557 lines
44 KiB
Plaintext
557 lines
44 KiB
Plaintext
\id SNG
|
|
\ide UTF-8
|
|
\h गीतरत्न
|
|
\toc1 गीतरत्न
|
|
\toc2 गीतरत्न
|
|
\toc3 sng
|
|
\mt1 गीतरत्न
|
|
|
|
|
|
\s5
|
|
\c 1
|
|
\p
|
|
\v 1 हे शलमोनाचे गीतरत्न आहे:
|
|
\q
|
|
\v 2 (तरुणी आपल्या प्रियकराशी बोलत आहे) तू माझे मुखचुंबन घे,
|
|
\q कारण तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा उत्तम आहे.
|
|
\q
|
|
\v 3 तुझ्या अभिषेकाच्या तेलाचा सुगंध मोहक आहे,
|
|
\q तुझे नाव दरवळणाऱ्या सुवासासारखे आहे. त्यामुळेच तरुणी तुझ्यावर प्रेम करतात.
|
|
\q
|
|
\v 4 मला तुझ्याबरोबर ने आणि आपण पळून जाऊ.
|
|
\q (तरुणी स्वतःशीच बोलते) राजाने मला त्याच्या अंतःपुरात आणले आहे.
|
|
\q (तरुणी तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे) मी आनंदीत आहे. मी तुझ्याविषयी आनंदीत आहे. मला तुझे प्रेम साजरे करू दे. ते द्राक्षारसापेक्षा चांगले आहे.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 5 (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीबरोबर बोलते) अहो, यरुशलेमेच्या कन्यांनो, मी काळी पण सुंदर आहे.
|
|
\q मी केदारच्या तंबूसारखी काळी आणि
|
|
\q शलमोनाच्या पडद्यासारखी सुंदर आहे.
|
|
\q
|
|
\v 6 मी काळी आहे म्हणून माझ्याकडे टक लावून पाहू नका.
|
|
\q कारण सूर्याने मी होरपळले आहे.
|
|
\q माझ्या आईची मुले माझ्यावर रागावले होते.
|
|
\q त्यांनी मला द्राक्षांच्या मळ्याची राखण करण्यास ठेवले.
|
|
\q परंतु मी आपल्या स्वत:च्या द्राक्षमळ्याची काळजी घेतली नाही.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 7 (ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे) माझ्या जीवाच्या प्रियकरा, मला सांग:
|
|
\q तो तू तुझा कळप कोठे चारतोस?
|
|
\q तू तुझ्या कळपाला दुपारी कोठे विसावा देतोस?
|
|
\q तुझ्या सोबत्यांच्या कळपाजवळ भटकणाऱ्यांसारखी मी का व्हावे?
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 8 (तिचा प्रियकर तिला उत्तर देतो) हे परम सुंदरी स्त्री,
|
|
\q जर तुला काय करायचे ते माहीत नाहीतर
|
|
\q माझ्या कळपाच्या मागे जा.
|
|
\q तुझ्या लहान बकऱ्यांना मेंढपाळाच्या तंबूजवळच्या कुरणात चार.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 9 माझ्या प्रिये, फारोच्या रथाच्या घोड्यांतल्या एका घोडीशी मी तुझी तुलना करतो.
|
|
\q
|
|
\v 10 तुझे सुंदर गाल सोन्याने अलंकृत केले आहेत.
|
|
\q तुझी मान मोत्यांच्या हारांनी सुंदर दिसत आहे.
|
|
\q
|
|
\v 11 मी तुझ्यासाठी चांदीचे टिके लाविलेले
|
|
\q सोन्याचे दागिने करेल.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 12 (ती स्त्री स्वतःशीच बोलते) राजा आपल्या पलंगावर असता
|
|
\q माझ्या जटामांसीचा सुगंध पसरला.
|
|
\q
|
|
\v 13 माझ्या वक्षस्थळांमध्ये रात्रभर विसावलेला,
|
|
\q माझा प्रियकर माझ्या गळ्यात असलेल्या गंधरसाच्या पुडीसारखा मला आहे
|
|
\q
|
|
\v 14 माझा प्रियकर एन-गेदीमधील
|
|
\q द्राक्षाच्या मळ्याजवळील मेंदीच्या फुलांच्या गुच्छासारखा आहे.
|
|
\p
|
|
\s5
|
|
\v 15 (तिचा प्रियकर तिच्याशी बोलतो) पाहा माझ्या प्रिये, तू किती सुंदर आहेस!
|
|
\q तू फारच सुंदर आहेस.
