जे मागितले ते ते त्यांनी त्यास दिले. अशाप्रकारे त्यांनी मिसरी इस्राएल लोकांस लुटले.
\s5
\v 37 तेव्हा इस्राएल लोक मिसरमधून निघून रामसेस येथून प्रवास करीत सुक्कोथ येथे गेले. मुलेबाळे सोडून ते सर्वजण मिळून सुमारे सहा लाख होते.
\v 38 त्यांच्या सोबत लोकांचा मिश्र समुदाय गेला. तशीच पुष्कळ कळप, गुरेढोरे, जनावरे होती.
\v 39 त्यांनी आपल्याबरोबर मिसर देशातून मळलेली कणीक आणली होती. त्यांना बेखमीर भाकरीच भाजाव्या लागल्या. त्यांना जबरीने बाहेर काढण्यात आले होते. त्यांना थांबण्यास वेळ नव्हता. तसेच खावयास काही विशेष जेवण करता आले नाही;
\v 40 इस्राएली लोक मिसर देशामध्ये येऊन चारशेतीस वर्षे राहिले होते.
\s5
\v 41 मग चारशेतीस वर्षाच्या अखेरीस बरोबर त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर देशातून बाहेर निघाल्या.
\v 42 परमेश्वराने त्यास मिसर देशातून बाहेर काढिले ह्याकरता ही परमेश्वरासाठी जागरणाची रात्र म्हणून अवश्य पाळावी. इस्राएल लोकांनी पिढ्यानपिढ्या ही रात्र परमेश्वरासाठी जागरणाची म्हणून अवश्य पाळावी.
\s5
\v 43 परमेश्वराने मोशे व अहरोन यांना सांगितले, “वल्हांडण सण पाळण्याविषयीचे नियम असे आहेत. कोणाही परदेशी माणसाने वल्हांडणाचे भोजन खाऊ नये.
\v 44 परंतु जर कोणी एखादा गुलाम विकत घेतला असेल आणि त्याची सुंता त्याने करवून घेतली असेल तर मग त्याने त्यातले खावे;
\s5
\v 45 परंतु उपरा माणूस किंवा मोलकरी ह्यापैकी कोणीही ते खाऊ नये.
\v 46 प्रत्येक इस्राएली कुटुंबाने आपले वल्हांडण सणाचे भोजन एकाच घरात खाल्ले पाहिजे; ते भोजन घराबाहेर नेऊ नये. यज्ञपशूचे कोणतेही हाड मोडू नये.
\s5
\v 47 सर्व इस्राएल मंडळीने हा सण पाळलाच पाहिजे.
\v 48 परदेशीय एकजण तुम्हाबरोबर राहत असेल व जर त्याला परमेश्वराच्या वल्हांडण सणाच्या भोजनात सहभागी होण्याची इच्छा असेल तर त्याने सुंता करून घेतलीच पाहिजे. म्हणजे मग तो इस्राएल लोकांसारखा रहिवासी होईल. मग त्याने वल्हांडण सणाच्या भोजनात सहभागी व्हावे; परंतु त्याने सुंता करून घेतली नाहीतर त्याला त्यातले काही खाता येणार नाही.
\s5
\v 49 हे नियम सर्वांसाठी सारखेच आहेत, मग तो इस्राएली असो किंवा तुमच्या देशात राहणारा इस्राएली नसलेला कोणी परदेशी असो. प्रत्येकासाठी सारखेच नियम आहेत.”
\v 50 तेव्हा परमेश्वराने मोशे व अहरोन यांना ज्या आज्ञा दिल्या त्या सर्व इस्राएली लोकांनी पाळल्या.
\v 51 अशा रीतीने त्याच दिवशी परमेश्वराने सर्व इस्राएली लोकांना त्यांच्या सैन्या-सैन्याने मिसर देशातून बाहेर काढून आणले.
\s5
\c 13
\p
\v 1 मग परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
\v 2 “इस्राएली लोकांमध्ये मनुष्याचा व पशुचा ह्या दोहोंचे प्रत्येक प्रथम जन्मलेले सर्व नर माझ्यासाठी पवित्र कर. प्रथम जन्मलेले ते माझे आहेत.”
\s5
\v 3 मोशे लोकांना म्हणाला, “आजच्या दिवसाची आठवण ठेवा. तुम्ही मिसर देशात गुलाम म्हणून होता; परंतु ह्या दिवशी परमेश्वराने आपल्या हात बलाने तुम्हास गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले म्हणून तुम्ही खमीर घातलेली भाकर खाऊ नये.
\v 4 आज अबीब महिन्यात तुम्ही मिसर सोडून निघत आहात.
\v 5 परमेश्वराने तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक करार केला होता की कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी व यबूसी ह्याच्या देशात, जेथे दुधामधाचे प्रवाह वाहतात त्या देशात आणल्यानंतर तुम्ही या महिन्यात ही सेवा करावी.
\s5
\v 6 या सात दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी. सातव्या दिवशी परमेश्वरासाठी तुम्ही हा सण पाळावा;
\v 7 ह्या सात दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी. तुमच्या देशाच्या हद्दीत कोठेही खमीराचे दर्शनसुध्दां होऊ नये.
\s5
\v 8 ह्या दिवशी परमेश्वराने आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले म्हणून आम्ही हा सण पाळीत आहोत असे तुम्ही आपल्या पुत्रपौत्रांना सांगावे.
\v 9 हे चिन्ह तुझ्या हातावर, तुझ्या दोन्ही डोळ्यांच्यामध्ये स्मारक असे असावे, परमेश्वराचा नियम तुझ्या मुखी असावा. कारण की परमेश्वराने बलवान भुजाने तुला मिसर देशामधून बाहेर आणले.
\v 10 म्हणून तू वर्षानुवर्षे नेमलेल्या समयी हा विधी पाळावा.
\s5
\v 11 परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे तो तुम्हाला आता कनानी लोक राहत असलेल्या देशात घेऊन जाईल व तो देश तुझ्या हाती देईल.
\v 12 तेव्हा उदरातून निघालेला प्रथम पुरुष व जनावराच्या पोटचा प्रथम वत्स यांस परमेश्वरासाठी वेगळे करावे सर्व नर परमेश्वराचे होत.
\v 13 गाढवाचा प्रथम वत्स एक कोकरू देऊन सोडवून घ्यावा; त्याचा मोबदला काही न दिल्यास त्याची मान मुरगाळावी. तुझ्या मुलातील प्रथम नर मोबदला देऊन सोडवून घ्यावा.
\s5
\v 14 पुढील काळीं तुमची मुलेबाळे विचारतील की हे काय? तेव्हा त्यास सांग, ‘मिसर देशातून गुलामगिरीतून परमेश्वराने आम्हांस आपल्या हाताच्या बलाने बाहेर काढले.
\v 15 आणि फारो आम्हांस मिसर सोडून जाऊ देईना, तेव्हा परमेश्वराने मिसर देशामधील मनुष्य व पशु यांचे सर्व प्रथम नर मारून टाकले; आणि म्हणूनच आम्ही उदरातून निघालेल्या सर्व प्रथम नरांचा मी परमेश्वरास बलि अर्पितो. पण माझे सर्व ज्येष्ठ पुत्र देऊन सोडवून घेतो.
\v 16 तुझ्या हातावर आणि तुझ्या दोहो डोळ्यांच्या मध्यभागी हे स्मारक चिन्ह व्हावे. कारण परमेश्वराने आपल्या हाताच्या बलाने आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले.”
\s5
\v 17 फारोने लोकांना जाऊ दिले, परंतु परमेश्वराने लोकांना पलिष्टी लोकांच्या देशातून जवळची वाट असताना देखील त्यातून जाऊ दिले नाही “युध्द प्रसंग पाहून हे लोक माघार घेऊन मिसर देशाला परत जातील, असे देवाला वाटले.”
\v 18 म्हणून देवाने त्यांना दुसऱ्या मार्गाने तांबड्या समुद्राजवळील रानातून नेले. इस्राएल लोक मिसरामधून सशस्र होऊन बाहेर निघाले होते.
\s5
\v 19 मोशेने योसेफाच्या अस्थी आपल्याबरोबर घेतल्या. कारण मरण्यापूर्वी योसेफाने आपणाकरता इस्राएली पुत्रांकडून वचन घेतले होते. तो म्हणाला होता, “देव जेव्हा तुम्हाला मिसरमधून सोडवील तेव्हा माझ्या अस्थी मिसरमधून घेऊन जाण्याची आठवण ठेवा.”
\v 20 मग ते सुक्कोथ येथून रवाना झाले व रानाजवळील एथामांत त्यांनी तळ दिला.
\v 21 त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यास मार्ग दाखविण्यासाठी मेघस्तंभाच्या ठायी आणि रात्री त्यास प्रकाश देण्यासाठी अग्नीस्तंभाच्या ठायी त्यांच्यापुढे चालत असे.
\v 22 दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्नीस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत.
\s5
\c 14
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 “इस्राएल लोकांना असे सांग की, तुम्ही मागे फिरून मिग्दोल व समुद्र यांच्यामध्ये व बआल-सफोन जवळ असलेल्या पीहहीरोथ येथे तळ देऊन रात्री मुक्काम करावा.
\v 3 फारो इस्राएल त्यामुळे लोकांविषयी म्हणेल की ते देशांत गोंधळले आहेत, त्यांचा रानांत कोंडमारा झाला आहे. असे फारोला वाटेल.
\s5
\v 4 मी फारोचे मन कठीण करीन व तो त्यांचा पाठलाग करीन. मी फारो व त्याची सेना यांचा पराभव करून गौरवशाली होईन मग मिसराच्या लोकांना समजेल की मी परमेश्वर आहे.” त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले.
\v 5 इस्राएल लोक निसटून गेल्याचे मिसराच्या राजाला समजले तेव्हा तो व त्याचे अधिकारी यांचे विचार बदलले व आपण हे काय केले असे त्यांना वाटले. फारो म्हणाला, “आपण इस्राएली लोकांना आपल्या दास्यातून पळून का जाऊ दिले?”
\s5
\v 6 तेव्हा फारोने आपला रथ तयार करण्यास सांगितले आणि आपल्या लोकांना घेऊन तो निघाला.
\v 7 त्याने सहाशे उत्तम योद्धे व मिसरातील सर्व रथ त्यावरील सरदारासोबत आपल्याबरोबर घेतले.
\v 8 इस्राएल लोक तर मिसरहून मोठ्या अवसानाने चालले होते, परंतु परमेश्वराने फारो राजाचे मन कठीण केले.
\v 9 मग फारोचे लष्करात पुष्कळ घोडेस्वार व रथ होते. मिसरी सैन्याने त्यांचा पाठलाग करून लाल समुद्र व बआल-सफोनाच्या दरम्यान पीहहीरोथ येथे तळ दिला होता तेथे त्यांना गाठले.
\s5
\v 10 फारो व मिसरी सैन्य आपणाकडे येताना इस्राएल लोकांनी पाहिले, तेव्हा ते अतिशय घाबरले; आणि मदतीसाठी ते परमेश्वराचा धावा करु लागले.
\v 11 ते मोशेला म्हणाले, “आम्हाला मिसरात काय कबरा नव्हत्या म्हणून येथे रानात मरावयास का आणले? आम्हांस तू मिसरातून बाहेर का काढले?
\v 12 मिसरमध्ये आम्ही तुला नव्हतो का म्हणत की आम्ही आहो ते ठीक आहो, आम्ही मिसरामध्ये गुलाम म्हणून राहिलो असतो तर बरे झाले असते. येथे रानात मरून जावे त्यापेक्षा मिसऱ्यांचे दास्य पत्करले.”
\s5
\v 13 परंतु मोशेने उत्तर दिले, “भिऊ नका! स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे तारण करील ते पाहा. आजच्या दिवसानंतर हे मिसराचे लोक तुम्हाला पुन्हा कधीही दिसणार नाहीत.
\v 14 परमेश्वर तुमच्याकरता त्यांच्याशी लढेल, तुम्ही शांत उभे राहा.”
\s5
\v 15 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझा धावा करीत काय बसलास? इस्राएल लोकांना सांग की पुढे चला.
\v 16 तू आपली काठी उचल आणि आपला हात समुद्रावर उगारून तो दुभाग म्हणजे इस्राएल लोक भर समुद्रात कोरड्या भूमीवरून चालतील.
\v 17 आणि पाहा, मी स्वतः मिसऱ्यांची मने कठीण करीन आणि ते त्यांचा पाठलाग करतील. आणि फारो व त्याचे सर्व सैन्य, स्वार व रथ यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट होईल.
\v 18 फारो व त्याचे रथ व त्यांचे स्वार यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट झाला म्हणजे मी परमेश्वर आहे हे मिसरी लोकांस कळेल.”
\s5
\v 19 इस्राएली सेनेच्या पुढे चालणारा देवाचा दूत सेनेच्या मागे गेला, आणि मेघस्तंभ त्यांच्या आघाडीवरून निघून त्यांच्या पिछाडीस उभा राहिला.
\v 20 अशा रीतीने तो मिसराचे लोक व इस्राएल लोक यांच्यामध्ये उभा राहिला; मेघ व अंधकार होता तरी तो रात्रीचा प्रकाश देत होता. रात्रभर एका पक्षाला दुसऱ्या पक्षाकडे जाता आले नाही.
\s5
\v 21 मग मोशेने तांबड्या समुद्रावर आपला हात उगारला तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेकडून जोराचा वारा वाहवून समुद्र मागे हटविला, असा की पाणी दुभागून मध्ये कोरडी जमीन झाली.
\v 22 आणि इस्राएल लोक कोरड्या वाटेवरून भरसमुद्रातून पार गेले. समुद्राचे पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला भिंतीसारखे उभे राहिले.
\s5
\v 23 त्यानंतर तेव्हा मिसऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार त्यांच्या पाठोपाठ समुद्रामध्ये गेले.
\v 24 तेव्हा त्यादिवशी भल्या पहाटे परमेश्वराने मेघस्तंभातून व अग्नीस्तंभातून खाली मिसराच्या सैन्याकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडवून त्यांचा पराभव केला.
\v 25 रथाची चाके रुतल्यामुळे रथावर ताबा ठेवणे मिसराच्या लोकांना कठीण झाले; तेव्हा ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “आपण येथून लवकर निघून जाऊ या! कारण परमेश्वर इस्राएलाच्या बाजूने आम्हाविरूद्ध लढत आहे.”
\s5
\v 26 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात समुद्रावर उगार म्हणजे भिंतीसारखे उभे राहिलेले पाणी पूर्ववत जमून मिसऱ्यावर, त्यांच्या रथावर व स्वारांवर येईल.”
\v 27 मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा दिवस उजडल्यावर पाणी पहिल्यासारखे समान पातळीवर आले; तेव्हा मिसराच्या लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु परमेश्वराने त्यास समुद्रामध्ये उलथून पाडिले.
\v 28 पाणी पूर्ववत झाले व त्याने घोडे, रथ व स्वारांना गडप केले आणि इस्राएल लोकांचा पाठलाग करणाऱ्या सर्व फारोच्या सैन्याचा नाश झाला, त्यातले कोणीही वाचले नाही.
\s5
\v 29 परंतु इस्राएली लोक कोरड्या भूमिवरून भरसमुद्र ओलांडून पार गेले. ते पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या हाताला भिंतीप्रमाणे उभे राहिले.
\v 30 तेव्हा अशा रीतीने त्या दिवशी परमेश्वराने मिसरांच्या हातातून सोडविले आणि मिसरी समुद्रतीरी मरून पडलेले इस्राएल लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले.
\v 31 परमेश्वराने मिसऱ्यांना आपला प्रबळ हात दाखविला तो इस्राएल लोकांनी पाहिला, तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर व त्याचा सेवक मोशे याच्यावरही विश्वास ठेवला.
\s5
\c 15
\p
\v 1 नंतर मोशे व इस्राएल लोक यांनी परमेश्वराला हे गीत गाईले, ते म्हणाले,
\q “मी परमेश्वराला गीत गाईन कारण तो विजयाने प्रतापी झाला आहे;
\q घोडा व स्वार यांना त्याने समुद्रात उलथून टाकले आहे.
\q
\s5
\v 2 परमेश्वर माझे सामर्थ्य व माझे गीत आहे.
\q तो माझे तारण झाला आहे.
\q मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन; परमेश्वर माझा देव आहे;
\q तो माझ्या पूर्वजाचा देव आहे; मी त्याचे गौरव करीन.
\q
\v 3 परमेश्वर महान योद्धा आहे;
\q त्याचे नांव याव्हे आहे.
\q
\s5
\v 4 त्याने फारोचे रथ व स्वार यांना समुद्रात फेकून दिले;
\q त्याचे निवडक अधिकारी तांबड्या समुद्रात बुडाले आहेत.
\q
\v 5 खोल पाण्याने त्यांना बुडविले;
\q ते खोल पाण्यात दगडाप्रमाणे तळापर्यंत बुडाले.
\q
\s5
\v 6 हे परमेश्वरा, तुझा उजवा हात आश्चर्यकारकरीत्या बलशाली आहे;
\q त्या हाताने तू शत्रूंचा चुराडा करून टाकलास.
\q
\v 7 तुझ्या वैभवशाली सामर्थ्याने तू तुझ्याविरूद्ध बंड करून उठणाऱ्यांचा नाश करतोस;
\q अग्नीने वाळलेल्या गवताच्या काड्या जाळाव्या तसे तू त्यांना तुझ्या रागाने जाळून भस्म करतोस.
\q
\v 8 तुझ्या नाकपुड्यांच्या फुंकाराने जलाच्या राशि बनल्या.
\q जलप्रवाह राशी सारखे उंच उभे राहिले,
\q जलाशय सागराच्या उदरी थिजून गेले.
\q
\s5
\v 9 शत्रु म्हणाला, मी त्यांचा पाठलाग करीन, त्यांना गाठीन, मी त्यांची सर्व संपत्ती लुटून घेईन;
\q त्यामुळे माझा जीव तृप्त होईल.
\q मी तलवार उपसून आपल्या हाताने त्यांचा नाश करीन.
\q
\v 10 परंतु तू त्यांच्यावर आपला फुंकर वायु सोडलास आणि समुद्राच्या पाण्याने त्यांना गडप केले;
\q ते शिशाप्रमाणे समुद्रात खोल पाण्यात तळापर्यंत बुडाले.
\q
\v 11 हे परमेश्वरा, देवांमध्ये तुजसमान कोण आहे?
\q पवित्रतेने ऐश्वर्यवान, स्तवनात भयानक,
\q अद्भुते करणारा असा तुजसमान कोण आहे?
\q
\s5
\v 12 तू तुझा उजवा हात उगारला
\q पृथ्वीने त्यांना गिळून टाकले.
\q
\v 13 तू उध्दारलेल्या लोकांना तू तुझ्या दयाळूपणाने चालवले आहेस;
\q तुझ्या सामर्थ्याने तू त्यांना तुझ्या पवित्र आणि आनंददायी प्रदेशात नेले आहे.
\q
\s5
\v 14 इतर राष्ट्रे ही गोष्ट ऐकून भयभीत होतील;
\q पलेशेथामध्ये राहणारे लोक भीतीने थरथरा कांपतील.
\q
\v 15 मग अदोमाचे अधिकारी हैराण झाले.
\q मवाबाचे नायक भीतीने थरथरा कांपत आहेत
\q आणि कनानी लोक गलित झाले आहेत.
\q
\s5
\v 16 तुझे सामर्थ्य पाहून ते लोक घाबरतील,
\q आणि परमेश्वराचे लोक म्हणजे
\q तू तारलेले लोक निघून पार जाईपर्यंत
\q ते तुझ्या लोकांना काहीही न करता, दगडासारखे एकाच जागी उभे राहतील;
\q
\s5
\v 17 तू तुझ्या लोकांना तुझ्या वतनाच्या पर्वतावर घेऊन जाशील;
\q हे परमेश्वरा, तू आपल्यासाठी केलेले निवासस्थान हेच आहे.
\q हे प्रभू, तुझ्या हातांनी स्थापिलेले तुझे पवित्र स्थान हेच.
\q
\v 18 परमेश्वर सदासर्वदा राज्य करील.”
\p
\s5
\v 19 फारोचे घोडे, स्वार व रथ समुद्रात गेले याप्रकारे परमेश्वराने त्यांना समुद्राच्या पाण्यात गडप केले; परंतु इस्राएल लोक भरसमुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालत पार गेले.
\v 20 त्यानंतर अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्टी हिने हाती डफ घेतला आणि ती व इतर स्त्रिया नाचू लागल्या. मिर्याम हे गीत पुन्हा पुन्हा गात होती;
\v 21 मिर्यामने त्यांच्या गाण्याला ध्रुपद धरले.
\q “परमेश्वराला गीत गा; कारण त्याने महान कृत्ये केली आहेत.
\q त्याने घोडा व स्वार यांना समुद्रात फेकून दिले आहे.”
\p
\s5
\v 22 मोशे इस्राएल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे घेऊन गेला. ते लोक शूरच्या रानात गेले; त्यांनी तीन दिवस रानातून प्रवास केला; पण त्यांना पाणी कोठे मिळाले नाही.
\v 23 तीन दिवस प्रवास केल्यानांतर ते लोक मारा नावाच्या ठिकाणी पोहोंचले; तेथे पाणी फार कडू असल्यामुळे लोकांना ते पिववेना, म्हणूनच त्या ठिकाणाचे नांव मारा पडले.
\s5
\v 24 लोक मोशेकडे कुरकुर करीत म्हणाले, “आता आम्ही काय प्यावे?”
\v 25 मोशेने परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने त्याला एक वनस्पति दाखवली. ती त्याने पाण्यात टाकल्यावर तेव्हा ते पाणी गोड झाले. त्यावेळी परमेश्वराने इस्राएल लोकांना विधी व नियम लावून दिला; तसेच त्याने त्यांचा विश्वासाची कसोटी घेतली.
\v 26 तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनःपूर्वक ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे योग्य ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील तर मिसरी लोकांवर ज्या व्याधी मी पाठवल्या त्यापैकी एकही तुजवर पाठविणार नाही. कारण मी तुला व्याधी मुक्त करणारा परमेश्वर आहे.
\p
\s5
\v 27 मग ते एलीम येथे आले; तेथे पाण्याचे बारा झरे होते व सत्तर खजुरीची झाडे होती; तेव्हा लोकांनी तेथे पाण्याजवळ तळ दिला.
\s5
\c 16
\p
\v 1 मग इस्राएली लोकांची मंडळी प्रवास करीत एलीम या ठिकाणाहून निघाले व मिसरमधून निघाल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एलीम व सीनाय यांच्या दरम्यान असलेल्या सीन रानात येऊन पोहचले.
\v 2 त्या रानात इस्राएल लोकांच्या मंडळीने मोशे व अहरोन यांच्यासंबंधी कुरकुर केली;
\v 3 इस्राएल लोक त्यास म्हणू लागले की, “परमेश्वराच्या हातून आम्हाला मिसरामध्येच मरण आले असते तर बरे झाले असते कारण तेथे आम्हास खावयास लागणारे सर्व प्रकारचे अन्न भरपूर होते; परंतु तुम्ही आम्हांस येथे रानात उपासाने मारावे म्हणून आणले आहे.”
