\v 1 देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तीमथ्य ह्यांजकडून; करिंथ शहरातील देवाच्या मंडळीस व सर्व अखया प्रांतातील सर्व पवित्र जणांस सलाम,
\v 2 देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती असो.
\v 4 तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो; यासाठी की, ज्या सांत्वनाने आमचे स्वतःचे देवाकडून सांत्वन होते. त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे.
\v 6 आणि आम्हावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते आणि आम्हास सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते; म्हणजे असे की, जी दुःखे आम्ही सोशीत आहोत, ती धीराने सहन करण्यास तुम्हास सामर्थ्य मिळते.
\v 7 आणि तुमच्याविषयीची आमची आशा बळकट आहे कारण आम्ही हे जाणतो की, तुम्ही दुःखांचे भागीदार आहात तसेच सांत्वनाचेही भागीदार आहात.
\v 8 बंधूंनो, आमच्यावर आशियात जे संकट आले त्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही; ते असे की, आम्ही इतके, शक्तिपलीकडे, अतिशयच दडपले गेलो की, आम्ही आमच्या जिवंत राहण्याविषयीची आशासुद्धा सोडून दिली होती.
\v 9 खरोखर आम्हास वाटत होते की, आम्ही मरणारच, पण आम्ही स्वतःवर विश्वास ठेवू नये, तर जो देव मरण पावलेल्यांना उठवतो त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा, म्हणून हे घडले.
\v 10 त्याने आम्हास मरणाच्या मोठ्या संकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हास ह्यापुढेही सोडवील, अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे.
\v 11 तुम्ही देखील आमच्यासाठी प्रार्थना करून आमचे सहाय्य करावे; मग पुष्कळ लोक आमच्यासाठी उपकार मानतील की त्यांच्या पुष्कळ प्रार्थनांमुळे देवाने आम्हास कृपा दिली आहे.
\v 12 आम्हास अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सद्सदविवेकबुद्धीची साक्ष होय. आम्ही मनुष्याच्या ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामाणिकपणे जगात आणि विशेषतः तुमच्याशी वागलो.
\v 13 कारण तुम्हास वाचता येतात किंवा समजतात, त्यावाचून दुसऱ्या गोष्टी आम्ही तुम्हास लिहीत नाही आणि शेवटपर्यंत तुम्ही नीट समजून घ्याल अशी मी आशा धरतो.
\v 14 त्याप्रमाणे तुम्ही काही अंशी आम्हास मान्यता दिली की, जसे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही आमच्या अभिमानाचा विषय आहा, तसेच आम्ही तुमच्या अभिमानाचा आहोत.
\v 15 आणि मी या विश्वासामुळे असे योजले होते की, प्रथम मी तुमच्याकडे यावे, म्हणजे तुम्हास दोन भेटीचा फायदा व्हावा.
\v 16 मी मासेदोनियाला जाताना तुम्हास भेटण्याची योजना केली आणि मासेदोनियाहून परत येताना तुमच्याकडे येण्याचे ठरवले आणि त्यानंतर तुम्ही मला यहूदीयाकडे वाटेस लावावे.
\v 17 असा विचार करीत असता, मी चंचलपणा केला काय? किंवा मी जे योजतो ते देहाला अनुसरून योजतो काय? म्हणजे मी माझे एकाच वेळेला ‘होय, होय’ आणि ‘नाही, नाही’ असे म्हणतो काय?
\v 18 पण जसा देव विश्वासनीय आहे; तसे आमचे तुमच्याबरोबरचे बोलणे ‘होय’ आणि ‘नाही’ असे नाही.
\v 19 कारण आम्ही, म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य मिळून, तुमच्यात ज्याची घोषणा केली तो देवाचा पुत्र येशू ख्रिस्त होय किंवा नाही असा नव्हता तर त्याच्यात होय अशीच होती.
\v 3 आणि मी हेच लिहिले होते, म्हणजे मी आल्यावर ज्यांच्याविषयी मी आनंद करावा त्यांच्याकडून मला दुःख होऊ नये, मला तुम्हा सर्वांविषयी विश्वास आहे की, माझा आनंद तो तुम्हा सर्वांचादेखील आहे.
\v 4 कारण, मी दुःखाने, मनाच्या तळमळीने व अश्रू गाळीत तुम्हास लिहिले ते तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नाही पण तुमच्यावर जी माझी प्रीती आहे तिची खोली तुम्हास समजावी.
