mr_udb/62-2PE.usfm

130 lines
41 KiB
Plaintext

\id 2PE - MARATHI_UDB_NT
\ide UTF-8
\h 2 पेत्र
\toc1 2 पेत्र
\toc2 2 पेत्र
\toc3 2pe
\mt1 2 पेत्र
\s5
\c 1
\p
\v 1 मी, शिमोन पेत्र, मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे. मी येशू ख्रिस्ताची सेवा करतो, आणि त्याने नियुक्त केलेला मी एक प्रेषित आहे. देवाने आम्हा प्रेषितांना ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवण्यास मदत केली अगदी तशीच ज्यांना त्याने मदत केली त्या तुम्हाला हे पत्र मी पाठवत आहे. येशू ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवण्याचा आमचा आणि तुमचा सन्मान सारखाच आहे. तो देव आहे, तो पूर्णपणे न्याय्य आहे, हा तोच आहे ज्याची आम्ही उपासना करतो, आणि तो आमचा तारणहार आहे.
\v 2 देव आणि आमचा प्रभू येशू ह्याची तुम्हाला खरोखर माहिती आहे, म्हणून देव तुमच्यासोबत सतत फार दयाळूपणे वागत राहो आणि तुम्हाला एक गहन शांती देत राहो अशी मी प्रार्थना करतो.
\s ख्रिस्ती मनुष्याचे हक्क व शील
\s5
\p
\v 3 आम्ही सर्वकाळ जगावे आणि देवाचा सन्मान करावा म्हणून त्याने आम्हाला सर्व गोष्टी दिल्या आहेत. देव म्हणून त्याच्या सामर्थ्याच्याद्वारे तो हे करतो, आणि आम्ही त्याला ओळखतो म्हणून तो हे करतो. आम्ही त्याला ओळखत आहोत परिणामी त्याने आम्हाला देखील ते दिले आहे. तो बलवान व चांगला आहे म्हणून आम्ही त्याचे लोक व्हावे म्हणून आम्हाला निवडणारा केवळ तो एकच आहे.
\v 4 तो आमच्यासाठी खूप महान आणि अमूल्य गोष्टी करेल हे वचन त्याने आम्हाला दिले आहे, कारण तो असाच आहे. त्याने जे वचन दिले आहे ते त्यावर तुम्ही विश्वास ठेवतात म्हणून तो तुम्हाला हे देखील म्हटला आहे की, जसे देव योग्य मार्गाने कार्य करतो, तसे तुम्ही देखील योग्य मार्गाने कार्य करण्यास सक्षम व्हाल, आणि जसे अविश्वासणारे वाईट गोष्टींना ते करू इच्छितात तसे तुम्ही आता करू इच्छित नाहीत म्हणून आता मरणाच्या मार्गावर तुम्ही जाणार नाहीत.
\s5
\p
\v 5 देवाने हे सर्व पूर्ण केले आहे म्हणून, ख्रिस्तामध्ये केवळ विश्वास ठेवू नका, परंतु चांगले जीवन देखील जगण्याकरता तुम्ही तुमचे सर्वोत्कृष्ट प्रयत्न करा. आणि तुम्ही केवळ चांगले जीवन जगून समाधानी असू नये, परंतु देवाबद्दल तुम्ही आधिक आणि अधिक शिकावे, याची खात्री करा.
\v 6 याव्यतिरिक्त, केवळ देवाबद्दल आधिक आणि अधिक जाणून घेऊ नका, परंतु तुम्ही काय बोलता आणि करता त्यामध्ये तुमच्या स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा देखील तुम्ही सर्वोत्कृष्ट प्रयत्न करा. आणि तुम्ही काय बोलता आणि करता केवळ ह्यावर नियंत्रण करायचे असे समजू नका, परंतु तुम्ही त्याच्याशी विश्वासू आहात याची देखील खात्री बाळगा. आणि तुम्ही केवळ त्याच्याशी विश्वासू राहायचे आहे असे समजू नका, परंतु त्याचा सन्मान करावा याबद्दल देखील खात्री बाळगा.