\s5
\v 4 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुम्हाला खाण्याकरता मी आकाशातून अन्नवृष्टि करीन; दर दिवशी ह्या लोकांनी आपल्याला त्या दिवसाला पुरेल एवढे अन्न बाहेर जाऊन गोळा करावे. यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात की नाही हे पाहण्यासाठी मी त्यांची परीक्षा करीन.
\v 5 सहाव्या दिवशी जे काही गोळा करून जेवण तयार करतील तेव्हा मात्र ते इतर दिवशी गोळा करतात त्याच्या दुप्पट असावे.”
\s5
\v 6 म्हणून मोशे व अहरोन सर्व इस्राएल लोकांना म्हणाले, “आज संध्याकाळी तुम्ही परमेश्वराचे सामर्थ्य पाहाल; तेव्हा मिसरमधून तुम्हाला वाचविणारा परमेश्वर हाच आहे हे तुम्हाला कळेल.
\v 7 उद्या सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल; तुम्ही परमेश्वराविरुध्द कुरकुर केली त्याने ती ऐकली आहे. आम्ही कोण की तुम्ही आम्हाविरुध्द कुरकुर करावी?”
\v 8 आणि मोशे म्हणाला, “परमेश्वर तुम्हास संध्याकाळी मांस खावयास देईल; आणि सकाळी पोटभर भाकरी देईल; कारण तुम्ही परमेश्वराविरूद्ध कुरकुर करीत आहा ती त्याने ऐकली आहे. आम्ही कोण आहो? तुमचे कुरकुरने आमच्याविरुध्द नाहीतर परमेश्वराविरुध्द आहे.”
\s5
\v 9 मग मोशे अहरोनाला म्हणाला, “तू इस्राएल लोकांच्या मंडळीला सांग की, तुम्ही परमेश्वराकडे एकत्र या कारण त्याने तुमच्या तक्रारी ऐकल्या आहेत.”
\v 10 मग अहरोन सर्व इस्राएल मंडळीशी बोलत असताना सर्व लोकांनी वळून रानाकडे पाहिले; आणि त्यांना मेघात परमेश्वराचे तेज दिसले.
\v 11 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 12 “मी इस्राएल लोकांच्या तक्रारी ऐकल्या आहेत तेव्हा त्यांना सांग, रात्री तुम्ही मांस खाल आणि दररोज सकाळी तुम्हाला पाहिजे तितक्या भाकरी खाल; मग परमेश्वर मी तुमचा देव आहे हे तुम्हाला समजेल.”
\s5
\v 13 त्या संध्याकाळच्या वेळी, तेथे लावे येऊन छावणीभर ते पसरले आणि सकाळी छावणीच्या सभोवती जमिनीवर दंव पडले.
\v 14 सूर्य उगवल्यावर दंव विरून गेले परंतु त्यानंतर जमिनीवर खवल्यासारखे हिमकणाएवढे सूक्ष्म कण पसरलेले दिसले.
\v 15 ते पाहून इस्राएल लोकांनी एकमेकांना विचारले, “हे काय आहे?” कारण ते काय आहे हे त्यांना माहीत नव्हते. तेव्हा मोशेने त्यांना सांगितले, “परमेश्वर हे अन्न तुम्हाला खाण्याकरता देत आहे.
\s5
\v 16 परमेश्वराने आज्ञा केली आहे ती ही आहे की, प्रत्येकाने आपल्याला जेवढ्या अन्नाची गरज आहे तेवढेच गोळा करावे; ज्याच्या तंबूत जेवढी माणसे असतील तेवढ्यासाठी त्याच्या आहाराप्रमाणे प्रत्येकी एकएक ओमर गोळा करावे.”
\v 17 इस्राएल लोकांनी तसे केले, कोणी कमी, कोणी जास्त गोळा केले.
\v 18 त्यांनी ओमरच्या मापाने ते मापून पाहिले; तेव्हा ज्याने अधिक गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही. तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही. प्रत्येकाने आपआपल्या आहाराच्या मानाने ते गोळा केले.
\s5
\v 19 मोशेने लोकांना सांगितले, “कोणीहि यापैकी काहीएक सकाळपर्यंत ठेवू नये.”
\v 20 परंतु लोकांनी मोशेचे ऐकले नाही, काही लोकांनी त्या अन्नातून सकाळपर्यंत ठेवले त्यात किडे पडले व त्याची घाण येऊ लागली. त्यावरून मोशे त्यांच्यावर फार रागावला.
\v 21 दर दिवशी ते लोक आपल्याला पुरेसे अन्न गोळा करीत परंतु उन्हाच्या उष्णतेमुळे ते अन्न वितळून जाई व नाहीसे होई.
\s5
\v 22 सहाव्या दिवशी त्यांनी दुप्पट म्हणजे दर माणशी दोन ओमर गोळा केले. तेव्हा मंडळीचे सर्व पुढारी लोक मोशेकडे आले व त्यांनी हे त्याला कळवले.
\v 23 तो त्यांना म्हणाला, “परमेश्वराचे सांगणे असे आहे की, उद्या विश्रामवार, परमेश्वराचा पवित्र शब्बाथ आहे. तुम्हाला भाजावयाचे भाजा आणि शिजवायचे ते शिजवा आणि जे काही उरेल ते आपल्यासाठी सकाळपर्यंत ठेवावे.”
\s5
\v 24 मोशेने सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते सकाळपर्यंत ठेवले. पण त्याची घाण सुटली नाही किंवा त्यात कोठेही किडे पडले नाहीत.
\v 25 मग मोशे म्हणाला, “ते आज खा, कारण आज परमेश्वराचा शब्बाथ आहे, आज रानांत ते तुम्हास मिळावयाचे नाही.
\s5
\v 26 तुम्ही सहा दिवस ते गोळा करावे परंतु आठवड्याचा सातवा दिवस हा शब्बाथ आहे. त्या दिवशी काही मिळणार नाही.”
\v 27 तरी काही लोक सातव्या दिवशी ते गोळा करावयास बाहेर गेले परंतु त्यांना काहीच मिळाले नाही.
\s5
\v 28 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझ्या आज्ञा व माझे नियम पाळावयास तुम्ही कोठवर नाकारणार?
\v 29 पाहा परमेश्वराने तुम्हास शब्बाथ दिला आहे; म्हणून सहाव्या दिवशी तो तुम्हास तो दोन दिवस पुरेल एवढे अन्न देतो, तेव्हा सातव्या दिवशी आपआपल्या ठिकाणी स्वस्थ असावे, आपले स्थान सोडून कोणीहि बाहेर जाऊ नये.”
\v 30 याप्रमाणे लोकांनी सातव्या दिवशी विसावा घेतला.
\s5
\v 31 इस्राएल लोकांनी त्या अन्नाचे नांव मान्ना ठेवले; ते धण्यासारखे पांढऱ्या असून त्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी होती.
\v 32 मोशे म्हणाला, “परमेश्वराने अशी आज्ञा दिली आहे की ह्यातले एक ओमर पुढील पिढ्यांच्या लोकांसाठी राखून ठेवा. मी तुम्हाला मिसर देशातून काढून नेल्यावर रानात कसे अन्न दिले हे त्यांना समजेल.”
\s5
\v 33 तेव्हा मोशेने अहरोनाला सांगितले, “एक भांडे घे आणि त्यात एक ओमर मान्ना घाल. तो परमेश्वरापुढे सादर करण्यासाठी आपल्या पुढील पिढ्यांसाठी राखून ठेव.”
\v 34 मग परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे अहरोनाने परमेश्वराच्या आज्ञापटापुढे ते भांडे ठेवले.
\v 35 इस्राएल लोक तो मान्ना चाळीस वर्षे, कनान देशाच्या सरहद्दीपर्यंत जाऊन पोहोंचेपर्यंत खात होते.
\v 36 एक ओमर मान्ना म्हणजे “एका एफाचा दहावा भाग” आहे.
\s5
\c 17
\p
\v 1 सर्व इस्राएल लोकांच्या समुदायाने सीनच्या रानातून एकत्र प्रवास करत गेले, परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे ते ठिकठिकाणाहून प्रवास करत रफीदिम येथे गेले आणि त्यांनी तेथे तळ दिला; तेथे त्यांना प्यावयास पाणी मिळेना.
\v 2 तेव्हा इस्राएल लोक मोशेविरूद्ध उठले व त्याच्याशी भांडू लागले. ते म्हणाले, “आम्हाला प्यावयास पाणी दे.” मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही मजशी कां भांडता? तुम्ही परमेश्वराची परीक्षा कां पाहात आहात?”
\v 3 परंतु लोक तहानेने कासावीस झाले होते म्हणून ते मोशेकडे कुरकुर करीतच राहिले; ते म्हणाले, “तू आम्हाला मिसर देशातून बाहेर का आणलेस? आमची मुले, गुरेढोरे यांना पाण्यावाचून मारण्यासाठी तेथून आम्हाला तू येथे आणलेस काय?”
\s5
\v 4 तेव्हा मोशे परमेश्वराकडे धावा करून म्हणाला, “मी ह्या लोकांना काय करु? ते तर मला दगडमार करावयास उठले आहेत.”
\v 5 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांपुढे जा. त्यांच्यापैकी काही वडील माणसे तुजबरोबर घे. नील नदीच्या पाण्यावर तू जी काठी आपटली होतीस ती हाती घेऊन लोकांच्या पुढे चाल.
\v 6 पाहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्यापुढे उभा राहीन, त्या खडकावर ती आपट त्यातून पाणी निघेल. म्हणजे ते हे लोक पितील” मोशेने हे सर्व इस्राएलांच्या वडिलासमोर केले.
\v 7 मोशेने त्या ठिकाणाचे नांव मस्सा (परीक्षा) व मरीबा (कलह) ठेवले; कारण याठिकाणी इस्राएल लोकांनी तेथे कलह केला आणि “परमेश्वर आमच्यामध्ये आहे किंवा नाही” असे म्हणून परमेश्वराची परीक्षा पाहिली.
\s5
\v 8 रफीदिम येथे अमालेकी लोक इस्राएल लोकांवर चालून आले आणि त्यांनी त्यांच्याशी लढाई केली.
\v 9 तेव्हा मोशे यहोशवाला म्हणाला, “काही लोकांना निवड व त्यांना घेऊन उद्या अमालेकांशी लढाई कर; देवाने मला दिलेली काठी हातात घेऊन मी डोंगराच्या माथ्यावर उभा राहीन.”
\v 10 यहोशवाने मोशेची आज्ञा मानली व त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो अमालेकी लोकांविरूद्ध लढावयास गेला त्यावेळी मोशे, अहरोन व हूर हे डोंगराच्या माथ्यावर गेले.
\s5
\v 11 जेव्हा मोशे हात वर करी तेव्हा लढाईत इस्राएलाची सरशी होई; परंतु जेव्हा तो हात खाली करी तेव्हा अमालेकाची सरशी होई.
\v 12 काही वेळाने मोशेचे हात थकून गेले. तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशाच्या खाली ठेविला व तो त्यावर बसला आणि नंतर एका बाजूने अहरोन व दुसऱ्या बाजूने हूर यांनी आधार देऊन मोशेचे हात सूर्य मावळेपर्यंत तसेच वर स्थिर धरून ठेवले.
\v 13 तेव्हा यहोशवाने या लढाईत तलवारीच्या धारेने अमालेकांचा पराभव केला.
\s5
\v 14 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “लढाई विषयीच्या ह्या सर्व गोष्टी एका ग्रंथात लिहून ठेव आणि यहोशवाला सांग. कारण मी अमालेकी लोकांना पृथ्वीतलावरून नक्की पूर्णपणे नष्ट करीन.”
\v 15 मग मोशेने तेथे एक वेदी बांधून तिला याव्हे-निस्सी “परमेश्वर माझे निशाण” असे नांव दिले.
\v 16 आणि तो म्हणाला, “परमेश्वराच्या सिंहासानावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकांशी पिढ्यानपिढ्या युध्द होईल.”
\s5
\c 18
\p
\v 1 देवाने मोशे व इस्राएल लोक यांच्यासाठी जे केले तसेच त्यांना परमेश्वराने मिसर देशातून सोडवून बाहेर आणले यासंबंधी मोशेचा सासरा मिद्यांनी याजक इथ्रो याने ऐकले;
\v 2 मोशेने आपली पत्नी सिप्पोरा पूर्वी परत पाठवली होती, तिला आणि तिच्या दोन पुत्रांला घेऊन मोशेचा सासरा इथ्रो आला;
\v 3 पहिल्या मुलाचे नांव गेर्षोम होते कारण त्याचा जन्म झाला त्यावेळी मोशे म्हणाला होता, “मी या देशात परका आहे.”
\v 4 दुसऱ्या मुलाचे नांव एलियेजर असे होते, कारण तो जन्मला तेव्हा मोशे म्हणाला होता, “माझ्या पित्याच्या देवाने मला मदत केली व मला फारोच्या तलवारीपासून वाचवले.”
\s5
\v 5 तेव्हा इथ्रो रानात देवाच्या पर्वताजवळ जेथे मोशेने तळ दिला होता तेथे त्याची पत्नी सिप्पोरा व त्याची दोन पुत्र घेऊन मोशेकडे आला.
\v 6 त्याने मोशेला निरोप पाठवला, “मी तुझा सासरा, इथ्रो, तुझी पत्नी व तिचे दोन पुत्र यांना घेऊन तुझ्याकडे आलो आहे.”
\s5
\v 7 तेव्हा मोशे आपल्या सासऱ्याला सामोरा गेला; त्याने त्याच्यापुढे लवून त्याला नमन केले, आणि त्याचे चुंबन घेतले. त्या दोघांनी एकमेकांची खुशाली विचारल्यावर ते तंबूत गेले.
\v 8 परमेश्वराने इस्राएली लोकांसाठी फारोचे व मिसरी लोकांचे काय केले, तसेच मिसराहून प्रवास करताना काय काय संकटे आली व कसा त्रास झाला परमेश्वराने त्यांना कसे वाचवले ती सर्व हकिकत मोशेने आपल्या सासऱ्यास सांगितली.
\s5
\v 9 परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या ऐकल्यावर आणि मिसराच्या लोकांपासून परमेश्वराने इस्राएल लोकांना स्वतंत्र केले म्हणून इथ्रोला फार आनंद झाला.
\v 10 इथ्रो म्हणाला, “ज्याने तुम्हास मिसऱ्यांच्या व फारोच्या हातातून सोडवले ज्याने आपल्या प्रजेस मिसऱ्यांच्या तावडीतून स्वतंत्र केले तो परमेश्वर धन्य होय.
\v 11 परमेश्वर सर्व देवांहून श्रेष्ठ आहे हे आता मला कळाले. इस्राएल लोकापेक्षा स्वत:ला श्रेष्ठ मानीत असलेल्या मिसरी लोकांचे त्याने काय केले हे मला समजले.”
\s5
\v 12 मग मोशेचा सासरा इथ्रो याने देवाला होमबली व यज्ञ केले. नंतर अहरोन इस्राएलाच्या सर्व वडिलांसह मोशेचा सासरा इथ्रो यांच्याबरोबर देवासमोर जेवण करावयास आला.
\s5
\v 13 दुसऱ्या दिवशी मोशे लोकांचा न्यायनिवाडा करावयास बसला आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक मोशासमोर उभे होते.
\v 14 मोशेला लोकांसाठी काय काय करतो ते इथ्रोने पाहिले तेव्हा तो म्हणाला, “तू लोकांबरोबर जे हे करतोस ते काय आहे? तू एकटाच बसतोस आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व लोक तुझ्याभोवती उभे राहतात ते कां?”
\s5
\v 15 मोशे आपल्या सासऱ्यास म्हणाला, “देवाचा प्रश्र विचारण्यासाठी लोक माझ्याकडे येतात.
\v 16 लोकांचा काही भांडणतंटा असेल तर ते माझ्याकडे येतात तेव्हा मी त्यांचा आपसांत निवाडा करतो आणि देवाचे नियम व विधी यांचे शिक्षण त्यास देतो.”
\s5
\v 17 परंतु मोशेचा सासरा त्याला म्हणाला, “हे तू करतोस ते चांगले नाही.
\v 18 तुझ्या एकट्यासाठी हे काम फार आहे त्यामुळे तू थकून जातोस व लोकही थकून जातात हे काम तुला एकट्याला करवणार नाही.
\v 19 तर आता माझे ऐक, मी तुला सल्ला देतो, आणि देव तुला मदत करो. या लोकांचा देवाकडे तू मध्यस्थ हो आणि यांची प्रकरणे देवापाशी ने.
\v 20 तू त्यास नियम व विधी यासंबंधी शिक्षण दे; त्यांनी कोणत्या मार्गाने चालावे व कोणते काम करावे त्यांना तू समजावून सांग.
\s5
\v 21 तू लोकांमधून कर्तबगार देवाचे भय धरणारे, व विश्वासू, सत्यप्रिय, अन्याय न करणारे असे लोक निवडून घे; त्यांना हजार लोकांवर, शंभर लोकावर, पन्नास लोकावर आणि दहा लोकांवर नायक म्हणून नेम.
\v 22 ह्या नायक लोकांनी लोकांचा न्यायनिवाडा करावा; जर अगदी महत्वाची बाब असेल तर तिचा न्यायनिवाडा करण्याकरता तो वाद नायकांनी तुझ्याकडे आणावा, परंतु लहानसहान प्रकरणांसंबंधी त्यांनी स्वत: निर्णय द्यावेत. अशाप्रकारे तुझे काम सोपे होईल तसेच तुझ्या कामात ते वाटेकरी होतील.
\v 23 तू असे करशील व देव तुला आज्ञा देईल तर तू टिकशील, आणि हे सर्व लोक शांतीने आपल्या ठिकाणास पोहचतील.”
\s5
\v 24 तेव्हा मोशेने इथ्रोच्या म्हणण्याप्रमाणे केले.
\v 25 मोशेने इस्राएल लोकांतून चांगले लोक निवडले आणि त्यांना हजार हजार, शंभर शंभर पन्नास पन्नास व दहा दहावर नायक म्हणून नेमले.
\v 26 ते लोकांवर न्यायाधीश झाले. लोक सतत नायकाकडे आपली गाऱ्हाणी आणू लागले व मोशेला फार महत्वाच्या प्रकरणांबद्दलच निकाल देण्याचे काम करावे लागे.
\v 27 मग थोड्याच दिवसानी मोशेने आपला सासरा इथ्रो याला निरोप दिला आणि इथ्रो माघारी आपल्या घरी गेला.
\s5
\c 19
\p
\v 1 मिसरामधून प्रवासास निघाल्यानंतर तिसऱ्या महिन्यात इस्राएल लोक सीनायच्या रानात येऊन पोहोंचले.
\v 2 ते लोक रफीदिम सोडून सीनायच्या रानात आले होते; इस्राएल लोकांनी पर्वतासमोर आपला तळ दिला.
\s5
\v 3 तेव्हा मोशे पर्वत चढून देवाकडे गेला. परमेश्वराने त्याला पर्वतावरून हाक मारून सांगितले की, “तू याकोबाच्या वंशजांना हे सांग, इस्राएल लोकांना हे सांग.
\v 4 मिसऱ्यांचे मी काय केले आणि तुम्हाला गरुडाच्या पंखावर उचलून घेऊन माझ्याजवळ कसे आणले हे तुम्ही पाहिले आहे.
\v 5 म्हणून मी आता तुम्हाला सांगतो की तुम्ही माझी वाणी खरोखर ऐकाल आणि माझ्या कराराचे पालन कराल, तर सर्व लोकांमध्ये माझा खास निधी व्हाल. सर्व पृथ्वी माझी आहे.
\v 6 तुम्ही मला, याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. तू इस्राएल लोकांस हेच सांग.”
\s5
\v 7 मोशेने येऊन लोकांच्या वडिलांस एकत्र बोलावले; परमेश्वराने त्याला जी वचने सांगण्याची आज्ञा होती ती सर्व त्याने त्यांच्यापुढे सांगितली.
\v 8 आणि सर्व लोक मिळून म्हणाले, “परमेश्वराने सांगितलेले सर्व आम्ही करू.” मोशेने परमेश्वराला लोकांचे म्हणणे सांगितले.
\v 9 आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी दाट ढगात तुजजवळ येऊन तुझ्याशी बोलेन आणि माझे तुझ्याबरोबरचे बोलणे सर्व लोकांना ऐकू जाईल;” त्यांचा नेहमी तुझ्यावरही विश्वास बसेल मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले.
\s5
\v 10 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू जाऊन आज आणि उद्या लोकांना पवित्र कर; त्यांनी आपले कपडे स्वच्छ धुवावेत.
\v 11 तिसऱ्या दिवशी त्यांनी तयार रहावे कारण तिसऱ्या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सीनाय पर्वतावर उतरेल.
\s5
\v 12 परंतु लोकांसाठी तेथे सीमारेषा आखून लोकांनी ती ओलांडू नये त्यांना बजावून सांग; पर्वतावर कोणीही चढू नये जो कोणी पर्वताला स्पर्श करील तो खास आपल्या जिवास मुकेल.
\v 13 कोणीही त्याला हात लावू नये. हात लावला तर त्याला दगडमार करावा किंवा बाणांनी विंधावे, तो पशु असो किंवा मनुष्य असो, त्याला जीवंत ठेवू नये. शिंगाचा दीर्घ आवाज होईल तेव्हा लोकांनी पर्वताजवळ यावे.”
\s5
\v 14 मग मोशे पर्वतावरून खाली उतरला; तो लोकांकडे गेला व देवाच्या भेटीसाठी त्याने त्यांना पवित्र केले. लोकांनी आपले कपडे धुवून स्वच्छ केले.
\v 15 मग मोशे लोकांना म्हणाला, “तीन दिवस तुम्ही देवाची भेट घेण्यासाठी तयार राहा. तोपर्यंत स्त्रीस्पर्श करू नका.”
\s5
\v 16 तिसरा दिवस उजडताच मेघगर्जना झाली व विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग आले आणि प्रचंड शिंगाचा फार आवाज होऊ लागला. तेव्हा छावणीत राहणारे सर्व लोक थरथर कांपू लागले.
\v 17 नंतर मोशाने लोकांना छावणीतून बाहेर काढून देवाच्या दर्शनाला बाहेर आणले आणि ते पर्वताच्या तळाजवळ उभे राहिले.
\v 18 परमेश्वर सीनाय पर्वतावर अग्नीतून उत्तरला म्हणून तो सर्व धुराने झाकून गेला. भट्टीतून येणाऱ्या धुरासारखा त्याचा धूर वर आला. आणि सर्व पर्वत थरथरू लागला.
\s5
\v 19 शिंगाचा आवाज मोठमोठा होऊ लागला. तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्याला आपल्या वाणीने उत्तर देत गेला.
\v 20 परमेश्वराने पर्वताच्या शिखरावर उतरून मोशेला सीनाय पर्वताच्या शिखरावर बोलावले. तेव्हा तो पर्वतावर गेला.
\v 21 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू खाली जा आणि लोकांना बजावून सांग की त्यांनी मर्यादा ओलांडून परमेश्वर काय आहे ते पाहण्यास तिकडे येऊ नये. जर ते तसे करतील तर बरेच जण मरतील.