\v 5 जर कोणी दुःख दिले असेल, तर त्याने केवळ मलाच दुःख दिले, असे नाही, तर काही प्रमाणात तुम्हा सर्वांना दिले आहे. त्यासंबंधी मी फार कठीण होऊ इच्छीत नाही.
\v 6 अशा मनुष्यास ही बहुमताने दिली ती शिक्षा पुरे.
\v 7 म्हणून, उलट त्यास क्षमा करून तुम्ही त्याचे सांत्वन करावे; यासाठी की अति दुःखाने तो दबून जाऊ नये.
\v 10 ज्या कोणाला तुम्ही कशाची क्षमा करता त्यास मीही क्षमा करतो, कारण मी क्षमा केली असेल तर ज्या कशाची कोणाला मी क्षमा केली आहे, त्यास तुमच्याकरीता, मी ख्रिस्ताच्या समक्ष केली आहे.
\v 11 यासाठी सैतानाने आपल्याला ठकवू नये; कारण आपण त्याच्या दुष्ट योजना जाणत नाही असे नाही.
\s शुभवृत्तामुळे उद्भवणारी संकटे व जयोत्सवाचे प्रसंग
\v 14 पण देवाचे आभार मानतो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हास विजयाने नेतो आणि त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रत्येक ठिकाणी आमच्याद्वारे सगळीकडे पसरवितो.
\v 15 कारण ज्यांचे तारण होत आहे अशा लोकात आणि ज्यांचा नाश होत आहे अशा लोकात आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुवास आहोत.
\s5
\v 16 ज्या लोकांचा नाश होत आहे, मृत्युचा मरणसूचक वास आणि जे तारले गेले आहेत, जीवनाकडे नेणारा जीवनाचा वास आहोत आणि या गोष्टींसाठी कोण लायक आहे?
\v 17 कारण दुसर्या कित्येकांसारखे देवाच्या वचनाची भेसळ करणारे आम्ही नाही पण आम्ही शुद्ध भावाने, देवाचे म्हणून देवाच्या दृष्टीपुढे ख्रिस्तात बोलतो.
\v 3 शाईने नव्हे, तर जिवंत देवाच्या आत्म्याने कोरलेले दगडी पाट्यांवर नव्हे, तर मानवी मांसमय हृदयाच्या पाट्यांवर कोरलेले, आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र आहात, असे तुम्ही दाखवून देता.
\v 4 आणि ख्रिस्तामुळे देवाच्या ठायी आमचा असा विश्वास आहे.
\v 5 आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरविण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे.
\v 6 त्याने आम्हास नव्या कराराचे सेवक होण्यास पात्र केले. तो लेखाद्वारे केलेला नाही, पण पवित्र आत्म्याद्वारे केलेला आहे कारण लेख मारून टाकतो पण पवित्र आत्मा जिवंत करतो.
\s नियमशास्त्र वैभवापेक्षा शुभवृत्त वैभव अधिक तेजस्वी
\v 7 पण दगडावर कोरलेल्या अक्षरात लिहिलेली मरणाची सेवा इतकी गौरवी झाली की, इस्राएल लोक मोशेच्या तोंडावरील तेज, जे नाहीसे होत चालले होते, त्या तेजामुळे त्याच्या तोंडाकडे दृष्टी लाववत नव्हती.
\v 8 तर तिच्यापेक्षा पवित्र आत्म्याची सेवा अधिक गौरवयुक्त कशी होणार नाही?
\v 18 पण आपल्या तोंडावर आच्छादन नसून आपण सर्वजण, जणू आरशात पाहिल्याप्रमाणे, प्रभूच्या तेजाकडे पाहत असता, कलेकलेने त्याच्या प्रतिरूपात आपले रूपांतर होत आहे. हे प्रभूच्या आत्म्याकडून होत आहे.
\v 1 म्हणून, आमच्यावर देवाची दया झाल्यामुळे ही सेवा आम्हास देण्यात आली आहे, म्हणून आम्ही खचत नाही.
\v 2 आम्ही लज्जास्पद गुप्त गोष्टी आम्ही सोडल्यात; आम्ही कपटाने वागत नाही किंवा आम्ही देवाचे वचन फसवेपणाने हाताळीत नाही तर देवाच्या दृष्टीसमोर खरेपण प्रकट करण्यास आम्ही आपणांसमोर सर्व लोकांच्या सद्सदविवेकबुद्धीला पटवितो.