|
|
\q तुझे डोळे कबुतरासारखे आहेत.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 16 (तरुणी आपल्या प्रियकराशी बोलते) पाहा, माझ्या प्रियकरा, तू देखणा आहेस, तू किती देखणा आहेस.
|
|
\q आपला बिछाना किती आल्हाददायक आणि सुखावह आहे.
|
|
\q
|
|
\v 17 आपल्या घराच्या तुळ्या गंधसरूच्या लाकडाच्या आहेत.
|
|
\q आणि छताचे वासे देवदारुच्या लाकडाचे आहे.
|
|
|
|
\s5
|
|
\c 2
|
|
\q
|
|
\v 1 (ती स्त्री तिच्या प्रियकराशी बोलत आहे) मी शारोनाचे कुंकुमपुष्प आहे.
|
|
\q दरीतले कमलपुष्प आहे.
|
|
\q
|
|
\v 2 (पुरुष तिच्याशी बोलतो) जसे काटेरी झाडांत कमलपुष्प
|
|
\q तसे माझे प्रिये इतर मुलींमध्ये तू आहेस.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 3 (स्त्री स्वतःशी बोलते) जसे सफरचंदाचे झाड वनातल्या झाडांमध्ये
|
|
\q तसा माझा प्रियकर इतर पुरुषांमध्ये आहे.
|
|
\q त्याच्या सावलीत मला बसायला खूप आनंद झाला.
|
|
\q आणि त्याच्या फळाची चव मला गोड लागली.
|
|
\q
|
|
\v 4 त्याने मला मेजवानीच्या घरात आणले
|
|
\q आणि माझ्यावर त्याच्या प्रेमाचा झेंडा फडकावला.
|
|
\s5
|
|
\v 5 (ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलते) मनुकांची पोळी देऊन माझ्यात शक्ती आणा.
|
|
\q सफरचंद खाऊ घालून मला ताजेतवाने करा.
|
|
\q कारण मी प्रेमज्वराने अशक्त झाले आहे.
|
|
\v 6 (ती स्त्री स्वतःशी बोलते) त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे
|
|
\q आणि त्याचा उजवा हात मला आलिंगीत आहे.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 7 (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलत आहे) यरुशलेमेच्या कन्यांनो,
|
|
\q तुम्हाला वनातील हरीणीची आणि रानमृगांची शपथ घालून सांगते की,
|
|
\q आमचे प्रेमकरणे होईपर्यंत तुम्ही व्यत्यय आणू नका.
|
|
\s5
|
|
\v 8 (ती स्त्री स्वतःशी बोलत आहे) मी माझ्या प्राणप्रियाचा आवाज ऐकत आहे. तो येत आहे,
|
|
\q डोंगरावरुन उड्या मारत,
|
|
\q टेकड्यांवरुन बागडत येत आहे.
|
|
\q
|
|
\v 9 माझा प्रियकर मृगासारखा, हरीणीच्या पाडसासारखा आहे.
|
|
\q आमच्या भिंतीच्या मागे उभा आहे,
|
|
\q खिडकीतून डोकावणाऱ्या,
|
|
\q झरोक्यातून पाहणाऱ्या माझ्या प्रियकराला बघा.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 10 माझा प्रियकर माझ्याशी बोलला आणि म्हणाला,
|
|
\q माझ्या प्रिये, ऊठ, माझ्या सुंदरी, ये आपण दूर जाऊ या!
|
|
\q
|
|
\v 11 बघ आता हिवाळा संपला आहे.
|
|
\q पाऊस आला आणि गेला.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 12 भूमीवर फुले दिसत आहेत,
|
|
\q पक्ष्यांची गाण्याची वेळ आली आहे.
|
|
\q आणि आमच्या देशात कबुतरांचा आवाज ऐकू येत आहे.
|
|
\q
|
|
\v 13 अंजिराच्या झाडावरील हिरवे अंजीर पिकवीत आहे.
|
|
\q आणि द्राक्षवेलीस फुले आली आहेत.
|
|
\q ती सुगंध पसरीत आहे. अगे माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ आपण आता दूर जाऊ या.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 14 माझ्या कबुतरा, उंच कड्यावरच्या खडकात लपलेल्या,
|
|
\q पर्वतात लपलेल्या माझ्या कबुतरा,
|
|
\q मला तुझे मुख पाहू दे.
|
|
\q मला तुझा आवाज ऐकू दे.
|
|
\q तुझा आवाज अतिशय गोड आहे आणि तुझा चेहरा खूप सुंदर आहे.
