mr_udb/67-REV.usfm

919 lines
236 KiB
Plaintext
Raw Permalink Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

\id REV - MARATHI_UDB_NT
\ide UTF-8
\h प्रकटीकरण
\toc1 प्रकटीकरण
\toc2 प्रकटीकरण
\toc3 rev
\mt1 प्रकटीकरण
\s5
\c 1
\s प्रस्तावना व नमस्कार
\p
\v 1 प्रभू येशू ख्रिस्ताने मला दाखवलेल्या गोष्टी या पुस्तकात लिहिल्या आहेत देवाने ह्या गोष्टी योहानाला दाखवल्या जेणेकरून त्याने त्याच्या सेवकांपर्यंत ह्या पोहोंचवाव्यात. ह्या गोष्टी लवकरच घडणार आहेत. येशूने त्याच्या देवदूताला त्याचा सेवक योहान ह्याच्याकडे पाठवून या गोष्टींची माहिती दिली.
\v 2 देवाच्या वचनाविषयी आणि येशू ख्रिस्ताविषयी दिलेला सर्व सत्य वृत्तांत जो मी पाहिला व ऐकला तो मी साक्षीदार म्हणून लिहिला आहे.
\v 3 जो कोणी हे शब्द वाचतो आणि जो कोणी हे शब्द ऐकतो जेव्हा हे मोठ्याने वाचल्या जातात त्या सर्वांना देव उत्तम आशीर्वाद देईल. यात लिहिलेल्या आज्ञा पाळण्यासाठी जे ह्यांना लक्षपूर्वक ऐकतात त्यांच्यासाठी तो चांगले करेल कारण यात लिहिलेल्या गोष्टी घडण्याची वेळ लवकरच येत आहे.
\s5
\p
\v 4 आशिया प्रांतातील विश्वासणाऱ्याच्या सात गटांना मी योहान, हे पत्र लिहित आहे. देव तुम्हांला दया दाखवो आणि तुम्हांला शांती देवो कारण तो नेहमीच अस्तित्वात होता सध्या अस्तित्वात आहे आणि भविष्यातही तो अस्तित्वात राहिल. त्याच्या सिंहासनासमोर उपस्थित राहणारे सात आत्मे ही ह्या गोष्टी तुम्हांसाठी करोत.
\v 5 देवाविषयी ज्याने संपूर्ण सत्य विश्वास योग्यतेने सांगितले तो येशू ख्रिस्त ही आपली दया व शांती तुम्हांला देवो. कारण मृतातून देवाने ज्याला जिवंत केले असा तो प्रथम आहे आणि तोच पृथ्वीवरील सर्व राजांवर राज्य ही करतो. आम्हांवर प्रीती करणारा तोच आहे आणि तो वधस्तंभावर मरण पावला तेंव्हा त्याच्या रक्ताने आम्हांला आमच्या पापांच्या दोषातून ज्याने मुक्त केले तो हाच होय.
\v 6 त्याच्या राज्यावर त्याने अधिकार करणे आरंभ केले आहे. त्याने आज्ञापिल्याप्रमाणे त्याच्या पित्याची उपासना करण्यास आणि देवाजवळ येणाऱ्यास याजक बनण्यासाठी त्याने आम्हांला वेगळे केले आहे. येशू ख्रिस्ताचा आंम्ही आदर आणि स्तुती निरंतर करणे आवश्यक आहे. कारण हे सत्य आहे.
\s5
\p
\v 7 पाहा! ख्रिस्त ढगांवर येत आहे प्रत्येकजण त्याला पाहतील ज्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले तेही त्याला पाहतील. ते त्याला येतांना पाहतील तेव्हा पृथ्वीतील प्रत्येक वंश प्रत्येक प्रकारचा व्यक्ती दुःखामध्ये आणि शोकामध्ये असेल हे सत्य आहे.
\v 8 प्रभू परमेश्वर असे म्हणतो “मी अल्फा म्हणजे सर्व गोष्टींची सुरूवात करणारा आणि ओमेगा म्हणजे सर्व गोष्टींचा शेवट करणारा आहे. मी अस्तित्वात आहे मी नेहेमी अस्तित्वात होतो आणि नेहमी अस्तित्वात राहणार आहे मीच एक आहे जो सर्वांवर व सर्वगोष्टींवर राज्य करतो.”
\s मनुष्याच्या पुत्राचा साक्षात्कार
\s5
\p
\v 9 येशू ख्रिस्त आम्हावर राज्य करतो म्हणून मी योहान त्याच्यासाठी दुःख भोगत आहे. मी तुम्हा सोबतीचा विश्वासणारा आहे. आमच्या विश्वासासाठी दुःख सहन करावे हे आमच्या सोबतीचे पाचारण आहे. आम्ही त्याच्या राज्याचे भाग आहोत आणि त्याच्यासोबत सर्व गोष्टींवर राज्य करतो. आम्ही हे सर्व दुःख धैर्याने सहन करतो आणि परीक्षा येते तेव्हा प्रत्येक कसोटी सहन करतो. मला अटक करण्यात आली आणि पात्म नावाच्या बेटावर पाठवण्यात आले मी लोकांना देवाचा संदेश आणि येशू विषयीचे सत्य सांगत असल्यामुळे हे घडले.
\v 10 इतर विश्वासणाऱ्यांसोबत ज्या दिवशी आम्ही प्रभूची उपासना करतो त्या दिवसांपैकी एका दिवशी देवाच्या आत्म्याने माझे नियंत्रण घेतले. माझ्या मागे कोणीतरी उभे राहून बोलत आहे असे मी ऐकले. तुतारी वाजवली जावी आणि त्याचा ध्वनी निघावा तसा त्याच्या बोलण्याचा ध्वनी होता.
\v 11 तो मला म्हणाला “तू जे काही पाहतोस ते एका गुंडाळीवर लिही आणि विश्वासणाऱ्यांच्या सात गटांना ते पाठवून दे. इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलादेल्फिया, लावदिकिया या शहरातील विश्वासणाऱ्यांना ते पत्र पाठवले.”
\s5
\p
\v 12 मी हे शब्द ऐकले तेव्हा कोण बोलत आहे. हे पाहण्यासाठी मी मागे वळालो तेव्हा मला सात दिपस्तंभ दिसले.
\v 13 त्या दिपस्तंभाच्यामध्ये मनुष्यासारखा कोणीतरी उभा असतांना मला दिसला. (त्याला काही ठिकाणी मनुष्याचा पुत्र असे म्हटले आहे.) पायापर्यंत लांब असा झगा त्याने घातला होता आणि त्याच्या छातीवर एक सोन्याचा पट्टा होता.
\s5
\p
\v 14 त्याच्या डोक्यावरील केस लोकरीसारखे शुभ्र किंवा नुकत्याच पडलेल्या बर्फासारखे पांढरे होते. त्याचे डोळे तेजस्वी ज्वालेसारखे होते.
\v 15 त्यांचे पाय भट्टीतून नुकत्याच बाहेर काढलेल्या पितळेसारखे लाल भडक होते. तो बोलत असतांना त्याचा आवाज एखादी मोठी नदी पाण्याने भरून वाहत असतांना जसा आवाज करते तसा होता.
\v 16 त्याच्या उजव्या हातात त्याने सात तारे धरले होते. त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूंनी धारदार अशी तलवार बाहेर येत होती. भर दुपारी सूर्य जसा तेजाने प्रकाशतो तसाच त्याचा चेहराही प्रकाशत होता.
\s5
\p
\v 17 जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा जणू काय मेल्यासारखा मी त्याच्या पायांजवळ पडलो. परंतु त्याने त्याच्या उजव्या हाताने मला धरले आणि मला म्हणाला “घाबरू नकोस! सर्व गोष्टींची सुरूवात करणारा तो मी पहिला आहे. आणि सर्व गोष्टींचा शेवट करणाराही मी शेवट आहे.
\v 18 मी एकदा जरी मेलो होतो तरी आता मी जिवंत आहे आणि मी खरोखर युगानयुग नेहमीकरता जिवंत आहे! मला मृत्यूवर अधिकार आहे आणि मृतांच्या ठिकाणावर ही माझे नियंत्रण आहे.
\s5
\p
\v 19 जे काही तू पाहिलेस ते लिहून ठेव. आणि आता जे घडत आहे ते ही लिहून ठेव. भविष्यामध्ये जे काही घडणार आहे तेही लिही.
\v 20 माझ्या उजव्या हातात जे सात तारे तू पाहिले आणि सात दिपस्तंभ पाहिले त्यांचा अर्थ असा आहे; आशियातील विश्वासणाऱ्यांच्या सात गटांवर लक्ष देणाऱ्या देवदूताचे हे सात तारे आहेत आणि सात दिपस्तंभ त्या सात गटांसाठी प्रत्येकी एक एक आहेत.”
\s5
\c 2
\s इफिस येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र
\p
\v 1 इफिस शहरातील विश्वासणाऱ्यांच्या समुहाच्या देवदूताला हा संदेश लिही; ज्याच्या उजव्या हातात सात तारे आहेत आणि जो सात दिपस्तंभाच्यामध्ये चालतो तो असे म्हणतो;
\v 2 ‘तू जे काही केले ते सर्व मला ठाऊक आहे. तू माझ्यासाठी कठोर परिश्रम करतोस हे मला माहीत आहे. जेव्हा तू कठीण प्रसंगांमधून जातोस तेव्हा तू धीर धरतोस हे मला माहीत आहे. जे लोक दुष्ट आहेत त्यांच्या विश्वासाविषयी जे प्रश्न विचारतात आणि जे स्वतःला प्रेषित असल्याचा दावा करतात परंतु ते नाहीत अशा लोकांना सहन करू शकत नाही हे देखील मला माहीत आहे.
\s5
\p
\v 3 तू माझ्यावर विश्वास ठेवतो म्हणून जेव्हा तुला दुःखातून जावे लागते तेव्हा ते तू धैर्याने सहन करतो हे मला माहीत आहे आणि तू माझी सेवा विश्वास योग्यतेने करण्यास धीर धरून राहतो. तू माझे अनुसरण केले म्हणून लोकांनी तुला फार दुःख दिले तरी देखील तू ते करत राहिला. माझ्या वचनांवर चालणे अवघड होते तेव्हा तू ते धरून ठेवले आणि माझी सेवा करणे सोडले नाही. तू धीर सोडला नाही थांबला नाही तुझ्यासाठी अवघड होते तरीही तू स्थिर राहिलास.
\v 4 तरी देखील तू काहीतरी चुकीचे केले आहेस; तुम्ही माझ्यावर आणि एकमेकांवर प्रीती करीत नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला होता. तेव्हा तुम्ही आधी जशी प्रीती करत होता तशी प्रीती आता माझ्यावर नाही.
\v 5 म्हणून तुम्ही माझ्यावर कशी प्रीती करत होता. त्याची आठवण करा असे मी तुम्हांला सांगतो. सुरूवातीला तुम्ही करत होता तशी पुन्हा प्रीती माझ्यावर करा. आणि जर तुम्ही ते केले नाही तर मी येईन आणि तुमच्या उपासना करणाऱ्यांच्या समाजातून म्हणजे विश्वासणाऱ्यांच्या गटातून प्रकाश काढून घेईन मी तो तुम्हामधून दूर करीन.
\s5
\p
\v 6 परंतु तुम्ही एक गोष्ट फार चांगली करता; ते निकलाइत लोक जे म्हणतात की तुम्ही मूर्तीची उपासना करू शकता आणि अनैतिक कार्य करू शकता तू त्याचा तिरस्कार करते जसा मी तिरस्कार करतो.
\v 7 ज्या प्रत्येकाला माझा संदेश समजून घ्यायचा आहे. त्यांनी देवाचा आत्मा विश्वासणाऱ्यांचे गट एकत्र येतात तेव्हा त्यांना काय म्हणतो तो संदेश लक्षपूर्वक ऐकला पाहिजे. जे कोणी माझ्या मागे येतात त्यांना विजय मिळेल असे अभिवचन दिले आहे. जे झाड सार्वकालिक जीवन देते त्या झाडाचे फळ खाण्याची परवानगी विजयी झालेल्यांना देण्यात येईल हे झाड देवाच्या बागेमध्ये लावले आहेत.
\s स्मुर्णा येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र
\s5
\p
\v 8 “स्मुर्णा शहरातील विश्वासणाऱ्या गटाच्या देवदूताला हा संदेश लिही ‘मी तुला ह्या गोष्टी बोलत आहेत. ज्याने सर्व गोष्टींची सुरूवात केली तो मी पाहिला आहे आणि तो सर्व गोष्टींचा अंत करणारा तो मी शेवटचा आहे. जो मेला होता आणि आता पुन्हा जिवंत झाला आहे तो मी आहे.
\v 9 तू कोणत्या त्रासातून गेलास ते मला माहीत आहे. तुझ्या गरीबी विषयी आणि तुला अनेक गोष्टींची गरज आहे. ते मला माहीत आहे. (परंतु तू सर्वकाळच्या गोष्टींमध्ये खरोखर श्रीमंत आहेस आणि त्या तुझ्यापासून कोणीही काढून घेणार नाही.) लोकांनी श्राप द्यावा म्हणजे काय हे तुला ठाऊक आहे आणि येशूचे अनुयायी म्हणून लोक जे वाईट गोष्टी तुझ्याविषयी बोलतात तेही तू अनुभवले आहेस. ते यहूदी (ते खरे यहूदी नव्हेत) जे तुला श्राप देतात आणि तुझ्या विषयी वाईट बोलतात ते सैतानाच्या सदस्यांच्या समूहातील आहेत आणि ते देवाच्या लोकांचा समूह नाहीत.
\s5
\p
\v 10 ज्या गोष्टींचा आता तुला त्रास होणार आहे. त्या कोणत्याही गोष्टीला तू घाबरू नकोस. तुम्हापैकी काही जणांना सैतान तुरुंगात टाकणार आहे. आणि हे सत्य आहे तुमचा विश्वास कोणत्या प्रकारचा आहे याची परीक्षा व्हावी म्हणून तो तुम्हांला अवघड ठिकाणी ठेवणार आहे. तुम्ही थोड्यावेळेसाठी दुःख सहन करणार आहात. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता म्हणून त्यांनी तुम्हांला ठार जरी केले तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत राहा. आणि मी तुमच्या डोक्यावर एक मुकुट ठेवेल तुम्हांला अनंतकाळचे जीवन असल्याचे आणि तुम्ही विजयी झाल्याचे ते चिन्ह आहे.
\v 11 विश्वासणाऱ्यांचे समुह एकत्र आले असता देवाचा आत्मा त्यांना काय म्हणतो ह्याला लक्षपूर्वक ऐका. जे कोणी विजयी होतात त्यांना दुसऱ्या मृत्यूचा अनुभव येणार नाही.”
\s पर्गम येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र
\s5
\p
\v 12 “पर्गम शहरातील विश्वासणाऱ्याच्या समूहाला हा संदेश लिही; मी तुला या गोष्टी सांगत आहे. ज्याच्याकडे दुधारी तलवार आहे तो मी आहे.
\v 13 सैतानाचे सामर्थ्य आणि त्याचा प्रभाव जेथे सगळीकडे आहे अशा ठिकाणी तू राहतो हे मला माहीत आहे. माझ्यासाठी जे महत्त्वाचे आहेत आणि ज्या गोष्टींवर मी प्रीती करतो त्या गोष्टींना तू धरून आहेस आणि तू मजबूत विश्वासात आहेस हे मला माहीत आहे. त्यांनी माझा विश्वासू सेवक अंतिपास ह्याला ठार केले तरीही तू लोकांना मी कोण आहे आणि मी त्यांच्यासाठी काय केले ते सांगत राहिला.
\s5
\p
\v 14 परंतु तुझ्या साक्षीस खराब करणाऱ्या आणि तुझ्या आज्ञापालनास कमजोर करणाऱ्या काही गोष्टींविषयी मला तुझ्याशी बोलायचे आहे. बलामाने फार पूर्वी शिकवल्या होत्या तशा काही गोष्टींचे शिक्षण तुझ्या काही सदस्यांनी द्यावे अशी तू परवानगी त्यांना देतोस. मूर्तीला अर्पिलेले अन्न खावे आणि देवाच्या लोकांमध्ये लैंगिक अनेकता आणि अनैतिकतेची परवानगी आहे असे त्याने बालकास शिकवले.
\v 15 अशाप्रकारे तू काही सदस्यांना निकलाइत शिकवतात अशी परवानगी देतोस की लैंगिक अनैतिकतेची परवानगी आहे जी खरोखर दिलेली नाही.
\s5
\p
\v 16 हे करणे तू थांबव आणि आपला मार्ग बदल किंवा मी वाट पाहणार नाही आणि अचानक तुझ्याकडे येईन आणि तुझ्या विरुद्ध युद्ध करेन माझ्या मुखातून येणाऱ्या देवाच्या वचनाने मी त्यांच्या विरुद्ध युद्ध करीन.
\v 17 देवाच्या विश्वासणाऱ्यांच्या समूहासोबत देवाचा आत्मा जे बोलतो ते लक्षपूर्वक ऐका. जो विजय मिळवतो त्याला मी लपवलेला मान्ना देईन तो तुला तुप्त करेल आणि बळकट करेल. मी त्याला पांढरा दगड देईन त्यावर त्याचे नवे नाव त्याच्यासाठी मी कोरीन, हे नाव केवळ त्याला आणि मला ठाऊक असेल.
\s थुवतीरा येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र
\s5
\p
\v 18 थुवतीरा शहरातील विश्वासणाऱ्यांचे गट एकत्र येतात याच्या दूताला असा संदेश लिही; मी देवाचा पुत्र ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि त्याचे पाय शुद्ध पितळेसारखे चकाकतात तो मी तुला ह्या गोष्टी सांगत आहे.
\v 19 तू ज्या सर्व चांगल्या गोष्टी करतोस त्या मला ठाऊक आहेत तू माझ्यावर विश्वास ठेवतोस आणि तुम्ही माझ्यावर आणि एकमेकांवर प्रीती करता हे मला माहीत आहेत. तू इतरांची सेवा करतो आणि धैर्याने अनेक संकटांचा सामना करतो हे मला माहीत आहे. तू भूतकाळात करत होता त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात तू ह्या गोष्टी करत आहेस हे मला माहीत आहे.
\s5
\p
\v 20 तरी देखील तू काहीतरी चुकीचे केले आहेस; फार काळापूर्वी दुष्ट राणी ईजबेल होती. तिच्या सारखी असलेली एक स्त्री तुझ्या लोकांमध्ये आहे तिला तू सहन करतोस. ती असे म्हणते की ती एक संदेष्टी आहे. परंतु ती जे काही शिकवते ती माझ्या सेवकांना त्याने फसवत आहे. ती त्यांना अनैतिक लैंगिक कामे करावी अशी भुरळ घालते आणि मूर्त्यांना चढवलेले अन्न खावे असे शिकवते.
\v 21 तिने तिच्या लैंगिक अनैतिकतेपासून आणि परराष्ट्रीय चाली रितींपासून दूर व्हावे असा वेळ मी तिला दिला होता तरीही तिची थांबायची इच्छा नव्हती.
\s5
\p
\v 22 परिणामी तिने खूप आजारी व्हावे असे मी करीन. ती जे काही करत आहे ते त्यांनी करणे थांबवले नाही तर तिच्यासारख्याच अनैतिक कामे करणाऱ्यांनाही मी खूप मोठ्या दुःखातून नेईल.
\v 23 ती जे काही शिकवत आहे ते स्वीकार करून काही लोक तिच्या मुलांसारखे झाले आहेत आणि मी त्यांना नक्कीच ठार करीन. आणि मग विश्वासाणाऱ्यांचे सर्व समुह शिकतील की प्रत्येकजण जो काही विचार करतो आणि इच्छा करतो ते मी जाणणारा आहे. तुम्ही जे काही केले आहे त्याप्रमाणे मी तुम्हा प्रत्येकाला प्रतिफळ देईन.
\s5
\p
\v 24 परंतु थुवतीरा शहरातील विश्वासणाऱ्यांना मला काहीतरी चांगले सांगायचे आहेत. तुम्ही ह्या चुकीच्या गोष्टींना स्वीकारत नाही हे तुम्ही चांगले करता. सैतानाने त्यांना शिकवलेल्या गुप्त गोष्टींना तुम्ही स्वीकारत नाही ‘हे चांगले करता. मी तुम्हांला इतर कोणत्याही आज्ञांचे ओझे देणार नाही.