\v 22 तसेच परमेश्वराजवळ येणाऱ्या याजकांनीही पवित्र व्हावे; नाहीतर परमेश्वर त्यांना शिक्षा करीन.”
\s5
\v 23 मोशेने परमेश्वराला सांगितले, “लोक सीनाय पर्वतावर येऊ शकणार नाहीत, कारण तूच स्वत: आम्हाला मर्यादा घालून दिली व सक्त ताकीद दिली व तो अधिक पवित्र करण्यास सांगितले.”
\v 24 परमेश्वर त्याला म्हणाला, “तू खाली लोकांकडे जा व मागे येताना अहरोनाला तुझ्याबरोबर परत आण, परंतु याजक किंवा इतर लोकांना इकडे येऊ देऊ नको; ते जर माझ्याजवळ येतील तर मी त्यांना शिक्षा करीन.”
\v 25 मग मोशाने खाली जाऊन लोकांना हे सांगितले.
\s5
\c 20
\p
\v 1 देवाने ही सर्व वचने सांगितली,
\v 2 मी परमेश्वर तुझा देव आहे. ज्याने तुला मिसर देशातून, गुलामगिरीतून सोडवून आणले.
\v 3 माझ्यासमोर तुला इतर कोणतेही दुसरे देव नसावेत.
\s5
\v 4 तू आपल्यासाठी कोरीव मूर्ति करु नकोस; वर आकाशांतील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलांतील कशाचीही प्रतिमा करु नकोस;
\v 5 त्यांची सेवा करू नको; किंवा त्यांच्या पाया पडू नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव ईर्ष्यावान देव आहे. जे माझा विरोध करतात, त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो;
\v 6 परंतु जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो.
\s5
\v 7 तुझा देव परमेश्वर याचे नांव तू व्यर्थ घेऊ नकोस; कारण जो परमेश्वराचे नांव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही.
\s5
\v 8 शब्बाथ दिवस हा पवित्र दिवस म्हणून पाळण्याची आठवण ठेव;
\v 9 सहा दिवस श्रम करून तू तुझे कामकाज करावेस;
\v 10 परंतु सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्बाथ आहे, म्हणून त्यादिवशी तू, तुझा पुत्र, तुझी कन्या, तुझे दास व दासी यांनी तसेच तुझे पशु, किंवा व तुझ्या वेशीत राहणाऱ्या परकीयांनीही कोणतेही कामकाज करु नये;
\v 11 कारण परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्वकाही उत्पन्न केले आणि त्यानंतर सातव्या दिवशी विसावा घेतला; या प्रमाणे परमेश्वराने शब्बाथ दिवस हा आशीर्वाद देऊन तो पवित्र केला आहे.
\s5
\v 12 आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तू चिरकाळ राहशील.
\v 13 खून करू नकोस.
\v 14 व्यभिचार करू नकोस.
\s5
\v 15 चोरी करू नकोस.
\v 16 आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देऊ नकोस.
\v 17 “तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरु नकोस; आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीचा लोभ धरु नकोस; आपल्या शेजाऱ्याचा दासदासी, बैल, गाढव, किंवा त्याच्या कोणत्याही वस्तूचा लोभ धरु नकोस.”
\s5
\v 18 लोकांनी पर्वतावरील ढगांचा गडगडाट ऐकला, विजांचा चकचकाट पाहिला, शिंगाचा नाद होत आहे व पर्वतातून धूर वर चढताना पाहून भीतीने त्यांचा थरकाप झाला. ते दूर उभे राहिले.
\v 19 ते मोशेला म्हणू लागले आम्हाशी तूच बोल, आम्ही ऐकू; देव आम्हाशी न बोलो, तो बोलेल तर आम्ही मरुन जाऊ.
\v 20 मग मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका, कारण तुमची परीक्षा करावी आणि त्याचे भय तुमच्या डोळ्यांपुढे राहून तुम्ही पाप करू नये यासाठी देव आला आहे.”
\v 21 मोशे, ढगांच्या दाट अंधारात, जेथे देव होता तेथे गेला, तोपर्यंत लोक पर्वतापासून लांब उभे राहिले.
\s5
\v 22 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांना असे सांग, मी तुमच्याशी आकाशातून बोललो हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे.
\v 23 माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका आपल्यासाठी सोन्यारुप्याचे देव करू नका.”
\s5
\v 24 माझ्यासाठी मातीची वेदी बांधा आणि तिजवर तुझी मेंढरे व तुझे बैल यांचे होमार्पणे व शांत्यर्पणे वाहा; जेथे जेथे मी माझ्या नावाची आठवण व्हावी म्हणून मी सांगतो तेथे तेथे मी येऊन तुम्हाला आशीर्वाद देईन.
\v 25 तुम्ही जर दगडाची वेदी बांधणार असाल तर ती घडलेल्या चिऱ्याची नसावी; कारण तुम्ही आपले हत्यार दगडाला लावल्यास तो भ्रष्ट होईल.
\v 26 तुझ्या शरीराची नग्नता माझ्या वेदीवर दिसून येऊ नये म्हणून तू पायऱ्यांनी चढता कामा नये.
\s5
\c 21
\p
\v 1 आता जे इतर नियम तू इस्राएल लोकांना लावून द्यावेत ते हेचः
\s5
\v 2 तुम्ही जर एखादा इब्री गुलाम विकत घेतला तर त्याने फक्त सहा वर्षे काम करावे; सातव्या वर्षी तो काही भरपाई न घेता त्यास मुक्त होऊन जावे.
\v 3 जर तो एकटाच आला असेल तर त्याने मुक्त होताना एकटेच निघून जावे; परंतु जर तो त्याची पत्नी घेऊन आला असेल तर त्याने त्याच्या पत्नीला घेऊन जावे.
\v 4 जर तो एकटा आला असेल तर त्याच्या मालकाने त्याला पत्नी करून द्यावी; तिला पुत्र किंवा कन्या झाल्या असतील तर ती व तिची मुले मालकाची राहतील; त्याने एकट्यानेच जावे.
\s5
\v 5 पण जर तो आपल्या मालकाबरोबर राहण्याचे स्पष्ट करतो तर मग मी माझ्या मालकावर व माझ्या पत्नीमुलांवर प्रेम करतो, मी मुक्त होऊ इच्छित नाही.
\v 6 तर त्याच्या मालकाने त्याला देवासमोर अथवा त्याला दाराच्या चौकटीजवळ उभे करावे व अरीने त्याचा कान टोचावा. मग तो त्याची आयुष्यभर चाकरी करील.
\s5
\v 7 कोणी आपली कन्या गुलाम म्हणून विकली तर ती गुलामाप्रमाणे मुक्त होऊन जाता कामा नये.
\v 8 तिचा मालक तिला आपली स्त्री करून घेणार असून पुढे तिच्यावरून त्याची मर्जी उडाली तर त्याने खंड घेऊन तिची मुक्तता करावी. तिजशी त्याने कपट केल्यामुळे परक्या लोकांस तिला कन्येप्रमाणे वागवावे.
\s5
\v 9 तिला आपल्या पुत्रासाठी ठेवून घ्यावयाचे असेल तर त्याने तिला कन्येप्रमाणे वागवावे.
\v 10 त्याने दुसऱ्या स्त्रीशी लग्न केले तरी त्याने पहिल्या पत्नीस अन्नवस्त्र कमी पडू देऊ नये.
\v 11 ह्या तीन गोष्टी त्याने तिच्यासाठी केल्या नाहीत तर मग ती त्याला काही खंडणी न देता मुक्त होईल;
\s5
\v 12 कोणी एखाद्याला मारले व त्यामुळे तो मेला तर त्याला अवश्य जिवे मारावे.
\v 13 अपघाताने एखाद्याच्या हातून कोणी मेले तर देवाने त्याला त्याच्या हाती दिले तर पळून जाण्यासाठी मी तुला एक स्थान नेमून देईल.
\v 14 परंतु जर कोणी एकाने जाणूनबुजून व ठरवून रागाने किंवा द्वेषाने दुसऱ्या माणसाला ठार मारले तर मात्र त्याला शिक्षा करावी; त्याला वेदीपासून खेचून आणून ठार मारावे.
\s5
\v 15 कोणी आपल्या पित्यास किंवा आईस मारहाण करील त्याला अवश्य ठार मारावे.
\v 16 जो कोणी एखाद्याला चोरून नेऊन विकेल किंवा त्याच्याकडे तो सापडेल तर त्याला अवश्य जिवे मारावे.
\v 17 जो कोणी आपल्या पित्याला किंवा आईला शिव्याशाप देईल त्या माणसाला अवश्य जिवे मारावे.
\s5
\v 18 दोघेजण भांडत असताना एकाने दुसऱ्याला दगड किंवा ठोसा मारला आणि त्यामुळे तो मेला नाही, पण त्याला अंथरूणात पडून रहावे लागले,
\v 19 तर मारणाऱ्याने त्याला त्याच्या वाया गेलेल्या वेळेबद्दल नुकसान भरपाई द्यावी व तो माणूस बरा होईपर्यंत त्याच्यासाठी लागणारा खर्च द्यावा.
\s5
\v 20 काही वेळा लोक आपल्या गुलामाला किंवा गुलाम स्त्रीला छडीने मारहाण करतात त्यामुळे जर तो गुलाम किंवा ती गुलाम स्त्री मेली तर त्यांना मारणाऱ्याला अवश्य शिक्षा करावी;
\v 21 पण तो एकदोन दिवस जिवंत राहिला तर मालकास शिक्षा होणार नाही कारण तो त्याचेच धन आहे.
\s5
\v 22 दोघे जर मारामारी करीत असतील व त्यांचा धक्का एखाद्या गरोदर बाईला लागला आणि त्या बाईचा गर्भपात झाला पण तिला इतर कोणतीही इजा झाली नाहीतर ज्याचा धक्का तिला लागला तिचा नवरा न्यायाधीशांच्या सल्ल्याने जो दंड ठरवील तो दंड त्याने द्यावा.
\v 23 पण दुसरी काही जास्त इजा झाल्यास जिवाबद्दल जीव.
\v 24 डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय,
\v 25 चटक्याबद्दल चटका, ओरखड्याबद्दल ओरखडा, व जखमेबद्दल जखम असा बदला घ्यावा.
\s5
\v 26 जर एखाद्याने आपल्या गुलामाच्या किंवा गुलाम स्त्रीच्या डोळ्यावर मारल्यामुळे त्याचा किंवा तिचा डोळा गेला तर त्याने त्याला मुक्त करावे.
\v 27 एखाद्या मालकाने आपल्या पुरुष दासाच्या किंवा स्त्री दासीच्या तोंडावर मारल्यामुळे त्याचा किंवा तिचा दात पडला तर त्याने त्याला दास्यमुक्त करून जाऊ द्यावे
\s5
\v 28 एखाद्याच्या बैलाने एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला हुंदडून जिवे मारले तर त्या बैलास दगडमार करून जिवे मारावे, त्या बैलाचे मांस कोणी खाऊ नये, परंतु त्या बैलाचा मालकास सोडून द्यावे.
\v 29 परंतु त्या बैलाला हुंदडण्याची सवयच असली आणि त्याविषयी त्याच्या मालकाला सूचना केली असूनही त्याने त्या बैलाला बांधून ठेवले नाही आणि त्यानंतर कोणा पुरुषांस किंवा स्त्रीस जिवे मारले तर त्याबद्दल त्याचा मालक दोषी आहे, त्या बैलाला धोंडमार करून जिवे मारावे व त्याच्या मालकासही जिवे मारावे.
\v 30 त्याच्याकडून खंडणी मागितल्यास त्याने आपला प्राण वाचविण्यासाठी आपल्यावर लादलेली खंडणी देऊन टाकावी.
\s5
\v 31 बैलाने एखाद्याच्या पुत्राला किंवा कन्येला हुंदडून जिवे मारले तर त्याबाबतीत हाच नियम लागू करावा.
\v 32 एखाद्या बैलाने जर कोणाच्या पुरुष दासाला किंवा स्त्री दासीला हुंदडून ठार मारले तर त्या बैलाच्या मालकाने त्याच्या मालकाला रुप्याची तीस नाणी द्यावी आणि त्या बैलालाही दगडमार करावा;
\s5
\v 33 एखाद्या मनुष्याने बुजलेला खड्डा उकरिला किंवा त्याने खड्डा खणून त्यावर झाकण ठेवले नसेल आणि जर कोणाचा बैल, गाढव वगैरे त्या खड्डयात पडून मेले तर खड्ड्याचा मालक दोषी आहे;
\v 34 त्याने त्या जनावराच्या मालकाला भरपाई म्हणून त्याची किंमत द्यावी आणि ते मेलेले जनावर खड्ड्याच्या मालकीचे आहे.
\s5
\v 35 जर एखाद्याच्या बैलाने दुसऱ्याच्या बैलाला हुंदडून मारून टाकले तर जिवंत राहिलेला बैल विकून आलेले पैसे दोघा मालकांनी विभागून घ्यावेत आणि मेलेला बैलही विभागून घ्यावा.
\v 36 परंतु तो बैल पूर्वीपासून मारका आहे हे ठाऊक असून मालकाने त्यास बांधून ठेवले नाहीतर त्याने बैलाबद्दल बैल द्यावा व मेलेला बैल त्याचा व्हावा.
\s5
\c 22
\p
\v 1 एखाद्याने बैल किंवा मेंढरू चोरुन ते कापले किंवा विकून टाकले तर त्याने एका बैलाबद्दल पाच बैल व एका मेंढराबद्दल चार मेंढरे द्यावीत.
\v 2 चोर घर फोडीत असता सापडला व जिवे जाईपर्यंत मार बसला तर त्याच्या खुनाचा दोष कोणावर येणार नाही.
\v 3 परंतु तो चोरी करत असता सूर्योदय झाला तर मारण्यावर खुनाचा दोष येईल. चोराने नुकसान अवश्य भरून द्यावे. त्याच्याजवळ काही नसेल तर चोरीच्या भरपाईसाठी त्याची विक्री करावी.
\v 4 चोरलेला बैल, गाढव, मेंढरू वगैरे चोराच्या हाती जिवंत सापडले तर त्याने एकेकाबद्दल दुप्पट परत द्यावी.
\s5
\v 5 कोणी आपले जनावर मोकळे सोडले ते दुसऱ्याच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात जाऊन चरले व खाल्ले तर आपल्या शेतातील किंवा द्राक्षमळ्यातील चांगल्यात चांगल्या पिकातून त्याने त्याचे नुकसान भरून द्यावे.
\s5
\v 6 जर कोणी काटेकुटे जाळण्यासाठी आग पेटवली व ती भडकल्यामुळे धान्याच्या सुड्या किंवा उभे पीक जळाले तर आग पेटवणाऱ्याने नुकसान भरून दिलेच पाहिजे.
\s5
\v 7 कोणी शेजाऱ्याकडे आपला पैसा किंवा काही वस्तू ठेवण्यासाठी दिल्या आणि जर ते सर्व त्याच्या घरातून चोरीस गेले, तर चोर सापडला तर त्याच्या दुप्पट चोराने किंमत भरून द्यावी.
\v 8 परंतु जर चोर सापडला नाही तर घरमालकाला देवासमोर घेऊन जावे म्हणजे मग त्याने स्वतः त्या वस्तूला हात लावला की नाही त्याचा न्याय होईल.
\v 9 जर हरवलेला एखादा बैल, किंवा एखादे गाढव किंवा मेंढरू किंवा वस्त्र यांच्यासंबंधी दोन माणसात वाद उत्पन्न झाला, तर ती माझी आहे अशी कोणी तक्रार केली तर त्या हक्क सांगणाऱ्या दोन्ही पक्ष्याला देवासमोर यावे; ज्याला देव दोषी ठरवील त्याने आपल्या शेजाऱ्याला तिच्याबद्दल दुप्पट बदला द्यावा.
\s5
\v 10 एखाद्याने आपले गाढव, बैल, किंवा मेंढरू थोडे दिवस सांभाळण्याकरता आपल्या शेजाऱ्याकडे दिले परंतु ते जर मेले, किंवा जखमी झाले किंवा कोणी पाहत नसताना पकडून नेले.
\v 11 तर त्या दोघांमध्ये परमेश्वराची शपथ व्हावी. आपण शेजाऱ्याच्या मालमत्तेला हात लावला नाही असे सांगितले तर त्या जनावराच्या मालकाने त्याच्या शपथेवर विश्वास ठेवावा; मग त्या शेजाऱ्याला जनावराची किंमत भरून द्यावी लागणार नाही.
\v 12 त्याच्यापासून खरोखर ते चोरीस गेले असेल तर त्याची किंमत मालकाला भरून द्यावी.
\v 13 जर ते जनावर कोणी मारून टाकले असेल तर ते पुराव्यादाखल आणून दाखवावे म्हणजे त्याला भरपाई भरून द्यावी लागणार नाही.
\s5
\v 14 जर कोणी आपल्या शेजाऱ्याकडून त्याचे जनावर मागून घेतले मालक तेथे हजर नसताना त्या जनावराला जर इजा झाली किंवा ते मेले तर त्या मालकाला त्याची किंमत अवश्य भरून द्यावी;
\v 15 जर त्यावेळी तेथे जनावराजवळ मालक असेल तर मग भरपाई करावी लागणार नाही; किंवा ते जनावर भाड्याने घेतले असले तर त्याचे नुकसान भाड्यातच आले आहे.
\s5
\v 16 आणि मागणी झाली नाही अशा कुमारीकेला फसवून जर कोणी तिला भ्रष्ट केले तर त्याने पूर्ण देज देऊन तिच्याशी लग्न केलेच पाहिजे;
\v 17 तिच्या पित्याने त्याला ती देण्यास नकार दिला तर भ्रष्ट करणाऱ्याने तिच्या पित्याला कुमारीकेच्या रीतीप्रमाणे पैसा तोलून द्यावा.
\s5
\v 18 कोणत्याही चेटकिणीला जिवंत ठेवू नये.
\v 19 पशुगमन करणाऱ्यास अवश्य जिवे मारावे.
\s5
\v 20 परमेश्वराशिवाय दुसऱ्या दैवतांना बलि करणाऱ्या अवश्य जिवे मारावे.
\v 21 उपऱ्याचा छळ करु नये किंवा त्याच्यावर जुलूम करू नको. कारण मिसर देशात तुम्हीही उपरी होता.
\s5
\v 22 विधवा किंवा अनाथ यांना तुम्ही जाचू नका
\v 23 तुम्ही त्यांना कोणत्याही रीतीने जाचशील आणि ती मला हाक मारतील तर मी त्यांचे ओरडणे अवश्य ऐकेन;
\v 24 व माझा राग तुम्हावर भडकेल व मी तुम्हाला तलवारीने मारून टाकीन म्हणजे तुमच्या स्रिया विधवा व तुमची मुले पोरकी होतील.
\s5
\v 25 तुझ्याजवळ राहणाऱ्या माझ्या एखाद्या गरीब माणसाला तुम्ही उसने पैसे दिले तर त्याबद्दल तुम्ही व्याज आकारु नये.
\v 26 तू आपल्या शेजाऱ्याचे पांघरून तुझ्याजवळ गहाण ठेवून घेतले तर सूर्य मावळण्याआधी तू त्याचे पांघरुन त्याला परत करावे;
\v 27 कारण त्याचे अंग झाकायला तेवढेच असणार. ते घेतले तर तो काय पांघरून निजेल? त्याने गाऱ्हाणे केले तर मी त्याचे एकेन, कारण मी करुणामय आहे.
\s5
\v 28 तू आपल्या देवाची निंदा करू नको किंवा तुझ्या लोकांच्या राज्यकर्त्याला शाप देऊ नको.
\s5
\v 29 आपल्या हंगामातले व आपल्या फळांच्या रसातले मला अर्पण करण्यास हयगय करू नको. तुझा प्रथम जन्मलेला पुत्र मला द्यावा;
\v 30 तसेच प्रथम जन्मलेले बैल व मेंढरे, यांना जन्मल्यापासून सात दिवस त्यांच्या आईजवळ ठेवावे व आठव्या दिवशी ते मला द्यावेत.
\v 31 तुम्ही माझे पवित्र लोक आहात म्हणून फाडून टाकलेल्या पशूंचे मांस तुम्ही खाऊ नये; ते कुत्र्यांना घालावे.
\s5
\c 23
\p
\v 1 खोटी अफवा पसरवू नको; दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नको.
\v 2 दुष्टाई करण्याकरता पुष्कळ जणांना तू अनुसरू नको, आणि तू पुष्कळ जणांच्या मागे लागून वादात न्याय विपरीत करण्यास बोलू नको.
\v 3 एखाद्या गरीब माणसाचा न्याय होताना, त्याची बाजू खरी असल्याशिवाय त्याचा पक्ष घेऊ नको.
\s5
\v 4 आपल्या शत्रूचा हरवलेला बैल किंवा एखादे गाढव मोकाट फिरताना दिसले तर त्याला वळवून ते त्याच्याकडे नेऊन सोडावे.
\v 5 तुझ्या शत्रूचे गाढव जास्त ओझ्याखाली दबून पडलेले दिसले तर तू त्याला सोडून जाऊ नको, तू अवश्य त्याच्याबरोबर राहून ते सोडीव.
\s5
\v 6 तू आपल्या गरीबाच्या वादात त्याचा योग्य न्याय विपरीत होऊ देऊ नका;
\v 7 कोणावरही खोटे दोषारोप करु नका; एखाद्या निष्पाप वा निरपराधी ह्यांचा वध करू नको. कारण दुष्टाला मी नीतिमान ठरवणार नाही.
\v 8 लाच देण्याचा प्रयत्न करील, तर ती तुम्ही मुळीच घेऊ नये; लाच घेऊ नको कारण लाच डोळसास आंधळे करते; आणि नीतिमानांच्या म्हणण्याचा विपरीत न्याय करते.
\v 9 परक्यांना कधीही छळू नका; कारण त्याच्या मनोभावनेची तुम्हाला चांगली माहीती आहे कारण तुम्ही देखील एकेकाळी मिसर देशात परके होता.
\s5
\v 10 सहा वर्षे आपल्या जमिनीची पेरणी कर; आणि तिचे उत्पन्न साठीव.
\v 11 परंतु सातव्या वर्षी जमीन पडीत राहू दे. त्यावर्षी शेतात काहीही पेरू नये. जर शेतात काही उगवले तर ते गरीबांना घेऊ द्या; व राहिलेले वनपशूंना खाऊ द्या; तुमचे द्राक्षमळे व जैतूनाची बने यांच्या बाबतीतही असेच करावे.
\s5
\v 12 तुम्ही सहा दिवस काम करावे, व सातव्या दिवशी विसावा घ्यावा; त्यामुळे तुमच्या गुलामांना व इतर उपऱ्यांनाही विसावा मिळेल व त्यांना ताजेतवाने वाटेल; तुमच्या बैलांना व गाढवानांही विसावा मिळेल.
\v 13 मी जे काही सांगितले ते सर्व नियम कटाक्षाने पाळावेत; इतर देवांचे नांव देखील घेऊ नका; ते तुमच्या तोंडाने उच्चारू नका.
\s5
\v 14 वर्षातून तीनदा तू माझ्यासाठी उत्सव करून सण पाळ.