\v 4 जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने या युगाच्या दुष्ट दैवताने आंधळी केलीली आहेत.
\v 6 कारण ज्या देवाने प्रकाशाला अंधारामधून प्रकाशण्यास सांगितले तो आमच्या अंतःकरणात, येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी प्रकाशला आहे.
\v 13 मी विश्वास ठेवला आणि म्हणून मी बोललो, हे पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे आम्ही विश्वास ठेवला आहे आणि म्हणून बोलतो; कारण आमच्यात तोच विश्वासाचा आत्मा आहे.
\v 14 कारण आम्ही हे जाणतो की, प्रभू येशूला ज्याने उठवले तो आपल्यालाही येशूबरोबर उठवील आणि आम्हास तुमच्याबरोबरच सादर करील.
\v 15 सर्व गोष्टी तुमच्याकरता आहेत, म्हणजे ही विपुल कृपा पुष्कळ जणांच्या उपकारस्मरणाने, देवाच्या गौरवार्थ बहुगुणित व्हावी.
\v 18 आता आम्ही दिसणार्या गोष्टींकडे पाहत नाही पण न दिसणार्या गोष्टींकडे पाहतो कारण दिसणार्या गोष्टी क्षणिक आहेत पण न दिसणार्या गोष्टी सार्वकालिक आहेत.
\v 4 कारण या मंडपात असलेले आम्ही आमच्यावर भार पडल्यामुळे कण्हतो पण आमचे वस्त्र काढले जावे असे इच्छीत नाही, तर आमचा स्वर्गीय पोशाख घातला जावा म्हणजे हे मरणाधीनपण जीवनात गिळले जावे.
\v 5 आणि याच एका गोष्टीसाठी ज्याने आम्हास तयार केले तो देव आहे आणि त्यानेच आम्हास पवित्र आत्मा हा विसार दिला आहे.
\v 9 म्हणून आम्ही झटत आहोत, म्हणजे आम्ही येथे किंवा तेथे असलो, तरी देवाला संतोष देणारे असे असावे.
\v 10 कारण आपल्याला, प्रत्येक जणाला, ख्रिस्ताच्या न्यायासनापुढे प्रकट झाले पाहिजे; ह्यासाठी की, शरीरात केलेल्या गोष्टींबद्दल प्रत्येक मनुष्यास त्याने जे जे केले असेल त्याचे प्रतिफळ मिळावे. ते चांगले असेल किंवा वाईट असेल.
\v 11 म्हणून आम्हास प्रभूचे भय कळले असल्यामुळे आम्ही मनुष्यांचे मन वळवतो पण आम्ही देवाला प्रकट झालो आहो; आणि मी अशी आशा धरतो की, आम्ही तुमच्या विवेकांत प्रकट झालो आहोत.
\v 12 कारण तुमच्याजवळ आम्ही आमची पुन्हा प्रशंसा करीत नाही, पण तुम्हास आमच्या बाबतीत अभिमानाला कारण देतो; म्हणजे, मनुष्याच्या अंतःकरणाविषयी नाही, पण त्याच्या बाहेरच्या स्थितीविषयी जे अभिमान मिरवतात त्यांच्यासाठी तुमच्याजवळ काही उत्तर असावे.
\v 13 कारण आम्ही वेडे झालो असलो तर देवासाठी आणि आम्ही समंजस मनाचे असलो तर तुमच्यासाठी आहोत.
\v 14 कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हास आवरते कारण आम्ही असे मानतो की एक सर्वांसाठी मरण पावला तर सर्व मरण पावले,
\v 15 आणि सर्वांसाठी तो ह्यासाठी मरण पावला की, ह्यापुढे जे जगतील त्यांनी आपल्या स्वतःसाठी नाही, पण त्यांच्यासाठी जो स्वतः मरण पावला आणि पुन्हा उठला त्याच्यासाठी त्यांनी जगावे.
\v 20 तर मग आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकील झालो आहो; जणू तुम्हास आमच्याद्वारे देव विनंती करीत आहे; ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हास विनवणी करतो की, तुम्ही देवाशी समेट केलेले असे व्हा.
\v 21 कारण जो पाप जाणत नव्हता त्यास त्याने आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे आपण त्याच्याठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.
\v 1 प्रियांनो, आपल्यालाही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून आपण देहाच्या व आत्म्याच्या प्रत्येक अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करू आणि देवाच्या भयात राहून आपल्या पवित्र्याला पूर्ण करावे.