\v 7 आणि तुम्ही केवळ त्याला सन्मान देऊ नये, परंतु जसे भाऊ व बहिणी म्हणून एकमेकांकरिता असणे आवश्यक आहे तसेच तुमच्यासह विश्वासबद्दल तुम्हाला चिंता असायला हवी. आणि केवळ आपल्या सहविश्वासूबद्दल तुम्हाला चिंता असायला हवी असे समजू नका, परंतु इतरांवर देखील तुम्ही प्रेम करण्याची खात्री बाळगा.
\s5
\p
\v 8 जर तुम्ही या सर्व गोष्टी केल्या, आणि जर आधिक आणि आधिक प्रमाणात तुम्ही त्यांना केले, तर आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनात फार चांगले परिणाम उत्पन्न करतो असे ते दिसते.
\v 9 परंतु अगदी एका अंध व्यक्तीप्रमाणेच त्याच्या आजुबाजूला काय आहे याची जाणिव नसते. तसे जर या गोष्टी लोकांबद्दल सत्य नसतील तर त्यांना या गोष्टी महत्त्वाच्या आहेत याची त्यांना कल्पना नाही याचा असा अर्थ होतो. जसा एक अदूरदर्शी व्यक्ती केवळ जवळ असलेल्या गोष्टी स्पष्टपणे पाहतो, त्याच्यासारखेच ते केवळ पृथ्वीवरील गोष्टींबद्दल विचार करतात. देवाने त्यांच्या पूर्वीच्या पापी जीवनासाठी त्यांना क्षमा केली आहे हे ते विसरले आहेत असे ते दिसते.
\s5
\p
\v 10 त्या लोकांप्रमाणे वागण्याऐवजी, देवाने तुम्हाला त्याचे लोक होण्यासाठी निवडले आहे, हे प्रत्येकाला समजावे म्हणून तसे वागण्याचा प्रयत्न करा. तुम्ही असे केले, तर तुम्ही नक्कीच कधीही देवापासून विभक्त होणार नाही,
\v 11 आणि आमचा प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त हा त्याच्या लोकांवर सर्वकाळासाठी जेथे राज्य करणार आहे त्या जागेवर देव तुम्हा सर्वांचे फार मनापासून स्वागत करेल.
\s जागृत राहण्याबाबत इशारा
\s5
\p
\v 12 जरी तुम्ही त्यांना आधीच ओळखत असलात आणि त्या सत्य आहेत याबद्दल ठामपणे सहमत आहात तरी या बाबींबाबत वारंवार आठवण करून देण्याचा माझा हेतू आहे.
\v 13 मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही या बाबींबाबत सतत विचार करत राहावा म्हणून मी तुम्हाला त्याच्यांबद्दल आठवण देत राहून मी तुम्हाला मदत करावी, हा मी तो योग्य विचार करतो.
\v 14 कारण जसे आमचा प्रभू येशू ख्रिस्त याने मला स्पष्टपणे सांगितले आहे, त्याप्रमाणे लवकरच मी मरणार आहे हे मला माहित आहे.
\v 15 शिवाय, माझ्या मृत्युनंतर त्यांना तुम्ही नेहमी आठवण करून द्यावी म्हणून या गोष्टी खाली लिहून तुम्हाला सक्षम करण्यासाठी मी प्रत्येक प्रयत्न करीन.
\s पेत्राची स्वतःची साक्ष व संदेष्ट्यांची साक्ष
\s5
\p
\v 16 आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा शक्तिशाली आहे आणि तो काही दिवसांनी परत येत आहे हे आम्ही प्रेषितांनी तुम्हाला सांगितले आहे. आम्ही जे काही तुम्हाला सांगितले ते आम्ही आपल्या चतुराईने शोध लावलेल्या कथांच्या आधारावर नव्हते. तर त्याऐवजी, प्रभू येशू सर्वोच्च महान आहे हे आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले ते आम्ही तुम्हाला सांगितले आहे.
\v 17 देवाच्या महान प्रकाशाने त्याला वेढले होते, तेव्हा आमच्या देव पित्याने, मोठ्या मानाने त्याला सन्मानित केले, आणि तो म्हणाला, “हा माझा पुत्र आहे, ज्याला मी खूप प्रेम करतो; मी त्याच्याबरोबर फार संतुष्ट आहे.”