|
|
\s5
|
|
\v 15 (ती स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलत आहे) आमच्यासाठी कोल्ह्यांना पकडा.
|
|
\q लहान कोल्ह्यांनी द्राक्षमळ्यांचा नाश केला आहे.
|
|
\q कारण आमचे द्राक्षांचे मळे फुलले आहेत.
|
|
\s5
|
|
\v 16 (ती स्त्री स्वतःशी बोलत आहे) माझा प्रियकर माझा आहे आणि मी त्याची आहे.
|
|
\q तो आपला कळप कमळांच्यामध्ये चारीत आहे.
|
|
\v 17 (ती स्त्री तिच्या प्रियकरांबरोबर बोलत आहे) शिळोप्याची वेळ येईपर्यंत, आणि सावल्या लांब पळून जातील तोपर्यंत, तू फिरत राहा.
|
|
\q माझ्या प्राणप्रिया, वियोगाच्या पर्वतावर हरीणासारखा किंवा हरीणीच्या पाडसासारखा परत फीर.
|
|
|
|
\s5
|
|
\c 3
|
|
\q
|
|
\v 1 (ती स्त्री स्वतःशी बोलते) रात्रीच्या वेळी मी माझ्या शय्येवर पडले असता
|
|
\q ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो
|
|
\q त्याची उत्कंठा मला लागली. मी त्याला उत्कटतेने शोधले
|
|
\q पण तो मला सापडला नाही.
|
|
\q
|
|
\v 2 मी स्वतःशीच म्हणाले, मी उठून, शहरासभोवती,
|
|
\q रस्त्यावर आणि चौकांत फिरून माझ्या प्राणप्रियाला शोधीन.
|
|
\q मी त्याला शोधले पण मला तो सापडला नाही.
|
|
\s5
|
|
\v 3 शहरात पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांना मी सापडले.
|
|
\q मी त्यांना विचारले, “माझा प्राणप्रियाला तुम्ही पाहिलेत का?”
|
|
\q
|
|
\v 4 मी पहारेकऱ्यांना सोडून निघाले होते.
|
|
\q इतक्यात ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो तो माझा प्राणप्रिय मला सापडला.
|
|
\q मी त्याला धरले. मी त्याला जाऊ दिले नाही.
|
|
\q मी त्याला माझ्या आईच्या घरी नेले.
|
|
\q जिने माझे गर्भधारण केले तिच्या खोलीत आणीपर्यंत मी त्याला सोडले नाही.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 5 (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलत आहे) यरुशलेमेच्या कन्यांनो,
|
|
\q रानतल्या हरीणी आणि मृगी यांच्या साक्षीने मी शपथ घालून सांगते.
|
|
\q आमचे प्रेम करणे संपत नाही
|
|
\q तोपर्यंत त्यामध्ये व्यत्यय आणू नका.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 6 (ती तरुणी स्वतःशीच बोलते) गंधरस व ऊद व्यापाऱ्याकडील
|
|
\q सर्व चूर्णानी सुवासिक द्रव्ये यांच्या सुगंधाने
|
|
\q अशी धुराच्या खांबासारखी
|
|
\q रानातून येणारी ती ही कोण आहे?
|
|
\q
|
|
\v 7 पाहा, ती शलमोनाची पालखी येत आहे.
|
|
\q त्याच्यासभोवती साठ सैनिक आहेत,
|
|
\q ते साठजण इस्राएलाच्या सैनिकांपैकी आहेत.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 8 ते सगळे निपुण लढवय्ये व तलवारधारी आहेत.
|
|
\q रात्री येणाऱ्या कोणत्याही संकटाचा मुकाबला
|
|
\q करायला ते तयार आहेत.
|
|
\q
|
|
\v 9 राजा शलमोनाने स्वत:साठी
|
|
\q लबानोनी लाकडाची पालखी तयार केली.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 10 त्याने खांब चांदीचे केले.
|
|
\q पाठ सोन्याची केली.
|
|
\q बैठक जांभळ्या रंगाच्या कापडाने मढवली.
|
|
\q त्याचा अंतर्भाग यरुशलेमेच्या कन्यांनी प्रेमाने सजवला आहे.
|
|
\q
|
|
\v 11 (ती स्त्री यरुशलेमेच्या स्त्रियांशी बोलत आहे) सीयोनेच्या कन्यांनो बाहेर या, आणि राजा शलमोनाला पाहा.