\v 25 मी पुन्हा परत येईन तो पर्यंत तुम्ही माझ्या आज्ञा पाळत राहा आणि माझ्यावर भक्कम विश्वास ठेवा.
\s5
\p
\v 26 जे सैतानावर विजय मिळवतात आणि मरेपर्यंत मी ज्या आज्ञा त्यांना दिल्या त्यांचे पालन करतात मी त्यांना जगातील सर्व लोकगटांवर अधिकार देईन.
\v 27 लोखंडी दांड्याने त्यांना शासन करावे असे ते त्यांच्यावर नियंत्रण करतील. लोक मातीच्या भांड्यांना जसे फोडतात तसेच ते दुष्ट कर्मे करणाऱ्यांचा नाश करतील. माझ्या पित्याने जसा तो मला अधिकार दिला आहे तसा त्या गोष्टी करण्याचा अधिकार मी त्यांना देईन .
\v 28 जो कोणी सैतानावर विजय मिळवतो त्या प्रत्येकाला मी सकाळचा तारा देईन.
\v 29 विश्वासणाऱ्यांचे गट जेव्हा एकत्र येतात तेव्हा देवाचा आत्मा त्यांना जे सांगतो ते प्रत्येकाने देवाचा संदेश समजून घेण्यासाठी लक्षपूर्वक ऐकणे महत्वाचे आहे.
\s5
\c 3
\s सार्दीस येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र
\p
\v 1 सार्दीस शहरातील विश्वासणाऱ्यांचे गट एकत्र येतात त्यांच्या देवदूताला हा संदेश लिही, मी तुला ह्या गोष्टी लिहित आहे. ज्याच्याकडे देवाचे सात आत्मे आणि सात तारे आहेत तो मी आहे. जे काही तू केले आहेस ते सर्व मला ठाऊक आहे. तू जिवंत असल्यासारखा दिसतो परंतु तू मेलेला आहेस.
\v 2 आपल्या या झोपेतून जागा हो. तुझ्याकडे अद्यापही ज्या गोष्टी आहेत त्या सांभाळून ठेव. ज्या गोष्टी सध्या मरणास टेकल्या आहेत त्याही सांभाळून ठेव. तू जे काही करतोस त्यापैकी काहीही समाधानकारक नाही असे माझ्या देवाला वाटते. हे मला ठाऊक आहे म्हणून तू हे करणे अवश्यक आहे.
\s5
\p
\v 3 तू जेव्हा देवाचा संदेश आणि त्याचे सत्य ऐकले व ते स्वीकारले त्या गोष्टींची नेहमी आठवण ठेव. नेहमी त्याचे पालन कर आणि पापमय स्वभावापासून मागे फिर. जसा एखादा चोर लपून छपून येतो तसाच जेव्हा तुला अपेक्षा असणार नाही त्यावेळेस मी तुझ्याकडे येईन. मी तुझा न्याय करण्यासाठी कोणत्या वेळेस येईन ते तुला कधी कळणार नाही.
\v 4 परंतु सार्दीस शहरामध्ये तुझ्याकडे काही विश्वासणारे असे आहेत जे चुकीचे कार्य करत नाहीत. त्यांनी आपली वस्त्रे मलिन केली नाहीत असे ते आहेत. ते आज माझ्यासोबत राहण्याच्या पात्रतेचे आहेत. म्हणून ते माझ्यासोबत राहतील आणि ते सर्व प्रकारे शुद्ध असतील ज्या लोकांनी शुभ्र पांढरी वस्त्रे घातली आहेत त्यांच्या सारखे ते होतील.
\s5
\p
\v 5 जे सैतानावर विजय मिळवितात त्यांना मी पांढऱ्या वस्त्रांमध्ये सुशोभीत करेल. ज्या ज्या लोकांना अनंतकाळचे जीवन आहे. त्यांची नावे ज्या जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहे त्यातून मी ह्या लोकांची नावे कधीही खोडणार नाही. माझ्या स्वर्गीय पित्यासमोर आणि त्याच्या देवदूतां समोर ते माझे आहेत असा मी त्यांचा स्वीकार करेन.
\v 6 विश्वासणाऱ्यांचे समुह एकत्र येतात त्यांना देवाच्या आत्म्याचा संदेश काय आहे हे समजण्यासाठी देवाच्या आत्म्याचे शब्द प्रत्येकाने लक्षपूर्वक ऐका.
\s फिलदेल्फिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र
\s5
\p
\v 7 फिलदेल्फिया या शहरामध्ये विश्वासणाऱ्यांचे जे गट एकत्र आलेले आहेत त्यांच्या देवदूतांना तू हा संदेश लिही. मी तुला या गोष्टी सांगत आहे. जो सत्य आणि जो पवित्र तो मी आहे. प्राचीन यरूशलेम शहरांमध्ये लोकांना प्रवेश देण्याचा अधिकार जसा राजा दावीद याच्याकडे होता तसाच माझ्या राज्यात लोकांनी प्रवेश करावा असा अधिकार माझ्याकडे आहे. मी जे दार उघडतो ते कोणाच्यानेही बंद करवत नाही आणि जे दार मी बंद करतो ते कोणाच्यानेही उघडले जाऊ शकत नाही असा मी आहे.
\v 8 तू केलेले सर्व काही मला ठाऊक आहे. मी तुझ्यासाठी दार उघडले आहे आणि ते कोणीही बंद करू शकत नाही याची जाणिव असू दे. जरी तू अल्प शक्तीचा असलास तरी मी जे काही म्हणालो त्याचे पालन केले आहेस हे मला ठाऊक आहे. तू माझ्यावर विश्वास ठेवतो याचा तू नाकार केलेला नाहीस.
\s5
\v 9 काळजी घे. सैतानाचे अनुसरण करण्याऱ्यांसोबत तुम्हापैकी काही लोक भेटतात ह्या विषयी मला जाणिव आहे. ते यहूदी असल्याचा दावा करतात परंतु मला ठाऊक आहे ते खरेखुरे यहूदी नाहीत. ते खोटे बोलत आहेत. त्यांनी तुझ्याकडे यावे असे मी करीन आणि तुझ्या पायांजवळ ते नम्रपणे नमन करतील आणि मी तुझ्यावर प्रीती करतो ह्याची ते स्वीकृती देतील.
\p
\v 10 तू माझ्या आज्ञा पाळू नये असा प्रयत्न करणाऱ्यांपासून मी तुझी सुरक्षा करीन कारण तू धैर्याने दुःख सहन करावे अशी मी तुला आज्ञा दिली असता तू माझे आज्ञा पालन केले आहे. संपूर्ण जगातील सर्व लोकांसोबत ते लवकरच असे करणार आहेत.
\v 11 मी लवकर परत येईन. देवाने तुझ्यासाठी राखून ठेवलेले प्रतिफळ तू गमावू नये कोणी कारण बनू नये म्हणून मी तुला जे सांगितले ते करत राहा.
\s5
\p
\v 12 जे सैतानावर विजय मिळवितात त्यांना मी सुरक्षा दिली आहे. माझ्या देवाच्या मंदिरातील खांबांप्रमाणे ते मजबूत होतील आणि तेथे ते सदासर्वकाळ उभे राहतील. ते माझ्या देवाचे आहे असे चिन्ह आणि ते माझे आहेत हेही त्यावरून मी दाखवून देईन. माझ्या देवापासून उतरलेले नवे शहर म्हणजे नवे यरूशलेम हे नाव आणि हे लोक देवाने दिले आहेत असे शब्द मी त्यांच्यावर अंकित करीन.
\v 13 विश्वासणाऱ्यांच्या समुहाच्या मंडळीला देवाचा आत्मा काय म्हणतो हे सर्वांनी लक्षपूर्वक ऐकणे गरजेचे आहे म्हणजे देवाचा संदेश त्यांच्या लक्षात येईल.
\s लावदिकिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र
\s5
\p
\v 14 लावदिकीयाच्या शहरात विश्वासणाऱ्यांचे जे गट एकत्र येतात त्यांच्या देवदूताला हा संदेश लिही. ‘मी तुला या गोष्टींविषयी लिहित आहे. देवाने दिलेले सर्व अभिवचन खात्रीने पूर्ण होतील असे मी सांगतो. मी देवाविषयी खरेपणाने आणि अचूकपणे साक्ष देणारा आहे. देवाने माझ्याद्वारे सर्व गोष्टी निर्माण केल्या.
\v 15 तू माझ्यासाठी जे काही केलेस ते सर्व मला ठाऊक आहे; तू माझ्यावर विश्वास ठेवतो याचा नाकार करीत नाहीस परंतु तुझे माझ्यावर जास्त प्रेम ही नाही. जे थंड ही नाही किंवा गरम ही नाही. अशा पाण्यासारखा तू आहेस तू एक तर गरम किंवा थंड असला तर बरे झाले असते असे मला वाटते.
\v 16 तू गरम ही नाहीस आणि थंड ही नाहीस म्हणून मी तुला नाकारतो कोमट पाण्याच्या गुळण्या करून थुंकून टाकावे तसे मी तुला थुंकून देईन.
\s5
\p
\v 17 तू म्हणाला आहेस ‘मी श्रीमंत झालो आहे आणि मी खूप धन गोळा केले आहे. मला कशाचीही कमतरता नाही! परंतु तुझ्यात असंख्य गोष्टींची कमतरता आहे याची तुला जाणीवही नाही. लाचार गरीब आंधळे नग्न आणि टाकलेल्या अशा लोकांसारखा तू आहेस.
\v 18 तो माझ्याकडून जसे काय शुद्ध सोने विकत घ्यावे तसेच तुझ्यात ज्या गोष्टींची कमतरता आहेत त्या गोष्टी तू माझ्याकडून मिळवाव्यात असा मी तुला सल्ला देतो तू जर हे करशील तर तू खरोखर श्रीमंत होशील. तू नग्नतेत आणि लज्जेत राहण्यापेक्षा जर माझ्याकडून शुभ्र वस्त्रे विकत घेशील तर बरे होईल म्हणजे मला तुला नीतिमान करण्यास मदत होईल. तुझ्या आजाराने ग्रस्त डोळ्यांमध्ये घालण्यासाठी तू माझ्याकडून अंजन घ्यावे आणि ते तुझ्या डोळ्यात घालावे असे कर म्हणजे तुला सत्य समजून सांगण्यास मला सोपे जाईल.
\s5
\p
\v 19 ज्यांच्यावर मी प्रेम करतो त्यांना मी रागावतो आणि त्यांच्या चुका दुरूस्त करतो म्हणून तू तुझ्या पूर्ण हृदयाने तुझ्या सर्व पापमय स्वभावापासून मागे फिर.
\v 20 तुमच्या दाराच्या जवळ उभा राहून आणि वाट बघत मी दार ठोठावत आहे. हे करून तुमच्यापैकी प्रत्येकाला प्रतिसाद देण्याची मी संधी देत आहे याची जाणिव असू द्या. जो कोणी माझा आवाज ऐकतो माझ्यासाठी दार उघडतो आणि मला आत येण्याचे आमंत्रण देतो त्या प्रत्येकाच्या जवळ मी जाईन आणि मित्र एकमेकांसोबत जसे राहतात तसा मी त्यांच्यासोबत राहिन आणि आम्ही एकत्र भोजन करू.
\s5
\p
\v 21 जसा मी सैतानावर विजय मिळवला आणि आता माझ्या पित्याच्या सिंहासनावर मी बसलो आहे आणि राज्य करत आहे. तसाच जो कोणी सैतानावर विजय मिळवितो त्यालाही मी माझ्या सिंहासनावर बसण्याची आणि अधिकार करण्याची परवानगी देईन.
\v 22 विश्वासणाऱ्यांच्या गटांच्या समुहाला देवाचा आत्मा काय सांगत आहे हे सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावे म्हणजे त्यांना देवाचा संदेश समजेल.
\s5
\c 4
\s स्वर्गाचा साक्षात्कार
\p
\v 1 या गोष्टी घडल्या नंतर मी स्वर्ग उघडलेला आणि त्यात एक दार उघडले असा दृष्टांत पाहिले. ज्याचा आवाज एका मोठ्याने वाजणाऱ्या तुतारी सारखा होता आणि जो माझ्याशी या अगोदर बोलला होता तो मला म्हणाला “इकडे वर ये! या नंतर ज्या घटना घडायच्या आहे त्या मी तुला दाखवेन.”
\v 2 लगेचच देवाचा आत्मा मला विशेष रितीने नियंत्रण करत आहे असा अनुभव मला झाला. तेथेच स्वर्गामध्ये एक सिंहासन होते त्या सिंहासनावर कोणीतरी बसले होते आणि अधिकार करत होते.
\v 3 यास्फे रत्नासारखा तेजस्वी आणि लालभडक सार्दि ह्या रत्नासारखा असा तो दिसायला चमकदार होता. त्या सिंहासनाभोवती पाचू ह्या धातूसारखे मेघ धनुष्य होते. ते अतिशय तेजस्वी असून चकाकत होते.
\s5
\p
\v 4 त्या सिंहासनच्याजवळ आणखी चोवीस इतर सिंहासने होती. त्या सिंहासनावर चोवीस वडील बसून होते. त्यांनी शुभ्र वस्त्रे परिधान केली होती आणि त्यांच्या मस्तकांवर सोन्याचे मुकुट ठेवण्यात आलेले होते.
\v 5 त्या सिंहासना मधून विजा चकाकत होत्या गर्जना होत होत्या आणि वाणी ऐकू येत होती. तसेच सिंहासनाच्या समोर सात मशाल जळत होत्या त्या देवाच्या सात आत्म्यांचे प्रतीक अशा होत्या.
\s5
\p
\v 6 जणू काय काचेचा समुद्र असावा तसे काही तरी त्या सिंहासनाच्या समोर होते. ते पारदर्शक स्फटिकासारखे होते. त्या सिंहासनाच्या चारही बाजूंना एक-एक जिवंत प्राणी होता. त्या प्रत्येक प्राण्याला समोरून आणि मागून डोळ्यांनी व्यापलेले होते.
\s5
\p
\v 7-8 तो पहिला जिवंत प्राणी सिंहासारखा दिसत होता. दुसरा जिवंत प्राणी एका वासरासारखा दिसत होता. तिसऱ्या जिवंत प्राण्याचा चेहरा मनुष्याच्या चेहऱ्याला साजेसा सारखा होता. तो चौथा जिवंत प्राणी उडणार्‍या गरुड पक्ष्याप्रमाणे दिसत होता. त्या चारही जिवंत प्राण्यांना प्रत्येकी सहा-सहा पंख होते. वर पासून तर खालपर्यंत या प्राण्यांचे हे पंख डोळ्यांनी भरलेले होते. दिवसा आणि रात्री ते निरंतर असे म्हणत होते
\q पवित्र पवित्र पवित्र प्रभूदेव पवित्र
\q सर्वसामर्थी परमेश्वर पवित्र.
\q आता पर्यंत जो अस्तित्वात होता तोच हा होय
\q तो आताही अस्तित्वात आहे.
\q आणि नेहमी अस्तित्वात राहणार आहे.
\s5
\p
\v 9-10 जो नेहमी सर्व काळाकरिता जिवंत आहे जो सिंहासनावर बसला आहे त्याला हे जिवंत प्राणी स्तुती सन्मान आणि धन्यवाद देतात. ज्या ज्या वेळेस ते असे करतात त्या त्या वेळेस ते चोवीस वडील जमिनीवर पालथे पडतात आणि जो सिंहासनावर बसला आहे त्याच्या समोर नमन करतात. तो सदासर्वकाळ आणि नेहमी करता जिवंत आहे त्याची ते उपासना करतात. ते आपले मुकुट त्या सिंहासनासमोर ठेवतात आणि असे म्हणतात;
\q
\v 11 “हे आमच्या प्रभू आणि देवा सर्व प्राण्यांनी तुझी स्तुती करावी याच्या योग्यतेचा तू आहेस.
\q सर्वांनी तुझा सन्मान करावा या योग्यतेचा तू आहेस आणि
\q तू सर्वशक्तीमान आहेस असे सर्व प्राण्यांनी स्वीकारावे ह्याही तू योग्यतेचा आहे.
\q कारण तू एकट्यानेच सर्वकाही निर्माण केले.
\q वास्तविक पाहता तू त्यांना निर्माण केले म्हणून ते अस्तित्वात आहेत.”
\s5
\c 5
\s देवाच्या कोकऱ्याचा साक्षात्कार
\p
\v 1 सिंहासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातात मी एक गुंडाळी पाहिली. ती गुंडाळी आतील बाजूने आणि बाहेरील बाजूने अशा दोन्हीही बाजूने लिहिलेली होती आणि त्या गुंडाळीला सात शिक्क्यांनी मोहर मारलेली होती.
\v 2 तसेच मी एका बळकट दूताला पाहिले तो मोठ्या आवाजात सुचना देत होता “गुंडाळी वरील शिक्क्यांना तोडण्यास योग्य आणि तिला उघडण्यास योग्य अशा व्यक्तीने पुढे यावे आणि तसे करावे.”
\s5
\p
\v 3 परंतु स्वर्गात पृथ्वीवर किंवा तिच्या खाली कोणत्याही निर्माण केलेल्या प्राण्याला ती गुंडाळी उघडता येणे आणि तिच्यात काय लिहिले आहे ते पाहणे अशक्य होते.
\v 4 ते कार्य करण्यास कोणीही पात्र नव्हते म्हणून मी मोठ मोठ्याने रडू लागलो.
\v 5 परंतु वडिलांपैकी एकाने मला म्हटले “पाहा आता आणखी रडू नकोस! यहूदा वंशातील ज्याला सिंह असे म्हणतात आणि जो दावीद राजाचा वारसदार आणि वंशज आहे तो सैतानावर प्रबळ झाला आहे. त्यामुळे ह्या गुंडाळीवरील हे सात शिक्के तोडण्यासाठी आणि ती उघडण्यासाठी तो पात्र आहे!”
\s5
\p
\v 6 सिंहासनाच्या भोवती वडिलांमध्ये आणि त्यात चार जिवंत प्राण्यांच्यामध्ये एक कोकरा उभा असलेला नंतर माझ्या दृष्टीस पडला. जरी अद्यापि तो जिवंत होता तरीही कोणीतरी त्याला ठार केले होते असे दाखवणारे चिन्ह त्याच्यावर होते. देव संपूर्ण पृथ्वीवर जे सात आत्मे पाठवतो त्याचे सात डोळे त्याच्यावर होते आणि त्याला सात शिंगे होती.
\v 7 जो सिंहासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून गुंडाळी घेण्यासाठी तो कोकरा तेथे आला आणि त्याने ती घेतली.
\s5
\p
\v 8 त्याने ती गुंडाळी आपल्या हातात घेतल्यानंतर ते चार जिवंत प्राणी आणि ती चोवीस वडील माणसे त्याच्यासमोर नतमस्तक झाली आणि पालथी पडली. त्यांच्या प्रत्येकाजवळ एक वीणा होती आणि त्यांच्या जवळ देवाच्या लोकांच्या प्रार्थनेने भरलेल्या धूपाच्या सोन्याच्या वाट्या होत्या.
\s5
\p
\v 9 त्या जिवंत प्राण्यांनी आणि वडिलांनी एक नवे गीत गाईले. ते गीत असे:
\q “तुला ठार करण्यात आले होते म्हणून तू ती गुंडाळी आपल्या हातात घ्यावी आणि तिचे शिक्के उघडावे याच्या योग्यतेचा आहेस
\q आणि तू देवासाठी प्रत्येक वंश, भाषा, लोक
\q आणि लोक गट यातून तुझ्या रक्ताने व तुझ्या मरणाने तू लोकांना खंडणी भरून देवासाठी घेतले आहे म्हणून योग्यतेचा आहे.
\q
\v 10 तुझ्यामुळे आता देव ज्यांच्यावर राज्य करतो
\q आणि देवाची सेवा करणारे ते याजक व्हावेत असे लोक तू निर्माण केले आहेत; ते लोक पृथ्वीवर राज्य करतील.”
\s5
\p
\v 11 मी हे पाहणे सुरू ठेवले तो पाहा! अनेक देवदूतांची वाणी सिंहासनाच्या अवतीभोवती आणि त्या जिवंत प्राण्यांच्या व त्या वडिलांच्या भोवती बोलतांना मला ऐकू आली. ते शेकडो-हजारो असे होते त्यांची संख्या ऐवढी होती की ते कोणाच्याने मोजवली नसती.