\v 18 ख्रिस्ताबरोबर आम्ही त्या पवित्र पर्वतावर होतो तेव्हा देव स्वर्गातून, हे म्हटला आहे हे आम्ही स्वतः ऐकलेले आहे.
\s5
\p
\v 19 या प्रकारे, आम्ही जे पाहिले, फार पूर्वीपासून संदेष्ट्यांनी ख्रिस्ताबद्दल जे लिहिले ते विश्वसनीय आहे म्हणून याची आणखी निश्चीत आम्हाला खात्री आहे. त्यांनी काय लिहिले आहे त्यावर तुम्ही लक्ष दिले पाहिजे, कारण जसा एक दिवा एका अधांऱ्या जागेवर चमकून लोक कुठे जात आहे ते पाहण्यासाठी मदत करतो तसेच जे काही आम्ही तुम्हाला शिकवले ते खरे किंवा खोटे आहे, हे तुम्हाला कळवून देते. आमचा प्रभू येशू ख्रिस्त परत येईल आणि देवाला पूर्णपणे समजण्यासाठी तुम्हाला सक्षम करेल तोपर्यंत तुम्ही त्यांनी जे काही लिहिले आहे त्यावर तुम्ही लक्ष लावले पाहिजे. त्या वेळी, दिवस उजाडतो आणि प्रभात तारे उगवतात, आणि तेव्हा आम्ही त्याला स्पष्टपणे पाहू शकतो असे ते होईल.
\v 20 कोणताही संदेष्टा देवाच्या आत्म्याच्या मदतीशिवाय शास्त्रवचनामध्ये त्यांनी लिहिलेल्या गोष्टींचा अर्थ तो स्वतः लावू शकत नाही हे तुम्ही समजून घेणे महत्वाचे आहे,
\v 21 कारण कोणत्याही मनुष्यांनी त्या भविष्यवाण्या करणे ठरविले नाही. त्याउलट, पवित्र आत्म्याने त्यांना तसे करण्यास मदत केली म्हणून ते देवापासून आलेले संदेश बोलले. म्हणूनच ते काय म्हणतात ते समजावे म्हणून आत्मा तुम्हाला देखील मदत करेल.
\s5
\c 2
\s खोटे संदेष्टे व पापी जीवनक्रम
\p
\v 1 फार वर्षापूर्वी, इस्त्राएलातील विविध लोकांनी देवाकडून आलेल्या सत्य संदेशाला देण्याचे ढोंग केले, आणि लोक तुमच्या बरोबर देखील असेच करतील. प्रथम ते कोण आहेत याची तुम्हाला माहिती नव्हती, आणि ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणे थांबवावा म्हणून त्यांनी काही अडथळे निर्माण केले; जरी त्यांना मुक्त करणारा तो एकच आहे तरी प्रभू हा महत्वाचा नाही असा विचार ते सुरू करतील. परंतु लवकरच, देव या खोट्या संदेष्ट्यांचा नाश करेल.
\v 2 आणि हे खोटे संदेष्टे कसे राहतात त्याचे अनुकरण अनेक विश्वासणारे करतील. अशाप्रकारे देवाबद्दल जे काय सत्य आहे त्याचा ते अपमान करतील.
\v 3 तुमच्यापासून त्यांना पैसे कमवता यावे म्हणून ते अशाप्रकारे तुम्हाला खोटे सांगतील. देवाने त्यांच्यासाठी ठरवलेली शिक्षा देण्यासाठी तो फार काळ प्रतीक्षा करणार नाही; ते लवकरच नाश पावतील.
\s5
\p
\v 4 देवाने पाप करणाऱ्या देवदूतांना नष्ट केले. त्याने नरकातील सर्वात वाईट ठिकाणी त्यांना फेकून दिले आणि तो न्याय करेल आणि त्यांना शिक्षा करील म्हणून तोपर्यंत त्याने तेथील अंधारामध्ये त्यांना कैद करून ठेवले आहे.