|
|
\q ज्या दिवशी त्याचे लग्र झाले,
|
|
\q त्यादिवशी त्याच्या आईने त्याच्या मस्तकावर ठेवलेला मुकुट पाहा.
|
|
\q ज्या दिवशी तो खूप आनंदी होता.
|
|
|
|
\s5
|
|
\c 4
|
|
\q
|
|
\v 1 (त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) अहा! प्रिये, तू सुंदर आहेस! तू खूप सुंदर आहेस.
|
|
\q तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे डोळे कबुतर असे आहेत.
|
|
\q तुझे केस गिलाद पर्वताच्या उतारावरुन जाणाऱ्या
|
|
\q शेरड्याच्या कळपाप्रमाणे हेलकावणारे आहेत.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 2 लोकर कातरून धुतलेल्या मेंढ्या वर आल्या आहेत, ज्यातल्या प्रत्येकीस जुळे आहे.
|
|
\q त्यांच्यापैकी कोणालाही हिरावून घेतलेले नाही.
|
|
\q त्याच्या कळपासारखे तुझे दात आहेत.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 3 तुझे ओठ किरमिजी रंगाच्या धाग्याप्रमाणे आहेत.
|
|
\q तुझे मुख सुंदर आहे.
|
|
\q तुझ्या बुरख्याच्या आत
|
|
\q तुझी कानशिले दोन बाजू डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 4 तुझी मान दाविदाने शस्रगारासाठी बांधलेल्या मनोऱ्याप्रमाणे आहे.
|
|
\q ज्याच्यावर सैनिकांच्या एक हजार ढाली व कवचे लटकत आहेत.
|
|
\q
|
|
\v 5 हरीणीची जी जुळी,
|
|
\q जे दोन पाडस कमलपुष्पांच्यामध्ये चरतात
|
|
\q त्यांच्यासारखी तुझी दोन वक्षस्थळे आहेत.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 6 दिवस शेवटच्या घटका मोजत आहेत आणि सावल्या दूर पळत आहेत.
|
|
\q तेवढ्या वेळात मी त्या गंधरसाच्या पर्वतावर
|
|
\q ऊदाच्या टेकडीवर जाईन.
|
|
\q
|
|
\v 7 प्रिये, तू सगळीच फार सुंदर आहेस.
|
|
\q तुझ्यात कुठेही काहीही दोष नाही.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 8 लबोनान मधून माझ्या वधू, तू माझ्याबरोबर ये.
|
|
\q लबानोनातून माझ्याबरोबर ये. अमानाच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये, सनीर व हर्मोन यांच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये. सिंहाच्या गुहेतून, चित्त्याच्या पर्वतावरुन माझ्याबरोबर ये.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 9 अगे माझ्या बहिणी, माझ्या वधू,
|
|
\q तू माझे हृदय हरण केले आहेस.
|
|
\q तुझ्या नेत्रकटाक्षाने, तुझ्या गळ्यातल्या हारातील एका रत्नाने
|
|
\q तू माझे हृदय चोरले आहेस.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 10 माझ्या प्रिये, माझ्या वधू, तुझे प्रेम फार सुंदर आहे.
|
|
\q तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा चांगले आहे.
|
|
\q तुझ्या अत्तराचा वास इतर सुगंधी द्रव्यापेक्षा चांगला आहे.
|
|
\q
|
|
\v 11 माझ्या वधू, तुझ्या ओठातून मध गळतो.
|
|
\q तुझ्या जिभेखाली मध आणि दूध आहे.
|
|
\q तुझ्या कपड्यांना लबानोनाच्या वासासारखा गोड सुवास आहे.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 12 माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू तर बंद केलेल्या बागेसारखी आहेस.
|
|
\q तू बंद असलेल्या झऱ्यासारखी, शिक्का मारलेल्या कारंज्यासारखी आहेस.
|
|
\q
|
|
\v 13 तुझी रोपे मोलवान फुले असलेला डाळिंबाचा मळा अशी आहेत.
|
|
\q त्यामध्ये कापराची व जटामांसीची झाडे,
|
|
\q
|
|
\v 14 मेंदी, जटामांसी, केशर,
|
|
\q वेखंड व दालचिनी इत्यादींनी भरलेल्या बागेसारखे आहेत.
|
|
\q तुझे अवयव उदाची झाडे, गंधरस व अगरू व इतर सुगंधी झाडांनी भरलेल्या बागेसारखे आहेत.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 15 तू बागेतल्या कारंज्यासाखी,
|
|
\q ताज्या पाण्याच्या विहिरीसारखी,
|
|
\q लबानोनाच्या पर्वतावरुन वाहात जाणाऱ्या पाण्यासारखी आहेस.
