mr_udb/66-JUD.usfm

58 lines
15 KiB
Plaintext

\id JUD - MARATHI_UDB_NT
\ide UTF-8
\h यहूदा
\toc1 यहूदा
\toc2 यहूदा
\toc3 jud
\mt1 यहूदा
\s5
\c 1
\p
\v 1 मी यहूदा आहे. मी येशू ख्रिस्ताचा सेवक आणि याकोबाचा भाऊ आहे. ज्याला देवाने त्याच्या स्वतःजवळ बोलवले आहे त्यांना मी लिहीत आहे, ज्यांना पिता प्रीती करतो, त्या तुम्हाला ख्रिस्तासाठी राखून ठेवले आहे.
\v 2 देवाची तुमच्यावर अधिक दया असो. तो तुला खूप शांती देवो, आणि तो तुझ्यावर खूप प्रीती करील.
\s5
\p
\v 3 ज्यांच्यावर मी प्रीती करतो, मी तुम्हाला एक पत्र लिहिण्यास खूप प्रयत्न केला. खऱ्या गोष्टीबद्दल बोलण्यासाठी आपल्यास प्रोत्साहित करण्यासाठी लिहिण्याची गरज आहे. देवाने ह्या गोष्टी सर्व विश्वासणाऱ्यांना शिकविल्या आहेत. या गोष्टी कधीही बदलणार नाहीत.
\v 4 काही लोक तुमच्या सभास्थानामध्ये सर्पासारखे असतात. ते खोटे शिक्षण देतात, आणि देवाच्या कृपेने लैंगिक पाप करण्यास परवानगी देतात. अशाप्रकारे ते आपला धणी आणि प्रभू येशू ख्रिस्त, याच्याबद्दल सत्य काय आहे त्याचा विरोध करतात.
\s5
\p
\v 5 जरी आपल्याला या सर्व गोष्टी यापूर्वी माहित होत्या तरी, काही गोष्टी आहेत ज्यात मला आपल्याला आठवण करण्याची इच्छा आहे. देवाने आपल्या लोकांस मिसरमधून बाहेर काढले हे विसरू नका, असे असले तरी ज्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, त्याने त्यातील बहुतेक लोकांचा नाश केला आहे.
\v 6 शिवाय, कित्येक देवदूतांना देवाने स्वर्गात अधिकाऱ्याच्या पदावर नेमले होते. परंतु त्या पदावर त्यांना अधिक काळ अधिकारी म्हणून राहता आले नाही. म्हणून देवाने दूतांना साखळदंडात बांधून सर्व काळपर्यंत अंधकारात टाकले. देव न्याय करेल आणि त्यांना शिक्षा करेल त्या दिवसापर्यंत ते तेथे राहतील.
\s5
\p
\v 7 त्याचप्रमाणे, सदोम व गमोरा शहरात व जवळच्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांनी लैंगिक अनैतिकता केली. देवाने सर्व प्रकारच्या लैंगिक संबंधाकडे दुर्लक्ष केले ज्याची देवाने परवानगी दिली आहे. म्हणून देवाने त्यांच्या नगरांचा नाश केला. त्या लोकांना आणि त्या स्वर्गातील देवदूतांना त्यांचे काय झाले ते हे दाखवितात की देव खोटे शिकवण शिकवणाऱ्यांना, तो नरकाच्या सार्वकालिक अग्नीमध्ये, लोकांना शिक्षा करील.
\v 8 त्याचप्रमाणे, तुमच्यामध्ये देखील अधार्मिक लोक राहतात जे आपल्या शरीरात अनैतिकरीत्या जगतात. देवाने त्यांना असा दृष्टांत दिला आहे आणि असे जगण्यास सांगितले आहे असे ते म्हणतात. परंतु ते देवाच्या आज्ञा पाळत नाहीत, आणि त्यांनी सामर्थशाली देवदूताचा अपमान केला.
\s5
\p
\v 9 जेव्हा सैतानाने मोशेच्या शरीराचा ताबा घेण्यासाठी मीखाएलशी वाद घातला, तरीसुद्धा तो त्याचा अपमान व निंदा करत राहीला; त्याने फक्त म्हटले, “प्रभूने तुला शिक्षा द्यावी!”
\v 10 परंतु ह्या लोकांना ज्यांना मी हे पत्र लिहीत आहे, ते प्रत्येक चांगल्या गोष्टीला वाईट बोलतात हे त्यांना समजत नाही. ते अगदी जंगली प्राण्यासारखे आहेत जे विचार करू शकत नाहीत, कारण त्या सर्व गोष्टी त्या नैसर्गिकरित्या त्यांचा नाश करणे समजू शकतात.
\p
\v 11 देव अशा गोष्टी करणाऱ्यास अगदी खात्रीपूर्वक शिक्षा करील. काइनाने जसे केले तसे ते वागतात. बलामाने जसे पैशांसाठी पाप केले तसे ते पाप करतात, आणि ते कोरहासारखे मरतील, ज्यांनी मोशेविरुद्ध बंड केले.