\v 5 त्याने फार पूर्वी या जगात राहणाऱ्या लोकांचा देखील नाश केला आहे. त्याने त्यांच्यापैकी जो एक धार्मिक उपदेश करणारा नोहा याच्यासह, केवळ आठ जणांना वाचवले. सर्व अधार्मिक लोक जे त्या काळी राहत होते त्यांचा पाण्याद्वारे त्याने नाश केला तेव्हा त्याने हे केले.
\v 6 त्याने सदोम आणि गमोरा या शहरांना देखील दोषी ठरवले आहे आणि नंतर त्यांची राख करण्यासाठी त्यांना पूर्णपणे जाळून टाकले. देवाचा अपमान व्हावा म्हणून असे पुढे जे कोणी जगतील त्याच्यांसाठी ही एक चेतावणी आहे.
\s5
\p
\v 7 परंतु अब्राहामाचा भाचा, लोट, जो एक नीतिमान मनुष्य होता, त्याला त्याने वाचवले. सदोममधील लोक अतिशय अनैतिक कृत्ये करीत होते म्हणून लोट अतिशय दुःखी होता.
\v 8 देवाच्या नियमाविरूद्ध ते दुष्ट लोक गोष्टी करताना तो प्रत्येक दिवशी पाहत आणि ऐकत होता म्हणून त्या नीतिमान मनुष्याला पीडा होत होत्या.
\v 9 आणि प्रभू देवाने लोटाला वाचवले तेव्हापासून, त्याला आदर सन्मान देणाऱ्या लोकांना कसे सोडवावे आणि तो त्यांना शिक्षा करेल तेव्हा त्या वेळेपर्यंत त्याला आदर न देणाऱ्या लोकांना त्या वेळेसाठी सज्ज न राहावे म्हणून त्यांना कसे राखून ठेवावे हे त्याला ठाऊक आहे याची तुम्हाला खात्री असावी.
\s5
\p
\v 10 देवाला अप्रिय असणाऱ्या व स्वतःला वाटेल त्या गोष्टी करणाऱ्यांना तो विशेषतः गंभीरपणे शिक्षा देईल. जे काही करण्याची इच्छा त्यांना असते ते सर्व ते धैर्याने करतात; देवाच्या शक्तिशाली देवदूतांचा देखील ते अपमान करतात.
\v 11 देवाच्या दूतांनी त्याच्यासमोर कोणाचा देखील, त्या लोकांच्या विपरीत, किंवा अगदी त्यांचा देखील, अपमान केला नाही!
\s5
\p
\v 12 खोट्या गोष्टींना शिकवणारे लोक—आमच्यासारखा विचार करू न शकणाऱ्या प्राण्याप्रमाणे ते आहेत—देवाबद्दल त्यांना काही माहिती देखील नाही, त्याबद्दल ते वाईट गोष्टी बोलतात. निसर्गाला कोणताही उपयोग नसलेल्या वन्यप्राण्याची आम्ही शिकार करतो आणि नष्ट करतो तशाचप्रकारे तो त्यांचा देखील नाश करेल.
\v 13 त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टींमुळेच त्यांना स्वतःला इजा होते: ते दिवस आणि रात्र मेजवानी करतात आणि दारू पितात. पूर्वी कधी स्वच्छ होते अशा कपड्यांवर ते डाग आणि ठिपक्यासारखे असतात.
\v 14 प्रत्येक ज्या स्त्रीला ते पाहतात तिच्या सोबत ते झोपू इच्छितात. त्यांना कधीही पापापासून दूर राहवत नाही. जे देवाशी फार विश्वासू नाहीत अशांना आपल्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी ते त्या लोकांचे मन वळवतात. जसे क्रिडासाठी खेळाडू स्वतःला तयार करतात, तसेच हे लोक लोभी बनण्यासाठी त्यांना स्वतःला तयार करतात. परंतु देवाने त्यांना शाप दिला आहे.
\s5
\p
\v 15 देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्यास ते नकार देतात. बौराचा पुत्र, संदेष्टा बलाम, फार पूर्वी केले ते त्यांनी अनुकरण केले आहे. तो दुष्ट मार्गाने कार्य करेल आणि त्यासाठी त्याला प्रतिफळ प्राप्त होईल असा विचार त्याने केला होता.
