mr_udb/61-1PE.usfm

252 lines
66 KiB
Plaintext
Raw Permalink Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

\id 1PE - MARATHI_UDB_NT
\ide UTF-8
\h 1 पेत्र
\toc1 1 पेत्र
\toc2 1 पेत्र
\toc3 1pe
\mt1 1 पेत्र
\s5
\c 1
\s नमस्कार
\p
\v 1 देवाने ज्या तुम्हाला स्वतःचे लोक म्हणून निवडले आहे आणि जे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता त्या तुम्हा सर्वांना येशू ख्रिस्ताने ज्याला प्रेषित बनवले तो पेत्र हे पत्र लिहीत आहे. पंत, गलतिया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया आणि आपल्या सर्वांचे खरे घर स्वर्ग ह्यापासून दूर राहणाऱ्या सर्वांना मी हे पत्र लिहीत आहे.
\v 2 देव जो पिता ह्याने पूर्वीच निश्‍चित केल्याप्रमाणे स्वतःसाठी त्याने तुम्हाला निवडून घेतले आणि प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा पाळण्यासाठी त्याच्या आत्म्याने तुम्हाला वेगळे करून ठेवले जेणेकरून त्याच्या रक्ताच्या द्वारे तुम्ही देवासाठी स्वीकार करण्यायोग्य व्हावे. देव तुम्हाला त्याची विपुल दया देवो आणि त्याची शांती तुम्हास प्राप्त होवो,
\s ख्रिस्तशिष्यांना तारणप्राप्तीची आशा आहे म्हणून आभारप्रर्दशन
\s5
\p
\v 3 प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता, आमचा देव त्याची स्तुती होवो! आम्हावर त्याची दया आहे म्हणून त्याने आम्हाला पुन्हा जिवंत केले आहे. येशू ख्रिस्ताला त्याने मरण पावल्यानंतर ही पुन्हा जिवंत केल्यामुळे, त्याने आम्हाला ज्या गोष्टींचे अभिवचन दिले आहे ती तो पूर्ण करणार याची आम्हास खात्री आहे.
\v 4 ज्या गोष्टी सदासर्वकाळ राहणार आहेत म्हणजेच त्याने आम्हासाठी स्वर्गामध्ये ज्या गोष्टी ठेवल्या आहेत त्या स्वीकारण्याची अपेक्षा करण्याची सक्षमता त्याने आम्हास दिली आहे.
\v 5 तुम्ही येशू वर विश्वास ठेवत असताना देव त्याच्या सामर्थ्यशाली बळाने तुमचे रक्षण करत आहे. आम्ही सध्या ज्या शेवटल्या काळामध्ये जगत आहोत, त्यामध्ये सैतानाच्या शक्तीपासून तुम्हाला पूर्णपणे सोडवण्यासाठी तो तुमचे रक्षण करत आहे.
\s ख्रिस्तशिष्यांना तारणप्राप्तीची आशा आहे म्हणून आभारप्रदर्शन
\s5
\p
\v 6 तुम्ही सध्या निरनिराळ्या प्रकारच्या कठीण समस्यांना तोंड देत आहात आणि त्यामुळे तुम्ही थोडावेळ दुःखात आहात परंतु ज्यावेळेस त्या घटना घडतील तेव्हा तुम्ही अतिशय आनंदित व्हाल. मोलवान धातू शुद्ध आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी जसे त्यांचे परीक्षण केले जाते तसेच परमेश्वर तुमची परीक्षा व्हावी अशी परवानगी देत आहे. तुम्ही सध्या ज्या निरनिराळ्या परीक्षांचा अनुभव घेत आहात ह्या आवश्यक आहेत.
\v 7 तुम्ही प्रभू येशू वर खरोखर भरवसा ठेवला आहे हे सिद्ध करण्यासाठी या कठीण समस्या येतात. जगातील संपूर्ण सोन्यापेक्षा देवासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे कारण ते अग्नीने नाश होऊ शकते. प्रभू येशू जेव्हा पुन्हा परत येईल त्यावेळेस देव तुमचा अतिशय मोठा सन्मान करेल.
\s5
\v 8 तुम्ही येशूला पाहिले नाही तरी तुम्ही त्याच्यावर प्रीती करता. सध्या तो तुमच्या दृष्टीस पडत नाही तरीही तुम्ही अतिशय उल्लास करता;
\v 9 देव तुम्हाला तुमच्या पापांच्या दोषापासून सध्या तारत आहे, कारण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता.
\p
\v 10 देव एके दिवशी तुमचे तारण कसे करणार आहे याविषयी त्याने बऱ्याच काळापूर्वी संदेष्ट्यांच्याद्वारे संदेश दिला होता आणि ते दाखवून दिले होते. या गोष्टींचे त्यांनी अतिशय बारकाईने अध्ययन केले होते.
\s5
\p
\v 11 त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता तो कोणाविषयी बोलत आहे हे त्यांना माहीत व्हावे अशी त्यांची इच्छा होती. तो कोणत्या काळाविषयी बोलत होता हे देखील जाणून घ्यावे अशी त्यांची इच्छा होती. कारण वेळेच्या अगोदरच पवित्र आत्मा त्यांना हे दाखवून देत होता की ख्रिस्त कशाप्रकारे दुःख सहन करणार आणि मरण पावणार आहे आणि त्यानंतर कोणत्या महिमामय गोष्टी घडणार होत्या.
\v 12 देवाने त्यांना सांगितले की ज्या गोष्टी देव त्यांना कळवत होता त्या त्यांच्यासाठी नव्हे तर तुमच्या उपयोगासाठी दर्शवित होता. देवाने स्वर्गातून त्याचा पवित्र आत्मा पाठवून दिला आणि त्याने त्यांना सक्षम केल्याप्रमाणे त्यांनी त्या गोष्टींची घोषणा केली. देव आमचे तारण कसे करतो याविषयी स्वर्ग दूतांना देखील जाणून घ्यावयाची इच्छा आहे व सत्य समजून घ्यायची अभिलाषा आहे.