|
|
\q
|
|
\v 16 (तरुणी आपल्या प्रियकराबरोबर बोलते) उत्तरेकडच्या वाऱ्या, ऊठ! दक्षिणवाऱ्या ये,
|
|
\q माझ्या बागेवरुन वाहा. तिचा गोड सुगंध सर्वत्र पसरव.
|
|
\q माझा सखा त्याच्या बागेत येवो
|
|
\q आणि त्याच्या आवडीची फळे खावो.
|
|
|
|
\s5
|
|
\c 5
|
|
\p
|
|
\v 1 (स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) माझे बहिणी, माझे वधू, मी माझ्या बागेत गेलो.
|
|
\q मी माझा गंधरस व माझी सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत.
|
|
\q मी माझा मध मधाच्या पोळ्यासहीत खाल्ला आहे.
|
|
\q मी माझा द्राक्षारस व दूध प्यालो आहे.
|
|
\q मित्रांनो, खा.
|
|
\q माझ्या प्रियांनो; प्या, मनसोक्त प्या.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 2 (ती तरुणी स्वतःशी बोलते) मी झोपलेली आहे. पण माझे हृदय स्वप्नात जागे आहे.
|
|
\q माझा प्रियकर दार वाजवतो आणि म्हणतो,
|
|
\q माझे बहिणी, माझ्या प्रिये, माझ्या कबुतरा, माझ्या निर्दोषे! माझे डोके दहिवराने ओले झाले आहे.
|
|
\q माझे केस रात्रीच्या दवबिंदूने ओलसर झाले आहेत.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 3 (तरुण स्त्री स्वतःशी बोलते) मी माझा पोषाख काढून टाकला आहे. तो पुन्हा मी कसा अंगात घालू?
|
|
\q मी माझे पाय धुतले आहेत. ते मी कसे मळवू?
|
|
\q
|
|
\v 4 पण माझ्या प्रियकराने फटीतून हात घातला
|
|
\q आणि माझे हृदय त्याच्यासाठी कळवळले.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 5 माझ्या प्रियकराला दार उघडायला मी उठले.
|
|
\q तेव्हा माझ्या हातास
|
|
\q दाराच्या कडीवरील गंधरस लागला.
|
|
\q माझ्या बोटांवरून त्याचा द्रव गळत होता.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 6 मी माझ्या प्रियकरासाठी दार उघडले.
|
|
\q पण माझा प्रियकर तोंड फिरवून व निघून गेला होता.
|
|
\q तो गेला तेव्हा माझा जीव गळून गेला.
|
|
\q मी त्याला शोधले पण तो मला सापडला नाही.
|
|
\q मी त्याला हाक मारली पण त्याने मला उत्तर दिले नाही.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 7 शहरावर पहारा करणाऱ्या पहारेकऱ्यांना मी दिसले.
|
|
\q त्यांनी मला मारले, जखमी केले.
|
|
\q कोटावरच्या पहारेकऱ्यांनी माझा अंगरखा घेतला.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 8 (ती स्त्री त्या शहरातील स्त्रीयांशी बोलत आहे) यरुशलेमेच्या कन्यांनो! मी तुम्हाला शपथ घालून सांगते,
|
|
\q जर तुम्हाला माझा प्रियकर सापडला,
|
|
\q तर कृपाकरून त्याला सांगा की, मी प्रेमामुळे आजारी झाले आहे.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 9 (त्या शहरातील स्त्रिया त्या तरुणीशी बोलत आहेत) अगे स्त्रियांतील सर्वात सुंदरी!
|
|
\q तुझा प्रियकर इतर प्रियकरांहून अधिक चांगला आहे तो कसा काय?
|
|
\q तू आम्हास अशी शपथ घालतेस तर तुझ्या प्रियकरांत इत्तरापेक्षा अधिक ते काय आहे?