\v 16 परंतु देवाने त्याला पाप करू नये म्हणून दटावले. आणि जरी गाढवांना बोलता येत नाही, तरी देखील देवाने मानवी आवाजात बलामाला बोलण्यासाठी त्याच्या स्वताःच्या गाढवीचा उपयोग केला आणि त्याच्या वेडेपणाच्या कृतीला थांबविले.
\s5
\p
\v 17 हे लोक जे खोटे शिकवतात ते पाणी न देणाऱ्या झऱ्याप्रमाणे आहेत; पाऊस पाडण्यापूर्वीच डोक्यावरून निघून जाणाऱ्या ढगाप्रमाणे ते आहेत. म्हणूनच, देवाने त्या शिक्षकांसाठी नरकाचा अंधकार राखून ठेवला आहे.
\v 18 ते स्वतः बद्दल बढाई मारतात, परंतु जे काय ते म्हणतात त्याला काहीही किंमत नाही. जे नुकतेच विश्वासणारे झाले आहेत आणि ज्यांनी दुष्ट गोष्टी करण्याचे नुकतेच थांबविले आहे अशा लोकांचे मन ते वळवतात. पापी लोकांना जे काही करण्यास आवडते तसे करून ते त्यांना पुन्हा पाप करण्यास त्यांचे मन वळवतात.
\v 19 त्यांना जे आवडते ते करण्यासाठी ते मुक्त आहेत असे त्यांना ते सांगतात. परंतु त्यांच्या वाईट मनाने जे करण्यास सांगितले ते त्यांना पाळावेच लागते म्हणून ते स्वतःचेच दास असतात. जो कोणी त्याच्यावर नियंत्रण करतो तिचा गुलाम तो व्यक्ती आहे.
\s5
\p
\v 20 पंरतु आमचा प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त यांना जाणून घेण्याची सुरूवात तुम्ही केली, आणि देवाने तुम्हाला स्वीकारू नये अशा गोष्टींना करण्याचे तुम्ही थांबवले आहे असे समजा. नंतर त्याच सारख्या वाईट गोष्टींना करण्याची तुम्ही पुन्हा सुरूवात केली आहे आणि तुम्ही प्रथम होता त्यापेक्षा आधिक आता वाईट झाले आहात असे समजा.
\v 21 जर योग्य मार्गाने कसे जगावे हे त्यांनी कधीही शिकले नसते तर त्यांच्यासाठी हे अधिक चांगले झाले असते. परंतु देवाने त्यांना जे करायला सांगितले ते त्यांनी नाकारले आहे. आम्ही प्रेषितांना त्यांच्याकडे जे पाठवले ते त्यांनी नाकारले, म्हणून देव त्यांना आणखी अधिक शिक्षा देईल.
\v 22 लोक म्हणतात त्या नितिसूत्रांप्रमाणेच ते त्या पद्धतीने पुन्हा आपले वर्तन करीत आहेत: “आपल्या स्वतःच्या ओकी खायला परत येतात त्या कुत्र्यप्रमाणे ते आहेत;” आणि “स्वतःला धूतल्यानंतर पुन्हा घाणीत लोळण्यासाठी शिरणाऱ्या डुकरासारखे ते आहेत.”
\s5
\c 3
\s ख्रिस्ताच्या पुनरागमनाचा दिवस
\p
\v 1 मी ज्यांच्यावर प्रेम करतो त्या तुम्हाला हे पत्र मी आता लिहित आहे, मी तुम्हाला लिहिलेले हे दुसरे पत्र आहे. तुम्हाला आधीच माहित असलेल्या गोष्टींबद्दल तुम्हाला आठवण करून द्यावी, त्या गोष्टींबद्दल तुम्ही मनापासून विचार करावा व तुम्हाला उत्तेजित करावे म्हणून हे दोन्ही पत्र मी तुम्हाला लिहिले आहे.
\v 2 फार पूर्वी पवित्र संदेष्ट्याच्याद्वारे बोलल्या गेलेल्या शब्दांची आठवण तुम्ही ठेवावी आणि आमचा प्रभू आणि तारणारा याने जी काय आज्ञा केली आहे व आम्ही जे तुमचे प्रेषित आहोत ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्याची आठवण तुम्ही ठेवावी अशी माझी इच्छा आहे.