\s ख्रिस्तशिष्यांना शोभेसे शील
\s5
\p
\v 13 म्हणून देवाचे आज्ञापालन करण्यासाठी तुम्ही आपली मने तयार करा. तुम्ही आपल्या मनाला शिस्त लावावी असा याचा अर्थ होतो. येशू ख्रिस्त स्वर्गातून परत येईल तेव्हा देव तुम्हावर दया दाखवून तुम्हासाठी चांगल्या गोष्टी करेल आणि तुम्हाला उत्तम प्रतिफळ देईल याविषयी तुम्ही खात्री बाळगा.
\v 14 देवाविषयीचे सत्य तुम्हाला ठाऊक नव्हते त्यावेळेत तुम्ही जे दुष्ट कर्म करण्याची इच्छा बाळगत होता तशी कामे करू नका कारण जसे लेकरांनी पृथ्वीवरील आई-वडिलांचे आज्ञापालन करणे अवश्यक आहे तसेच तुम्ही तुमच्या स्वर्गीय पित्याची आज्ञा पाळणे आवश्यक आहे.
\s5
\p
\v 15 त्याऐवजी, ज्याने तुम्हाला निवडले आणि स्वतःचे बनवले तो देव जसा पवित्र आहे तसेच तुम्ही जे सर्व काही करतात त्यामध्ये पवित्र असणे अवश्यक आहे.
\v 16 पवित्र असा, कारण शास्त्र लेखात म्हटले आहे की, “मी पवित्र आहे म्हणून तुम्ही देखील पवित्र असावे.”
\p
\v 17 प्रत्येक जण काय कृती करतो त्याचा न्याय करणारा परमेश्वर आहे, आणि तो हे अतिशय योग्यप्रकारे करतो. तुम्ही त्याला ‘बापा, अशी हाक मारता म्हणून पृथ्वीवर जगत असता तुम्ही योग्य रीतीने जगले पाहिजे. ज्या लोकांना त्यांच्या घरातून हाकलून लावले आहे अशा लोकांसारखे तुम्ही आहात, कारण तुमचे जे खरे स्वर्ग आहे तेथेन तुम्ही फार दूर राहत आहात.
\s5
\p
\v 18 तुम्ही तुमच्या पूर्वजांकडून ज्याप्रकारे मूर्खतापूर्ण वर्तन करणे शिकला आहात ते करणे थांबवावे कारण देवाने तुम्हाला सोने किंवा चांदी अशा नाशवंत गोष्टींनी तुम्हाला विकत घेतले नाही कारण त्याची इच्छा आहे की तुम्ही आदरणीय जीवन जगावे.
\v 19 त्यांच्या ऐवजी ख्रिस्ताच्या शरीरातून वाहिलेल्या मोलवान रक्ताद्वारे देवाने तुम्हाला विकत घेतले आहे. यहूदी याजक ज्या कोकऱ्याचे अर्पण करत असत त्यांच्यासारखे परिपूर्ण कोणतेही व्यंग नसलेला आणि डाग नसलेला असा कोकरा ख्रिस्त होता.
\s5
\p
\v 20 सृष्टी निर्माण करण्यापूर्वी देवाने हे कार्य करण्यासाठी त्याची निवड केली, परंतु आता जगाचा लवकरच अंत होणार आहे तोपर्यंत देवाने त्याला तुम्हावर प्रगट केले नव्हते.
\v 21 ख्रिस्ताने जे कार्य केले त्यामुळे तुम्ही देवावर भरवसा ठेवत आहात तेव्हा देवाने त्याला मेलेल्यामधून पुन्हा जिवंत केले आणि त्याचा मोठा सन्मान केला. यामुळे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत होता तो देव आहे आणि तो तुम्हासाठी महान गोष्टी करणार आहे याची तुम्ही अपेक्षा करत आहात.
\s5
\p
\v 22 देवाविषयीच्या सत्याचे तुम्ही आज्ञा पालन केलेले असल्यामुळे आणि त्याने तुम्हाला शुद्ध करावे अशी तुम्ही त्याला परवानगी दिल्यामुळे व विश्वासणाऱ्यासोबत प्रीति करावी असे होऊ दिले म्हणून एकमेकांवर उत्कंठेने आणि प्रामाणिकपणे प्रीति करत राहा.
\v 23 मी तुम्हाला हे करावयास सांगत आहे कारण आता तुम्ही एक नवीन जीवन जगत आहात. जे नाशवंत आहे त्या अशा कोणत्या वस्तूद्वारे तुम्हाला हे नवीन जीवन प्राप्त झाले नाही. त्याऐवजी तुम्हाला ते अशा वस्तूने प्राप्त झाले आहे जे अनंत काळाकरीता आहे ते म्हणजे देवाने जे म्हटले त्याच्यावर विश्वास ठेवणे हे होय.
\s5
\p
\v 24 हे सत्य आहे हे आम्हास ठाऊक आहे यशया संदेष्ट्याने लिहिल्याप्रमाणे ते आहे,
\q “गवत नष्ट होते तसेच सर्व लोक नाश पावतील. आणि लोकांकडे जी महत्ता आहे ती सदासर्वकाळ टिकणार नाही,
\q गवतातील फुले नेहमीकरीता टिकत नसतात त्याप्रमाणे ते आहे.
\q गवत सुकते आणि फुले कोमेजून जातात,
\q
\v 25 परंतु देवाचा संदेश सदासर्वकाळ राहतो.”
\m सदासर्वकाळ टिकून राहणारा संदेश म्हणजे आम्ही तुम्हाला याची घोषणा केली तो ख्रिस्ताविषयीचा संदेश होय.