\v 12 ते मोठ्या आवाजाने असे गात होते:
\q “ज्या कोकऱ्याला त्यांनी ठार केले-
\q त्याचे सामर्थ्य त्याची संपत्ती त्याचे ज्ञान आणि त्याची शक्ती यांची आम्ही स्तुती करणे योग्य आहे.
\q निर्माण केलेल्या सर्व गोष्टींनी त्याचा आदर करावा आणि त्याची स्तुती करावी हे योग्य आहे!”
\s5
\p
\v 13 आणि मी स्वर्गातील प्रत्येक प्राणी आणि पृथ्वीवरील आणि पृथ्वीच्या खालील.
\p आणि समुद्रातील प्रत्येक प्राण्याला असे म्हणतांना ऐकले
\q “जो सदासर्वकाळ सिंहासनावर बसतो त्याची
\q आणि कोकऱ्याची आम्ही त्याची स्तुती सन्मान गौरव अनंत काळापर्यंत करावे.”
\q संपूर्ण सामर्थ्याने सदासर्वकाळ त्यांनी राज्य करावे.”
\p
\v 14 त्या चार जिवंत प्राण्यांनी असे म्हटले “असेच होवो!” मग ते वडील जमिनीवर पालथे पडले आणि त्यांनी देवाची व त्या कोकऱ्याची उपासना केली.
\s5
\c 6
\s शिक्के फोडण्यात आले
\p
\v 1 त्या गुंडळीतील सातपैकी पहिला शिक्का त्या कोकऱ्याने उघडला असता मी ते पाहिले. तेव्हा त्या चार जिवंत प्राण्यांपैकी एका प्राण्याने गर्जनेने ऐवढ्या मोठ्या आवाजात असे म्हटले “इकडे ये!”
\v 2 आणि एक पांढरा घोडा प्रकट झाला. त्यावर कोणीतरी स्वार झालेले होते आणि त्याच्याकडे एक धनुष्य आणि बाण होते. लोकांना जिंकणारा तो राजा आहे हे दाखवण्यासाठी देवाने त्याला एक मुकुट दिला. तो लोकांना जिंकत राहावे यासाठी बाहेर पडला.
\s5
\p
\v 3 मग कोकऱ्यासारख्या दिसणार्‍या त्याने आणखी दुसरा शिक्का उघडला आणि दुसऱ्या जिवंत प्राण्याला मी “इकडे ये!” असे म्हणतांना ऐकले.
\v 4 जेव्हा तो असे म्हणाला “एक लाल घोडा प्रकट झाला.” त्यावरही कोणीतरी बसलेले होते आणि लोकांनी आपसात शांतीने राहू नये असे अधिकार देवाने त्याला दिलेले होते त्यांनी शांतीत न राहता त्या ऐवजी ते एकमेकांना ठार करणार होते. या उद्देशासाठी त्याच्या हातात एक मोठी तलवार देण्यात आली होती.
\s5
\p
\v 5 मग त्या कोकऱ्याने तिसरा शिक्का उघडला आणि मी त्या तिसर्‍या जिवंत प्राण्याला “ये!” असे म्हणतांना ऐकले. या वेळेस एक काळा घोडा प्रकट झाला. त्यावर कोणीतरी स्वार झालेले होते आणि त्याच्या हातामध्ये मी एक तराजू पाहिले.
\v 6 या चार जिवंत प्राण्यांच्या मधून जणू काय आवाज येत होता असा आवाज मी ऐकला. त्या वाणीने घोड्यावरील व्यक्तीला असे म्हटले “एक किलो गहू विकत घेण्यासाठी एका मनुष्याला दिवसभर कष्ट करून पुरेसे पैसे कमवता यावे असे कर. आणि तीन किलो ज्वारी ही तेवढ्याच किंमतीत विकत देता येईल असे कर. परंतु जैतूनाचे तेल किंवा द्राक्षरस यांचा पुरवठा कमी होऊ देऊ नकोस.”
\s5
\p
\v 7 मग त्या कोकऱ्याने चौथा शिक्का उघडला आणि मी चौथ्या प्राण्याला “ये!” असे म्हणतांना ऐकले.
\v 8 या वेळेस एक फिकट रंगाचा घोडा प्रकट झाला. त्यावर कोणीतरी स्वार झाले होते; आणि त्याचे नाव “लोकांना ठार मारण्यासाठी कारण असलेला” असे होते कोणीतरी त्याच्या मागे येत होते; आणि त्या व्यक्तीचे नाव “मेलेले लोक जेथे जातात ती जागा” असे होते. संपूर्ण पृथ्वीतील सर्व लोकांमधील एक चतुर्थांश लोकांना ठार करण्याची शक्ती देवाने या दोघा व्यक्तींना दिली होती. ते त्यांना शस्त्रांच्या द्वारे किंवा दुष्काळाच्या द्वारे किंवा आजाराने किंवा जंगली श्वापदां द्वारे ठार करणार होते.
\s5
\p
\v 9 मग त्या कोकऱ्याने पाचवा शिक्का उघडला मग मी स्वर्गातील वेदीच्या खाली देवाच्या सेवकांचे आत्मे पाहिले या सेवकांनी देवाच्या संदेशावर विश्वास ठेवला होता आणि ते इतरांना त्या विषयीचे सत्य आणि येशूविषयी सांगत होते म्हणून इतरांनी त्यांना ठार केले होते अशांचे आत्मे ते होते.
\v 10 त्यांनी मोठ्याने देवाकडे विनंती केली “सर्वशक्तिमान प्रभू तू पवित्र आणि खरा आहे. पृथ्वीवरील ज्या लोकांनी आमचा वध केला आहे त्या लोकांना दोषी ठरवून त्यांना शिक्षा देण्याआधी आणखी तू किती वेळ घेशील?”
\v 11 मग देवाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला एक लांब शुभ्र झगा दिला आणि तो त्यांना म्हणाला की त्यांनी थोडा वेळ अधिक धैर्य धरावे आणि तोपर्यंत विसावा घ्यावा. त्या दुष्ट लोकांनी त्यांच्यासोबत प्रभूची सेवा करणाऱ्या इतर विश्वासणाऱ्यांना ठार करे पर्यंत त्यांनी धीर धरायचा होता. हे इतर ज्या प्रकारे मरण पावले होते त्याच प्रकारे या विश्वासणाऱ्यांनाही मरायचे होते अशी देवाची इच्छा होती.
\s5
\p
\v 12 मग त्या कोकऱ्याने सहावा शिक्का उघडलेला मी पाहिला आणि पृथ्वी जोर जोराने हालली. काळ्या लोकर पासून बनलेल्या कापडाप्रमाणे सूर्य अगदी काळाभोर झाला. संपूर्ण चंद्र रक्तासारखा लाल झाला.
\v 13 एका प्रचंड वादळात जसे अंजिराच्या झाडाला हलवल्याने कच्चे अंजीर खाली पडतात तसेच आकाशातील तारे पृथ्वीवर असंख्य संख्येने पडले.
\v 14 एखादी जुनी गुंडाळी फाडली असता जशी दोन्ही बाजूनी गुंडाळून वेगळी होते तसे आकाश फाटले आणि दोन्ही बाजूनी गुंडाळले गेले. प्रत्येक पर्वत आणि प्रत्येक बेट त्यांच्या जागेतून हलले आणि बाजूला झाले.
\s5
\p
\v 15 यामुळे पृथ्वीतील सर्व लोक म्हणजेच राजे, लोकांवरील मोठे अधिकारी, सेनापती, श्रीमंत लोक, शक्तीशाली लोक आणि त्यासोबत इतर सर्व लोक म्हणजे जे गुलाम होते आणि स्वतंत्र होते ते सर्व गुहांमध्ये आणि डोंगरातील कपारींमध्ये जाऊन लपले.
\v 16 ते पर्वताकडे आणि त्या खडकांकडे आरोळी करू लागले “जो सिंहासनावर बसलेला आहे आम्ही त्याच्या दृष्टीस पडू नये आणि त्या कोकऱ्याने आम्हांला शिक्षा करू नये म्हणून तुम्ही आम्हावर पडा आणि त्यांच्यापासून आम्हांला लपवा!”
\v 17 आम्हांला शिक्षा देण्याचा हा भयंकर दिवस आज आहे त्या शिक्षेपासून कोणीही वाचू शकत नाही!”
\s5
\c 7
\s एकशे चव्वेचाळीस हजारांवर शिक्का
\p
\v 1 यानंतर मी चार देवदूतांना पृथ्वीवर उभे असलेले पाहिले. एक उत्तरेकडे उभा होता, एक पूर्वेकडे, एक दक्षिणेकडे आणि एक पश्चिमेकडे उभा होता. त्यांनी पृथ्वीवर समुद्रावर आणि कोणत्याही झाडावर वाऱ्याने वाहू नये आणि पृथ्वी वरील गोष्टींची नासधूस करू नये म्हणून त्यांना धरून ठेवले होते.
\v 2 मग मी पूर्वेकडून आणखी एका देवदूताला येताना पाहिले. त्याच्या हातात देवाचा शिक्का होता. देवाच्या स्वतःच्या लोकांचे रक्षण व्हावे म्हणून सर्वशक्तिमान देव या शिक्क्याच्या द्वारे त्यांच्यावर चिन्ह करत होता. देवाने ज्या चार देवदूतांना पृथ्वी आणि समुद्राचे नुकसान करण्याची आज्ञा दिली होती त्यांना या देवदूताने मोठ्याने आवाज देऊन बोलावले.
\v 3 तो त्यांना म्हणाला “आम्ही देवाच्या सेवकांच्या कपाळावर जोपर्यंत चिन्ह करत नाहीत तोपर्यंत पृथ्वीला समुद्राला किंवा झाडांना कसलाही उपद्रव करू नका.”
\s5
\p
\v 4 मग त्या दूताने आणि त्याच्या सोबतीच्या दूतांनी देवाच्या सर्व सेवकांवर चिन्ह केले. त्यांनी ज्याच्यावर चिन्ह केले होते त्या लोकांची संख्या मी ऐकली. ती संख्या एक लाख चव्वेचाळीस हजार होती. ते इस्त्राएलाच्या प्रत्येक वंशातील लोक होते.
\v 5 त्या देवदूतांनी यहूदा वंशाच्या बारा हजार लोकांवर चिन्ह केले. रऊबेन वंशाच्या बारा हजारांवर; गाद वंशाच्या बारा हजारांवर;
\v 6 आशेर वंशातील बारा हजारांवर; नफताली वर्षातील बारा हजारांवर; मनश्शे वंशातील बारा हजारांवर.
\s5
\p
\v 7 शिमोनाच्या वंशातील बारा हजारांवर; लेवीच्या वंशातील बारा हजारांवर; इस्साखारच्या वंशातील बारा हजारांवर;
\v 8 जबलूनच्या वंशातील बारा हजारांवर; योसेफाच्या वंशातील बारा हजारांवर; बन्यामीनाच्या वंशातील बारा हजारांवर; त्यांनी ते चिन्ह केले.
\s स्वर्गातील तारण पावलेल्यांचा साक्षात्कार
\s5
\p
\v 9 या गोष्टी घडून गेल्यानंतर मी एक मोठा लोकसमुदाय पाहिला. ते लोक इतके होते की कोणीही त्यांना मोजू शकले नसते. प्रत्येक राष्ट्र प्रत्येक वंश प्रत्येक लोक गट आणि प्रत्येक भाषा बोलणाऱ्यां मधून ते होते. ते सिंहासन आणि कोकऱ्या समोर उभे होते. त्यांनी पांढरे झगे घातलेले होते आणि आपल्या हातांमध्ये हलवण्यासाठी झावळ्याच्या फांद्या त्यांनी धरल्या होत्या ते उत्सव साजरा करत होते.
\v 10 ते मोठ्याने ओरडले “सिंहासनावर बसणारा आमचा देव आणि सैतानाच्या शक्तीपासून ज्याने आम्हांला सोडवले तो कोकरा!
\s5
\p
\v 11 इतर सर्व देवदूत त्या सिंहासनाच्या भोवती वडिलांच्या भोवती आणि त्या चार जिवंत प्राण्यांच्या भोवती उभे होते. त्या सिंहासनांच्या समोर ते आपल्या तोंडावर जमिनीवर पालथे पडले आणि त्यांनी देवाची उपासना केली.
\v 12 ते म्हणाले “होय असेच होवो! आमच्या देवा सदासर्वकाळ आम्ही तुझी स्तुती करतो तुझे आभार मानतो आणि तुझा सन्मान करतो आम्ही हे कबूल करतो की तू परिपूर्ण ज्ञानी शक्तिमान आणि सर्व गोष्टीत सर्व काम करण्यास समर्थ आहे असेच होवो!
\s5
\p
\v 13 नंतर त्यांच्यापैकी एका वडिलाने मला विचारले “ज्या लोकांनी ही पांढरे झगे घातलेली आहेत ते कोण आहे आणि ते कोठून येतात हे तुला ठाऊक आहे काय?”
\v 14 मी त्याला उत्तर दिले “महाराज ते कोण आहे हे मला ठाऊक नाही. ते कोण आहे हे नक्कीच तुला ठाऊक असेल!” तो मला म्हणाला “इतरांनी ज्यांना फार दुःख दिले असे हे लोक होत. कोकरा यांच्यासाठी मरण पावला आणि देवाने त्यांना त्यांच्या पापांची क्षमा केली. त्यांनी आपली वस्त्रे जणू काय त्याच्या रक्तामध्ये धुतली आहे आणि स्वतःला स्वच्छ केले आहे.
\s5
\p
\v 15 या कारणामुळे ते देवाच्या सिंहासनासमोर आहेत रात्रंदिवस त्याच्या मंदिरात ते त्याची उपासना करतात. सिंहासनावर बसलेला देव त्यांचे संरक्षण करील.
\v 16 यामुळे यानंतर ते कधीही भुकेले होणार नाहीत. त्यांना कधीही ताहान लागणार नाही. सूर्याचा त्यांच्यावर काहीही प्रभाव पडणार नाही आणि कोणतीही उष्णता त्यांना बांधणार नाही. जसा एखादा मेंढपाळ आपल्या मेंढरांची काळजी घेतो तसा सिंहासनारूढ त्यांची काळजी घेईल म्हणून असे होईल.
\v 17 जसा मेंढपाळ आपल्या मेंढरांना पाण्याच्या ओढ्याजवळ नेतो तसेच तो कोकरा त्यांना अनंत काळाच्या जीवनाच्या स्त्रोताकडे मार्गदर्शन करेल. ते यापुढे कधीही उदास होणार नाहीत असे देव करेल. त्यांच्या डोळ्यातील सर्व अश्रूंना तो पुसून टाकेल तशा सारखे हे होईल.
\s5
\c 8
\s सात कर्ण्याचा नाद
\p
\v 1 मग कोकऱ्याने सातवा शिक्का उघडला आणि थोड्या काळासाठी स्वर्गामध्ये कोणताही आवाज झाला नाही.
\v 2 देवासमोर जे सात देवदूत उभे होते ते त्यांना मी पाहिले. त्याने त्यांच्यापैकी प्रत्येकाला एक एक तुतारी दिली.
\s5
\v 3 मग दुसरा एक देवदूत आला आणि तो वेदीजवळ जाऊन उभा राहिला. त्याच्या हातामध्ये धुपाने भरलेली सोन्याची वाटी होती. देवाच्या सिंहासनासमोर सोन्याच्या वेदीवर देवाच्या लोकांच्या प्रार्थना त्याने अर्पण करावे यासाठी देवाने त्याला खूप मोठे धुप दिलेले होते. त्या वेदीवर त्याने तो धूप जाळला.
\v 4 त्यांच्या हातातील वाटीत जळणाऱ्या धुपामधून देवाच्या लोकांच्या प्रार्थना देखील धुरासोबत देवाकडे वर जात होत्या.
\v 5 मग त्या देवदूताने ती सोनेरी धुप वाटी घेतली आणि तिला वेदीवरील आगेतील ते कोळशांनी भरले. त्याने तो कोळसा संपूर्ण पृथ्वीवर फेकून दिला. विजा चमकल्या आणि मेघ गर्जना झाली आणि संपूर्ण पृथ्वी हालली.
\s5
\p
\v 6 मग ज्या प्रत्येक देवदूताच्या हातात त्या सात तुताऱ्या होत्या ते सात देवदूत त्या वाजवण्यासाठी तयार झाले.
\v 7 पहिल्या देवदूताने त्याच्या हातातील तुतारी वाजवली आणि रक्तासहित गारपीट आणि आग ह्यांचा पृथ्वीवर वर्षाव करण्यात आला. यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरील सर्वांपैकी एक तृतीयांश जळून भस्म झाले: झाडांचा एक तृतीयांश भाग नष्ट झाला हिरव्या गवताच्या एक तृतीयांश प्रदेशही जळून गेला.
\s5
\p
\v 8 मग दुसर्‍या दूताने आपली तुतारी वाजवली आणि मोठ्या पर्वताच्या आकाराचे काहीतरी आगे सहित समुद्रात पडले. यामुळे समुद्राच्या पूर्ण भागापैकी एक तृतीयांश भाग रक्तासारखा लाल झाला
\v 9 समुद्रातील सर्व जीवधारी प्राण्यांपैकी एक तृतीयांश प्राणी मरण पावले आणि समुद्रात असलेल्या सर्व जहाजांपैकी एक तृतीयांश जहाज नष्ट झाले.
\s5
\p
\v 10 मग तिसऱ्या देवदूताने आपली तुतारी वाजवली असता मोठी मशाली जळतात तसा एक मोठा तारा आकाशातून पृथ्वी वरील सर्व नद्या आणि झऱ्यांच्या एक तृतीयांश भागावर पडला.
\v 11 त्या ताऱ्याचे नाव कडूदवणा असे आहे. हे घडल्यामुळे पाण्याच्या एक तृतीयांश भागातील नद्या आणि पाण्याचे ओहोळ कडू झाले. ते पाणी पिण्याने खूप लोक मरण पावले कारण ते अतिशय कडू होते.
\s5
\p
\v 12 मग चौथ्या दूताने आपली तुतारी वाजवली आणि देवाने सूर्य, चंद्र आणि तारे ह्यांना हानले त्यामुळे त्यांच्या प्रकाश देण्याच्या वेळेपैकी एक तृतीयांश वेळ कमी झाली. दिवसाचा एक तृतीयांश भाग सूर्यप्रकाश देत नव्हता आणि रात्रीच्या पूर्ण प्रकाशा ऐवजी चंद्र आणि तारे ही केवळ एक तृतीयांश एवढाच वेळ प्रकाश देत होते.
\s5
\p
\v 13 मी हे सर्व पाहत असतांना आकाशामध्ये उंच उडणार्‍या एका गरुडाने मोठ्या आवाजात असे म्हटलेले आहे “पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसोबत भयंकर घटना घडणार आहे कारण आता तीन उरलेले देवदूत त्यांच्या तुताऱ्या वाजवणारा आहेत! आता ते तुताऱ्या वाजवण्याच्या बेतात आहेत!”
\s5
\c 9
\p
\v 1 मग पाचव्या देवदूताने त्याची तुतारी वाजवली आणि आकाशातून एक तारा खाली पृथ्वीवर पडलेला मी पाहिला. देवाने त्याला मृतांच्या जगात खाली उतरणार्‍या शीडीची चावी दिली होती.
\v 2 जेव्हा त्याने तो दरवाजा उघडला तेव्हा एका मोठ्या भट्टीतून बाहेर येतो तसा धूर तिच्यातून बाहेर पडला. तो धूर ऐवढा होता की त्या धूराने सूर्य आणि आकाशातील प्रकाश लोकांना पाहता आला नाही.
\s5
\p
\v 3 त्या धूरातून टोळही बाहेर आले आणि त्यांनी पृथ्वी व्यापून टाकली. जसा विंचू आपली नांगी मारतो तसेच त्यांनी लोकांना नांगीने मारावे अशा अधिकार देवाने त्यांना दिला होता.
\v 4 देवाने त्या टोळांना अशी सुचना केली की पृथ्वीवरील गवत किंवा इतर कोणत्याही झुडपाला किंवा कोणत्याही झाडाला त्यांनी कसलाही उपद्रव करू नये. देवाने त्यांना सांगितले की ज्यांच्या माथ्यावर ते देवाचे आहेत हे दाखवणारे चिन्ह नाही केवळ अशाच लोकांना त्यांनी उपद्रव करावा.
