mr_ulb/64-2JN.usfm

37 lines
4.7 KiB
Plaintext

\id 2JN - Marathi Old Version Revision
\ide UTF-8
\rem Copyright information: creative Commons Attribution- Share Alike 4.0 License
\h योहानाचे दुसरे पत्र
\toc1 योहानाचे दुसरे पत्र
\toc2 २ योहा.
\s5
\c 1
\p
\v 1 वडिलांकडून, देवाने निवडलेली बाई व तिच्या मुलांना, सत्यात सहभागी असलेल्या लोकांप्रमाणे ज्यांच्यावर मी प्रीती करतो, आणि तुमच्यावर प्रीती करणारा मी एकटाच नाही, तर ज्यांची सत्याशी ओळख झाली आहे असे इतर सर्वजणसुध्दा प्रीती करतात.
\v 2 या सत्यामुळे जे आमच्यामध्ये असते, ते आमच्यामध्ये सर्वकाळ राहील.
\v 3 देवपित्यापासून आणि पित्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याजपासून कृपा, दया व शांती ही सत्यात व प्रीतीत आपणाबरोबर राहोत
\s5
\p
\v 4 पित्याने आपल्याला दिलेल्या आज्ञेप्रमाणे तुझी काही मुले सत्यात चालतात असे मला दिसून आले यावरून मला फार आनंद झाला.
\v 5 आणि बाई, मी तुला आता, विनंति करतो की, आपण एकमेकांवर प्रीती करावी. ही मी तुला नवी आज्ञा करतो असे नाही, तर जी प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच लिहितो.
\v 6 आणि त्याच्या आज्ञेत चालणे म्हणजेच प्रीती करणे होय. हीच आज्ञा आहे जी तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे.
\s5
\p
\v 7 कारण फसवणूक करणारी, म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत.फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधक असलाच आहे.
\v 8 आम्ही केलेले काम तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हास मिळावे, म्हणून खबरदारी घ्या.
\s5
\p
\v 9 ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहतां जो पुढेंपुढेंच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो ख्रिस्ताच्या शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र ह्या दोघांची प्राप्ति झाली आहे.
\v 10 हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका. किंवा त्याला सलामही करू नका.
\v 11 कारण जो कोणी त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्मांचा भागीदार होतो.
\s5
\p
\v 12 मला जरी अनेक गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत तरी त्या तुम्हाला मी शाई व लेखणीने लिहू इच्छित नाही. तर त्याऐवजी तुम्हाला भेटावे व प्रत्यक्ष सर्वकाही बोलावे अशी आशा मनात बाळगून आहे. म्हणजे आपला आनंद त्यामुळे परिपूर्ण होईल.
\v 13 देवाने निवडून घेतलेल्या तुमच्या बहिणींची मुले तुम्हाला सलाम सांगतात.