\s5
\c 2
\p
\v 1 म्हणून, तुम्ही कोणत्याही प्रकारे दृष्टतेने वागू नये किंवा दुसऱ्यांना फसवू नये. ढोंगी बनू नका आणि दुसर्‍याची र्इष्या करू नका. कधीही कोणाविरुद्ध खोटेपणाने दुष्ट गोष्टी बोलू नका.
\v 2 नुकतेच जन्मलेले बाळ आईच्या निऱ्या दुधाची इच्छा धरते तशाच प्रकारे तुम्हीही देवापासून सत्य गोष्टी शिकण्यासाठी इच्छा धरा त्या गोष्टी शिकल्याने तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवण्यामध्ये प्रौढ व्हाल. या जगातील सर्व दृष्टायीपासून देव तुम्हाला पूर्णपणे स्वतंत्र करण्याची वेळ येत नाही तोपर्यंत तुम्ही हे करत राहणे आवश्यक आहे.
\v 3 प्रभू तुम्हा प्रति अतिशय दयाळूपणे वागतो याचा अनुभव तुम्ही घेतला आहे म्हणूनही तुम्ही अशा रीतीने वागले पाहिजे.
\s5
\p
\v 4 प्रभू येशूकडे या. इमारतीच्या पायामध्ये सर्वात महत्त्वाचा दगड तो आहे परंतु तो निर्जीव दगडासारखा नव्हे तर तो सजीव असा आहे. अनेक लोकांनी त्याला नाकारले परंतु देवाने त्याची निवड केली आणि त्याच्या दृष्टीने तो अतिशय मोलवान आहे.
\v 5 आणि मनुष्य ज्याप्रमाणे दगडांनी घर बनवतात, तसेच परमेश्वर ही तुम्हाला एकत्र जोडून त्यांचा आत्मा ज्यात वस्ती करतो तशी इमारत बांधत आहे. येशू ख्रिस्त तुम्हासाठी मरण पावला यामुळे याजक लोक जसे बलिदान करतात तसेच तुम्ही ही देवाला प्रसन्न करणाऱ्या गोष्टी कराव्या यासाठी देव तुम्हाला एकत्र करत आहे.
\s5
\p
\v 6 शास्त्रलेख आम्हाला जे काही सांगतात त्यावरून हे सत्य आहे असे दिसून येते: “मी यरुशलेममध्ये अतिशय मोलवान दगड ठेवणार आहे, तो इमारतीतील सर्वात महत्त्वाचा दगड असेल आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतील ते कधीही लज्जित होणार नाहीत.”
\s5
\p
\v 7 म्हणून जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांचा देव सन्मान करणार आहे. परंतु जे त्याच्यावर विश्वास ठेवण्यास नाकार देतात ते शास्त्र ज्याविषयी बोलते अशा बांधकाम करणाऱ्यासारखा आहे: “जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केला तो इमारतीमध्ये अतिशय महत्वाचा कोनशिला ठरला आहे शास्त्रलेखामध्ये असे ही लिहिलेले आहे की लोकांना ज्यामुळे ठेच लागते अशा धोंड्यासारखा ही तो ठरेल.”
\p
\v 8 शास्त्रलेखामध्ये हे देखील लिहले आहे:
\q “एक धोंडा जो लोकांना अडखळवितो असा तो झाला,
\q आणि लोक ज्यावरून जातात असा एक खडक तो झाला.
\p ज्याप्रमाणे लोक एखाद्या खडकावर पडतात तेव्हा त्यांना इजा होते,
\q जे लोक देवाच्या संदेशाचा अनादर करतात त्यांची स्वतःला इजा करून घेतात;
\q देवाने त्यांच्यासाठी हेच ते निश्चित केले होते.”
\s5
\p
\v 9 परंतु देवाने तुम्हाला त्याचे स्वतःचे लोक होण्यासाठी निवडले आहे. याजक जसे देवाची उपासना करतात तशी उपासना करणाऱ्या लोकांमध्ये तुम्ही आहात, आणि तुम्ही देवाबरोबर राजांसारखे राज्य करता तुम्ही देवाच्या लोकांचा समाज आहात त्याने तुम्हासाठी केलेली अद्भुत कृत्ये तुम्ही घोषित करावी म्हणून हे असे आहे. तुम्ही त्याच्या सत्यापासून अनभिज्ञ होता, तुम्हाला त्याचे सत्य ठाऊक नव्हते, त्याच्या सत्याविषयी तुम्ही अज्ञान होता तेव्हा त्याने तुम्हाला तुमच्या जुन्या मार्गातून बोलावून घेतले आणि त्याच्या विषयीच्या अदभूत गोष्टी तुम्हाला समजाव्यात असे त्याने केले.
\v 10 तुमच्याविषयी शास्त्रलेख जे सांगतो ते सत्य आहे:
\q “तुम्ही कोणीही लोक असे नव्हता;
\q परंतू आता तुम्ही देवाचे लोक ठरला आहात.
\q एकेकाळी देव तुम्हासोबत दयेने वागला नाही;
\q परंतू आता देवाने त्याची दया तुमच्यावर प्रकट केली आहे.”
\s5
\p
\v 11 तुम्हा लोकांवर मी प्रीति करतो आणि मी तुम्हाला याविषयी विचार करावा अशी विनंती करतो: तुम्ही अशा परकीय लोकांसारखे आहात ज्यांचे घर स्वर्गात आहे. म्हणून ज्या पापमय गोष्टी करण्याची तुम्हामध्ये आधी इच्छा होती आणि तुम्ही त्या करत होता आता तुम्ही त्या करू नये कारण जर तुम्ही त्या कराल तर तुम्ही देवासगंती चांगले जीवन जगू शकणार नाही.
\v 12 जे देवाला ओळखत नाहीत त्यांच्याशी तुम्ही चांगल्या रीतीने वर्तणूक करत राहावी. तुम्ही जे काही करता ते वाईट आहे असे जरी ते म्हणत असतील, ते तुम्ही जे चांगले काम करता ते पाहतील, आणि जेव्हा देव सर्वांचा न्याय करण्यासाठी येतो तेव्हा ते त्याचा सन्मान करतील.