\v 15 बेखमीर भाकरीचा सण पाळ; त्यात सात दिवस खमीर न घातलेली भाकर तुम्ही खावी; हा सण तुम्ही अबीब महिन्यात पाळावा, कारण याच महिन्यात तुम्ही मिसरमधून बाहेर निघून आला; कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये.
\s5
\v 16 शेतात पेरलेल्या पहिल्या पिकाच्या कापणीचा सण पाळावा. वर्षाच्या अखेरीस तू आपल्या श्रमाच्या फळांचा संग्रह करिशील तेव्हा संग्रहाचा सण पाळावा.
\v 17 वर्षातून तीनदा तुझ्या सर्व पुरुषांनी प्रभू परमेश्वरासमोर यावे.
\s5
\v 18 तुम्ही यज्ञपशूचे रक्त मला अर्पण करावयाचे वेळी खमीर घातलेल्या भाकरीसोबत अर्पण करु नये; आणि मला अर्पण केलेल्या यज्ञपशूची चरबी दुसऱ्या दिवसापर्यंत राहू देऊ नये.
\v 19 आपल्या जमिनीच्या प्रथम उपजातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधांत शिजवू नये.
\s5
\v 20 पाहा, वाटेने तुला सांभाळण्याकरता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोचविण्याकरता मी एक दूत तुझ्यापुढे पाठवत आहे.
\v 21 त्याच्यासमोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक, आज्ञा पाळा आणि त्यांच्यामागे चाला; त्याच्याविरुध्द बंड करु नका. कारण तो तुम्हाला क्षमा करणार नाही; कारण त्याच्या ठायी माझे नांव आहे.
\v 22 जर तू त्याची वाणी खरोखर ऐकशील व मी सांगतो ते सर्व तुम्ही केले तर मी तुम्हाबरोबर राहीन; मी तुमच्या सर्व शंत्रूचा शत्रू व विरोधकांचा विरोधक होईन.
\s5
\v 23 देव म्हणाला, माझा दूत तुमच्यापुढे चालून, अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबूसी ह्या लोकांकडे तुला नेईल आणि मी त्यांचा नाश करीन.
\v 24 परंतु या सर्व लोकांच्या देवाला तू नमन करू नये; त्यांची सेवा करू नये, त्यांना जमीनदोस्त करावे; आणि त्यांच्या स्तंभाचे तुकडे तुकडे करावे.
\v 25 तुम्ही आपला देव परमेश्वर याचीच उपासना करावी; म्हणजे तू त्याच्या अन्नपाण्यास बरकत देईल. मी तुमच्यामधून रोगराई दूर करीन.
\s5
\v 26 तुमच्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही आणि कोणीही वांझ असणार नाही; मी तुम्हाला दीर्घायुषी करीन.
\v 27 ज्या ज्या लोकांच्या विरूद्ध तू जाशील त्यांना मी आधीच दहशत घालून त्यांची फसगत करीन. आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुला पाठ दाखवयास लावीन.
\v 28 मी तुमच्यापुढे गांधीलमाशा पाठवीन; त्या हिव्वी, कनानी, व हित्ती ह्याना तुझ्यापुढून पळावयास लावतील.
\v 29 मी त्यांना एका वर्षातच घालवून देणार नाही; कारण मी तसे केले तर देश एकदम ओस पडेल आणि मग वनपशूंची वाढ होऊन ते तुम्हाला त्रास देतील.
\s5
\v 30 तुमची संख्या वाढून तू देशाचा ताबा घेशील तोपर्यंत मी हळूहळू तुझ्यापुढून त्यांना घालवून देईन.
\v 31 “मी तुम्हाला तांबड्या समुद्रापासून पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत आणि रानापासून ते फरात नदीपर्यंत मी तुझ्या देशाची सीमा करीन. मी तुम्हाला तेथे राहणाऱ्या लोकांना तुमच्या हाती देईल व तुम्ही त्या सर्वाना तेथून घालवून द्याल.
\v 32 तू त्याच्याशी किंवा त्यांच्या देवांशी कोणताही करार करू नको.
\v 33 तुम्ही त्यांना तुमच्या देशात राहू देऊ नका; तुम्ही जर त्यांना तुमच्यात राहू द्याल तर ते पुढे तुम्हाला सापळ्यासारखे अडकविणारे होतील ते तुम्हाला माझ्याविरूद्ध पाप करावयास लावतील व तुम्ही त्यांच्या देवांची उपासना करण्यास सुरवात कराल.”
\s5
\c 24
\p
\v 1 मग तो मोशेला म्हणाला, “तू, अहरोन, नादाब, अबीहू आणि इस्राएलांच्या वडिलापैकी सत्तरजण असे मिळून परमेश्वराकडे पर्वतावर चढून येऊन त्याला दुरुनच नमन करा;
\v 2 मग मोशे एकट्यानेच परमेश्वराजवळ यावे; इतरांनी जवळ येऊ नये, आणि इतर लोकांनी तर पर्वत चढून वरही येऊ नये.”
\s5
\v 3 मोशेने लोकांना परमेश्वराचे सर्व नियम व आज्ञा सांगितल्या; मग सर्व लोक एका आवाजात म्हणाले, “परमेश्वराने जी वचने सांगितलेली त्या सर्वाप्रमाणे आम्ही करू.”
\v 4 तेव्हा मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली आणि पहाटेस उठून मोशेने पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली व त्याने इस्राएलाच्या बारा वंशाप्रमाणे बारा स्तंभ उभे केले.
\s5
\v 5 मग मोशेने इस्राएल लोकांपैकी काही तरुणांना परमेश्वराला होमबली व बैलाची शांत्यर्पणे अर्पण करण्यास पाठवले.
\v 6 मोशेने त्या अर्पणातून अर्धे रक्त घेऊन कटोऱ्यात ठेवले आणि अर्धे रक्त त्याने वेदीवर शिंपडले.
\s5
\v 7 मग मोशेने कराराचे पुस्तक घेऊन लोकांना वाचून दाखविले आणि ते ऐकून लोक म्हणाले, “परमेश्वराने सांगितले आहे तसे करू आणि त्याने दिलेल्या आज्ञा आम्ही पाळू.”
\v 8 मग मोशेने रक्त घेऊन व लोकांवर शिंपडले, तो म्हणाला, “परमेश्वराने तुमच्याशी ह्या वचनाप्रमाणे करार केला आहे असे हे त्याचे रक्त आहे.”
\s5
\v 9 नंतर मोशे, अहरोन, नादाब, अबीहू व इस्राएल लोकांमधील सत्तर वडीलधारी माणसे पर्वतावर चढून गेले.
\v 10 तेथे त्यांनी इस्राएलाच्या देवाला पाहिले; इंद्रनीलमण्यांच्या चौथऱ्यासारखे तेथे काही होते, ते आकाशाप्रमाणे स्वच्छ होते
\v 11 इस्राएलातील वडिलधाऱ्या माणसांनी देवाला पाहिले परंतु त्याने त्यांचा नाश केला नाही. मग त्यांनी तेथे एकत्र खाणेपिणे केले.
\s5
\v 12 परमेश्वर मोशेला म्हणाला, “पर्वतावर मला भेटावयास ये; मी दोन दगडी पाट्यांवर इस्राएल लोकांच्या शिक्षणासाठी नियम व आज्ञा लिहिलेल्या आहेत; त्या मी तुला देतो.”
\v 13 तेव्हा मोशे व त्याचा मदतनीस यहोशवा हे उठले आणि मोशे देवाच्या पर्वतावर चढून गेला.
\s5
\v 14 मोशे इस्राएलांच्या वडीलांस म्हणाला, “आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यंत तुम्ही येथेच थांबा, मी परत येईपर्यंत अहरोन व हूर हे तुमच्याबरोबर आहेत; कोणाचे काही प्रकरण असेल तर त्याने त्यांच्याकडे जावे.”
\v 15 मग मोशे पर्वतावर चढून गेला आणि ढगाने पर्वत झाकून टाकला;
\s5
\v 16 परमेश्वराचे तेज सीनाय पर्वतावर उतरले; ढगाने सहा दिवस पर्वताला झाकून टाकले; सातव्या दिवशी परमेश्वराने मोशेला हाक मारली.
\v 17 इस्राएल लोकांना पर्वताच्या शिखरावर परमेश्वराचे तेज भस्म करणाऱ्या धगधगत्या अग्नीसारखे दिसत होते.
\v 18 मोशे पर्वतावर चढून आणखी वर ढगात गेला; मोशे चाळीस दिवस व चाळीस रात्र तेथे होता.
\s5
\c 25
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 “इस्राएल लोकांना माझ्यासाठी अर्पणे आणावयास सांग. ज्या कोणाची माझ्यासाठी मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून ही अर्पणे तू माझ्यासाठी स्विकारावी.
\s5
\v 3 त्यांच्याकडून तू माझ्याकरता घ्यावयाच्या वस्तूंच्या अर्पणाची यादी अशीः सोने, चांदी, पितळ;
\v 4 निव्व्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि तलम सणाचे कापड; बकऱ्याचे केस;
\v 5 लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी; तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड;
\v 6 दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले;
\v 7 एफोद व ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने.”
\s5
\v 8 मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांना माझ्यासाठी एक पवित्र तयार करावे.
\v 9 निवासमंडप कसा असावा त्याचा नमुना व त्यातील वस्तू कशा असाव्यात त्यांचा नमुना मी तुम्हास दाखवीन. त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही तो तयार करावा.
\s5
\v 10 “बाभळीच्या लाकडाची एक पेटी तयार करावी; त्याची लांबी अडीच हात, रुंदी दीड हात व उंची दीड हात असावी.
\v 11 तो आतून बाहेरून शुध्द सोन्याने मढवावा आणि त्याच्यावर सभोवती शुद्ध सोन्याचा काठ करावा.
\s5
\v 12 त्याच्या चारही पायांना लावण्यासाठी सोन्याच्या चार गोल कड्या ओतून एकाबाजूला दोन व दुसऱ्या बाजूला दोन अशा लावाव्या.
\v 13 बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व तेही सोन्याने मढावावेत
\v 14 कोशाच्या कोपऱ्यांवरील गोल कड्यांमध्ये दांडे घालून मग तो वाहून न्यावा.
\s5
\v 15 हे दांडे कोशाच्या कड्यातच कायम तसेच राहू द्यावेत, ते काढून घेऊ नयेत.”
\v 16 देव म्हणाला, मी तुला साक्षपट देईन तोहि त्या कोशात ठेवावा.
\v 17 मग शुद्ध सोन्याचे एक दयासन बनवावे; त्याची लांबी अडीच हात, रूंदी दीड हात असावी;
\v 18 मग सोन्याचे घडीव काम करून दोन करूब करून ते दयासनाच्या दोन्ही टोकांना ठेवावेत.
\s5
\v 19 एक करूब एकाबाजूला व दुसरा करूब दुसऱ्या बाजूला असे दयासनाशी एकत्र जोडून अखंड सोन्याचे घडवावेत.
\v 20 त्या करूबांचे पंख आकाशाकडे वर पसरलेले असावेत व त्यांच्या पंखांनी दयासन झाकलेले असावे; त्याची तोंडे समोरासमोर असावीत व त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी.
\v 21 दयासन कोशावर ठेवावे. मी तुला जो साक्षपट देईन तो तू त्या कोशात ठेवावा;
\s5
\v 22 तेथे मी तुला भेटत जाईन. दयासनावरून त्या साक्षपटाच्या कोशावरील ठेवलेल्या दोन्ही करूबामधून मी तुझ्याशी बोलेन आणि तेथूनच मी इस्राएल लोकांसाठी माझ्या सर्व आज्ञा देईन.
\s5
\v 23 बाभळीच्या लाकडाचे एक मेज बनवावे; ते लांबी दोन हात, रूंदी एक हात व उंची दीड हात असावी.
\v 24 ते शुद्ध सोन्याने मढवावे, व त्याच्या भोवती सोन्याचा काठ करावा.
\s5
\v 25 मग चार बोटे रुंदीची एक चौकट बनवावी व सोन्याचा काठ तिच्यावर ठेवावा.
\v 26 मग सोन्याच्या चार गोल कड्या बनवून त्या मेजाच्या चार पायांच्या कोपऱ्यांना त्या लावाव्यात.
\v 27 ह्या कड्या मेजाच्या वरच्या भागा भोवती चौकटीच्या जवळ ठेवाव्यात. मेज वाहून नेण्यासाठी ह्या कड्यांमध्ये दांडे घालावे.
\s5
\v 28 मेज वाहून नेण्यासाठी बाभळींच्या लाकडाचे दांडे बनवावेत व ते सोन्याने मढवावेत.
\v 29 मेजावरची तबके, धूपपात्रे, सुरया व पेयार्पणे ओतण्याकरता वाट्या बनीव. ही शुद्ध सोन्याची असावीत.
\v 30 माझ्यापुढे मेजावर समक्षतेची भाकर नेहमी ठेवावी
\s5
\v 31 शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तयार कर हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा. त्याची बैठक व त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याच्या कळ्या व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी.
\v 32 त्या दीपवृक्षाला एकाबाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा असाव्यात.
\s5
\v 33 प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलांसारख्या तीन तीन वाट्या ह्या कळ्याफुलांसह असाव्यात.
\v 34 ह्या दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या कळ्या पाकळ्यासहीत असलेल्या फुलाप्रमाणे असावीत.
\s5
\v 35 ह्या दीपवृक्षावर निघणाऱ्या सहा शाखापैकी दोन दोन शाखा त्याच्याखाली असलेले एकएक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची असावी.
\v 36 त्याची बोंडे व त्याच्या शाखा ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी. तो सबंध दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा एकच घडीव तुकडा असावा.
\s5
\v 37 मग ह्या दीपवृक्षावर सात दिवे बसवावेत म्हणजे त्या दिव्यातून दीपवृक्षाच्या समोरील भागावर प्रकाश पडेल.
\v 38 दिवे मालवण्याचे चिमटे व त्यांच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची असावीत.
\v 39 हा दीपवृक्ष त्याच्या सर्व उपकरणासहीत एक किक्कार शुद्ध सोन्याची करावा;
\v 40 आणि मी तुला पर्वतावर दाखविलेल्या नमुन्याप्रमाणेच ह्या सर्व वस्तू बनविण्याकडे तू लक्ष दे.
\s5
\c 26
\p
\v 1 निवासमंडप दहा पडद्यांचे कर. ते कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुतापासून तयार करावा. व कुशल कारागिराकडून करूब काढावेत.
\v 2 प्रत्येक पडद्याचे मोजमाप एक सारखेच असावे म्हणजे लांबी अठ्ठावीस हात व रूंदी चार हात असावी;
\v 3 त्यापैकी पाच पडदे एकत्र जोडून एक भाग करावा व दुसऱ्या पाचांचा जोडून दुसरा भाग करावा;
\s5
\v 4 जेथे एक पडदा दुसऱ्याशी जोडला जाईल तेथे किनारीवर निळ्या सुताची बिरडी करावीत. व तसेच दुसऱ्या पडद्यावरील किनारीवरहि तशीच बिरडी कर
\v 5 एका पडद्याला पन्नास बिरडी कर व दुसऱ्या पडद्याच्या किनारीला पन्नास बिरडी कर. ही बिरडी समोरासमोर असावी;
\v 6 पडद्यांचे ते दोन भाग जोडण्यासाठी सोन्याच्या पन्नास गोल कड्या बनवून त्यांच्या सहाय्याने ते दोन भाग एकत्र जोडावेत की सर्व मिळून निवासमंडप तयार होईल.
\s5
\v 7 त्यानंतर निवासमंडपावरच्या तंबूसाठी बकऱ्याच्या केसांचे पडदे करावे. हे पडदे अकरा असावे.
\v 8 हे सर्व पडदे एकसारख्या मोज मापाचे म्हणजे तीस हात लांब व चार हात रूंद अशा मापाचे बनवावेत.
\v 9 त्यातून पाच पडदे एकत्र जोडावे आणि सहा पडदे एकत्र जोडावे. सहावा पडदा तंबूच्या पुढल्या बाजूला दुमडावा.
\s5
\v 10 पहिल्या भागाच्या कडेखाली पन्नास बिरडी करावीत व दुसऱ्या भागाच्या कडेलाही तसेच पन्नास बिरडी करावी;
\v 11 नंतर पडदे जोडण्यासाठी पितळेच्या पन्नास गोल कड्या कराव्यात; त्यामुळे दोन भागांना जोडून तंबूसाठी अखंड होईल.
\s5
\v 12 ह्या तंबूच्या शेवटच्या पडद्याचा अर्धा भाग पवित्र निवासमंडपाच्या मागच्या टोकाखाली लोंबत राहील.
\v 13 आणि तंबूचे पडदे लांबीकडून हातभर ह्या बाजूला व हातभर त्या बाजूला निवासमंडप झाकण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूला लोंबते ठेवावे.
\v 14 तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे एक आच्छादन व दुसरे तहशाच्या कातड्याचे एक आच्छादन करावे.
\s5
\v 15 पवित्र निवासमंडपाला बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्यांचा आधार करावा.
\v 16 प्रत्येक फळीची लांबी दहा हात व उंची दीड हात असावी.
\v 17 प्रत्येक फळी दुसऱ्याशी जोडण्यासाठी दोन बाजूला दोन कुसे करावीत; निवासमंडपाच्या सर्व फव्व्या अश्याच कराव्यात.
\v 18 पवित्र निवासमंडपाच्या दक्षिण बाजूसाठी वीस फव्व्या कराव्यात.
\s5
\v 19 फळ्यासाठी चांदीच्या चाळीस बैठका कराव्यात. प्रत्येक फळीला आत खोल जाण्यासाठी प्रत्येक बाजूस एक बैठक या प्रमाणे दोन, चांदीच्या बैठका असाव्यात.
\v 20 पवित्र निवासमंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूसाठी वीस फव्व्या कराव्यात;
\v 21 आणि त्यांच्यासाठी प्रत्येक फळीखाली दोन बैठका या प्रमाणे चांदीच्या चाळीस बैठका कुसा कराव्यात.
\s5
\v 22 पवित्र निवासमंडपाच्या मागच्या बाजूसाठी म्हणजे पश्चिम बाजूसाठी आणखी सहा फव्व्या कराव्यात;
\v 23 आणि मागील बाजूला कोपऱ्यांसाठी दोन फळ्या कराव्यात.
\v 24 कोपऱ्याच्या फळ्या खालच्या बाजूस जोडाव्यात; त्यांच्यावरील भागांची कडी त्यांना जोडून ठेवील दोन्ही कोपऱ्यांसाठी असेच करावे.
\v 25 पवित्र निवासमंडपाच्या पश्चिम टोकास एकूण आठ फळ्या असतील आणि त्या प्रत्येक फळीच्या खाली दोन याप्रमाणे सोळा, चांदीच्या बैठका असतील.
\s5
\v 26 त्यांच्या फळ्यांसाठी बाभळीच्या लाकडाचे अडसर करावेत; त्यांच्या पहिल्या बाजूस पाच अडसर व
\v 27 दुसऱ्या बाजूस पाच अडसर असावेत; आणि त्यांच्या पाठीमागच्या म्हणजे पश्चिम बाजूस पाच अडसर असावेत.
\v 28 मध्यभागावरील अडसर लाकडांच्या फळ्यातून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जावा.
\s5
\v 29 फळ्या आणि अडसर सोन्याने मढवावेत आणि त्यांना जोडणाऱ्या कड्याही सोन्याच्या कराव्यात.
\v 30 मी तुला पर्वतावर दाखविल्याप्रमाणे पवित्र निवासमंडप बांधावा.
\s5
\v 31 तलम सणाच्या कापडाचा व निळया जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा एक अंतरपट बनवावा आणि त्यावर कुशल कारागिराकडून करूब काढून घ्यावेत.
\v 32 बाभळीच्या लाकडाचे चार खांब बनवून ते सोन्याने मढवावेत, त्यावर सोन्याच्या आकड्या लावाव्यात आणि ते खांब चांदीच्या चार उथळ्यात उभे करावेत;
\v 33 सोन्याच्या आकड्याखाली हा पडदा ठेवावा मग त्याच्यामागे आज्ञापटाचा कोश-ठेवावा; हा अंतरपट पवित्र स्थान व परमपवित्र स्थान यांना अलग करील;
\s5
\v 34 परमपवित्रस्थानातील आज्ञापटाच्या कोशावर दयासन ठेवावे.
\v 35 अंतरपटाच्या दुसऱ्या बाजूला तू बनविलेला मेज ठेवावा; तो निवासमंडपाच्या उत्तर बाजूस असावा व दक्षिण बाजूला मेजासमोर दीपवृक्ष ठेवावा.
\s5
\v 36 “पवित्र निवासमंडपाच्या दारासाठी निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा पडदा करून त्यावर वेलबुट्टीदार पडदा बनवावा.
\v 37 हा पडदा लावण्यासाठी बाभळीच्या लाकडाचे पाच खांब करावेत व ते सोन्याने मढवावेत; त्यांच्याकरिता पितळेच्या पाच बैठका बनवाव्यात; हा पडदा अडकविण्यासाठी सोन्याच्या आकड्या कराव्यात.”
\s5
\c 27
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला, बाभळीच्या लाकडाची पाच हात लांब, पाच हात रुंद व तीन हात उंच अशी चौरस वेदी तयार कर.
\v 2 वेदीच्या चार कोपऱ्यांना प्रत्येकी एक अशी चार शिंगे अंगचीच बनलेली असावी; मग वेदी पितळेने मढवावी.
\s5
\v 3 वेदीवरील राख काढण्यासाठी लागणारी भांडी, फावडी, कटोरे, काटे व अग्नीपात्रे ही सर्व उपकरणे पितळेची बनवावी.
\v 4 तिच्यासाठी पितळेच्या जाळीची एक चाळण बनवावी.
\s5
\v 5 ही चाळण वेदीच्या कंगोऱ्याखालीं, वेदीच्या तळापासून अर्ध्या उंची इतकी येईल अशा अंतरावर लावावी.
\v 6 वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व ते पितळेने मढवावेत.
\s5
\v 7 ते वेदीच्या दोन्ही बाजूच्या कड्यांत घालावेत म्हणजे वेदी उचलून नेण्यासाठी त्यांचा उपयोग होईल.
\v 8 वेदी मध्यभागी पोकळ ठेवावी व बाजूंस फळ्या बसवाव्यात; पर्वतावर मी तुला दाखविल्याप्रमाणे ती तयार करावी.
\s5
\v 9 निवासमंडपाला अंगण तयार कर; त्याच्या दक्षिणेला कातलेल्या तलम सणाच्या पडद्यांची कनात कर, तिची लांबी एकाबाजूला शंभर हात असावी.
\v 10 तिच्याकरता वीस खांब करावेत व त्यांच्यासाठी पितळेच्या वीस बैठका बनावाव्यात; खांबाच्या आकड्या व पडद्याचे गज चांदीचे करावेत.
\s5
\v 11 वेदीच्या उत्तर बाजूसही शंभर हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात असावी, तिच्यासाठी वीस खांब, पितळेच्या वीस बैठका आणि चांदीच्या आकड्या व गज हे सर्व असावे.
\v 12 अंगणाच्या पश्चिम बाजूस पडद्यांची पन्नास हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात असावी; तिला दहा खांब व खांबांना दहा खुर्च्या असाव्यात.