\v 7 आणि केवळ त्याच्या येण्यामुळे नाही, पण तो जेव्हा तुमची उत्कंठा, तुमचा शोक व तुमची माझ्याविषयीची तीव्र सदिच्छा ह्यांविषयी आम्हास सांगत होता तेव्हा तुमच्याबाबतीत त्याचे जे सांत्वन झाले त्याच्या योगाने आमचे सांत्वन होऊन मला विशेष आनंद झाला.
\v 8 मी माझ्या पत्राने तुम्हास दुःख दिले ह्याबद्दल मला वाईट वाटत नाही; मला वाईट वाटले होते कारण मला दिसले होते की त्या पत्राने जणू घटकाभर, तुम्हास दुःखी केले होते;
\v 9 तरी आता मी आनंद करतो, तुम्हास दुःख झाले ह्यामुळे नव्हे, तर पश्चात्ताप होण्याजोगे दुःख झाले ह्यामुळे, कारण देवानुसार तुमचे हे दुःख दैवी होते, आमच्याकडून तुमची कसलीही हानी होऊ नये म्हणून असे झाले.
\v 10 कारण देवप्रेरित दुःख तारणदायी पश्चात्तापास कारणीभूत होतो त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण जगीक दुःख मरणास कारणीभूत होते.
\v 11 कारण पाहा, तुमचे हे दुःख दैवी होते, या एकाच गोष्टीने तुमच्यामध्ये केवढी कळकळ, केवढे दोषनिवारण, केवढा संताप, केवढे भय, केवढी उत्कंठा, केवढी आस्था, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी, उत्पन्न झाली! या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात ह्याचे प्रमाण तुम्ही पटवून दिले आहे.
\v 12 तथापि मी तुम्हास लिहिले ते ज्याने अन्याय केला त्याच्यामुळे नव्हे आणि ज्यावर अन्याय झाला त्याच्यामुळेही नव्हे, तर आमच्याविषयी तुम्ही दाखवत असलेल्या कळकळीची जाणीव तुम्हास देवासमक्ष व्हावी म्हणून लिहीले.
\v 13 ह्यामुळे आमचे सांत्वन झाले आहे आणि आमचे सांत्वन इतकेच नव्हे, तर विशेषकरून तीताला आनंद झाल्यामुळे आम्हीही फारच आनंदित झालो; कारण तुम्हा सर्वांकडून त्याच्या मनाला स्वस्थता मिळाली.
\v 14 आणि तुमच्याविषयी त्याच्यापुढे मी जर अभिमान मिरवला असेल तर मला काही लाज वाटत नाही. पण आम्ही ज्याप्रमाणे तुमच्याबरोबर सर्वकाही खरेपणाने बोलतो, त्याचप्रमाणे तीतापुढील तुम्हाविषयीचा आमचा अभिमान खरेपणाचा आढळला आहे.
\v 15 तुमच्या सर्वांच्या आज्ञांकितपणाची म्हणजे तुम्ही भय धरून, कापत कापत, त्याचे कसे स्वागत केले याची त्यास आठवण होत असता तुमच्यासाठी त्याची ममता फारच फार आहे.
\v 16 मला सर्वबाबतीत तुमचा विश्वास वाटतो म्हणून मी आनंद करतो.
\v 7 म्हणून जसे तुम्ही सर्व गोष्टीत, म्हणजे विश्वासात, बोलण्यात ज्ञानात व सर्व आस्थेत व आम्हावरील आपल्या प्रीतीत वाढला आहा, तसे तुम्ही या कृपेच्या कार्यातही फार वाढावे.
\v 9 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हास माहीत आहे, तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.
\v 10 ह्याविषयी मी आपले मत सांगतो, कारण हे तुम्हास हितकारक आहे, तुम्ही मागेच एक वर्षापूर्वी प्रथमतः असे करण्यास आरंभ केला, इतकेच नव्हे तर अशी इच्छा करण्यासही केला.
\v 11 तर हे कार्य आता पूर्ण करा, ह्यासाठी की जशी इच्छा करण्याची उत्सुकता तुमच्या तुम्हास होती तशी तुमच्या ऐपतीप्रमाणे कार्यसिद्धी व्हावी.
\v 19 यापेक्षा अधिक म्हणजे मंडळ्यांनी हे कृपेचे दानार्पण घेऊन जाण्यासाठी आमची निवड केली. जे आम्ही प्रभूच्या गौरवासाठी करतो आणि मदत करण्याची आमची उत्सुकता दिसावी म्हणून हे करतो.
