mr_ulb/45-ACT.usfm

1991 lines
356 KiB
Plaintext
Raw Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

\id ACT - Marathi Older Version Revision
\ide UTF-8
\rem Copyright information: creative Commons Attribution- Share Alike 4.0 License
\h प्रेषितांची कृत्ये
\toc1 प्रेषितांची कृत्ये
\toc2 प्रे.
\s5
\c 1
\s विषय प्रवेश
\p
\v 1 हे थियफिल महाराज, येशूचे जे प्रेषित होते त्यांना पवित्र आत्म्याच्याद्वारे आज्ञा केली व नंतर तो वर घेतला गेला,
\v 2 त्या दिवसापर्यंत पवित्र आत्म्याने जे जे आज्ञापिले व शिकवावयास आरंभिले होते त्या सर्वाविषयी मी पहिला ग्रंथ केला.
\v 3 मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखविले. चाळीस दिवसपर्यत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे.
\s5
\v 4 तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की, यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगी विषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पाहा.
\v 5 कारण योहानाने पाण्याने तुमचा बाप्तिस्मा केला खरा थोडया दिवसांनी तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.
\s येशूचे स्वर्गारोहण
\s5
\p
\v 6 मग ते एकत्र असताना शिष्यांनी येशूला विचारले, प्रभूजी, ह्याच काळात आपण इस्राएलांचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?
\v 7 तो त्यांना म्हणाला, पित्याने स्वत:च्या अधिकारात काळ व समय ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही.
\v 8 परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरूशलेमेत, सर्व यहूदीयांत, शोमरोनांत व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.
\s5
\v 9 असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यादेखत तोवर घेतला गेला; आणि मेघांनी त्याला दृष्टीआड केले.
\v 10 तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरूष त्यांच्याजवळ उभे राहिले.
\v 11 ते म्हणाले अहो गालीलकारांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिले आहात? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच, तुम्ही त्याला जसे आकाशात जातांना पाहिले, तसाच परत येईल.
\s बाराव्या प्रेषिताची नेमणूक
\s5
\p
\v 12 मग यरुशलेमेजवळ म्हणजे शब्बाथ दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनांचा डोंगरावरून ते यरूशलेमेस परत आले.
\v 13 आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत जिथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहूदा हे राहत होते तिथे गेले;
\v 14 हे सर्व जण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरीया व त्याचे भाऊ एकचित्ताने एकसारखे प्रार्थना करत होते.
\s5
\v 15 त्यादिवसात पेत्र बंधुवर्गामध्ये (सुमारे एकशेवीस माणसांच्या जमावामध्ये) उभा राहून म्हणाला,
\v 16 बंधुजनहो, येशूला धरून नेणाऱ्यांना वाट दाखविणाऱ्या यहूदाविषयी पवित्र आत्म्याने दावीदाच्या मुखावाटे जे भविष्य आधीच वर्तवले होते ते पूर्ण होण्याचे अगत्य होते.
\s5
\v 17 तो आपल्या मधलाच एक होता आणि त्याला ह्या सेवेतल्या लाभाचा त्याचा वाटा मिळाला होता.
\v 18 (त्याने आपल्या दुष्टाईची कृतीकरून मजुरीने शेत विकत घेतले; तो पालथा पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले, व त्याची आतडी बाहेर पडली.
\v 19 हे यरूशलेमेत राहणाऱ्या सर्वाना कळले म्हणून त्यांच्या भाषेत त्या शेताला हकलदमा म्हणजे रक्ताचे शेत असे नाव पडले आहे).
\s5
\v 20 स्तोत्रसहितेत असे लिहिले आहे की त्याचे घर उजाड पडो व त्यात कोणीही न राहो. आणि त्याचा हुद्दा दूसरा घेवो.
\s5
\v 21 म्हणून प्रभू येशू आमच्यामध्ये आत बाहेर येत जात होता त्या सर्व काळात,
\v 22 योहानाच्या बाप्तिस्म्यापासून तर ज्या दिवशी प्रभू येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले त्या दिवसापर्यंत, तर जी माणसे आपल्या संगतीसोबतीत होती त्यांच्यातून एकाने आपल्याबरोबर त्याच्या पुनरूत्थानाचा साक्षी झाले पाहिजे.
\v 23 तेव्हा ज्याचे उपनाव युस्त होते तो बर्सबा म्हटलेला योसेफ व मत्थिया, ह्या दोघांना त्यांनी पुढे आणले.
\s5
\v 24 मग त्यांनी अशी प्रार्थना केली हे सर्वाची हृदये जाणणाऱ्या प्रभू,
\v 25 हे सेवकपद व प्रेषितपद सोडून आपल्या जागी गेलेल्या यहूदाचे पद ज्याला मिळावे असा ह्या दोघांपैकी तू कोण निवडला आहेस ते दाखीव.
\v 26 मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठी निघाली; तेव्हा त्याला अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले.
\s5
\c 2
\s पवित्र आत्म्याचे दान
\p
\v 1 नंतर पेन्टीकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना,
\v 2 अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते वसले होते ते सर्व त्याने भरले.
\v 3 आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या.
\v 4 तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.
\s5
\v 5 त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्टांतील भक्तिमान यहूदी यरूशलेमेंत राहत होते.
\v 6 तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला; कारण प्रत्येकाने त्यांना आपआपल्या भाषेत बोलताना ऐकले.
\v 7 ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पाहा, हे बोलणारे सर्व गालीली ना?
\s5
\v 8 तर आपण प्रत्येक जण आपआपली जन्मभाषा ऐकतो हे कसे?
\v 9 पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहूदीया, कप्पुदुकिया, पंत, आसिया,
\v 10 फ्रुगिया, पंफूलिया, मिसर, व कुरणेच्या जवळचा लिबुवा देश ह्यात राहणारे, यहूदी व यहूदीयमतानूसारी असे रोमन प्रवासी,
\v 11 क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपआपल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.
\s5
\v 12 तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकांस म्हणाले, हे काय असेल?
\v 13 परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे नवीन द्राक्षारसाने मस्त झाले आहेत.
\s पेन्टेकॉस्टच्या वेळेचे पेत्राचे भाषण
\s5
\p
\v 14 तेव्हा पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहूदी लोकांनो व यरूशलेमेतील रहिवाश्यांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या.
\v 15 तुम्हाला वाटते हे मस्त झाले आहेत; पण असे नाही; कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे;
\s5
\v 16 परंतु योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते ते हे आहे.
\v 17 देव म्हणतो, शेवटल्या दिवसात 'असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरूणांस दृष्टांन्त होतील, व तुमच्या वृध्दास स्वप्ने पडतील;
\s5
\v 18 आणखी त्यादिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; ' म्हणजे ते संदेश देतील;
\v 19 आणि वर 'आकाशात अदभूते, व खाली 'पृथ्वीवर' चिन्हे, म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाफ अशी मी दाखवीन;
\s5
\v 20 परमेश्वराचा महान व प्रसिध्द दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल;
\v 21 तेव्हा असे होईल की, जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धांवा करील तो तरेल.'
\s5
\v 22 अहो इस्त्राएल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका; नासोरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, अदभूते व चिन्हे तुम्हाला दाखविली त्यावरून देवाने तुम्हाकरिता मान्यता दिलेला असा तो मनुष्य होता, ह्याची तुम्हाला माहिती आहे.
\v 23 तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले;
\v 24 त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले, कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते.
\s5
\v 25 दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो; 'मी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे; मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे;
\v 26 म्हणून माझे हृदय आनंदित, व माझी जीभ उल्हासित झालीच आणखी माझा देह ही आशेवर राहील.,
\s5
\v 27 कारण तू माझा जीव मृतलोकात राहू देणार नाहीस, व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.
\v 28 जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत; ते आपल्या समक्षतेने मला हर्षभरीत करिशील.
\s5
\v 29 बंधुजनहो, कुलाधिपति दावीद ह्याच्याविषयी मी तुम्हाबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यत आपल्यामध्ये आहे.
\v 30 तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की, देवाने त्याला अभिवचन दिले की, तुझ्या संतानातील एकाला तुझ्या राजासनावर बसवीन.'
\v 31 ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरूत्थानाविषयी असे बोलला की, 'त्याला मृतलोकात सोडून दिले नाही' व त्याच्या देहाला 'कुजण्याचा अनुभव आला नाही.'
\s5
\v 32 त्या येशूला देवाने उठवले ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहो.
\v 33 म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे, त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे.
\s5
\v 34 कारण दावीद स्वर्गास चढून गेला नाही; पण तो स्वतः म्हणतोः “परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की,
\v 35 मी तुझ्या शत्रूचे तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.'
\v 36 म्हणून इस्त्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.
\s5
\v 37 हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली, आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, बंधुजनहो, आम्ही काय करावे?
\v 38 पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.
\v 39 कारण हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना व 'जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर' आपला देव 'स्वतःकडे बोलावील तितक्यांना" दिले आहे.
\s5
\v 40 आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यास साक्ष दिली व बोध करून म्हटले, ह्या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.
\v 41 तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्या दिवशी त्यांच्यांत सुमारे तीन हजार माणसांची भर पडली.
\s ख्रिस्ती मंडळीचे धार्मिक जीवन
\p
\v 42 ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यांत व प्रार्थना करण्यांत तत्पर असत.
\s5
\v 43 तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले; आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भूत कृत्ये व चिन्हे घडत होती.
\v 44 तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते, आणि त्यांचे सर्वकाही समाईक होते,
\v 45 ते आपआपली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वांटून देत असत.
\s5
\v 46 ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत, आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवत.
\v 47 सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे.
\s5
\c 3
\s लंगड्या भिकाऱ्याला बरे करणे
\p
\v 1 आणि पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळेस, नवव्या ताशी वर मंदिरात जात होते.
\v 2 आणि जन्मापासून पांगळा असा एक मनुष्य होता; मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ मंदिरात जाणाऱ्याकडे भीक मागण्यास दररोज त्याला कोणीतरी नेऊन ठेवत असत.
\v 3 पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने त्यांच्याकडे भीक मागितली.
\s5
\v 4 तेव्हा पेत्र योहानाबरोबर त्याला निरखून पाहत म्हणाला, आमच्याकडे पाहा.
\v 5 तेव्हा त्यांच्यापासून काही मिळेल अशी आशा धरून त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले.
\v 6 आणि पेत्र म्हणाला, रूपे व सोने माझ्याजवळ काहीच नाही, पण जे माझ्याजवळ आहे ते मी तुला देतो; नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने उठून चालू लाग.
\s5
\v 7 आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले; तेव्हा लागलेच त्याची पावले व त्याचे घोटे यांत बळ आले.
\v 8 आणि तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला, आणि तो चालत व उड्या मारत व देवाची स्तुती करत त्याच्याबरोबर मंदिरात गेला.
\s5
\v 9 आणि सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले.
\v 10 आणि जो मंदिराच्या सुंदर दरवाजाजवळ भीक मागण्यासाठी बसत असे तो हाच आहे, असे त्यांनी त्याला ओळखले, तेव्हा त्याला जे झाले होते त्यावरून ते आश्चर्याने व विस्मयाने व्याप्त झाले.
\s पेत्राचे शलमोनाच्या देवडीवरील भाषण
\s5
\p
\v 11 तेव्हा तो पेत्राला व योहानाला धरून राहिला असता, सर्व लोक फार आश्चर्य करीत शलमोनाचा द्वारमंडप म्हटलेल्या ठिकाणी त्याच्याकडे धावत आले.
\v 12 हे पाहून पेत्राने त्या लोकास उत्तर दिले; तो म्हणाला, अहो इस्त्राएल मनुष्यांनो, यावरून तुम्ही आश्चर्य का करता, अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालायला लावले आहे, असे समजून आम्हाकडे का न्याहाळून पाहता?
\s5
\v 13 अब्राहामाचा व इसहाकाचा व याकोबाचा देव, आमच्या पूर्वजांचा देव, याने आपला सेवक येशू याचे गौरव केले आहे, त्याला तुम्ही मरणास सोपवून दिले, व पिलाताने त्याला सोडून देण्याचे ठरवले असताही त्याला तुम्ही त्याच्यासमक्ष नाकारले.
\v 14 तुम्ही तर जो पवित्र व नीतिमान त्याला नाकारले, आणि घातक माणूस आम्हाला द्यावा, असे मागितले;
\s5
\v 15 आणि जीवनाच्या अधिपतीला तुम्ही जिवे मारले; त्याला देवाने मेलेल्यामधून उठवले, याचे आम्ही साक्षी आहो.
\v 16 आणि त्याच्या नावाने, त्याच्या नावावरील विश्वासाकडून ज्याला तुम्ही पाहता व ओळखता त्या ह्या माणसाला शक्तिमान केले आहे; आणि त्याच्याद्वारे प्राप्त झालेल्या विश्वासानेच तुम्ही सर्वांच्यादेखत याला हे पूर्ण आरोग्य दिले आहे.
\s5
\v 17 तर आता भावांनो, मी जाणतो की, अज्ञानाने तुम्ही, तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही, हे केले;
\v 18 परंतु आपल्या ख्रिस्ताने दुःखे सोसावी म्हणून देवाने आपल्या सर्व भविष्यवाद्यांच्या तोंडाने जे पूर्वी कळवले होते ते याप्रमाणे पूर्ण केले आहे.
\s5
\v 19 तर तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप कराव फिरा, अशासाठी की, विसाव्याचे समय प्रभूच्या समक्षतेपासून यावेत,
\v 20 आणि तुमच्याकरिता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू याला त्याने पाठवावे.
\s5
\v 21 सर्व गोष्टींची सुस्थिती पुनःस्थापित होण्याच्या काळांपर्यत स्वर्गात त्याला राहणे अवश्य आहे; त्या काळाविषयी युगाच्या आरंभापासून देवाने आपल्या पवित्र भविष्यवाद्याच्या तोंडून सांगितले आहे
\v 22 मोशेने तर सांगितले की, प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा भविष्यवादी तुमच्या भावांमधून उठवील, तो जे काही तुम्हाला सांगेल ते सर्व त्याचे ऐका.
\v 23 आणि असे होईल की, जो कोणी जीव त्या भविष्यवाद्यांचे ऐकणार नाही तो लोकांमधून अगदी नष्ट केला जाईल.
\s5
\v 24 आणखी शमुवेलापासून जे भविष्यवादी परंपरेने झाले, जितके बोलत आले त्या सर्वानी ह्या दिवसाविषयी कळवले.
\v 25 तुम्ही भविष्यवाद्यांचे मुले आहा, आणि तुझ्या संततीद्वारे पृथ्वीतील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील, असे अब्राहामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांशी जो करार केला, त्या कराराची तुम्ही मुले आहा.
\v 26 देवाने आपला सेवक येशू याला उठवून प्रथम तुमच्याकडे पाठवले; यासाठी की त्याने तुमच्यातील प्रत्येकाला तुमच्या दुष्कर्मापासून फिरण्याने तुम्हास आशीर्वाद द्यावा.
\s5
\c 4
\s न्यायसभेपुढे पेत्र व योहान
\p
\v 1 पेत्र आणि योहान लोकांशी बोलत असता, याजक व मंदिराचा सरदार व सदूकी हे त्यांच्यावर चालून आले.
\v 2 कारण ते लोकांना शिक्षण देउन, येशूच्या द्वारे मेलेल्यातून पुन्हा उठणे आहे असे उघडपणे सांगत होते, म्हणून त्यांना फार संताप आला.
\v 3 तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली, व आता संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यत त्यांना बंदिशाळेत ठेवले.
\v 4 तरी वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळांनी विश्वास ठेवला, आणि विश्वास ठेवलेल्या पुरूषांची संख्या सुमारे पाच हजार होती.
\s5
\v 5 मग दुसऱ्या दिवशी असे झाले की, त्यांचे अधिकारी व वडील व नियमशास्त्र शिक्षक, हे यरूशलेमेत एकत्र जमले.
\v 6 आणि त्यात प्रमुख याजक हन्ना व कयफा, योहान, आलेक्सांद्र मुख्य याजकाचे जे सर्व नातेवाईक ते होते.
\v 7 आणि त्यांनी पेत्र व योहानाला मध्ये उभे करून विचारले, हे तुम्ही कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले?
\s5
\v 8 तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण झालेला असता त्यांना म्हणाला, अहो लोकांच्या अधिकाऱ्यांनो आणि वडिलांनो,
\v 9 एका आजारी माणसावर उपकार झाला, म्हणजे तो कशाने बरा करण्यात आला? याविषयी जर आमची चौकशी आज होत आहे,
\v 10 तर तुम्हा सर्वास व सर्व इस्त्राएल लोकास हे माहित असावे की, ज्याला तुम्ही वधस्तंभी दिले, ज्याला देवाने मेलेल्यामधून उठवले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने, हा माणूस बरा होऊन येथे तुमच्यापुढे उभा राहिला आहे.
\s5
\v 11 जो धोंडा तुम्ही बांधणाऱ्यांनी नाकारला, तो कोनशिला झाला, तो हाच आहे.
\v 12 आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही.
\s5
\v 13 तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, आणि ही निरक्षर व अशिक्षित माणसे आहेत हे जाणून, त्यांनी आश्चर्य केले, आणि हे येशूच्या संगतीत होते असे त्यांनी ओळखले, .
\v 14 तेव्हा तो बरा झालेला माणूस त्यांच्याजवळ उभा असलेला पाहून यहूदी पुढाऱ्यांना त्यांच्या विरूध्द काही बोलता येईना.
\s5
\v 15 मग त्यांना सभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा करून ते आपसात विचार करू लागले;
\v 16 ते म्हणाले, या माणसांस आपण काय करावे? कारण खरोखर यांच्याकडून प्रसिध्द चमत्कार घडला आहे, यरूशलेमेत राहणाऱ्या सर्वास माहित आहे, व ते आपण नाकारू शकत नाही.
\v 17 परंतु हे लोकांमध्ये अधिक पसरू नये, म्हणून आपण त्यांना अशी धमकी द्यावी की, यापुढे तुम्ही या नावाने कोणाशीही बोलू नये.
\v 18 मग त्यांनी पेत्र व योहानला बोलावून आज्ञा केली की, तुम्ही येशूच्या नावाने मुळीच बोलू नका व शिकवूंही नका.
\s5
\v 19 परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर देऊन म्हटले, देवापेक्षा तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे, हे तुम्हीच ठरवा.
\v 20 कारण ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या व ऐकल्या त्या आम्ही बोलू नयेत हे आम्हाला शक्य नाही.
\s5
\v 21 तेव्हा त्यांनी त्यांना आणखी धमकावून सोडून दिले, कारण लोकांमुळे त्यांना शिक्षा कशी करावी हे त्यांना काहीच सुचेना; कारण घडलेल्या गोष्टीवरून सर्व लोक देवाचे गौरव करीत होते.
\v 22 कारण ज्या माणसावर हा बरा करण्याचा चमत्कार घडला होता तो चाळीस वर्षाहून अधिक वयाचा होता.
\s पेत्र व योहान आपल्या मित्रांकडे परत येतात
\s5
\p
\v 23 तेव्हा त्यांची सुटका झाल्यानंतर ते आपल्या लोकांकडे आले, आणि मुख्य याजकांनी व वडिलांनी जे काही म्हटले होते ते सर्व त्यांनी सांगितले.
\v 24 ते ऐकून ते एकचित्त होऊन देवाला उच्च वाणीने म्हणाले, हे प्रभू, आकाश व पृथ्वी व समुद्र व त्यातील सर्वकाही ज्याने निर्माण केले तो तूच आहेस.
\v 25 तुझा सेवक, आमचा पूर्वज दावीद याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्याद्वारे तू म्हटले की, राष्ट्रे का खवळली, व लोकांनी व्यर्थ कल्पना का केल्या?
\s5
\v 26 प्रभूविरूध्द व त्याच्या ख्रिस्ताविरूध्द पृथ्वीचे राजे उभे राहिले व अधिकारी एकत्र जमले.
\s5
\v 27 कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्याविरूध्द ह्या नगरात परराष्ट्रीय व इस्त्राएली लोक यांच्याबरोबर हेरोद व पंतय पिलात एकत्र झाले,
\v 28 यासाठी की, जे काही घडावे म्हणून तुझ्या हाताने व तुझ्या इच्छेने पूर्वी नेमले होते ते त्यांनी करावे.
\s5
\v 29 तर हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा, आणि तुझ्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन बोलावे असे दान दे;
\v 30 तू आपला हात लोकास निरोगी करण्यास पुढे करीत असता असे कर की, तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चमत्कार व अदभूते घडावी असेहि कर.
\v 31 आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते एकत्र जमले होते ती हालली, आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.
\s समाईक निधी
\s5
\p
\v 32 तेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांचा समुदाय एक मनाचा व एकजिवाचा होता, आणि कोणीही आपल्या मालमत्तेतील काही आपले स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व पदार्थ समाईक होते.
\v 33 आणि प्रेषित मोठ्या सामर्थ्याने.प्रभू येशूच्या पुनरूत्थानाविषयी साक्ष देत होते; आणि त्या सर्वावर मोठी कृपा होती
\s5
\v 34 त्यांतील कोणालाही काही उणे नव्हते, कारण जितके जमिनीचे किंवा घरांचे मालक होते तितक्यांनी ती विकली आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणले,
\v 35 आणि ते प्रेषितांच्या पायाशी ठेवले; मग जसजशी कोणाला गरज लागत असे तसतसे ते प्रत्येकाला वाटून देत असत.
\s5
\v 36 आणि कुप्राचा राहणारा, लेवी योसेफ, ज्याला प्रेषितांनी बर्णबा, म्हणजे बोधाचा मुलगा असे नाव दिले होते,
\v 37 त्याची जमीन होती, ती त्याने विकून तिचा पैसा आणून प्रेषितांच्या पायाशी ठेवला.
\s5
\c 5
\s हनन्या व सप्पीरा
\p
\v 1 तेव्हा हनन्या नावाचा कोणीएक माणूस व त्याची बायको सप्पीरा यांनी आपली मालमत्ता विकली.
\v 2 मग, त्याने, त्या किंमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने ठेवून घेतला आणि काही भाग आणून प्रेषितांच्या पायाशी ठेवला.
\s5
\v 3 तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी आणि जमिनीच्या किंमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरले आहे?
\v 4 ती होती तोपर्यंत तुझी स्वतःची नव्हती काय? आणि ती विकल्यावर तुझ्याच स्वाधीन नव्हती काय? ही गोष्ट तू आपल्या मनात का आणली? तू माणसाशी नाही, तर देवाशी लबाडी केली आहे.
\v 5 तेव्हा हनन्याने हे शब्द ऐकताच खाली पडून प्राण सोडला. आणि हे ऐकणाऱ्या सर्वाना मोठे भय प्राप्त झाले.
\v 6 तेव्हा तरूणांनी उठून त्याला गुंडाळले, व बाहेर नेऊन पुरले.
\s5
\v 7 त्यानंतर सुमारे तीन तासांनतर त्याची बायको आत आली, पण जे झाले होते ते तिला समजले नव्हते.
\v 8 तेव्हा पेत्राने तिला म्हटले, मला सांग, तुम्ही एवढ्यालाच जमीन विकली काय? आणि तिने म्हटले, होय एवढ्यालाच.
\s5
\v 9 पण पेत्र तिला म्हणाला, प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही एकोपा का केला? पाहा, ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरले त्यांचे पाय दारापाशी आहेत; ते तुलाही उचलून बाहेर नेतील.
\v 10 तेव्हा लागलेच तिने त्यांच्या पायाजवळ पडून प्राण सोडला, आणि तरूण आत आले तेव्हा ती मेलेली अशी आढळली, आणि त्यांनी तिला बाहेर नेऊन तिच्या नवऱ्याजवळ पुरले.
\v 11 आणि सर्व मंडळीला व ज्यांनी ह्या गोष्टी ऐकल्या त्या सर्वांना मोठे भय प्राप्त झाले.
\s प्रेषितांनी केलेली अद्भुते
\s5
\p
\v 12 तेव्हा प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चमत्कार व अदभूते घडत असत; आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या द्वारमंडपात जमत असत.
\v 13 आणि इतर लोकांतला कोणी त्यांच्याशी मिळण्यास धजत नसे; तरी लोक त्यांना थोर मानीत असत.
\s5
\v 14 इतकेच नव्हे तर विश्वास धरणारे पुष्कळ पुरूष व स्त्रिया यांचे समुदाय प्रभूला मिळत असत.
\v 15 इतके चमत्कार घडले की लोकांनी दुखणेकऱ्यास उचलुन रत्यामध्ये आणले आणि पेत्र जवळून येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील कोणावर पडावी म्हणून त्यांना बाजांवर व पलंगावर ठेवले.
\v 16 आणखी यरुशलेमेच्या आसपासच्या चहूकडल्या गावांतील लोकांचे समुदाय रोग्यास व अशुध्द आत्म्यांनी पीडलेल्यांस घेउन येत असत.
\s न्यायसभेपुढे पुन्हा प्रेषित
\s5
\p
\v 17 तेव्हा प्रमुख याजक उठला, आणि तो व त्याच्याबरोबर असलेले सर्व सदूकी पंथाचे लोक हे आवेशाने भरले..
\v 18 आणि त्यांनी आपले हात प्रेषितांवर टाकून त्यांना सार्वजनिक बंदिशाळेत ठेवले.
\s5
\v 19 परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले, व त्यांना बाहेर आणून म्हटले,
\v 20 " जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाचा सर्व संदेश लोकांना सांगा."
\v 21 हे ऐकून उजाडताच ते मंदिरामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले.इकडे, प्रमुख याजक व त्यांच्याबरोबर जे होते त्यांनी येउन न्यायसभा व इस्त्राएल लोकांचे संपूर्ण वडीलमंडळ एकत्र बोलावले आणि त्यांना आणण्यास बंदिशाळेकडे पाठवले.
\s5
\v 22 पण तिकडे गेलेल्या शिपायांना ते तुरुंगात सापडले नाहीत; म्हणून त्यांनी परत येउन सांगितले की,
\v 23 बंदिशाळा चांगल्या व्यवस्थेने बंद केलेली आणि दरवाजांपाशी पहारेकरी उभे राहिलेले आम्हाला आढळले, परंतु तुरुंग उघडल्यावर आम्हाला आत कोणी सापडले नाही.
\s5
\v 24 हे वर्तमान ऐकून ह्याचा काय परिणाम होईल ह्याविषयी मंदिराचा सरदार व मुख्य याजक घोटाळ्यात पडले.
\v 25 इतक्यात कोणीतरी येऊन त्यांना असे सांगितले की, 'पाहा, ज्या माणसाला तुम्ही तुरुंगात ठेवले होते ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत.'