\v 13 अंगणाची पूर्वेकडील म्हणजे प्रवेश द्वाराकडील बाजूही पन्नास हात असावी.
\s5
\v 14 अंगणाच्या फाटकाच्या एकाबाजूला पंधरा हात लांबीची पडद्याची कनात असावी; ह्या बाजूस तीन खांब व तीन खुर्च्या असाव्यात;
\v 15 फाटकाच्या दुसऱ्या बाजूलाही पंधरा हात लांबीची पडद्याची कनात, व तिलाही तीन खांब व तीन खुर्च्या हे सर्व असावे.
\v 16 अंगणाच्या फाटकासाठी निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा वीस हात लांबीचा पडदा असावा व त्यावर नक्षीदार विणकाम असावे; पडद्यासाठी चार खांब व चार खुर्च्या असाव्यात.
\s5
\v 17 अंगणाच्या सभोवतीचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्टयांनी जोडलेले असावेत; त्यांच्या आकड्या चांदीच्या व खुर्च्या पितळेच्या असाव्यात.
\v 18 अंगणाची लांबी शंभर हात असावी व पन्नास हात रुंद असावे; अंगणासभोवतीची पडद्याची कनात पाच हात उंच असावी व ती कातलेल्या तलम सणाच्या सुताची बनविलेली असावी; आणि तिच्या खांबाच्या खुर्च्या पितळेच्या असाव्यात.
\v 19 पवित्र निवास मंडपातील सर्व उपकरणे, तंबूच्या मेखा आणि इतर वस्तू आणि अंगणासभोवतीच्या कनातीच्या मेखा पितळेच्या असाव्यात.
\s5
\v 20 इस्राएल लोकांनी दीपवृक्ष सतत जळत ठेवण्यासाठी जैतूनाचे हाताने कुटलेले निर्मळ तेल तुझ्याकडे घेऊन यावे;
\v 21 अंतरपटातील पडद्यामागील आज्ञापटाच्या बाहेर असलेल्या दर्शनमंडपात अहरोन व त्याचे पुत्र ह्यानी तो दीपवृक्ष संध्याकाळपासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर जळत ठेवण्याची व्यवस्था करावी; हा इस्राएल लोकांसाठी व त्यांच्या वंशासाठी पिढ्यानपिढ्या कायमचा विधी आहे.
\s5
\c 28
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला, याजक म्हणून माझी सेवाकरण्यासाठी तुझा भाऊ अहरोन व त्याचे मुलगे नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांना इस्राएल लोकांतून वेगळे होऊन तुजकडे यावयास सांग.
\v 2 आणि गौरवासाठी व शोभेसाठी तुझा भाऊ अहरोन याच्यासाठी पवित्र वस्रे तयार कर.
\v 3 ही वस्रे बनवणारे कारागीर ज्यांना मी ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण केले आहे त्या सर्वांना अहरोनाचा वस्रे तयार करण्यास सांग. त्यामुळे तो माझी याजकीय सेवाकरण्यासाठी पवित्र होईल.
\s5
\v 4 तुझा भाऊ अहरोन व त्याची पुत्र यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून कारागिरांनी त्यांच्यासाठी ही पवित्र वस्त्रे ऊरपट, एफोद, झगा, चौकड्याचा अंगरखा, मंदिल व कमरबंद तयार करावीत.
\v 5 त्यांनी सोन्याची जर आणि निळया, जांभळया व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड वापरून ही वस्रे तयार करावीत.
\s5
\v 6 सोन्याची जर व निळया, जांभळया व किरमिजी रंगाचे सूत तसेच कातलेल्या तलम सणाचे कापड घेऊन कुशल कारागिराकडून त्यांचे एफोद तयार करून घ्यावे;
\v 7 एफोदाच्या दोन खांदपट्ट्या जोडलेल्या असाव्यात, त्याची दोन टोके जोडावी.
\v 8 एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर कुशलतेने विणलेली एक पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड असावी; सोन्याची जरीची, व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सुताची व कातलेल्या तलम सणाच्या कापडाने ती असावी.
\v 9 मग दोन गोमेद रत्ने घेऊन त्यांच्यावर इस्राएलाच्या पुत्रांची नांवे त्यांच्या जन्माच्या क्रमाने कोरावी.
\s5
\v 10 त्यांच्या नावांपैकी सहा नांवे एका रत्नावर व बाकीची सहा नांवे दुसऱ्या रत्नावर कोरावी.
\v 11 रत्नावर कोरीव काम करणारा कारागीर कुशलतेने एखादी मुद्रा कोरतो त्याप्रमाणे दोन्ही रत्नावर इस्राएलाच्या बारा पुत्रांची नांवे कोरावी आणि ती सोन्याच्या जाळीदार कोंदणात बसवावी.
\v 12 ती दोन्ही रत्ने एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर लावावी. ती इस्राएल लोकांची स्मारकरत्ने होत म्हणजे अहरोन त्यांची नांवे परमेश्वरासमोर आपल्या दोन्ही खांद्यावर स्मरणार्थ वागवील.
\s5
\v 13 त्याचप्रमाणे सोन्याची जाळीदार कोंदणे करावी.
\v 14 पीळ घातलेल्या दोरीसारख्या शुद्ध सोन्याच्या दोन साखळया कराव्या व त्या पीळ घातलेल्या साखळ्या त्या कोंदणात बसवाव्या.
\s5
\v 15 न्यायाचा ऊरपटही तयार कुशल कारागिराकडून तयार करावा. जसा एफोद तयार केला, तसाच तो करावा. तो सोन्याच्या जरीचा, आणि निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा करावा;
\v 16 तो चौरस व दुहेरी असावा; व त्याची लांबी व रुंदी प्रत्येकी एक वीत असावी.
\s5
\v 17 त्यात रत्ने खोचलेल्या चार रांगा असाव्या; पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक;
\v 18 दुसऱ्या रांगेत पाचू, इंद्रनीलमणि व हिरा;
\v 19 तिसऱ्या रांगेत तृणमणि, सूर्यकांत व पद्मराग;
\v 20 आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे; ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात खोचावीत.
\s5
\v 21 ऊरपटावर इस्राएलाच्या प्रत्येक पुत्राच्या नावाच्या संख्येएवढी ही रत्ने, असावी. त्यांच्या संख्येइतकी बारा नांवे असावी. मुद्रा जशी कोरतात तसे बारा वंशापैकी एकेकाचे नांव एकेका रत्नावर कोरावे.
\v 22 ऊरपटावर लावण्यासाठी दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळया कराव्यात.
\v 23 ऊरपटावर सोन्याच्या दोन कड्या कराव्यात; त्या न्यायाच्या ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावाव्यात;
\v 24 ऊरपटाच्या टोकांस लावलेल्या ह्या दोन कड्यात पीळ घातलेल्या सोन्याच्या साखव्व्या घालाव्यात.
\s5
\v 25 पीळ घातलेल्या दोन्ही साखळयांची दुसरी टोके दोन्ही कोंदणात खोचून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर पुढल्या बाजूस लावाव्यात.
\v 26 सोन्याच्या आणखी दोन कड्या करून न्यायाच्या ऊरपटाच्या आतल्या दोन्ही कोपऱ्यांना एफोदाच्या बाजूला लावाव्या.
\s5
\v 27 सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या खांदपट्ट्याखालील एफोदाच्या समोर त्याच्या जोडाजवळील पट्टीवर लावाव्या.
\v 28 त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळया फितींने बांधाव्या, ह्याप्रमाणे तो कुशलतेने विणलेल्या एफोदाच्या पट्टीवर राहील, आणि ऊरपट एफोदावरून घसरणार नाही.
\s5
\v 29 अहरोन पवित्रस्थानात प्रवेश करील तेव्हा त्याच्या ऊरपटावर म्हणजे आपल्या हृदयावर त्याने इस्राएलाच्या मुलांची नांवे कोरलेली असतील त्यामुळे परमेश्वराला इस्राएलाच्या बारा पुत्रांची सतत आठवण राहील.
\v 30 ऊरपटात तू उरीम व थुम्मीम ठेव. अहरोन परमेश्वरासमोर येईल तेव्हा ते त्याच्या हृदयावर असतील. त्यामुळे इस्राएल लोकांचा न्याय करण्याचा मार्ग तो नेहमी आपल्या हृदयावर घेऊन जाईल.
\s5
\v 31 एफोदाबरोबर घालावयाचा झगा संपूर्ण निळया रंगाचा करावा;
\v 32 त्याच्या मध्याभागी डोके घालण्यासाठी एक भोक असावे आणि त्याच्या भोवती कापडाचा गोट शिवावा म्हणजे झग्याचा तो भाग फाटणार नाही.
\s5
\v 33 निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडाची डाळिंबे काढून ती त्या झग्याच्या खालच्या घेराभोवती लावावीत आणि दोन डाळिंबाच्या मधील जागेत सोन्याची घुंगरे लावावीत;
\v 34 त्यामुळे झग्याच्या घेराच्या खालच्या बाजूला एक डाळिंब व एक घुंगरु अशी क्रमावर ती असावीत.
\v 35 सेवा करताना अहरोनाने हा झगा घालावा; जेव्हा जेव्हा तो पवित्रस्थानात परमेश्वरासमोर जाईल किंवा तेथून बाहेर पडेल तेव्हा तेव्हा त्या घुंगरांचा आवाज ऐकू येईल; त्यामुळे तो मरावयाचा नाही.
\s5
\v 36 शुद्ध सोन्याची एक पट्टी बनवावी आणि मुद्रा कोरतात तशी तिच्यावर परमेश्वरासाठी पवित्र ही अक्षरे कोरावीत.
\v 37 ही सोन्याची पट्टी अहरोनाच्या मंदिलाला समोरील बाजूस निळ्या फितीने बांधावी;
\v 38 ती अहरोनाच्या कपाळावर सतत असावी ह्यासाठी की ज्या गोष्टी इस्राएल लोक परमेश्वराला पवित्र अर्पण करतील म्हणजे ज्या पवित्र भेटी त्यासंबंधीचा दोष अहरोनाने वाहावा; त्यामुळे ती दाने परमेश्वराला मान्य ठरतील.
\s5
\v 39 चौकड्यांचा अंगरखा तलम सणाचा करावा व एक मंदिलहि तलम सणाचा करावा आणि एक वेलबुट्टीदार कमरबंद करावा.
\s5
\v 40 अहरोनाच्या पुत्रांसाठीही अंगरखे, कमरबंद व फेटे करावेत; ही वस्रे गौरवासाठी व शोभेसाठी असावी.
\v 41 तुझा भाऊ अहरोन ह्याला व त्याच्या पुत्रांना ही वस्रे घालून, त्यांना अभिषेक करावा व त्यांच्यावर संस्कार करावा आणि त्यांना पवित्र कर म्हणजे मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील.
\s5
\v 42 “त्यांच्यासाठी सणाच्या कापडाचे चोळणे कर म्हणजे कमरेपासून मांडीपर्यंत त्यांचे अंग झाकलेले राहील.
\v 43 आणि अहरोन व त्याचे पुत्र दर्शनमंडपात प्रवेश करतील व पवित्रस्थानात सेवा करण्यास जातील तेव्हा त्यांनी हे चोळणे घातलेले असावे; तसे न केल्यास, दोषी ठरुन ते मरतील; अहरोनाला व त्यानंतर त्याच्या वंशाला हा कायमचा नियम आहे.”
\s5
\c 29
\p
\v 1 त्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी यासाठी त्यांना पवित्र करण्यासाठी तू काय करावेस ते मी तुला सांगतोः एक गोऱ्हा व दोन निर्दोष मेंढे घ्यावेत;
\v 2 बेखमीर भाकरी, तेलात मळलेल्या बेखमीर पोळया व तेल लावलेल्या बेखमीर चपात्या घ्याव्यात; ह्या सर्व सपिठाच्या असाव्या.
\s5
\v 3 त्या सर्व एका टोपलीत घालून ती टोपली त्याचप्रमाणे तो गोऱ्हा व ते दोन मेंढे ह्याच्यासहीत ती टोपली घेऊन ये.
\v 4 अहरोन व त्याचे पुत्र यांना दर्शनमंडपाच्या दारासमोर घेऊन यावे; त्यांना आंघोळ घालावी;
\s5
\v 5 ती वस्रे घेऊन अहरोनाला त्याचा अंगरखा व एफोदाचा झगा घाल; त्याला एफोद व ऊरपट बांधावा आणि एफोदाचा बेलबुट्टीदार पट्टा त्याच्या कमरेला बांध;
\v 6 त्याच्या डोक्याला मंदिल घाल. आणि मंदीलावर पवित्र मुकुट ठेव.
\v 7 नंतर अभिषेकाचे तेल त्याच्या डोक्यावर ओतून त्याला अभिषेक कर;
\s5
\v 8 मग त्याच्या पुत्रांना जवळ बोलावून त्यांना अंगरखे घालावेत;
\v 9 आणि अहरोनाला व त्याच्या पुत्रांना कमरबंद बांधव त्यांच्या डोक्यांना फेटे बांधावेत; अशाप्रकारे या विधीने त्यांना याजकपद कायमचे राहील ह्याप्रमाणे अहरोन व त्याची मुले ह्यांच्यावर संस्कार करावे
\s5
\v 10 नंतर तो गोऱ्हा दर्शनमंडपासमोर आणावा आणि अहरोन व त्याची मुले यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत
\v 11 मग तेथेच परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी त्या गोऱ्ह्याचा वध करावा;
\s5
\v 12 मग गोऱ्ह्याचे थोडे रक्त घेऊन ते आपल्या बोटांनी वेदीच्या शिंगास लावावे व बाकीचे सगळे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
\v 13 मग त्याच्या आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील पडदा आणि दोन्ही गुरदे व त्यांच्यावरील चरबी ही सर्व घेऊन त्याचा वेदीवर होम करावा.
\v 14 पण गोऱ्हाचे मांस, कातडे व शेण ही छावणीबाहेर नेऊन आगीत जाळून टाकावी; हा पापर्पणाचा बली होय.
\s5
\v 15 मग अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात एका मेंढ्याच्या डोक्यावर ठेवावेत;
\v 16 आणि तो मेंढा वधावा; व त्याचे रक्त वेदीच्या चारही बाजूस टाकावे.
\v 17 मेंढा कापल्यानंतर त्याचे तुकडे करावेत; मग त्याची आतडी व पाय धुऊन ते, त्याचे तुकडे व डोके यांच्यासह वेदीवर ठेवावेत;
\v 18 त्यानंतर वेदीवर सबंध मेंढ्याचा होम करावा. हे परमेश्वराकरता होमार्पण होय. हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय;
\s5
\v 19 नंतर अहरोन व त्याच्या मुलांनी दुसऱ्या मेंढ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत;
\v 20 मग तो मेंढा वधावा व त्याच्या रक्तातून थोडे रक्त घेऊन ते अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या उजव्या कानांच्या पाळया व त्यांच्या उजव्या हातांच्या व उजव्या पायांच्या अंगठ्यांना लावावे आणि बाकीचे रक्त वेदीवर चार बाजूस शिंपडावे.
\s5
\v 21 नंतर वेदीवरील रक्त आणि अभिषेकाचे तेल त्यातले काही घेऊन अहरोनावर व त्याच्या वस्रावर तसेच त्याच्या पुत्रावर व त्यांच्या वस्रावरही शिंपडावे; अशाने तो व त्याची वस्र आणि त्याच्याबरोबर त्याची मुले व त्यांची वस्रे पवित्र होतील.
\s5
\v 22 तो मेंढा संस्काराचा आहे म्हणून त्याची चरबी, आणि त्याची चरबीदार शेपूट व त्याच्या आतड्यावरील चरबी व काळजावरील पडदा, दोन्ही गुरदे व त्याच्यावरील चरबी आणि उजवी मांडी, ही घे;
\v 23 त्याचप्रमाणे परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतून एक भाकर, तेलात मळलेल्या सपिठाची एक पोळी व एक चपाती घ्यावी
\s5
\v 24 आणि ते सर्व अहरोन व त्याच्या पुत्रांच्या हातावर ठेव व हे ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळ.
\v 25 मग त्या सर्व वस्तु त्यांच्या हातातून घेऊन मेंढ्यासह परमेश्वरासमोर सुवासिक मधुर सुगंध म्हणून वेदीवरील होमार्पणावर त्यांचा होम करावा; ते परमेश्वराला अर्पिलेले सुवासिक हव्य होय.
\s5
\v 26 मग अहरोनाच्या संस्कारासाठी वधिलेल्या मेंढ्यांचे ऊर घेऊन ओवाळणीचे अर्पण ते परमेश्वरासमोर ओवाळ, तो तुझा हिस्सा आहे.
\v 27 नंतर अहरोन व त्याचे पुत्र यांच्या संस्कारासाठी वधिलेल्या मेंढ्यांचे ओवाळलेले ऊर व समर्पिलेली मांडी तू पवित्र करावी.
\v 28 इस्राएल लोकांकडून मिळणारा अहरोनाचा व त्याच्या पुत्रांचा हा निरंतरचा हक्क आहे. कारण हे समर्पित केलेले दान आहे. हे इस्राएलाकडून त्यांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञांपैकी परमेश्वराकरता समर्पित केलेले दान होय.
\s5
\v 29 अहरोनाची पवित्र वस्रे त्यानंतर ती त्याच्या पुत्रपौत्रांसाठी असावी, म्हणजे ह्या वस्रानिशी त्यांचा अभिषेक होऊन त्यांच्यावर संस्कार व्हावा.
\v 30 अहरोनाच्या जागी त्याचा जो पुत्र याजक होईल त्याने पवित्रस्थानात सेवाकरण्यासाठी दर्शनमंडपात जाताना ती वस्रे सात दिवस घालावीत.
\s5
\v 31 समर्पण विधीसाठी वध केलेल्या मेंढ्याचे मांस घेऊन ते पवित्र जागी शिजवावे;
\v 32 अहरोन व त्याच्या मुलांनी त्या मेंढ्याचे मांस आणि टोपलीतील भाकर दर्शनमंडपाच्या दारापाशी खावी;
\v 33 त्यांचा संस्कार व पवित्रीकरण ह्यासाठी ज्या पदार्थांनी प्रायश्चित झाले ते पदार्थ त्यांनी खावे. पण कोणी परक्याने ते खाऊ नयेत. कारण ते पदार्थ पवित्र आहेत.
\v 34 समर्पित केलेल्या मांसातले किंवा भाकरीतले जर काही सकाळपर्यत उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे, ते खाऊ नये कारण ते पवित्र आहे;
\s5
\v 35 मी तुला आज्ञा केली आहे त्या सर्व गोष्टीप्रमाणे अहरोन व त्याचे पुत्र यांचे कर. सात दिवसापर्यंत त्यांच्यावर संस्कार कर.
\v 36 प्रायश्चितासाठी पापबली म्हणून एक गोऱ्हा या दर दिवशी बली दे. आणि वेदीसाठी प्रायश्चित करून ती पवित्र कर आणि ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक कर.
\v 37 सातही दिवस वेदीसाठी प्रायश्चित करून कर म्हणजे वेदी परमपवित्र होईल, ज्याचा वेदीला स्पर्श होईल ते पवित्र होईल.
\s5
\v 38 वेदीवर होम करायचा तो असाः प्रतिदिनी एकएक वर्षाच्या दोन कोकरांचा नेहमी होम करावा.
\v 39 एका कोकराचा सकाळी व दुसऱ्या कोकराचा संध्याकाळी होम करावा.
\s5
\v 40 कुटून काढलेल्या पाव हीन तेलात एक दशमांश माप सपीठ मळून ते एका कोकराबरोबर अर्पावे आणि पाव हिन द्राक्षारसाचे पेयार्पण करावे.
\s5
\v 41 आणि संध्याकाळी दुसरे कोकरू अर्पावे व त्याच्याबरोबरही सकाळच्याप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पण करावे; हे परमेश्वराला प्रिय असे सुवासिक हव्य होय.
\v 42 दर्शनमंडपाच्या दारापाशी दररोज परमेश्वरासमोर तुम्ही पिढ्यानपिढ्या असेच होमार्पण करीत राहावे; ह्या ठिकाणी मी तुमच्याशी बोलण्यासाठी तुम्हाला भेटेन.
\s5
\v 43 त्याठिकाणी मी इस्राएल लोकांना भेटेन आणि माझ्या तेजाने मंडप पवित्र होईल.
\v 44 “ह्याप्रमाणे मी दर्शनमंडप व वेदी पवित्र करीन आणि अहरोन व त्याच्या पुत्रांना याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून मी त्यांनाही पवित्र करीन.
\s5
\v 45 मी इस्राएल लोकांमध्ये राहीन आणि त्यांचा देव होईन.
\v 46 आणि लोकांना समजेल की मी त्यांचा देव परमेश्वर आहे; मला त्यांच्याबरोबर राहता यावे म्हणून मीच त्यांना मिसर देशातून सोडवून आणले आहे हे त्यांना कळेल; मी त्यांचा देव परमेश्वर आहे.”
\s5
\c 30
\p
\v 1 तू धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी कर.
\v 2 ती चौरस असून एक हात लांब व एक हात रुंद असावी, आणि ती दोन हात उंच असावी; तिची शिंगे एकाच अखंड लाकडाची करावी.
\s5
\v 3 वेदीचा वरचा भाग व तिच्या चारही बाजू शुद्ध सोन्याने मढवाव्यात आणि सभोवती सोन्याचा कंगोरा करावा.
\v 4 त्या कंगोऱ्याखाली वेदीच्या एकमेकीच्या विरूद्ध बाजूंना सोन्याच्या दोन दोन गोल कड्या असाव्यात; त्यांच्यात दांडे घालून वेदी उचलून नेण्याकरता त्यांच्या उपयोग होईल.
\s5
\v 5 हे दांडे बाभळीच्या लाकडाचे करून ते सोन्याने मढवावेत.
\v 6 वेदी अंतरपटासमोर ठेवावी; आज्ञापटाचा कोश अंतरपटाच्या मागे असेल; आज्ञापटाच्या कोशावर असणाऱ्या दयासनासमोर वेदी असेल; ह्याच ठिकाणी मी तुला भेटत जाईन.
\s5
\v 7 अहरोन दिव्याची तेलवात करण्यासाठी येईल त्या प्रत्येक सकाळी दररोज त्याने वेदीवर सुगंधी धूप जाळावा;
\v 8 पुन्हा संध्याकाळी अहरोन दिवे लावण्यासाठी येईल तेव्हा त्याने वेदीवर सुंगधी धूप जाळावा; याप्रमाणे दररोज परमेश्वरापुढे सुंगधी धूप सतत पिढयानपिढया जाळीत जावा.
\v 9 तिच्यावर निराळा धूप किंवा होमार्पण, अन्नार्पण किंवा कोणत्याही प्रकारचे पेयार्पण अर्पण करू नये.
\s5
\v 10 अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगावर प्रायश्चित्त करावे; पिढ्यानपिढ्या वर्षातून एकदा प्रायश्चित्तासाठी अर्पिलेल्या लोकांच्या पापांची भरपाई करण्यासाठी अहरोनाने पापार्पणाच्या रक्ताने तिच्यासाठी त्याने प्रायश्चित करावे. ही वेदी परमेश्वराकरता परमपवित्र आहे.