\s5
\p
\v 5 देवाने त्या टोळांनी त्या लोकांचा जीव घ्यावा याची परवानगी दिली नव्हती. त्या ऐवजी पाच महिन्यांपर्यंत ते टोळ लोकांना वेदना देणार होते. विंचू चावल्यावर जशा वेदना होतात तशाच वेदना त्या टोळ्यांनी आपली नांगी मारल्यावर लोकांना होत होत्या.
\v 6 बंडखोर लोकांना वेदना देण्यासाठी जेव्हा ते टोळ त्यांना नांगी मारतील तेव्हा त्यातील वेदना इतक्या भयंकर होती की ते लोक मरण्याचा मार्ग शोधतील परंतु त्यांना मारण्याचा कोणताही मार्ग सापडणार नाही. त्यांना मरण्याची तीव्र इच्छा होईल परंतु ते मरू शकणार नाही.
\s5
\p
\v 7 युद्धासाठी सज्ज झालेल्या घोड्यांप्रमाणे ते टोळ दिसत होते. सोनेरी मुकुटांसारखी दिसणारे असे काही तरी त्यांच्या डोक्यावर होते. त्यांचे चेहरे लोकांच्या चेहऱ्यांसारखे होते.
\v 8 स्त्रियांचे केस जसे लांब असतात तसे त्यांचे केसही लांब होते. सिंहाच्या दातांसारखे त्यांचे दातही फार मजबूत होते.
\v 9 त्यांचे चिलखत धातूंनी बनलेले होते. अनेक घोडे युद्धातील रथाला ओढतांना जसा आवाज करतात तसा मोठा आवाज हे टोळ हवेत उडतांना करत होते.
\s5
\p
\v 10 विंचूला जशी शेपटी असते तशीच शेपटी ह्या टोळांनाही होती. ह्या शेपटीच्या द्वारेच ते लोकांना चावा घेत असत. पाच महिने पर्यंत लोकांना उपद्रव करण्याचा त्यांची शक्ती ही त्यांच्या शेपटीमध्येच होती.
\v 11 अथांग डोहाचा दूत हा त्यांच्यावर राज्य करत होता. इब्री भाषेमध्ये त्याचे नाव अबद्दोन असे आहे आणि ग्रीक भाषेमध्ये त्याचे नाव अपल्लूओन असे होते. या दोन्ही भाषांमध्ये त्याच्या या दोन्ही नावाचा अर्थ विनाश करणारा असा होतो.
\p
\v 12 यासोबतच पहिला अनर्थ संपला. परंतु यानंतर आणखी दोन अनर्थ होणार आहेत ह्याची जाणिव असू द्या.
\s5
\p
\v 13 देवाच्या उपस्थितीत ठेवलेल्या त्या सोनेरी वेदीच्या चारही कोपर्‍यांमधून येणारी एक वाणी मी ऐकली कारण सहाव्या देवदूताने त्याची तुतारी वाजवली होती.
\v 14 ज्या सहाव्या देवदूताच्या हातात तुतारी होती त्या देवदूताला ती वाणी असे म्हणतांना मी ऐकली “फरात नावाच्या महान नदीजवळ मी ज्या चार देवदूतांना बांधून ठेवले आहेत त्यांना तू मोकळे कर”
\v 15 नंतर ते चार दूत ज्यांनी ते वर्ष तो महिना आणि त्या दिवसाचा तो निश्चित प्रहर येण्याची वाट पाहिली होती त्यांना मोकळे सोडण्यात आले. लोकांच्या एक तृतीयांश संख्येला ठार करण्यासाठी आपल्या सैनिकांना सक्षम करावे ह्याकरिता त्यांना मोकळे करण्यात आले होते.
\s5
\p
\v 16 घोड्यांवर स्वार असलेल्या त्या सैनिकांची संख्या वीस कोटी ऐवढी होती. कोणी तरी त्यांचीही संख्या सांगितली तेव्हा मी ते ऐकले होते.
\v 17 ते सैनिक आणि ज्यावर ते बसले होते ते घोडे कसे दिसत होते ह्या दृष्टांतात मी पाहिले. त्या सैनिकांनी जी उरस्त्राणे घातली होती ती अग्नीसारखी लाल धूराप्रमाणे निळसर आणि गंधकाच्या रंगांची पिवळी अशी होती. ते ज्या घोड्यांवर बसले होते त्यांची डोकेही सिंहाच्या डोक्यांसारखी होती. त्यांच्या तोंडातून आग धूर आणि गंधक जळल्यामुळे निघणाऱ्या धुरासारखी होती.
\s5
\p
\v 18 त्या घोड्यांच्या तोंडातून निघणार्‍या या तीन गोष्टींना म्हणजेच आग, धूर आणि जळता गंधक यांनी लोकांच्या एक तृतीयांश संख्येला ठार केले.
\v 19 त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात आणि त्यांच्या शेपटांमध्ये होती. त्याच्या शेपटीला जणू काय सापांच्या तोंडांसारखी तोंडे होती आणि त्यांनी ते लोकांना उपद्रव करत असत.
\s5
\v 20 परंतु जे लोक अग्नी धूर आणि जळता गंधक यांच्या संकटांनी ठार झाले नव्हते असे उरलेले लोक आपल्या पापमय गोष्टींना सोडून वळले नाहीत आणि जे ते करत होते तसेच कार्य करत गेले. भूतांची किंवा मूर्त्यांची उपासना करणे त्यांनी थांबवले नाही त्यांनी त्यांची निर्मिती सोने, चांदी, तांबे, दगड आणि लाकडांपासून केली होती. जरी त्या मूर्त्या पाहू शकत नव्हत्या ऐकू शकत नव्हत्या चालू शकत नव्हत्या तरीही लोकांनी त्यांची उपासना करणे थांबवले नाही.
\v 21 त्यांनी लोकांचा खून करणे जादू टोणा करणे लैंगिक अनैतिक कामे करणे आणि चोरी करणे देखील थांबवले नाही.
\s5
\c 10
\s बलवान दूत व लहानसे पुस्तक
\p
\v 1 दुष्टांतामध्ये मी पाहिले की स्वर्गामधून आणखी एक बळकट देवदूत खाली उतरून आला. तो ढगांनी वेढलेला होता. त्याच्या डोक्याच्या भोवती मेघ धनुष्य होता. त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजाने प्रकाशत होता. त्याचे पाय जणू काय अग्नीच्या स्तंभासारखे होते.
\v 2 त्याच्या हातामध्ये एक छोटी गुंडाळी होती आणि ती उघडलेली होती. त्याने त्याचा उजवा पाय समुद्रावर ठेवला आणि त्याचा डावा पाय जमिनीवर ठेवला.
\s5
\p
\v 3 त्याने मोठ्या आवाजात काहीतरी म्हटले त्याचा आवाज सिंहाच्या गर्जनेसारखा होता. जेव्हा तो ओरडला तेव्हा त्याची वाणी सात वेळेस गर्जनेसारखी ऐकू आली त्या गर्जनेमध्ये असे शब्द होते जे मी समजू शकलो नाही.
\v 4 मी जे शब्द ऐकले ते मी लिहून घेणार होतो परंतु स्वर्गातून एक वाणी मला म्हणाली “त्या गर्जनेने काय म्हटले ते शब्द गुप्त ठेव त्यांना लिहून ठेवू नको.”
\s5
\p
\v 5 मग तो दूत ज्याला मी समुद्रावर आणि जमिनीवर उभे राहतांना पाहिले होते त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे पुढे केला
\v 6 जो सदासर्वकाळ जिवंत आहे त्याला त्याने विचारले “ज्याने स्वर्गाची आणि त्यातील सर्व काही निर्माण केले ज्याने पृथ्वी बनवली आणि तिच्या वरील सर्व काही निर्माण केले ज्याने समुद्र आणि समुद्रातील सर्वकाही निर्माण केले त्याला त्याने विचारले तो जे काही बोलत आहे ते सत्य आहे असे तो म्हणाला. त्या दूताने म्हटले की देवाने ज्या गोष्टींची योजना करण्याची आखली आहे ती पूर्ण करण्यात तो खात्रीने कदापि उशीर करणार नाही.
\v 7 सातवा देवदूत आपली तुतारी वाजवण्याची वेळ येईल तेव्हा देवाची ती गुप्त योजना पूर्ण होईल, त्याने त्याच्या संदेष्ट्यांना त्याच्या सेवकांना फार पूर्वी सांगितल्याप्रमाणे होईल.
\s5
\p
\v 8 माझ्या संगती स्वर्गातून जी वाणी बोलत होती ती माझ्याशी पुन्हा एकदा बोलतांना मी ऐकले. ती मला म्हणाली “समुद्रावर आणि पृथ्वीवर जो देवदूत उभा आहे त्याच्याकडे जा आणि त्याच्या हातातून ती उघडलेली गुंडाळी घे.”
\v 9 म्हणून मी त्या देवदूताजवळ गेलो आणि त्याने ती लहान गुंडाळी मला द्यावी अशी मी त्याला विनंती केली. तो मला म्हणाला “ही गुंडाळी घे आणि ती खाऊन टाक. तुझ्या तोंडामध्ये ती तुला मधाच्या चवी सारखी लागेल परंतु ती तुझ्या पोटाला कडू करेल.”
\s5
\p
\v 10 मी त्या देवदूताच्या हातातून ती लहान गुंडाळी घेतली आणि मी ती खाल्ली. ती माझ्या तोंडामध्ये मधाच्या चवीसाठी गोड लागली परंतु नंतर माझ्या पोटात मला कडूपणा जाणवला.
\v 11 जो माझ्याशी स्वर्गातून बोलत होता तो मला म्हणाला “अनेक अनेक राष्ट्रांविषयी लोकांच्या गटांविषयी वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यां विषयी अनेक राजांविषयी तू पुन्हा पुन्हा देवाचा संदेश बोलत जा.”
\s5
\c 11
\s दोन साक्षीदार
\p
\v 1 मोजायला वापरतात तशा काठी सारखा एक वेत देवदूताने माझ्या हातात दिला. देव मला म्हणाला “मंदिराकडे जा त्याचे मोजमाप घे आणि त्यातील वेदीचेही मोजमाप घे तेथे माझी उपासना करणारे किती लोक आहेत त्यांना मोज.”
\v 2 परंतु मंदिराच्या समोरील अंगणाचे मोजमाप करू नको कारण मी ते परराष्ट्रीय लोकांच्या गटांना दिलेले आहेत. यामुळे ते यरूशलेम शहराला बेचाळीस महिन्यांपर्यंत पायाखाली तुडवतील.
\s5
\p
\v 3 एक हजार दोनशे साठ दिवसांपर्यंत मी ज्या गोष्टी माझ्या दोन साक्षीदारांना प्रकट करणार आहे त्यांची घोषणा करावी यासाठी मी त्यांना पाठवून देईन. ते दोघे बकऱ्यांच्या केसांपासून बनवलेले खरबरीत कपडे परिधान करते आणि माझ्या लोकांच्या पातकांबद्दल ते दुःखी आहेत असे दाखवून देतील.”
\v 4 पृथ्वीवर अधिकार करणाऱ्या प्रभूच्या उपस्थितीत जी दोन जैतूनाची झाडे आणि दोन दिपस्तंभ आहेत त्या दोन साक्षीदारांचे प्रतिनिधित्त्व करतात.
\v 5 जर कोणी त्या दोन साथीदारांना उपद्रव करण्याचा प्रयत्न केला तर त्या साक्षीदाराच्या तोंडातून आग बाहेर येते आणि ती त्यांचा नाश करते. जर लोकांनी त्यांना उपद्रव करण्याचा प्रयत्न केला तर ते दोघे त्याच प्रकारे त्यांनाही ठार करतील.
\s5
\p
\v 6 देव त्यांना जे काही प्रगट करतो याची घोषणा करण्याच्या काळामध्ये आकाशातून पाऊस पडू नये यावर त्या दोन साथीदारांना अधिकार देण्यात आलेला आहे. तसेच जिथे कुठे पाणी आहे ते पाणी रक्तमय व्हावे असेही करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे संपूर्ण पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारच्या पीडा याव्यात असे करण्याचा अधिकारही त्यांना देण्यात आलेला आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे कधीही ते ह्या गोष्टी करू शकतील.
\v 7 देवाकडून येणारा संदेश त्यांनी लोकांना सांगण्याचे संपवल्यावर अथांग डोहातून वर येणारा श्वापद त्यांच्यावर हल्ला करेल तो त्यांच्यावर विजयी होईल आणि तो त्यांना ठार करेल.
\s5
\p
\v 8 सदोम आणि मिसरमधील लोक जसे दुष्ट होते तसे लोक जेथे त्यांचा प्रभू वधस्तंभी दिला गेला आणि या शहराला सदोम आणि मिसर असे नाव देण्यात आले त्या मोठ्या शहराच्या रस्त्यांवर त्या दोघा साक्षीदाराचे मृतदेह पडून राहतील.
\v 9 साडे तीन दिवसांपर्यंत वेगवेगळ्या लोकांचे गट वेगवेगळे वंश वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आणि राष्ट्रे त्या दोघांच्या मृत देहांकडे पाहत राहतील परंतु कोणीही त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते पुरावे याची परवानगी देण्यात येणार नाही.
\s5
\p
\v 10 ते दोन साक्षीदार मरण पावले आहे हे जेव्हा पृथ्वीवरील लोक पाहतील तेव्हा ते आनंद आणि उत्साह साजरा करतील. या दोन साथीदारांनी त्यांच्यावर पिडा पाठवल्या होत्या म्हणून ते आनंदाने एकमेकांना उपहार पाठवतील.
\v 11 परंतु साडे तीन दिवसानंतर त्यांनी पुन्हा श्वास घ्यावा आणि जिवंत व्हावे असे परमेश्वर देव करील. ते ऊठून उभे राहतील आणि जेव्हा लोक त्यांना पाहतील तेव्हा ते फार भयभीत होतील.
\v 12 ते दोन साक्षीदार स्वर्गातून येणारा मोठा आवाज ऐकतील ती वाणी त्यांना असे म्हणेल “येथे वर या!” मग ते दोघे ढगांमध्ये वेष्टीले जाऊन वर घेतले जातील. ते वर जात असतांना त्यांचे शत्रू त्यांच्याकडे पहात राहतील.
\s5
\p
\v 13 त्याच वेळेस एक मोठा भूमिकंप होईल त्यामुळे शहरातील दहा टक्के इमारती पडतील आणि सात हजार लोक मरण पावतील उरलेले लोक फार भयभीत होतील आणि स्वर्गात जो देव राज्य करतो तो महान आहे याच्याशी ते सहमत होतील.
\p
\v 14 असा हा दुसरा अनर्थ होऊन गेला. लवकरच तिसरा अनर्थ येणार आहे हे लक्षात ठेवा.
\s सातवा कर्णा
\s5
\p
\v 15 मग सातव्या देवदूताने त्याच्या हातातील तुतारी वाजवली. स्वर्गातील वाण्यांनी मोठ्याने आरोळी केली “आमचा प्रभू परमेश्वर आणि ख्रिस्त ज्याला त्याने जगातील सर्व लोकांवर शासन करण्यासाठी नियुक्त केले आहे आता ते लोकांवर राज्य करतील आणि त्यांचे राज्य या लोकांवर युगानुयुग चालत राहिल.”
\s5
\p
\v 16 देवाच्या उपस्थितीत जे चोवीस वडील सिंहासनावर बसलेले आहेत त्यांनी त्याच्यासमोर नमन केले पालथे पडले आणि त्याची उपासना केली.
\v 17 ते म्हणाले:
\q “प्रभुदेवा तू सर्व सामर्थ्यशाली आहेस!
\q आपण आता अस्तित्वात असलेले एकच आहात!
\q तू नेहमी पासून अस्तित्वात राहिला आहेस!
\q तू आपल्या सामर्थ्याने तुझ्याविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या
\q प्रत्येकाला पराजित केले आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो
\q आणि जगातील सर्व लोकांवर आता तू राज्य करत आहेस.
\s5
\q
\v 18 राष्ट्रातील विश्वास न ठेवणारे लोक तुझ्याविरुद्ध रागाने क्रोधाने युद्ध करत होते.
\q यामुळे तू ही त्यांच्यावर खूप कोपला होता.
\q सर्व मेलेल्या लोकांचा न्याय करण्याची हीच योग्य वेळ आहे असे तू ठरवले.
\q तुझ्या सर्व सेवकांना त्यांचे प्रतिफळ देण्याची हिच योग्य वेळ आहे असाही तू निर्णय घेतला.
\q तुझे संदेष्टे आणि तुझा सन्मान करणारे इतर सर्व लोक
\q मग ते पृथ्वीवर महत्त्वाचे असो किंवा कोणत्याही महत्त्वाचे नसो त्या सर्वांना प्रतिफळ देण्याची हिच वेळ आहे.
\q असे तू ठरव आणि असे लोक जे पृथ्वीवरील इतरांचा नाश करणारे होते,
\q त्या सर्व लोकांचा नाश करण्याची हिच वेळ आहे असा देखील त्याने निर्णय घेतला.
\s5
\p
\v 19 मग देवाने स्वर्गात असलेले त्याचे मंदिर उघडले आणि मी पाहिले की त्यामध्ये एक पवित्र पेटी होती तेथे विजा चमकत होत्या त्या ठिकाणी मेघ गर्जना आणि ढगांचा गडगडाट होत होता पृथ्वी हालली आणि आकाशातून मोठ-मोठ्या गारा पडल्या.
\s5
\c 12
\s स्त्री व अजगर
\p
\v 1 मग आकाशामध्ये काहीतरी अतिशय महत्त्वाचे घडतांना मी पाहिले. तर पाहा सूर्य वस्त्र म्हणून पांघरले एक स्त्री तेथे होती. चंद्र तिच्या पायाखाली होता बारा ताऱ्यांनी बनलेला विजयासाठी घालतात असा मुकुट तिच्या डोक्यावर होता.
\v 2 ती बालकास जन्म देण्याच्या लागास आली होती तिला फार वेदना होत होत्या म्हणून ती मोठ्याने ओरडत होती.
\s5
\p
\v 3 आणि मग आकाशामध्ये काहीतरी कधी न घडते असे काहीतरी घडतांना मी पाहिले. तेथे एक मोठा लाल अजगर होता. त्याला सात डोकी आणि ‘दहा शिंगे’ होती. त्याच्या प्रत्येक डोक्यावर एक राजकीय मुकुट ठेवण्यात आला होता.
\v 4 त्या अजगराच्या शेपटीने आकाशातून एक तृतीयांश तारे तोडून घेतले आणि ते जमिनीवर पाडले. तो अजगर त्या बाई समोर जाऊन उभा राहिला म्हणजे ती ज्या बाळाला जन्म देणार होती त्याचा जन्म होताच त्याने ते खाऊन टाकावे.
\s5
\p
\v 5 जगातील सर्व लोकांवर आणि त्यांच्या राष्ट्रांवर राज्य करण्यासाठी जो नेमलेला होता त्या मुलाला तिने नंतर जन्म दिला तो देवाच्या लोखंडी दंडुकेला घेऊन राज्य करणार होता. देवाने ते मुल तिच्यापासून हिसकावून घेतले आणि त्याला आपल्या सिंहासनाजवळ नेले .
\v 6 परंतु ती बाई रानांमध्ये पळून गेली. देवाने तेथे तिची काळजी घेण्यासाठी एक सुरक्षित जागा तयार केली आहे तेथे तो एक हजार दोनशे साठ दिवसांपर्यंत तिची काळजी घेणारा होता.
\s5
\p
\v 7 मग स्वर्गामध्ये एक युद्ध झाले. ‘मीखाएल’ आणि ज्या देवदूतांवर तो अधिकारी होता त्यांनी त्या अजगराविरुद्ध युद्ध केले. तो अजगर आणि त्याचे दूत यांनी मीखाएल आणि त्याच्या दूतांच्याविरुद्ध युद्ध केले.
\v 8 परंतु तो अजगर त्या युद्धाला जिंकू शकला नाही. तो अजगर आणि त्याच्या दूतांनी यापुढे स्वर्गात राहण्याची परवानगी देवाने त्यांना दिली नाही.
\v 9 त्याऐवजी देवाने त्या मोठ्या अजगराला स्वर्गातून खाली फेकून दिले. हा अजगर म्हणजे तो पुरातन सर्प होय आणि त्यालाच सैतान किंवा तो दुष्ट असे नाव देण्यात आले आहे. संपूर्ण पृथ्वीवरील लोकांना फसवणारा तो हाच होय त्याला त्याच्या देवदूता समवेत पृथ्वीवर टाकण्यात आले होते.