\s5
\v 26 तेव्हा सरदाराने शिपायांसह जाऊन त्यांना जुलूम न करिता आणले; कारण लोक आपणाला दगडमार करतील असे त्यांना भय वाटत होते.
\v 27 त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे. तेव्हा प्रमुख याजकाने त्यांना विचारले,
\v 28 "ह्या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हाला निक्षून सांगितले होते की नाही? तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरूशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणू पाहत आहात."
\s5
\v 29 परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, "आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.
\v 30 ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले;
\v 31 त्याने इस्त्राएलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले.
\v 32 ह्या गोष्टीविषयी आम्ही साक्षी आहोत आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे.
\s5
\v 33 हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जिवे मारण्याचा विचार करू लागले.
\v 34 परंतु सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलियेल नावाचा एक परूशी शास्त्राध्यापक होता; त्याने न्यायसभेत उभे राहून त्या माणसांना थोडा वेळ बाहेर पाठवण्यास सांगितले.
\s5
\v 35 मग तो त्यांना म्हणाला, "अहो इस्त्राएल लोकांनो, तुम्ही ह्या माणसांचे काय करणार ह्याविषयी जपून असा.
\v 36 कारण काही दिवसांपूर्वी थुदास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला; त्याला सुमारे चारशे माणसे मिळाली, तो मारला गेला आणि जितके त्याला मानत होते त्या सर्वाची दाणादाण होऊन ते नाहीसे झाले.
\v 37 त्याच्यामागून गालीलकर यहूदा नावनिशी होण्याच्या दिवसात पुढे आला व त्याने पुष्कळ लोकांना फितवून आपल्या नादी लावले; त्याचाही नाश झाला व जितके त्याला मानत होते त्या सर्वांची पांगापांग झाली.
\s5
\v 38 म्हणून मी तुम्हाला आता सांगतों, ह्या माणसांपासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या; कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास नष्ट होईल;
\v 39 परंतु ते देवाचे असल्यास तुम्हाला ते नष्ट करता यावयाचे नाही; तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल"
\s5
\v 40 तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले; त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि 'येशूच्या नावाने बोलू नका" असे निक्षून सांगून त्यांना सोडून दिले.
\v 41 ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यांत आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले;
\v 42 आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकवण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.
\s5
\c 6
\s सात जणांची निवड
\p
\v 1 त्यादिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता ग्रीक यहूद्यांची इब्री लोकांविरूध्द कुरकुर सुरू झाली; कारण रोजच्या वाटणीत त्याच्या विधवांची उपेक्षा होत असे.
\s5
\v 2 तेव्हा बारा प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, "आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून भोजनाची सेवा करावी हे ठीक नाही.
\v 3 तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठीत पुरूष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू.;
\v 4 म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू."
\s5
\v 5 ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरूष स्तेफन, आणि फिलीप्प, प्रखर, नीकलाव तीमोन, पार्मिना व यहूदी मतानुसारी नीकलाव अंत्युखीयकर ह्यांची निवड केली;
\v 6 त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले.
\s5
\v 7 मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरूशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली; याजकवर्गातीलहि पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली.
\s5
\v 8 स्तेफन कृपा व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन लोकांत मोठी अदभूते व चिन्हे करत असे.
\v 9 तेव्हा सिबिर्तिन नामक लोकांच्या सभास्थानातील काहीजण तसेच कुरेनेकर आलेक्सांद्रियेकर आणि किलिकिया व आसिया ह्यातील लोकांपैकी कित्येक उठले आणि स्तेफनाबरोबर वादविवाद करू लागले.
\s5
\v 10 पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना त्यांच्याने तोंड देववेना
\v 11 तेव्हा त्यांनी काही लोकांची गुप्तपणे मने वळवली, आम्ही स्तेफनाला मोशेविरूध्द व देवाविरूध्द दुर्भाषण करताना ऐकले असे म्हणण्यास पढविले;
\s5
\v 12 आणि लोकास, वडिलांस व नियमशास्त्राच्या शिक्षकांस चिथवले. त्यांनी स्तेफनावर चाल करून त्याला धरून न्यायसभेपुढे नेले.;
\v 13 आणि त्यांनी खोटे साक्षीदार उभे केले; ते म्हणाले, "हा माणूस ह्या पवित्र स्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरूध्द दुर्भाषण करण्याचे सोडत नाही.
\v 14 कारण आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की, हा नासोरी येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आम्हाला लावून दिलेल्या चालीरीती बदलून टाकील."
\v 15 तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्व जण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले.
\s5
\c 7
\s स्तेफनाचे भाषण
\p
\v 1 प्रमुख याजक म्हणाला, "ह्या गोष्टी अशाच आहेत काय?"
\v 2 तेव्हा तो म्हणालाः बंधुजनहो व वडिलांनो, ऐका, आपला पूर्वज अब्राहाम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम्या देशात असता "गौरवशाली देवाने"त्याला दर्शन देऊन म्हटले,
\v 3 "तू आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात जा."
\s5
\v 4 तेव्हा तो खास्द्यांच्या देशातून निघून हारानात जाऊन राहिला; मग त्याचा बाप मेल्यावर देवाने त्याला तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले;
\v 5 पण त्यांत त्याला वतन दिले नाही, पाऊल भर देखील जमीन दिली नाही; त्याला मूलबाळ नसताही देवाने त्याला अभिवचन दिले की, हा देश तुला व तुझ्यामागे तुझ्या संततीला वतन असा देईल.
\s5
\v 6 देवाने आणखी असे सांगितले की, 'त्याची संतती परदेशात जाऊन काही काळ राहतील आणि ते लोक त्यांना दास करून चारशे वर्षे वाईटाने वागवतील.
\v 7 ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्यांचा न्याय मी करीन, ' आणि त्यानंतर ते तेथून निघून 'ह्या' स्थळी माझी उपासना करतील, 'असे देवाने म्हटले.
\v 8 त्याने अब्राहामाला 'सुंतेचा करार'लावून दिला; हा करार झाल्यानंतर अब्राहामाला इसहाक झाला; त्याची त्याने आठव्या दिवशी सुंता केली; मग इसहाकाला याकोब झाला व याकोबाला बारा कुलपती झाले.
\s5
\v 9 नंतर कुलपतींनी 'हेव्यामुळे योसेफाला मिसर देशात विकून टाकले; 'पण 'देव त्याच्याबरोबर होता'
\v 10 त्याने त्याला त्याच्यावरील सर्व संकटातून सोडवले आणि 'मिसर देशाचा राजा फारो याच्यासमोर त्याला कृपापात्र व ज्ञानी असे केले; म्हणून फारोने त्याला मिसर"देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले.
\s5
\v 11 मग सर्व मिसर व कनान ह्या देशात दुष्काळ पडून त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले.
\v 12 "तेव्हा मिसर देशात धान्य आहे हे ऐकून याकोबाने" तुमच्याआमच्या पूर्वजांना पहिल्या खेपेस पाठवले.
\v 13 मग दुसऱ्या खेपेस 'योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली; " आणि योसेफाचे कूळ फारो राजाला कळले.
\s5
\v 14 तेव्हा योसेफाने, आपला पिता याकोब व आपले सगळे नातलग 'म्हणजे पंचाहत्तर माणसे ह्यांना'बोलावून घेतले.
\v 15 ह्याप्रमाणे " याकोब मिसर देशात गेला आणि तेथे तो व आपले पूर्वजही 'मरण पावले";
\v 16 त्यांना शखेमात नेले आणि जी कबर अब्राहामाने शखेमात हमोराच्या पुत्रांपासून रोख रुपये देऊन विकत घेतली होती तिच्यात त्यांना पुरले.
\s5
\v 17 मग देवाने अब्राहामाला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याचा समय जसजसा जवळ आला तसतसे ते लोक मिसर देशात वाढून संख्येने पुष्कळ झाले.
\v 18 योसेफाची माहिती नसलेला असा दुसरा राजा मिसर देशाच्या गादीवर बसेपर्यत' असे चालले.
\v 19 हाच राजा आपल्या' लोकांबरोबर कपटाने वागला आणि त्यांची बालके जगू नयेत म्हणून ती बाहेर टाकून देण्यास त्याने त्यांना भाग पाडले; असे त्याने आपल्या पूर्वजांना छळले.
\s5
\v 20 त्याकाळात मोशेचा जन्म झाला. तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता; त्याचे पालनपोषण 'तीन महिनेपर्यत'त्याच्या पित्याच्या घरी झाले;
\v 21 मग त्याला बाहेर टाकून देण्यात आले असता फारोच्या कन्येने त्याला घेउन आपला मुलगा म्हणून त्याला वाढवले.
\s5
\v 22 मोशेला मिसरी लोकांचे सर्व ज्ञान शिकला आणि तो भाषणात व कामात पराक्रमी होता.;
\v 23 मग तो जवळ जवळ चाळीस वर्षाचा झाला तेव्हा'आपले बांधव म्हणजे इस्त्राएलाचे संतान' ह्यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले.
\v 24 तेव्हा मोशेने इस्त्राएलातील कोणाएकावर अन्याय होत आहे असे पाहून ह्या जाचलेल्या माणसाचा कैवार घेतला आणि 'मिसऱ्याला मारून ' त्याचा सूड घेतला.
\v 25 तेव्हा देव त्याच्या हातून त्याच्या बांधवाची सुटका करत आहे हे त्यांना समजले असेल असे त्याला वाटले होते, पण ते त्यांना समजले नाही.
\s5
\v 26 मग दुसऱ्या दिवशी कोणी इस्त्राएली भांडत असता तो त्यांच्यापुढे आला व त्यांचा समेट करू लागला; तो म्हणाला, गृहस्थांनो, तुम्ही बांधव आहात एकमेकांवर अन्याय का करता?"
\v 27 तेव्हा ' जो आपल्या शेजाऱ्यावर अन्याय करत, होता तो ' त्याला ढकलून देऊन म्हणाला, " तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले?
\v 28 काल तू मिसऱ्याला ठार मारले तसे मलाही मारायला पाहतोस काय?
\s5
\v 29 हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला आणि मिद्यान देशात परदेशी होऊन राहिला; तेथे त्याला दोन मुलगे झाले.
\v 30 मग चाळीस वर्षे भरल्यावर सीनाय 'पर्वताच्या रानांत एका झुडपातील अग्निज्वालेत एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला.
\s5
\v 31 मग मोशेने अग्निज्वालाचे दृष्य पाहिल्यावर तो फार आश्चर्यचकित झाला. आणि हे दृष्य पाहण्यासाठी तो जवळ गेला.तेव्हा प्रभूची वाणी झाली की,
\v 32 मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा, इसहाकाचा व याकोबाचा देव आहे.' तेव्हा मोशे थरथर कापला व त्याला तिकडे पाहण्याचे धैर्य झाले नाही.
\s5
\v 33 कारण प्रभूने त्याला म्हटले, तू आपल्या पायातले जोडे काढ; कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे.
\v 34 मिसर देशातल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे, त्यांचे हुंदके मी ऐकले आहेत आणि त्यांना सोडवून घेण्यासाठी मी उतरलो आहे; तर आता चल मी तुला मिसर देशात पाठवतो.
\s5
\v 35 तुला अधिकारी व न्यायाधीश कोणी केले.' असे म्हणून ज्या मोशेला त्यांनी झिडकारले होते, त्यालाच झुडपात दर्शन झालेल्या देवदूताच्या हस्ते, देवाने अधिकारी व मुक्तिदाता म्हणून पाठवले.
\v 36 मिसर देशात ' तांबड्या समुद्रात व 'रानात चाळीस वर्षे अद्भूत कृत्ये करून व चिन्हे दाखवून' त्या लोकांना बाहेर नेले.
\v 37 तोच मोशे इस्त्राएल लोकांना म्हणाला, परमेश्वर तुमच्या बांधवामधून माझ्यासारखा संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील.
\s5
\v 38 रानातील मंडळीमध्ये सीनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय; त्यालाच आपल्याला देण्याकरता जिवंत वचने मिळाली.
\v 39 त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती; तर त्यांनी त्याला धिक्कारले व आपले अंतःकरण 'मिसर देशाकडे फिरवून
\v 40 ते अहरोनाला म्हणाले, " आमच्यापुढे चालतील असे देव आम्हाला करून दे; कारण ज्याने आम्हाला मिसर देशातून आणले त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला कळत नाही."
\s5
\v 41 मग त्यादिवसात 'त्यांनी वासराची मूर्ती बनवली' व तिच्यापुढे'यज्ञकरून' आपल्या हातच्या कृतीबद्दल आनंदोत्सव केला.
\v 42 तेव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना 'आकाशातील सेनागणाची' पूजा करण्यास सोडून दिले; ह्याविषयी संदेष्ट्यांच्या पुस्तकात लिहीले आहे'हे इस्त्राएलाच्या घराण्या तुम्ही चाळीस वर्षे अरण्यात बलिदाने व यज्ञ मला केलेत काय?
\s5
\v 43 मोलखाचा मंडप व रेफान दैवतांचा तारा' म्हणजे पुजण्याकरता' तुम्ही ज्या प्रतिमा केल्या त्या तुम्ही उचलून घेतल्या; मीही तुम्हाला बाबेलच्या पलिकडे नेऊन ठेवीन.
\s5
\v 44 तू जो नमुना पाहिलास त्याप्रमाणे साक्षीचा मंडप कर. असे ज्याने मोशेला सांगितले त्याने नेमल्याप्रमाणे तो मंडप रानात आपल्या पूर्वजांचा होता
\v 45 जी राष्ट्रे देवाने त्यांच्यासमोरून घालवली त्यांचा देश आपल्या ताब्यात घेतला, तेव्हा तो मिळालेला मंडप त्यांनी यहोशवाबरोबर त्या देशात आणिला आणि दाविदाच्या काळापर्यत परंपरेने तसाच ठेवला.
\v 46 दाविदावर देवाची कृपादृष्टी झाली आणि त्याने याकोबाच्या घराण्यासाठी वस्तीस्थान मिळविण्याची विनंती केली.
\s5
\v 47 आणि' शलमोनाने त्याच्यासाठी घर बांधले.
\v 48 तथापि जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाहीः संदेष्ट्याने म्हटले आहे
\v 49 प्रभू म्हणतो, आकाश माझे राजासन आहे. पृथ्वी माझे पादासन आहे; तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते?
\v 50 माझ्या हाताने ह्या सर्व वस्तु केल्या नाहीत काय?
\s5
\v 51 अहो ताठ मानेच्या आणि हृदयांची व कानांची सुंता न झालेल्या लोकांनो, तुम्ही तर पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करता; जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही.
\v 52 ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का?ज्यांनी त्या नीतिमान पुरूषाच्या गमनाविषयी पूर्वी सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले; आणि आता त्याला धरून देणारे व जिवे मारणारे तुम्ही निघाला आहात.
\v 53 अशा तुम्हाला देवदूतांच्या योगे योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते; पण तुम्ही ते पाळले नाही.
\s स्तेफनाचा मृत्यु
\s5
\p
\v 54 त्याचे भाषण ऐकणाऱ्या सभेतील सभासदांच्या अंतःकरणास इतके झोंबले की, ते दातआेठ खाऊ लागले.
\v 55 परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला.
\v 56 आणि त्याने म्हटले, पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.
\s5
\v 57 तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करीत एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले.
\v 58 मग ते त्याला शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले; आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरूणाच्या पायांजवळ ठेवली.
\s5
\v 59 ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धांवा करीत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.
\v 60 मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको. असे बोलून तो झोपी गेला.
\s5
\c 8
\s ख्रिस्ती लोकांचा छळ आणि त्यांची पांगापांग
\p
\v 1 स्तेफनाचा जो खून झाला त्याला शौलाची संमति होती. त्या दिवसापासून यरूशलेम येथील रिव्रस्ताच्या मंडळीचा मोठा छळ सुरू झाला. प्रेषितांशिवाय इतर सर्व विश्वासणारे शिष्य यहूदा व शोमरोन प्रांताच्या कानाकोपऱ्यात पांगून गेले.
\v 2 काही धार्मिक माणसांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी त्यांनी फार शोक केला.
\v 3 शौलाने रिव्रस्ताच्या मंडळीचा छळ करण्यास सुरुवात केली. तो घरोघर जाई. स्त्रिया व पुरूष यांना धरून खेचून नेई व तुरुंगात टाकीत असे.
\s शोमरोनामध्ये फिलिप्प
\s5
\p
\v 4 विश्वासणारे सगळीकडे पांगले होते. जेथे कोठे विश्वासणारे जात, तेथे ते लोकांना सुवार्ता सांगत.
\v 5 फिलिप्प शोमरोनातील एका शहरात गेला. त्याने ख्रिस्ताची घोषणा केली. तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले व त्याने केलेले चमत्कार पाहिले
\s5
\v 6 फिलिप्प जी चिन्हे करत असे व ज्या गोष्टी त्यांना सांगत असे ते ती लक्षपूर्वक ऐकत असत.
\v 7 कारण ज्यांना अशुध्द आत्मे लागले होते. त्यांच्यातील पुष्कळांतून ते मोठ्याने ओरडून निघून गेले. तेथे बरेच लंगडे व अर्धांगवायू झालेले लोक बरे झाले.
\v 8 यामुळे शहरातील लोक फार आनंदित झाले
\s शिमोन जादूगार
\s5
\p
\v 9 शिमोन नावाचा मनुष्य त्या नगरात राहत होता. तो जादूचे प्रयोग करीत असे. त्याच्या प्रयोगांमुळे शोमरोनी लोक आश्चर्यचकित होत असत. तो स्वतःला फार मोठा समजत असे
\v 10 अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत लोक लक्षपूर्वक त्याचे ऐकत. ते म्हणत असत. “देवाची महान शक्ती असे ज्याला म्हणतात तोच हा मनुष्य आहे!
\v 11 त्याने आपल्या जादूमुळे बराच काळपर्यंत लोकांना चकीत केले असल्याने लोक त्याचे ऐकत असत.
\s5
\v 12 परंतु जेव्हा देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्याविषयी फिलिप्पाने त्या लोकांना सुवार्ता सांगत असता त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याचवेळी त्यांनी बाप्तिस्मा घेतला. त्यांच्यात जसे पुरूष होते. तशा स्त्रियाही होत्या.
\v 13 स्वतः शिमोनाने विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तो फिलिप्पा बरोबर राहू लागला. आणि झालेले चमत्कार आणि अद्भूत चिन्हे पाहून शिमोन आश्चर्याने थक्क झाला.
\s शोमरोनामध्ये पेत्र व योहान
\s5
\p
\v 14 यरूशलेमेमधील प्रेषितांनी हे ऐकले की शोमरोनातील लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला, म्हणून पेत्र व योहान यांना प्रेषितांनी शोमरोनातील लोकांकडे पाठवले.
\v 15 पेत्र व योहान जेव्हा आले. तेव्हा त्यांनी शोमरोनी विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली.
\v 16 या लोकांचा प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा झाला होता, परंतु पवित्र आत्मा अजून त्यांच्यावर आला नव्हता.
\v 17 मग पेत्र व योहान यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला.
\s5
\v 18 शिमोनाने पाहिले की, प्रेषितांच्या हात ठेवण्याने लोकांना पवित्र आत्मा मिळाला, तेव्हा शिमोनाने प्रेषितांना पैसे देऊ करून म्हटले,
\v 19 मी ज्याच्यावर हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळेल, असा अधिकार मलासुध्दा द्या.”
\s5
\v 20 पेत्र शिमोनाला म्हणाला, “तुझा व तुझ्या पैशाचा नाश होवो! कारण, देवाचे दान पैशाच्या बळावर विकत घेण्याचा तू विचार केलास!
\v 21 या कामात तू आमचा सहभागी होऊ शकणार नाहीस. कारण तुझे अंतःकरण देवासमोर योग्य नाही.
\v 22 तू ज्या या वाईट गोष्टी केल्या आहेत, त्यासाठी पश्चाताप कर. प्रभूला प्रार्थना कर. कदाचित तुइया अंतःकरणातील कल्पनेची तो तुला क्षमा करील.
\v 23 कारण तुझ्या मनात कटू मत्सर भरलेला आहे. व तू पापाच्या बंधनात आहेस, हे मला दिसून आले आहे!
\s5
\v 24 शिमोनाने उत्तर दिले, तुम्ही सांगितले त्यातले काही माझ्यावर येऊ नये म्हणून तुम्हीच प्रभूकडे माझ्यासाठी प्रार्थना करा.
\s5
\v 25 नंतर पेत्र व योहान ह्यांनी आपली साक्ष लोकांना देऊन प्रभूचे वचन गाजवल्यावर ते यरुशलेमेला परत आले. परत येताना वाटेत त्यांनी अनेक शोमरोनी गावांत सुवार्ता सांगितली
\s फिलिप्प व हबशी षंढ
\s5
\p
\v 26 देवाचा दूत फिल्लीपाशी बोलला, तो म्हणाला “ऊठ, आणि यरूशलेमहून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा - (तो रस्ता वाळवंटातून जातो). ”
\v 27 मग तो उठला व गेला. रस्त्यात त्याला एक इथिओपियाचा मनुष्य भेटला, तो मनुष्य षंढ होता. तो इथिओपियाच्या कांदके राणीकडे उच्च पदावर अधिकारी म्हणून कामाला होता. तो राणीच्या खजिन्याचा मुख्य होता. तो यरूशलेमला उपासना करण्यासाठी गेला होता.
\v 28 आता तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेष्टयाचा ग्रंथ वाचत होता.
\s5
\v 29 पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “त्या रथाजवळ जा!”
\v 30 मग फिलिप्प त्या रथाजवळ धावत धावत गेला, तेव्हा त्याने त्याला यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचतांना ऐकले, फिलिप्प त्याला म्हणाला, “तुम्ही जे वाचत आहात, ते तुम्हाला समजते काय?”
\v 31 तो अधिकारी म्हणाला, “मला हे कसे समजेल? कोणीतरी याचा उलगडा करून मला सांगायला हवे.” आणि त्याने फिलिप्पाला रथात चढून आपल्यापाशी बसण्यास बोलावले.
\s5
\v 32 पवित्र शास्त्रातील जो भाग तो वाचत होता, तो भाग पुढीलप्रमाणे होताः “वधावयला नेत असलेल्या मेंढरासारखा तो होता. लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या कोकरांप्रमाणे तो शांत राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही.
\v 33 त्याला लज्जित केले गेले, त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही; त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण पृथ्वीवरील त्याचे जीवन संपविले गेले आहे.”
\s5
\v 34 तो अधिकारी फिलिप्पाला म्हणाला, “कृपा करून मला सांगा, भविष्यवादी हे कोणाविषयी बोलतो आहे? तो स्वतःविषयी बोलत आहे की दुसऱ्या कोणाविषयी बोलत आहे?”
\v 35 मग फिलिप्पाने तोंड उघडले व पवित्र शास्त्रातील यशया संदेष्टयाच्या भागापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली.
\s5
\v 36-37 ते दोघे प्रवास करीत असताना एका पाण्याच्या ठिकाणाजवळ (तळ्याजवळ)आले. अधिकारी म्हणाला, “पाहा! येथे पाणी आहे! माझा बाप्तिस्मा करायला कोणती अडचण आहे?” फिलिप्पाने म्हटले, जर आपण आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे.त्याने उत्तर दिले, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो.
\v 38 आणि षंढाने रथ थांबविण्याची आज्ञा केली. नंतर फिलिप्प व षंढ हे दोघे उतरून पाण्यात गेले आणि फिलिप्पाने त्याचा बाप्तिस्मा केला.
\s5
\v 39 ते जेव्हा पाण्याबाहेर आले, तेव्हा प्रभूच्या आत्म्याने फिलिप्पाला दूर नेले आणि त्या अधिकाऱ्याला फिलिप्प पुन्हा दिसला नाही. पण तो अधिकारी पुढे तसाच मोठ्या आनंदाने प्रवास करीत घरी गेला.
\v 40 आपण अजोत नगरात आहोत असे फिलिप्पाला दिसून आले आणि पुढे जात असताना जी जी गावे लागली त्या सर्व गावात त्याने सुवार्ता सांगितली. नंतर तो कैसरीयाला गेला.
\s5
\c 9
\s शौलाचा पालट
\p
\v 1 शौल यरूशलेममध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा व जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता. म्हणून तो प्रमुख याजकाकडे गेला.
\v 2 शौलाने दिमिष्क येथील सभास्थानातील प्रमुख याजकाकडून रिव्रस्ताच्या अनुयायांना पकडण्यासाठी अशी अधिकारपत्रे मागितली की, जर त्याला तेथे कोणी विश्वासणारा, मग तो पुरूष असो अथवा स्त्री, सापडले तर त्याने त्यांना बांधून यरूशलेमला आणावे.
\s5
\v 3 मग शौल दिमिष्काजवळ आला तेव्हा एकाएकी आकाशातून फारच प्रखर प्रकाश त्याच्याभोवती चमकला.
\v 4 शौल जमिनीवर पडला आणि एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, “शौला, शौला! तू माझा छळ का करतोस?”
\s5
\v 5 शौल म्हणाला, “प्रभू तू कोण आहेस?” ती वाणी म्हणाली, “मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस तो मीच आहे.
\v 6 आता ऊठ आणि नगरात जा. तुला काय करायचे आहे, ते तुला तेथे कोणीतरी सांगेल.”
\v 7 जी माणसे शौलाबोबर प्रवास करीत होती, ती तेथेच स्तब्ध उभी राहिली. त्या लोकांनी आवाज ऐकला, पण त्यांना कोणी दिसले नाही.
\s5
\v 8 शौल जमिनीवरून उठला. त्याने डोळे उघडले, पण त्याला काहीच दिसेना. म्हणून जे लोक त्याच्याबरोबर होते, त्यांनी त्याचा हात धरून त्याला दिमिष्क शहरात नेले.
\v 9 तीन दिवसांपर्यत शौलाला काहीच दिसत नव्हते. त्याने काही खाल्ले किंवा प्याले नाही.
\s दिमिष्कामध्ये शौल
\s5
\p
\v 10 दिमिष्कांमध्ये येशूचा एक शिष्य होता. त्याचे नाव हनन्या होते. प्रभू त्याच्याशी एका दृष्टान्तात बोललाः तो म्हणाला, “हनन्या! ”हनन्याने उत्तर दिले, “मी इथे आहे, प्रभू!”
\v 11 प्रभू हनन्याला म्हणाला, “ऊठ आणि नीट नावाच्या रस्त्यावर जा. तेथे यहूदाचे घर शोध व तार्ससहून आलेल्या शौल नावाच्या व्यक्तिबद्दल विचार. सध्या तो तेथे आहे व प्रार्थना करीत आहे.