\s5
\v 11 मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 12 “तू इस्राएल लोकांची शिरगणती करिशील तेव्हा गणनेसमयी आपणावर काही मरी येऊ नये म्हणून त्यातल्या प्रत्येक इस्राएलाने स्वत:च्या जिवाबद्दल परमेश्वराला खंड द्यावा;
\v 13 जितक्या लोकांची मोजदाद होईल तितक्यांनी पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे अर्धा शेकेल द्यावा. हा अर्धा शेकेल परमेश्वराकरता केलेले समर्पण आहे.
\v 14 वीस वर्षे व त्याहून जास्त वयाच्या लोकांमध्ये ज्याची गणना होईल त्यातील प्रत्येकाने त्याने परमेश्वराकरता हे समर्पण करावे.
\s5
\v 15 तुम्ही आपल्या जिवाबद्दल प्रायश्चित्त म्हणून परमेश्वराकरता हे समर्पण कराल तेव्हा श्रीमंत माणसाने अर्धा शेकेलापेक्षा जास्त देऊ नये व गरीबाने अर्धा शेकेलापेक्षा कमी देऊ नये;
\v 16 इस्राएल लोकांकडून प्रायश्चित्ताचा पैसा घेऊन आणि त्याचा दर्शनमंडपातील सेवेसाठी उपयोग करावा; हा पैसा इस्राएल लोकांच्या जिवाबद्दल प्रायश्चित दिल्याचे स्मारक म्हणून त्यांच्याप्रीत्यर्थ परमेश्वरासमोर राहील.”
\s5
\v 17 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 18 “पितळेचे एक गंगाळ बनवून ते पितळेच्या बैठकीवर ठेवावे, त्यातील पाण्याचा हातपाय धुण्यासाठी उपयोग करावा; ते दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये ठेवावे व ते पाण्याने भरावे.
\s5
\v 19 या गंगाळातील पाण्याने अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हातपाय धुवावेत;
\v 20 दर्शनमंडपात व वेदीजवळ सेवा करण्यास जाताना म्हणजे परमेश्वराकरता हव्य जाळण्यासाठी जातेवेळी त्यांनी आपले हातपाय धुवावेत; नाहीतर ते मरतील.
\v 21 अहरोन व त्याचे वंशज ह्याच्यासाठी हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी व्हावा.”
\s5
\v 22 मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 23 “तू उत्तम प्रकारचे मसाले घे; म्हणजे पवित्र स्थानातल्या चलनाप्रमाणे पाचशे शेकेल प्रवाही गंधरस; त्याच्या निम्मे म्हणजे अडीचशे शेकेल सुगंधी दालचिनी, पाचशे शेकेल सुगंधी बच,
\v 24 आणि पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे पाचशे शेकेल तज आणि एक हीनभर जैतूनाचे तेल घे,
\v 25 व त्याचे अभिषेकाचे पवित्र तेल म्हणजे गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळलेले अभिषेकासाठी पवित्र, सुंगधी तेल तयार कर;
\s5
\v 26 या तेलाने दर्शनमंडप व साक्षीकोश,
\v 27 तसेच मेज व त्यांवरील सर्व समान, दीपवृक्ष व त्याची उपकरणे, धूपवेदी,
\v 28 तसेच होमवेदी व तिचे सर्व सामान आणि गंगाळ व त्याची बैठक ह्यासर्वाना अभिषेक करावा.
\s5
\v 29 त्यांना पवित्र करावे म्हणजे ती परमपवित्र ठरतील; ज्याचा त्यांना स्पर्श होईल ते पवित्र होईल.
\v 30 आणि अहरोन व त्याच्या पुत्रांना अभिषेक करून पवित्र कर. मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील;
\v 31 इस्राएल लोकांना तू सांग की, पिढ्यानपिढ्या तुम्हाला माझ्यासाठीच हेच पवित्र अभिषेकाचे तेल असणार.
\s5
\v 32 हे तेल कोणाही मनुष्याच्या अंगाला लावायचे नाही. व ह्या प्रकारचे तेल कोणीही तयार करु नये; हे तेल पवित्र आहे आणि तुम्ही ह्याला पवित्रच मानावे.
\v 33 जो कोणी त्याच्यासारखे मिश्रण तयार करील किंवा ते कोणा परकीयाला लावील तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.”
\s5
\v 34 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू हे सुवासिक मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामासी, गंधाबिरुजा व शुद्ध ऊद ही घ्यावी. ह्या सर्व वस्तू समभाग घ्याव्यात;
\v 35 आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळून मिठाने खारावलेला, निर्भेळ शुद्ध व पवित्र असे धूपद्रव्य तयार करावे;
\v 36 त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे, व ते दर्शनमंडपातील ज्या साक्षकोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन तेथे ठेवावे; ते तुम्ही परमपवित्र लेखावे.
\s5
\v 37 हे परमेश्वरासाठी पवित्र लेखावे; त्यासारखे दुसरे धूपद्रव्य तुम्ही स्वतःसाठी तयार करु नये.
\v 38 सुवास घेण्याकरता कोणी असले काही तयार करील तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.”
\s5
\c 31
\p
\v 1 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला
\v 2 “पाहा, यहूदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल याला मी निवडून घेतले आहे.
\s5
\v 3 देवाच्या आत्म्याने त्याला परिपूर्ण भरले आहे; आणि सर्व प्रकारची कामे करण्यासाठी मी त्याला अक्कल, बुद्धी व ज्ञान ही दिली आहेत.
\v 4 तो सोने, चांदी व पितळ यांच्या कलाकुसरीचे काम करील.
\v 5 तो रत्नांना सुंदर पैलू पाडील व हिरे जडवून देईल; तो लाकडावरील कोरीव कामही करील; आणि अशा सर्व प्रकारची कलाकुसरीची कामे करील.
\s5
\v 6 त्याच्याबरोबर काम करण्याकरता दान याच्या वंशातील अहिसामाखाचा मुलगा अहलियाब यालाही मी निवडले आहे; एवढेच नव्हे तर जेवढे म्हणून बुध्दिमान आहेत त्या सर्वांच्या हृदयात मी बुध्दि ठेवली आहे. ती यासाठी की, तुला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी सर्व गोष्टी तयार कराव्या.
\v 7 म्हणजे दर्शनमंडप आज्ञापटाचा कोश, त्यावरील दयासन आणि तंबूचे सर्व सामान;
\v 8 मेज व त्यावरील सर्व समान, शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष व त्याची उपकरणे;
\v 9 होमवेदी व तिची उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक;
\s5
\v 10 अहरोन व त्याच्या मुलांनी याजक या नात्याने माझी सेवा करताना घालावयाची, कुशलतेने विणलेले तलम व पवित्र वस्रे;
\v 11 अभिषेकाचे सुवासिक तेल आणि पवित्र स्थानी जाळावयाचा सुंगधी द्रव्याचा धूप. ह्या सर्व वस्तू मी तुला सांगितल्याप्रमाणे हे कारागिर तयार करतील.”
\s5
\v 12 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 13 “इस्राएल लोकांना हे सांग की, तुम्ही माझे शब्बाथ अवश्य पाळावेत, कारण की पिढ्यानपिढ्या तुमच्यामाझ्यामध्ये ही खूण आहे. ह्यावरून हे कळावे की, तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.
\v 14 म्हणून शब्बाथ दिवस तुम्ही पवित्रपणे पाळावा; शब्बाथ दिवसाला जर कोणी भ्रष्ट करील तर त्याला अवश्य जिवे मारावे; जो कोणी त्यादिवशी काम करील, त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.
\v 15 सहा दिवस काम करावे. परंतु सातवा दिवस परमेश्वराचा पवित्र दिवस परमविश्रामाचा शब्बाथ होय. जर कोणी शब्बाथ दिवशी काम करील तर त्याला अवश्य ठार मारावे.
\s5
\v 16 इस्राएल लोकांनी शब्बाथ पाळावा; शब्बाथ हा निरंतरचा करार समजून त्यांनी तो पिढ्यानपिढ्या पाळावा.
\v 17 शब्बाथ दिवस इस्राएल लोकामध्ये व माझ्यामध्ये कायमची खूण आहे. परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश व पृथ्वी निर्माण केल्यावर सातव्या दिवशी स्वस्थ राहून विसावा घेतला.”
\s5
\v 18 या प्रमाणे देवाने सीनाय पर्वतावर मोशेबरोबर आपले बोलणे संपविले व मग त्याने आपल्या बोटांनी लिहिलेल्या दोन दगडी पाट्यांचे आज्ञापट त्याला दिले.
\s5
\c 32
\p
\v 1 मोशेला पर्वतावरून उतरण्यास बराच विलंब लागला आहे असे लोकांनी पाहिले तेव्हा सर्व लोक अहरोनाभोवती जमले व त्याला म्हणाले, “पाहा, मोशेने आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले आहे. परंतु मोशेचे काय झाले ते आम्हांस कळत नाही, म्हणून आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी तयार कर.”
\v 2 तेव्हा अहरोन लोकांना म्हणाला, “तुम्ही तुमच्या स्रिया, पुत्र व कन्या यांच्या कानातील सोन्याची कुंडले मजकडे आणा.”
\s5
\v 3 मग सर्व लोकांनी आपल्या कानातील सोन्याची कुंडले काढून अहरोनाकडे आणली.
\v 4 अहरोनाने लोकांकडून ते सोने घेतले; आणि ते ओतून व कोरणीने कोरुन त्यापासून वासरू केले. मग लोक म्हणाले, “हे इस्राएला, ज्या देवाने तुला मिसर देशातून बाहेर आणले आहे तो हाच देव आहे.”
\s5
\v 5 अहरोनाने हे सर्व पाहिले तेव्हा त्याने त्या वासरापुढे एक वेदी बांधली आणि जाहीर करून तो म्हणाला, “तुमच्या परमेश्वराकरता उद्या उत्सव होणार आहे.”
\v 6 लोक दुसऱ्या दिवशी पहाटेस उठले; त्यांनी होमार्पणे अर्पिली व शांत्यर्पणे आणली. मग ते खाण्यापिण्यास बसले; नंतर उठून ते खेळायला लागले.
\s5
\v 7 त्यासमयी परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू पर्वत उतरुन लवकर खाली जा, कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिसर देशातून बाहेर आणले ते बिघडले आहेत.
\v 8 ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञापिले होते त्या मार्गापासून किती लवकर ते बहकून गेले आहेत. त्यांनी आपल्यासाठी सोने वितळवून वासराची मूर्ति केली आहे; ते त्याची पूजा करीत आहेत व त्याला बलि अर्पणे वाहात आहेत; ते म्हणत आहेत, ‘हे इस्राएला, ह्याच देवांनी तुला मिसर देशातून बाहेर आणले आहे.”
\s5
\v 9 परमेश्वर मोशेला म्हणाला, “ह्या लोकांना मी पाहिले आहे; ते ताठमानेचे लोक आहेत;
\v 10 तर आता मला आड येऊ नको, त्यांना माझ्या रागाच्या तडाख्याने भस्म करतो. नंतर मी तुझ्यापासूनच एक महान राष्ट्र निर्माण करतो.”
\v 11 परंतु काकुळतीने विनंती करून मोशे आपला देव परमेश्वर ह्याला म्हणाला, हे परमेश्वरा, तुझ्या महान सामर्थ्याने व भुजप्रतापाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा?
\s5
\v 12 आणि परमेश्वराने त्यांचे वाईट करण्यासाठी, डोंगरावर त्यांना ठार मारण्यासाठी व पृथ्वीवरुन त्यांचा नायनाट करण्यासाठी त्यांना मिसर देशातून बाहेर आणले असे मिसरी लोकांनी का म्हणावे? आपल्या तीव्र कोपापासून फीर, आणि आपल्या लोकांवर आपत्ति आणण्याच्या हेतूपासून परावृत हो.
\v 13 तुझे सेवक अब्राहाम, इसहाक व इस्राएल, यांची आठवण कर; तू तुझ्या नावाने शपथ वाहिली होतीस; तू म्हणाला होतास, मी तुमची संतती आकाशातील ताऱ्यांइतकी जास्तीत जास्त करीन, मी ज्या देशाविषयी सांगितले तो सर्व देश मी तुझ्या संततीला देईन व तो सर्वकाळ त्यांचे वतन होईल.
\v 14 तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ति आणण्याचा जो परमेश्वराचा हेतू होता, त्यापासून तो परावृत्त झाला.
\s5
\v 15 मग मोशे पर्वतावरुन साक्षपटाच्या दोन पाट्या घेऊन पर्वतावरून खाली उतरला. त्या पाट्यावर पुढे व मागे अशा दोन्ही बाजूंना लिहिलेले होते.
\v 16 देवाने स्वत:च त्या पाट्या तयार केल्या होत्या व त्यांच्यावर कोरलेला लेख देवाने लिहिलेला होता.
\s5
\v 17 यहोशवाने लोकांचा गोंगाट ऐकला व तो मोशेला म्हणाला, “छावणीत लढाईसारखा आवाज ऐकू येत आहे.”
\v 18 मोशेने उत्तर दिले, “एखाद्या सैन्याच्या विजयाचा हा आवाज नाही किंवा एखाद्या सैन्याच्या पराभवचा हा आक्रोश नाही; मला जो आवाज ऐकू येत आहे तो नाचगाण्यांचा आहे.”
\s5
\v 19 मोशे छावणीजवळ येऊन पोहोंचल्यावर त्याने ते सोन्याचे वासरू व लोकांच्या नाचगाण्यांचा धिंगाणा पाहिला आणि तो भयंकर संतापला; त्याने आपल्या हातातल्या दगडी पाट्या खाली डोंगराच्या पायथ्याशी फेकून फोडून टाकल्या.
\v 20 नंतर लोकांनी बनविलेले ते सोन्याचे वासरू मोशेने तोडून फोडून ते अग्नीत जाळले. व कुटून त्याची पूड केली; मग ती पाण्यात टाकली. नंतर ते पाणी त्याने इस्राएल लोकांस पिण्यास दिले.
\s5
\v 21 मोशे अहरोनास म्हणाला, “ह्या लोकांनी तुझे असे काय केले होते की तू त्यांना असे भयंकर पाप करावयास लावलेस?”
\v 22 अहरोन मोशेला म्हणाला, “स्वामी, असे माझ्यावर रागावू नका; ह्या लोकांची प्रवृति पापाकडे आहे, हे आपणास माहीत आहे.
\v 23 लोक मला म्हणाले, ‘मोशेने आम्हाला मिसर देशातून काढून बाहेर आणले; परंतु आता त्याचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही; तेव्हा आमच्यापुढे चालतील असे देव तू आमच्यासाठी करून दे.
\v 24 तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘जर तुम्हाकडे सोन्याची कुंडले असतील तर ती मला द्या. तेव्हा लोकांनी मला त्यांच्याकडील सोने दिले; मी सोने भट्टीत टाकले आणि तिच्यातून हे वासरू बाहेर आले.”
\s5
\v 25 मोशेने पाहिले की अहरोनाने लोकांवरचे नियंत्रण ढिले केले त्यामुळे ते बेभान होत गेले आणि त्यांच्या मूर्खपणाच्या आचरणाचा तमाशा त्यांच्या शत्रूंनी पाहिला.
\v 26 तेव्हा मोशे छावणीच्या दाराजवळ उभा राहिला आणि म्हणाला, “ज्या कोणाला परमेश्वराच्या मागे यावयाचे असेल, त्याने मजकडे यावे,” आणि लगेच लेवी वंशाचे सर्व लोक मोशेकडे जमा झाले.
\v 27 मग मोशे त्यांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर काय म्हणतो ते मी तुम्हास सांगतो, ‘प्रत्येकाने आपल्या कमरेस तलवार लटकावावी आणि छावणीच्या ह्या प्रवेशव्दारापासून त्या प्रवेशव्दारापर्यंत अवश्य जावे आणि प्रत्येक माणसाने आपला भाऊ, मित्र व शेजारी यांना अवश्य जिवे मारावे.”
\s5
\v 28 लेवी वंशाच्या लोकांनी मोशेची आज्ञा पाळली आणि त्यादिवशी सुमारे तीन हजार इस्राएल लोक मेले.
\v 29 मग मोशे म्हणाला, “आज आपणाला परमेश्वराकरता समर्पण करून प्रत्त्येक पुरुषाने आपल्या पुत्रावर व भावावर चालून जावे, म्हणजे आज तो तुम्हाला आशीर्वाद देईल.”
\s5
\v 30 दुसऱ्या दिवशी सकाळी मोशेने लोकांना सांगितले, “तुम्ही भयंकर पाप केले आहे! परंतु आता मी परमेश्वराकडे पर्वतावर जातो; काहीतरी करून कदाचित् मला तुमच्या पापांचे प्रायश्चित करता येईल.”
\v 31 तेव्हा मोशे माघारी परमेश्वराकडे जाऊन म्हणाला, “हाय, हाय ह्या लोकांनी फार घोर पातक केले आहे. आपणासाठी सोन्याचे देव बनविले;
\v 32 तरी आता तू त्यांच्या ह्या पापांची क्षमा कर! परंतु जर तू त्यांच्या पापांची क्षमा करणार नसशील तर मग तू लिहिलेल्या जीवनी पुस्तकातून मला काढून टाक.”
\s5
\v 33 परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “जे मजविरूद्ध पाप करतात केवळ त्या लोकांचीच नांवे मी माझ्या पुस्तकातून काढून टाकतो.
\v 34 तेव्हा तू आता खाली जा आणि मी सांगतो तेथे लोकांना घेऊन जा; माझा दूत तुजपुढे चालेल व तुला मार्ग दाखवील जेव्हा पाप केलेल्या लोकांना शिक्षा करण्याची वेळ येईल तेव्हा त्यांना शिक्षा केली जाईल.”
\v 35 अहरोनाने बनवलेले वासरू लोकांनीच बनविले होते, म्हणून परमेश्वराने त्यांना ताडण केले.
\s5
\c 33
\p
\v 1 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आणि तुझ्याबरोबर मिसर देशातून तू आणलेले लोक, तुम्ही येथून पुढच्या प्रवासास निघा; आणि जो देश मी तुझ्या संततीला देईन अशी मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना शपथ वाहिली होती त्या देशाला तुम्ही जा.
\v 2 तुमच्यापुढे चालण्यास मी माझ्या दूताला पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी लोकांना तेथून घालवून देईन.
\v 3 दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशास तू जा; मी तुमच्याबरोबर येणार नाही कारण तुम्ही फार ताठमानेचे लोक आहात. मी आलो तर रस्त्यातच तुम्हाला नष्ट करीन.”
\s5
\v 4 ही वाईट बातमी ऐकल्यावर लोक फार दु:खी झाले आणि त्यानंतर कोणीही आपल्या अंगावर दागदागिने घातले नाहीत;
\v 5 कारण परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांस असे सांग, ‘तुम्ही फार ताठमानेचे लोक आहात; मी तुमच्याबरोबर थोडा वेळ जरी असलो तरी मी तुम्हाला भस्म करीन; म्हणून तुम्ही तुमचे दागदागिने काढून ठेवा; मग तुमचे काय करावयाचे ते मी पाहीन.”
\v 6 म्हणून होरेब पर्वतापासून पुढे इस्राएल लोक दागदागिन्यावाचून राहिले.
\s5
\v 7 मोशे छावणीबाहेर बऱ्याच अंतरावर तंबू लावत असे. मोशेने त्याला दर्शनमंडपअसे नांव दिले होते; ज्या कोणाला परमेश्वराला काही विचारावयाचे असेल तो छावणीबाहेरील दर्शनमंडपाकडे जाई.
\v 8 ज्यावेळी मोशे छावणीतून मंडपाकडे जाई त्यावेळी सर्व लोक आपापल्या तंबूच्या दारात उभे राहत आणि मोशे मंडपाच्या आत जाईपर्यंत त्याला निरखून बघत.
\v 9 जेव्हा मोशे मंडपात जाई तेव्हा मेघस्तंभ खाली उतरून येई आणि मंडपाच्या दारापाशी तो उभा राही; ह्याप्रमाणे परमेश्वर मोशेशी बोलत असे.
\s5
\v 10 जेव्हा लोक दर्शनमंडपाच्या दारात ढग बघत तेव्हा ते आपापल्या तंबूच्या दारात उभे राहून देवाला नमन करीत.
\v 11 मित्रांशी बोलावे त्याप्रमाणे परमेश्वर मोशेबरोबर समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे माघारी जात असे. तरी मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा, हा तरुण मंडप सोडून बाहेर येत नसे.
\s5
\v 12 मोशे परमेश्वराला म्हणाला, “पाहा ह्या लोकांना घेऊन जाण्यास तू मला सांगितलेस, परंतु तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार ते तू सांगितले नाहीस; तू मला म्हणालास, मी तुला तुझ्या नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टि आहे.
\v 13 आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखीव ना. म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टि माझ्यावर होईल. पाहा, हे राष्ट्र तुझी प्रजा आहे.”
\s5
\v 14 परमेश्वराने उत्तर दिले, “मी स्वत: तुझ्याबरोबर येईन व तुला विसावा देईन.”
\v 15 मग मोशे परमेश्वराला म्हणाला, “जर तू स्वतः येणार नाहीस तर मग आम्हाला या येथून पुढे नेऊ नकोस.
\v 16 तसेच तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या लोकांवर झाली आहे हे कशावरून समजावे? जर तू आमच्याबरोबर आल्याने मी व हे तुझे लोक पृथ्वीवरील इतर सर्व लोकाहून वेगळे झालो आहो यावरूनच ते समजावयाचें ना?”
\s5
\v 17 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मागतोस त्याप्रमाणे मी करीन, कारण माझी कृपादृष्टि तुझ्यावर झाली आहे आणि मी व्यक्तिशः तुला तुझ्या नावाने ओळखतो.”
\v 18 नंतर मोशे म्हणाला, “आता कृपाकरून मला तुझे तेज दाखव.”
\s5
\v 19 मग परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; मी परमेश्वर आहे आणि हे माझे नांव मी जाहीर करीन. ज्यावर कृपा करावीसी वाटेल त्याजवर मी कृपा करीन आणि ज्यावर दया करावीसी वाटते त्यावर दया करीन.
\v 20 परंतु” तू माझा “चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण माझा चेहरा पाहिलेला कोणीही माणूस जीवंत राहणार नाही.”
\s5
\v 21 परमेश्वर म्हणाला, “माझ्याजवळ ह्या ठिकाणी एक खडक आहे; तू त्यावर उभा राहा.
\v 22 माझे तेज त्या जागेजवळून पुढे जाईल तेव्हा मी तुला त्या खडकातील मोठ्या भेगेत ठेवीन; आणि मी निघून जाईपर्यंत माझ्या हाताने तुला झाकीन;
\v 23 नंतर मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठ पाहशील; परंतु तू माझा चेहरा पाहणार नाहीस.”
\s5
\c 34
\p
\v 1 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पहिल्या दोन पाट्याप्रमाणे आणखी दोन दगडी पाट्या घडून तयार कर म्हणजे फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्याच्यावर लिहीन.
\v 2 पहाटेस तयार हो व सीनाय पर्वतावर चढून ये आणि तेथे पर्वताच्या शिखरावर माझ्यासमोर हजर राहा.