\s5
\p
\v 10 मग स्वर्गात कोणीतरी मोठ्याने ओरडतांना मी ऐकले
\q “आता आमच्या देवाने त्याच्या लोकांना आपल्या सामर्थ्याने वाचवले आहे आणि तो सर्व लोकांवर राज्य करत आहे!
\q आता देवाने ज्याला सर्वांचा अधिकारी म्हणून नेमले तो ख्रिस्त त्याला सर्वांवर सगळीकडे राज्य करण्याचा अधिकार देण्यात आला
\q कारण देवाने जो आपल्या सोबतीच्या विश्वासाणाऱ्यांनी चुका केल्या आहेत,
\q असा आरोप लावतो त्याला स्वर्गातून बाहेर काढून टाकले आहे तो अजगर त्यांच्या रात्रंदिवस देवासमोर आरोप लावतो.
\s5
\q
\v 11 आमच्या सोबतीच्या विश्वासणाऱ्यांनी त्याच्यावर विजय मिळवला कारण कोकऱ्याने त्यांच्यासाठी आपले रक्त वाहिले आणि त्यांच्यासाठी तो मरण पावला.
\q आणि हे ह्यासाठी घडले कारण त्यांनी इतर लोकांना त्यांच्या विषयीचे सत्य सांगितले.
\q त्यांच्या विषयीचे सत्य बोलण्यासाठी लोकांनी त्यांना ठार ही करू दिले.
\q तरीही ते सत्य बोलले आणि त्यांनी जिवंत राहावे याची अभिलाषा धरली नाही.
\q
\v 12 म्हणून स्वर्गातील प्रत्येकाने आता आनंद करावा. परंतु खाली पृथ्वीवर राहणारे आणि समुद्रात राहणाऱ्या लोकांसोबत भयंकर गोष्टी घडणार आहेत.
\q कारण आता सैतानाला तुमच्याकडे खाली टाकण्यात आले आहे. तो आता खूप चिडलेला आहे.
\q कारण देवाने त्याचा न्याय करून त्याला शासन करण्याची वेळ येण्यासाठी अगदी थोडी घटका उरलेली आहे.
\s5
\p
\v 13 देवाने त्या अजगराला पृथ्वीवर फेकून दिले ह्याची जेव्हा त्याला जाणिव झाली तेव्हा त्याने ज्या बाईने त्या मुलाला जन्म दिला होता तिचा पाठलाग केला.
\v 14 परंतु देवाने त्या बाईला मोठ्या गरुडांच्या पंखांसारखे दोन मोठ-मोठे पंख दिले त्यांचा उपयोग करून ती रानामध्ये पळून गेली. तेथे देवाने तिच्यासाठी एक जागा तयार केली आहे. देवाने साडे तीन वर्षांपर्यंत तेथे तिची काळजी घेतली. ती ज्या ठिकाणी होती तेथे तो अजगर पोहोंचू शकत नव्हता.
\s5
\p
\v 15 मग त्या सर्पाने नदीतून वाहते तसे आपल्या तोंडातून पाणी वाहवीले म्हणजे तो तिला त्या ठिकाणा वरून पुरामध्ये वाहून टाकणार होता.
\v 16 परंतु जमिनीने त्या बाईची मदत केली आणि त्या अजगराच्या तोंडातून निघालेली ती नदी गिळून टाकली.
\v 17 मग तो अजगर त्या बाईवर अधिकच रागावला म्हणून तो तिला सोडून देऊन तिच्या इतर वंशजांशी युद्ध करण्यासाठी निघून गेला. येशू विषयीचे सत्य बोलणारे आणि देवाच्या आज्ञांचे पालन करणारे हे ते लोक होत.
\v 18 मग तो अजगर समुद्राच्या किनार्‍यावर जाऊन उभा राहिला.
\s5
\c 13
\s समुद्रातून वर आलेले श्वापद
\p
\v 1 मग समुद्रातून एक श्वापद बाहेर येतांना मी पाहिला. त्याला दहा शिंगे आणि सात डोकी होती. त्याच्या प्रत्येक शिंगावर एक राजकीय मुकुट होता. आणि त्याच्या प्रत्येक डोक्यावर देवाची निंदा करणारे शब्द लिहिलेले होते.
\v 2 हे श्वापद दिसायला चित्त्यासारखे होते. परंतु त्याचे पाय अस्वलाच्या पायांसारखे आणि त्याचे तोंड एखाद्या सिंहाच्या तोंडासारखे होते. त्या अजगराने त्या श्वापदाला अतिशय शक्तिशाली बनवले होते. लोकांवर राजा म्हणून राज्‍य करण्‍याचा अधिकार अजगराने त्या श्वापदाला दिला होता.
\s5
\p
\v 3 त्या श्वापदाच्या डोक्यांपैकी एका डोक्यावर कोणीतरी जीवघेणा प्रहार केल्यासारखे जखम होती ती जखम अशी होती की त्या जखमेमुळे त्या श्वापदाचा जीव जवळपास गेलाच होता. परंतु त्याची ती जखम बरी झाली होती. यामुळे पृथ्वीवरील सर्व लोकांनी आश्चर्य केले आणि ते त्या श्वापदाच्या मागे गेले.
\v 4 त्यांनी त्या अजगराची ही उपासना केली कारण त्याने त्या श्वापदाला त्यांच्यावर राज्य करण्याचा अधिकार दिला होता. त्यांनी त्या श्वापदाची उपासना केली आणि ते म्हणाले “या श्वापदासारखा सर्वशक्तिमान कोणीच नाही! याच्याविरुद्ध लढाई करणे कोणाला शक्य आहे?”
\s5
\p
\v 5 त्या श्वापदाने गर्वाने बोलावे आणि देवाची निंदा करावी असे देवाने होऊ दिले. लोकांवर बेचाळीस महिन्यांपर्यंत राज्य करण्याची परवानगी देवाने त्याला दिली.
\v 6 जेव्हा तो श्वापद बोलत असे तेव्हा देव त्याचे नाव जेथे तो राहतो ते ठिकाण आणि स्वर्गात राहणाऱ्या सर्वांचा अपमान तो करत असे.
\s5
\p
\v 7 त्या श्वापदाने देवाच्या लोकांसोबत युद्ध करून त्यांना जिंकावे असे देवाने होऊ दिले. प्रत्येक वंश प्रत्येक राष्ट्रावर प्रत्येक भाषा बोलणाऱ्या लोकांवर आणि जगातील सर्व लोक गटांवर राज्‍य करण्‍याचा अधिकार या श्वापदाकडे होता.
\v 8 पृथ्वीवर राहणारे सर्व लोक त्याची उपासना करत होते. जो कोकरा वधला गेला होता त्याच्याकडील जीवनाच्या पुस्तकात ज्या लोकांची नावे लिहिली नव्हती ते हे लोक होत. देवाने सृष्टी निर्माण करण्याच्या पुर्वी त्याने ह्या लोकांची नावे ते लोक देवाची आहेत म्हणून लिहून घेतली होती.
\s5
\p
\v 9 देवाकडून आलेला हा संदेश समजण्यासाठी प्रत्येकाने याकडे लक्षपूर्वक कान दिले पाहिजे.
\v 10 काही लोकांनी त्यांच्या शत्रूकडून धरले जावे असे जर देवाने ठरवले असेल तर ते धरले जातील. काही लोकांचा युद्धामध्ये मृत्यू होईल असे जर देवाने ठरवले असेल तर ते युद्धात मरून जातील. म्हणून देवाच्या लोकांनी वेदना सहन कराव्या आणि त्याच्यासोबत विश्वास योग्य राहावे.
\s भूमीतून वर आलेले श्वापद
\s5
\p
\v 11 मग मी पृथ्वीवरून आणखी एक श्वापद वर येतांना पाहिले. एखाद्या मेंढीला असतात तसेच त्याला दोन छोटे शिंग डोक्यावर होते. परंतु तो अजगर बोलत होता तसे ते कठोर पणाने बोलत होते.
\v 12 त्या पहिल्या श्वापदाची जी इच्छा आहे ते लोकांनी करावे म्हणून हे दुसरे श्वापद त्यांच्यावर राज्य करते. पृथ्वीवरील सर्व लोकांनी त्या पहिल्या श्वापदाची उपासना करावी असे ते करते ते पहिले श्वापद म्हणजे ज्याला जीवघेणी जखम झाली होती परंतु नंतर ती बरी झाली ते होय.
\s5
\p
\v 13 पृथ्वीवरील सर्व लोकांच्या देखत आकाशातून आग ही पाडण्यासारखे चमत्कार ते दुसरेच श्वापद करू शकत होते.
\v 14 पहिल्या श्वापदासाठी हे दुसरे श्वापद चमत्कार करत होते असे करून पृथ्वीवरील लोकांनी त्या पहिल्या श्वापदाची उपासना करावी यासाठी ते त्यांना फसवत असे. परंतु हे सर्व घडत होते कारण देवाने हे सर्व घडू देण्याची परवानगी दिलेली होती. पहिले श्वापद ज्याला कोणीतरी जवळपास ठार केले होते त्याची मूर्ती करून पृथ्वीवरील लोकांनी त्याची उपासना करावी असे दुसऱ्या श्वापदाने लोकांना सांगितले.
\s5
\p
\v 15 त्या दुसऱ्या श्वापदाने त्या मूर्तीमध्ये प्राण ओतावा असे देवाने होऊ दिले होते तसेच त्या मूर्तीला बोलण्याचा आणि जे कोणी त्यांची उपासना करत नाही त्याला ठार करण्याची आज्ञा देण्याचा अधिकारही दिला.
\v 16 तसेच जगातील सर्व लोकांनी म्हणजेच गरीब किंवा श्रीमंत गुलाम किंवा स्वतंत्र महत्त्वाचे किंवा कोणतेही महत्त्व नसलेले अशा सर्वांनी त्या पहिल्या श्वापदाचे नाव आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर लिहावे असे त्या दुसऱ्या श्वापदाने लोकांना सांगितले.
\v 17 लोकांनी कोणत्याही गोष्टी विकू नये आणि कोणत्याही गोष्टी खरेदी करू नये म्हणून त्या दुसऱ्या श्वापदाने लोकांना ते चिन्ह म्हणजेच त्या श्वापदाचे नाव किंवा त्याच्या नावाचे प्रतीक म्हणून असलेला अंक घ्यावा असे सांगितले.
\s5
\p
\v 18 या चिन्हाचा अर्थ काय आहे हे समजण्यासाठी तुम्ही फार शहाणपणाने विचार करणे गरजेचे आहे. जो कोणी शहाणपणाने विचार करतो त्याच्या हे लक्षात येईल की तो क्रमांक मानवजातीचे चिन्ह आहे. आणि तो क्रमांक सहाशे सहासष्ट असा आहे.
\s5
\c 14
\s कोकरा व त्याचे अनुयायी
\p
\v 1 परंतु नंतर मी त्या कोकऱ्याला यरुशलेमेतील सीयोन पर्वतावर उभे असलेले पाहिले. त्याच्यासोबत एक लाख चव्वेचाळीस हजार लोक होते. त्याच्याबरोबर त्याचे आणि त्याच्या पित्याचे नाव त्यांच्या कपाळांवर लिहिलेले होते.
\v 2 मग मी स्वर्गातून आलेला एक आवाज ऐकला तो आवाज नद्यांच्या मोठ्या धबधब्यासारखा किंवा एका मोठ्या गर्जनेसारखा मोठा होता. अनेक लोकांनी एकत्रितपणे वाद्य वाजवावे तसे त्या आवाजाला ऐकूण वाटत होते.
\s5
\p
\v 3 सिंहासनासमोर उभे राहून जिवंत प्राण्यांच्या समोर आणि वडिलांच्या समोर उभे राहून ते एक लाख चव्वेचाळीस हजार लोक एक नवे गीत गात होते. पृथ्वीवरील सर्व लोकांमध्ये ज्यांना खंडणी देऊन मुक्त केले होते. त्या एक लाख चव्वेचाळीस हजार लोकांनाच ते नवे गीत शिकता येणार होते. ते गीत इतर कोणालाही शिकता येणार नव्हते.
\v 4 त्या एक लाख चव्वेचाळीस हजार लोकांनी स्वतःला स्त्री-संबंधाने भ्रष्ट केले नव्हते. ते पवित्र होते. जेथे कोठे कोकरा जातो तेथे तेथे त्याच्या मागे चालणारे असे ते लोक आहेत. पृथ्वीवरील लोकांमधून देवासाठी कोकऱ्याणे ज्यांना खंडणी भरून सोडवले असे ते लोक आहेत. या लोकांना कोकऱ्याने सर्वप्रथम देवाला अर्पण केले आणि स्वतःला अर्पण केलेले आहे.
\v 5 या लोकांनी आपल्या शब्दांनी कधीही खोटे पणा केला नाही आणि कधीही अनैतिक कार्य केले नाही.
\s तीन स्वर्गदूत आणि संदेश
\s5
\p
\v 6 मग मी दुसर्‍या एका देवदूताला आकाश आणि स्वर्ग यांच्यामध्ये उडतांना पाहिले. पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी देवाने सर्व काळाकरिता दिलेली आनंदाची बातमी गाजवण्यासाठी त्याला पाठवण्यात आले होते. तो ती बातमी प्रत्येक राष्ट्र प्रत्येक वंश, प्रत्येक भाषा बोलणारे लोक आणि प्रत्येक लोक गटाला गाजवणार होता.
\v 7 तो मोठ्या आवाजात म्हणाला “देवाने आता न्याय करण्याची वेळ आली आहे म्हणून तुम्ही देवाचा सन्मान करा आणि त्याची स्तुती करा. त्याची उपासना करा कारण त्यानेच स्वर्ग, पृथ्वी, समुद्र आणि पाण्यांचे झरे निर्माण केले आहेत.”
\s5
\p
\v 8 त्यानंतर दुसरा एक देवदूत माझ्याकडे आला आणि मला म्हणाला “बाबेल शहर आता पूर्णपणे नष्ट झाले आहे! ती स्वतः ज्या प्रकारच्या लैंगिक अनैतिक कर्मांमध्ये गुंतलेली होती तशी कर्मे पृथ्वीवरील सर्व लोकांनीही करण्यास ती त्यांचे मन वळवत असे म्हणून देवाने तिला शासन केले आहे. आणि म्हणून देव त्या सर्वांवर रागावला आहे आणि तो त्या सर्वांना शिक्षा करणार आहे. त्याचा हा राग द्राक्षरसासारखा असेल आणि तो त्यांना त्या द्राक्षरसास पिण्यास लावेल.”
\s5
\p
\v 9 आणि मग आणखी एक तिसरा देवदूत पुढे आला आणि तो मोठ्या आवाजात म्हणाला ‘जर लोक श्वापदाची उपासना करतील किंवा त्याची प्रतिमा अथवा त्याचे चिन्ह आपल्या कपाळांवर किंवा आपल्या हातांवर घेतील
\v 10 तर देव त्यांच्यावर क्रोध प्रकट करेल आणि त्यांना अतिशय कठोर पणे शासन करेल. त्याच्या पवित्र देवदूतांच्या उपस्थितीत आणि कोकऱ्याच्या उपस्थितीमध्ये तो त्यांना जळत्या गंधकामध्ये पीडा देईल.
\s5
\p
\v 11 त्यांना ज्या अग्नीमध्ये पीडा दिली जाईल त्या अग्नीतून निघणारा धूर सर्वकाळाकरिता निघत राहील. देव त्यांना निरंतर पीडा देत राहील ते रात्रंदिवस पीडेत राहतील. जे लोक त्या श्वापदाची उपासना करतात त्याची प्रतिमा किंवा त्याचे नाव स्वतः लिहून घेतात त्या सगळ्यां संगती असे घडेल.”
\v 12 म्हणून जे लोक देवाच्या आज्ञांचे पालन करतात आणि जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवत राहावा आणि विश्वासूपणे त्याच्या आज्ञापालन करत राहावे.
\s5
\p
\v 13 मग मी स्वर्गातून येणारी एक वाणी ऐकली “हे लिहून ठेव यानंतर प्रभूच्या सोबत असतांना जे मरण पावतील ते किती आशिर्वादित आहेत.” देवाचा आत्मा म्हणतो “होय ते मरण पावल्यानंतर त्यांना पुढे कधीही दु:ख होणार नाही. त्याऐवजी ते विसावा पावतील आणि त्यांनी जी चांगली कामे केली आहेत ती सर्वांना कळवली जातील.”
\s हंगाम व पृथ्वीची कापणी
\s5
\p
\v 14 त्यानंतर मी आणखी एक आश्चर्यचकीत करणारी गोष्ट पाहिली. ते एक पांढरे ढग होते आणि त्या ढगावर मनुष्याच्या पुत्रासारखा दिसणारा कोणीतरी बसून होता. त्याने आपल्या डोक्‍यावर एक सोनेरी मुकुट परिधान केला होता. त्याच्या हातामध्ये एक तीक्ष्ण आणि धारदार विळा होता.
\v 15 मग स्वर्गातील मंदिरातून आणखी एक वेगळा देवदूत बाहेर आला जो ढगावर बसून होता त्याला त्याने एका मोठ्या आवाजात म्हटले “पृथ्वीवरील धान्याची कापणी करण्याची वेळ आली आहे म्हणून तुझ्या हातातील विळ्याने त्या धान्याची कापणी कर कारण धान्य तयार झाले आहे.”
\v 16 मग त्याने पृथ्वीवर आपला विळा चालवला आणि ते कार्य पूर्ण केले.
\s5
\p
\v 17 आणखी एक दूत स्वर्गातील पवित्रस्थानातून बाहेर आला त्याच्या हातात देखील एक धारदार विळा होता.
\v 18 आणि मग वेदीमधूनही आणखी एक दुसरा देवदूत बाहेर आला तो वेदीवरील आगीची काळजी घेतो. ज्या देवदूताच्या हातात विळा होता त्याला त्याने मोठ्याने म्हटले “पृथ्वीवरील द्राक्षांच्या मळ्यातील द्राक्षांच्या घडांवर तुझ्या हातातील विळा चालव आणि मग ह्या द्राक्षाच्या घडांना एकत्रित कर कारण ती द्राक्षे पिकली आहेत!”
\s5
\p
\v 19 म्हणून त्या देवदूताने त्याच्या हातातील विळा पृथ्वीवर चालवला आणि मग त्याने त्या द्राक्षांना देव जेथे रागाने त्यांना शिक्षा करणार होता त्या मोठ्या जागेत फेकले.
\v 20 देवाने त्या द्राक्षांना द्राक्ष कुंडामध्ये तुडवले त्याने हे शहराबाहेर केले व त्यातून रक्त बाहेर पडले! त्यातून वाहिलेले रक्त इतके खोल होते की ते घोड्याच्या लगामा पर्यंत पोहोंचले होते आणि ते वाहत वाहत तीनशे किमी अंतरापर्यंत गेले.
\s5
\c 15
\s सात वाट्या आणि पीडा
\p
\v 1 मग आकाशामध्ये आणखी काहीतरी विचित्र घडले. मला सात देवदूत दिसले बंडखोर लोकांना सात वेगवेगळ्या प्रकारे शिक्षा करण्याचे त्यांचे काम होते. परमेश्वर बंडखोर लोकांवर ऐवढा रागावलेला होता की त्यांनी त्यांच्या पापी वागणुकीपासून वळण्याची ही शेवटली संधी तो त्यांना देऊ इच्छित होता. म्हणून त्याने त्यांना शिक्षा करण्याचे ठरवले.
\s5
\p
\v 2 मग मला एक समुद्र दिसला तो समुद्र काचेचा बनल्यासारखा दिसत होता आणि त्यामध्ये आगही मिसळलेली होती. आणि माझ्या दृष्टीस ते ही लोक पडले ज्यांनी त्या श्वापदावर विजय प्राप्त केला होता. त्यांनी त्याची उपासना केली नव्हती त्याच्या प्रतिमेची किंवा श्वापदांच्या सेवकांनी त्यांच्यावर त्याचा अंक किंवा त्याचे नाव कोरू दिले नव्हते. काचेसारख्या दिसणार्‍या त्या समुद्राच्या किनाऱ्यावर ते सगळे उभे होते त्यांच्या हातामध्ये देवाची उपासना करुन स्तुती करण्यासाठी वीणा होत्या.