\v 12 शौलाने दृष्टान्तात पाहिले की, त्यात हनन्या नावाचा मनुष्य आपल्याकडे आला असून आपल्यावर हात ठेवत आहे, व त्यानंतर त्याला पुन्हा दृष्टी प्राप्त झाली, असे त्याला दिसले.”
\s5
\v 13 परंतु हनन्याने उत्तर दिले, “प्रभू मी त्या मनुष्याविषयी अनेक लोकांच्या तोंडून ऐकले आहे. यरूशलेम येथील तुझ्या संतांशी तो किती वाईट रीतीने वागला हे मी ऐकले आहे.
\v 14 आणि आता जे तुझ्या नावावर विश्वास ठेवतात, अशा लोकांना बांधून नेण्यासाठी मुख्य याजकाकडून अधिकारपत्र घेऊन हा शौल येथे आला आहे.”
\v 15 परंतु प्रभू म्हणाला, “जा! राजांना, आणि परराष्ट्रांना आणि इस्त्राएलाचे संतान यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे.
\v 16 माझ्या नावाकरीता ज्या गोष्टी त्याला सहन कराव्या लागतील त्या मी त्याला दाखवून देईन.”
\s5
\v 17 हनन्या निघाला, आणि यहूदाच्या घरी गेला. त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, “शौल, भाऊ, प्रभू येशूने तुला इकडे येत असता रस्त्यावर दर्शन दिले त्यानेच मला तुझ्याकडे पाठवले, यासाठी की, तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे.”
\v 18 लागलीच खपल्यासारखे काहीतरी शौलाच्या डोळ्यावरून खाली पडले, आणि त्याला पुन्हा दृष्टी आली शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला.
\v 19 नंतर त्याने अन्न सेवन केल्यावर त्याच्या अंगात शक्ती आली. शौल काही दिवस दिमिष्क येथील शिष्यांबरोबर राहिला.
\s5
\v 20 यानंतर सरळ सभास्थानात जाऊन शौल येशूच्या नावाची घोषणा करू लागला. की, येशू हा देवाचा पुत्र आहे.
\v 21 ज्या लोकांनी शौलाचे बोलणे ऐकले त्या सर्वांना मोठे नवल वाटले. ते म्हणाले, “यरूशलेम येथील ज्या लोकांचा येशूच्या नावावर विश्वास आहे, त्या सर्वाचा नाश करू पाहणारा हाच नाही काय? तो येशूच्या अनुयायांना अटक करण्यासाठी येथे आला आहे व तो त्यांना यरूशलेम येथील मुख्य याजकासमोर उभे करणार आहे.”
\v 22 परंतु शौल अधिकाधिक सामर्थ्यशाली होत गेला. त्याने हे सिध्द केले की, येशू हाच ख्रिस्त आहे. आणि त्याचे पुरावे इतके सबळ होते की, दिमिष्क येथील यहूदी त्याच्याबरोबर वाद घालू शकले नाहीत.
\s5
\v 23 काही दिवसानंतर यहूदी लोकांनी शौलाला जिवे मारण्याचा कट रचला.
\v 24 यहूदी रात्रंदिवस शहराच्या वेशीवर पहारा देत होते. व शौलाला पकडण्याची वाट पाहत होते. त्यांना शौलाला ठार मारायचे होते, पण त्यांचा हा बेत शौलास समजला.
\v 25 एके रात्री शौलाने ज्यांना शिक्षण दिले होते अशा काही अनुयायांनी शहरातून जाण्यासाठी शौलाला मदत केली, अनुयायांनी शौलाला एका टोपलीत ठेवले. नंतर त्यांनी टोपली गावकुसावरून रात्रीच्या वेळी खाली सोडली
\s यरुशलेम व तार्स येथे शौल
\s5
\p
\v 26 नंतर शौल यरूशलेमला गेला. तेथील विश्वास ठेवणाऱ्यांच्या परिवारात मिसळण्याचा त्याने प्रयत्न केला, पण ते त्याला घाबरत होते. त्यांचा विश्वासच बसत नव्हता की, शौल खरोखर येशूचा शिष्य झाला आहे.
\v 27 परंतु बर्णबाने शौलाचा स्वीकार केला व त्याला घेऊन प्रेषितांकडे गेला. बर्णबाने सांगितले की, शौलाने येशूला दिमिष्कच्या रस्त्यावर पाहिले आहे. येशू त्याच्याशी कसा बोलला हेही त्याने सविस्तरणे सांगितले. मग त्याने प्रेषितांना सांगितले की, येशूविषयीची सुवार्ता शौलाने मोठ्या धैर्याने दिमिष्क येथील लोकांना सांगितली.
\s5
\v 28 मग शौल अनुयायांसह तेथे राहिला, तो यरुशलेमेमध्ये सगळीकडे गेला व धैर्याने प्रभूची सुवार्ता सांगू लागला.
\v 29 शौल नेहमी ग्रीक भाषा बोलणाऱ्या यहूदी लोकांशी बोलत असे तो त्यांच्याशी वादविवाद करीत असे. पण ते त्याला मारण्याचा प्रयत्न करीत होते.
\v 30 जेव्हा बंधुजनांना हे कळाले तेव्हा त्यांनी त्याला कैसरीया येथे नेले, व नंतर तेथून त्याला तार्सास पाठवले.
\s5
\v 31 अशाप्रकारे सर्व यहूदीया, गालीली, शोमरोन ह्या प्रदेशातील मंडळीस तेथे शांती लाभली. आणि तिची पवित्र आत्म्याच्या साहाय्याने व भयात असता वाढत गेली.
\v 32 मग असे झाले की, पेत्र यरुशलेमच्या सभोवतालच्या गावामध्ये फिरला. लोद या गावामध्ये जे देवाचे पवित्रजन होते, त्यांना भेटला.
\s5
\v 33 लोद येथे त्याला ऐनेयास नावाचा माणूस आढळला. त्याच्या अंगातून वारे गेल्याने तो पंगू झाला होता व आठ वर्षे अंथरुणाला खिळून होता.
\v 34 पेत्र त्याला म्हणाला, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे; ऊठ, आपले अंथरुण नीट कर!” ऐनेयास ताबडतोब उभा राहिला.
\v 35 लोद येथे राहणाऱ्या सर्व लोकांनी आणि शारोनात राहणाऱ्यांनी त्याला पाहिले, तेव्हा ते सर्व प्रभूकडे वळले.
\s दुर्कस
\s5
\p
\v 36 यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती. तीचे नाव तबिथा होते (ग्रीक भाषेत तिचे नाव दुर्कस होते, त्याचा अर्थ हरीण) ती नेहमी लोकांसाठी चांगली कामे करीत असे. गरीबांना दानधर्म करीत असे.
\v 37 जेव्हा पेत्र लोदमध्ये होता. तेव्हा तबिथा आजारी पडली व मेली. लोकांनी तिला आंघोळ घालून व माडीवरच्या एका खोलीत ठेवले.
\s5
\v 38 यापो येथील शिष्यांनी ऐकले की, पेत्र लोदमध्ये आहे. (लोद हे यापोजवळ आहे, ) म्हणून त्यांनी दोन माणसे पाठविली. त्यांनी त्याला विनंति केली. ते म्हणाले, “त्वरा करा, आमच्याकडे लवकर या!”
\v 39 पेत्र तयार झाला व त्यांच्याबरोबर गेला. जेव्हा तो तेथे पोहोचला तेव्हा त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. सर्व विधवा स्त्रिया पेत्राभोवती उभ्या राहिल्या. त्या रडत होत्या. दुर्कस (तबीथा) जिवंत असताना जे कपडे व झगे तिने तयार केले होते ते त्यांनी पेत्राला दाखवले.
\s5
\v 40 पेत्राने खोलीतील सर्वांना बाहेर काढले. त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली. आणि दुर्कसच्या शरीराकडे वळून तो म्हणाला, “तबिथा ऊठ!” तेव्हा तिने डोळे उघडले, जेव्हा तिने पेत्राला पाहीले तेव्हा ती उठून बसली.
\v 41 त्याने तिला आपला हात देऊन उभे राहण्यास मदत केली, नंतर त्याने पवित्रजनांना आणि विधवा स्त्रियांना खोलीमध्ये बोलावले. त्याने तबिथाला त्यांना दाखवले, ती जिवंत होती!
\v 42 यापोमधील सर्व लोकांना हे समजले, यातील पुष्कळ लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला.
\v 43 नंतर असे झाले की, तो यापोत शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणाऱ्या चांभाराच्या येथे बरेच दिवस राहीला.
\s5
\c 10
\s पेत्र व कर्नेल्य
\p
\v 1 कर्नेल्य नावाचा मनुष्य कैसरीयामध्ये राहत होता. तो इटलीक नावाच्या पलटणीत शताधिपती होता.
\v 2 कर्नेल्य हा भक्तीमान असून आपल्या कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा होता. तो गोरगरिबांना पुष्कळसा दानधर्म करीत असे आणि तो नेहमी देवाची प्रार्थना करीत असे.
\s5
\v 3 एके दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास, कर्नेल्याला दृष्टांन्त झाला. त्याने तो स्पष्टपणे पाहिला. त्या दृष्टांतांत देवाचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “कर्नेल्या!”
\v 4 कर्नेल्य देवदूताकडे पाहून भयभीत होऊन आणि म्हणाला “काय आहे, प्रभू?”देवदूत कर्नेल्याला म्हणाला, “देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे, ज्या गोष्टी तू गरीबांना दिल्या आहेत, त्या देवाने पाहिल्या आहेत. देवाला तुझी आठवण आहे.
\v 5 तू यापो गावी माणसे पाठीव आणि शिमोन नावाच्या माणसाला घेऊ नये, शिमोनाला पेत्र असेसुध्दा म्हणतात; तो
\v 6 शिमोन नावाच्या चांभाराच्या घरी राहत आहे. त्याचे घर समुद्राजवळ आहे.”
\s5
\v 7 कर्नेल्याशी बोलणे झाल्यावर देवदूत निघून गेला. नंतर कर्नेल्याने त्याचे दोन विश्वासू नोकर व एका धर्मशील शिपायाला बोलावून घेतले.
\v 8 कर्नेल्याने या तिघांना घडलेले सर्वकाही सांगितले, आणि त्यांना यापोला पाठवले.
\s5
\v 9 दुसऱ्या दिवशीही माणसे यापो गावाजवळ आली, ती दुपारची वेळ होती. त्याचवेळी प्रार्थना करावयास पेत्र गच्चीवर गेला.
\v 10 पेत्राला भूक लागली होती. त्याला काही खावेसे वाटले. ते पेत्रासाठी जेवणाची तयारी करीत असता पेत्राला तंद्री लागली.
\v 11 आणि आपल्यासमोर आकाश उघडले असून मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे असा दृष्टांन्त त्याला झाला.
\v 12 त्यांत पृथ्वीवरील सर्वप्रकारचे चालणारे, सरपटणारे, आकाशात उडणारे पक्षी होते
\s5
\v 13 नंतर एक वाणी पेत्राने ऐकली, “पेत्रा, ऊठ; यापैकी कोणताही प्राणी मारून खा.”
\v 14 पण पेत्र म्हणाला, “मी तसे कधीच करणार नाही, प्रभू! जे अशुध्द व अपवित्र आहे असे कोणतेही अन्न मी कधी खाल्लेले नाही.”
\v 15 पण ती वाणी त्याला पुन्हा म्हणाली, “देवाने या गोष्टी शुध्द केल्या आहेत. त्यांना अशुध्द म्हणू नकोस!”
\v 16 असे तीन वेळा घडले. मग ते पात्र आकाशात वर घेतले गेले.
\s5
\v 17 पेत्र भयचकित होऊन या दृष्टान्ताचा अर्थ काय असावा याविषयी विचार करू लागला. ज्या लोकांना कर्नेल्याने पाठवले होते, त्यांना शिमोनाचे घर सापडले. ते दाराजवळ उभे होते.
\v 18 त्यांनी विचारले, “शिमोन पेत्र येथेच राहतो काय?”
\s5
\v 19 पेत्र अजूनसुध्दा या दृष्टान्ताविषयीच विचार करीत होता. पण आत्मा त्याला म्हणाला, “ऐक, तीन माणसे तुला शोधीत आहेत.
\v 20 ऊठ आणि पायऱ्या उतरून खाली जा, कारण मीच त्यांना पाठवले आहे. काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा.”
\v 21 मग पेत्र खाली त्या माणसांकडे गेला. तो म्हणाला, “तुम्ही ज्याचा शोध करीत आहात तो मीच आहे. तुम्ही येथे का आलात?”
\s5
\v 22 ती माणसे म्हणाली, “एका पवित्र देवदूताने तुम्हाला आमंत्रित करण्याविषयी कर्नेल्याला सांगितले होते. कर्नेल्य हा शताधिपती आहे. तो नीतिमान मनुष्य आहे. तो देवाची उपासना करतो. सर्व यहूदी लोक त्याचा आदर करतात, तुम्हाला घरी बोलावून तुमचे शब्द ऐकावेत असे देवदूताने त्याला सांगितले आहे.”
\v 23 पेत्राने त्यांना आत बोलावून घेतले व रात्रभर मुक्काम करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी पेत्र तयार झाला व त्या तीन मनुष्याबरोबर गेला. यापो येथील काही बंधूही पेत्राबरोबर गेले.
\s5
\v 24 दुसऱ्या दिवशी पेत्र कैसरीया शहरात आला. कर्नेल्य त्याची वाट पाहत होता. त्याने आपले जवळचे मित्र व नातेवाईक यांनाही आपल्या घरी जमा केले होते.
\s5
\v 25 "जेव्हा पेत्र आत गेला, तेव्हा कर्नेल्य त्याला भेटला. कर्नेल्याने पेत्राच्या पाया पडून आदराने त्याला नमन केले. "
\v 26 पण पेत्र म्हणाला. “उभा राहा, मी तुझ्यासारखाच मनुष्य आहे.”
\s5
\v 27 पेत्र त्याच्याशी बोलत घरात गेला आणि आतमध्ये बरेच लोक जमलेले त्याने पाहिले.
\v 28 पेत्र त्या लोकांना म्हणाला, “तुम्ही हे जाणता की, यहूदी मनुष्याने इतर विदेशी लोकांच्या घरी जाणे किंवा त्यांच्याशी संबंध ठेवणे हे यहूदी नियमाला धरुन नाही. पण देवाने मला दाखविले आहे की, मी इतर मनुष्यमात्राला ‘अशुध्द’ किंवा ‘अपवित्र’ मानू नये.
\v 29 याच कारणासाठी जेव्हा हे लोक मला बोलावण्यास आले, तेव्हा मी त्यांच्याशी वाद घातला नाही. आता, कृपा करून मला सांगा, तुम्ही मला येथे का बोलावले?”
\s5
\v 30 कर्नेल्य म्हणाला, “चार दिवसांपूर्वी, माझ्या घरांमध्ये मी प्रार्थना करीत होतो. बरोबर याच वेळेला म्हणजे दुपारचे तीन वाजता मी प्रार्थना करीत होतो. अचानक एक मनुष्य माझ्यासमोर उभा राहिला. त्याने लखलखीत, चमकदार कपडे घातले. होते
\v 31 तो मनुष्य म्हणाला, ‘कर्नेल्या! देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. गरीब लोकांना ज्या वस्तु तू दिल्या आहेत ते देवाने पाहिले आहे. देव तुझी आठवण करतो.
\v 32 म्हणून यापो या शहरी काही माणसे पाठव व शिमोन पेत्राला बोलावून घे. पेत्र हा शिमोन चांभाराच्या घरी राहत आहे. आणि त्याचे घर समुद्राच्या जवळ आहे.
\v 33 तेव्हा मी लागलीच तुम्हाला निरोप पाठविला, तुम्ही येथे आलात ही तुमची मोठी कृपा आहे. तेव्हा आम्हाला जे काही सांगण्याची आज्ञा प्रभूने तुम्हाला दिली आहे, ते ऐकण्यासाठी आम्ही सर्व आता येथे देवासमोर जमलेले आहोत.”
\s पेत्राचे भाषण
\s5
\p
\v 34 पेत्राने बोलायला सुरुवात केली “मला आता हे खरोखर समजले आहे की, देवाला प्रत्येक मनुष्य सारखाच आहे.
\v 35 प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भक्ति करतो आणि योग्य ते करतो, त्याला देव स्वीकारतो, व्यक्ति कोणत्या देशाची आहे, हे महत्वाचे नाही.
\s5
\v 36 देव यहूदी लोकांशी बोलला. देवाने त्यांना सुवार्ता पाठविली की, येशू ख्रिस्ताद्वारे शांती जगात आली आहे. येशू सर्वाचा प्रभू आहे!
\v 37 सगळ्या यहूदा प्रांतात काय घडले हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. त्याची सुरुवात योहानाने लोकांना बाप्तिस्म्याविषयी गालीलात जो संदेश दिला, त्याने झाली.
\v 38 नासरेथच्या येशूविषयी तुम्हाला माहिती आहे. देवाने त्याला पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला (ख्रिस्त). येशू सगळीकडे लोकांसाठी चांगल्या गोष्टी करीत गेला. जे लोक दुष्ट आत्म्याने पछाडले होते त्यांना येशूने बरे केले. कारण देव त्याच्याबरोबर होता.
\s5
\v 39 येशूने संपूर्ण यहूदीया प्रांतात आणि यरूशलेमेत जे जे केले त्या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. पण येशूला मारण्यात आले. लाकडाच्या वधस्तंभावर त्यांनी त्याला टांगून मारले.
\v 40 परंतु देवाने तिसऱ्या दिवशी त्याला जिवंत केले! देवाने येशूला लोकांना स्पष्ट पाहू दिले.
\v 41 परंतु सर्वच माणासांनी येशूला पाहिले नाही. देवाने त्यांना अगोदरच साक्षीदार म्हणून निवडले होते. त्यांनीच त्याला पाहिले. ते साक्षीदार आम्ही आहोत! येशू मरणातून उठविला गेल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर अन्नपाणी सेवन केले.
\s5
\v 42 येशूने आम्हाला लोकांना उपदेश करायला सांगितले. जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी देवाने त्याला आपल्याला आहे हे सांगण्यासाठी त्याने आम्हाला आज्ञा केली.
\v 43 जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, त्याला क्षमा केली जाईल. येशूच्या नावामध्ये देव त्या व्यक्तिच्या पापांची क्षमा करील. सर्व संदेष्टे हे खरे आहे असे म्हणतात.”
\s परराष्ट्रीयांवर आत्मा उतरतो व त्यांचा बाप्तिस्मा होतो
\s5
\p
\v 44 पेत्र हे बोलत असतानाच त्याचे बोलणे ऐकत बसलेल्या सर्व लोकांवर पवित्र आत्मा आला.
\v 45 यहूदी सुंता झालेले विश्वासाणारे जे पेत्राबरोबर आले होते, ते चकित झाले. यहूदी नसलेल्या लोकांवरसुध्दा पवित्र आत्माच्या दानाचा वर्षाव झाला आहे, यामुळे ते चकित झाले.
\s5
\v 46 आणि यहूदी नसलेल्या लोकांना निरनिराळ्या भाषा बोलताना आणि देवाची स्तुती करताना यहूदी लोकांनी एेकले.
\v 47 मग पेत्र म्हणाला, “या लोकांना पाण्याने बाप्तिस्मा देण्यास आपण नकार देऊ शकत नाही, ज्याप्रमाणे आम्हाला मिळाला, त्याचप्रमाणे त्यांनाही पवित्र आत्मा मिळाला आहे.”
\v 48 म्हणून पेत्राने कर्नेल्य, त्याचे नातेवाईक आणि मित्र यांना येशु ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा देण्याची आज्ञा केली. मग पेत्राने आणखी काही दिवस त्यांच्याबरोबर राहावे अशी त्या लोकांनी त्याला विनंती केली.
\s5
\c 11
\s पेत्राचे आत्मसमर्थन
\p
\v 1 यहूदी नसलेल्या लोकांनीसुध्दा देवाच्या वचनाचा स्विकार केला आहे हे यहूदा प्रांतातील प्रेषितांनी व बंधूनी ऐकले.
\v 2 पण जेव्हा पेत्र यरुशलेमेला आला, तेव्हा सुंता झालेला गट त्याच्यावर टिका करू लागले.
\v 3 ते म्हणाले, “जे सुंता न झालेले व यहूदीतर आहेत अशा लोकांच्या घरी तुम्ही गेला, एवढेच नव्हे तर तुम्ही त्यांच्यासह जेवणही केले!”
\s5
\v 4 म्हणून पेत्राने त्यांना सर्व घटना सविस्तर स्पष्ट करून सांगितल्या.
\v 5 पेत्र म्हणाला, “मी यापो शहरात प्रार्थना करीत असताना मला तंद्री लागल्यासारखे झाले व मी एक दृष्टांन्त पाहिला की, एक पात्र उतरले, ते मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून आकाशातून सोडलेले असे माझ्यापर्यंत आले;
\v 6 मी त्याच्याकडे न्याहाळून पाहून विचार करीत होतो. मी त्यात पृथ्वीवरील चार पायाचे प्राणी, जंगली पशू, सरपटणारे प्राणी आणि आकाशात उडणारे पक्षी मी त्यांत पाहिले.
\s5
\v 7 एक वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली. ‘पेत्रा, ऊठ, मारून खा!
\v 8 पण मी म्हणालो, ‘प्रभू, मी असे कधीही करणार नाही. मी अपवित्र किंवा अशुध्द असे कधीच खाल्ले नाही’.
\v 9 आकाशातून त्या वाणीने पुन्हा उत्तर दिले, ‘देवाने या गोष्टी शुध्द केल्या आहेत. त्यांना अशुध्द म्हणू नकोस!
\v 10 असे तीन वेळा घडले. मग ते सर्व पुन्हा वर आकाशात घेतले गेले.
\s5
\v 11 इतक्यात पाहा, तीन माणसे ज्या घरामध्ये आम्ही होतो त्यापुढे कैसरीयाहून माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहिली.
\v 12 आत्म्याने मला कोणत्याही प्रकारचा संशय न धरिता त्यांच्याबरोबर जाण्यास सांगितले. हे सहा बंधू जे येथे आहेत, तेही माझ्याबरोबर होते. आम्ही कर्नेल्याच्या घरी गेलो.
\v 13 कर्नेल्याने आपल्या घरात देवदूत उभा असलेला कसा दिसला हे आम्हास सांगितले. देवदूत कर्नेल्याला म्हणाला, “काही माणसे यापोस पाठव. शिमोन पेत्राला बोलावून घे.
\v 14 तो तुझ्याशी बोलेल. तो ज्या गोष्टी तुला सांगेल, त्यामुळे तुझे व तुझ्या कुटुंबाचे तारण होईल.
\s5
\v 15 त्यानंतर मी माझ्या भाषणाला सुरुवात केली. सुरुवातीला ज्याप्रमाणे पवित्र आत्मा आपल्यावर आला तसाच तो त्यांच्यावरही आला.
\v 16 तेव्हा मला प्रभूचे शब्द आठवले. प्रभू म्हणाला होता, ‘योहान लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करीत असे हे खरे. पण तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल!
\s5
\v 17 आपण येशू रिव्रस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांस तसे त्यांसही देवाने सारखेच दान दिले. मग देवाला अडविणारा असा मी कोण?”
\v 18 "जेव्हा त्यांनी या गोष्टी ऐकल्या, तेव्हा ते शांत राहिले, त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले. “तर मग देवाने परराष्ट्रीयांसही जीवन मिळावे म्हणून पश्चातापबुध्दी दिली आहे.”
\s परराष्ट्रीयांमधून झालेली ख्रिस्ती मंडळी
\s5
\p
\v 19 स्तेफन मारला गेल्यानंतरच्या काळात जो छळ झाला, त्यामुळे विश्वासणारे यरूशलेमेपासून दूर ठिकाणी फेनीके, कुप्र व अंत्युखियापर्यंत पांगले गेले. विश्वासणाऱ्यांनी या ठिकाणी फक्त यहूदी लोकांनाच सुवार्ता सांगितली.
\v 20 यातील काही विश्वासणारे कुप्र व कुरेने येथे राहणारे होते. जेव्हा हे लोक अंत्युखियात आले, तेव्हा त्यांनी या ग्रीक लोकांना येशूविषयीची सुवार्ता सांगितली.
\v 21 प्रभू विश्वासणाऱ्यांना मदत करीत होता आणि बऱ्याच मोठ्या गटाने विश्वास ठेवला व ते प्रभूला अनुसरू लागले.
\s5
\v 22 याविषयीची बातमी यरूशलेम येथील विश्वासणाऱ्या मंडळीच्या कानावर आली. म्हणून यरूशलेम येथील विश्वासणाऱ्यांनी बर्णबाला अंत्युखियाला पाठवले.
\v 23 बर्णबा चांगला मनुष्य होता. तो पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्णपणे भरलेला होता. जेव्हा बर्णबा अंत्युखियाला गेला, तेव्हा त्याने पाहिले की, देवाने या लोकांवर खूप कृपा केली आहे. त्यामुळे बर्णबाला खूप आनंद झाला. अंत्युखियातील सर्व विश्वासणाऱ्यांना त्याने उत्तेजन दिले, त्याने त्यांना सांगितले, “कधीही तुमचा विश्वास गमावू नका. नेहमी प्रभूची आज्ञा अंतःकरणापासून पाळा.”
\v 24 तो चागंला मणुष्य होता, आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता; तेव्हा प्रभूला पुष्कळजण मिळाले.
\s5
\v 25 जेव्हा बर्णबा तार्सास गेला तेव्हा तो शौलाचा शोध घेत होता.
\v 26 जेव्हा बर्णबाने त्याला शोधले तेव्हा त्याने शौलाला आपल्यासह अंत्युखियाला आणले. शौलाने व बर्णबाने वर्षभर तेथे मंडळीत राहून पुष्कळ लोकांना शिकवले. अंत्युखियामध्ये येशूच्या अनुयायांना ‘ख्रिस्ती’ हे नाव पहिल्यांदा मिळाले.
\s बर्णबा व शौल यरुशलेमेस जातात
\s5
\p
\v 27 याच काळात काही संदेष्टे यरूशलेमेहून अंत्युखियास आले.
\v 28 यांच्यापैकी एकाचे नाव अगब होते. अंत्युखियात तो उभा राहिला आणि बोलू लागला. पवित्र आत्म्याच्या साहाय्याने तो म्हणाला, “फार वाईट काळ सर्व पृथ्वीवर येत आहे. लोकांना खायला अन्न मिळणार नाही.” (क्लौदिया राजा राज्य करीत होता तेव्हा त्याच्या काळात हे घडले.)
\s5
\v 29 विश्वासणाऱ्यांनी ठरवले की, यहूदीया येथील आपल्या बंधू व भगिनींना जास्तीत जास्त मदत पाठविण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक शिष्याने जास्तीत जास्त मदत पाठवण्याचे ठरवले.