\s सरकारी अधिकाऱ्यांच्या अंकित होऊन राहणे
\s5
\p
\v 13 तुम्ही प्रभू येशूचा सन्मान करू इच्छिता म्हणून, ज्यांच्याकडे योग्य अधिकार आहे त्या सर्वांच्या आज्ञांचे पालन करा. त्यामध्ये राजा आहे कारण त्याच्याकडे सर्वोच्च सामर्थ्य आहे,,
\v 14 आणि राज्यपाल, जे लोक चुकीची कामे करतात त्यांना शिक्षा देण्यासाठी तो पाठवतो आणि जे योग्य करतात त्यांची स्तुती करण्यासाठी त्याला पाठवण्यात येते.
\v 15 तुम्ही चांगले करावे अशी देवाची तुम्हासाठी इच्छा आहे. जर तुम्ही असे कराल तर देवाला न ओळखणाऱ्या मूर्ख लोकांना तुम्ही चूक केली आहे असे बोलण्यास समर्थ होणार नाहीत.
\v 16 तुम्ही कोणत्याही मालकाचे आज्ञापालन करण्यापासून स्वतंत्र असल्यासारखे वर्तन ठेवा, परंतु यामूळे तुम्ही दुष्ट कामे करू शकता असा विचार आपल्या मनात ठेवू नका. त्याऐवजी, देवाचे दास जसे वर्तन करतील तसेच तुम्ही वागाल.
\v 17 प्रत्येकाशी सन्मानीय वर्तणूक ठेवा. सोबतीच्या सर्व विश्वासणाऱ्यावर प्रीति करा. देवाचा सन्मान करा, आणि राजाला ही सन्मान द्या.
\s सेवेचा अर्थ
\s5
\p
\v 18 तुम्हापैकी जे विश्वासणारे गुलाम आहेत त्यांनी त्याच्या स्वामींच्या अधीनतेत दयावे आणि त्यांचा पूर्णपणे सन्मान करावा. जे तुम्हासंगती चांगले आणि दयेने वागतात केवळ त्याच्या प्रती तुम्ही समर्पित असावे असे नाही तर जे तुम्हाला कठोर रीतीने वागवतात त्यांनाही तुम्ही समर्पित व्हावे.
\v 19 ज्या गुलामांचे स्वामी त्यांच्यासंगती अन्यायाने वागतात कठोर वर्तन करूण त्यांना वेदना होतील असे वागतात देव त्यांच्यावर विशेष प्रसन्न आहे कारण त्यांनाही ठाऊक आहे की ज्या त्रासाचा ते सामना करत आहे आणि दुःख सहन करत आहे देवाला त्याची जाणीव आहे.
\v 20 जर तुम्ही एखादी चुकीची गोष्ट कराल आणि त्याबद्दल ते तुम्हाला शिक्षा करतील तर देव नक्कीच त्यामुळे तुमच्यावर प्रसन्न होणार नाही. परंतु जे चांगले ते तुम्ही कराल आणि तुम्हाला दुःख सहन करावे लागले तर तुम्ही चांगले करुनही दुःख सहन करत आहात. आणि तुम्ही जर ते सहन केले तर देव तुमची स्तुती करेल.
\s5
\p
\v 21 देवाने तुम्हाला निवडले याचे एक कारण म्हणजे तुम्ही दुःख सहन करावे हे होय. जेव्हा ख्रिस्ताने तुमच्यासाठी दुःख सहन केले तेव्हा तो तुम्हाकरिता एक आदर्श ठरला जेणेकरुन तुम्ही त्याने जे केले त्याची कृती करावी.
\p
\v 22 ख्रिस्ताने स्वतःची वर्तणूक कशी ठेवली त्याची आठवण ठेवा,
\q त्याने कधीही पाप केले नाही,
\q आणि लोकांना फसवण्यासाठी तो कधीही बोलला नाही.
\q
\v 23 जेव्हा लोकांनी त्याचा अपमान केला तेव्हा लोकांचा त्याने उलट अपमान केला नाही.
\q जेव्हा लोकांनी त्याला त्रास दिला तेव्हा त्याचा बदला घेण्याची धमकी त्याने त्यांना दिली नाही.
\q त्याऐवजी त्याने निर्णय घेतला की, जो सर्वाचा न्याय नितीने करतो तो त्याला निर्दोष सिध्द करेल.
\s5
\q
\p
\v 24 जेव्हा तो वधस्तंभावर मरण पावला तेव्हा आमच्या पापांची शिक्षा त्याने स्वतःच्या शरीरावर स्वतःहून सहन केली जेणेकरून आम्ही पाप करणे थांबवावे आणि योग्य रितीचे जीवन जगणे सुरु करावे.
\p त्यांनी त्याला जखमी केले म्हणून त्यामुळेच देव तुम्हाला आरोग्य देत आहे.
\v 25 खरोखर तुम्ही अशा मेंढरांसारखे झाला होता जी हरवलेली होती परंतु आता तुम्ही येशूकडे परत फिरला आहात तो अशा मेंढपाळासारखा आहे जो आपल्या मेंढरांची काळजी घेतो.
\s5
\c 3
\s पती व पत्नी
\p
\v 1 ज्या महिला विश्वासणाऱ्या आहेत त्यांनी त्यांच्या पतीच्या अधीन असावे. तुम्हापैकी जर कोणाचे पती ख्रिस्ताच्या संदेशावर विश्वास ठेवणारे नसतील तर तुम्ही त्यांना काहीही न बोलता ते विश्वासणारे व्हावेत म्हणून तुम्ही असे करा.
\v 2 तुम्ही त्यांचा सन्मान कराल आणि तुम्ही त्यांना पूर्णपणे विश्वासू राहाल हे जेव्हा त्यांच्या दृष्टीस पडेल तेव्हा ते विश्वास ठेवतील.