\s5
\p
\v 3 देवाचा सेवक मोशे ह्याने फार पुर्वी जे गीत गायले होते तेच गीत ते गात होते. कोकऱ्याची स्तुती अशा प्रकारे करावी म्हणून ते गीत गात होते:
\q “सर्वशक्तिमान प्रभुदेवा
\q तू जे काही करतोस ते शक्तिशाली आणि अद्भुत असे करतोस!
\q नेहमी नीतिमत्तेने आणि सत्यतेने वागतोस.
\q सर्व लोकांच्या राष्ट्रांवर तू नेहमीकरता राजा आहेस!
\q
\v 4 हे प्रभो केवळ तुच पवित्र आहेस म्हणून सगळे जण तुझे भय धरतील आणि तुझा सन्मान करतील.
\q सर्व लोक गट तुझ्या समोर येतील आणि तुला नमन करतील
\q कारण तू प्रत्येकाचा न्याय योग्य रितीने केला आहे हे तू दाखवून दिले आहेस.”
\s5
\p
\v 5 त्यानंतर स्वर्गातील अतिशय पवित्रस्थान उघडलेले माझ्या दृष्टीस पडले त्या ठिकाणी पवित्रमंडप होता.
\v 6 ज्या सात देवदूतांच्या हातामध्ये सात वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा ठेवलेल्या वाट्या होत्या ते त्या अतिशय पवित्र ठिकाणातून बाहेर आले. त्या देवदूतांनी स्वच्छ शुभ्र पांढर्‍या तागाची वस्त्रे घातलेली होती त्याच्या छातीवरून सोन्याचे पट्टे घातलेले होते.
\s5
\p
\v 7 त्या चार जिवंत प्राण्यांपैकी एकाने त्या सातही देवदूतांच्या हातामध्ये द्राक्षारसाने भरलेली सोन्याची वाटी ठेवली. त्यात द्राक्षरसाचा प्रतिकारात्मक अर्थ असा होता की सदासर्वकाळ जिवंत राहणारा देव त्याच्याविरुद्ध ज्यांनी बंडखोरी केली आहे अशा लोकांवर खूप रागावलेला असून तो त्यांना शिक्षा देणार होता.
\v 8 सर्वशक्तिमान आणि गौरवी देवाच्या उपस्थितीचे दर्शक असलेल्या धूराने ते परमपवित्र स्थान भरून गेले. त्या सात देवदूतांनी पृथ्वीवरील लोकांना सात वेगवेगळ्या प्रकारे शिक्षा देण्याचे संपेपर्यंत कोणीही त्या परमपवित्र स्थानात प्रवेश करण्यास समर्थ नव्हते.
\s5
\c 16
\p
\v 1 ज्या देवदूतांच्या हातामध्ये सात वाट्या होत्या त्यांच्याशी परम पवित्र स्थानात कोणीतरी मोठ्या आवाजाने बोलत असतांना मी दृष्टांतात ऐकले. तो म्हणाला “तुम्ही येथून निघा आणि तुमच्या हातातील सात वाट्यांमधील द्राक्षरस तुम्ही पृथ्वीवर ओता. देव त्यांच्याशी क्रोधित झाला आहे म्हणून लोकांना त्रासातून जावे लागेल आणि यामुळे त्यांना दुःख होईल.”
\s5
\p
\v 2 तर तो पहिला देवदूत निघाला आणि त्याने त्याच्या वाटीत असलेला द्राक्षरस पृथ्वीवर ओतला. त्यामुळे ज्या लोकांनी त्या श्वापदाला अशी परवानगी दिली होती त्याचे नाव आपल्या अंगावर लिहावे त्यांना आणि ज्यांनी त्याची उपासना केली त्यांच्या अंगावर भयंकर आणि अतिशय वेदना देणारे फोड आले.
\s5
\p
\v 3 त्यानंतर दुसऱ्या देवदूताने समुद्रावर त्याच्या वाटीतील द्राक्षरस ओतला त्यामुळे समुद्रातील पाणी जणूकाय मृतदेहांच्या शरीरातील रक्तासारखे झाले आणि त्याचा दुर्गंध पसरला अशाने समुद्रातील प्रत्येक प्राणी मरण पावले.
\s5
\p
\v 4 त्यानंतर तिसर्‍या देवदूताने त्यांच्या वाटीतील द्राक्षरस नद्यांवर आणि पाण्याच्या ओहोळांवरून ओतला. त्यामुळे नद्यातील आणि ओहोळांमधील पाणी रक्तामध्ये बदलले.
\v 5 ज्या देवदूताला पाण्यावर देवाने अधिकार दिला होता त्या देवदूताने देवाला असे म्हणतांना मी ऐकले “हे देवा तू अस्तित्वात आहेस आणि तू आधीपासून अस्तित्वात राहत आला आहेस. तू तो पवित्र देव आहेस तू लोकांचा न्याय नीतिमत्तेने करतो.
\v 6 जे लोक तुझ्या विरुद्ध बंड पुकारतात त्यांनी तुझ्या पवित्र लोकांचा आणि तुझे संदेष्टे त्यांचा खून केला आहे. म्हणून त्यांना पिण्यासाठी रक्त देऊन तू त्यांना जी शिक्षा करत आहेस ती योग्य आहे ते या शिक्षेस पात्र आहेत.”
\v 7 त्यानंतर मी त्या वेदीवरून कोणीतरी उत्तर देतांना ऐकले “हे प्रभू देवा होय तू सर्व शक्तिमान आहेस आणि तू लोकांना योग्य आणि न्यायाने शासन केले आहे.”
\s5
\p
\v 8 त्यानंतर चौथ्या देवदूतानेही त्याच्या वाटीत असलेला द्राक्षरस सूर्यावर ओतला लोकांना अग्नीने भाजावे अशी क्षमता त्याने सूर्याला दिली.
\v 9 त्यामुळे लोक भयंकर उष्णतेने भाजून निघाले त्यांनी देवाविरुद्ध दुष्ट गोष्टी बोलल्या कारण या सर्व प्रकारे लोकांनी त्रासातून जावे असे त्याने केले होते. परंतु तरीही त्यांनी त्यांच्या दुष्ट वर्तणूकीपासून वळण्यास नाकार दिला आणि त्याची स्तुती करण्याचा ही नाकार दिला.
\s5
\p
\v 10 जेव्हा पाचव्या देवदूताने त्याच्या वाटीत असलेला द्राक्षरस श्वापदाच्या सिंहासनावर ओतला तेव्हा जेथे तो श्वापद राज्य करत होता तेथे सर्वत्र अंधार पसरला. तेव्हा ते श्वापद आणि ज्यांच्यावर ते श्वापद राज्य करत होते ते सर्व लोक आपल्या जिभा चाऊ लागले कारण ते अत्यंत तीव्र वेदनांनी ग्रासलेले होते.
\v 11 त्यांची फोडे इतकी वेदनादायक होती की त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर स्वर्गातून राज्य करणाऱ्या देवाचा अपमान केला. परंतु ज्या दृष्ट गोष्टी ते करत होते त्या थांबविण्यास त्यांनी नाकारले.
\s5
\p
\v 12 मग सहाव्या देवदूताने त्याच्या वाटीतील द्राक्षरस फरात नदीवर ओतला. त्यामुळे त्या नदीतील पाणी सुकून गेले आणि पूर्वेकडील देशातील राजे त्यांच्या सैन्यासहित ती नदी ओलांडून येऊ शकत होते.
\v 13 मग बेडकासारखे दिसणारे अशुद्ध आत्मे मी पाहिले. एक अजगराच्या तोंडातून बाहेर आला, एक श्वापदाच्या तोंडातून बाहेर आला आणि एक त्या खोट्या संदेष्ट्याच्या तोंडातून बाहेर पडला.
\v 14 ते आत्मे सैतानाचे होते आणि त्यांना चमत्कार करता येत होते. ते जगातील सर्व सत्ताधीशांकडे गेले म्हणजे त्यांना त्यांचे सैन्य गोळा करता येईल. त्या श्वापदाच्या शत्रूंना जेव्हा सर्वसमर्थ्य देव शिक्षा देईल त्या महत्त्वाच्या दिवशी त्यांना एकत्रित पणे लढता यावे यासाठी त्यांनी तसे केले.
\s5
\p
\v 15 (प्रभू येशूला असे बोलतांना मी ऐकले “तू माझे लक्षपूर्वक ऐक मी चोरासारखा अनपेक्षितपणे येईन म्हणून जे सावध आहेत आणि योग्यप्रकारे जीवन जगत आहेत जेणेकरून त्यांना लाजावे लागू नये त्यांच्याविषयी मी आनंदित असणार. इतर लोकांच्या समोर लाजवले जाऊ नये म्हणून जो व्यक्ती आपले कपडे परिधान करून राहतो तशासारखे ते होतील.”)
\v 16 इब्री भाषेमध्ये या जागेचे नाव हर्मगीदोन आहे त्या ठिकाणी सर्व सत्ताधिशांना ते दुष्ट आत्मे एकत्रित करतील.
\s5
\v 17 त्यानंतर सातव्या देवदूताने त्याच्या वाटीतील द्राक्षरस हवे वर ओतला. त्यानंतर परमपवित्र स्थानातील त्या सिंहासनावरून कोणीतरी मोठ्या आवाजात असे म्हणाले “बंडखोर लोकांना शिक्षा देण्याची देवाची वेळ आता संपली आहे.”
\v 18 जेव्हा त्या देवदूताने त्याची वाटी रिकामी केली तेव्हा विजा चमकल्या गर्जना झाली आणि ढगांचा गडगडाट झाला व पृथ्वी हालली. पृथ्वीवर सर्वप्रथम मानव वस्ती करून राहू लागला तेव्हापासून ती एवढ्या जोरात कधीही हालली नव्हती इतक्या जोरात यावेळेस ती हालली.
\v 19 त्यामुळे ते मोठे शहर तीन भागात विभागले गेले. देवाने इतर राष्ट्रांमधील शहरांचाही नाश केला. बाबेलच्या लोकांनी खूप पापे केली आहेत याचा देवाला विसर पडला नाही. तो त्यांच्यावर क्रोधायुक्त झाला असल्यामुळे त्यांने त्यांना द्राक्षरसाच्या प्यालातून प्यायला दिले म्हणजे त्यांना अधिक वेदना होतील.
\s5
\p
\v 20 या भूकंपामुळे प्रत्येक बेट अदृश्य झाले आणि प्रत्येक पर्वत सपाट भूमी परावर्तित झाले.
\v 21 मोठ मोठ्या गारा जवळपास चाळीस किलोपर्यंत वजनाच्या त्या होत्या आकाशातून त्या लोकांवर पडल्या. मग लोकांनी देवाचा अपमान केला कारण त्याने त्यांना अशा भयंकर पद्धतीने शिक्षा केली होती कारण त्या गारा आकाराने वजनाने फार मोठ्या होत्या.
\s5
\c 17
\s मोठी कलावंतीण व श्वापद
\p
\v 1 ज्या सात देवदूतांच्या हातामध्ये सात वाट्या होत्या त्यापैकी एक देवदूत माझ्याकडे आला आणि मला म्हणाला “माझ्यासोबत ये म्हणजे मी देव त्या स्त्रीला म्हणजेच त्या शहराचे प्रतिक म्हटलेल्या वेश्येला कशाप्रकारे शिक्षा करेन ते मी तुला दाखवीन त्या शहरामध्ये पाण्याचे अनेक कालवे आहेत.
\v 2 पृथ्वीवरील राजाने तिच्यासोबत अनैतिक आणि मूर्तिपूजक कार्य केले आहेत. पृथ्वीवरील लोकांनीही तिच्यासोबत तशाच प्रकारची अनैतिक कृत्ये केली आहेत. तिने त्यांना जणू काय द्राक्षरस दिला होता आणि तो पिऊन ते मस्त झाल्यासारखे दिसत होते.”
\s5
\p
\v 3 मग देवाच्या आत्म्याने माझे नियंत्रण घेतले आणि त्यात देवदूताने मला एका निर्जनस्‍थळी उचलून नेले. एका लाल रंगाच्या श्वापदावर बसलेली एक स्त्री तेथे मला दिसली. त्या श्वापदाने स्वतःच्या संपूर्ण शरीरावर नावे लिहून ठेवलेली होती. देवाचा अपमान करणारी अशी ती नावे होती. त्या श्वापदाला सात डोके आणि दहा शिंगे होती.
\v 4 त्या स्त्रीने जांभळ्या आणि लाल रंगाची वस्त्रे परिधान केली होती. सोन्याची मोलवान रत्नांची आणि मोत्यांची दागिने तीने घातलेले होती; तिच्या हातामध्ये एक सोन्याचा प्याला होता. जेव्हा ती लैंगिक अनैतिक कामे करते ती कृती दर्शविणाऱ्या पेयाने तो प्याला पूर्णपणे भरलेला होता आणि तो घृणास्पद व घाणेरड्या गोष्टींचा प्रतिक असा होता.
\v 5 तिच्या कपाळावर एक नाव लिहिले होते त्या नावाचा एक गुप्त अर्थ होता. “ती स्री म्हणजे बाबेल शहर होय हे अतिशय दुष्ट शहर आहे! पृथ्वीवरील सर्व वेश्यांची ती माता आहे. तिच त्यांना या जगामध्ये घाणेरड्या आणि अनैतिक गोष्टी करण्यास शिकवते असा त्या नावाचा गुप्त अर्थ आहे.”
\s5
\p
\v 6 येशू विषयीच्या सत्याची घोषणा करणाऱ्या देवाच्या लोकांना जो छळ सहन करावा लागला त्यांचे रक्त प्याल्याने ती मदमस्त झालेली स्त्री मी पाहिली. जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा मी अतिशय आश्चर्यचकीत झालो.
\p
\v 7 त्या देवदूताने मला म्हटले “आश्चर्यचकीत होऊ नकोस ती स्त्री आणि ज्या श्वापदाला सात डोके व दहा शिंगे आहेत ज्याच्यावर ती स्वार आहे त्याचा गुप्त अर्थ मी तुला समजावून सांगतो.
\s5
\p
\v 8 जे श्वापद तू यापुर्वी पाहिले होते सरतेशेवटी देव त्याचा नाश करणार आहे आणि आताही तो मेलेलाच आहे. तो त्या अथांग डोहातून वर येणार आहे. जेव्हा तो श्वापद पुन्हा प्रगट होईल तेव्हा पृथ्वीवरील लोक आश्चर्यचकीत होतील देवाने सृष्टी निर्माण केली त्याच्या अगोदर जीवनाच्या पुस्तकात ज्या लोकांची नावे लिहिली नव्हती असे ते लोक होते.
\s5
\p
\v 9 ह्या गोष्टी समजण्यासाठी लोकांनी ज्ञानाने विचार करणे आवश्यक आहे. ती स्री ज्या श्वापदावर बसली आहे त्या श्वापदाचे सात डोकी, ती स्री ज्या शहराचे प्रतिनिधत्त्व करते त्या शहरातील सात डोंगर होत.
\v 10 त्या सात डोक्यांचा अर्थ सात सत्ताधीश ही होतो. त्यापैकी पाच सत्ताधीश मरण पावले आहेत एक सत्ताधीश सध्या ही जिवंत आहे आणि सातवा सत्ताधीश अद्याप यावयाचा आहे. जेव्हा तो येतो तेव्हा तो अगदी थोड्याच काळासाठी सत्ता गाजवेल.
\s5
\p
\v 11 जे श्वापद अगोदर जिवंत होते आणि नंतर ते जिवंत राहिले नाही ते श्वापद आठवे सत्ताधीश असणार आहे. खरे पाहिले असता तो त्या सात सत्ताधीशांपैकी एक आहे परंतु देव त्याचा नक्कीच नाश करणार आहे.
\s5
\p
\v 12 जी सात शिंगे तू पाहिलीस ती सात सत्ताधीशांचे प्रतिक आहेत त्यांनी अद्याप सत्ता गाजवण्यास आरंभ केला नाही. त्यांचे राज्य अगदी थोडावेळ जणूकाय एखाद्या तासासाठी असेल आणि ते सत्ताधीश त्या श्वापदासोबत राज्य करण्याचा अधिकार मिळवतील.
\v 13 ते सर्व सत्ताधीश एकमताने राज्य करण्यासाठी सहमत होतील त्यामुळे ते सर्वजण लोकांवर राज्य करण्याचा आपला अधिकार त्या श्वापदाच्या हातात देतील.
\v 14 ते सत्ताधीश आणि ते श्वापद कोकऱ्याच्या विरुद्ध लढाई लढतील. तो त्यांना पराजीत करणार कारण इतरांवर प्रभूत्त्व करणाऱ्या प्रभूंचा तो प्रभू आहे आणि इतर सर्व राजांवर राज्य करणारा असा तो राजा आहे. त्याच्यासोबतचे लोक देवाने निवडलेले आणि स्वत:साठी बोलावलेले आहेत ते विश्वास योग्यतेने त्याची सेवा करत राहतात.
\s5
\p
\v 15 मग तो देवदूत मला म्हणाला “त्या शहरात ती वेश्या बसते त्या ठिकाणी तू जे पाणी पाहिले ते लोकांचे समुदाय, लोकांचे गट आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक ह्यांचे प्रतिक आहे.
\s5
\p
\v 16 ती दहा शिंगे दहा सत्ताधीशांचे प्रतिक आहेत ते सत्ताधीश आणि ते श्वापद त्या वेश्येचा तिरस्कार करतील. ते त्या शहरातील सर्व काही काढून घेतील जणूकाय ते त्या शहराला नग्न करतील. मांस सडते तशाप्रकारे ते त्या शहराचा नाश करतील आणि त्याला पूर्णपणे जाळून टाकतील.
\v 17 देवाची इच्छा आहे तेच कार्य त्यांनी करावे असे निश्चित केल्यामुळे ते ह्या गोष्टी करतील. देवाने जे काही सांगितले आहे ते परिपूर्ण होई पर्यंत त्यांची अधिकार करण्याची शक्ती श्वापदाकडे असावी असे ते करतील.
\s5
\p
\v 18 या पृथ्वीतील राजांवर त्या दुष्ट शहरातील जे पुढारी राज्य करतात त्यांचे प्रतिक म्हणजे ती वेश्या होय.”
\s5
\c 18
\s मोठ्या नगरीचा अधःपात
\p
\v 1 हे घडल्यानंतर मी आणखी एक दूसरा देवदूत पाहिला तो स्वर्गातून उतरला होता आणि त्याच्याकडे खूप अधिकार होता. त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली कारण की तो खूप तेजोमय होता.
\v 2 त्याने उंच आवाजात असे म्हटले “देव बाबेलच्या दुष्ट शहरांचा नाश करणार आहे त्यामुळे सर्वप्रकारचे दुष्ट आत्मे तेथे वस्ती करतील आणि सर्वप्रकारच्या घृणास्पद आणि तिरस्कार वाटणारे पक्षी त्या ठिकाणी राहतील.
\v 3 कारण बाबेल हे शहर वेश्येसारखे झाले आहे तिच्या संगती सर्वप्रकारच्या लोकांनी अनैतिक कार्य केले आहे. देव त्यांच्यावर खूप रागावलेला आहे. पृथ्वीवरील राजांनी देखील तिच्या संगती अश्याच गोष्टी केल्या आहेत. जगातील सर्व व्यापारी श्रीमंत झाले आहेत कारण अनैतिक कृत्ये करण्याची तिची फार तीव्र इच्छा होती.”
\s5
\p
\v 4 मग स्वर्गातून निघालेली दुसरी वाणी मी ऐकली ती म्हणाली “बाबेलातील लोकांसारखे तुम्ही पाप करू नये म्हणून बाबेलामधून पळून जा. माझ्या लोकांनो जर तुम्ही त्यांच्यासारखी पापे केलीत तर जसे मी त्यांना सात वेगवेगळ्या प्रकारे शिक्षा करणार तशीच शिक्षा मी तुम्हालाही देईन.
\v 5 त्यांची पापे जणूकाय स्वर्गापर्यंत पोंचली आहेत. आणि देव त्यांच्या पापांना आठवतो म्हणून आता तो त्यांना शिक्षा करीन.”