\v 30 त्यांनी पैसे गोळा करून बर्णबा व शौल यांच्याकडे दिले. मग बर्णबा व शौल यांनी ते पैसे यहूदीयातील वडीलजनांकडे पाठवून दिले.
\s5
\c 12
\s हेरोदाने केलेला छळ व पेत्राची बंदिवासातून सुटका
\p
\v 1 त्या वेळेच्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतील काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला.
\v 2 योहानाचा भाऊ याकोबा ह्याला त्याने तलवारीने जिवे मारले.
\s5
\v 3 हेरोदाने पाहिले की, यहूदी लोकांना हे आवडले आहे.म्हणून त्याने पेत्रालासुध्दा अटक करण्याचे ठरवले.ते बेखमीर भाकरीचे दिवस होते.
\v 4 हेरोदाने पेत्राला अटक करून तुरुंगात टाकले. त्याच्या रखवालीकरिता त्याला शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले. वल्हांडण सण झाल्यावर पेत्राला लोकांसमोर आणण्याची योजना होती.
\s5
\v 5 म्हणून पेत्राला तुंरूगात ठेवण्यात आले. पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती.
\v 6 पेत्र दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता. त्याला दोन साखळ्यांनी बांधले होते. तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते. ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की, दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे.
\s5
\v 7 तेव्हा पाहा, अचानक देवाचा दूत तेथे उभा राहिला. तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला. देवदूताने पेत्राच्या कुशीला स्पर्श करून त्याला उठवले. देवदूत म्हणाला, “लवकर ऊठ!” तेव्हा पेत्राच्या हातातील साखळ्या गळून पडल्या.
\v 8 देवदूत पेत्राला म्हणाला, “कपडे घाल व तुझ्या वहाणा घाल.” मग पेत्राने कपडे घातले. मग देवदूत म्हणाला, “तुझा झगा अंगात घाल व माझ्यामागे ये!”
\s5
\v 9 मग देवदूत बाहेर पडला व पेत्र त्याच्यामागे चालला. पेत्राला कळत नव्हते की, हे खरोखर काय करीत आहे. त्याला वाटले आपण दृष्टांन्त पाहत आहोत.
\v 10 पहिल्या व दुसऱ्या फेऱ्यातील पहारेकऱ्यांना ओलांडून पेत्र व देवदूत लोखंडी दरवाजाजवळ येऊन पोहोचले. ते त्यांच्यासाठी आपोआप उघडले. पेत्र व देवदूत दरवाजामधून बाहेर पडले. त्यांनी एक रस्ता पार केला आणि अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला.
\s5
\v 11 पेत्राला मग कळले की नेमके काय घडले, आणि तो म्हणाला, “आता मला समजले की प्रभूने खरोखर त्याचा दूत माझ्याकडे पाठविला. व त्याने मला हेरोदाच्या हातातून व यहूदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.”
\v 12 या गोष्टींची जाणीव झाल्यावर पेत्र मरीयेच्या घरी गेला. ती योहानाची आई होती. (योहानाला मार्क असेही म्हणत) पुष्कळ लोक त्याठिकाणी जमले होते. ते सर्व प्रार्थना करीत होते.
\s5
\v 13 पेत्राने बाहेरील बाजूने दार ठोठावले. तेव्हा रुदा नावाची दासी दार उघडण्यासाठी आली.
\v 14 तिने पेत्राचा आवाज लगेच ओळखला आणि ती खूप आनंदित झाली. ती दार उघडण्याचेसुध्दा विसरून गेली. ती आतमध्ये पळाली आणि लोकांना तिने सांगितले, “पेत्र दाराजवळ उभा आहे!”
\v 15 विश्वासणारे रुदाला म्हणाले, “तू बावचळलीस!” परंतु पेत्र दाराजवळ उभा आहे, असे रुदा परत परत अगदी कळकळीने सांगू लागली. म्हणून लोक म्हणाले, “तो पेत्राचा दूत असला पाहिजे!”
\s5
\v 16 पण पेत्र बाहेरून दार सारखे ठोठावत होता. जेव्हा विश्वासणाऱ्यांनी दार उघडले, तेव्हा त्यांनी पेत्राला पाहिले. ते चकित झाले होते.
\v 17 पेत्राने हाताने खुणावून शांत राहायला सांगितले, मग त्याने प्रभूने तुरुंगातून कसे आणले हे सविस्तर सांगितले. तो म्हणाला. “याकोब व इतर बांधवांना काय घडले ते सांगा.” मग पेत्र तेथून निघून दुसऱ्या ठिकाणी गेला
\s5
\v 18 दुसऱ्या दिवाशी शिपाई फार हताश झाले होते. पेत्राचे काय झाले असावे याचा ते विचार करीत होते.
\v 19 हेरोदाने पेत्राला सगळीकडे शोधले पण तो त्याला शोधू शकला नाही. मग हेरोदाने पहारेकऱ्यांना प्रश्न विचारले व त्यांना मरणाची शिक्षा ठोठावली. नंतर हेरोद यहूदातून निघून गेला. तो कैसरीया शहरात गेला व तेथे काही काळ राहिला.
\s हेरोदाचा मृत्यु
\s5
\p
\v 20 हेरोद सोर व सिदोन नगरातील लोकांवर फार रागावला होता. ते लोक मिळून हेरोदाला भेटायला आले. ब्लस्तला आपल्या बाजूला वळविण्यात ते यशस्वी झाले. ब्लस्त हा राजाचा खाजगी सेवक होता. लोकांनी हेरोदाकडे शांततेची मागणी केली कारण त्यांचा देश अन्नधान्याच्या बाबतीत हेरोदाच्या देशावर अवलंबून होता.
\v 21 हेरोदाने त्यांना भेटण्यासाठी एक दिवस ठरवला. त्या दिवशी हेरोदाने आपला सुंदर दरबारी पोशाख घातला होता. तो न्यायासनावर बसून लोकांसमोर भाषण करू लागला.
\s5
\v 22 लोक मोठ्याने आरोळी करून म्हणाले, “ही तर देवाची वाणी आहे, मनुष्याची नव्हे!” हेरोदाने या स्तुतीचा स्वीकार केला.
\v 23 आणि त्याने देवाला गौरव दिला नाही, म्हणून देवाच्या दूताने त्यावर प्रहार केला. तो किडे पडून मेला.
\s5
\v 24 देवाचे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरत गेले. व लोकांना प्रेरित करीत होता. विश्वासणाऱ्यांचा गट दिवसेंदिवस मोठा होत होता.
\v 25 बर्णबा व शौलाने त्यांचे यरूशलेम येथील काम संपविल्यानंतर ते अंत्युखियाला परत आले. त्यांनी मार्क योहान याला त्यांच्याबरोबर घेतले.
\s5
\c 13
\s अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळी
\p
\v 1 अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते. ते पुढीलप्रमाणेः बर्णबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, मनाएन (जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला होता), आणि शौल.
\v 2 ही सर्व माणसे देवाची सेवा करीत असत व उपास करीत असत. पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौलाला ह्यांना ज्या कामासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करा.”
\v 3 म्हणून मंडळीने उपास व प्रार्थना केल्या, त्यांनी बर्णबा व शौल यांच्या डोक्यांवर हात ठेवून प्रार्थना केली, मग त्यांना पाठवून दिले.
\s कुप्र येथे बर्णबा व शौल
\s5
\p
\v 4 पवित्र आत्म्याच्याद्वारे बर्णबा व शौल यांना पाठविण्यात आले. ते सलुकीयात गेले. नंतर तेथून समुद्रमार्गे कुप्र बेटावर गेले.
\v 5 ते जेव्हा सलमीनांत आले, तेव्हा त्यांनी देवाचे वचनाची यहूदी लोकांच्या सभास्थानात घोषणा केली मार्क म्हटलेला योहान हाही त्यांच्या मदतीला होता.
\s5
\v 6 ते संपूर्ण बेट पार करून पफे शहरास गेले. पफे येथे त्यांना एक यहूदी मनुष्य भेटला. तो जादूच्या करामती करीत असे. त्याचे नाव बर्येशू होते. तो खोटा संदेष्टा होता.
\v 7 बर्येशू नेहमी सिर्ग्य पौल याच्या निकट राहण्याचा प्रयत्न करायचा. सिर्ग्य पौल राज्यपाल होता, व तो हुशार होता. त्याने बर्णबा व शौल यांना आपणाकडे बोलावले. त्याला त्यांच्याकडुन देवाचे वचन ऐकाण्याची उत्कंठा दाखवली.
\v 8 परंतु अलीम जादूगार(त्याच्या नावाचा अर्थ हाच आहे.)हा बर्णबा व शौल यांच्याविरुध्द होता. राज्यपालाने विश्वास ठेवू नये म्हणून अलीमने त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला.
\s5
\v 9 पण शौल, ज्याला पौलहि म्हणत, तो पवित्र आत्म्याने भरला होता. पौलाने त्याच्याकडे रोखून पाहिले व म्हणाला,
\v 10 “सैतानाच्या पुत्रा! तू दुष्टाईने व खोटेपणाने भरलेला आहेस. अवघ्या नीतिमानाच्या वैऱ्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय?
\s5
\v 11 तर आता पाहा, प्रभूचा हात तुझ्यावर आहे, तू आंधळा होशील. व काही वेळपर्यत तुला सूर्य दिसणार नाही. मग लागलेच अलीमावर धुके व अंधार पडला. आणि तो आपल्याला कोणी हाती धरून चालवावे म्हणून इकडेतिकडे फिरुन माणसांचा शोध करू लागला.
\v 12 तेव्हा जे झाले ते पाहून राज्यपालाने विश्वास ठेवला. प्रभूच्या शिक्षणाने तो चकित झाला.
\s पिसिदियातील अंत्युखियामध्ये पौलाने यहूद्यांना केलेला उपदेश
\s5
\p
\v 13 पौल व जे त्याचे मित्र त्याच्याबरोबर होते ते पफेकडून समुद्रमार्गे निघाले. ते पंफुल्यातील पिर्गा गावी आले. परंतु योहान (मार्क) त्यांना सोडून परत यरुशलेमेला गेला.
\v 14 पौल व त्याच्या मित्रांनी त्यांचा प्रवास पुढे चालू ठेवला. पिर्गापासून पुढे ते पिसिदीयांतील अंत्युखियास गेले. आणि शब्बाथ दिवशी ते सभास्थानात गेले आणि तेथे बसले.
\v 15 तेव्हा नियमशास्त्र आणि संदेष्टयांच्या लेखाचे वाचन झाल्यावर सभास्थानच्या अधिकाऱ्यांनी पौल व बर्णबाला निरोप पाठविलाः “बंधुनो, येथील लोकांना काही मदत होईल असे काही बोधवचन सांगा.
\s5
\v 16 पौल उभा राहिला. आणि आपला हात उंचावून म्हणाला, “अहो इस्त्राएल लोकांनो व देवाचे भय धरणाऱ्यांनो, ऐका!
\v 17 ह्या इस्राएल लोकांच्या देवाने आपल्या वाडवडिलांची निवड केली.आणि ते ज्या काळात मिसरमध्ये परकी म्हणून राहत होते, त्याकाळात देवाने त्यांना अगणित केले आणि उभारलेल्या बाहूने त्यांना तेथून बाहेर आणले.
\v 18 आणि देवाने अरण्यातील चाळीस वर्षात त्यांना सहनशीलता दाखविली.
\s5
\v 19 देवाने कनानच्या प्रदेशातील सात राष्ट्रांना नाश केला. देवाने त्यांच्या जमिनी त्याच्या लोकांना दिल्या.
\v 20 हे सर्व साधारणपणे चारशेपन्नास वर्षात घडले.“त्यानंतर देवाने शमुवेल संदेष्ट्यापर्यंत आपल्या लोकांना न्यायाधीश नेमून दिले.
\s5
\v 21 मग लोकांनी राजाची मागणी केली. देवाने त्यांना किशाचा पुत्र शौल याला दिले. शौल हा बन्यामिनाच्या वंशातील होता. तो चाळीस वर्षेपर्यंत राजा होता.
\v 22 नंतर देवाने शौलाला काढून टाकले. देवाने दावीदाला त्यांचा राजा केले. दावीदाविषयी देव असे बोललाः इशायाचा पुत्र, दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझी सर्व इच्छा पूर्ण करील.
\s5
\v 23 याच दाविदाच्या वंशजातून देवाने इस्राएल लोकांचा तारणारा आणिला. तो वंशज येशू आहे. देवाने हे करण्याचे अभिवचन दिले होते.
\v 24 येशू येण्यापूर्वी सर्व यहूदी लोकांना योहानाने उपदेश केला. त्यांच्या अंतःकरणात बदल व्हावा म्हणून योहानाने लोकांना सांगितले की, त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे.
\v 25 जेव्हा योहान आपले काम संपवत होता, तेव्हा तो म्हणाला, ‘मी कोण आहे असे तुम्हाला वाटते? मी ख्रिस्त नाही. तो नंतर येत आहे. त्याच्या वहाणांचे बंद सोडण्याची सुध्दा माझी लायकी नाही.
\s5
\v 26 “माझ्या बंधुनो, अब्राहामच्या कुटुंबातील पुत्रांनो, आणि तुम्ही यहूदी नसलेले पण खऱ्या देवाची उपासना करणारे, ऐका! या तारणाची बातमी आम्हाला सांगितली गेली.
\v 27 यरुशलेमेमध्ये राहतात ते यहूदी व त्यांचे अधिकारी यांनी त्याला ओळखले नाही, येशू हा तारणारा होता. येशूविषयी जे शब्द भविष्यवाद्यांनी लिहिले ते यहूदी लोकांसाठी प्रत्येक शब्बाथाच्या वारी वाचले गेले. परंतु त्यांना ते समजले नाही. यहूदी लोकांनी येशूला दोषी ठरवल्याने त्यांनी ते भविष्यावाद्यांचे शब्द खरे ठरवले!
\s5
\v 28 येशूने का मरावे याचे खरे कारण ते शोधू शकले नाहीत. पण त्यांनी पिलाताला सांगितले की त्याला जिवे मारावे.
\v 29 शास्त्रामध्ये येशूच्याबद्दल या गोष्टी लिहिल्या होत्या की, जे वाईट ते त्याच्याबाबतीत घडणारे होते. ते सर्व या यहूदी लोकांनी येशूला केले. मग त्यांनी येशूला वधस्तंभावरुन खाली घेतले. व त्याला कबरेत ठेवले.
\s5
\v 30 पण देवाने त्याला मरणातून उठवले
\v 31 यानंतर, पुष्कळ दिवसांपर्यंत जे त्याच्याबरोबर होते, त्यांना गालीलापासून यरुशलेमपर्यंत येशूने दर्शन दिले. ते लोक आता त्याचे साक्षीदार म्हणून लोकांसमोर आहेत.
\s5
\v 32 आम्ही तुम्हाला देवाने जे अभिवचन आमच्या वाडवडिलांना (पूर्वजांना) दिले त्याविषयी सुवार्ता सांगतो.
\v 33 आम्ही त्यांची लेकरे (वंशज) आहोत आणि देवाने हे अभिवचन आमच्या बाबतीत खरे करून दाखविले. देवाने हे येशूला मरणातून पुन्हा उठविण्याद्वारे केले. आम्ही याविषयी स्तोत्रसंहितेमध्येसुध्दा वाचतोः‘तू माझा पुत्र आहेस. आज मी तुला जन्म दिला आहे.
\v 34 शिवाय त्याने कुजण्याच्या अवस्थेपर्यंत जाऊ नये म्हणून त्याने त्याला मरणातून उठवले. याविषयी त्याने असे सांगितले आहे की, ‘दाविदाला देण्यात आलेली पवित्र व निश्चित अाशीर्वाद तुम्हास देईन.
\s5
\v 35 म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतोः‘तू तुझ्या पवित्र पुरुषाला कबरेत कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.
\v 36 कारण दाविद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून मेला. आपल्या वाडवडिलांशेजारी त्याला पुरले. आणि कबरेत त्याचे शरीर कुजले.
\v 37 पण ज्याला देवाने मरणातून पुन्हा उठवले, त्याला कुजण्याचा अनुभव आला नाही.
\s5
\v 38 बंधुनो, आम्ही जी घोषणा करीत आहोत ते तुम्ही समजून घेतले पाहिजेः या एकाकडूनच तुमच्या पापांची क्षमा तुम्हाला मिळू शकते.
\v 39 मोशेचे नियमशास्त्र तुम्हाला तुमच्या पापांपासून मुक्त करणार नाही. पण प्रत्येक व्यक्ति जी त्याच्यावर विश्वास ठेवते, ती त्याच्याद्वारे त्या सर्वाविषयी न्यायी ठरविली जाते.
\s5
\v 40 संदेष्टयांनी सांगितलेल्या काही गोष्टी घडतील, सावध राहा! या गोष्टी तुमच्याबाबत होऊ नयेत म्हणून जपा.
\v 41 अहो धिक्कार करणाऱ्यांनो, पाहा, आश्चर्य कराव नाहीसे व्हा, कारण तुमच्या काळामध्ये मी एक कार्य करतो, ज्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही कोणी ते स्पष्ट करून सांगितले तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही.”
\s5
\v 42 जेव्हा पौल व बर्णबा जाऊ लागले, तेव्हा लोक म्हणाले की, पुढील शब्बाथाच्या दिवशी परत या आणि आम्हाला याविषयी अधिक सांगा.
\v 43 सभास्थानातील बैठक संपल्यावर अनेक यहूदी लोक आणि यहूदी मतानुसारी चालणारे इतर धार्मिक लोक पौल व बर्णबा यांच्यामागे गेले. पौल व बर्णबा यांनी त्या लोकांना देवाच्या कृपेत टिकून राहण्यास कळकळीची विनंति केली.
\s प्रेषित परराष्ट्रीयांकडे वळतात
\s5
\p
\v 44 पुढील शब्बाथवारी शहरातील जवळ जवळ सर्व लोक देवाचे वचन ऐकण्यासाठी एकत्र जमले.
\v 45 यहूदी लोकांनी त्या सर्वांना तेथे पाहिले. त्यामुळे यहूदी लोकांना मत्सर वाटू लागला. तेही काही फार वाईट गोष्टी बोलले आणि जे पौल बोलला त्याविरुध्द वाद उपस्थित केला.
\s5
\v 46 पण पौल व बर्णबा फार धैर्याने बोलले. ते म्हणाले. “देवाचे वचन तुम्हा यहूद्यांना प्रथम आम्हाला सांगितलेच पाहिजे. पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात. तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करून घेत आहात. व अनंतकाळचे जीवन प्राप्त करून घेण्यासाठी अपात्र ठरत आहात! म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशांतील यहूदीतर लोकांकडे जाऊ!
\v 47 प्रभूने आम्हाला आज्ञा दिली आहे की.‘परराष्ट्रीयांसाठी मी तुम्हाला प्रकाश असे केले यासाठी की, तुम्ही पृथ्वीवरील सर्व लोकांना तारणाचा मार्ग दाखवू शकाल.”
\s5
\v 48 जेव्हा यहूदी नसलेल्यांनी पौलाला असे बोलताना ऐकले तेव्हा ते फार आनंदित झाले, देवाच्या वचनाला त्यांनी गौरव दिले. आणि त्या लोकांपैकी पुष्कळांनी वचनावर विश्वास ठेवला, कारण ते अनंतकाळच्या जीवनासाठी निवडले गेले होते.
\v 49 आणि म्हणून देवाचा संदेश संपूर्ण देशात सांगितला गेला.
\s5
\v 50 तेव्हा यहूदी लोकांनी शहरातील काही धार्मिक स्त्रिया व पुढारी यांना भडकावून दिले. त्या लोकांनी पौल व बर्णबा यांच्याविरुध्द अनेक वाईट गोष्टी केल्या आणि त्यांना शहराबाहेर घालवून दिले.
\v 51 मग पौल व बर्णबा यांनी आपल्या पायाची धूळ झटकली, व ते इकुन्या शहराला गेले.
\v 52 इकडे येशूचे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.
\s5
\c 14
\s इकुन्यामध्ये पौल व बर्णबा
\p
\v 1 पौल व बर्णबा इकुन्या शहरात गेले. ते तेथील यहूदी सभास्थानात गेले. तेथील लोकांशी ते बोलले. पौल व बर्णबा अशारीतीने बोलले की, पुष्कळ यहूदी लोकांनी व ग्रीक लोकांनी त्यांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवला.
\v 2 परंतु काही यहूदी लोकांनी विश्वास ठेवला नाही. त्यांनी यहूदीतर लोकांची मने भडकाविली आणि बंधुजनांविषयीची मने वाईट केली.
\s5
\v 3 म्हणून पौल व बर्णबाने त्याठिकाणी बरेच दिवस मुक्काम केला. आणि धैर्याने येशूविषयी सांगत राहीले. पौल व बर्णबाने देवाच्या कृपेविषयी संदेश दिला. देवाने त्यांना पौल व बर्णबाला चमत्कार व अदभूते कृत्ये करण्यास मदत करून ते जे काही सांगत होते ते खरे ठरवले.
\v 4 परंतु शहरातील काही लोकांना यहूदी लोकांची मते पटली. दुसऱ्या लोकांना प्रेषित पौल व बर्णबाचे म्हणणे पटले. त्यामुळे शहरात दोन तट पडले.
\s5
\v 5 काही यहूदीतर लोक, काही यहूदी लोक व त्यांचे पुढारी यांनी पौल व बर्णबाला बांधले व इजा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पौल व बर्णबा यांना दगडमार करून मारावयाचे होते.
\v 6 पौल व बर्णबा यांना जेव्हा त्याविषयी कळले तेव्हा त्यांनी ते शहर सोडले. ते लुस्त्र व दर्बे या लुकवनियाच्या नगरात गेले. आणि त्या शहरांच्या सभोवतालच्या परिसरात गेले.
\v 7 त्या ठिकाणीसुध्दा त्यांनी सुवार्ता सांगितली.
\s लुस्र येथे पौल व बर्णबा
\s5
\p
\v 8 लुस्त्र येथे एक मनुष्य होता त्याचे पाय अधू होते तो जन्मतःच पांगळा जन्मला होता. व कधीच चालला नव्हता.
\v 9 पौल भाषण करीत असताना हा मनुष्य ऐकत होता. पौलाने त्याच्याकडे दृष्टि लावून व त्याला आपण बरे होऊ असा त्या मनुष्याचा विश्वास आहे असे पाहून,
\v 10 मोठ्याने म्हणाला, “तुझ्या पायांवर नीट उभा राहा!” तेव्हा त्या मनुष्याने उडी मारली आणि चालू लागला.
\s5
\v 11 पौलाने केलेले लोकांनी जेव्हा पाहिले, तेव्हा ते आपल्या लुकवनिया भाषेत ओरडले. ते म्हणाल, “देव माणसांच्या रूपाने आमच्यात उतरले आहेत.”
\v 12 लोकांनी बर्णबाला ज्युपितर म्हटले व पौलाला मर्क्युरी म्हटले, कारण पौल मुख्य बोलणारा होता.
\v 13 ज्युपितरचे मंदिर जवळ होते. या मंदिराचा पुजारी काही बैल व फुले घेऊन वेशीजवळ आला. पुजारी व लोकांना पौल व बर्णबा यांची उपासाना करण्यासाठी त्यांच्यापुढे बळी द्यावयाचा होता.
\s5
\v 14 परंतु ते काय करीत आहेत, हे जेव्हा प्रेषित पौल व बर्णबा यांना समजले तेव्हा त्यांनी आपले कपडे फाडले व लोकांच्या गर्दीत शिरले आणि मोठ्याने म्हणाले,
\v 15 लोकांनो, ह्या गोष्टी तुम्ही का करीत आहात? आम्ही देव नाही! तुम्हाला जशा भावना आहेत, तशाच आम्हालाही आहेत! आम्ही तुम्हाला सुवार्ता सांगायला आलो. आम्ही तुम्हाला हे सांगत आहोत की या व्यर्थ गोष्टींपासून तुम्ही तुमचे मन वळवावे. खऱ्या जिवंत देवाकडे आपले मन लावावे. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व जे काही आहे ते निर्माण केले.
\v 16 भूतकाळात, देवाने सर्व राष्ट्रांना त्यांना जसे पाहिजे तसे वागू दिले.
\s5
\v 17 परंतु देवाने अशा गोष्टी केल्या, की त्याद्वारे तो खरा आहे हे सिध्द व्हावे. तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतो, तो तुम्हाला आकाशातून पाऊस देतो.योग्यवेळी तो तुम्हाला चांगले पीक देतो. तो तुम्हाला भरपूर अन्न देतो व तो तुमची अंतःकरणे आनंदाने भरतो”
\v 18 पौल व बर्णबाने ह्या गोष्टी लोकांना सांगितल्या, व मोठ्या प्रयासाने आपणास यज्ञ अर्पिण्यापासून त्याना परावृत्त केले.
\s5
\v 19 नंतर अंत्युखिया व इकुन्या येथील काही यहूदी लोक तेथे आले. त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली, आणि पौलाला दगडमार केला. त्यात पौल मेला असे समजून त्यांनी त्याला ओढत नेऊन नगराबाहेर टाकले.
\v 20 येशूचे शिष्य पौलाभोवती जमा झाले मग पौल उठून परत शहरात गेला व दुसऱ्या दिवशी ते दोघे दर्बेला गेले.
\s अंत्युखियास परतणे
\s5
\p
\v 21 आणि त्या नगरात त्यांनी सुवार्ता सांगून अनेक लोकांना शिष्य केले. त्यानंतर ते लुस्त्र, इकुन्या आणि अंत्युखिया नगरांना परत आले.
\v 22 आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले. त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ राहावे म्हणून उत्तेजन दिले. ते म्हणाले, “अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.”
\s5
\v 23 पौल व बर्णबाने प्रत्येक मंडळीत वडीलजनांची नेमणूक केली. त्यांनी या वडिलांसाठी उपास आणि प्रार्थना केल्या, प्रभू येशूवर विश्वास असलेले असे सर्व वडीलजन होते म्हणून पौलाने व बर्णबाने त्यांना प्रभूच्या हाती सोपवले.
\v 24 पौल आणि बर्णबा पिसिदिया प्रदेशातून गेले नंतर ते पंफुलिया येथे आले.
\v 25 त्यांनी पिर्गा शहरात देवाचा संदेश दिला नंतर ते अत्तलिया शहरात गेले.
\v 26 नंतर तेथून पुढे पौल व बर्णबा सिरीया येथील अंत्युखियात समुद्रमार्गे गेले. जे काम त्यांनी पूर्ण केले होते त्याची सुरुवात त्यांनी देवाच्या कृपेने अंत्युखियापासूनच केली होती.