\s5
\p
\v 3 हे समजून घेणे आपल्यासाठी महत्वाचे आहे की ख्रिस्ताच्या परत येण्यापूर्वी लगेच लोक आपणास म्हणतील की ख्रिस्त परत येईल. ते लोक ज्या वाईट गोष्टी करू इच्छितात त्या गोष्टी करणार नाहीत.
\v 4 ते म्हणतात, “ख्रिस्त परत येणार आहे हे वचन दिले होते, तरी तो परत येणार नाही. फार पूर्वी जगत असलेले ख्रिस्ती पुढारी मरण पावले, तेव्हापासून सर्व काही सारखेच राहिले आहे. देवाने जग निर्माण केले तेव्हापासून गोष्टी जशा होत्या त्या नेहमी तशाच आहेत!”
\s5
\p
\v 5 ते जाणूनबुजून खऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात म्हणून ते असे म्हणतील की, देवाने फार पूर्वी आदेश देऊन म्हणाला ते असे होवो व तसे झाले. त्याने आकाश अस्तित्वात आणीले आणि पाण्यातून जमीन बाहेर आणीली आणि ती पाण्यापासून वेगळी केली.
\v 6 आणि देवाने, हे असे व्हायला हवे होते अशी आज्ञा देऊन असे केले, आणि नंतर त्या वेळी अस्तित्वात असलेल्या जगाचा नाश केला, पृथ्वीला पाण्याने भरवून तिच्या नाशाचे कारण केले.
\v 7 शिवाय, ते असे असावे, देवाने आज्ञा देऊन आज अस्तित्वात असलेले आकाश आणि पृथ्वी वेगळी केली आणि तो अधार्मिक लोकांचा न्याय करील तेव्हा तोपर्यंत ते राखून ठेवलेले आहेत. आणि त्यावेळी तो आकाश आणि पृथ्वीला अग्नीने जाळून टाकून नाश करेल.
\s5
\p
\v 8 प्रिय मित्रांनो, या जगातील लोकांचा न्याय करण्यासाठी प्रभू देव खूप वेळ प्रतीक्षा करण्यासाठी तयार आहे हे तुम्ही नीट समजून घ्यावे ही माझी इच्छा आहे! प्रभू देव या जगातील लोकांचा न्याय करेल त्याआधी किती वेळ जाईल याचा त्याला काही फरक पडत नाही! एक दिवस एक हजार वर्षांपेक्षा अधिक वेगाने निघून जात नाही असा विचार तो करतो, आणि एक हजार वर्ष आपल्यास एक दिवसासारखा होईल असा देखील विचार तो करतो!
\v 9 म्हणूनच, ख्रिस्त अद्याप लोकांचा न्याय करण्यासाठी परत येत नाहीये, प्रभू देवाने जे काय वचन दिले आहे ते करण्यासाठी तो उशीर करतो असा विचार तुम्ही कदापी करू नये. हे असे आहे असा काही लोक विचार करतात, आणि ख्रिस्त कधीही परत येणार नाही असे ते म्हणतात. परंतु देव तुमच्याशी धीराने वागत आहे, कारण कोणालाही तो कायमचा गमावू इच्छित नाही म्हणूनच ख्रिस्त अद्याप लोकांचा न्याय करण्यासाठी परत येत नाही हे याचे कारण असे आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. त्याऐवजी, प्रत्येकजणांनी आपल्या पापी वर्तनापासून दूर वळावे असे तो इच्छित आहे.
\s5
\p
\v 10 देव धीर बाळगत असला तरी, त्याने नियुक्त केलेल्या वेळी, प्रभू येशू ख्रिस्त नक्कीच लोकांचा न्याय करण्यासाठी परत येईल. जसा एक चोर अनपेक्षितरित्या येतो, तसेच अनपेक्षितरित्या तो परत येईल. त्या वेळी एक महान गर्जनेचा आवाज तेथे असेल. आकाश अस्तित्वात राहणार नाही. सृष्टितत्त्वे अग्नीद्वारे नष्ट होतील, आणि देवाने निर्माण केलेली पृथ्वी आणि तिच्यावर ज्या गोष्टी लोकांनी निर्माण केल्या त्या सर्वांचा नाश केला जाईल.