\p
\v 6 देवाने बाबेलाला शिक्षा देण्यासाठी ज्या देवदूताला जबाबदारी दिली होती त्याला येशू म्हणाला “इतर लोकांना ज्या प्रकारे त्यांनी उपद्रव केला तशाच प्रकारे तू ही त्या शहरात राहणाऱ्या लोकांना उपद्रव कर. त्यांनी इतर लोकांना जशा वेदना दिल्या त्याचप्रकारे त्यांना दुप्पट दे.
\s5
\p
\v 7 बाबेल म्हणजेच त्या स्त्रीने ज्या प्रमाणात स्वत:चा सन्मान केला आणि तिने मनात येईल तशी कृती केली अगदी त्याच प्रकारे तू तिला शासन आणि दुःख दे. ती स्वतःच्या मनात असा विचार करते की ‘मी एका राणी प्रमाणे शासन करीन! मी विधवा नाही आणि मी कधीही विधवेसारखे शोक करणार नाही. म्हणून तू तिला शासन कर!
\v 8 म्हणून एकाच दिवशी तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारची भयंकर संकटे येतील. त्या शहरातील लोक शोक दुष्काळ आणि मरी यामुळे मरण पावतील. ते शहर जाळले जाईल देव शक्तिशाली आहे म्हणून तो तिला शासन करण्यास समर्थ आहे.”
\s5
\p
\v 9 “म्हणून पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्या सोबत अनैतिक कामे केली आहेत ते जेव्हा त्या शहराला आग लागली असल्याने तिच्यातील निघालेला धूर पाहतील तेव्हा ते तिच्यासाठी रडतील आणि तिच्यासाठी शोक करतील.
\v 10 ते बाबेलापासून दूर उभे राहतील कारण त्यांचीही तिच्यासारखीच अवस्था होईल ह्याची त्यांना भीती वाटेल. ते एकमेकांना म्हणतील ‘बाबेल संगती किती भयंकर घडले आहे ते एक बळकट शहर होते! देव त्या शहराला अचानक आणि वेगाने त्या शहराला शासन करत आहे!
\s5
\p
\v 11 पृथ्वीवरील व्यापारी तिच्यासाठी शोक करतील आणि रडतील कारण तिच्यातील कोणीही त्यांचे कोणतेही सामान विकत घेण्यास समर्थ असणार नाही.
\v 12-13 ते सोन्याचे बनवलेले दागिने, चांदी, मोलवान रत्ने आणि मोती ह्यांचे दागिने विकतात. अतिशय चांगल्या दर्जाचे ताग आणि रेशीम ह्यांचे महाग कापड ते विकतात तसेच ज्या कापडाला जांभळे आणि किरमिजी रंग दिलेले आहे असेही महाग कापडाची ते विक्री करतात. अतिशय दुर्मिळ असे लाकूड हत्तीच्या दातांनी बनलेले वेगवेगळ्या वस्तू, महाग लाकूड, तांबे, लोखंड आणि संगमरवर ही ते विकतात. ते दालचिनी, सुगंधी द्रव्य, धूप, मसाले, गंधरस, द्राक्षरस, जैतूनाचे तेल, उच्च प्रतीचे पीठ ,आणि धान्य ह्यांची विक्री करतात. जनावरे, मेंढरे, घोडे आणि रथ यांचीही ते विक्री करतात. ते मनुष्यांना देखील गुलाम म्हणून विकतात.
\s5
\p
\v 14 व्यापारी अशा प्रकारे म्हणतील ‘ज्या चांगल्या गोष्टी हव्यात अशी जी आवड लोकांमध्ये आहे ती आता संपली आहे! तुमच्या आरामदायक आणि वैभवशाली मालमत्ता नाश पावल्या आहेत! त्या नेहमी करता लोप पावल्या आहेत!
\s5
\p
\v 15 त्या शहराला ज्याप्रकारे दुःख सहन करावे लागेल तसेच त्या व्यापारांनाही दुःख सहन करावे लागेल या भीतीमुळे ह्या वस्तू विकणारे आणि त्या विकून श्रीमंत झालेले सर्व व्यापारी त्या शहरांपासून दूर उभे राहतील. ते रडतील आणि तिच्यासाठी शोक करतील.
\v 16 आणि ते असे म्हणतील ‘या महान शहरांसोबत भयंकर वाईट गोष्टी घडल्या आहेत! हे शहर म्हणजे उत्तम प्रतिची तागाची वस्रे जांभळे आणि किरमिजी रंग दिलेले महाग कापड आणि सोने, मौल्यवान रत्न आणि मोती यांनी आभूषण घातलेली स्त्री असे हे शहर होते.
\p
\v 17 परंतु अचानक आणि फार लवकर देवाने तिच्यातील सर्व महान गोष्टी नष्ट केल्या आहेत. प्रत्येक जहाजाचा कप्तान जहाजाने प्रवास करणारे सर्व लोक, सर्व खलाशी समुद्रावर प्रवास करून जे सर्व लोक आपली उपजीविका चालवतात ते सर्व लोक या शहरापासून दूर उभे राहतील.
\s5
\p
\v 18 तेथे ती आग लागली आहे त्याचा धूर जेव्हा त्यांच्या दृष्टीस पडेल तेव्हा ते ओरडतील ‘ते असे म्हणतील इतर कोणतेही शहर या शहरा एवढे महान नव्हते!
\v 19 ते दुःखी आहेत हे दाखवण्यासाठी ते आपल्या डोक्यांवर धूळ व माती ओढतील आणि ते फार आरडाओरडा करतील रडतील आणि शोक करतील. ते म्हणतील ‘बाबेलसंगती भयंकर गोष्टी घडल्या आहेत! या शहराने तर कितीतरी लोकांना श्रीमंत बनवले आहे, हे श्रीमंत झालेले लोक समुद्रावर आपल्या जहाजांमध्ये जातात आणि महाग गोष्टींची विक्री करतात. परमेश्वराने या शहराचा सर्वनाश केला.
\p
\v 20 मग कोणीतरी स्वर्गातून असे म्हटले “बाबेला संगती जे घडले त्यामुळे हे स्वर्गातील लोकहो प्रेषितांनो संदेष्ट्यांनो आणि पुढाऱ्यांनो तुम्ही आनंदित व्हा कारण तुमचा होणारा न्याय देवाने तिच्यावर ओढवला आहे.”
\s5
\p
\v 21 मग एका बलवान दूताने धान्य दळण्याच्या जात्या ऐवढा मोठा दगड उचलला आणि त्याने तो समुद्रात फेकला. मग तो म्हणाला “बाबेलच्या महान शहरात राहणार्‍या लोकांना जसा हा दगड समुद्रामध्ये फेकल्यानंतर अदृश्य झाला तसेच देवही तुमच्या शहराला फेकून देईल आणि अदृश्य करेल! तुमचे शहर नेहमीकरता नष्ट होईल!
\p
\v 22 यानंतर तुमच्या शहरामध्ये कोणीही विणा वाजवणार नाही, गीत गाणार नाही, बासरी वाजवणार नाही किंवा तुतारीचा शब्द ऐकू येणार नाही. तुमच्या शहरात कोणीही कुशल कारागीर कोणतीही वस्तू निर्माण करणार नाही; यानंतर कोणतेही लोक चक्कीवर कुठल्याही प्रकारचे धान्य दळतांना दिसणार नाहीत.
\s5
\p
\v 23 यानंतर पुढे कोणताही दिवा तेथे पेटणार नाही. नवरा किंवा नवरी ह्यांच्या आनंदाचे स्वर यानंतर तेथे ऐकू यावयाचे नाहीत. देव हे शहर नाश करणार आहे कारण जगातील सर्वात महत्त्वाचे मनुष्य असे व्यापारी तेथे होते. वेगवेगळ्या राष्ट्रातील लोकांना फसवण्यासाठी तुम्ही जादुटोण्याचा उपयोग केला होता.
\v 24 देवाचे इतर लोक आणि देवाचे संदेष्टे यांना ठार करण्यासही तुम्हीच जबाबदार होता. पृथ्वीवर करण्यात आलेल्या प्रत्येक खूणाचा दोष तुमच्यावर आहे.”
\s5
\c 19
\s स्वर्गात जयोत्सव व कोकऱ्याचे लग्न
\p
\v 1 या गोष्टी घडल्यानंतर स्वर्गामध्ये एका मोठ्या लोक समुदायाच्या ध्वनीसारखा आवाज मी ऐकला ते ओरडून
\q “हालेलुया” “त्याने आम्हांला वाचवले आहे.”
\q “तारण गौरव आणि सामर्थ्य आमच्या देवाचे आहे! अशा गोष्टींची घोषणा करत होते.”
\q
\v 2 “तो सत्याने आणि न्यायाने न्याय करतो म्हणून त्याची स्तुती असो!”
\q “जे दुष्ट शहर एका वेश्ये समान होते त्याला त्याने शासन केले आहे.
\q कारण पृथ्वीतील इतर लोकांना स्वतः प्रमाणेच अनैतिक कर्मे करण्यासाठी त्या शहरातील लोकांनी वळवले होते.”
\q “त्याच्या सेवकांचा खूण केल्याबद्दल त्याने त्यांना शासन केले आहे म्हणून त्याची स्तुती करा!”
\s5
\q
\v 3 त्या लोक समुदायाने पुन्हा एकदा घोषणा केली ते म्हणाले
\q “हालेलुया! त्या शहराला लाभलेल्या आगीतून जो धूर निघत आहे तो सदासर्वकाळ निघत राहिल!”
\q
\v 4 ते चोवीस वडिलांनी आणि ते चार जिवंत प्राणी ह्यांनी जो सिंहासनावर बसतो त्या देवाची उपासना केली आणि त्याच्यासमोर दंडवत घातले. ते म्हणाले “ते सत्य आहे! हालेलुया!”
\s5
\p
\v 5 कोणीतरी त्या सिंहासनावरून बोलला आणि म्हणाला “तुम्ही सर्व जे त्याचे सेवक आहात देवाची स्तुती करा! त्याचा आदर करणारे तुम्ही सर्व लहान-थोर त्याची स्तुती करा! प्रत्येक जण त्याचे गौरव करा!”
\s5
\p
\v 6 असंख्य लोकांच्या मोठ्या समुदायाच्या आवाजासारखा आवाज त्यानंतर मी ऐकला तो आवाज मोठ्या धबधब्याच्या आवाजासारखा होता गर्जनेच्या आवाजासारखा मोठा असा ध्वनी होता.
\q ते ओरडत होते: “हालेलुया! आमचा प्रभूदेव सर्वशक्तिमान राज्य करतो!
\s5
\q
\v 7 आम्ही हर्ष करावा आम्ही अत्यानंदित व्हावे आम्ही त्याचा सन्मान करावा.
\q कारण कोकऱ्याने वधू संगती विवाह करून एकत्रित होण्याची वेळ आली आहे तिने स्वतःला तयार केले आहे.
\q
\v 8 तिने स्वतःला उच्च प्रतिच्या तागांनी स्वच्छ व तेजस्वी वस्त्र परिधान करून स्वतःला तयार करावे अशी देवाने तिला परवानगी दिली आहे.
\q स्वच्छ तेजस्वी आणि चकाकणारी ताग देवाच्या लोकांच्या न्यायीपणाचे प्रतिक आहे.”
\s5
\p
\v 9 मग देवदूत मला म्हणाला “हे लिहून ठेव: कोकरा त्याच्या वधूशी विवाह करणार” त्या मेजवाणीत देव ज्या लोकांना आमंत्रण देणार आहे ते किती आशिर्वादित असतील. तो मला हे देखील म्हणाला “देव ह्या ज्या शब्दांची घोषणा करत आहे ते सत्य आहेत!”
\v 10 मी लगेचच त्याची उपासना करावी म्हणून त्याच्या पायाशी लोटांगण घेतले. परंतु त्याने मला म्हटले “माझी उपासना करू नकोस! मी देखील केवळ तुझ्यासारखाच सोबतीचा दास आहे आणि तुझ्या सोबतचा विश्वासणाऱ्यांचा तुझ्यासारखाच सेवक आहे. मी येशू विषयी सत्य गोष्ट बोलतो. तू केवळ देवाची उपासना केली पाहिजे कारण येशू विषयीचे सत्य बोलण्याची लोकांना शक्ती देणारा हा देवाचा आत्मा होय.”
\s विजयशाली ख्रिस्त
\s5
\p
\v 11 मग मी स्वर्ग उघडतांना पाहिला आणि एक पांढरा घोडा पाहून मी आश्चर्यचकीत झालो. त्या घोड्यावर स्वार होणाऱ्या येशूला सत्य आणि विश्वासयोग्य असे म्हटले आहे. जे योग्य आहे त्याप्रमाणेच तो सर्व लोकांचा न्याय करतो. त्याच्या शत्रूंच्या विरुद्ध तो न्यायाने युद्ध करतो.
\v 12 अग्नीच्या ज्वालासारखे त्याचे डोळे चमकत होते. त्याच्या डोक्यावर राजांना घालतात तसे अनेक मुकुट होते. त्यांच्यावर एक एक नाव लिहिण्यात आले होते. त्या नावाचा अर्थ केवळ त्यालाच ठाऊक आहे.
\v 13 त्यांनी परिधान केलेला झगा रक्तामध्ये बुचकळलेला होता. “देवाचा संदेश” हे देखील त्याचे नाव आहे.
\s5
\p
\v 14 स्वर्गातील सैन्य त्याच्या मागे येत होते. ते शुभ्र पांढर्‍या घोड्यांवर स्वार झालेले होते. स्वच्छ पांढऱ्या तागाचे बनलेले कपडे त्यांनी घातलेले होते.
\v 15 त्याच्या मुखातून एक तीक्ष्ण तलवार बाहेर येत होती. बंडखोर लोकांच्या समुदायाने तो तिने शासन करणार होता. त्याच्या हातात लोखंडाचा दांडा असल्याप्रमाणे तो त्यांच्यावर सामर्थ्याने शासन करणार होता. द्राक्ष कुंडामध्ये कोणी मनुष्याने द्राक्षे तुडवावीत तसे तो त्याच्या शत्रूंना तुडवणार होता. त्यांच्या पापांमुळे त्यांच्यावर अत्यंत क्रोधित झालेल्या सर्व समर्थ देवासाठी तो हे करणार होता.
\v 16 त्याच्या मांडीच्या जवळ त्याच्या झग्यावर एक नाव लिहिण्यात आले होते “सर्व राजांवर राज्य करणारा राजा आणि सर्व प्रभूंवर प्रभूत्त्व करणारा प्रभू.”
\s त्याच्या शत्रूंचा नाश
\s5
\p
\v 17 त्यानंतर मला सूर्यप्रकाशात उभा असलेला एक देवदूत दिसला. आकाशामध्ये उंच उडणारे आणि मांस खाणार्‍या पक्षांना त्याने मोठ्याने आवाज दिला “देव तुम्हांला ज्या मोठ्या मेजवानीचा पुरवठा करणार आहे या आणि तिचा आनंद घ्या!”
\v 18 या आणि देवाचे सर्व शत्रू मरण पावले आहेत त्यांचे मांस खा राजांचे मांस सेनापतींचे जे लोक सामर्थ्याने लढले त्यांच्या घोड्यांचे आणि सैनिकांचे जे त्यांच्यावर स्वार होते सर्व प्रकारच्या लोकांचे मांस मग ते स्वतंत्र असो किंवा गुलाम असो ते लहान असो किंवा मोठे ह्या सर्वांचे मांस खाण्यासाठी या!”
\s5
\p
\v 19 त्यानंतर मी त्या श्वापदाला आणि पृथ्वीवरील राजांना त्यांच्या सैन्यासहित पाहिले. त्या घोड्यावर स्वार असलेल्या स्वारा सोबत आणि त्याच्या सैन्यासोबत लढण्यासाठी ते सर्व एकत्र आलेले होते.
\v 20 पांढऱ्या घोड्यावरील स्वाराने त्या खोट्या संदेष्ट्याला आणि त्या श्वापदाला धरले त्या श्वापदाच्या उपस्थितीमध्ये ज्याने हे चमत्कार केले होते तोच हा खोटा संदेष्टा होय. ते चमत्कार करून लोकांनी त्या श्वापदाचे चिन्ह आपल्या कपाळावर घ्यावे आणि त्यांच्या प्रतिमेची उपासना करावी अशी त्याने लोकांची फसवणूक केली होती. मग देवाने त्या श्वापदाला आणि त्या खोट्या संदेष्ट्याला गंधकाने जळणाऱ्या अग्नीच्या तलावामध्ये जिवंत टाकून दिले.
\s5
\p
\v 21 त्या घोड्यावरील स्वाराने आपल्या तलवारीने उरलेल्या सर्व सैन्यांना ठार केले ती तलवार त्याच्या तोंडातून येत होती. त्याने ठार केलेल्या घोड्यावर आणि लोकांच्या मांसावर पक्ष्यांनी ताव मारला.
\s5
\c 20
\s एक हजार वर्षे सैतानाला बांधून ठेवणे
\p
\v 1 त्या नंतर पाहा एक देवदूत स्वर्गातून खाली उतरतांना माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या जवळ अथांग डोहाची चावी होती आणि त्याच्या हातात एक मोठा साखळदंड होता.
\v 2 त्याने त्या श्वापदाला जो जूनाट साप सैतान ह्याला त्या साखळदंडाने बांधले. तो साखळदंड एक हजार वर्षे कोणीही मोकळा करु शकणार नव्हता.
\v 3 त्या नंतर देवदूताने अथांग डोहाचा दरवाजा उघडून त्याला त्यात फेकूण दिले आणि कोण्याच्यानेही तो दार उघडले जाऊ नये म्हणून त्याने तो दरवाजा बंद केला आणि त्याच्यावर शिक्का मारला. ती एक हजार वर्षे संपेपर्यंत सैतानाने इतर कोणत्याही लोकांना फसवू नये म्हणून त्याने तसे केले. त्या वेळे नंतर सैतानाला अगदी थोड्यावेळेसाठी मोकळे करण्यात येईल म्हणजे देवाने जे योजले ते त्याच्या कडून पूर्ण होईल.
\s5
\p
\v 4 लोक ज्यावर बसले आहेत अशी सिंहासने माझ्या दृष्टीस पडली. देवाने त्यांना न्याय करण्याचा अधिकार दिला होता. येशू ख्रिस्ता विषयीचे सत्य बोलल्यामुळे आणि देवाच्या संदेशाची घोषणा केल्याने ज्या लोकांचा शिरच्छेद करण्यात आला होता अशा लोकांचे आत्मे माझ्या दृष्टीस पडले. ज्या लोकांनी त्या श्वापदाची किंवा त्यांच्या प्रतिमेची उपासना करण्यास नकार दिला होता आणि ज्यांनी त्या त्या श्वापदाच्या सेवकांना श्वापदाची चिन्हे त्यांच्या कपाळावर किंवा त्यांच्या हातावर लावू दिले नव्हते असे ते लोक होते. ते पुन्हा जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर ती एक हजार वर्षे राज्य केले.
\s5
\v 5 देव मेलेल्या लोकांना जिवंत करणार होता त्या पहिल्या वेळेस जे सर्वप्रथम जिवंत केले गेले ते हे लोक होत. इतर मरण पावलेले विश्वासणारे पून्हा जिवंत झाले नाहीत कारण ते एक हजार वर्षे संपायचे होते.
\v 6 जे लोक प्रथम जिवंत होतील त्यांच्यावर परमेश्वर प्रसन्न असेल. देवाच्या दृष्टीने ते पवित्र असतील त्यांना आता दुसरा मृत्यू नाही. त्याऐवजी देवाची आणि ख्रिस्ताची सेवा करणारे असे ते याजक बनतील आणि ख्रिस्ताबरोबर ते एक हजार वर्षे राज्य करतील.
\s सैतानाची मुक्तता व शेवटची झटापट
\s5
\p
\v 7 एक हजार वर्षांचा कालावधी संपल्यानंतर देव सैतानाला त्याच्या तुरुंगातुन स्वतंत्र करील.
\v 8 पृथ्वीवरील बंडखोरी करणाऱ्या लोकांच्या गटांना फसवण्यासाठी सैतान परत बाहेर येईल. येहेज्केल संदेष्ट्याने ज्यांना गोग आणि मागोग असे नाव दिले ही ती राष्ट्रे होत. देवाच्या लोकांच्या विरुद्ध लढण्यासाठी सैतान त्यांना एकत्र करेल. देवाच्या लोकांच्या विरुद्ध लढणाऱ्या त्या सैन्याची संख्या इतकी जास्त असणार की ती मोजता येणार नाही त्यांची संख्या समुद्राच्या किनाऱ्यावरील रेतीच्या कणांसारखी अगणित असणार.