\s5
\v 3 तुझ्याबरोबर कोणी चढून वर येऊ नये पर्वतावरील कोणत्याच ठिकाणी कोणी मनुष्य दिसू नये; तसेच शेरडेमेंढरे कळप व गुरेढोरे ह्याना त्या पर्वताच्या पायथ्याशी चरू देऊ नकोस.”
\v 4 तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यांसारख्याच आणखी दोन दगडी पाट्या घडून तयार केल्या; सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सीनाय पर्वतावर चढून गेला;
\s5
\v 5 तेव्हा मोशे पर्वतावर आल्यावर परमेश्वर एका ढगातून त्याच्याकडे खाली उतरला व तेथे त्याच्यापाशी उभा राहिला; आणि त्याने परमेश्वर ह्याच नांवाची घोषणा केली.
\v 6 परमेश्वर त्याच्यापुढून अशी घोषणा करीत गेलाः “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू, कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर,
\v 7 हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप यांची क्षमा करणारा, (पण अपराधी जनांची) मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्रपौत्रांचा तिसऱ्या व चौथ्या पिढीपर्यंतही, समाचार घेतो.”
\s5
\v 8 मग मोशेने ताबडतोब भूमिपर्यंत वाकून परमेश्वराला नमन केले.
\v 9 मग तो म्हणाला, “हे प्रभू, तुझी कृपादृष्टि जर मजवर झाली असेल तर आमच्याबरोबर चालावे. हे लोक ताठमानेचे आहेत हे मला माहीत आहे; तरी आमचा अन्याय व पाप यांची तू आम्हाला क्षमा कर आणि आपले वतन म्हणून आमचा स्विकार कर.”
\s5
\v 10 मग परमेश्वर म्हणाला, “पाहा, मी तुझ्या सर्व लोकांबरोबर हा करार करीत आहे; आतापर्यंत पृथ्वीवरील कोणत्याही राष्ट्रासाठी यापूर्वी कधीही केलेले नाहीत ते चमत्कार मी करीन; ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सर्व लोक परमेश्वराची कृती पाहतील, कारण जे मी तुझ्याबरोबर करणार आहे ते भयानक आहे.
\v 11 मी आज तुला ज्या आज्ञा देतो त्या तू पाळ म्हणजे मग मी अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्या लोकांना तुझ्यासमोरुन घालवून देतो.
\s5
\v 12 सावध राहा, तू ज्या देशात जात आहेस त्यात राहणाऱ्या लोकांबरोबर कोणत्याही प्रकारे करारमदार करशील आणि तो तुला पाश होईल.
\v 13 परंतु त्यांच्या वेद्या पाडून टाका; त्यांचे स्तंभ तोडून टाका; त्यांच्या अशेरा मूर्ति फोडून टाका.
\v 14 तू तर कोणत्याही दुसऱ्या देवाला नमन करू नये; कारण ज्याचे नांव ईर्ष्यावान असे आहे; तो परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे.
\s5
\v 15 तू सावध राहा. या देशातील रहिवाशाबरोबर कोणत्याही प्रकारचे करारमदार करू नकाे; ते व्यभिचारी मतीने आपल्या देवामागे लागून त्यांना बलिदान करतील. त्यातल्या कोणी तुला बोलावले असता तुम्ही त्यांच्या बलिदानातले काही खाल.
\v 16 त्यांच्या कन्यांची तुम्ही आपल्या पुत्रांसाठी पत्नी म्हणून निवड कराल; त्यांच्या कन्या व्यभिचारी मतीने आपल्या देवाच्यामागे जातील आणि त्या तुमच्या पुत्रांना व्यभिचारी बुध्दीने त्यांच्या नादी लावतील.
\v 17 तू आपल्यासाठी ओतीव देव करू नको.
\s5
\v 18 बेखमीर भाकरीचा सण पाळ, मी दिलेल्या आज्ञेप्रमाणे नेमलेल्या वेळी अबीब महिन्यातील सात दिवसपर्यंत तू बेखमीर भाकर खावी, कारण अबीब महिन्यात मिसर देशातून तू बाहेर निघालास.
\s5
\v 19 प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे; तसेच तुझ्या गुरांढोरापैकी गायीचे व मेंढराचे प्रथम जन्मलेले नर वत्स माझे आहेत.
\v 20 गाढवीचे पहिले शिंगरु खंडणी दाखल एक कोकरू देऊन सोडवून घ्यावे पण त्याला तसे सोडवले नाहीतर त्याची मान मोडावी. तुझ्या मुलांपैकी प्रत्येक ज्येष्ठ पुत्राला मोबदला देऊन सोडवून घ्यावा. कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये.
\s5
\v 21 सहा दिवस तू आपले कामकाज कर परंतु सातव्या दिवशी विसावा घे; नांगरणीच्या व कापणीच्या हंगामातही सातव्या दिवशी तू विसावा घे.
\v 22 तू सप्ताहाचा, म्हणजे गव्हाच्या कापणीच्या प्रथम पिकाचा सण पाळावा.
\s5
\v 23 तुमच्या सर्व पुरुषांनी वर्षातून तीनदा इस्राएलाचा देव प्रभू परमेश्वर ह्यासमोर हजर राहावे.
\v 24 मी तर परराष्ट्रांस तुझ्यापुढून घालवून देईन; मी तुझ्या देशाच्या सीमा वाढवीन; आणि वर्षातून तीनदा तू आपला देव परमेश्वर ह्यासमोर हजर राहावयास जाशील त्यावेळी तुझ्या देशाचा कोणीही लोभ धरणार नाही.
\s5
\v 25 माझ्या यज्ञबलीचे रक्त खमीराच्या भाकरीबरोबर अर्पू नये; आणि वल्हांडण सणाच्या यज्ञपशूचे काहीही सकाळपर्यंत राहू देऊ नये.
\v 26 हंगामाच्या वेळी तुझ्या जमिनीच्या उत्पन्नातील प्रथम पीकाचा सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर, ह्याच्या मंदिरात आणावा करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.”
\s5
\v 27 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “ही वचने लिहून ठेव कारण ह्याच वचनाप्रमाणे मी तुझ्याशी व इस्राएल लोकांशी करार केला आहे.”
\v 28 मोशे तेथे परमेश्वराजवळ चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला; त्या दिवसात त्याने अन्न खाल्ले नाही, आणि तो पाणीही प्याला नाही; आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे दहा आज्ञा लिहून ठेवल्या.
\s5
\v 29 मग मोशे, साक्षपटाच्या त्या दोन पाट्या घेऊन सीनाय पर्वतावरून खाली उतरला; परमेश्वराशी बोलल्यामुळे त्याच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्याला भान नव्हते.
\v 30 अहरोन व सर्व इस्राएल लोक यांनी मोशेच्या चेहऱ्यावरील तेजस्वी किरणे पाहिली तेव्हा ते त्याच्याजवळ जाण्यास घाबरले;
\v 31 परंतु मोशेने अहरोन व मंडळीचे प्रमुख ह्याना बोलावले, तेव्हा अहरोन व मंडळीचे प्रमुख त्याच्याकडे परत आले, तो त्यांच्याशी बोलू लागला.
\s5
\v 32 त्यानंतर सर्व इस्राएल लोक जवळ आले आणि जे काही परमेश्वराने त्याला सीनाय पर्वतावर सांगितले होते ते सगळे त्याने त्यांना आज्ञा देऊन सांगितले.
\v 33 लोकांशी आपले बोलणे संपविल्यावर मोशेने आपला चेहरा आच्छादनाने झाकला.
\s5
\v 34 जेव्हा कधीही मोशे परमेश्वराबरोबर बोलावयास त्याच्यासमोर आत जाई, तेव्हा तो बाहेर येईपर्यंत आपल्या चेहऱ्यावरील आच्छादन काढीत असे; मग तो इस्राएल लोकांकडे बाहेर येऊन परमेश्वर जी काही आज्ञा होई ती तो त्यांना सांगत असे.
\v 35 मोशेचा तेजाने तळपणारा चेहरा इस्राएल लोक पाहत तेव्हा तो पुन्हा आपला चेहरा झाकून घेई; आणि तो परमेश्वराकडे बोलावयास आत जाईपर्यंत तो आपला चेहरा झाकून ठेवत असे.
\s5
\c 35
\p
\v 1 मोशेने सगळया इस्राएल लोकांच्या मंडळीला एकत्र केले; तो त्यांना म्हणाला, ज्या गोष्टी करण्याविषयी परमेश्वराने आज्ञा केली आहे त्या ह्याः
\v 2 सहा दिवस काम करावे, परंतु सातवा दिवस तुमच्यासाठी परमेश्वराचा पवित्र दिवस, परमविसाव्याचा शब्बाथ होय, त्यादिवशी काम करणाऱ्या कोणत्याही माणसास अवश्य जिवे मारावे.
\v 3 शब्बाथ दिवशी तुम्ही आपल्या रहात असलेल्या जागेत कोठेही विस्तव पेटवू नये.
\s5
\v 4 मोशे सर्व इस्राएल लोकाच्या मंडळीस म्हणाला, परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हेः
\v 5 परमेश्वरासाठी तुम्ही अर्पणे आणावी. ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वराकरता सोने, चांदी, पितळ;
\v 6 निळे, जांभळे व किरमिज रंगाचे सूत, व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस;
\v 7 लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड;
\v 8 दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले;
\v 9 तसेच एफोद व ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेदमणी आणि इतर रत्ने आणावी.
\s5
\v 10 “तुमच्यापैकी जे कोणी कुशल कारागीर आहेत त्या सर्वांनी येऊन परमेश्वराने जे काही करण्याची आज्ञा दिली आहे ते सर्व करावे, म्हणजे
\v 11 निवासमंडप, त्याचा बाहेरील तंबू व त्यावरील आच्छादान, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब, व उथळ्या;
\v 12 कोश, त्याचे दांडे, दयासन व अंतरपाट,
\s5
\v 13 मेज व त्याचे दांडे, त्यावरील सर्व पात्रे व समक्षतेची भाकर;
\v 14 प्रकाशाकरीता दीपवृक्ष, त्याची उपकरणे व दिवे, आणि दिव्यासाठी तेल;
\v 15 धूपवेदी व तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी द्रव्ययुक्त धूप, निवासमंडपाच्या दारासाठी पडदा;
\v 16 होमवेदी व तिची पितळेची जाळी, दांडे व तिचे इतर साहित्य, गंगाळ व त्याची बैठक;
\s5
\v 17 अंगणाचे पडदे, त्यांचे खांब व त्यांच्या उथळ्या, आणि अंगणाच्या फाटकासाठी पडदा;
\v 18 निवासमंडप व अंगण ह्याच्यासाठी देणाऱ्या मेखा व तणावे,
\v 19 पवित्रस्थानात सेवाकरण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्रे आणि याजक ह्या नात्याने सेवाकरण्यासाठी अहरोन याजकाची व त्याच्या पुत्रांची पवित्र वस्रे.”
\s5
\v 20 मग इस्राएल लोकांची सर्व मंडळी मोशेपुढून निघून गेली.
\v 21 नंतर ज्यांच्या अंतःकरणांत स्फूर्ति झाली, त्या सर्वांनी दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळया सेवेसाठी आणि पवित्र वस्रासाठी परमेश्वराला अर्पणे आणली.
\v 22 ज्यांना मनापासून देण्याची इच्छा झाली त्या सगळया स्त्री पुरुषांनी नथा, कुंडले, अंगठ्या, बांगडया असे सर्व प्रकारचे सोन्याचे दागिने आणले; ही सोन्याची पवित्र अर्पणे परमेश्वरासाठी आणली.
\s5
\v 23 ज्या ज्या पुरुषांच्याकडे निळया, जांभळया व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी होती त्यांनी ते ते आणले.
\v 24 चांदी व पितळ यांचे अर्पण करणाऱ्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली आणि ज्यांच्याकडे बाभळीचे लाकूड होते त्यांनी ते परमेश्वराला अर्पण केले.
\s5
\v 25 ज्या स्रिया शिवणकाम व विणकाम ह्यात तरबेज होत्या त्या सर्वांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड आपल्या हातांनी विणून आणले.
\v 26 आणि ज्या स्त्रियांच्या अंतःकरणात स्फूर्ति होऊन त्यांना बुध्दि झाली, त्या सर्वानी बकऱ्याचे केस कातले.
\s5
\v 27 अधिकाऱ्यांनी याजकाचे एफोद व ऊरपट ह्यात जडवण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने आणली.
\v 28 दिव्याचे तेल व अभिषेकाचे तेल व सुगंधी धुपासाठी मसाला आणला.
\v 29 परमेश्वराने मोशेला जे करण्याची आज्ञा दिली होती त्या सर्वासाठी इस्राएल लोकांनी स्वखुशीने परमेश्वरासाठी अर्पणे आणली ज्या ज्या स्त्रीपुरुषांच्या अंतःकरणांत स्फूर्ति झाली त्यांनीही अर्पणे आणली.
\s5
\v 30 तेव्हा मोशे इस्राएल लोकांना म्हणाला, पहा, परमेश्वराने यहूदा वंशातील उरीचा पुत्र म्हणजे हूराचा नातू बसालेल ह्याला नाव घेऊन बोलावले आहे.
\v 31 आणि त्याने त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुध्दि, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे.
\v 32 तो सोने, चांदी आणि पितळ ह्यांच्यापासून कलाकुसरीचे काम करील.
\v 33 तो रत्नांना पैलू पाडील. लाकडाचे नक्षीकामही करून अशा सर्व प्रकारची कारागीरीची कामे करील.
\s5
\v 34 परमेश्वराने त्याला आणि दान वंशातील अहिसामाखाचा पुत्र अहलियाब, ह्याच्याठायी शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेवले आहे.
\v 35 कोरीव काम करणारे कुशल कारागीर, निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारे, विणकाम करणारे, सर्व प्रकारचे कसबी काम करणारे व कुशल कामाची योजना करणारे अशा सारख्या सर्व कारागिरीची कामे करण्यासाठी त्याने ह्या दोघांचे मन ज्ञानाने परिपूर्ण केले आहे.
\s5
\c 36
\p
\v 1 “परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे पवित्रस्थानाचे सेवेसाठी सर्व तऱ्हेचे काम कसे करावे ते समजण्यासाठी ज्यांच्या ठायी परमेश्वराने बुध्दी व समज घातली आहे ते बसालेल व अहलियाब आणि प्रत्येक ज्ञानी मनुष्य ह्यानी हे बांधकाम करावे.”
\s5
\v 2 नंतर बसालेल व अहलियाब ह्याना आणि ज्या ज्ञानी मनुष्याच्या मनात परमेश्वराने बुध्दी घातली होती व ज्यांना हे कार्य करण्याची स्फूर्ति झाली होती, त्यांना मोशेने बोलावले.
\v 3 आणि पवित्रस्थानाच्या सेवेसाठी म्हणजे ते बांधण्यासाठी इस्राएल लोकांनी जे एकंदर अर्पणे आणले होते ते त्यांनी मोशेच्या पुढून घेतले. लोकांनी रोज सकाळी आपली स्वखुशीची अर्पणे त्याच्यापाशी आणण्याचा क्रम चालू ठेवला.
\v 4 शेवटी मग सर्व बुध्दीमान पुरुष पवित्रस्थानाचे करीत असलेले आपले काम सोडून मोशेकडे आले.
\s5
\v 5 आणि ते मोशेला म्हणाले लोकांनी परमेश्वरासाठी खूप अर्पणे आणली आहेत! आम्हाला ह्या पवित्रस्थानाचे बांधकाम पूर्ण करावयास लागणाऱ्या साहित्यापेक्षा कितीतरी अधिक आमच्यापाशी आले आहे!
\v 6 तेव्हा मोशेने सर्व छावणीभर असा हुकूम दिला की, “कोणाही स्त्रीने किंवा पुरुषाने आता पवित्रस्थानाच्या सेवेसाठी अर्पण म्हणून आणखी कोणतेही कसबाचे वगैरे काम करून आणू नये,” तेव्हा अशा रीतीने आणखी अर्पणे आणावयास बंदी घालण्यात आली.
\v 7 त्यांच्या हाती जी सामग्री जमली होती ती ते सर्व काम करण्यास पुरून उरेल इतकी होती.
\s5
\v 8 मग त्या कसबी कारागिरांनी दहा पडद्यांचा निवासमंडप बनविला. त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचे पडदे तयार केले व त्यांच्यावर त्यांनी कुशल कारागिराकडून करूब काढले.
\v 9 प्रत्येक पडद्याचे मोजमाप अठ्ठावीस हात लांब व रुंदी चार हात असे सारखेच होते.
\v 10 त्यांनी त्यापैकी पांच पडदे जोडून एक भाग व दुसरे पांच पडदे जोडून दुसरा भाग असे केले.
\s5
\v 11 नंतर त्यांनी त्या दोन्हीही भागांच्या शेवटच्या किनारीवर निळ्या सुताची बिरडी केली; तसेच दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही तशीच बिरडी केली.
\v 12 त्यांनी एका पडद्याखाली किनारीवर पन्नास बिरडी व दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही पन्नास बिरडी केली; ती बिरडी समोरासमोर होती.
\v 13 नंतर ते दोन पडदे एकत्र जोडण्यासाठी त्यांनी सोन्याच्या पन्नास गोल आकडे बनविले; त्या आंकड्यांनी ते पडदे एकत्र जोडल्यावर त्या सर्वाचा मिळून अखंड पवित्र निवासमंडप तयार झाला.
\s5
\v 14 नंतर पवित्र निवासमंडप झाकण्यासाठी त्या कारागिरांनी बकऱ्याच्या केसांच्या अकरा पडद्यांचा एक तंबू बनविला.
\v 15 ह्या सर्व पडद्यांचे मोजमाप सारखेच होते म्हणजे तीस हात लांब व चार हात रुंद होते.
\v 16 त्या कारागिरांनी त्यापैकी पाच पडदे जोडून एक भाग व दुसरे सहा पडदे जोडून दुसरा भाग तयार केला.
\v 17 नंतर त्यांनी एका कनातीच्या बाहेरील शेकटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी व तशीच दुसऱ्या कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी केली.
\s5
\v 18 हे दोन पडदे जोडून एक तंबू करण्यासाठी त्यांनी पितळेचे पन्नास आंकडे केले.
\v 19 मग त्यांनी पवित्र निवासमंडप झाकण्यासाठी लाल रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे व दुसरे तहशाच्या कमावलेल्या कातड्याचे अशी दोन आच्छादने केली.
\s5
\v 20 पवित्र निवासमंडपाला आधार देण्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाच्या फव्व्या तयार केल्या.
\v 21 प्रत्येक फळी दहा हात लांब व दीड हात रुंद होती.
\v 22 त्यांनी प्रत्येक फळी दुसऱ्या फळीशी जोडण्यासाठी त्यांनी तिला दोन कुसे केली. त्यांनी निवासमंडपाच्या सर्व फळ्या अशाच केल्या.
\v 23 निवासमंडपासाठी ज्या फळ्या त्यांनी केल्या त्यापैकी दक्षिण बाजूस लावण्यासाठी वीस फळ्या केल्या;
\s5
\v 24 त्या वीस फळयांच्या खाली लावण्यासाठी त्यांनी चांदीच्या चाळीस उथळ्या त्यांनी केल्या, एका फळीच्या खाली कुसासाठी दोन दोन उथळ्या त्यांनी केल्या.
\v 25 त्याचप्रमाणे निवासमंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूस लावण्यासाठी त्यांनी वीस फळया केल्या.
\v 26 त्यांनी त्याच्यासाठी चांदीच्या चाळीस उथळ्या केल्या म्हणजे एकेका फळीच्या खाली दोन दोन उथळ्या.
\s5
\v 27 निवासमंडपाच्या मागील बाजूस म्हणजे पश्चिम बाजूस लावण्यासाठी सहा फळ्या केल्या,
\v 28 आणि मागच्या बाजूस निवासमंडपाच्या कोपऱ्यासाठी दोन फळ्या त्यांनी केल्या.
\s5
\v 29 ह्या फळ्या खालपासून दोन दोन असून त्या दोन्ही वरच्या भागी एकेका कडीने त्यांनी जोडल्या होत्या; दोन्ही कोपऱ्यांसाठी त्यांनी अशाच फळ्या केल्या.
\v 30 ह्याप्रकारे आठ फळ्या व त्यांना चांदीच्या सोळा उथळ्या झाल्या. अर्थात एकेका फळीखालीदोन दोन उथळ्या होत्या.
\s5
\v 31 त्यांनी बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार केले. निवासमंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी पाच,
\v 32 दुसऱ्या बाजूच्या फव्व्यासाठी पाच आणि पश्चिमेच्या म्हणजे मागल्या बाजूसाठी पांच;
\v 33 आणि त्यांनी फव्व्याच्या मध्यभागी लावावयाचा अडसर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोंचेल असा केला.
\v 34 त्या फळ्या त्यांनी सोन्याने मढविल्या, अडसर लावण्याच्या कड्या सोन्याच्या बनविल्या आणि अडसरही सोन्याने मढविले.
\s5
\v 35 मग त्यांनी निव्व्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि तलम सणाच्या कापडाचा एक अंतरपट बनविला व त्यावर करूब काढली,
\v 36 आणि त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे चार खांब केले व ते सोन्याने मढविले; त्याच्या आकड्या सोन्याच्या केल्या आणि त्याच्यासाठी चांदीच्या चार उथळ्या ओतल्या.
\s5
\v 37 मग त्यांनी निवासमंडपाच्या प्रवेशद्वारासाठी निव्व्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा नक्षीदार पडदा बनविला.
\v 38 व त्या पडद्यासाठी त्यांनी पांच खांब व त्यांच्या आकड्या बनविल्या; त्यांचा वरचा भाग व त्यांच्या बांधपट्ट्या सोन्याने मढविल्या; आणि खांबासाठी पितळेच्या पांच उथळ्या बनविल्या.
\s5
\c 37
\p
\v 1 बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनविला; तो अडीच हात लांब, दीड हात रुंद व दीड हात उंच होता.
\v 2 त्याने तो आतून बाहेरून शुद्ध सोन्याने मढविला आणि त्यासभोवती सोन्याचा कंगोरा केला.
\v 3 त्याच्या चाऱ्ही पायांना लावण्यासाठी त्याने सोन्याच्या चार कड्या ओतून एकाबाजूला दोन व दुसऱ्या बाजूला दोन अशा लावल्या.
\s5
\v 4 त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून ते शुद्ध सोन्याने मढविले.
\v 5 कोश उचलण्यासाठी ते दांडे त्याने त्याच्या दोन्ही बाजूंच्या कड्यात घातले.
\v 6 नंतर त्याने शुद्ध सोन्याचे दयासन बनविले; ते अडीच हात लांब व दीड हात रुंद होते.
\s5
\v 7 बसालेलाने सोने घडवून दोन करूब बनविले. ते दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी बनविले.
\v 8 त्याने एक करूब एका टोकासाठी व दुसरा करूब दुसऱ्या टोकासाठी बनविला. करुब व दयासन अखंड असून ते त्याने दोन्ही टोकांस बनविले.