\s तयारी ठेवण्याची आवश्यकता
\s5
\p
\v 11 मी आताच जसे बोललो त्याप्रमाणे देव निश्चितच या सर्व गोष्टींचा नाश करणार आहे, म्हणून तुम्ही कसे वागायला पाहिजे हे नक्कीच तुम्हाला माहित असयाला हवे. देवाने नियुक्त केलेल्या ख्रिस्ताच्या परत येण्याच्या दिवसाची तुम्ही अतिशय ऊत्सुकतेने वाट पाहत असता,
\v 12 देवाचा सन्मान होईल या प्रकारे तुम्ही वागले पाहिजे, आणि तो दिवस लवकर यावा म्हणून तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. देव त्या दिवशी जे काय करणार आहे त्यामुळे आकाश जळून लयास जाईल. सृष्टितत्त्वे अत्यंत तापून वितळतील आणि जळून जातील.
\v 13 या सर्व घटना घडून येतील, तरी आम्ही आंनद करू कारण देवाने वचन दिलेल्या नवीन आकाशाचे आणि नवीन पृथ्वीची आम्ही वाट पाहत आहोत. जे लोक नीतिमान असतील केवळ तेच लोक या नवीन आकाशामध्ये आणि या नवीन पृथ्वीवर राहतील.
\s5
\p
\v 14 म्हणूनच, प्रिय मित्रांनो, तुम्ही या गोष्टी घडण्याची प्रतीक्षा करीत आहात, म्हणून देवाला सन्मान मिळेल अशा एका मार्गाने तुम्ही तुमचे जीवन जगण्यासाठी सर्व काही करू शकता, जेणेकरून तुम्ही पाप करीत नाही आणि तुम्ही एकमेकांबरोबर शांततेने राहत आहात असे ख्रिस्त पाहू शकेल.
\v 15 आणि याबद्दल विचार करा: आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला लोकांना वाचवण्याची इच्छा आहे म्हणून तो धीर धरतो. आमचा प्रिय बंधू पौल याने देखील या सारख्या समान विषयाबद्दल ज्ञानी शब्द लिहिले आहेत, कारण देवाने ह्या घटना समजण्यासाठी त्याला सक्षम केले.
\v 16 लोकांना समजण्यास अवघड आहेत अशा काही विशिष्ट गोष्टींना पौलाने पत्रामध्ये लिहून ठेवले आहे. देवाबद्दल काहीच माहिती नसणारे लोक आणि शास्त्रवचनांच्या काही भांगाचा जे चुकीचा अर्थ लावतात कारण ते शास्त्रवचनांच्या इतर भागांना देखील वरच्यावर पद्धतीने अर्थ लावतात. देवाने त्यांना शिक्षा करावी म्हणून ते त्याला पुढे नेतील असा याचा परिणाम आहे.
\s5
\p
\v 17 म्हणूनच, प्रिय मित्रानो, तुम्हाला या खोट्या शिक्षकांविषयी आधीच माहिती आहे, म्हणून त्यांच्यापासून तुमचा बचाव करा. चुकीच्या गोष्टी सांगून तुम्हाला फसवण्याचा हे लोक प्रयत्न करतील त्यांना तसे तुम्ही करू देऊ नका. तुम्ही आता ज्या गोष्टींवर ठामपणे विश्वास ठेवत आहात त्यावर तुम्ही शंका घ्यावी म्हणून त्यांना तुमचे मन वळवू देऊ नका.
\v 18 त्याऐवजी, आमचा तारणहार येशू ख्रिस्त तुम्हाला प्रेमळपणे वागवेन याचा अधिक आणि आधिक अनुभव तुम्हाला घेता येईल असे एका प्रकारे तुमचे जीवन जगा आणि मग तुम्ही त्याला चांगल्या आणि चांगल्या रितीने ओळखाल.
\p येशू ख्रिस्ताला आता आणि सदासर्वकाळ सर्वांनी मान दिला पाहिजे अशी प्रार्थना मी करतो! हे खरे असावे म्हणून असे बना!