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 10 माझा प्रियकर गोरापान व लालबुंद आहे.
|
|
\q तो दहा हजारात श्रेष्ठ आहे.
|
|
\q
|
|
\v 11 त्याचे मस्तक शुध्द सोन्याप्रमाणे आहे.
|
|
\q त्याचे केस कुरळे आहेत आणि डोंमकावळ्यासारखे काळे आहेत.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 12 त्याचे डोळे झऱ्याजवळच्या कबुतरासारखे आहेत,
|
|
\q दुधात धुतलेले कबुतरासारखे आहेत कोदंणात जडलेल्या मोलवान खड्यासारखे आहेत.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 13 त्याचे गाल सुगंधी झाडाचे वाफे,
|
|
\q सुगंधी फुलझाडांचे ताटवे असे आहेत,
|
|
\q अत्तरासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलांसारखे आहेत.
|
|
\q त्याचे ओठ कमलपुष्पाप्रमाणे असून त्यातून गंधरस स्रवतो.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 14 त्याचे हात रत्नांनी जडवलेल्या सोन्याच्या कांबीप्रमाणे आहेत.
|
|
\q त्याचे पोट नीलमणी जडवलेल्या मऊ हस्तिदंतफलकासारखे आहे.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 15 त्याचे पाय सोन्याचा पाया असलेल्या संगमरवरी खांबासारखे आहेत.
|
|
\q त्याचे रुप लबानोनासारखे आहे. ते गंधसरू झाडासारखे उत्कृष्ट आहे.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 16 होय, यरुशलेमच्या कन्यांनो,
|
|
\q माझा प्रियकर हाच माझा सखा आहे.
|
|
\q त्याची वाणी सर्वांत गोड आहे.
|
|
\q तो सर्वस्वी सुंदर आहे.
|
|
|
|
\s5
|
|
\c 6
|
|
\q
|
|
\v 1 (यरुशलेमेतील स्त्री तरुणीशी बोलत आहे) स्त्रियांतील सर्वात सुंदरी!
|
|
\q तुझा प्रियकर कोठे गेला आहे?
|
|
\q तुझा प्रियकर कोणत्या दिशेने गेला आहे म्हणजे,
|
|
\q तुझ्याबरोबर आम्ही त्याला शोधावयाला येऊ?
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 2 (ती तरुण स्त्री स्वतःशीच बोलते) माझा प्रियकर आपल्या बागेत सुगंधी झाडांच्या वाफ्यांकडे,
|
|
\q बागेत आपला कळप चारायला
|
|
\q आणि कमळे वेचण्यास गेला आहे.
|
|
\q
|
|
\v 3 मी आपल्या प्रियकराची आहे. तो प्रियकर माझा आहे.
|
|
\q तो आपला कळप कमलपुष्पात चारत आहे.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 4 (स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) माझ्या प्रिये, तू तिरसा नगरीप्रमाणे सुंदर आहेस.
|
|
\q यरुशलेमेसारखी सुरूप आहेस.
|
|
\q ध्वजा फडकिवणाऱ्या सेनेसारखी भयंकर आहेस.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 5 तू आपले डोळे माझ्यापासून फिरीव
|
|
\q त्यांनी मला घाबरे केले आहे.
|
|
\q जो शेरडांचा कळप गिलाद पर्वताच्या बाजूवर बसला आहे
|
|
\q त्यासारखे तुझे केस आहेत.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 6 ज्या मेंढ्या धुतल्या जाऊन वरती आल्या आहेत,
|
|
\q ज्यांतल्या प्रत्येकीला जुळे आहे,
|
|
\q आणि ज्यांतली कोणी पिल्ला वेगळी झाली नाही,
|
|
\q त्यांच्या कळपासारखे तुझे दात आहेत.
|
|
\q
|
|
\v 7 तुझ्या बुरख्याच्या आत तुझी कानशिले
|
|
\q डाळिंबाच्या फोडींसारखी आहेत.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 8 (स्त्रीचा प्रियकर स्वतःशीच बोलतो) साठ राण्या आणि ऐंशी उपपत्नी,
|
|
\q आणि अगणित कुमारी असतील.
|
|
\q
|
|
\v 9 पण माझे कबुतर, माझी सर्वोत्कृष्ट एकच आहे,
|
|
\q ती तिच्या आईची एकुलती एक विशेष मुलगी आहे,
|
|
\q आपल्या जननीची आवडती आहे. माझ्या नगरातील कन्यांनी तिला पाहिले आणि तिला आशीर्वादित म्हटले,
|
|
\q राण्यांनी आणि उपपत्नींनीसुध्दा तिची स्तुती केली.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 10 ती पहाटेप्रमाणे चमकते आहे,
|
|
\q ती चंद्रासारखी सुंदर आहे.
|
|
\q सूर्यासारखी तेजस्वी आहे
|
|
\q आणि आकाशातल्या सैन्याप्रमाणे भयंकर आहे. ती पूर्णपणे आकर्षित करून घेणारी कोण आहे?