\s5
\v 27 ते जेव्हा तेथे पोहोचले, तेव्हा त्यांनी मंडळीला एकत्र बोलावले आणि देवाने त्यांच्याबाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्यांना सांगितल्या तसेच दुसऱ्या देशातील यहूदीतर लोकांमध्ये देवाने विश्वासाचे दार कसे उघडले ते सांगितले,
\v 28 नंतर ते शिष्यांबरोबर तेथे बरेच दिवस राहिले.
\s5
\c 15
\s परराष्ट्रीयातले ख्रिस्ती व मोशेचे नियमशास्र
\p
\v 1 तेव्हा काही जणानी यहुदीयाहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली की, मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुंता झाल्यावाचुन तुमचे तारण होणे शक्य नाही.
\v 2 तेव्हा पौल व बर्णबा ह्यांचा त्यांच्याशी बराच मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरविण्यात आले की, पौल व बर्णबा ह्यांनी व त्यांच्यापैकी इतर काहींनी ह्या वादासंबधाने यरूशलेमेतले प्रेषित व वडीलवर्ग हयांच्याकडे जावे.
\s5
\v 3 मग मंडळीने त्यांची बोळवण केल्यावर ते फेनीके व शोमरोन ह्यांमधून गेले, आणि परराष्ट्रीय देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले.
\v 4 नंतर ते यरूशलेमेस पोहचल्यावर तेथील मंडळी, प्रेषित व वडीलवर्ग ह्यांनी त्यांचे आगतस्वागत केले. तेव्हा आपण देवाच्या सहवासांत असतांना त्याने जे जे घडविले ते त्यांनी सांगितले.
\s5
\v 5 तरी पण परूशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे पुढे होऊन म्हणाले, त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळावयाची त्यांना आज्ञा केलीच पाहीजे.
\s यरुशलेम येथील धर्मसभा
\p
\v 6 मग प्रेषित व वडीलवर्ग ह्या प्रकरणाचा विचार करावयास जमले.
\s5
\v 7 तेव्हा पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला बंधुजनहो, तुम्हास ठाऊक आहे की, माझ्या तोडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीचा दिवसांपासून तुम्हामध्ये देवाने माझी निवड केली;
\v 8 आणि हृदये जाणणाऱ्या देवाने जसा आपणास तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली.
\v 9 त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुध्द करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही.
\s5
\v 10 असे असतांना जे जोखड आपले पूर्वज व आपण वाहावयास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालू तुम्ही देवाची परीक्षा का पाहता?
\v 11 तर मग त्यांच्याप्रमाणेच आपले तारण प्रभू येशूच्या कृपेने होईल असा आपला विश्वास आहे.
\s5
\v 12 तेव्हा सर्व लोक गप्प राहीले, आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्या द्वारे देवाने परराष्ट्रीयामध्ये जी चिन्हे व अदभूते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले.
\s5
\v 13 मग त्यांचे भाषण सपंल्यावर याकोब म्हणाला; बंधुजनहो, माझे ऐका.
\v 14-15 परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली, हे शिमोनाने सांगितले आहे; आणि हयाच्याशी संदेष्ट्यांच्या उक्तीचाही मेळ बसतो. असा शास्त्रलेख आहे की,
\v 16 हयानंतर मी परत येईन, व दावीदाचा पडलेला मंडप पुन्हा उभारीन; आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन;
\v 17 हयासाठी की, शेष राहिलेल्या माणसांनी, व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे
\v 18 हे जे त्याला युगादीपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो,
\v 19 तेव्हा माझे तर मत असे आहे की, जे परराष्ट्रीयांतून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये;
\v 20 तर त्यांना असे लिहून पाठवावे की, मूर्तीचे अमगंळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्याच्यापासून तुम्ही अलिप्त असा
\v 21 कारण प्राचीन काळापासून दर शब्बाथ दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून दाखवून त्याची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरांत आहेत.
\s परराष्ट्रीयांतील लोकांना एक पत्र
\p
\v 22 तेव्हा पौल व बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणातून निवडलेली माणसे म्हणजे बंधुजनांतील प्रमुख बर्शब्बा म्हटलेला यहूदा व सीला ह्यांना अंत्युखियास पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडील ह्यांना वाटले.
\v 23 त्यांच्या हाती त्यांनी असे लिहून पाठवलेः अंत्युखिया, सूरीया व किलकिया येथील परराष्ट्रीयांतले बंधुजन ह्यांना प्रेषित व वडीलवर्ग ह्या बंधुजनांचा सलाम.
\v 24 आमच्यापैकी काहींना जाऊन आपल्या बोलण्याने तुमचे जीव घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे; पण त्यांना आम्ही तसे करावयाला सांगितले नव्हते;
\v 25 म्हणून आमचे एकमत झाल्यावर आम्हाला हे योग्य वाटले की,
\v 26 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकरिता जीवावर उदार झालेले आपले प्रिय बंधू बर्णबा व पौल हयांच्याबरोबर काही निवडलेले माणसे तुम्हाकडे पाठवावी.
\v 27 हयाकरीता यहुदा व सीला ह्यांना आम्ही पाठवले आहे ते स्वतः ह्या गोष्टी तुम्हाला तोंडी सांगतिल.
\v 28 कारण पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टीशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हाला योग्य वाटले;
\v 29 त्या म्हणजे मूर्तीला अर्पीलेले पदार्थ, रक्त, गळा दाबुन मारलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी; ह्यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल. क्षेंमकुशल असो.
\v 30 त्यांना पाठवून दिल्यावर ते अंत्युखियास गेले आणि त्यांनी सर्व मंडळीला जमवून ते पत्र सादर केले.
\v 31 त्यातला बोध वाचून त्यांना आनंद झाला.
\v 32 यहुदा व सीला हे स्वतः संदेष्टे होते, म्हणून त्यांनी पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला व स्थिरावले.
\v 33 तेथे ते काही दिवस राहील्यावर ज्यांनी त्यांना पाठवले होते त्यांच्याकडे जाण्यास बंधुजनांनी त्यांना शांतीने पाठवून दिले;
\v 34 परंतु सिलाला तेथे आणखी रहावयास बरे वाटले.
\v 35 आणि पौल व बर्णबा इतर पुष्कळ जणांबरोबर प्रभूचे वचन शिकवीत व सुवार्तेची घोषणा करीत अंत्युखियास राहीले.
\s पौल व बर्णबा वेगळे होतात
\p
\v 36 मग काही दिवसानंतर पौलाने बर्णबाला म्हटले ज्या ज्या नगरात आपण प्रभूच्या वचनांची घोषणा केली तेथे पुन्हा जाऊन बंधुजनांना भेटून ते कसे आहेत हे पाहू या.
\v 37 बर्णबाची इच्छा होती की, ज्याला मार्क म्हणत त्या योहानाला बरोबर घ्यावे;
\v 38 परंतु पौलाला वाटले की, पंफूल्याहून जो आपणाला सोडून गेला होता व आपल्याबरोबर काम करावयास आला नाही त्याला सोबतील घेणे योग्य नाही.
\v 39 ह्यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्णबा मार्काला घेऊन तारवात बसून कुप्रास गेला;
\v 40 पौलाने सिलाला निवडून घेतले आणि बंधुजनांनी त्याला प्रभूच्या कृपेवर सोंपविल्यावर तो तेथून निघाला,
\v 41 आणि मंडळयाना स्थैर्य देत सूरीया व किलिकिया हयामधुन गेला.
\s5
\c 16
\s लुस्र येथे तीमथ्य पौलाला जाउन मिळतो
\p
\v 1 मग तो दर्बे व लुस्त्र येथे खाली आला; आणि पाहा. तेथे तीमथ्य नावाचा कोणीएक शिष्य होता; तो विश्वास ठेवणाऱ्या कोणाएका स्त्रीचा मुलगा होता; पण त्याचा बाप यहूदी हेल्लणी होता.
\v 2 त्याला लुस्त्रांतले व इकुन्यातले बंधू नावाजीत होते.
\v 3 त्याने आपणाबरोबर यावे अशी पौलाची इच्छा होती; तेव्हा त्याठिकाणी जे यहूदी होते त्यांच्याखातर त्याने त्याला घेऊन त्यांची सुंता केली; कारण त्याचा बाप ग्रीक आहे हे सर्वांना ठाऊक होते.
\s5
\v 4 तेव्हा त्यांनी नगरांमधून जाता जाता यरुशलेमेतील प्रेषित व वडील ह्यांनी जे ठराव केले होते ते त्यांना पाळावयास नेमून दिले.
\v 5 ह्यावरून मंडळया विश्वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस वाढत चालल्या.
\s5
\v 6 नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतीबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया ह्या प्रांतामधून गेले;
\v 7 आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही;
\v 8 मग ते मुसियाजवळून जाऊन त्रोवसाला खाली गेले.
\s5
\v 9 तेथे रात्री पौलाला असा दृष्टांन्त झाला की, मासेदोनियात कोणीएक माणुस उभा राहून आपणाला विनंती करीत आहे की, इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला साहाय्य कर.
\v 10 त्याला असा दृष्टांन्त झाल्यानंतर त्या लोकांना सुवार्ता सांगावयास देवाने आम्हाला बोलावले आहे असे अनुमान करून आम्ही मासेदोनियात जाण्याचा लागलाच विचार केला.
\s पौल मासेदोनियामधील फिलिप्पैला जातो
\s5
\p
\v 11 तेव्हा त्रोवसापासून हाकारून आम्ही नीट समथ्राकेस गेलो व दुसऱ्या दिवशी नियापुलीस गेलो.
\v 12 तेथून फीलिप्पैस गेलो; ते मासेदोनियाचे ह्या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमन लोंकाची वसाहत आहे त्या नगरात आम्ही काही दिवस राहीलो.
\v 13 मग शब्बाथ दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी, जेथे प्रार्थना होत असते असे आम्हाला वाटले तेथे जाऊन बसलो; आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो.
\s5
\v 14 तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती; ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकीत असे; ती देवाची उपासना करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले; तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले;
\v 15 मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की, मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानीत आहा तर माझ्या घरी येऊन राहा तिच्या आग्रहास्तव ती विंनती आम्हाला मान्य करावी लागली.
\s5
\v 16 मग असे झाले की, आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता कोणीएक भूत लागलेली मुलगी आम्हाला आढळली. तिच्या अंगात येत असे.ती दैवप्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे.
\v 17 ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, हे लोक परात्पर देवाचे दास आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवितात.
\v 18 असे ती पुष्कळ दिवस करीत असे; मग पौलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या आत्म्याला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की, तू हिच्यामधून निघून जा आणि ते तत्काळ निघून गेले.
\s पौल व सीला ह्यांचा बंदिवास व सुटका
\s5
\p
\v 19 मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्यांनी पौल व सिला ह्यांना धरून पेठेत अधिकाऱ्यांकडे ओढून नेले.
\v 20 आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यांपुढे उभे करून म्हंटले, हे लोक यहूदी असून आमच्या नगराला त्रास देतात,
\v 21 आणि आम्हा रोमन लोकांना जे परिपाठ स्विकारावयाला व आचरावयाला योग्य नाहीत ते हे सांगतात
\s5
\v 22 तेव्हा लोक त्यांच्यावर उठले, आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारावयाची आज्ञा दिली.
\v 23 मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदिशाळेत टाकून त्यांनी बंदिशाळेचे नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला;
\v 24 त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्यांने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालू त्यांचे पाय खोडयात अडकवले.
\s5
\v 25 मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते.
\v 26 तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले. सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली.
\s5
\v 27 तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदिशाळेचे दरवाजे उघडे पाहिले; आणि बंदिवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तरवार उपसून आपला घात करणार होता.
\v 28 इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस; कारण आम्ही सर्व जण येथेच आहोत.
\s5
\v 29 मग दिवे आणवून तो आत धावत गेला, कांपत कांपत पौल व सिला हयांच्या पाया पडला
\v 30 आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहीजे?
\v 31 ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.
\s5
\v 32 त्यांनी त्याला व त्याच्या घरांतील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले.
\v 33 मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या; आणि तेव्हांच त्याने व त्याच्या घरच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला.
\v 34 मग त्याने त्यास घरी नेऊन जेवू घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घरच्या मंडळीने आनंदोत्सव केला.
\s5
\v 35 दिवस उगवल्यावर अधिकाऱ्यांनी चोपदारास पाठवून सांगितले की, त्या माणसांना सोडून दे.
\v 36 तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने पौलाला असे वर्तमान सांगितले की, तुम्हाला सोडावे म्हणून अधिकाऱ्याने माणसे पाठवली आहेत; तर आता शांतीने जा.
\s5
\v 37 परंतु पौल त्यांना म्हणाला, आम्ही रोमन माणसे असता अपराधी ठरवल्यावाचून त्यांनी आम्हाला उघडपणे फटके मारून बंदिशाळेत टाकले आणि आता ते आम्हास गुप्तपणे घालवितात काय? हे चालणार नाही; तर त्यांनी स्वतः येऊन आम्हास बाहेर काढावे.
\v 38 मग चोपदारांनी हे वर्तमान अधिकाऱ्यास सांगितले. तेव्हा ते रोमन आहेत हे ऐकून त्यास भय वाटले.
\v 39 मग त्यांनी येऊन त्यांची समजूत घातली; आणि त्यांना बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली.
\s5
\v 40 मग ते बंदीशोळेतून निघून लुदियेच्या घरी गेले, बंधुजनांस भेटून त्यांनी त्यांना धीर दिला आणि तेथून ते मार्गस्थ झाले.
\s5
\c 17
\s थेस्सलनीका येथे पौल
\p
\v 1 नंतर ते अंफिपुली व अपुल्लोनिया ह्यांच्यामधून जाऊन थेस्सलनीकास गेले. तेथे यहूद्यांचे सभास्थान होते.
\v 2 तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्याच्याकडे जाऊन तीन शब्बाथ त्यांच्याबरोबर शास्त्रलेखावरून वादविवाद केला.
\s5
\v 3 त्यांने शास्त्रलेखाचा उलगडा करून असे प्रतिपादन केले की, ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यांमधून पुन्हा उठावे ह्याचे अगत्य होते, आणि ज्या येशूची मी तुमच्यापुढे घोषणा करीत आहे तोच तो ख्रिस्त आहे.
\v 4 तेव्हा त्याच्यापैकी काही जणांची खातरी होऊन पौल सीला ह्यांना येऊन मिळाले; आणि ग्रीक उपासक ह्यांचा मोठा समुदाय त्यांना मिळाला. त्यात प्रमुख स्त्रिया काही थोड्या थोडक्या नव्हत्या.
\s5
\v 5 परंतु यहूद्यांनी हेव्याने आपणाबरोबर बाजारचे काही गुंड लोक घेऊन व घोळका जमवून नगरांत घबराट निर्माण केली, आणि यासोनाच्या घरावर हल्ला करून त्यांना लोंकाकडे बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिली;
\v 6 परंतु त्यांचा शोध लागला नाही तेव्हा त्यांनी यासोनाला व कित्येक बंधूना नगराच्या अधिकाऱ्यांकडे ओढीत नेऊन आरडाओरड करीत म्हंटले, ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहेत.
\v 7 त्यास यासोनाने आपल्या घरात घेतले आहे, आणि हे सर्व जण कैसराच्या आज्ञेविरुध्द वागतात, म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे असे म्हणतात.
\s5
\v 8 हे ऐकवून त्यांनी लोकास व शहराच्या अधिकाऱ्यास खवळून सोडले.
\v 9 मग त्यांनी यासोनाचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांना सोडून दिले.
\s बिरुया येथे पौल
\s5
\p
\v 10 नंतर बंधुजनांनी पौल, व सीला ह्यांना लागलेच रातोरात बिरुयास पाठवले. ते तेथे पोहचल्यावर यहूदयांचे सभास्थानात गेले.
\v 11 तेथील लोक थेस्लनिकांतल्या लोंकापेक्षा मोठया मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रलेखात दररोज शोध करीत गेले.
\v 12 त्यातील अनेकांनी व बऱ्याच प्रतिष्ठित ग्रीक स्त्रिया व पुरूष ह्यांनी विश्वास ठेवला.
\s5
\v 13 तरी पण पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे हे थेस्सलनीकांतल्या यहूद्यांना समजले तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांना खवळून चेतविले.
\v 14 त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्राकडे जाण्यास लागलेच पाठवले; आणि सीला व तीमथ्य हे तेथेच राहीले.
\v 15 तेव्हा पौलाला पोहचविणाऱ्यांनी त्याला अथेनैपर्यंत नेले, आणि सिला व तीमथ्य ह्यांनी आपणाकडे होईल तितके लवकर यावे अशी त्यांची आज्ञा घेउन ते निघाले.
\s अथेनै येथे पौल
\s5
\p
\v 16 पौल अथेनैस त्यांची वाट पाहत असता, ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाचा संताप झाला.
\v 17 ह्यामुळे तो सभास्थानात यहूदयांबरोबर व उपासक लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर दररोज वाद घालीत असे.
\s5
\v 18 तेव्हा एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी ह्यांच्याबरोबर कित्येक तत्वज्ञांनी त्याला विरोध केला. कित्येक म्हणाले, हा बडबड्या काय बोलतो? दुसरे म्हणाले, हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो; कारण येशू व पुनरुत्थान हयाविषयीच्या सुवार्तेची तो घोषणा करीत असे.
\s5
\v 19 नंतर त्यांनी त्याला धरून अरियपगावर नेऊन म्हंटले, तुम्ही दिलेली ही नवी शिकवण काय हे आम्हास समजून सांगाल काय? कारण तुम्ही आम्हास अपरिचित गोष्टी ऐकवत आहा; हयाचा अर्थ काय हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे.
\v 20 कारण तुम्ही आम्हास अपरिचित गोष्टी ऐकवित आहा; त्याचा अर्थ काय हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे.
\v 21 काहीतरी नवलविशेष सांगितल्या ऐकल्याशिवाय सर्व अथैनेकर व तेथे राहणारे परके लोक ह्यांचा वेळ जात नसे.
\s अरीयपगात पौलाने केलेले भाषण
\s5
\p
\v 22 तेव्हा पौल अरियपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला अहो अथेनैकरांनो, तुम्ही सर्व बाबतीत देवदेवतांना फार मान देणारे आहा असे मला दिसते.
\v 23 कारण मी फिरता फिरता तुमच्या उपासनेच्या वस्तु पाहतांना, अज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हास जाहीर करतो.
\s5
\v 24 ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही.
\v 25 आणि त्याला काही उणे आहे, म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही; कारण जीवन प्राण व सर्वकाही तो स्वतः सर्वांना देतो;
\s5
\v 26 आणि त्याने एकापासुन माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबध पाठीवर राहावे असे केले आहे; आणि त्याचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या आहेत,
\v 27 अशासाठी की, त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे.तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही;
\s5
\v 28 कारण आपण त्याच्याठायी जगतो, वागतो, व आहो तसेच तुमच्या कवीपैकीही कित्येकांनी म्हटले आहे की, आपण वास्तविक त्याचा वंश आहो.
\v 29 तर मग आपण देवाचे वंशज असतांना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण, हयांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये.
\s5
\v 30 अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो.
\v 31 त्याने असा एक दिवस ने मला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्याने त्याला मेलेल्यातून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वास पटवले आहे.
\s5
\v 32 तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू
\v 33 इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला.
\v 34 तरी काही माणसांनी त्यास चिटकून राहून विश्वास ठेवला; त्यांत दिओनुस्य अरिय-पगकर, दामारी नावांची कोणी स्त्री व त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते.
\s5
\c 18
\s करिंथ येथे पौल
\p
\v 1 नंतर पौलाने अथेनै शहर सोडले व करिंथ शहरास गेला.
\v 2 करिंथमध्ये पौल एका यहूदी मनुष्याला भेटला ज्याचे नाव अक्विल्ला असे होते. तो पंत येथील रहिवासी होता. आपली पत्नी प्रिस्किल्ला हिच्यासह नुकताच तो इटलीहून आला होता. कारण सर्व यहूदी लोकांनी रोम शहर सोडून गेले पाहिजे असा हुकूम क्लौद्याने काढला होता. पौल त्यांना (अक्विल्ला व प्रिस्किल्ला) भेटावयास गेला.
\v 3 पौलासारखेच ते तंबू बनविणारे होते. तो त्यांच्याबरोबर राहिला व त्यांच्याबरोबर काम करू लागला.
\s5
\v 4 प्रत्येक शब्बाथवारी पौल सभास्थानात यहूदी लोकांशी व ग्रीक लोकांशी बोलत असे (चर्चा करीत असे) आणि तो यहूदी व ग्रीक लोकांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत असे.
\v 5 जेव्हा सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून परत आले, तेव्हा पौल उपदेश करण्यात आपला सर्व वेळ घालवू लागला. येशू हाच ख्रिस्त आहे अशी साक्ष देऊ लागला.
\v 6 परंतु यहूदी लोकांनी पौलाला विरोध केला. त्याला ते (यहूदी लोक) वाईट रीतीने बोलले. तेव्हा आपला निषेध दर्शविण्याकरिता पौलाने आपल्या अंगावरील कपडे झटकले. तो यहूदी लोकांना म्हणाला, “जर तुमचे तारण झाले नाही, तर तो तुमचा दोष असेल! तुमचे रक्त तुमच्याच माथी असो! मी निर्दोष आहे. येथून पुढे मी यहूदीतर लोकांकडेच जाईन.”
\s5
\v 7 पौल तेथून निघाला आणि सभास्थानाजवळ राहत असलेल्या तीत युस्त नावाच्या देवाच्या उपासकाच्या घरी गेला.
\v 8 त्या सभास्थानाचा क्रिस्प हा पुढारी होता. क्रिस्पने व त्याच्या घरातील सर्वांनी प्रभूवर विश्वास ठेवला. करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला. करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला आणि त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला.
\s5
\v 9 एके रात्री, प्रभूने स्वप्नामध्ये पौलाला म्हटले, “घाबरु नको! बोलत राहा. शांत राहू नको!
\v 10 मी तुझ्याबरोबर आहे. कोणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही व तुला इजा करणार नाही; कारण या शहरात माझे पुष्कळ लोक आहेत.”
\v 11 म्हणून पौल तेथे दीड वर्षे देवाचे वचन त्या लोकांना शिकवीत राहिला.
\s गल्लियो आणि पौल
\s5
\p
\v 12 जेव्हा गल्लियो अखया प्रांताचा राज्यपाल होता, त्यावेळेस काही यहूदी पौलविरुध्द एकत्र आले आणि त्याला न्यायासनापुढे उभे केले.
\v 13 यहूदी लोक म्हणाले, “हा मनुष्य अशारीतीने लोकांना देवाची उपासना करायला शिकवीत आहे की, जे नियमशास्त्राच्या विरुध्द आहे.”
\s5
\v 14 पौल काही बोलणार इतक्यात गल्लियो यहूदी लोकाना म्हणाला, “एखादा अपराध किंवा वाईट गोष्ट असती तर तुमचे म्हणणे ऐकून घेणे रास्त ठरले असते.
\v 15 परंतु ज्याअर्थी ही बाब शब्द, नावे व तुमच्या नियमशास्त्रातील प्रश्नांशी संबंधित आहे. त्याअर्थी तुम्हीच तुमची समस्या सोडवा. अशा गोष्टींबाबत न्याय करण्यास मी नकार देतो!”
\s5
\v 16 मग गल्लियोने त्यांना न्यायासनापुढून घालवून दिले.
\v 17 मग त्या सर्वांनी यहूदी न्यायासनासमोर प्रमुख सोस्थनेस याला मारहाण केली, पण गल्लियोने त्याकडे लक्ष दिले नाही.
\s पौल सुरियास परत येतो
\s5
\p
\v 18 पौल बंधुजनांबरोबर बरेच दिवस राहिला. नंतर तो निघाला, व सूरिया देशाला समुद्रमार्गे गेला. आणि त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व अक्विल्ला ही दोघे होती. पौलाने किंख्रिया येथे आपल्या डोक्याचे मुंडण केले. कारण त्याने नवस केला होता.
\v 19 मग ते इफिस येथे आले. पौलाने प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांना तेथे सोडले. तो सभास्थानात गेला आणि यहूदी लोकांबरोबर वादविवाद केला.
\s5
\v 20 जेव्हा त्यांनी त्याला तेथे आणखी काही वेळ थांबण्यासाठी सांगितले, तेव्हा तो कबूल झाला नाही.
\v 21 परंतु जाता जाता तो म्हणाला, “देवाची इच्छा असेल तर मी परत तुमच्याकडे येईन.” मग तो समुद्रमार्गे इफिसहून निघाला.
\s5
\v 22 जेव्हा तो कैसरीया येथे आला, तेव्हा तो तेथून वर यरूशलेमला गेला. आणि मंडळीला भेटला. मग तो खाली अंत्युखियाला गेला
\v 23 तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो गेला, आणि गलतिया व फ्रुगिया या प्रदेशातून ठिकठिकाणी प्रवास करीत गेला. त्याने येशूच्या अनुयायांना विश्वासात बळकट केले.
\s इफिसमध्ये अपुल्लो
\s5
\p
\v 24 अपुल्लो नावाचा एक यहूदी होता. तो आलेक्सांद्र येथे जन्मला होता. तो उच्च शिक्षित होता. तो इफिस येथे आला. त्याला शास्त्रलेखाचे सखोल ज्ञान होते.
\v 25 देवाच्या मार्गाचे शिक्षण त्याला देण्यात आले होते. तो आत्म्यात आवेशी असल्यामुळे येशूविषयी अचूकतेने शिकवीत असे व बोलत असे, तरी त्याला फक्त योहानाचा बाप्तिस्माच ठाऊक होता.
\v 26 तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रस्किला व अक्विल्ला ह्यांनी त्यांचे भाषण एेकूण त्याला जवळ बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला.
\s5
\v 27 अपुल्लोला अखया देशाला जायचे होते, तेव्हा बंधुंनी त्याला उत्तेजन दिले. आणि तेथील येशूच्या शिष्यांना त्याचे स्वागत करण्याविषयी लिहिले. जेव्हा तो पोहोंचला, तेव्हा ज्यांनी कृपेमुळे (येशूवर) विश्वास ठेवला होता, त्यांना त्याने खूप मदत केली.
\v 28 जाहीर वादविवादात त्याने यहूदी लोकांना फार जोरदारपणे पराभूत केले. आणि पवित्र शास्त्रलेखाच्या आधारे येशू हाच ख्रिस्त आहे हे सिध्द केले.
\s5
\c 19
\s इफिस येथे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिष्य
\p
\v 1 तेव्हा असे झाले की, अपुल्लो करिंथ येथे असताना पौल निरनिराळ्या भागातून प्रवास करीत इफिस येथे आला, तेथे त्याला येशूचे काही अनुयायी आढळले.