\s5
\v 20 ही जी विपुलता आम्हाकडून सेवेस उपयोगी पडत आहे तिच्या कामात कोणीही आम्हावर दोष लावू नये म्हणून आम्ही काळजीपूर्वक वागत आहोत.
\v 22 त्यांच्याबरोबर आम्ही आमच्या दुसऱ्या एका बंधूला पाठवले आहे. त्याच्या उत्सुकतेची पारख आम्ही पुष्कळ गोष्टीत अनेक वेळा केली आहे आणि आता तुमच्यावर त्याचा फार विश्वास असल्यामुळे तो अधिक उत्सुक आहे.
\v 23 तीताच्या बाबतीत सांगायाचे तर, तो तुमच्यामधील माझा एक सहकारी व सहकर्मचारी आहे, आमच्या इतर बंधूंच्या बाबतीत सांगायचे तर, ते ख्रिस्ताला गौरव व मंडळ्यांचे प्रेषित आहेत.
\v 1 तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हास लिहावे ह्याचे अगत्य नाही.
\v 2 कारण मदत करण्याबद्दलची तुमची उत्सुकता मला माहीत आहे आणि मी मासेदोनियातील लोकांस याविषयी अभिमानाने सांगत होतो की, गेल्या वर्षापासून अखयातील तुम्ही लोक देण्यासाठी तयार आहात आणि तुमच्या उत्साहामुळे पुष्कळजण कृति करण्यास आवेशाने पुढे आले आहेत.
\v 3 तरी या बाबतीत तुमच्याविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी या बंधूंना पाठवत आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपली तयारी केलेली असावी.
\v 4 नाही तर कदाचित, मासेदोनियाचे लोक जर माझ्याबरोबर आले आणि तुम्ही तयारीत नसलेले आढळला, तर या खातरीमुळे आमची आम्ही म्हणत नाही की, तुमची फजिती होईल.
\v 5 म्हणून मला हे आवश्यक वाटते की, ह्यांनी तुमच्याकडे आधी जावे अशी या बंधूंना विनंती करावी आणि तुम्ही देऊ केलेली देणगी त्यांनी आधीच तयार करावी; म्हणजे लोभाने घेऊन नाही पण देणगी म्हणून ती तयार राहील.
\v 6 हे लक्षात ठेवा जो हात राखून पेरतो तो त्याच प्रमाणात कापणी करील आणि जो उदार हाताने पेरील तो त्याच प्रमाणात कापणी करील.
\v 7 प्रत्येक मनुष्याने आपल्या मनात जे ठरवले असेल त्याप्रमाणे त्याने द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ आवडतो.
\v 8 तुमच्याजवळ सर्व गोष्टींत सदा, सर्व पुरवठा रहावा आणि प्रत्येक चांगल्या कामात तुम्ही संपन्न व्हावे म्हणून देव तुम्हास सर्व प्रकारची कृपा पुरवण्यास समर्थ आहे.
\v 12 कारण या सेवेचे काम केवळ पवित्रजनांच्या गरजा पुरवणे एवढेच नाही पण देवाच्या पुष्कळ उपकारस्मरणात ते सेवाकार्य बहुगुणित होते.
\v 13 या सेवेच्या कसोटीमध्ये, ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाच्या अंगिकाराबाबत तुमच्या आज्ञांकितपणामुळे आणि त्यांच्यासाठी व इतरांसाठी तुम्ही उदारपणे दिलेल्या दानामुळे ते देवाचे गौरव करतात;
\v 14 आणखी ते तुम्हाकरिता प्रार्थना करीत असता तुम्हावर देवाने जी विपुल कृपा केली आहे त्यामुळे तुमची भेट व्हावी अशी उत्कंठा ते धरतात.
\v 1 पण जो मी, पौल, तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो पण दूर असताना तुमच्याबरोबर कडकपणे वागतो. तो मी तुम्हास ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने विनंती करतो.
\v 2 माझे मागणे असे आहे, आम्ही देहाला अनुसरून चालतो असा आमच्याविषयी जे विचार करतात, त्यांच्याबरोबर कडकपणे बोलण्याचा मी ज्या विश्वासाने विचार करीत आहे त्याप्रमाणे मला त्यांच्याविरुद्ध कडक होण्याची गरज पडू नये.