\s5
\p
\v 3 हे करण्याकरता तुमच्या केसांची वेगवेगळी ठेवन करून किंवा सोन्याचे दागिने घालून आणि उत्तम दर्जाची वस्त्र घालून तुमच्या शरीराला बाहेरून सुशोभित करून हेच साध्य करण्याचा प्रयत्न करू नका.
\v 4 त्याऐवजी, तुमच्या अंतर्यामीच्या जे कधीही नाहीसे होत नाही अशा मनुष्यत्वाला सौंदर्याने नटवा. मला असे म्हणायचे आहे की तुमची वृत्ती नम्र आणि शांत असावी कारण देवाच्या नजरेत या गोष्टी अतिशय मोलवान आहेत.
\s5
\p
\v 5 ज्या स्त्रिया देवाचा सन्मान करत फार पूर्वी जीवन जगल्या आहेत त्या स्वतःला अशाच प्रकारे सुशोभित करत आलेल्या आहेत.
\v 6 उदाहरणार्थ, सारेने या आज्ञेचे पालन केले आणि ती त्याला स्वामी म्हणून हाक मारत असे. तुम्ही विश्वासणारे आहात म्हणून तुमचा पती किंवा इतर कोणीही तुम्हासंगती काहीतरी वाईट करणार याची तुम्ही भीती बाळगत नाही आणि तुम्ही योग्य करणार तर देव तुम्हाला त्याची कन्या म्हणून स्वीकारेल.
\s5
\p
\v 7 तुम्हामध्ये जे पुरुष विश्वासणारे आहेत तुमची पत्नी जसा तुमचा सन्मान करते तसे तुम्हीही तुमची जीवनशैली त्यांच्या सोबत योग्य प्रकारे वर्तन ठेवणारी अशी करावी. तुम्ही त्यांच्यासोबत सन्मानाने वागणूक ठेवा कारण त्या तुम्हापेक्षा नाजूक पात्र आहेत ह्याची जाणीव तुम्हाला आहे. पण तुम्हाला याची जाणीव आहे की तुमच्या सारखेच देवाने त्यांना सार्वकालिक जीवन दिलेले आहे. तुम्हाला प्रार्थना करण्यापासून कशाचेही अडखळन होऊ नये म्हणून तुम्ही असे करा.
\s ख्रिस्तनिष्ट मनुष्यांना शोभणारी सहानुभूती
\s5
\p
\v 8 माझ्या या पत्राच्या या भागाचा अंत करण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना असे सांगतो की तुम्ही जो काही विचार करतात त्यामध्ये तुम्ही एकमेकांबरोबर सहमत असावे. एकमेकांबरोबर कनवाळू वृत्तीने रहा. एकाच कुटुंबाच्या सदस्यांनी एकमेकांवर प्रीति करावी तशी तुम्ही प्रीति करा. एकमेकांबरोबर कळवळा दाखवा. नम्र रहा.
\v 9 लोक तुम्हासोबत दुष्ट व वाईट गोष्टी करतात किंवा तुमचा अपमान करतात तुम्ही त्यांच्यासोबत तसेच वर्तन करू नका. त्याऐवजी देवाने त्यांना मदत करावी अशी विनंती करा कारण हेच कार्य करण्यासाठी देवाने तुम्हाला निवडले आहे म्हणजे तो तुम्हाला मदत करेल.
\s5
\p
\v 10 स्तोत्रकर्त्याने योग्य प्रकारे जीवन जगण्याविषयी काय म्हटले काय लिहिले याविषयी विचार करा: “ ज्यांना जीवनाचा आनंद घ्यायचा आहे आणि त्यांच्यासोबत चांगल्या गोष्टी घडाव्यात अशी ज्यांची इच्छा आहे, त्यांनी कोणतीही दृष्ट गोष्ट बोलू नये किंवा दुसऱ्यांना फसवणारे शब्द उच्चारू नये.
\v 11 निरंतर दुष्टाई करणे त्यांनी थांबवावे आणि त्याऐवजी जे काही चांगले आहे ते त्यांनी करावे; लोकांनी एकमेकांच्या सोबत शांतीने व्यवहार करावा यासाठी त्यांनी साहाय्य करण्याचा प्रयत्न अवश्य करावा; कारण नीतिमान लोक जे काही करतात देव त्याचा स्वीकार करतो.
\v 12 नीतिमान लोक जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा तो त्यांचे ऐकतो आणि त्यांना उत्तर देतो. परंतु जे लोक दुष्टाई करतात त्यांना तो नाकारतो.
\s अन्याय सोसून ख्रिस्ताने घालून दिलेले उदाहरण
\s5
\p
\v 13 चांगली कृत्ये करण्यासाठी जर तुम्ही इच्छूक आहात तर बहुतेक लोक तुम्हाला कसलाही उपद्रव करणार नाहीत.”
\v 14 परंतु जे काही चांगले आहे ते करत असल्यामुळे जर तुम्ही दुःखाला सामोरे जात आहात तर देव तुम्हाला आशीर्वादित करेल. यशयाने लिहिल्याप्रमाणे तुम्ही करा: ‘तुम्हाला धमकी देणाऱ्या लोकांना घाबरू नका, आणि ते तुमच्यासोबत काय करतील याविषयी कोणतीही चिंता करू नका.
\s5
\p
\v 15 त्याऐवजी, ख्रिस्त तुमचा स्वामी आहे आणि त्याच्यावर तुम्ही प्रीति करता हे तुमच्या अंतर्यामात यांमध्ये ओळखून घ्या. देव तुम्हासाठी जे काही करणार आहे याविषयीची तुमची दृढ अपेक्षा काय आहे असे जर कोणी तुम्हाला सांगा असे म्हटले तर तुम्ही नेहमीच उत्तर देण्यासाठी तयार असावे. परंतु त्यांना उत्तर देताना तुम्ही नम्रतेने आणि आदरपूर्वक असावे,
\v 16 आणि कोणतीही चूक करणार नाही ह्याची तुम्ही खात्री करून घ्या असे केल्याने तुम्हाविषयी दुष्टतेच्या गोष्टी बोलणारे लोक हे पाहतील की तुम्ही ख्रिस्ताबरोबर जोडलेले असल्याने तुमची वर्तणूक किती चांगली आहे आणि मग ते लज्जित होतील.