\v 9 त्या करूबांचे पंख वर असे पसरले होते की त्यांनी ते दयासन झाकले होते; त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टि दयासनाकडे लागलेली होती.
\s5
\v 10 त्याने बाभळीच्या लाकडाचे मेज बनविले, ते दोन हात लांब, एक हात रुंद व दीड हात उंच होते.
\v 11 त्याने ते शुद्ध सोन्याने मढविले व त्यासभोवती सोन्याचा कंगोरा केला;
\v 12 आणि त्याने त्याच्यासाठी चार बोटे रुंदीची एक पाळ केली व त्या पाळीस सभोवती सोन्याचा कंगोरा केला.
\v 13 त्याच्यासाठी सोन्याच्या चार गोल कड्या ओतून तयार केल्या व त्याच्या चाऱ्ही पायावरच्या चार कोपऱ्यांना त्या लावल्या.
\s5
\v 14 ह्या गोल कड्या त्या पाळीजवळ ठेवल्या, त्या मेज उचलावयाच्या दांड्यासाठी होत्या.
\v 15 मेज उचलण्यासाठी त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढविले;
\v 16 नंतर त्याने मेजावरची पात्रे म्हणजे तबके, धूपपात्रे, सुरया व पेयार्पणे ओतण्यासाठी कटोरे ही सर्व शुद्ध सोन्याची बनवली.
\s5
\v 17 त्याने शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनविला; हा दीपवृक्ष, त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याच्या बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची घडविली.
\v 18 ह्या दीपवृक्षाला एकाबाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा होत्या.
\v 19 प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलासारख्या तीन तीन वाट्या, बोंडाफुलासह केल्या आणि दुसऱ्या बाजूच्या त्याच्या जोडीच्या प्रत्येक शाखेलाहि बदामाच्या फुलांसारख्या तीन तीन वाट्या बोंडाफुलासारख्या केल्या. दीपवृक्षामधून निघालेल्या सहा शाखांची रचना अशीच होती.
\s5
\v 20 दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या बोडांफुलांसह चार वाट्या होत्या.
\v 21 ह्या दीपवृक्षामधून निघणाऱ्या सहा शाखापैकी दोन दोन शाखा आणि त्यांच्याखाली असलेले प्रत्येकी एक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची होती.
\v 22 शाखा व फूले असलेला हा संपूर्ण दीपवृक्ष शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यातून घडविलेला होता.
\s5
\v 23 त्याने त्या दीपावृक्षाचे सात दिवे, त्याचे चिमटे व ताटल्या शुद्ध सोन्याच्या केल्या.
\v 24 त्याने तो दीपवृक्ष व त्याचे बरोबरची सर्व उपकरणे एक किक्कार शुद्ध सोन्याची त्याने बनवली.
\s5
\v 25 मग त्याने बाभळीच्या लाकडाची धूपवेदी केली; ती एक हात लांब, एक हात रुंद व दोन हात उंच अशी चौरस होती; तिची शिंगे अंगचीच होती.
\v 26 त्याने त्या वेदीचा वरचा भाग, तिच्या चाऱ्ही बाजू व तिची शिंगे शुद्ध सोन्याने मढविली व तिला सभोवती सोन्याचा कंगोरा केला;
\s5
\v 27 वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालण्याकरता त्याने सोन्याच्या दोन दोन गोल कड्या करून त्या कंगोऱ्यांच्या खाली तिच्या दोन्ही अंगाला लावल्या.
\v 28 त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढविले.
\v 29 नंतर त्याने अभिषेकाचे पवित्र तेल आणि सुगंधी द्रव्ययुक्त शुद्ध धूप गांध्याच्या कृतीप्रमाणे केला.
\s5
\c 38
\p
\v 1 बसालेलाने बाभळीच्या लाकडाची एक चौरस होमवेदी बनवली; ती पाच हात लांब व पाच हात रुंद व तीन हात उंच अशी केली.
\v 2 त्याने तिच्या चाऱ्ही कोपऱ्यास चार शिंगे बनवली, अंगचीच होती, त्याने ती पितळेने मढविली.
\v 3 त्याने वेदीची सर्व उपकरणे म्हणजे हंड्या, फावडी, कटोरे, काटे व अग्नीपात्रे ही सर्व पितळेची बनवली.
\s5
\v 4 त्याने वेदीला सभोवती कंगोऱ्याच्या खाली पितळेची जाळी बनवली ती खालपासून वेदीच्या तळाच्या अर्ध्या अंतरापर्यंत वर आली.
\v 5 त्याने पितळेच्या जाळीच्या चारही कोपऱ्यांना दांडे घालण्यासाठी चार कड्या ओतून तयार केल्या;
\s5
\v 6 त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते पितळेने मढविले.
\v 7 वेदी उचलून नेण्याकरता तिच्या बाजूच्या कड्यात त्याने दांडे घातले; वेदीच्या चारही बाजूस फळ्या लावून ती मध्यभागी पोकळ ठेवली.
\s5
\v 8 दर्शनमंडपाच्या दारापाशी सेवा करण्याऱ्या स्रियांनी अर्पण म्हणून आणलेल्या पितळी आरशांचे पितळ घेऊन त्याने गंगाळ व त्याची बैठक बनवली.
\s5
\v 9 त्याने अंगण तयार केले; त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलम सणाच्या कापडाच्या पडद्यांची लांबी शंभर हात होती.
\v 10 तिला वीस खांब असून त्या खांबासाठी पितळेच्या वीस उथळ्या होत्या; खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.
\s5
\v 11 अंगणाच्या उत्तर बाजूलाही शंभर हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती व तिच्यासाठीही वीस पितळी उथळ्या असलेल्या वीस खांबावर आधारलेली होती; खाबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.
\v 12 अंगणाच्या पश्चिम बाजूला पडद्यांची पन्नास हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक होती; तिच्यासाठी दहा खांब व दहा उथळ्याहि होत्या; ह्या खांबाच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या;
\s5
\v 13 पूर्वेकडील बाजू पन्नास हात लांब होती;
\v 14 अंगणाच्या फाटकाच्या एकाबाजूला पंधरा हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात होती; तिच्या करता तीन खांब व तीन उथळ्या होत्या;
\v 15 आणि अंगणाच्या फाटकाची दुसरी बाजूही अगदी तशीच होती. अंगणाच्या फाटकाच्या ह्या बाजूस व त्या बाजूस पंधरा पंधरा हात पडदे जोडून केलेल्या कनाती होत्या, त्यांना तीन तीन खांब व त्यांच्या उथळ्याहि तीन तीन होत्या.
\v 16 अंगणाच्या सभोवतालचे सर्व पडदे कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे होते.
\s5
\v 17 खांबाच्या उथळ्या पितळेच्या आणि आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या होत्या; खांबांची वरची टोके चांदीने मढविली होती; अंगणाचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्ट्यांनी जोडले होते.
\v 18 अंगणाच्या फाटकाचा पडदा निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा होता; त्यावर वेलबुट्टीदार विणकाम केलेले होते; तो वीस हात लांब व पांच हात उंच होता; ही उंची अंगणाच्या पडद्या इतकी पांच हात असावी.
\v 19 तो पडदा पितळेच्या चार उथळ्या आणि चार खांबावर अाधारलेला होता; खांबांवरील आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या बनवलेल्या होत्या; खांबाची वरची टोके चांदीने मढविली होती.
\v 20 निवासमंडपाच्या आणि अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व मेखा पितळेच्या होत्या.
\s5
\v 21 निवासमंडपाचे म्हणजे साक्षपटाच्या निवासमंडपाचे जे सामान लेव्यांच्या सेवेकरता केले त्याची यादी मोशेच्या सांगण्यावरून अहरोन याजकाचा पुत्र इथामार ह्याने केली ती ही.
\v 22 ज्या ज्या वस्तू करण्याविषयी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती त्या सर्व वस्तू यहूदा वंशातील हुराचा नातू म्हणजे उरीचा पुत्र बसालेल याने बनविल्या;
\v 23 तसेच त्याला मदतनीस म्हणून दान वंशातील अहिसामाखाचा पुत्र अहलियाब हा होता; तो सर्व प्रकारचे कोरीव काम करणारा कुशल कारागीर होता; तो विणकाम व निळ्या, व जांभळ्या व किरमिजी रंगाच्या तलम कापडावर कशिदा काढणारा होता.
\s5
\v 24 पवित्रस्थानाच्या सर्व कामाकरता अर्पण केलेले सोने सुमारे एकोणतीस किक्कार होते. आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे सातशे तीस शेकेल होते.
\v 25 मंडळीपैकी ज्यांची नोंद करण्यात आली त्या एकूण लोकांनी अर्पण केलेली चांदी शंभर किक्कार भरली आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे सतराशे पंचाहत्तर शेकेल भरली.
\v 26 वीस वर्षे व त्याहून अधिक वयाच्या पुरुषांची गणती केली तेव्हा ते सहा लाख, तीन हजार, पाचशे पन्नास भरले आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे प्रत्येकाला प्रत्येकी एक बेका चांदी म्हणजे अर्धा शेकेल मिळाला.
\s5
\v 27 त्यांनी ती चांदी पवित्रस्थानातील शंभर उथळ्या व अंतरपटाच्या उथळ्या करण्यासाठी वापरली; त्यांनी प्रत्येक उथळीसाठी प्रत्येकी एक किक्कार अशा शंभर किक्काराच्या शंभर उथळ्या बनविल्या.
\v 28 बाकीची सतराशे पंचाहत्तर शेकेल चांदी आकड्या बांधपट्ट्या आणि खांबांना मढविण्यासाठी लागली.
\v 29 सत्तर किक्कार व दोन हजार चारशे शेकेल अधिक पितळ अर्पण करण्यात आले होते.
\s5
\v 30 त्या पितळेचा दर्शनमंडपाच्या प्रवेश दाराजवळील उथळ्या, वेदीची उपकरणे व तिची जाळी ह्या करता;
\v 31 त्याचप्रमाणे अंगणाच्या कनातीच्या खांबांच्या उथळ्या, प्रवेशद्वारावरील पडद्यांच्या खांबांच्या उथळ्या, तसेच पवित्र निवासमंडप अंगणाच्या चारही बाजूस लागणाऱ्या मेखा बनविण्यासाठी उपयोग झाला.
\s5
\c 39
\p
\v 1 परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे पवित्रस्थानांतील सेवेसाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाची सुताची कुशलतेने विणलेली वस्रे केली; अहरोनासाठीही पवित्र वस्रे बनवली.
\s5
\v 2 त्यांनी सोन्याच्या जरीचे आणि निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या सुताचे व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे एफोद तयार केले.
\v 3 त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे केले व ते पत्रे कापून त्याची तार केली आणि ती कुशल कारागिराकडून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुतात व कातलेल्या तलम सणाच्या कापडात भरली.
\s5
\v 4 त्यांनी एफोदसाठी खांदपट्ट्या केल्या व त्या एफोदाच्या दोन्ही टोकांना जोडल्या.
\v 5 एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर जी कुशलतेने विणलेली पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड तुकड्याची केली. ती सोन्याच्या जरीची, निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाची केली. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.
\s5
\v 6 मुद्रेवर छाप कोरतात तशी त्यांनी इस्राएलाच्या मुलांची नांवे गोमेद रत्नावर कोरली व ती रत्ने सोन्याच्या कोंदणात बसविली.
\v 7 इस्राएल लोकांची स्मारकरत्ने व्हावी म्हणून ती एफोदाच्या खांदपट्ट्यांवर लावली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
\s5
\v 8 त्यांने कुशल कारागिराकडून एफोदप्रमाणेच सोन्याच्या जरीचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा ऊरपट बनवून घेलता.
\v 9 तो ऊरपट चौरस होता. त्यांनी तो दुहेरी केला; तो दुहेरी असून तो एक वीत लांब व एक वीत रुंद असा चौरस होता.
\s5
\v 10 त्यात रत्नांच्या चार रांगा बसविल्या; पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक;
\v 11 दुसऱ्या रांगेत पाचू इंद्रनीलमणि व हिरा;
\v 12 तिसऱ्या रांगेत तृणमणि, सूर्यकांत व पद्मराग;
\v 13 आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे, ही सर्व रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणात बसविली.
\s5
\v 14 इस्राएलाच्या पुत्रांसाठी एक या प्रमाणे ती बारा रत्ने ऊरपटावर होती. त्यांच्या बारा वंशाच्या संख्येइतकी एकेका रत्नावर एकेका मुलाचे नांव मुद्रा कोरतात त्याप्रमाणे त्यांनी कोरले होते.
\v 15 दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळ्या त्यांनी ऊरपटावर लावल्या.
\v 16 सोन्याची दोन जाळीदार कोंदणे व सोन्याच्या दोन कड्या बनवून त्या ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावल्या.
\s5
\v 17 ऊपपटाऱ्या टोकास लावलेल्या दोन्ही कड्यात पीळ घातलेल्या सोन्याच्या साखळ्या घातल्या.
\v 18 पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांनी दुसरी दोन टोके सोन्याच्या कोंदणात खोचून त्या त्यांनी एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर समोरच्या बाजूला लावल्या.
\s5
\v 19 सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या ऊरपटाच्या दोन्ही टोकांवर एफोदाच्या आतील बाजूच्या कडेला एफोदाजवळ लावल्या.
\v 20 सोन्याच्या आणखी दोन कड्या करून एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर खालून त्याच्यासमोर त्याच्या सांध्याजवळ कुशलतेने विणलेल्या पट्टीवर लावल्या.
\s5
\v 21 त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांनी निळ्या, फितीने अशा बांधल्या की ऊरपट एफोदाच्या पट्ट्यांवर राहावा व तो एफोदावरून ऊरपट घसरू नये. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी हे सर्व केले.
\s5
\v 22 नंतर बसालेलने एफोदाबरोबर घालावयाचा निळ्या रंगाच्या सुताचा झगा विणून घेतला.
\v 23 त्यांनी झग्याच्या मध्यभागी एक भोक ठेवले व त्या दरम्यान झगा फाटू नये म्हणून त्या भोकाच्या किनारीला सभोवती कापडाचा गोट शिवला.
\v 24 मग त्यांनी त्या झग्याच्या खालच्या घेराभोवती कातलेल्या तलम सणाच्या कापडाची व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या कापडाची डाळिंबे काढली.
\s5
\v 25 नंतर त्यांनी शुद्ध सोन्याची घुंगरे केली व ती झग्याच्या खालच्या घेराभोवती दोन दोन डाळिंबाच्यामध्ये लावली. म्हणजे झग्याच्या खालच्या घेराभोवती घुंगरु मग डाळिंब, पुन्हा घुंगरु मग डाळिंब याप्रमाणे दोन डाळिंबामध्ये एक घुंगरु अशी ती झाली;
\v 26 सेवा करते वेळी अंगी घालायच्या झगाच्या घेराच्या काठावर सभोवती एक घुंगरू व एक डाळिंब व एक घुंगरू व एक डाळिंब असे लावले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे तसेच त्यांनी हे केले.
\s5
\v 27 अहरोन व त्याच्या मुलांसाठी तलम सणाच्या विणलेल्या कापडाचे अंगरखे केले.
\v 28 आणि त्यांनी तलम सणाचे मंदिल, फेटे व कातलेल्या सणाचे चोळणे केले.
\v 29 मग त्यांनी तलम सणाच्या कापडाचा व निव्व्या जांभळ्या व किरमिजी रंगाचा वेलबुट्टीदार कमरपट्टा बनविला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
\s5
\v 30 मग त्यांनी पवित्र मुकुटासाठी शुद्ध सोन्याची पट्टी केली व तिच्यावर “परमेश्वरासाठी पवित्र” अशी अक्षरे कोरली.
\v 31 ती मंदिला भोवती समोर बांधता यावी म्हणून तिला निळी फीत लावली. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
\s5
\v 32 अशाप्रकारे पवित्र निवासमंडपाचे म्हणजे दर्शनमंडपाचे सर्व काम पूर्ण झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.
\v 33 मग त्यांनी तो निवासमंडप मोशेकडे आणिला. तंबू व त्याचे सर्व सामान म्हणजे आकड्या, फळया, अडसर, खांब, खांबाच्या उथळ्या;
\v 34 आणि लाल रंगवलेली मंडप झाकण्याची मेंढ्यांची कातडी व तहशाची कातडी वे अंतरपट;
\v 35 साक्षपटाचा कोश, तो वाहून नेण्याचे दांडे आणि दयासन
\s5
\v 36 मेज, त्यावरील सर्व सामान व पवित्र समक्षतेची भाकर;
\v 37 शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष त्यावरील दिवे व त्याची सर्व उपकरणे व दिव्यासाठी तेल;
\v 38 सोन्याची वेदी, अभिषेकाचे तेल, सुगंधी धूप आणि तंबूच्या दारासाठी पडदा;
\v 39 पितळेची वेदी व तिची पितळेची जाळी, वेदी वाहून नेण्याचे दांडे व तिची सर्व पात्रे, गंगाळ व त्याची बैठक:
\s5
\v 40 अंगणाचे पडदे व कनाती, खांब व त्याच्या उथळ्या, अंगणाच्या प्रवेश दाराचा पडदा, तणावे, मेखा व पवित्र निवासमंडपाच्या व दर्शनमंडपाच्या सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य:
\v 41 पवित्रस्थानात सेवाकरण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्रे, अहरोन याजकाची पवित्र वस्रे आणि याजक या नात्याने सेवाकरण्यासाठी त्याच्या पुत्रांची वस्रे ही सर्व त्यांनी आणली;
\s5
\v 42 परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सगळे काम केले.
\v 43 लोकांनी काम केले ते सर्व मोशेने बारकाईने पाहिले; ते त्यांनी अगदी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले होते म्हणून मोशेने त्यांना आशीर्वाद दिला.
\s5
\c 40
\p
\v 1 मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 “पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी दर्शनमंडपाचा निवासमंडप उभा कर.
\s5
\v 3 साक्षपटाचा कोश त्यामध्ये ठेव व तू अंतरपटाने कोशाला पडदा घाल.
\v 4 मग मेज मध्ये आत आणून त्याच्यावरील सामान व्यवस्थित ठेव; नंतर दीपवृक्ष आत नेऊन त्याचे दिवे लाव.
\s5
\v 5 साक्षपटाच्या कोशापुढे सोन्याची धूपवेदी ठेव आणि निवासमंडपाच्या दाराचा पडदा लाव.
\v 6 दर्शनमंडपाच्या निवासमंडपाच्या दारापुढे होमवेदी ठेव.
\v 7 दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेव व त्यात पाणी भर.
\s5
\v 8 सभोवती अंगण कर व मग त्याच्या प्रवेशदारापाशी पडदा लाव.
\v 9 अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडपाला व त्यातल्या सर्व वस्तूंना अभिषेक कर व त्याचे सर्व सामान पवित्र कर म्हणजे तो पवित्र होईल.
\v 10 होमवेदी व तिची सर्व उपकरणे यांना अभिषेक करून पवित्र कर म्हणजे ती परमपवित्र होईल.
\v 11 गंगाळ व त्याच्या खालची बैठक ह्यास अभिषेक कर व त्यांना पवित्र कर.
\s5
\v 12 अहरोन व त्याचे पुत्र ह्याना दर्शनमंडपाच्या दारापाशी नेऊन त्यांना आंघोळ घाल.
\v 13 अहरोनाला पवित्र वस्रे घाल व त्याला तेलाने अभिषेक करून पवित्र कर मग तो याजक या नात्याने माझी सेवा करील.
\s5
\v 14 त्याच्या पुत्रांजवळ बोलावून अंगरखे घाल.
\v 15 त्यांच्या पित्याला जसा अभिषेक करशील त्याप्रमाणेच त्यांना कर म्हणजे याजक या नात्याने ते माझी सेवा करतील; हा त्यांचा अभिषेक त्यांच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरच्या याजकपदाचा दर्शक होईल.”
\v 16 मोशेने परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्वकाही तसे केले.
\s5
\v 17 दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र निवासमंडपाची उभारणी झाली.
\v 18 परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने पवित्र निवासमंडप उभा केला; प्रथम त्याने उथळ्या बसवून घेतल्या, मग त्याने त्यांच्यावर फळया लावल्या. अडसर लावले व त्यांचे खांब उभे केले;
\v 19 त्यानंतर निवासमंडपावरचा तंबू केला, मग वरच्या तंबूवर त्याने आच्छादन घातले; परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने हे सर्व केले.
\v 20 मोशेने साक्षपट घेऊन कोशात ठेवला व कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेवले.
\s5
\v 21 त्याने तो कोश निवासमंडपात आणला आणि योग्य ठिकाणी अंतरपट लावून साक्षपटाचा कोश झाकला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
\v 22 मोशेने पवित्र निवासमंडपाच्या उत्तर बाजूस दर्शनमंडपात पडद्याच्या बाहेर मेज ठेवले;
\v 23 त्याने त्याच्यावर परमेश्वरासमोर समर्पित भाकर ठेवली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
\s5
\v 24 त्याने पवित्र निवासमंडपाच्या दक्षिण बाजूस दर्शनमंडपात मेजासमोर दीपवृक्ष ठेवला.
\v 25 नंतर त्याने परमेश्वरासमोर दीपवृक्षावर दिवे लावले; परमेश्वरने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
\s5
\v 26 त्याने दर्शनमंडपात अंतरपटासमोर सोन्याची वेदी ठेवली.
\v 27 नंतर त्याने तिच्यावर सुगंधी धूप जाळला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.
\s5
\v 28 त्याने पवित्र निवासमंडपाच्या दाराला पडदा लावला.
\v 29 त्याने पवित्र निवासमंडपाच्या दर्शनमंडपाच्या दारापाशी होमवेदी ठेवली व तिच्यावर होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण केली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
\v 30 त्याने दर्शनमंडप आणि वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेवले व धुण्यासाठी त्यात पाणी भरले.
\s5
\v 31 मोशे, अहरोन व अहरोनाची पुत्र त्यात आपआपले हातपाय धूत असत;
\v 32 ते दर्शनमंडप व वेदीपाशी जाताना प्रत्येक वेळेस आपले हातपाय तेथे धूत असत; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी हे केले.
\v 33 त्याने निवास मंडपाभोवती अंगणाची कनात उभी केली व अंगणात वेदी बसवली आणि अंगणाच्या फाटकास पडदा लावला; ह्याप्रकारे परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने सर्व काम संपविले.
\s5
\v 34 दर्शनमंडपावर मेघाने छाया केली व पवित्र निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला.
\v 35 दर्शनमंडपावर मेघ राहिला व परमेश्वराच्या तेजाने निवासमंडप भरून गेला म्हणून मोशेला आत जाता येईना.
\s5
\v 36 पवित्र निवास मंडपावरील मेघ वर जाई तेव्हा इस्राएल लोक आपला पुढील प्रवास सुरु करीत;
\v 37 परंतु तो मेघ निवासमंडपावर असेपर्यंत लोक तेथून हलत नसत; तो वर जाईपर्यंत ते तेथेच थांबत.
\v 38 परमेश्वराचा मेघ दिवसा निवासमंडपावर राही आणि रात्री त्यात अग्नी असे त्यामुळे सर्व इस्राएल लोकांना आपल्या प्रवासात तो दिसत असे.