\v 2 पौलाने त्यांना विचारले, “जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला, तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय?” ते अनुयायी त्याला म्हणाले, “पवित्र आत्मा आहे हे सुध्दा आम्ही ऐकलेले नाही!”
\s5
\v 3 तो म्हणाला, “मग कसला बाप्तिस्मा तुम्ही घेतला?”ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा.”
\v 4 पौल म्हणाला, “योहानाचा बाप्तिस्मा पश्चातापाचा होता. त्याने लोकांना सांगितले की, त्याच्यानंतर जो येत आहे, त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा. तो येणारा म्हणजे येशू होय.”
\s5
\v 5 जेव्हा त्यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतला.
\v 6 आणि जेव्हा पौलाने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले, तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले व भविष्य सांगू लागले.
\v 7 या गटात सर्व मिळून बारा पुरूष होते.
\s इफिस येथे पौल
\s5
\p
\v 8 पौल यहूदी सभास्थानात जात असे व तीन महिने धैर्याने बोलत असे, देवाच्या राज्याविषयी चर्चा करीत व यहूदी लोकांचे मन वळवीत असे.
\v 9 परंतु त्यांच्यातील काही कठीण मनाचे झाले, व त्यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला, आणि देवाच्या मार्गाविषयी वाईट बोलले. मग पौल त्यांच्यातून निघून गेला व शिष्यांनाही त्यांच्यातून वेगळे केले. आणि तुरन्नाच्या शाळेत दररोज त्यांच्याशी चर्चा केली.
\v 10 हे असे दोन वर्षे चालले, याचा परिणाम असा झाला की, आशियात राहत असलेल्या सर्व यहूदी व ग्रीक लोकांपर्यंत प्रभू येशूचे वचन पोहोचले.
\s5
\v 11 देवाने पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडविले.
\v 12 पौलाच्या शरीरावरून रुमाल आणि कपडेही आणून काही. लोक या गोष्टी आजारी लोकांवर ठेवत असत. जेव्हा ते असे करीत तेव्हा आजारी लोक बरे होत आणि दुष्ट आत्मे त्यांना सोडून जात.
\s5
\v 13 काही यहूदी सुध्दा सगळीकडे प्रवास करीत असत व लोकांमधून दुष्ट आत्मे घालवीत असत. ते दुष्ट आत्म्याने पछाडलेल्या व्यक्तिमधून प्रभू येशूच्या नावाने ते आत्मे घालवीत असत.
\v 14 ते म्हणत, “पौल ज्या येशूच्या नावाने घोषणा करतो त्या नावाने मी तुला आज्ञा करतो.” स्किवा नावाच्या यहूदी मुख्य याजकाचे सात पुत्र असे करीत होते.
\s5
\v 15 परंतु एकदा एक दुष्ट आत्मा त्यांना म्हणाला, “मी येशूला ओळखतो, पौल मला माहीत आहे, पण तुम्ही कोण आहात?”
\v 16 मग ज्याला दुष्ट आत्मा लागला होता त्या मनुष्याने त्यांच्यावर उडी मारली. त्याने त्यांच्यावर सरशी केली व त्यांना पराभूत केले. तेव्हा ते दोघे उघडे व जखमी होऊन घरातून पळाले.
\v 17 इफिस येथे राहणाऱ्या सर्व यहूदी व ग्रीक लोकांना हे समजले. तेव्हा सर्वांना भीती वाटली, आणि लोक प्रभू येशूच्या नावाचा अधिकच आदर करू लागले
\s5
\v 18 पुष्कळसे विश्वासणारे पापकबुली देऊ लागले व ज्या वाईट गोष्टी त्यांनी केल्या होत्या, त्या सांगू लागले.
\v 19 काही विश्वासणाऱ्यांनी जादूची कामे केली होती. या विश्वासणाऱ्यांनी आपली सर्व जादूची पुस्तके लोकांसमोर आणली आणि जाळली. त्या पुस्तकांची किंमत पन्नास हजार चांदीच्या नाण्यांइतकी भरली
\v 20 अशारीतीने प्रभूच्या वचनाचा दूरवर प्रसार झाला व ते फार परिणामकारक ठरले.
\s पौलाचे पुढले बेत
\s5
\p
\v 21 या गोष्टी घडल्यानंतर पौलाने मनात ठरवले की, मासेदोनिया व अखया या प्रांतांतून प्रवास करीत पुढे यरूशलेमला जायचे. तो म्हणाला, “मी तेथे गेल्यांनतर मला रोम शहरही पाहिलेच पाहिजे.”
\v 22 म्हणून त्याचे दोन मदतनीस तीमथ्य व एरास्त यांना त्याने मासेदोनियाला पाठवून दिले. आणि त्याने आणखी काही काळ आशियात घालविला.
\s इफिस येथील दंगल
\s5
\p
\v 23 याकाळामध्ये त्यामार्गाविषयी (ख्रिस्ती चळवळीविषयी) मोठा गोंधळ उडाला.
\v 24 देमेत्रिय नावाचा एक मनुष्य होता. तो सोनार होता. तो अर्तमी देवीचे देव्हारे बनवीत असे. जे कारागीर होते त्यांना यामुळे खूप पैसे मिळत.
\v 25 त्या सर्वांना व या धंद्याशी संबंध असलेल्या सर्वांना त्याने एकत्र केले, आणि तो म्हणाला, “लोकहो, तुम्हाला माहीत आहे की, या धंद्यापासून आपल्याला चांगला पैसा मिळतो.
\s5
\v 26 पण पहा तो पौल नावाचा मनुष्य काय करीत आहे! तो काय म्हणत आहे ते ऐका! पौलाने पुष्कळ लोकांना प्रभावित केले आहे व बदलले आहे. त्याने हे इफिसमध्ये व सगळ्या आशियामध्ये केले आहे, तो म्हणतो, माणसांच्या हातून बनवलेले देव खरे देव नाहीत.
\v 27 ह्यामुुळे ह्या आपल्या धंद्याची बदनामी होण्याचा धोका आहे; इतकेच नव्हे तर ज्या महादेवी अर्तमीची पूजा सर्व आशिया प्रांत किंबहूना जगसुध्दा करते तिचे देऊळ क:पदार्थ ठरण्याचा व तिचे स्वत:चे महत्व नष्ट होण्याचा धोका आहे.
\s5
\v 28 जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार रागावले, आणि मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “इफिसकरांची अर्तमी थोर आहे!”
\v 29 शहरातील लोकांमध्ये गोंधळ उडाला. आणि लोकांनी गायस व अरीस्तार्ख या पौलाबरोबर सोबती म्हणून प्रवास करणाऱ्या मासेदिनियाच्या रहिवाश्यांना पकडून नाट्यगृहात नेले.
\s5
\v 30 पौल लोकांच्या पुढे जाऊ इच्छीत होता पण येशूचे अनुयायी त्याला असे करू देईनात
\v 31 पौलाचे काही मित्र जे प्रांताधिकारी होते, त्यांनी निरोप पाठवून त्याने नाट्यगृहात जाऊ नये अशी कळकळीची विनंति केली.
\v 32 एकत्र जमलेल्या जमावातून काही लोक एक घोषणा करू लागले तर दुसरे लोक इतर घोषणा करू लागले. त्यामुळे सगळा जमाव अगदी गोंधळून गेला. आणि त्यातील पुष्कळ जणांना माहीत नव्हते की, आपण या न्याय भवनात एकत्र का आलोत.
\s5
\v 33 यहूदी लोकांनी आलेक्सांद्र नावाच्या एका मनुष्याला ढकलीत नेऊन सर्वांच्या समोर उभे केले. तो आपल्या हातांनी खुणावून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागला.
\v 34 पण जेव्हा लोकांना समजले की, तो एक यहूदी आहे, तेव्हा जवळ जवळ दोन तास सातत्याने ते एका आवाजात ओरडत राहिले, “इफिसकरांची अर्तमी देवी थोर आहे!”
\s5
\v 35 शहराचा लेखनिक लोकांना शांत करीत म्हणाला, “इफिसच्या लोकांनो, थोर अर्तमी देवीचे व स्वर्गातून पडलेल्या पवित्र दगडाचे इफिस हे रक्षणकर्ते आहे. हे ज्याला माहीत नाही असा एक तरी माणूस जगात आहे काय?
\v 36 ज्याअर्थी या गोष्टी नाकारता येत नाहीत त्याअर्थी तुम्ही शांत राहिलेच पाहिजे. उतावळेपणा करू नये.
\v 37 तुम्ही या दोघांना (गायस व अरिस्तार्ख) येथे घेऊन आलात. वस्तुतः त्यांनी मंदिरातील कशाचीही चोरी केली नाही किंवा आपल्या देवीची निंदा केलेली नाही.
\s5
\v 38 जर देमेत्रिय व त्याच्याबरोबर असलेल्या कारागिरांच्या काही तक्रारी असतील, तर त्यासाठी न्यायालये उघडी आहेत. तेथे ते एकमेकांवर आरोप करू शकतात!
\v 39 परंतु जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची चौकशी करायची असेल तर नियमित सभेत त्यासंबंधी विचार केला जाईल.
\v 40 आज येथे जे काही घडलेले आहे, त्याबद्दल योग्य ते कारण आपणांस सांगता येणार नाही, त्यामुळे आपणच ही दंगल सुरू केली असा आरोप आपल्यावर केला जाण्याची भीती आहे.”
\v 41 असे सांगून झाल्यानंतर त्याने जमावाला जाण्यास सांगितले.
\s5
\c 20
\s मासेदोनीया, हेल्लास प्रांत व त्रोवस येथे पौल
\p
\v 1 "जेव्हा गोंधळ थांबला, तेव्हा पौलाने येशूच्या अनुयायांना भेटायला बोलावले आणि त्यांना उत्तेजन दिल्यानंतर त्यांचा निरोप घेतला. आणि तो मासेदोनियाला निघाला."
\v 2 मासेदोनियातून जात असताना निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या येशूच्या अनुयायांना त्याने अनेक गोष्टी सांगून धीर दिला. मग पौल ग्रीसला आला
\v 3 त्याठिकाणी तो तीन महिने राहिला. पौल सूरियाला समुद्रमार्गे निघाला असता, यहूदी लोकांनी त्याच्याविरुध्द कट रचला, हे पाहून त्याने मासेदोनियातून परत फिरण्याचे ठरवले.
\s5
\v 4 त्याच्याबरोबर काही लोक होते ते असेः बिरुया शहराच्या पुर्राचा मुलगा सोपत्र, थेस्सलनीका येथील अरिस्तार्ख व सकुंद, दर्बे येथील गायस आणि तीमथ्य, तुखिक व त्रफिम हे आशिया प्रांतातील होते.
\v 5 ही माणसे आमच्यापुढे गेली व त्रोवस येथे आमची वाट पाहू लागली.
\v 6 बेखमीर भाकरीच्या यहूदी सणानंतर आम्ही फिलीप्पै येथून समुद्रमार्गे निघालो आणि पाच दिवसांनी त्रोवस येथे त्यांना जाऊन भेटलो व तेथे सात दिवस राहिलो.
\s युतुख
\s5
\p
\v 7 मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी आम्ही सर्व भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो असताना, पौल त्यांच्याबरोबर बोलू लागला कारण दुसऱ्या दिवशी निघण्याचा त्याचा बेत होता. तो मध्यरात्रीपर्यंत बोलत राहीला.
\v 8 वरच्यामजल्यावरील ज्या खोलीत आम्ही जमा झालो होतो तेथे पुष्कळ दिवे होते.
\s5
\v 9 युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता. पौल बोलत असताना त्याच्यावर झोपेचा इतका अंमल चढला की, तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला, जेव्हा त्याला उचलले, तेव्हा तो मेलेला आढळला.
\v 10 पौल खाली गेला व त्याच्यावर ओणवा पडला आणि त्याला आपल्या हातांनी कवेत धरून म्हणाला, “चिंता करू नका! त्याच्यात अजून जीव आहे.”
\s5
\v 11 मग पौल वर गेला. त्यांने भाकर मोडली व ती खाल्ली. पहाट होईपर्यंत तो त्यांच्याशी बोलला, मग तो गेला.
\v 12 त्या तरुणाला त्यांनी जिवंत असे घरी नेले, त्या सर्वांना फार समाधान झाले.
\s मिलेताचा प्रवास
\s5
\p
\v 13 तेथून आम्ही पुढे निघालो व अस्सा या नगरी समुद्रमार्गे निघालो. तेथे आम्ही पौलाला घेणार होतो. त्यानेच अशाप्रकारे योजना केली होती, ती म्हणजे त्याने स्वतः पायी जायचे.
\v 14 जेव्हा आम्हाला तो अस्सा येथे भेटला, तेव्हा आम्ही त्याला जहजात घेतले, आणि आम्ही मितुलेनाला गेलो.
\s5
\v 15 दुसऱ्या दिवशी आम्ही जहाजाने मितुलेनाहून निघालो व खियासमोर आलो. मग दुसऱ्या दिवशी सामा बेट ओलांडले आणि एक दिवसानंतर मिलेतला आलो.
\v 16 कारण पौलाने ठरवले होते की इफिस येथे थांबायचे नाही. आशियात त्याला जास्त वेळ थांबायचे नव्हते. तो घाई करीत होता कारण शक्य झाल्यास पन्नासाव्या दिवसाच्या सणासाठी त्याला यरूशलेम येथे राहावयास हवे होते.
\s मिलेत तेथे इफिसाच्या वडीलवर्गाशी पौलाने वियोगसमयी केलेले भाषण
\s5
\p
\v 17 मिलेताहून इफिस येथे निरोप पाठवून पौलाने तेथील मंडळीच्या वडीलजनांना बोलावून घेतले.
\v 18 जेव्हा ते आले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “आशियात आलो त्या दिवसापासून मी तुमच्या सोबत असताना कसा राहिलो हे तुम्हाला माहीत आहे.
\v 19 मी प्रभूची सेवा पूर्ण नम्रतेने व रडून केली. यहूदी लोकांनी केलेल्या कटामुळे निर्माण झालेल्या उपद्रवांना तोंड देत मी त्याची सेवा केली.
\v 20 जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हाला सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही, हे तुम्हाला माहीत आहे. आणि या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधीही मागेपुढे पाहिले नाही.
\v 21 पश्चाताप करून देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी यहूदी व ग्रीक लोकांना सारखीच साक्ष दिली.
\s5
\v 22 आणि आता आत्म्याच्या आज्ञेने यरुशलेमेला चाललो आहे, आणि तेथे माझ्याबाबतीत काय घडेल हे माहीत नाही.
\v 23 मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की प्रत्येक शहरात पवित्र आत्मा मला सावध करतो. तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत हे तो मला सांगतो
\v 24 मी माझ्या जीवनाविषयी काळजी करीत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे. प्रभू येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे - ते काम म्हणजे- देवाच्या कृपेबद्दल (दयाळूपणबद्दल) ची सुवार्ता लोकांना सांगितली पाहिजे.
\s5
\v 25 राज्याची घोषणा करीत ज्या लोकांत मी फिरलो त्या तुम्हातील कोणालाही मी पुन्हा कधीही दिसणार नाही हे आता मला माहीत आहे
\v 26 म्हणून मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो की, सर्वांच्या रक्तासंबंधाने मी निर्दोष असा आहे.
\v 27 देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रकट करण्यास मी कधीही मागेपुढे पाहिलेले नाही.
\s5
\v 28 तुमची स्वत:ची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हाला दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या. कळपाची (देवाच्या लोकांची) काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली.
\v 29 मला माहीत आहे की, मी गेल्यावर तुमच्यामध्ये भयंकर असे दुष्ट लांडगे येतील. ते कळपाला सोडणार नाहीत.
\v 30 तुमच्यामधूनसुध्दा लोक उठून शिष्यांना, चुकीचे असे शिकवून आपल्यामागे घेऊन जातील.
\s5
\v 31 यासाठी सावध राहा. तुम्हातील प्रत्येकाला गेले तीन वर्षे डोळ्यांत अश्रू आणून सावध करण्याचे मी कधीच थांबविले नाही हे आठवा.
\v 32 आणि आता मी तुम्हाला देवाच्या व वचनाच्या कृपेच्या अधीन करतो. जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे, व सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वतन द्यावयाला समर्थ आहे
\s5
\v 33 मी कोणाच्याही सोन्याचा, चांदीचा व कपड्यांचा लोभ धरला नाही.
\v 34 मी आपल्या स्वतःच्या व माझ्याबरोबर राहणाऱ्यांच्या गरजा माझ्या हातांनी भागविल्या हे तुम्हाला चांगले माहीत आहे
\v 35 अशारीतीने मी तुम्हास उदाहरण घालू दिले आहे की जे दुर्बल आहेत अशांना आपण स्वतः मेहनत करून मदत केली पाहिजे, व प्रभू येशूचे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत. तो स्वतः म्हणाला, ‘घेण्यापेक्षा देणे अधिक आशीर्वादाचे असते.”‘
\s5
\v 36 आणि हे बोलल्यावर पौलाने गुडघे टेकले आणि प्रार्थना केली.
\v 37 तेव्हा प्रत्येकाला खूपच रडू आले, ते पौलाच्या गळ्यात पडले व त्याचे मुके घेत राहिले.
\v 38 ते पुन्हा त्याला कधीही पाहू शकणार नाहीत, या वाक्याने त्यांना फार दुःख झाले, मग ते त्याला जहाजापर्यंत निरोप देण्यास गेले.
\s5
\c 21
\s मिलेताहून सोरापर्यंत येणे
\p
\v 1 त्यांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही समुद्रमार्गे निघालो. आणि सरळ प्रवास करीत कोस येथे आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही रुदास गेलो. तेथून आम्ही पातरा येथे गेलो.
\v 2 तेथे फेनीकेला जाणारे जहाज आम्हाला आढळले. तेव्हा आम्ही जहाजात बसून पुढे निघालो.
\s5
\v 3 तेव्हा कुप्र आमच्या नजरेत आले. परंतु ते डाव्या अंगाला टाकून आम्ही थेट सूरीया देशाला रवाना झालो व सोर येथे उतरलो. कारण तेथे जहाजातील माल उतरावयाचा होता.
\v 4 तेथे येशूचे काही शिष्य आम्हाला आढळले, आणि आम्ही त्यांच्याबरोबर सात दिवस राहिलो. पवित्र आत्म्याच्या सूचनेवरून त्यांनी पौलाला असे सांगितले की, त्याने यरुशलेमेला जाऊ नये.
\s5
\v 5 आमच्या भेटीचे दिवस संपत आल्यावर आम्ही तेथून निघून आमचा पुढील प्रवास परत सुरू केला. त्यावेळी तेथील बंधुजन आपल्या पत्नी, मुलांच्याबरोबर आमच्यासह शहराबाहेर आले व तेथील समुद्रकिनाऱ्यावर आम्ही गुडघे टेकले व प्रार्थना केली.
\v 6 मग एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही जहाजात बसलो व ते लोक आपापल्या घरी गेले.
\s कैसरीयास येणे
\s5
\p
\v 7 सोरापासून आम्ही आमचा प्रवास सुरू केला व पोलेमा येथे उतरलो. आणि तेथील बंधुजनांना भेटलो, त्यांच्याबरोबर एक दिवस राहिलो.
\v 8 आणि दुसऱ्या दिवशी निघून आम्ही कैसरीयास आलो व सुवार्तिक फिलिप्प याच्या घरी जाऊन राहिलो. तो निवडलेल्या सात सेवकांपैकीएक होता.
\v 9 त्याला चार मुली होत्या. त्यांची लग्ने झालेली नव्हती. या मुलींना देवाच्या गोष्टी (भविष्याविषयीचे) सांगण्याचे दान होते
\s5
\v 10 त्या बंधूच्या बरोबर बरेच दिवस राहिल्यावर अगब नावाचा संदेष्टा यहूदीयाहून तेथे आला.
\v 11 त्याने आमची भेट घेऊन पौलाच्या कमरेचा पट्टा मागून घेतला. त्याने स्वतःचे हात व पाय बांधले आणि तो म्हणाला, “पवित्र आत्मा असे म्हणतो; हा पट्टा ज्या मनुष्याच्या कमरेचा आहे, त्याला यरूशलेम येथील यहूदी लोक असेच बांधतील व परराष्ट्रीयांच्या हाती देतील.”
\s5
\v 12 आम्ही व तेथील सर्वांनी ते शब्द ऐकले. तेव्हा आम्ही व इतर लोकांनी पौलाला कळकळीची विनंति केली की, त्याने यरूशलेमला जाऊ नये.
\v 13 पण पौल म्हणाला, “तुम्ही हे काय करीत आहा, असे रडून तुम्ही माझे मन खचवीत आहात काय? मी फक्त बांधून घेण्यासाठी नव्हे तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलेममध्ये मरायलादेखील तयार आहे.”
\v 14 यरुशलेमापासून दूर राहण्यासाठी आम्ही त्याचे मन वळवू शकलो नाही, म्हणून आम्ही त्याला विनंति करायची सोडली आणि म्हटले, “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो.”
\s यरुशलेमस येणे
\s5
\p
\v 15 त्यानंतर आम्ही तयार झालो आणि यरूशलेमला निघालो.
\v 16 कैसरीया येथील येशूचे काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि आम्हाला म्लासोनकडे घेऊन गेले. कारण त्याच्याकडेच आम्ही राहणार होतो. तो (म्नासोन) कुप्रचा होता. तो सुरुवातीच्या काळात प्रथम शिष्य झालेल्यांपैकी एक होता.
\s यहूद्यांतून ख्रिस्ती झालेल्यांची समजूत घालण्यासाठी पौलाने केलेला नवस
\s5
\p
\v 17 आम्ही जेव्हा यरुशलेमेला पोहचलो, तेव्हा तेथील बंधुजनांनी मोठ्या आनंदाने आमचे स्वागत केले.
\v 18 दुसऱ्या दिवशी पौल आमच्यासह याकोबाला भेटायला आला. तेव्हा सर्व वडीलजन हजर होते.
\v 19 पौल त्यांना भेटला. नंतर त्याच्या हातून देवाने यहूदीतर लोकांत कशीकशी सेवा करून घेतली, याविषयी क्रमवार सविस्तर माहिती सांगितली.
\s5
\v 20 जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी देवाचा गौरव केला. आणि ते त्याला म्हणाले, “बंधू, तू पाहशील की हजारो यहूदी विश्वासणारे झालेत. पण त्यांना असे वाटते की, मोशेचे नियम पाळणे फार महत्वाचे आहे.
\v 21 या यहूदी लोकांनी तुझ्याविषयी ऐकले आहे की, जे यहूदी इतर देशांत राहतात त्यांना तू मोशेचे नियम पाळू नका असे सांगतोस. तसेच आपल्या मुलांची सुंता करू नका असे सांगतो व आपल्या चालीरीती पाळू नका असे सांगतो.
\s5
\v 22 मग आता काय केले पाहिजे? तू येथे आला आहेस हे त्यांना नक्की कळेल.
\v 23 तेव्हा आता आम्ही सांगतो तसे कर; आमच्यातील चार लोकांनी नवस केला आहे.
\v 24 त्या चौघांना घे व स्वतःचे त्यांच्यासह शुध्दीकरण करून घे. त्या चौघांना त्यांच्या डोक्याचे मुंडण करता यावे म्हणून त्यांचा खर्च तू कर. मग सर्वांना हे समजेल की, त्यांनी जे काही तुझ्याबद्दल ऐकले आहे ते खरे नाही, उलट तू नियमशास्त्राचे पालन करतोस हे दिसेल.
\s5
\v 25 जे परराष्ट्रीय विश्वासणारे आहेत त्यांना आम्ही पत्र लिहिले आहे. ते असे, मूर्तीला वाहिलेले अन्न त्यांनी खाऊ नये. रक्त अगर गुदमरून मारलेले प्राणी त्यांनी खाऊ नयेत अनैतिक कृत्ये करू नयेत.”
\v 26 मग पौलानेच त्या चार लोकांना आपल्याबरोबर घेतले. दुसऱ्या दिवशी शुध्दीकरणाच्या विधीमध्ये तो सहभागी झाला. मग तो मंदिरात गेला. शुध्दीकरणाचे दिवस केव्हा संपतील हे जाहीर केले. शेवटच्या दिवशी प्रत्येकासाठी अर्पण देण्यात येईल.
\s यरुशलेमेतला दंगा व पौलाला अटक
\s5
\p
\v 27 सात दिवस जवळ जवळ संपत आले होते. परंतु आशियातील काही यहूदी लोकांनी पौलाला मंदिरात पाहिले. त्यानी लोकांना भडकाविले व त्याला (पौलाला) धरले.
\v 28 ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “इस्राएलच्या लोकांनो, मदत करा! हाच तो मनुष्य आहे, जो सर्व लोकांना सगळीकडे आपल्या लोकांविरुध्द आपल्या नियमांविरुध्द व या जागेबद्दल शिकवीत आहे, आणि आता त्याने ग्रीक लोकांना देखील मंदिरात आणले आहे, आणि ही पवित्र जागा विटाळविली आहे.”
\v 29 ते असे म्हणाले, कारण इफिसच्या त्रफिमला त्यांनी पौलाबरोबर यरूशलेम येथे पाहिले होते. त्रफिम यहूदी नव्हता, तो ग्रीक होता. लोकांना वाटले, पौलानेच त्याला मंदिरात नेले आहे.
\s5
\v 30 सर्व शहर खवळून उठले. सगळे लोक धावू लागले. त्यांनी पौलाला पकडले व मंदिरातून बाहेर ओढून काढले. लगेच दारे बंद करण्यात आली.
\v 31 ते त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करीत असतानाच रोमी सैन्याच्या सरदाराकडे बातमी गेली की, शहरात सगळीकडे गोंधळ उडालेला आहे.
\s5
\v 32 ताबडतोब त्याने काही शिपाई व काही शताधिपती घेतले. व तो यहूदी जेथे पौलाला मारीत होते, तेथे धावत गेला. जेव्हा यहूदी लोकांनी रोमी सरदाराला व सैन्याला पाहिले तेव्हा त्यांनी पौलाला मारण्याचे थांबविले.
\v 33 मग सरदार पौलाकडे आला व त्याला अटक केली व त्याला साखळ्यांनी बांधण्याची आज्ञा दिली. मग सरदाराने पौल कोण आहे व त्याने काय केले आहे याविषयी विचारले.
\s5
\v 34 गर्दीतून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येऊ लागले. गोंधळामुळे व ओरडण्यामुळे सरदारला सत्य काय आहे हे जाणून घेता येईना. म्हणून सरदाराने शिपायांना हुकूम दिला की, पौलाला इमारतीत घेऊन जावे.
\v 35 जेव्हा पौल इमारतीच्या पायऱ्यांजवळ आला तेव्हा शिपायांना त्याला उचलून आत न्यावे लागले.