\v 17 तुम्ही दुःख सहन करावे अशी कदाचित देवाची इच्छा असू शकते. जर असे आहे तर चांगल्या गोष्टी करून त्यासाठी दुःख सहन करणे हे वाईट गोष्टी करून दुःख सहन करणे यापेक्षा कितीतरी पटीने उत्तम आहे.
\s5
\p
\v 18 ज्या लोकांनी पाप केले होते अशा लोकांसाठी ख्रिस्त एकदा मरण पावला आहे म्हणून मी असे म्हणतो. नीतिमान पुरुष असूनही तो अनीतिमान लोकांसाठी मरण पावला.आम्हाला देवाकडे आणावे याकरिता तो मरण पावला. सर्वसाधारण शरीर असताना तो ठार केला गेला परंतु देवाच्या आत्म्याने त्याला पुन्हा जिवंत करावे असे केले.
\v 19 देवाने ज्या अशुध्द आत्म्यांना कैदेमध्ये टाकले होते त्यांना जाऊन देवाचा विजय घोषित करावा यासाठी आत्म्याने त्याला मदत केली.
\v 20 बऱ्याच काळापूर्वी, नोहा मोठा तारू बांधत होता त्यावेळी, लोक कदाचित आपल्या दुष्ट व्यवहारापासून फिरतील असे त्यांची पार धैर्याने वाट पाहत होता त्यावेळेस ह्या दुष्ट आत्म्यांनी देवाची आज्ञा उल्लंघन केली होती. त्या जहाजामध्ये फार थोड्या लोकांचा बचाव झाला होता. विशेषतः त्या मोठ्या महापुरातून केवळ आठच मनुष्यांना देवाने सुरक्षित बाहेर काढले. परंतु बाकीचे सर्व लोक त्यामधून बुडून मरण पावले.
\s5
\p
\v 21 आमचा बाप्तिस्मा ज्या पाण्यामध्ये झाला आहे त्या पाण्याचे प्रतीक तो पुर होता त्याच्यातून देवाने आम्हाला वाचवले आहे. हे पाणी आमच्या शरीरावरील मळ काढत नाही, त्याऐवजी आम्ही पाप केले आहे याविषयी आमच्या मनात जी दोष भावना आहे ती काढून टाकण्याची विनंती आम्ही देवाला करतो ह्याची ती खात्री आहे आणि त्याने ती दोष भावना काढून टाकली आहे कारण येशू ख्रिस्ताला त्याने मृतांमधून जिवंत केले आहे.
\v 22 देवाने सर्व दुष्टांना आणि सामर्थ्यशाली आत्म्यांना येशू ख्रिस्ताला अंकित व्हावे असे केले आणि ख्रिस्त वर स्वर्गात चढला आणि देवाच्या बाजूला बसून सर्वोच्च सन्मानाच्या ठिकाणातून तो सध्या राज्य करत आहे.
\s5
\c 4
\s पापाचा त्याग करणे
\p
\v 1 म्हणून, ख्रिस्ताने जसे त्याच्या शरीरामध्ये दुःख सहन केले तसेच तुम्हीही सहन करण्यास तयार असावे. ते ख्रिस्ताचे असल्यामुळे जे आपल्या शरीरामध्ये दुःख सहन करतात त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या पापांपासून स्वतःला दूर केले आहे.
\v 2 परिणामी त्याच्या पृथ्वीवरील उरलेल्या काळात पापी लोक इच्छा करतात तशा गोष्टींची इच्छा आता ते करत नाहीत, परंतु त्याऐवजी देव त्यांच्याकडून जे काही इच्छितो त्या गोष्टी ते करतात.
\s5
\p
\v 3 जे लोक देवाला ओळखत नाहीत त्या लोकांसारखे करण्यामध्ये तुम्ही अगोदरच या पृथ्वीवरील तुमच्या जीवनातील बराचकाळ खर्च केला आहे म्हणून मी तुम्हाला असे म्हणतो. भूतकाळात तुम्ही सर्वप्रकारच्या लैंगिक अनैतिक कृत्य केले आहे तुम्ही दारू पिऊन मस्त झाला आहात आणि त्यानंतर जारकर्म करणे व व्यभिचारमध्ये गुंतला आणि तुम्ही मूर्तीची उपासना केली ही सर्व कार्ये देवाच्या दृष्टीने घृणास्पद आहेत.
\v 4 आता जेव्हा तुमचे मित्र ह्या सर्व गोष्टी करतात तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत त्यामध्ये सामील होत नाहीत म्हणून ते आश्‍चर्यचकित होतात. आणि त्यामुळे, ते तुम्हाविषयी वाईट गोष्ट बोलतात.
\v 5 परंतू एके दिवशी त्यांनी जे काही केले आहे त्या सर्व गोष्टी देवासमोर त्यांना कबूल कराव्या लागतील.
\v 6 आणि ह्याच कारणामुळे ख्रिस्ताने मृतांना शुभवर्तमानाची घोषणा केली. त्याने असे केले कारण ते जिवंत असताना देवाने त्यांचा न्याय केला असला तरी त्यांनी आत्म्याच्या सामर्थ्याने अनंतकाळ जीवंत राहावे.
\s5
\p
\v 7 या पृथ्वीवरील सर्व वस्तूंचा लवकरच अंत होणार आहे. काळजीपूर्वक विचार करा आणि तुम्ही कशा विषयी विचार करता त्यावर नियंत्रण ठेवा म्हणजे तुम्हाला चांगली प्रार्थना करता येईल.