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 11 खोऱ्यातील हिरवीगार झाडेझुडपे बघायला,
|
|
\q द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की काय,
|
|
\q डाळिंबांना फुले आले आहेत की काय,
|
|
\q ते बघायला मी आक्रोडाच्या मळ्यातून गेलो.
|
|
\q
|
|
\v 12 मी खूप आनंदीत होते
|
|
\q जसे मला राजपुत्राच्या रथात बसवले होते.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 13 (त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) मागे फिर, परत ये, हे शुलेमकरिणी परिपूर्ण स्त्री,
|
|
\q मागे फिर, मागे फिर म्हणजे आम्ही तुला बघू शकू,
|
|
\q (ती तरुण स्त्री प्रियकराला म्हणते) त्या परिपूर्ण स्त्रीकडे तुम्ही टक लावून का पाहता?
|
|
\q जसे मी दोन नृत्य करणाऱ्याच्या रांगेत नृत्य करत आहे काय?
|
|
|
|
\s5
|
|
\c 7
|
|
\q
|
|
\v 1 (त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलतो) हे राजकन्ये, त्या चपलांमधे तुझे पाय सुंदर दिसतात.
|
|
\q कुशल कारागिराच्या हातच्या दागिन्यासारखा
|
|
\q तुझ्या माड्यांचा बांक आहे.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 2 तुझी बेंबी गोल कपासारखी आहे,
|
|
\q त्यामध्ये मिश्र द्राक्षारसातील उणीव कधीही नसावी.
|
|
\q तुझे पोट सभोवती कमलपुष्ये ठेवलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 3 तुझी वक्षस्थळे तरुण हरीणीच्या जुळ्या पाडसांसारखी आहेत.
|
|
\q
|
|
\v 4 तुझा मान हस्तिदंती मनोऱ्यासारखी आहे.
|
|
\q तुझे डोळे बाथ-रब्बीमच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या हेशबोनच्या तळ्यांसारखे आहेत.
|
|
\q तुझे नाक दिमिष्कासाकडे बघणाऱ्या लबानोनाच्या मनोऱ्यासारखे आहे.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 5 तुझे मस्तक कर्मेलासारखे आहे
|
|
\q आणि तुझ्या मस्तकावरचे केस जांभळ्या रेशमासारखे आहेत.
|
|
\q तुझे लांब मोकळे केस राजालासुध्दा बांधून ठेवतात.
|
|
\q
|
|
\v 6 अगे प्रिये, आनंदाकरता तू किती सुंदर आहेस
|
|
\q व किती गोड आहेस.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 7 तुझा उंची खजुरीच्या झाडासारखी
|
|
\q आणि तुझे वक्ष त्याच्या फळांच्या घोसासारखे आहेत.
|
|
\q
|
|
\v 8 मी विचार केला, मी खजुरीच्या झाडावर चढेल
|
|
\q त्याच्या फांद्यांना धरील.
|
|
\q तुझी वक्षस्थळे द्राक्षाच्या घोसासारखी
|
|
\q आणि तुझ्या श्वासाचा सुगंध सफरचंदासारखा असू दे.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 9 तुझे तोंड सर्वात उंची द्राक्षारसाप्रमाणे व्हावे.
|
|
\q तो माझ्या प्रियेसाठी घशात नीट उतरतो व झोपलेल्यांच्या ओठांवरून सहज गळतो,
|
|
\q त्यासारखे तुझे तोंड असो.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 10 (ती तरुण स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलते) मी आपल्या प्रियकराची आहे, त्याचे मन माझ्यावर बसले आहे.
|
|
\q
|
|
\v 11 माझ्या प्रियकरा, ये आपण बाहेर पटांगणांत जाऊ.
|
|
\q आपण खेेड्यात रात्र घालवू.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 12 आपण सकाळी लवकर उठून द्राक्षाच्या मळ्यात जाऊ.
|
|
\q द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की नाहीत ते पाहू.
|
|
\q आणि जर डाळिंब बहरत असतील तर प्रियकरा,
|
|
\q तेथे मी तुला माझे प्रेम अर्पण करीन.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 13 पुत्रदात्रीचा सुवास सुटला आहे
|
|
\q आणि आपल्या दाराजवळ नाना प्रकारची नव्या जुन्या बारांची उत्तम फळे आली आहेत.
|
|
\q माझ्या प्राणप्रिया ती मी तुझ्यासाठी जतन करून ठेवली आहेत.
|
|
|
|
\s5
|
|
\c 8
|
|
\q
|
|
\v 1 (तरुण स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलते) माझ्या आईचे स्तनपान केलेल्या
|
|
\q माझ्या बंधुसारखा तू असतास तर किती बरे होते.