\v 7 डोळ्यांपुढे आहे ते पाहा; आपण ख्रिस्ताचे आहोत असा जर कोणाला स्वतःविषयी विश्वास असेल तर त्याने आमच्याविषयी स्वतःशी विचार करावा की, जसे आपण ख्रिस्ताचे आहोत तसे तेही ख्रिस्ताचे आहोत.
\v 8 कारण, प्रभूने आम्हास जो अधिकार दिलेला आहे, तो तुमची उन्नती व्हावी म्हणून दिलेला आहे, तुमचा नाश करण्यास दिलेला नाही, त्याचा मी अधिक अभिमान मिरवल्यास मला लाज वाटणार नाही;
\v 11 अशा लोकांनी हे समजून घ्यावे की, आम्ही जसे दूर असताना आमच्या पत्रांतील बोलण्यात असतो, तसे आम्ही जवळ असताना कृतीत असतो.
\v 12 जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात, त्यांच्याबरोबर आम्ही आपणांस समजायला किंवा त्यांच्याशी आपली तुलना करायचे धाडस करीत नाही, ते तर स्वतःस स्वतःकडूनच मोजत असता व स्वतःची स्वतःबरोबरच तुलना करीत असतात हा शहाणपणा नाही.
\v 13 आम्ही आमच्या मर्यादेबाहेर अभिमान मिरवणार नाही; तर देवाने आम्हास लावून दिलेल्या आमच्या मर्यादेच्या आतच मिरवू, ती मर्यादा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे.
\v 14 कारण जणू आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो नव्हतो, अशाप्रकारे आम्ही मर्यादेबाहेर जात नाही कारण आम्ही ख्रिस्ताचे शुभवर्तमान गाजवीत तुमच्यापर्यंत प्रथम पोहचलोच आहोत.
\v 15 आम्ही मर्यादा सोडून दुसर्यांच्या कामात अभिमान मिरवीत नाही; पण आम्हास आशा आहे की, जसा तुमचा विश्वास वाढेल तसा, आमच्या कामाच्या मर्यादेचे प्रमाण अधिक पसरत जाईल.
\v 16 म्हणजे, दुसर्यांच्या कार्यक्षेत्रात आधीच करण्यात आलेल्या कामाचा अभिमान न मिरवता, आम्ही तुमच्या पलीकडील प्रांतांत शुभवर्तमान सांगावे.
\v 1 माझी इच्छा आहे की, तुम्ही माझा थोडासा मूर्खपणा माझ्यासाठी सहन करावा. पण तो तुम्ही सहन करीतच आहात.
\v 2 कारण मी देवाच्या आवेशाने तुम्हाविषयी आवेशी आहे, मी एका पतीबरोबर तुमची मागणी केली आहे, अशा हेतूने की, तुम्हास शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे.
\v 3 पण मला भीती वाटते की जसे हव्वेला सर्पाने कपट करून फसवले तसे तुमचे विचार कसे तरी बिघडून ती ख्रिस्ताची शुद्ध भक्ती व सरळपण ह्यापासून भ्रष्ट होतील.
\v 4 कारण, जर कोणीही येऊन, आम्ही ज्याची घोषणा केली नाही अशी दुसर्या येशूची घोषणा केली किंवा तुम्हास मिळाला नव्हता असा दुसरा आत्मा तुम्ही स्वीकारता किंवा तुम्ही स्वीकारले नाही असे दुसरे शुभवर्तमान तुम्ही स्वीकारता तर तुम्ही त्यांचे सहन करता.
\v 9 आणि मी तुम्हाजवळ होतो तेव्हा मला कमी पडले असतानाही मी कोणाला भार असा झालो नाही कारण मासेदोनियाहून जे बंधू आले त्यांनी माझी गरज पुरविली आणि सर्व गोष्टीत मी तुम्हास ओझे होऊ नये म्हणून मी स्वतःस ठेवले आणि यापुढेही ठेवीन.
\v 12 आणि मी जे करतो ते मी करीत राहीन यासाठी की, जे कारण पाहिजे आहे ते मी त्यांच्यासाठी ठेवू नये. ते त्यांना ह्यासाठी हवे आहे की, ते ज्या कामात अभिमान मिरवतात त्यामध्ये ते आमच्यासारखे दिसावेत.
\v 13 कारण असे लोक खोटे प्रेषित आहेत, ते फसविणारे कामगार आहेत, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत.
\v 14 आणि यामध्ये आश्चर्य नाही कारण सैतानदेखील तेजस्वी दूताचे रुप धारण करतो.