\v 8 एकमेकांवर खरी प्रीति करा कारण जर आपण इतरांवर प्रीति केली तर त्यांनी काय चूक केली आहे ते शोधण्याचा आम्ही प्रयत्न करणार नाही हे अतिशय महत्वाचे आहे.
\v 9 जे ख्रिस्ती विश्वासणारे प्रवासी तुमच्यामध्ये येतात त्यांना तुम्ही भोजन द्यावे आणि त्यांच्या झोपण्यासाठी ठिकाण द्यावे आणि हे सर्व करतांना तुम्ही कोणतीही तक्रार करू नये.
\s5
\p
\v 10 देवाने विश्वासणाऱ्यांना इतरांची सेवा करण्यासाठी जे तारण दिले आहे त्या सर्वांचा उपयोग त्यांनी करावा. देवाने त्यांना दयाळूपणे जे दान दिले आहेत त्यांचा व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करावे.
\v 11 विश्वासणाऱ्याच्या समूहा सगंती जे बोलतात त्यांनी देवाचे शब्दच बोलत असल्याप्रमाणे बोलावे. जे इतरांसाठी दयाळू पणाची कृत्य करतात त्यांनी देवाने दिलेल्या शक्तीच्या द्वारे ती करावी जेणेकरून येशू ख्रिस्त त्यांना जे काही करण्यास सक्षम करतो त्यामध्ये देवाचा सन्मान व्हावा. आपण सर्वांनी देवाची स्तुती करावी कारण सर्वांवर नेहमीकरीता राज्‍य करण्‍याचा अधिकार त्याचा आहे, आणि तो सदासर्वकाळ राहो..!
\s ख्रिस्तासाठी दुःख सहण करण्याचा हक्क
\s5
\p
\v 12 माझ्या प्रिय लोकांनो, तुम्ही ख्रिस्ताचे असल्यामुळे या वेदनामय त्रासातून तुम्हाला जावे लागत आहे त्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित होऊ नका. लोक जसे धातूचे परीक्षण अग्नीमध्ये टाकून करतात तसेच ह्या गोष्टी तुम्हा लोकांच्या परीक्षा घेत आहेत. त्यामुळे तुम्हसगंती काहीतरी विचित्र घडत आहे असा विचार करू नका.
\v 13 त्याऐवजी, ख्रिस्ताने ज्या गोष्टी सहन केल्या तशाच गोष्टींचा सामना तुम्ही ही करत आहात याबद्दल आनंद माना, तुम्ही दुःख सहन करता तेव्हा आनंद कराल ख्रिस्त परत येईल आणि तो त्याचे गौरव सर्वांना दाखविल त्यावेळेस तुम्ही अतिशय आनंदित व्हावे.
\v 14 तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवता म्हणून इतरांनी तुमचा अपमान केला तर देव तुम्हावर प्रसन्न झाला आहे कारण देवाचा आत्मा तुम्हावर आहे हे त्यावरून दिसून येते हा आत्मा देव किती महान आहे हे दाखवतो आणि तुम्हामध्ये वस्ती करतो हे प्रगट करतो.
\s5
\p
\v 15 दुसऱ्या कोणाच्या तरी कामामध्ये लुडबुड केली किंवा एखादे वाईट काम केले किंवा कशाची तरी चोरी केली किंवा कोणाचातरी खून केला ह्यामुळे तुम्हा पैकी कोणीही दुःख सहन करू नये.
\v 16 परंतु तुम्ही जर ख्रिस्ती आहात म्हणून तुम्ही दुःख सहन करता त्याविषयी लाज बाळगू नका, त्याऐवजी तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि म्हणून तुम्ही दुःख सहन करत आहात याबद्दल देवाची स्तुती करा.
\s5
\p
\v 17 देवाने लोकांचा न्याय करण्याची सुरुवात करावी अशी वेळ आता आली आहे आणि सर्वप्रथम जे त्यांचे स्वतःचे आहेत त्यांचा तो न्याय करणार आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगतो. देवाकडून आलेल्या आनंदाच्या बातमीवर जे विश्वास ठेवत नाहीत त्यांचे काय होईल ह्याचा विचार करा कारण देव सर्वप्रथम आम्हा विश्वासणाऱ्यांपासून न्यायाची सूरूवात करणार आहे!
\v 18 शास्त्र लेखामध्ये लिहिल्याप्रमाणे हे सर्व काही होईल:
\q “स्वर्गामध्ये जाण्याअगोदर आणि नीतिमान लोकांना वेगवेगळ्या दुःखांचा व परीक्षेचा सामना करावा लागेल.
\q म्हणून देवाचे भय न मानणाऱ्या लोकांना नक्कीच देवापासून कठोर शिक्षा आणि वेदना होतील!”
\p
\v 19 म्हणून ज्या देवाने तुम्हाला निर्माण केले आणि जो आपणाला दिलेले अभिवचन नेहमीच पूर्ण करतो, त्या देवावर दुःख सहन करणाऱ्यानी भरवसा ठेवावा कारण तोच देव त्यांचे रक्षण करेल.
\s5
\c 5
\s वडिलांना बोध
\p
\v 1 आता तुम्हामध्ये जे वडील आहेत म्हणजेच जे विश्वासणाऱ्याच्या मंडळीचे नेतृत्व करतात त्या तुम्हा सोबत मी बोलतो कारण मी देखील स्वतः एक वडील आहे. ज्यांनी ख्रिस्ताला दुःख सहन करताना पाहिले त्यांच्यापैकी मी एक आहे आणि ख्रिस्ताचे स्वर्गात जे गौरव आहे त्यामध्ये मला देखील थोडा वाटा आहे.
