mr_udb/64-2JN.usfm

34 lines
7.3 KiB
Plaintext

\id 2JN - MARATHI_UDB_NT
\ide UTF-8
\h 2 योहान
\toc1 2 योहान
\toc2 2 योहान
\toc3 2jn
\mt1 2 योहान
\s5
\c 1
\p
\v 1 तुम्ही सर्वजण मला प्रमुख वडील म्हणून ओळखता. मी हे पत्र ज्या मंडळीवर खूप प्रीती करतो, त्या तुम्हा विश्वासणाऱ्यांना लिहित आहे. देवाने तुमची निवड केली आहे, आणि मी तुमच्यावर प्रीती करतो कारण आम्हाला ख्रिस्ताबद्दल जे माहीत आहे ते खरे आहे! फक्त मीच तुमच्यावर प्रीती करत नाही, तर ज्या सर्वांना येशूविषयीची माहीती आणि देवाबद्दलच्या शिकविलेल्या सत्य संदेशावर जे विश्वास ठेवतात तेही तुमच्यावर प्रीती करतात!
\v 2 कारण आपण सर्व जण देवाच्या खऱ्या संदेशावर विश्वास ठेवतो. तो संदेश आमच्या अंतःकरणात आहे आणि आम्ही कायम त्यावर विश्वास ठेवणार!
\v 3 देव पिता आणि येशू ख्रिस्त, जो त्याचा पुत्र आहे, तो आपल्यावर प्रीती करतो त्यामुळे तो आमच्याशी प्रेमळ कृत्ये करतो आणि दयाळूपणे वागवतो. आम्हाला शांती मिळावी अशी मदत ते आम्हांस करतील, कारण ते आपल्यावर खरोखर प्रीती करतात.
\s5
\p
\v 4 मला आनंद होतोय कारण मला कळाले आहे की तुमच्यातील काही जण देवाने दिलेल्या शिकवणुकीनुसार जगले आहेत. हेच आमच्या वडिलांनी आम्हाला करायला सांगितले आहे.
\p
\v 5 आणि आता, प्रिय मंडळी, मी तुम्हाला विनंती करतो त्याने आम्हाला पाळण्यासाठी दिलेल्या आज्ञेचे पालन करा. त्यासाठी मी हे सर्व तुम्हाला लिहीत आहे. त्यांने काय आज्ञा दिली होती, आपण एकमेकांवर प्रीती केली पाहिजे नवीन काहीही नाही; त्याऐवजी, जेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये प्रथम विश्वास ठेवला तेव्हा आम्हाला कळले की आपण एकमेकांवर प्रीती केली पाहीजे.
\v 6 देवावर आणि एकमेकांवर प्रीती करणे हाच त्याचा अर्थ आहे. देवाने आपल्याला जे करायला सांगितले ते पाळले पाहिजे. त्याने आपल्याला काय आज्ञा दिली आहे त्याला आणि एकमेकांना प्रीती आहे.
\s5
\p
\v 7 बऱ्याच लोकांनी इतरांना फसवून तुमची मंडळी सोडली आहे आणि आता ते तुमच्या क्षेत्रातील इतर लोकांमध्ये गेले आहेत. येशू ख्रिस्त हा मनुष्य बनला यावर ते विश्वास ठेवण्यास नकार देणारे असे ते आहेत. तेच ते आहेत जे इतरांना फसवतात आणि स्वतः ख्रिस्ताचा विरोध करतात.
\v 8 तुम्ही त्या शिक्षकांना फसवू देऊ नका म्हणून सावध असा! जर तुम्ही त्यांना तुम्हाला फसवू दिले, तर तुम्ही जे प्रतिफळ एकत्र मिळवले आहे, ते तुम्ही गमवाल आणि तुम्हाला देवाचे आनंतकालाचे एकतेचे पूर्ण प्रतिफळ प्राप्त होणार नाही!
\s5
\p
\v 9 ख्रिस्ताने शिकवलेले जे ते बदलतात आणि जे शिकविले त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. परंतु जे ख्रिस्तात शिकविले आहे त्यावर जे विश्वास ठेवतात ते देव, आमचा पिता आणि त्याच्या पुत्राबरोबर दोघेही सामील आहेत.
\v 10 म्हणून, जो कोणी ख्रिस्ताने शिकवलेल्या शिकवणी व्यतिरीक्त काही सांगत असेल, त्याचे तू स्वागत करून आपल्या घरात घेवू नको! त्याला नमस्कार करून किंवा कोणत्याही प्रकारे त्याला शुभेच्छा देऊन त्याला प्रोत्साहन देऊ नको!
\v 11 मी ह्यासाठी सांगतो कारण तुम्ही एखाद्या सहविश्वासू माणसाशी वागता तसे तुम्ही अशा लोकांशी वागू नका, असे केल्याने तुम्ही त्यांच्या वाईट कृत्यांबद्दल त्यांना मदत करत आहात.
\s5
\p
\v 12 जरी तुम्हास सांगायला माझ्याजवळ खूप जास्त असले, तरी मी ह्या पत्रात ते न सांगण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी, मी लवकरच तुमच्याबरोबर येण्याची अपेक्षा करतो आणि तुमच्याशी थेट बोलेन. मग आपण पूर्णपणे एकत्र आनंदी राहू शकतो.
\v 13 देवाने निवडलेल्या, येथे असलेल्या मंडळ्यांमधील तुमच्या सर्व सहविश्वासणाऱ्यांकडून, तुम्हास सलाम.