\v 15 म्हणून त्याचे सेवकही जर न्यायीपणाच्या सेवकाचे रुप धारण करतात त्यामुळे त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, त्यांचा शेवट त्यांच्या कार्याप्रमाणे होईल.
\v 20 वस्तुतः जे कोणी तुम्हास दास करते किंवा छळ करते किंवा तुमचा गैरफायदा घेते किंवा स्वतः पुढे येण्याचा प्रयत्न करते किंवा तुमच्या तोंडावर मारते तरी तुम्ही त्यांचे सहन करता.
\v 22 ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्राएली आहेत काय? मीहि आहे. ते अब्राहामाचे संतान आहेत काय? मीहि आहे.
\v 23 ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे (मी हे वेडगळासारखे बोलतो) मी पुष्कळ कठीण काम केले आहे. सारखा तुरुंगात जात होतो, बेसुमार फटके खाल्ले, पुष्कळ वेळा मरणाला सामोरे गेलो, म्हणून मीही अधिक आहे.
\s5
\v 24 पाच वेळेला यहूद्यांकडून मला (“चाळीस चाबकाचे फटके वजा एक”) एकोणचाळीस फटके बसले.
\v 26 मी सातत्याने फिरत होतो, नदीच्या प्रवासात धोका होता. लुटारुंकडून धोका होता. माझ्या स्वतःच्या देशबांधवांकडून धोका होता. परराष्ट्रीय लोकांकडून, शहरांमध्ये धोका होता. डोंगराळ प्रदेशात धोका होता. समुद्रातील धोके होते, विश्वास ठेवणाऱ्या खोटया बंधूंकडून आलेले धोके होते.
\v 1 मला अभिमान मिरवणे भाग पडते; तरी हे उचित नाही पण मी प्रभूच्या दर्शनांकडे व प्रकटीकरणांकडे आता वळतो.
\v 2 मला एक ख्रिस्तातील मनुष्य माहीत आहे; तो चौदा वर्षांपूर्वी (शरीरात की शरीराबाहेर हे मला माहीत नाही, देवाला माहीत आहे) तिसर्या स्वर्गापर्यंत नेला गेला.
\v 6 कारण आपण अभिमान मिरवावा अशी जरी मी इच्छा धरली, तरी मी मूढ होणार नाही, कारण मी जे खरे ते बोलेन; पण मी स्वतःस आवरले पाहिजे, म्हणजे कोणी जे माझे पाहतो किंवा ऐकतो त्याहून त्याने मला अधिक मानू नये.
\v 7 आणि प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये म्हणून माझ्या देहात एक काटा दिलेला आहे, तो मला ठोसे मारणार्या सैतानाचा दूत आहे; म्हणजे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये. म्हणून तो ठेवण्यात आला आहे.
\v 9 आणि त्याने मला म्हणले की, ‘माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणात माझे सामर्थ्य पूर्ण होते.’ म्हणून, फार आनंदाने, मी माझ्या अशक्तपणात अभिमान मिरवीन, म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर रहावे;
\v 10 आणि म्हणून ख्रिस्तासाठी आजारात, अपमानात, आपत्तीत, पाठलागात आणि दुःखात मी संतुष्ट असतो कारण मी जेव्हा अशक्त असतो तेव्हाच सशक्त आहे.
\v 11 मी मूढ बनलो, असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले; तुम्ही माझ्याविषयी खातरी द्यायला पाहिजे होती कारण मी काहीच नसलो, तरी त्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी कोणत्याही गोष्टीत कमी नाही.
\v 12 चिन्हे, अद्भूते व सामर्थ्याची कृत्ये यांच्या योगाने खऱ्या प्रेषितांची चिन्हे खरोखरच सर्व सहनशीलतेने तुम्हामध्ये घडविण्यात आली.
\v 13 कारण मी आपला भार तुम्हावर टाकला नाही, या एका गोष्टीशिवाय तुम्ही दुसर्या कोणत्या गोष्टीत दुसर्या मंडळ्यांपेक्षा कमी आहात? मला या अपराधाची क्षमा करा.
\v 14 बघा, मी तिसर्या वेळी तुमच्याकडे येण्यास तयार आहे आणि तुमच्यावर भार घालणार नाही; कारण मी तुमच्यापासून काही मिळवू पाहत नाही, तर मी तुम्हास मिळवू पाहतो कारण मुलांनी आई-वडीलांसाठी साठवू नये पण आई-वडीलांनी मुलांसाठी साठवले पाहिजे.