\s5
\v 9 ते सैन्य संपूर्ण पृथ्वी पादाक्रांत करणार आणि येरुशलेमेतील देवाच्या लोकांच्या शिबिराला वेढा घालतील हे शहर तेच होय ज्याच्यावर देवाची प्रीती आहे. मग देव स्वर्गातून अग्नी ओतून देईल आणि तो त्यांना जाळून भस्म करेल.
\v 10 देव सैतानाला ज्याने लोकांना फसवले त्याला जळत्या गंधकाच्या तलावामध्ये फेकून देईल. याच ठिकाणी देवाने श्वापदाला आणि खोट्या संदेष्ट्याला ही फेकले होते. यामुळे ते युगानूयूगापर्यंत सदासर्वकाळ साठी निरंतर वेदना सहन करतील.
\s सर्वसामान्य पुनरुत्थान व शेवटला न्याय
\s5
\p
\v 11 मग देव त्या मोठ्या शुभ्र पांढर्‍या सिंहासनावर बसला होता ते मी पाहिले. तो एवढा भयानक होता की पृथ्वी आणि आकाश त्याच्या उपस्थितीतून पूर्णपणे अदृष्य झाले. आता ते यापुढे नव्हते असे झाले.
\v 12 मग मी पाहीले तो पाहा जे लोक मरण पावले होते परंतु आता ते पुन्हा जिवंत झाले आणि त्या सिंहासनासमोर ते सर्व उभे होते. यामध्ये गरीब आणि श्रीमंत लोक होते. लोक जी कामे करतात ती ज्या पुस्तकांमध्ये लिहिली होती ती पुस्तके देवाने उघडण्यास सांगितले. आणखी एक पुस्तक उघडले गेले ज्या लोकांना अनंतकाळचे जीवन दिले आहे आणि ज्यांची नावे देवाने लिहली आहे ते हे पुस्तक होय. या पुस्तकांमध्ये लोकांनी केलेली जी कर्मे लिहिण्यात आली होती त्याप्रमाणे देवाने मरण पावलेल्या परंतु आता पुन्हा जिवंत असलेल्या लोकांचा न्याय केला.
\s5
\v 13 जे लोक समुद्रामध्ये मरण पावले होते आणि समुद्रातच त्यांची शरीरे पुरले गेली होती ते ही पुन्हा जिवंत झाले आणि ते देवाच्या सिंहासनासमोर उभे राहिले. जे लोक जमिनीवर मरण पावले आणि ज्यांना मातीत पुरण्यात आले ते ही पुन्हा जिवंत झाले आणि देवाच्या सिंहासनासमोर उभे राहिले. त्या प्रत्येकाने जी कामे केली होती त्या त्यांना अनुसरून देवाने त्या प्रत्येकाचा न्याय केला.
\v 14 आणि सर्व विश्वास न ठेवणारे ते मेल्यानंतर देवाच्या न्यायाची वाट पाहाते ते ज्या ठिकाणी थांबले होते त्या सर्वांना जळत्या तलावात टाकण्यात आले. हा जळता तलाव म्हणजे लोक जेथे दुसऱ्यांदा मरतील अशी ती जागा होय.
\v 15 ज्या लोकांची नावे देवाच्या पुस्तकात नव्हती म्हणजेच ज्या लोकांना अनंत काळाचे जीवन आहे अशांची नावे देवाने ज्या पुस्तकात लिहिलेली सापडली नाहीत त्यांना अग्नीच्या तलावात फेकून देण्यात आले.
\s5
\c 21
\s नवे आकाश व नवी पृथ्वी
\p
\v 1 त्यानंतर मला एक नवा स्वर्ग आणि एक नवी पृथ्वी दिसली. पहिला स्वर्ग आणि पहिली पृथ्वी निघून गेली होती आणि समुद्रही आता अस्तित्वात नव्हते.
\v 2 देवाचे पवित्र शहर जे नवे यरूशलेम शहर होते ते मला दिसले. देवापासून स्वर्गातून ते खाली येत होते. देवाने ते तयार केले होते आणि त्याला सुशोभित केले होते. एखाद्या पुरुषाशी विवाह करण्यासाठी जशी स्री स्वतःला सुशोभित करते तसे ते होते.
\s5
\v 3 देवाच्या सिंहासनाजवळ कोणी एकाला मोठ्या आवाजात बोलतांना मी ऐकले तो म्हणाला “ हे एका! पाहा मी आता सर्व काही नवीन करत आहे! तो त्याच्यामधे निवास करणार.
\v 4 ते यापूढे कधीही दु:खी नसणार तो त्यांचे रडणे थांबवेल आणि त्यांच्यातील कोणीही यापूढे मृत्यू किंवा दु:खाने शोक करणार नाही कारण त्यांना दु:खी करणाऱ्या सर्व गोष्टी काढून घेतल्या जातील.
\s5
\v 5 तो मला म्हणाला मी जे काही बोललो ते सर्व काही लिहून ठेव कारण मी ह्या सर्व गोष्टी खात्रीने पूर्ण करणार आहे ह्याचा विश्वास बाळग त्यांच्यामध्ये विभाग करणार आहे .मग देव जो सिंहासनारूढ आहे तो मला म्हणाला: “ मी जे काही बोललो ते सर्वकाही तू लिहून ठेव कारण मी ह्या सर्व गोष्टी खात्रीने पूर्ण करणार आहे ह्याचा विश्वास बाळगा.”
\v 6 त्याने मला हे देखील म्हटले मी या सर्व गोष्टी परिपूर्ण केल्या आहेत मी या सर्व गोष्टींचा आरंभ केला आहे आणि मी या सर्व गोष्टींचा शेवटही करणारा आहे. ज्या झऱ्यातील पाणी पिल्याने लोक अनंतकाळ जगतात ते जर कोणाला हवे असेल तर ते मी त्याला फुकट देईन.”
\s5
\v 7 सैतानवर विजय मिळविणाऱ्या प्रत्येकाला मी ते देणार आहे. मी त्यांचा देव होईन आणि ते माझी मुले होतील.
\v 8 परंतु जे भीत्रेपणाने वागतात जे माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत ज्या गोष्टींची घृणा वाटेल अशी कर्मे करणारे जे लोकांचा खून करतात जे लैंगिक पापे करतात जे जादूटोणा करतात जे मूर्त्यांची उपासना करतात आणि प्रत्येक व्यक्ती जो खोटेपणा करतो व लबाड्या करतो ते गंधकाच्या आणि अग्निच्या सरोवरात जळतील. दुसरा मृत्यू ह्यालाच म्हणतात.”
\s स्वर्गीय यरुशलेम
\s5
\p
\v 9 मग ज्या देवदूतांच्या हातामध्ये द्राक्षारसाने भरलेल्या वाट्या होत्या - मागील सात वेगवेगळ्या प्रकारच्या पिडा ज्या द्राक्षरसामुळे झाल्या होत्या तो द्राक्षरस- तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला “माझ्यासोबत ये म्हणजे मी तुला जशी एखादी स्त्री एखाद्या मनुष्या संगती विवाह करून एकत्र जूडते तसेच जे लोक कोकऱ्याशी जूडले आहेत त्यांना मी तुला दाखवीन.
\v 10 मग देवाच्या आत्म्याने माझे नियंत्रण घेतले आणि त्या देवदूताने मला एका खूप उंच पर्वताच्या माथ्यावर नेले. त्याने मला देवापासून स्वर्गातून खाली उतरत असलेले देवाचे पवित्र शहर नवे यरुशलेम दाखवले.
\s5
\v 11 स्वतः देवापासून येणाऱ्या तेजस्वी प्रकाशाने ते अतिशय तेजोमय झालेले होते. अतिशय मोलवान यास्फे रत्न जसे चकाकते तसेच ते शहरही प्रकाशमान झाले होते आणि ते स्फटिकासारखे पारदर्शक होते.
\v 12 त्या शहराच्या सगळीकडून एक अतिशय उंच भींत होती. त्या भिंतीला बारा दरवाजे होते. प्रत्येक दरवाज्याजवळ एक देवदूत होता. इस्राएलाच्या बारा वंशांची नावे त्या प्रत्येक दरवाज्यावर लिहिलेली होती. प्रत्येक दारावर एकेका वंशाचे नाव लिहीण्यात आले होते.
\v 13 तीन दारे पूर्व दिशेला होती; तीन दारे उत्तर दिशेला तीन दारे दक्षिण दिशेला आणि तीन दारे पश्चिम दिशेला होती.
\s5
\v 14 शहराभोवतीच्या भींतीला बारा पाये होते प्रत्येक कोणशीलेवर कोकऱ्याने ज्या बारा प्रेषितांना नेमले होते त्यापैकी एकेकाचे नाव होते.
\v 15 जो देवदूत माझ्याशी बोलत होता त्याच्या हातामध्ये एक सोन्याची मोजण्याची पट्टी होती. त्याने त्या मोजण्याच्या पट्टीचा उपयोग करून शहर मोजले त्याची दारे आणि त्याची भींतही मोजली होती.
\s5
\v 16 ते शहर चौकोनी होते जेवढे ते लांब होते तेवढेच ते रुंदही होते. त्या देवदूताने शहर त्या मोजण्याच्या पट्टीने मोजल्यानंतर त्यानें ते शहर दोन हजार दोनशे किलोमीटर लांब आणि त्याची जेवढी लांबी होती तेवढीच त्याची रुंदी व त्याची उंची देखील होती असे सांगितले.
\v 17 त्याने त्या शहराची भींत मोजली आणि ती सहासष्ठ मीटर जाड होती असे सांगितले. लोक सहसा उपयोगात आणतात असे मोजण्याचे माप त्या देवदूताने उपयोगात आणले होते.
\s5
\v 18 आपण ज्या दगडाला यास्फे असे म्हणतो तशा प्रकारच्या काहीशा दगडाने त्या शहराची भींत तयार करण्यात आली होती. हे शहर शुद्ध सोन्याने तयार करण्यात आले होते आणि ते स्वच्छ अशा काचेसारखे दिसत होते.
\v 19 त्या शहराच्या भींतीचे पाये हे अतिशय सुंदर अशा मौल्यवान रत्नांनी बनवण्यात आले होते. त्याच्या पायाचा पहिला दगड हा यास्फे दगड होता, दुसरा नीळ, तिसरा शिवधातू, चौथा पाचू
\v 20 पाचवा गोमेद, सहावा सार्दि, सातवा लसणा, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकीथ, बारावा पद्मराज अशा रत्नांचे ते होते.
\s5
\v 21 त्या शहराच्या भींतीला लावण्यात आलेले बारा दरवाजे एकेका मोत्यामधून तयार करण्यात आले होते. एक दार एका संपूर्ण मोत्यापासून तयार झाले होते. त्या शहराचे रस्तेदेखील शुद्ध सोन्याचे बनवलेले असल्याने ते स्वच्छ पारदर्शक काचेसारखे दिसत होते.
\v 22 त्या शहरांमध्ये मंदिर नव्हते. प्रभूदेव सर्वसमर्थ हा स्वतः कोकरा तेथे आहे म्हणून तेथे मंदिराची कोणतीही आवश्यकता नाही.
\s5
\v 23 सूर्याची किंवा चंद्राची प्रकाश देण्यासाठी आवश्यकता त्या शहराला नाही कारण स्वतः देव या शहराला प्रकाश देतो आणि कोकराही त्या शहराचा प्रकाश आहे.
\v 24 त्या शहरातील प्रकाशात लोकांचे गट राहतील पृथ्वीवरील राजे त्या शहरामध्ये आपली धनसंपत्ती घेऊन येतील आणि देवाचा व कोकऱ्याचा सन्मान करतील.
\v 25 अंधार पडल्यावर जसे शहरातील वेशींना बंद करतात तसे त्या शहरातील वेशींना बंद करणार नाहीत कारण तेथे कधीही रात्र होणार नाही.
\s5
\v 26 पृथ्वीवरील लोकही आपले वैभव त्या शहरात आणतील.
\v 27 तिच्यात कोणत्याही निषीद्ध गोष्टी आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम ह्यांचा प्रवेश होणारच नाही तर कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा समावेश मात्र होईल.
\s5
\c 22
\p
\v 1 ज्या नदीतून पाणी पिणारे लोक सदासर्वकाळ जगतील ती नदी देवदूताने मला दाखवली. स्फटिकासारखे स्वच्छ असे ते पाणी होते ते पाणी चकाकत होते. ज्या सिंहासनावर देव आणि कोकरा बसलेले होते त्या सिंहासनातून ही नदी वाहत होती.
\v 2 ती नदी शहराच्या मधोमध वाहत होती त्या नदीच्या दोन्ही बाजूस दोन्ही किनाऱ्यांवर फळझाडे होती ही फळे खाल्ल्याने लोकांना सदा सर्वकाळ जीवन जगता येणार होते. त्या झाडांना बारा प्रकारची निरनिराळी फळे येत होती. दर एका महिन्याला एक हंगाम ते झाड देत होते. लोकांच्या जखमा बऱ्या व्हाव्यात म्हणून ते त्या झाडांची पाने औषधी म्हणून उपयोगात आणत असत.
\s5
\v 3 देव ज्याला शाप देईल अशी कोणतीही वस्तू किंवा गोष्ट त्या ठिकाणी नसेल. त्या शहरांमध्ये देवाचे आणि कोकऱ्याचे सिंहासन असेल. देवाचे सेवक तेथे त्याची उपासना करतील.
\v 4 ती त्याला समोरासमोर पाहतील त्याचे नाव त्यांच्या कपाळावर कोरलेले असेल.
\v 5 तेथे पुन्हा कधीही रात्र होणार नाही देवाच्या सेवकांना उजेडासाठी दिवा लावण्याची किंवा उजेड देण्यासाठी सूर्याची आवश्यकता भासणार नाही कारण प्रभूदेव स्वतःचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशित करेल ते सदासर्वकाळ राज्य करतील.
\s समाप्ती
\s5
\p
\v 6 देवदूत मला म्हणाला “देवाने तुला ह्या गोष्टी दाखवल्या आहेत त्या सत्य आहेत आणि तो त्या नक्कीच परिपूर्ण करणार आहे. प्रभूदेव संदेष्ट्यांना उत्तेजित करण्यासाठी आपल्या देवदूतांना पाठवून येणाऱ्या दिवसांमध्ये घडणाऱ्या घटना त्यांना कळवेल.”
\v 7 येशू त्याच्या सर्व लोकांना असे म्हणतो “तुम्हीही ऐका! मी लवकरच परत येत आहे! या पुस्तकामध्ये लिहिलेला संदेश पाळणाऱ्या प्रत्येकाला देव अतिशय जास्त प्रमाणात आशिर्वादित करणार आहे.”
\s5
\v 8 मी ज्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत त्या मला दृष्टांतात दिसल्या आणि त्या मी ऐकल्या आहेत. माझे नाव योहान आहे. जेव्हा मी ह्या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या तेव्हा लगेचच मी त्या देवदूताच्या समोर दंडवत घातले आणि तसे करून मी त्यांची उपासना करणार होतो.
\v 9 परंतु तो मला म्हणाला “ माझी उपासना करू नकोस! मी तुझ्यासारखाच देवाचा सेवक आहे! तुझ्या सोबतिचे विश्वासाणारे जे संदेष्टे आहेत त्यांच्यापैकी मी एक आहे! या पुस्तकातील उपदेशाचे पालन करणाऱ्या प्रमाणेच मी देखील आहे. माझी उपासना करण्याऐवजी देवाची उपासना कर!”
\s5
\v 10 त्याने मला असे देखील म्हटले “देवाने या संदेशामध्ये जे भविष्य सांगितले आहे ते तू गुप्त ठेवू नकोस कारण त्याचा संदेश पूर्ण होण्याची वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे.
\v 11 ती वेळ जवळ आलेली असल्यामुळे जे दुष्ट प्रकारे वागतात त्यांनी तसेच वागत राहावे; परमेश्वर देव लवकरच त्यांना त्याचे प्रतिफळ देईल जे दुष्ट आहेत आणि त्यांना दुष्टता करायची आहे त्यांनी ती करत राहावी. कारण देव लवकरच त्यांना त्याचे प्रतिफळ देणार आहे. जे नितीमत्तेने वागतात त्यांनी नितीमत्तेने वागत रहावे. जे परिपूर्ण आहे त्यांनी परिपूर्ण होत रहावे.”
\s5
\v 12 येशू आपल्या सर्व लोकांना असे म्हणतो “ ऐका मी लवकर परत येतोय! आणि प्रत्येकाने जसेजसे कार्य केले आहे त्याप्रमाणे प्रत्येकाला देण्यासाठी माझ्याकडे प्रतिफळ आहे, दंड आहे आणि पुरस्कारही आहे.
\v 13 सर्व गोष्टींची ज्याने सुरूवात केली तो मीच आहे आणि मीच सर्व गोष्टींचा अंत करणारा आहे. सर्व गोष्टींच्या पूर्वी मी होतो आणि सर्व गोष्टीच्या शेवटीही मी असेन.
\s5
\v 14 जे लोक आपली वस्त्रे धूतात आणि त्यांना स्वच्छ करतात त्यांच्यावर देव अतिशय प्रसन्न आहे कारण ते अशा झाडाची फळे खातील ज्यामुळे लोक सदासर्वकाळ जिवंत राहतील आणि ते त्या पवित्र शहरात वेशीतून प्रवेश करू शकतील.
\v 15 त्या शहराच्या बाहेरील लोक पवित्र असतील जादूटोणा करणारे लोक जे लोक अनैतिक कामे करतात इतरांचा खून करणारे लोक, मूर्तींची उपासना करणारे लोक आणि ज्या सर्व लोकांना लबाडी करणे प्रिय वाटते आणि जे निरंतर खोटारडेपणा करतात असे सर्व लोक बाहेर असतील. ते कधीही त्या शहरांमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत.
\s5
\v 16 “विश्वासनाऱ्यांच्या सर्व गटांना ह्या सर्व गोष्टी सत्य आहेत हे सांगण्यासाठी मी येशूने माझा दूत तुम्हाकडे पाठवला आहे. राजा दावीदाचा वंशज येणार आहे असे जे संदेष्ट्यांनी सांगितले तो मी होय पाहाटेचा तेजस्वी तारा तो मी होय.”
\s5
\v 17 देवाचा आत्मा आणि त्याचे लोक जे ख्रिस्ताच्या वधूसारखी आहेत ते एकमेकांना आणि जे विश्वासणारे आहेत ऐकमेकांना म्हणतात “ प्रभू ये! जो कोणी हे ऐकतो त्यानेही इतर विश्वासनाऱ्यांना असे म्हणावे ये! ज्या लोकांना यायचे आहेत ते येवोत. जे पाणी पिल्याने लोक सदासर्वकाळ जगतात ते पिण्यासाठी लोकांनी यावे आणि ते मोफत प्यावे. कारण ते मोफत देण्यात येत आहे.
\s5
\v 18 मी या पुस्तकामध्ये भविष्यातील घडणार्‍या गोष्टी अगोदरच लिहून ठेवल्या आहेत जो प्रत्येक जण हे ऐकतो त्याला मी योहान हा निकडीचा इशारा देत आहे. जर कोणी ह्या संदेशामध्ये काहीही टाकेल तर या पुस्तकात लिहिलेल्या सर्व पीडा देव त्या मनुष्यावर टाकणार आहे.
\v 19 जर कोणी मनुष्याने या संदेशातून मी जे भविष्य लिहून ठेवलेले आहे त्यातून काही खोडून टाकले तर देवही त्या व्यक्तीचे नाव त्या झाडाच्या फळाला खाण्याच्या अधिकारातून काढून टाकेल असे फळ जे खाल्ल्याने लोक सदासर्वकाळ जगतील. तसेच त्या व्यक्तीला देवाच्या शहरात प्रवेश मिळणार नाही असेही देव करेल. या दोन्ही गोष्टींची माहिती या पुस्तकात दिलेली आहे.
\s5
\v 20 या लिहिलेल्या सर्व गोष्टी सत्य आहेत असे मान्य करणारा येशू म्हणतो “नक्कीच मी लवकरच परत येईन! मी योहानाने प्रतिउत्तर केले “ प्रभू असेच होवो प्रभू येशू तू ये!”
\v 21 मी प्रार्थना करतो की तू प्रभू येशू देवाच्या लोकासंगती नेहमी दयाळूपणे वागत राहावा. आमेन.