|
|
\q तू जर मला बाहेर भेटल्यास मी तुझे चुंबन घेतले असते
|
|
\q आणि मग माझा कोणीही अपमान केला नसता.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 2 मी तुला माझ्याबरोबर चालवून आईच्या घरात आणले असते.
|
|
\q तू मला शिकवले असते.
|
|
\q मी तुला मसाला घातलेला द्राक्षारस
|
|
\q आणि माझ्या डाळिंबाचा रस प्यायला दिला असता.
|
|
\q
|
|
\v 3 त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली असता आणि
|
|
\q त्याचा उजवा हात मला आलिंगीत असता.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 4 (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलते) यरुशलेमच्या कन्यांनो,
|
|
\q मी तुम्हाला शपथ घालते.
|
|
\q माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका. समाधान होईपर्यंत
|
|
\q राहू द्या.
|
|
\s5
|
|
\v 5 (यरुशलेमेतील स्त्री बोलते) आपल्या प्रियकरावर टेकत रानातून येणारी ही स्त्री कोण आहे?
|
|
\q (ती तरूण स्त्री आपल्या प्रियकराशी बोलते) मी तुला सफरचंदाच्या झाडाखाली उठवले,
|
|
\q तेथे तुझ्या आईने तुझे गर्भधारण केले,
|
|
\q तेथे तिने तुला जन्म दिला, ती तुला प्रसवली.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 6 तू आपल्या हृदयावर शिक्क्याप्रमाणे,
|
|
\q आपल्या बाहूवर शिक्क्यासारखी मला ठेव.
|
|
\q कारण प्रेम मृत्यूसारखेच शक्तिशाली आहे. प्रेमसंशय मृतलोकासारखा कठोर आहे.
|
|
\q त्याची ज्वाला, अग्नीज्वालेसारखी,
|
|
\q किंबहुना परमेशाने प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 7 असले प्रेम महाजलांच्यानेहि विझवणार नाही.
|
|
\q महापुरांनी तिला बुडवून टाकिता येणार नाही.
|
|
\q जरी मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी
|
|
\q ती त्यापुढे अगदी तुच्छ होय.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 8 (त्या तरुण स्त्रीचा बंधू त्यांच्या विषयी बोलतो) आम्हाला एक लहान बहीण आहे
|
|
\q आणि तिच्या वक्षस्थळांची अजून पूर्ण वाढ झालेली नाही.
|
|
\q आमच्या या बहिणीस लग्नाची मागणी होईल त्या दिवशी आम्ही काय करावे?
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 9 ती जर भिंत असती तर
|
|
\q आम्ही तिच्याभोवती चांदीचा मनोरा उभारला असता.
|
|
\q ती जर दार असती तर
|
|
\q तिच्या भोवती आम्ही गंधसरूच्या फळ्यांनी झाकले असते.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 10 (ती तरुण स्त्री स्वतःशीच बोलते) मी भिंत आहे आणि माझी वक्षस्थळे बुरूजासारखे होते.
|
|
\q म्हणून मी आपल्या प्रियकराच्या दृष्टीने पूर्ण समाधानी आहे.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 11 (ती तरुणी स्वतःशी बोलते) बाल-हामोन येथे शलमोनाचा एक द्राक्षाचा मळा होता.
|
|
\q त्याने तो मळा राखणाऱ्यांच्या स्वाधीन केला,
|
|
\q त्याच्या फळांसाठी प्रत्येकाला एक हजार रुपये द्यावे लागत.
|
|
\q
|
|
\v 12 माझाहि एक द्राक्षीचा मळा आहे. तो माझाच आहे तो माझ्यापुढे आहे.
|
|
\q हे शलमोना, त्याचे हजार तुझे होतील, आणि दोनशे जो राखतात त्यांचे होतील.
|
|
\q
|
|
\s5
|
|
\v 13 (स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे.) जी तू बागेत राहतेस.
|
|
\q त्या तुझ्या मैत्रिणी तुझा आवाज ऐकत आहेत.
|
|
\q मलाही तो ऐकू दे!
|
|
\s5
|
|
\v 14 (ती तरुण स्त्री तिच्या प्रियकराशी बोलते) माझ्या प्रियकरा त्वरा कर.
|
|
\q सुगंधी झाडांच्या पर्वतावर हरीणासारखा,
|
|
\q तरुण हरीणीच्या पाडसासारखा तू हो. |