\v 15 मी तुमच्या जीवांसाठी फार आनंदाने खर्च करीन आणि स्वतः सर्वस्व खर्ची पडेन. मी तुमच्यावर अतिशयच प्रीती करतो म्हणून तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता की काय?
\v 17 मी तुमच्यासाठी ज्यांना पाठवले अशा कोणाकडून मी तुमचा फायदा घेतला काय?
\v 18 मी तीताला विनंती केली आहे आणि मी एका बंधूला त्याच्याबरोबर पाठवत आहे. तीताने तुमच्याकडून फायदा मिळवला काय? आम्ही एकाच आत्म्याने चाललो नाही काय? एकाच चालीने चाललो नाही काय?
\v 19 तुम्हास इतका वेळ वाटत असेल की आम्ही तुमच्यापुढे आमचे समर्थन करीत आहोत, आम्ही देवासमोर ख्रिस्ताच्या ठायी बोलत आहो आणि प्रियांनो या सर्व गोष्टी तुमच्या उन्नतीसाठी आहेत.
\s5
\v 20 कारण मला भीती वाटते की, मी येईन तेव्हा, मी अपेक्षा करीत असेन तसे, कदाचित्, तुम्ही मला आढळणार नाही; आणि तुम्ही अपेक्षा करणार नाही असा मी तुम्हास आढळेन. कदाचित्, तुमच्यात कलह, ईर्ष्या, राग, विरोध, स्वार्थी महत्त्वकांक्षा, कुरकुरी, गर्व, अफवा व गोंधळ मला आढळून येतील.
\v 21 किंवा मी पुन्हा येईन तेव्हा माझा देव तुमच्यासमोर मला लीन करील आणि ज्यांनी पाप केले असून आपण केलेल्या अमंगळपणाचा, व्यभिचाराचा व कामातुरपणाचा ज्यांनी पश्चात्ताप केलेला नाही अशा पुष्कळ जणांसाठी मला शोक करावा लागेल.
\v 1 मी आता तिसर्या वेळी तुमच्याकडे येत आहे. दोन किंवा तीन साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द सिद्ध होईल.
\v 2 ज्यांनी पूर्वी पाप केले होते त्यांना आणि दुसर्या सगळ्यांना मी अगोदर सांगितले होते आणि दुसर्या वेळी स्वतः आलो होतो तेव्हाप्रमाणे आता दूर असताना मी आधी सांगतो की, मी जर पुन्हा आलो तर गय करणार नाही.
\v 3 कारण माझ्याद्वारे ख्रिस्त बोलतो ह्याचे प्रमाण तुम्हास पाहिजे ते हेच; तो तुमच्यासंबंधाने दुर्बळ नाही पण तुमच्यात समर्थ आहे.
\v 4 कारण जरी अशक्तपणात तो वधस्तंभावर खिळला गेला तरी देवाच्या सामर्थ्याने तो जिवंत आहे कारण त्याच्यात आम्हीही दुर्बळ आहोत पण आम्ही देवाच्या सामर्थ्याने तुमच्यासाठी जिवंत राहू.
\v 5 तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही म्हणून आपली स्वतःची परीक्षा करा. आपली स्वतःची पारख करा. तुम्हास आपल्यात येशू ख्रिस्त आहे हे कळत नाही काय? नसेल तर मग, तुम्ही पसंतीस न उतरलेले आहात.
\v 7 आता देवाजवळ अशी प्रार्थना करतो की तुम्ही काही वाईट करू नये; म्हणजे आम्ही स्वीकृत दिसावे म्हणून नाही, पण आम्ही स्वीकृत नसलो तरी तुम्ही चांगले ते करावे.
\v 8 कारण आम्ही सत्याविरुद्ध काही करत नाही, तर सत्यासाठी करतो.
\v 10 एवढ्याकरता दूर असताना मी या गोष्टी लिहीत आहे, म्हणजे प्रभूने मला जो अधिकार उभारणी करण्यास दिलेला आहे, नाश करण्यास नाही, त्याचा उपयोग करून, मी तेथे असताना कडकपणाने वागू नये.
\v 11 शेवटी, बंधूंनो, आनंद करा तुम्ही आपली अधिकाधिक सुधारणा करा. तुमचे सांत्वन होवो. तुम्ही एकमनाचे व्हा व शांतीने रहा आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर राहील.