\v 2 तुमच्या मंडळीतील लोकांची तुम्ही काळजी घ्यावी असे आवाहन तुम्हा वडिलांना मी करतो. जे मेंढपाळ त्याच्या कळपातील मेंढराची काळजी घेतात त्यांच्यासारखे असल्याप्रमाणे तुम्ही हे कार्य करा. तुम्हाला हे करणे भाग पडते म्हणून तुम्ही हे करू नका परंतु त्याऐवजी देवाची इच्छा आहे म्हणून तुम्ही स्वयम् इच्छेने हे करा. तुम्ही हे कार्य केल्यामुळे तुम्हाला पैसा मिळेल ह्या लोभाने हे काम करू नका तर त्याऐवजी संपूर्ण उत्साहाने ही सेवा करा.
\v 3 देवाने तुमच्या हातात जे लोक सोपवले आहेत त्यांच्यावर धनी असल्यासारखे अधिकार गाजवू नका तर त्याऐवजी तुमच्या व्यवहारातून तुम्ही त्याच्यासमोर एक उदाहरण म्हणून स्वतःला ठेवा.
\v 4 जर तुम्ही असे कराल, तर येशू जो आमचा सर्वांचा मुख्य मेंढपाळ आहे, तो प्रकट होईल तेव्हा तुम्हापैकी प्रत्येकाला तो गौरवी प्रतिफळ देईल. जे खेळाडू धावण्याच्या शर्यती जिकंतात त्यांना जसे मुकुट देण्यात येतात तसे ते मुकुट तुम्हाला असतील. परंतु तुमचा मुकूट त्यांच्या मुकुटासारखे कोमेजून जाणार नाही.
\s5
\p
\v 5 आता तुम्हा तरुण पुरुषांना मी हे सांगत आहे. तुमच्या मंडळीतील प्रौढ मनुष्यांचे तुम्ही आज्ञापालन करावे. तुम्हा सर्व विश्वासणाऱ्यांनी एकमेकांसोबत नम्रतेने व्यवहार करावा कारण हे वाक्य खरोखर सत्य आहे:
\q “देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो,
\q परंतु जे विनम्र आहेत त्या सर्वांसाठी तो दयाळूपणे वागतो.”
\s सर्वसामान्य बोध
\p
\v 6 गर्विष्ठ लोकांना शिक्षा करण्यासाठी देवाकडे महान सामर्थ्य आहे या गोष्टीची जाणीव ठेवून तुम्ही स्वतःला नम्र करा जेणेकरून त्याने ठरवलेल्या वेळेत त्याने तुमचा सन्मान करावा.
\v 7 तो तुमची काळजी घेतो म्हणून तुम्ही ज्या सर्व गोष्टींची चिंता करत आहात त्या त्याच्या हातामध्ये सोपवून द्या व त्याला त्याची काळजी करू द्या.
\s5
\v 8 तुम्ही नेहमी सावध असा आणि लक्ष द्या कारण तुमचा जो शत्रू सैतान आहे तो लोकांचा नाश करण्यासाठी इकडे-तिकडे फिरत आहे.आपल्या भक्षाच्या शोधामध्ये इकडे-तिकडे फिरणाऱ्या सिंहासारखा तो गर्जना करतो आणि कोणाला तरी ठार करावे व नाश करावा असा शोध तो घेतो.
\v 9 ख्रिस्तावर आणि त्याच्या सदेंशावर मजबुतीने विश्वास ठेवल्याने तुम्ही त्याला विरोध करू शकाल आणि संपूर्ण जगातील तुम्हा सोबतीच्या विश्वासणाऱ्यांही अशा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो याची तुम्ही आठवण ठेवा.
\s5
\p
\v 10 प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्हाला मदत करणारा देव आहे आणि ख्रिस्तामध्ये आम्ही एक झाल्यामुळे त्याच्या स्वर्गातील सदासर्वकाळाच्या गौरवात आम्ही सहभागी व्हावे यासाठी त्याने आमची निवड केली आहे. जे लोक तुम्हाला उपद्रव करू इच्छितात त्याच्यामुळे तुम्ही थोडा वेळ दुःख सहन केल्यानंतर तो तुमच्या सर्व अध्यात्मिक कमकुवतपणा काढून टाकेल त्याच्यावर तुम्ही अधिक भरवसा ठेवावा म्हणून तो तुम्हाला मजबूत करेल आणि सर्व प्रकारे तो तुम्हाला सहाय्य पूरवेल.
\v 11 मी ही प्रार्थना करतो की त्यांने सदासर्वकाळ सामर्थ्याने तुम्हावर राज्य करावे. असेच होवो!
\s5
\p
\v 12 हे पत्र सिल्वान ने माझ्यासाठी लिहून काढले आहे. जसे-जसे मी बोललो तसे-तसे त्याने ते लिहिले. तो माझ्यासोबतीचा विश्वास ठेवणारा आहे असे मी त्याला गणतो, ज्या गोष्टींसाठी आम्ही पात्र नाही तरीही देव ते आम्हासाठी त्याच्या दयेने करतो याविषयीचा माझ्या हाताने लिहिलेला हा संदेश सत्य आहे याची मी तुम्हाला खात्री देतो आणि हे पत्र तुम्हाला मी उत्साहित करण्यासाठी लिहिलेले आहे.
\p
\v 13 या शहराला ज्याला आम्ही कधी कधी‘बाबेल,’असे ही म्हणतो यामध्ये देवाने ज्यांना आपले स्वतःचे लोक म्हणून निवडले आहेत ते लोक तुम्हाला शुभेच्छा पाठवतात, . तसेच मार्क जो माझ्या मुलासारखा आहे तोही तुम्हाला त्याच्या शुभेच्छा पाठवतो.
\v 14 तुम्ही एकमेकांवर प्रीती करता हे दाखवण्यासाठी तुम्ही एकमेकांच्या गालावर मुके घ्या. मी प्रार्थना करतो की ख्रिस्तामध्ये तुम्ही जे एकमेकांसोबत जोडले गेले आहात त्या तुम्हा सर्वांना देवाने त्याची शांती द्यावी.