\v 36 कारण जमाव हिंसक बनत चालला होता. जमाव त्याच्यामागे चालला होता व ओरडत होता, “त्याला जिवे मारा!”
\s5
\v 37 शिपाई पौलाला इमारतीत घेऊन जाणार इतक्यात पौल सरदाराला म्हणाला, “मी काही बोलू शकतो काय?” तो सरदार म्हणाला, “तुला ग्रीक बोलता येते काय?
\v 38 मग मला वाटते, तो मनुष्य तू नाहीस, मला वाटले इजिप्तच्या ज्या मजुराने काही दिवसांपूर्वी बंड करून सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तोच तू आहेस. त्या इजिप्तच्या मनुष्यांने चार हजार दहशतवाद्यांना अरण्यात नेले.”
\s5
\v 39 पौल म्हणाला, “किलकिया प्रांतातील तार्सस नगरात राहणारा मी एक यहूदी आहे. मी एका महत्वाच्या शहराचा नागरिक आहे. मी तुम्हाला विनवितो, मला लोकांशी बोलू द्या.”
\v 40 जेव्हा सरदाराने त्याला बोलण्याची परवानगी दिली तेव्हा तो पायऱ्यांवर उभा राहिला आणि आपल्या हाताने त्याने लोकांना शांत राहण्यास सांगितले. जेव्हा सगळीकडे शांतता पसरली तेव्हा पौल इब्री भाषेत बोलू लागलाः
\s5
\c 22
\s यहूद्यांबरोबर पौलाने केलेले भाषण
\p
\v 1 बंधुजनहो व वडील मंडळींनो, मी जे काही आता तुम्हास प्रत्युत्तर करतो ते ऐका.
\v 2 तो आपणाबरोबर इब्री भाषेत बोलत आहे हे ऐकून ते अधिक शांत झाले. मग त्याने म्हटले.
\s5
\v 3 मी यहूदी आहे. माझा जन्म किलकीयातील तार्स नगरांत झाला आणि मी ह्या शहरांत गमलिएलच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडीलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले, आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहा तसा मीही होतो.
\v 4 पुरूष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालू देहान्तशिक्षा देऊन सुध्दा मी ह्या पंथाचा पाठलाग केला.
\v 5 त्याविषयी प्रमुख याजक व सगळा वडिलवर्गहि माझा साक्षी आहे; मी त्यांच्यापासून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्कास चाललो होतो; ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरूशलेमेत शासन करावयास आणावे.
\s5
\v 6 मग असे झाले की, जाता जाता मी दिमिष्काजवळ पोहचलो तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला.
\v 7 तेव्हा मी जमिनीवर पडलो, आणि शौला, शौला, माझा छळ का करितोस? अशी वाणी माझ्याबरोबर मी बोलतांना ऐकली.
\v 8 मी विचारले, प्रभूजी, तू कोण आहेस? त्याने मला म्हटले, ज्या नासोरी येशूचा तू छळ करितोस तोच मी आहे.
\s5
\v 9 तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही.
\v 10 मग मी म्हणालो, प्रभूजी मी काय करावे?प्रभूने मला म्हटले, उठून दिमिष्कात जा; मग तू जे काही करावे म्हणून ठरविण्यात आले आहे, त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल.
\v 11 त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले; म्हणून माझ्या सोबत्यांनी माझा हात धरून मला दिमिष्कात नेले.
\s5
\v 12 मग हनन्या नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता, आणि तेथे राहणारे सर्व यहूदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत.
\v 13 तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, शौल भाऊ, इकडे पहा. तत्क्षणीच मी त्याच्याकडे वर पाहिले
\s5
\v 14 मग तो म्हणाला आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे; आणि त्या नीतिमान पुरुषाला पहावे व त्याच्या तोंडाची वाणी ऐकावी.
\v 15 कारण जे तू पाहिले आहे व एेकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील.
\v 16 तर आता उशीर का करितोस? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पापांचे क्षालन कर.
\s5
\v 17 मग असे झाले की, मी यरूशलेमेस माघारी आल्यावर, मंदिरात प्रार्थना करीत असता माझे देहभान सुटले.
\v 18 तेव्हा मी त्याला पाहिले; तो मला म्हणाला, त्वरा कर, यरूशलेमेतून लवकर निघून जा; कारण तू माझ्याविषयी दिलेली साक्ष ते मान्य करणार नाहीत.
\s5
\v 19 तेव्हा मी म्हणालो, प्रभो, त्यांना ठाऊक आहे की, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्याना मी बंदीत टाकून प्रत्येक सभास्थानात त्यांना मारहाण करीत असे;
\v 20 तुझा साक्षी स्तेफन ह्याचा रक्तपात झाला तेव्हा मी स्वतः जवळ उभा राहून मान्यता दर्शवित होतो आणि त्याचा घात करणाऱ्याची वस्त्रे सांभाळीत होतो.
\v 21 तेव्हा त्याने मला सांगितले, जा मी तुला मी परराष्ट्रीयांकडे दूर पाठवतो.
\s रोमन नागरिक म्हणून असलेल्या पौलाचा हक्क
\s5
\p
\v 22 ह्या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले; मग ते आरोळी मारून बोलले, जगातून ह्याला नाहीसे करा, ह्याची जगण्याची लायकी नाही.
\v 23 ते ओरडत व आपली वस्त्रे अंगावरून काढून टाकून आकाशात धूळ उधळीत असता.
\v 24 सरदाराने शिपायांना सांगितले, पौलाला चाबकाने मारा. अशाप्रकारे हे लोक पौलाविरुध्द का ओरड करीत आहेत हे सरादाराला जाणून घ्यायचे होते.
\s5
\v 25 मग त्यांनी त्याला वाद्यांनी ताणले. तेव्हा जवळ उभ्या असलेल्या शताधीपतीला पौलाने म्हटले, रोमन मनुष्याला व ज्याला दोषी ठरवले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय?
\v 26 हे एकूण शताधीपतीने सरदाराजवळ जाऊन म्हटले, आपण हे काय करीत आहा? तो माणूस रोमन आहे.
\s5
\v 27 तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणाला, मला सांग तू रोमन आहेस काय? त्याने म्हटले, होय.
\v 28 सरदाराने उत्तर दिले, मी हा नागरिकपणाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे. पौलाने म्हटले, मी तर जन्मतःच रोमन आहे.
\v 29 ह्यावरून जे त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ त्याच्यापासून निघून गेले; शिवाय हा रोमन आहे असे सरदाराला कळले तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्याला बांधिले होते.
\s सन्हेंद्रिन सभेपुढे पौलाचे आत्मसमर्पण
\s5
\p
\v 30 यहूदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते. म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने त्याला मोकळे केले, आणि मुख्य याजक व सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकुम करून पौलाला खाली आणून त्याच्यापुढे उभे केले.
\s5
\c 23
\p
\v 1 मग पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टि करून म्हणाला, बंधुजनहो, मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे.
\v 2 तेव्हा प्रमुख याजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांस त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली.
\v 3 तेव्हा पौल त्याला म्हणाला, हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील; तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करावयाला बसला असता नियमशास्त्राविरुध्द मला मारण्याची आज्ञा देतोस काय?
\s5
\v 4 तेव्हा जवळ उभे राहणारे म्हणाले, तू देवाच्या प्रमुख याजकाची निंदा करितोस काय?
\v 5 पौलाने म्हटले, बंधुजनहो, हा प्रमुख याजक आहे हे मला ठाऊक नव्हते; कारण 'तू आपल्या लोकांच्या अधिकाऱ्याविरुध्द वाईट बोलू नको ' असे शास्त्रात लिहिले आहे.
\s5
\v 6 तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदूकी व एक भाग परूशी आहे, हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, बंधुजनहो, मी परूशी व परुश्यांचा पुत्र आहे; आमची आशा व मेलेल्यांचे पुनरुत्थान ह्यासंबंधाने माझी चौकशी होत आहे.
\v 7 तो हे बोलत आहे तोंच परूशी व सदूकी ह्यांच्यात भांडण लागून लोकांत फुट पडली.
\v 8 कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही, असे सदूकी म्हणतात; परूशी तर ह्या दोन्ही गोष्टी मान्य करतात.
\s5
\v 9 तेव्हा मोठी गडबड उडाली; आणि जे नियमशास्र शिक्षक, परूश्यांच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काहीजण उठून तणतण करीत म्हणाले, या माणसाच्या ठायी आम्हाला काही वाईट दिसत नाही; जर आत्मा किंवा देवदूत त्यांच्याबरोबर बोलला असेल तर मग कसे?
\v 10 असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता; ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकुम केला की, खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे.
\s5
\v 11 त्याच रात्री प्रभू त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, धीर धर; जशी तू यरूशलेमेत माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरांतही तुला द्यावी लागेल.
\s यहूद्यांचा पौलाविरुध्द कट
\s5
\p
\v 12 मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबध्द होऊन म्हणाले, पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही.
\v 13 हा कट रचणारे इसम चाळीसांहून अधिक होते.
\s5
\v 14 ते मुख्य याजक व वडील ह्यांच्याकडे येऊन म्हणाले, पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही अन्नाला शिवणार नाही, अशा कडकडीत शपथेने आम्ही आपणास बध्द करून घेतले आहे.
\v 15 तर आता त्याच्याविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाची आहे, ह्या निमित्ताने त्याला आपणाकडे आणावे असे तुम्ही न्यायसभेतही सरदाराला समजावावे; म्हणजे तो जवळ येतो न येतो तोंच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार आहो.
\s5
\v 16 तेव्हा ते दबा धरून बसल्याचे पौलाच्या बहिणीच्या मुलाने ऐकले, आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले.
\v 17 तेव्हा पौलाने एका शताधीपतीला बोलावून म्हटले, या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा, ह्याला त्यास काही सांगावयाचे आहे.
\s5
\v 18 तेव्हा त्याने त्याला सरदाराकडे नेऊन म्हटले, बंदिवान पौल ह्याने मला बोलावून विनंती केली की, ह्या तरूणाला आपणाकडे आणावे, त्याला आपणाबरोबर काही बोलावयाचे आहे.
\v 19 तेव्हा सरदाराने त्याचा हात धरून त्याला एकीकडे नेऊन विचारले, तुला काय सांगावयाचे आहे?
\s5
\v 20 तो म्हणाला, यहूद्यांनी असा एकोपा केला आहे की, पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाच्या निमित्ताने त्याला उद्या खाली सभेमध्ये आणावे, अशी आपणाला विनंती करावी.
\v 21 तर आपण त्यांचे ऐकू नका; कारण त्यांच्यापैकी चाळीसांहून अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत; त्यांनी शपथ घेतली आहे की, त्याला जिवे मारीपर्यंत आपण खाणार पिणार नाही; आणि आता ते तयार होऊन आपल्या संमतीची वाट पाहत आहे.
\s5
\v 22 तेव्हा, तू हे मला कळविले आहे हे कोणाला सांगू नको, असे त्या तरूणाला निक्षून सांगून सरदाराने त्याला निरोप दिला.
\v 23 मग त्याने दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, कैसरीयास जाण्यासाठी दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी प्रहर रात्रीस तयार ठेवा,
\v 24 आणि पाठाळे मिळवा. त्यावर पौलाला बसवून फेलिक्स सूभेदाराकडे सांभाळून न्या.
\s5
\v 25 शिवाय त्याने अशा मजकूराचे पत्र लिहिले,
\v 26 महाराज फेलिक्स ह्यांना सुभेदार क्लौद्य लुसिया ह्याचा सलाम.
\v 27 ह्या मनुष्याला यहूद्यांनी धरले होते आणि त्यांच्याकडून त्याचा घात होणार होता, इतक्यात हा रोमी आहे असे कळाल्यावरून मी शिपाई घेऊन जाऊन त्याला सोडवले
\s5
\v 28 आणि ह्याच्यावर आरोप आणण्याचे काय कारण होते हे समजून घेण्याच्या इच्छेने त्याला त्यांच्या न्यायसभेत खाली नेले.
\v 29 तेव्हा त्यांच्या नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टींसंबंधी त्याच्यावर काही ठपका आणला होता, परंतु मरणाची किंवा बंधनाची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता, असे मला दिसून आले.
\v 30 ह्या माणसा विरुध्द कट होणार आहे अशी मला खबर लागताच मी त्याला आपल्याकडे पाठवले आहे. वादींनाही आपल्यासमोर खटला चालवण्यास सांगितले आहे. सुखरूप असावे
\s5
\v 31 शिपायांनी हुकुमाप्रमाणे पौलाला रात्री अंतिपत्रिसास नेले.
\v 32 आणि दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबर जाण्यास स्वार ठेवून ते गढीत परत आले.
\v 33 कैसरियात गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पौलाला त्याच्यापुढे उभे केले.
\s5
\v 34 पत्र वाचून त्याने विचारले, "हा कोणत्या प्रांताचा आहे? तो किलीकीयाचा आहे समजल्यावर
\v 35 त्याने म्हटले, " तुझे वादी आले म्हणजे मी तुझे म्हणणे ऐकेन; " आणि 'त्याला हेरोदाच्या वाड्यात ठेवावे ' असा त्याने हुकुम सोडला.
\s5
\c 24
\p
\v 1 पाच दिवसानंतर प्रमुख याजक हनन्या, काही वडील आणि तिर्तुल्ल नावाचा कोणीएक वकील ह्यांना घेऊन खाली आला; आणि त्यांनी सुभेदारापुढे पौलाविरुध्द फिर्याद केली.
\v 2 त्याच्यावर दोषारोप ठेवू लागला, तो येणेप्रमाणेः फेलिक्स महाराज, आपल्यामुळे आम्हाला फार शांतता मिळाली आहे आणि आपल्या दूरदर्शीपणामुळे ह्या राष्ट्रात सुधारणा होत आहेत.
\v 3 म्हणून त्यांचे आम्ही पूर्ण कृतज्ञतेने, सर्व प्रकारे व सर्वत्र स्वागत करतो.
\s5
\v 4 तरी आपला अधिक वेळ न घेता मी विनंती करतो की, मेहरबानी करून आमचे थोडक्यात ऐकावे.
\v 5 हा माणूस म्हणजे एक पिडा आहे असे आम्हाला आढळून आले आहे आणि जगातल्या सर्व यहूदी लोकांत हा बंड उठवणारा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे.
\v 6 ह्याने मंदिरही विटाळण्याचा प्रयत्न केला; त्याला आम्ही धरले; व आमच्या नियमाशास्त्राप्रमाणे ह्याचा न्याय करण्यास आम्ही पाहत होतो;
\s5
\v 7 पण लुसिया सरदाराने येऊन मोठ्या जबरदस्तीने ह्याला आमच्या हातातून काढून नेले.
\v 8 आणि ह्याची चौकशी आपण कराल तर ज्या गोष्टींचा दोषारोप आम्ही त्याच्यावर करतो त्या सर्वांविषयी त्याच्याकडूनच आपणाला समजेल.
\v 9 तेव्हा ह्या सर्व गोष्टी अशाच आहेत, (असे म्हणून यहूद्यांनी दुजोरा दिला).
\s5
\v 10 मग सुभेदाराने बोलण्यास खुणावल्यावर पौलाने उत्तर दिले. "आपण पुष्कळ वर्षापासून ह्या लोकांचे न्यायधीश आहात हे मला ठाऊक आहे, म्हणून मी आपल्यासंबंधीच्या गोष्टीचे संतोषाने समर्थन करतो.
\v 11 आपल्याला पूर्णपणे कळून येईल की, मला यरूशलेमेत उपासना करायला जाऊन अजून बारापेक्षा अधिक दिवस झाले नाहीत.
\v 12 आणि मंदिरात, सभास्थानात किंवा नगरात कोणाबरोबर वादविवाद करताना किंवा बंडाळी माजवताना मी त्यांना आढळलो नाही.
\v 13 ज्या गोष्टींचा दोषारोप ते माझ्यावर आता करत आहेत, त्या गोष्टी त्यांना आपणापुढे शाबीत करता येत नाहीत.
\s5
\v 14 तरी मी आपणाजवळ इतके कबूल करतो की, ज्या मार्गाला ते पाखंड म्हणतात त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखांत आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी पूर्वजांच्या देवाची सेवा करतो.
\v 15 आणि नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरूत्थान होईल, अशी जी आशा धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो.
\v 16 ह्यामुळे देवासंबंधाने व माणसांसंबंधाने माझा विवेकभाव सतत शुध्द राखण्याचा मी यत्न करत असतो.
\s5
\v 17 मी पुष्कळ वर्षांनी आपल्या लोकांना दानधर्म करण्यास व यज्ञार्पणे वाहण्यास आलो.
\v 18 शुध्दीकरणाच्या विधीत मी व्रतस्थ असा मंदिरात आढळलो. माझ्याबरोबर लोकांचा घोळका नव्हता किंवा दंगा होत नव्हता; पण तेथे आशिया प्रांतातले कित्येक यहूदी होते.
\v 19 त्यांचे माझ्याविरूध्द काही असते तर त्यांनी आपणा पूढे येऊन माझ्यावर दोषारोप करायचा होता;
\s5
\v 20 किंवा मी न्यायसभेपूढे उभा राहीलो असता माझा कोणता अपराध ह्यांना दिसून आला ते ह्यांनी तरी सांगावे.
\v 21 ह्यांच्यामध्ये उभे राहून, मेलेल्यांचा पुनरूत्थानाविषयी माझा न्याय आज तुमच्यापुढे होत आहे, हे शब्द मी मोठ्याने बोललो, हा एवढा उद्गार अपराध असला तर असेल.
\s फेलिक्स खटल्याचे काम तहकूब करतो
\s5
\p
\v 22 फेलिक्साला त्या मार्गाची चांगली माहीती असल्यामुळे त्याने खटला तहकूब करून म्हटले, लुसीयाचा सरदार येईल तेव्हा तुमच्या प्रकरणाचा निकाल करीन.
\v 23 आणि त्याने शताधिपतीला हुकुम केला की, "ह्याला पहाऱ्यात ठेवावे; तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयांना ह्याची सेवा करण्यास मनाई नसावी. "
\s5
\v 24 मग काही दिवसानंतर फेलिक्स आपली यहूदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला, व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले.
\v 25 तेव्हा नीतिमत्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी तो भाषण करत असता, फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, "आता जा; संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन."
\s5
\v 26 आणखी आपणास पौलाकडून द्रव्य मिळेल अशी आशाही त्याला होती. म्हणून तो त्याला पुनःपुन्हा बोलावून घेवून त्याच्याबरोबर संभाषण करत असे.
\v 27 पुढे दोन वर्षांनंतर फेलिक्साच्या जागेवर पुर्क्य फेस्त हा आला; तेव्हा यहूद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेलिक्स पौलाला कैदेतच ठेवून गेला.
\s5
\c 25
\s फेस्तासमोर पौलाची चौकशी
\p
\v 1 मग फेस्त सुभ्यांत आल्यावर तीन दिवसांनी कैसरीयाहून वर यरूशलेमेस गेला.
\v 2 तेव्हा मुख्य याजक व यहूद्यांतील मुख्य पुरूष ह्यांनी त्याच्याकडे पौलाविरूध्द फिर्याद नेली;
\v 3 आणि, कृपा करून त्याला यरूशलेमेत बोलावून घ्यावे, अशी त्याच्याकडे विनंती केली; वाटेत दबा धरून त्याचा घात करण्याचा त्यांचा बेत होता.
\s5
\v 4 फेस्ताने उत्तर, “ पौल कैसरीयात कैदेत आहे; मी स्वतः लवकरच तिकडे जाणार आहे;
\v 5 म्हणून त्या माणसाचा काही अपराध असला तर तुमच्यातील प्रमुखांनी माझ्याबरोबर येऊन त्याच्यावर आरोप ठेवावा."
\s5
\v 6 मग तो त्यांच्यामध्ये आठदहा दिवस राहून कैसरीयास खाली गेला आणि दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसल्यावर त्याने पौलाला आणण्याचा हुकूम केला.
\v 7 तो आल्यावर यरूशलेमेहून आलेल्या यहूद्यांनी त्याच्याभोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ व भयंकर आरोप त्याच्यावर ठेवले.
\v 8 पौलाने प्रत्युत्तर केले की, “ मी यहूद्यांच्या नियमशास्राचा, मंदिराचा किंवा कैसराचा काही अपराध केला नाही.
\s5
\v 9 तेव्हा यहूद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेस्त पौलाला म्हणाला, “ यरूशलेमेत जाऊन तेथे माझ्यापुढे ह्या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय?
\v 10 तेव्हा पौलाने म्हटले, कैसराच्या न्यायासनापुढे मी उभा आहे; येथेच माझा न्याय झाला पाहीजे. मी यहूद्यांचा काही अपराध केला नाही, हे आपणही चांगले जाणता.
\s5
\v 11 मी अपराध केला असला किंवा मरणास योग्य असे काही केले असले तर मी मरण्यास तयार नाही असे नाही; परंतु त्यांनी माझ्यावर जे आरोप ठेवले आहेत त्यांतला एकही जर खरा ठरत नाही, तर मला त्यांच्या स्वाधीन करण्याचा कोणालाही अधिकार नाही; मी कैसराजवळ न्याय मागतो.“
\v 12 तेव्हा फेस्ताने सभेची मसलत घेऊन उत्तर दिले, “ तू कैसराजवळ न्याय मागितला आहेस तर कैसरापुढे जाशील.“
\s अग्रिप्पा व बर्णीका
\s5
\p
\v 13 मग काही दिवस झाल्यावर अग्रिप्पा राजा व बर्णीका ही दोघे कैसरीयास येऊन फेस्ताला भेटली.
\v 14 तेथे ती पुष्कळ दिवस राहिली. तेव्हा फेस्ताने राजापुढे पौलाचे प्रकरण काढून म्हटले, “ फेलिक्साने बंदीत ठेवलेला एक माणूस येथे आहे.
\v 15 मी यरूशलेमेस गेलो होतो तेव्हा यहूद्यांच्या मुख्य याजकांनी व वडीलांनी फिर्याद करून त्याच्याविरूध्द ठराव व्हावा म्हणून विनंती केली.
\v 16 त्यांना मी उत्तर दिले की, आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची आरोपीला संधी मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरीता सोपवून देण्याची रोमी लोकांची रीत नाही.
\s5
\v 17 म्हणून ते येथे आल्यावर काही उशीर न करता, दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसून मी त्या माणसाला आणण्याचा हुकूम केला.
\v 18 त्याच्यावर आरोप करणारे जेव्हा त्याच्याविरुध्द बोलण्यास उभे राहिले, तेव्हा माझ्या अपेक्षेप्रमाणे कसल्याही गुन्ह्याबाबत त्यांनी त्याच्यावर आरोप केले नाहीत.
\v 19 उलट आपल्या धर्माविषयी आणि कोणाएका मनुष्याविषयी ज्याचे नाव येशू आहे, त्याच्यावरून यहूदी लोकांनी त्या माणसाशी वाद केला. येशू हा जरी मेलेला असला, तरी पौलाचा असा दावा आहे की, येशू जिवंत आहे.
\v 20 या प्रश्नाची चौकशी कशी करावी हे मला समजेना. तेव्हा त्या यहूदी मनुष्याविरुध्द यहूदी लोकांचे जे आरोप आहेत, त्याबाबत त्याला यरूशलेम येथे नेऊन त्याचा न्याय केला जावा अशी त्याची इच्छा आहे काय, असे मी त्याला विचारले.
\s5
\v 21 सम्राटाकडून आपल्या न्यायनिवाडा होईपर्यंत आपण कैदेत राहू असे जेव्हा पौल म्हणाला, तेव्हा मी आज्ञा केली की, कैसराकडे पाठविणे शक्य होईपर्यंत त्याला तुरुंगातच ठेवावे.”
\v 22 यावर अग्रिप्पा फेस्तला म्हणाला, “मला स्वतःला या मनुष्याचे म्हणणे ऐकावेसे वाटते.” फेस्तने त्याला उत्तर दिले, “उद्या त्याचे म्हणणे तुम्ही ऐकू शकाल.”
\s5
\v 23 म्हणून दुसऱ्या दिवशी अग्रिप्पा आणि बर्णीका मोठ्या थाटामाटात आले, व लष्करी सरदार व शहरातील मुख्य नागरिकांसह दरबारात प्रवेश केला. तेव्हा फेस्तच्या आज्ञेनुसार पौलाला तेथे आणण्यात आले.
\v 24 मग फेस्त म्हणाला, “राजे अग्रिप्पा महाराज आणि आमच्याबरोबर येथे उपस्थित असलेले सर्व जण, या मनुष्याला पाहा! याच्याच विषयी यरूशलेम व कैसरिया येथील सर्व यहूदी लोकांनी माइयाकडे अर्ज दिलेला आहे. याला जिवंत राहू देऊ नये, असा आकांत ते करतात.
\s5
\v 25 परंतु याला मरणदंड द्यावा असे याने काहीही केले नाही, असे मला आढळून आले. आणि त्याने स्वतःच आपणांला सम्राटाकडून (कैसराकडून) न्याय मिळावा अशी मागणी केली, म्हणून मी त्याला कैसरासमोर न्यायासाठी पाठविण्याचे ठरवले आहे.
\v 26 परंतु सम्राटाला याच्याविषयी निशिचत असे कळवावे, असे माइयाकडे काही नाही, म्हणून मी याला तुमच्यापुढे आणि विशेषतः राजा अग्रिप्पापुढे आणून उभे केले आहे. ते अशाकरिता की, या चौकशीनंतर मला या मनुष्याविषयी काहीतरी लिहिता यावे.
\v 27 " शेवटी एखाद्या कैद्याला कसलाही आरोप न ठेवता कैसराकडे पाठविणे मला योग्य वाटत नाही!”
\s5
\c 26
\s अग्रिप्पपुढे पौलाने केलेले भाषण
\p
\v 1 अग्रिप्पा पौलाला म्हणाला, “तुला तुझी बाजू मांडायला परवानगी आहे.” यावर पौलाने आपला हात उंच करून आपल्या बचावाचे भाषण सुरू केलेः "
\v 2 “अग्रिप्पा महाराज, मी स्वतःला धन्य समजतो कारण यहुद्यांनी आपल्यासमोर माझ्याविरुध्द केलेल्या आरोपांचा बचाव करण्याची संधी आज मिळाली.
\v 3 विशेषतः यहूदी चालीरीति आणि प्रश्न इत्यादी गोष्टींची आपणांला चांगल्या प्रकारे माहिती असल्याने तर हे जास्तच खरे म्हणावे लागेल. तेव्हा आपण माझे बोलणे धीराने ऐकून घ्यावे अशी मी विनंति करतो.
\s5
\v 4 “मी माझे जीवन तरुणपणापासून माइया प्रांतात व यरुशलेमात कशा रीतिने जगत आलो हे सर्व यहूदी लोकांना चांगले माहीत आहे.