\s5
\p
\v 12 हे लोक त्या पाण्याखालच्या खडकाप्रमाणे आहेत ज्याच्यावर जहाज जोराने आदळते. जेव्हा ते तुमच्या प्रीतीच्या मेजवानीत सहभागी होतात, तेव्हा त्यांना लाज वाटत नसते, कारण ते फक्त स्वतःला संतुष्ट करण्यासाठी खातात. ते फक्त ढगासारखे आहेत जे पाऊस पाडत नाहीत, ते वाऱ्यासोबत वाहून जाणारे ढग आहे. ते चांगली कृत्ये करत नाहीत, ते शरद ऋतूत उशीरा येणाऱ्या झाडासारखे असून फळ देत नाहीत. ते दोन वेळा मरण पावलेल्या लोकांसारखे आहेत; ते अशा वृक्षांसारखे आहेत ज्यांची मुळे खोलवर गेली नाहीत.
\v 13 ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. ते समुद्रामध्ये वादळाने उठलेल्या लाटासारखे आहेत. आणि लाटा समुद्र किनाऱ्यावर फेस आणि घाण आणतात, ज्याप्रमाणे त्यांच्या लज्जास्पदतेमुळे इतरांना दूषित करतात. ते आकाशात जेथे असायला हवे तेथे न राहणाऱ्या ताऱ्यांसारखे ते आहेत. देव त्यांना खूप भयकर अंधारात टाकून देईल.
\s5
\p
\v 14 हनोख, जो आदामाच्या वंशामध्ये सातवा मनुष्य होता, जे खोट्या शिकवणीचे शिक्षक आहेत त्याविषयी त्याने म्हटले: “ह्याकडे काळजीपूर्वक ऐका: देव त्याच्या अगणित असंख्य पवित्र देवदूतासह निश्चित येणार आहे.
\v 15 ते सर्व प्रत्येकाचा न्यायनिवाडा करतील आणि सर्व दुष्ट लोकांना, आणि देवाचा अनादर करणाऱ्यांना शिक्षा करील. हे सर्व लोक निरुपयोगी ठरतील व लोक ते खिन्न आहेत.”
\v 16 देवाने केलेल्या गोष्टींविषयी हे चुकीचे शिक्षण देणाऱ्यांनी कुरकुर केली. त्यांच्यासोबत काय झाले याबद्दल ते तक्रार करतात. ते वाईट गोष्टी करतात कारण ते करायचे असते. ते बढाई मारत बोलतात त्यांच्याकडून गोष्टी मिळवण्यासाठी ते लोकांची प्रशंसा करतात.
\s5
\p
\v 17 परंतु ज्यां लोकांवर मी प्रीती करतो त्यासाठी, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेले शब्द आठवा.
\v 18 ते तुम्हाला म्हणाले, “अगदी शेवटच्या दिवसापूर्वी, देवाने आम्हाला सांगितलेल्या खऱ्या गोष्टींवर काही लोक हसतील. ते त्यांच्या शरीरासंबंधाने पापे करतील कारण ते देवाबद्दल अनादर करतात त्यांना तसे करावे वाटते अशी त्यांची इच्छा असते.”
\v 19 हेच ते लोक आहेत जे विश्वासऱ्यामध्ये एकमेकांविषयी राग निर्माण करत आहेत. त्यांना जे करायचे त्या सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी ते करतात. देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये राहत नाही.
\s5
\p
\v 20 परंतु ज्या लोकांवर मी प्रीती करतो, त्यांना तुम्ही त्या देवाविषयीच्या सत्याबाबत एकमेकांना प्रोत्साहन द्या ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता. प्रार्थना करण्याच्या मार्गाने पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करो.
\v 21 देवाला आपल्या जीवनात प्रामाणिकपणे वागवा जे देवाला आवडतात. आपला प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याशी दयाळूपणे वागेल अशी अपेक्षा ठेवा. जोपर्यंत आपण त्याच्याबरोबर अनंतकाळ जगणे सुरू करत नाही तोपर्यंत अशी अपेक्षा ठेवा.
\s5
\p
\v 22 ज्या लोकांना समजत नाही कोणत्या शिक्षणावर विश्वास ठेवावा त्यांच्याविषयी दयाळुपणा दाखवा, आणि त्यांना मदत करा.
\v 23 इतरांना सार्वकालिक शिक्षेच्या अग्नीत जाण्यापासून दूर ठेवा. जे पाप करतात त्याजवर दया करा. पण त्या दुष्टांच्या चुकीच्या योजना आखू नका. त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या कपड्यांचा ही द्वेष करा; कारण त्यांच्या पापांमुळे ते गलिच्छ झाले आहेत.
\s5
\p
\v 24 देव तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवण्यास सक्षम आहे. तो तुम्हाला त्याच्या समोर घेऊन जाईल, जिथे उज्वल प्रकाश आहे. तू फारच आंनदी होशील आणि पापांपासून मुक्त होशील.
\v 25 तोच खरा देव आहे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याने जे आमच्यासाठी केले त्याचा परिणाम म्हणून त्याने आमचा बचाव केला आहे, देव वेळ सुरू होण्याआधीच तेजस्वी महान आणि पराक्रमी होता, आणि तो महान सत्ताधीश होता. तो तसाच आहे, आणि तो कायम राहील! आमेन!