\v 5 ते मला बऱ्याच काळापासून ओळखतात. आणि त्यांची इच्छा असेल तर मी एक परूशी म्हणजे आमच्या यहूदी धर्माच्या एका कट्टर गटाचा सभासद या नात्याने कसा जगत आलो याविषयी ते साक्ष देऊ शकतील.
\s5
\v 6 आता देवाने आमच्या पुर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय होण्याकरिता मी उभा आहे;
\v 7 ते वचन प्राप्त होण्याची आशा बाळगून आमचे बारा वंश देवाची सेवा रात्रंदिवस एकाग्रतेने करीत आहेत. महाराज, तीच आशा बाळगल्याबद्दल माझ्यावर यहूद्यांनी आरोप ठेवला आहे.
\v 8 देव मेलेल्यांना परत उठवितो, असे तुमच्यापैकी कित्येकांना विश्वास ठेवण्यास अयोग्य का वाटावे.
\s5
\v 9 नासरेथच्या येशूच्या नावाविरुध्द जे जे काही करता येईल ते ते मी करावे असे मलादेखील वाटत होते.
\v 10 आणि नेमके हेच मी यरूशलेम येथे केले. कारण मुख्य याजकांकडून मला तसा अधिकार मिळाला होता. म्हणून मी देवाच्या अनेक संतांना तुरुंगात टाकले, आणि हे जे संतगण जिवे मारले गेले, त्यांच्याविरुध्द मी माझे मत नोंदविले.
\v 11 अनेक सभास्थानात मी त्यांना शिक्षा केली. आणि देवाविरुध्द जबरीने वाईट भाषण करायला लावण्याचा मी प्रयत्न केला, या लोकांवरील माझा राग इतक्या पराकोटीला गेला होता की, मी त्यांचा छळ करण्याकरता इतर शहरांमध्ये देखील जात असे.
\s5
\v 12 “एकदा दिमिष्क शहराला जाण्यासाठी मुख्य याजकांनी मला अधिकार व परवानगी दिली तेव्हा महाराज,
\v 13 वाटेत भर दुपारच्या वेळी मी माझ्या व माझ्यासमवेत असणाऱ्यांच्या भोवती स्वर्गीय प्रकाश फाकलेला पाहिला. तो प्रकाश सूर्यापेक्षाही जास्त प्रखर होता.
\v 14 आम्ही सर्व खाली जमिनीवर पडलो आणि इब्री भाषेत माझ्याशी बोलताना एक वाणी मी ऐकली. ती वाणी म्हणाली, ‘शौला, शौला, माझा छळ तू का करतोस? अणकुचीदार काठीवर लाथ मारणे तुला हानिकारक आहे,
\s5
\v 15 आणि मी म्हणालो, ‘प्रभू, तू कोण आहेस? प्रभूने उत्तर दिले, ‘मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस.
\v 16 पण ऊठ आणि उभा राहा! या कारणांसाठी मी तुला दर्शन दिले आहे तुला सेवक म्हणून नेमावे व जे काही तुला दाखविले व जे दाखवीन त्याचा साक्षीदार म्हणून तुला नेमावे.
\v 17 ह्या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन.
\v 18 मी तुुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारांतून निघून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे, आणि त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.
\s5
\v 19 यासाठी, “अग्रिप्पा महाराज मला जो स्वर्गीय दृष्टांन्त झाला, त्याचा मी आज्ञाभंग केला नाही.
\v 20 उलट पहिल्यांदा दिमिष्कातील आणि नंतर यरूशलेमातील, यहूदा प्रांतातील सर्व आणि परराष्ट्रीय लोकांनासुध्दा प्रभूच्या वचनाची साक्ष दिली. त्यांनी पश्चात्ताप करावा, देवाकडे वळावे आणि पश्चात्तापाला साजेल अशी कामे करावी असे मी त्यांना सांगितले.
\v 21 या कारणांमुळे मी मंदिरात असताना यहूदी लोकांनी मला धरले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
\s5
\v 22 परंतु देवाने मला मदत केली म्हणून मी आज येथे उभा राहून समाजातील लहानथोरांना साक्ष देत आहे. "जे काही पुढे होणार होते, त्याविषयी संदेष्ट्यांनी व मोशेने जे सांगितले त्यापेक्षा दुसरे मी सांगत नाही."
\v 23 त्यानुसार देवाचा अभिषिक्त जो ख्रिस्त (मशीहा) तो दुःखसहन करील. आणि मेलेल्यातून उठविला जाणाऱ्यांत तो पाहिला असेल. यहूदी लोकांना तसेच परराष्ट्रीयांनाही देव प्रकाशाची घोषणा करील.”
\s5
\v 24 पौल आपल्या बचावासंबंधी बोलत असताना फेस्त त्याला मोठ्याने म्हणाला, “पौला, तू वेडा आहेस, जास्त ज्ञानामुळे तुला वेड लागले आहे!”
\v 25 पौलाने उत्तर दिले, “फेस्त महाराज, मी वेडा नाही; तर ज्या गोष्टी खऱ्या आहेत आणि अगदी योग्य आहेत, त्यांच्याविषयीच मी बोलत आहे.
\v 26 येथे हजर असलेल्या महाराजांना याविषयी चांगली माहिती आहे, आणि यामुळे मी त्यांच्याशी उघडपणाने बोलू शकतो. त्याच्या ध्यानातून काही सुटले नसेल, असे मला खात्रीने वाटते. मी हे म्हणतो, कारण ही गोष्ट एखाद्या कानाकोपऱ्यात झाली नाही.
\s5
\v 27 अग्रिप्पा महाराज, भविष्यवाद्यांनी जे लिहिले त्यावर तुमचा विश्वास आहे काय? तुमचा त्यावर विश्वास आहे हे मला नक्की माहीत आहे.”
\v 28 यावर अग्रिप्पा म्हणाला, “एवढ्या थोड्या वेळात ख्रिस्ती होण्यासाठी तू माझे मन वळवू शकशील असे तुला वाटते काय?”
\v 29 पौलाने उत्तर दिले, “थोड्या वेळात म्हणा अगर जास्त वेळात म्हणा, मी जसा आहे तसे केवळ तुम्हीच नव्हे तर आज जे जे येथे बसून माझे बोलणे ऐकत आहेत त्या सर्वांनी माझ्यासारखे या साखळदंडाखेरीज, विश्वास ठेवणारे व्हावे, अशी माझी देवाला नम्र विनंति आहे.”
\s5
\v 30 यानंतर राजा, बर्णीका, राज्यपाल आणि त्यांच्याबरोबर इतर जे तेथे बसले होते, ते सर्व उठले.
\v 31 ते न्यायालयातून बाहेर पडल्यावर एकमेकांशी बोलत होते. ते म्हणाले, “ज्यामुळे तुरुंगवास किंवा मरणदंड द्यावा असे काहीही या मनुष्याने केले नाही.”
\v 32 "अग्रिप्पा फेस्तला म्हणाला, “या मनुष्याने कैसराकडे न्याय मागितला नसता, तर त्याला सोडून देता आले असते.”
\s5
\c 27
\s पौलाचा रोमपर्यंतचा जलप्रवास - क्रेतापर्यंत
\p
\v 1 जेव्हा आम्ही समुद्रमार्गे इटलीला जाण्याचे ठरवले तेव्हा पौल व इतर काही कैद्यांना युल्य नावाच्या शताधिपतीच्या हाती सोपविण्यात आले. युल्य हा सम्राटाच्या सेनेतील एक अधिकारी होता.
\v 2 अद्रमुत्तिय येथील एका जहाजातून आम्ही जाणार होतो. हे जहाज आशियाच्या किनाऱ्यावरील बंदरे घेत पुढे जाणार होते. आम्ही या जहाजातून प्रवासाला निघालो. तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीका येथे राहणारा अरिस्तार्ख आमच्याबरोबर होता.
\s5
\v 3 दुसऱ्या दिवशी आम्ही सिदोन नगराला पोहचलो. युल्य पौलाशी फार चांगला वागला. पौलाच्या मित्रांना त्याची काळजी घेता यावी म्हणून त्याने मोकळीक दिली.
\v 4 तेथून आम्ही समुद्रमार्गे पुढे निघालो. आणि कुप्रच्या किनाऱ्याकिनाऱ्याने निघालो कारण वारा समोरचा होता.
\v 5 किलकिया व पंफुल्याजवळच्या समुद्राला पार करून लुक्या प्रांतातील मुर्या बंदरात पोहचलो.
\v 6 तेथे शताधिपतीला इटलीला जाणारे आलेक्झांद्रीयाचे एक जहाज आढळले. त्याने आम्हाला त्या जहजात बसविले.
\s5
\v 7 आम्ही बरेच दिवस हळूहळू प्रवास करीत होतो. कनिदा येथपर्यंत येण्यासाठी आम्हाला फार कष्ट पडले कारण वारा तोंडचा होता. आम्हाला पुढे जाता येईना. म्हणून आम्ही क्रेताच्या दक्षिणेकडून सलमोनाच्या समोरच्या बाजूस गेलो.
\v 8 यापुढे आमचे जहाज क्रेतच्या किनाऱ्याने मोठ्या अडचणीतून सुरक्षित बंदर येथे पोहोचले, तेथे जवळच लसया नगर होते.
\s मिलितापर्यंत- तुफान व नौकाभंग
\s5
\p
\v 9 बराच वेळ वाया गेला होता. आणि पुढील प्रवास करणे बरेच अवघड झाले होते. कारण एव्हाना यहूद्यांच्या उपासाचा काळही निघून गेला होता. तेव्हा पौलाने त्यांना सावधानतेचा इशारा दिला. पौल म्हणला,
\v 10 पुरुषांनो, मला वाटते, आपल्या प्रवासात जहाजातील मालाला आणि जहाजालाच नव्हे तर आपल्या जीवालाही धोका होईल!”
\v 11 परंतु पौलाच्या मताशी जहाजाचा कप्तान व मालक सहमत झाले नाहीत, उलट जहाजाच्या कप्तानाच्या व मालकाच्या बोलण्यावरच शताधिपतीचा जास्त विश्वास होता.
\s5
\v 12 परंतु हे बंदर (सुरक्षित म्हंटलेले) हिवाळ्यात मुक्काम करायला सोईचे नव्हते. म्हणून बहुमताने पुढे निघावे असे ठरले. आणि फेनिकेला जाण्याचा प्रयत्न करावा आणि शक्य झाले तर तेथेच हिवाळा घालवावा असे ठरले. (फेनिके हे क्रेत बेटावरील शहर होते. त्याचे तोंड नैऋत्य व वायव्य दिशेला होते.)
\v 13 तेव्हा दक्षिणेकडून मंद वारे वाहू लागले, तेव्हा ते नांगर उचलून क्रेताच्या किनाऱ्याकिनाऱ्याने तारू हाकारीत जाऊ लागले. जहाजावरच्या लोकांना वाटू लागले की, अशाच प्रकारचे वारे आम्हाला पाहिजे होते. व तसेच ते वाहत आहे.
\s5
\v 14 परंतु लवकरच क्रेत बेटावरून ‘ईशान्येचे’ म्हंटलेले वादळी वारे वाहू लागले.
\v 15 आणि जहाज वादळी वाऱ्यात सापडले, व त्याला पुढे जाता येईना. तेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न सोडून आम्ही वाऱ्याने जहाज भरकटू दिले.
\v 16 मग कौदा नावाच्या लहानशा बेटाच्या किनाऱ्याकिनाऱ्याने आम्ही जाऊ लागलो. मग थोड्या खटपटीनंतर जीवन रक्षक होडीवर उचलून घेतली.
\s5
\v 17 जीवन रक्षक होडी आत घेतल्यावर लोकांनी जहाज दोरखंडाने आवळून बांधले. जहाज वाळू असलेल्या सूर्तीनावाच्या उथळ जागी आदळेल या भीतीने त्यांनी शीड खाली काढले. तेव्हा वाऱ्याने ते भरकटू लागले.
\v 18 जोरदार वादळी वाऱ्याचे तडाखे खावे लागल्याने लोकांनी दुसऱ्या दिवशी जहाजावरील सामान बाहेर टाकून दिले.
\s5
\v 19 तिसऱ्या दिवशी जहाजाची काही सामग्री त्यांनी आपल्या हातांनी बाहेर काढून टाकली.
\v 20 बरेच दिवस आम्हाला सूर्य किंवा तारे दिसले नाहीत. वादळ फारच भयंकर होते. आम्ही आमच्या तरण्याची सर्व आशा सोडून दिली. आम्ही मरणार असे आम्हाला वाटू लागले.
\s5
\v 21 बराच काळपर्यंत लोकांना उपास घडल्यावर. मग पौल त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, “गुहस्थांनो, क्रेतावरून मुक्काम हलवू नका, हा माझा सल्ला तुम्ही ऐकायला पाहिजे होता. म्हणजे हा त्रास व ही हानी तुम्हाला टाळता आली असती.
\v 22 पण आता तुम्ही धीर धरावा अशी माझी विनंति आहे. कारण तुमच्यापैकी एकाच्याही जीवाला धोका पोहोंचणार नाही. आपले जहाज मात्र गमवावे लागेल.
\s5
\v 23 मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची उपासना मी करतो, त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहीला.
\v 24 आणि तो दूत म्हणाला, ‘पौला भिऊ नको! तुला कैसरापुढे उभे राहिलेच पाहिजे. तुझ्याबरोबर प्रवास करणारे जे लोक आहेत, त्यांच्या जीवाचे रक्षण करण्याचे देवाने मला वचन दिले आहे.
\v 25 तेव्हा गुहस्थांनो, तुम्ही सर्व धीर धरा! कारण मला जसे देवाने सांगितले, अगदी तसे होणार असा मला विश्वास आहे.
\v 26 परंतु आपणास एखाद्या बेटावर उतरून थांबावे लागले.”
\s5
\v 27 चौदाव्या रात्री आमचे जहाज अद्रिया समुद्रातून चालले होते, तेव्हा खलाशांनी जहाज एखाद्या भूमीजवळ पोहोचले असावे असा अंदाज केला.
\v 28 त्यांनी पाण्याची खोली मोजली तेव्हा ती वीस वाव भरली. आणखी काही वेळाने त्यांनी परत एकदा समुद्राची खोली मोजली तेव्हा ती पंधरा वाव भरली.
\v 29 ओबडधोबड खडकाळ जागेवर आपले जहाज आदळेल अशी भीती वाटल्याने त्यांनी चार नांगर जहाजाच्या मागील बाजूने टाकले आणि दिवस उजाडण्याची प्रार्थना करीत वाट पाहू लागले.
\s5
\v 30 खलाशांनी जहाजातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जहाजाच्या पुढील भागातून नांगर टाकल्याचे भासवून जीवन रक्षक होड्या समुद्रात टाकल्या.
\v 31 परंतु पौल शताधिपतीला व इतर शिपायांना म्हणाला, “जर हे लोक जहाजात राहणार नाहीत, तर तुम्ही वाचणार नाही.”
\v 32 यावर शिपायांनी जीवन रक्षक होड्यांचे दोर कापून टाकले. आणि त्याखाली पाण्यात पडू दिल्या.
\s5
\v 33 पहाट होण्याअगोदर पौलाने त्या सर्वांना काहीतरी खाण्याचा आग्रह केला. तो म्हणाला, “आज चौदावा दिवस आहे. तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात पण खाणेपिणे काही केले नाही. अन्नाचा कणही खाल्ला नाही.
\v 34 तुम्ही थोडे तरी खा. कारण तुमचा टिकाव लागण्यासाठी तुम्ही खाणे जरुरीचे आहे. तुम्ही खावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्यापैकी कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही.”
\v 35 असे बोलल्यानंतर पौलाने भाकर घेतली आणि सर्वांच्या समक्ष देवाचे उपकार मानले, ती भाकर मोडून तो खाऊ लागला.
\s5
\v 36 ते पाहून त्या सर्वांना धीर आला आणि ते जेवले.
\v 37 आम्ही सर्व मिळून जहाजात दोनशे शहात्तर लोक होतो.
\v 38 त्या सर्वांनी पुरेसे खाल्ल्या प्याल्यानंतर धान्य समुद्रात टाकून दिले आणि जहाजातील भार कमी केला.
\s5
\v 39 दिवस उजाडल्यावर त्यांना भूभागाची ओळख पटली नाही. परंतु तेथे किनारा असलेल्या उपसागरासारखी ती जागा दिसून आली. म्हणून शक्य झाल्यास तेथील किनाऱ्याला जहाज लावण्याचे त्यांनी ठरवले.
\v 40 म्हणून त्यांनी नांगर कापले आणि समुद्रात पडू दिले. त्याचबरोबर सुकाणूंच्या दोऱ्या एकत्र केल्या. नंतर त्यांनी जहाजाच्या पुढच्या भागाचे शीङ वारा भरावे म्हणून उभे केले आणि जहाज किनाऱ्याला आणले.
\v 41 परंतु दोन समुद्रांमधील वर आलेल्या वाळूच्या ढिगावर जहाज जोराने आदळले. तेव्हा जहाजाची पुढची बाजू वाळूमध्ये रुतून बसली आणि गलबताचा मागचा भाग लाटांच्या तडाख्यामुळे तुटू लागला.
\s5
\v 42 तेव्हा शिपायांनी कैद्यांना मारण्याचे ठरवले. यासाठी की त्यांच्यातील कोणी पोहोत जाऊन पळू नये.
\v 43 परंतु शतधिपतीला पौलाला वाचवायचे होते म्हणून त्याने शिपायांना तो विचार सोडून देण्यास सांगितले. आणि ज्यांना पोहता येत असेल त्यांनी जहाजातून उड्या टाकून किनाऱ्याला जावे अशी आज्ञा केली.
\v 44 बाकीच्या लोकांनी फळ्यांच्या अगर जहाजाच्या तुटलेल्या लाकडांच्या आधारे भूमी गाठावी असे सांगितले. अशारीतीने जहाजातील सर्व जण सुखरुपपणे भूमीवर पोहोचले.
\s5
\c 28
\s मिलिता येथे पौल
\p
\v 1 जेव्हा आमचे पाय सुखरुपपणे तेथील जमीनीला लागले. तेव्हा आम्हाला कळले की, त्या बेटाचे नाव मिलिता असे आहे.
\v 2 तेथील रहिवाश्यांनी आम्हाला अतिशय ममतेने वागविले. त्यांनी एक शेकोटी पेटविली आणि आमचे स्वागत केले. कारण पाऊस पडू लागाला होता व थंडीही होती.
\s5
\v 3 पौलाने काटक्या गोळा केल्या आणि ते त्या शेकोटीत टाकू लागला. उष्णतेमुळे तेथून एक साप निघाला. आणि त्याने पौलाच्या हाताला विळखा घातला.
\v 4 ते पाहून तेथील रहिवाशी एकमेकांना म्हणू लागले, “हा मनुष्य खुनी असला पाहिजे. समुद्रातून जरी हा वाचला असला तरी न्यायदेवताही याला जगू देत नाही!”
\s5
\v 5 परंतु पौलाने तो प्राणी शेकोटीत झटकून टाकला. आणि पौलाला काही अपाय झाला नाही.
\v 6 त्या बेटावरील लोकांना पौलाचे अंग सुजून येईल किंवा पौल एकाएकी मरून पडेल असे वाटत होते. बराच वेळ वाट पाहूनही पौलाला काहीही विकार झाल्याचे दिसेना, तेव्हा त्या लोकांचे विचार पालटले, आणि पौल देवच आहे असे ते म्हणू लागले.
\s5
\v 7 तेथून जवळच पुब्ल्य नावाच्या मनुष्याची शेती होती. पुब्ल्य हा त्या बेटाचा मुख्य अधिकारी होता. त्याने आम्हा सर्वांचे त्याच्या घरी स्वागत केले आणि तीन दिवस आमचा चांगला पाहुणचार केला.
\v 8 पुब्ल्याचे वडील तापाने व हगवणीने आजारी होते. त्यामुळे अंथरुणाला खिळून होते. पौल त्या आजारी व्याक्तिला भेटायला गेला प्रार्थना करून पौलाने आपला हात त्याच्यावर ठेवला आणि त्या मनुष्याला बरे केले.
\v 9 हे घडलेले पाहिल्यावर त्या बेटावरील इतर आजारी लोक पौलाकडे आले आणि बरे झाले.
\v 10 त्यांनी आम्हाला सन्मानपूर्वक पुष्कळ वस्तू भेटीदाखल दिल्या. आणि जेव्हा आम्ही परत प्रवासाला निघालो तेव्हा आम्हाला लागणाऱ्या अनेक गोष्टी पुरविल्या.
\s रोमचा प्रवास पुढे सुरू
\s5
\p
\v 11 "आम्ही तेथे हिवाळ्यात राहिल्यावर आलेक्सांद्रा शहरातील एका जहाजातून पुढील प्रवासाला निघालो. ते जहाज त्या बेटावर हिवाळाभर मुक्कामाला होते. त्या जहाजाच्या समोरील बाजूस ‘जुळ्या भावाचे’ चिन्ह होते."
\v 12 मग आम्ही सुराकूस येथे जाऊन पोहचलो आणि तेथे तीन दिवस राहिलो.
\s5
\v 13 तेथून शिडे उभारून आम्ही निघालो, आणि रेगियोन नगराला गेलो. तेथे एक दिवस मुक्काम केला. नंतर दक्षिणेकडील वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी पुत्युलास गेलो.
\v 14 "त्या शहरात आम्हाला काही बंधुजन भेटले. त्यांच्या सांगण्यावरून आम्ही तेथे सात दिवस राहिलो. मग आम्ही रोम येथे जाऊन पोहचलो."
\v 15 तेथील बंधूनी आमच्याबद्दलची वार्ता ऐकली होती. ते आमच्या भेटीसाठी अप्पियाच्या बाजारपेठेपर्यंत आणि तीन धर्मशाळेपर्यंत आले. पौलाची त्यांची भेट झाल्यावर त्याने देवाचे उपकार मानले, व त्याला धीर आला.
\s5
\v 16 आम्ही रोम येथे पोहोंचल्यावर पौलाला एकटे राहायला परवानगी मिळाली. परंतु त्याच्यावर देखरेख करण्यासाठी एक शिपाई ठेवण्यात आला.
\s पौल रोममधील यहूद्यांच्या भेटी घेतो
\p
\v 17 तीन दिवसानंतर पौलाने सर्व यहूदी पुढाऱ्यांना एकत्र बोलावले. जेव्हा सर्व जण जमा झाले तेव्हा पौल त्यांना म्हणाला, “बंधूंनो, आपल्या बांधवांविरुध्द मी काहीही केलेले नाही. तरी मला यरूशलेम येथे पकडून रोमी लोकांच्या हाती कैदी म्हणून देण्यात आले. आणि
\v 18 त्यांनी माझी चौकशी केली. तेव्हा त्यांची मला सोडून देण्याची इच्छा होती. कारण मरणदंडाला योग्य असा कोणताही गुन्हा मी केला नव्हता.
\s5
\v 19 परंतु यहूदी लोकांनी जेव्हा माझ्या सुटकेला हरकत घेतली, तेव्हा कैसराकडे न्याय मागणे मला भाग पडले. याचा अर्थ असा नाही की, यहूदी लोकांविरुध्द मला दोषारोप करण्याची इच्छा आहे.
\v 20 या कारणासाठी तुम्हाला भेटण्याची आणि तुमच्याशी बोलण्याची मी इच्छा दाखविली. कारण इस्राएलाच्या आशेच्या निष्ठेमुळेच मी या साखळ्यांनी जखडलो गेलो आहे.”
\s5
\v 21 यहूदी पुढारी पौलाला म्हणाले, “आम्हाला तुमच्याबाबत यहूदीयाहून कसलेही पत्र आलेले नाही, अगर तिकडून येणाऱ्या बंधुजनांपैकी एकाही भावाने तुमच्याविषयी वाईट कळविले अथवा बोललेले नाही.
\v 22 परंतु तुमची मते काय आहेत हे समजून घेण्याची आमची इच्छा आहे. कारण या गटाविरुध्द (ख्रिस्ती गटाविरुध्द) सगळीकडे लोक बोलतात हे आम्हाला माहीत आहे.”
\s5
\v 23 तेव्हा (रोम शहरातील) यहूदी लोकांनी एक बैठकीचा दिवस ठरवला, जेथे पौल राहत होता, तेथे ते मोठ्या संख्येने जमा झाले. तेव्हा पौलाने त्यांना समजावून सांगितले आणि देवाच्या राज्याविषयी आपली साक्ष दिली. मोशेच्या नियमशास्त्रापासून आणि संदेष्ट्यांच्यापासून फोड करून येशूविषयी त्यांची खात्री पटविण्याचा प्रयत्न केला. हे तो (पौल) सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत होता.
\v 24 त्याने फोड करून सांगितलेल्या गोष्टीविषयी काही जणांची खात्री पटली, तर काहींनी तो बोलत असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही.
\s5
\v 25 पौल पुढील एक गोष्ट बोलला, त्यावरून मतभेद होऊन त्यांच्यापैकी काहीजण उठले आणि तेथून जाऊ लागले, पौल म्हणाला, “यशया संदेष्टयांच्या द्वारे पवित्र आत्मा आपल्या वाडवडिलांशी जे बोलला, ते खरोखरच किती खरे आहे! यशया म्हणाला होताः
\v 26 ‘या लोकांकडे (यहूदी) तुम्ही जा, आणि त्यांना सांगाः तुम्ही ऐकाल तर खरेपण तुम्हाला समजणार नाही. तुम्ही पहाल तुम्हाला दिसेल पण तुम्ही काय पाहात ते तुम्हाला कळणार नाही
\s5
\v 27 " कारण या लोकांचे अंत:करण जङ झाले आहेत त्याच्या कानांनी त्यांना ऐकू येत नाही. आणि त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत नाही तर त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले असते आणि आपल्या कानांनी ऐकले असते आणि माझ्याकडे वळले असते आणि मी त्यांना बरे केले असते.
\s5
\v 28 “म्हणून देवाचे हे तारण परराष्ट्रीयांकडे लोकांकडे पाठविण्यात आले आहे. हे तुम्हा यहूदी लोकांना कळावे. ते ऐकतील.”
\v 29 [तो असे बोलल्यावर यहूदी आपल्यामध्ये फार विवाद करीत निघाले.]
\s समाप्ती
\s5
\p
\v 30 पूर्ण दोन वर्षे तो त्याच्या भाड्याच्या घरात राहिला. जे त्याला भेटायला येत, त्यांचे तो स्वागत करी.
\v 31 त्याने देवाच्या राज्याविषयी प्रचार केला. त्याने प्रभू येशूविषयी शिक्षण दिले. तो हे काम फार धैर्याने करीत असे. आणि कोणीही त्याला बोलण्यात अडवू शकले नाही.