mr_udb/60-JAS.usfm

200 lines
53 KiB
Plaintext

\id JAS - MARATHI_UDB_NT
\ide UTF-8
\h याकोब
\toc1 याकोब
\toc2 याकोब
\toc3 jas
\mt1 याकोब
\s5
\c 1
\p
\v 1 मी, याकोब, देवाची सेवा करणारा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे देवाला बांधलेला असा आहे. हे पत्र मी जगभर पसरलेल्या विश्वाणाऱ्या बारा यहूदी वंशांना लिहितो आहे. तुम्हा सर्वांना माझा सलाम.
\p
\v 2 माझ्या सहकारी बंधूनो, जेव्हा जेव्हा तुम्हावर कठीण परीक्षा येतात तेव्हा तुम्ही आनंदच माना.
\v 3 कठीण परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता, ती परीस्थिती तुम्हाला पुढे येणाऱ्या आणखी कठीण परीस्थितीसाठी तयार करते हे तुम्ही लक्षात घ्यावे.
\s5
\v 4 कठीण परीस्थितीमध्ये शेवटपर्यंत टिकून रहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचे सर्व प्रकारे अनुकरण करणारे असे व्हाल.
\v 5 जर एखाद्याला काय करावे हे जाणून घ्यायचे असल्यास त्याने देवाकडे प्रार्थनापुर्वक विचारावे. देवाला जो कोणी मागतो त्यांना तो न रागवता उदारपणे देतो.
\s5
\v 6 तुम्ही देवाला विचारले आहे तर उत्तर मिळेपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला नेहमी उत्तर देईल व मदत करेल याविषयी कधीही अविश्वास बाळगू नका कारण जे लोक देवावर अविश्वास दाखवतात ते त्या़चे अनुकरण करू शकत नाहीत; तर ते लोक वाऱ्याने उडून जाण्याऱ्या समुद्राच्या लाटेसारखे आहेत, जी कायम वाऱ्यामुळे पुढे व मागे हलत रहाते. अशा परिस्थितीत अविश्वासणारा टिकू शकत नाही.
\v 7 अविश्वासणाऱ्या माणसाने असा विचार करू नये की प्रभू देव आपण जे काही प्रार्थना विनंती करू, ती तो आपल्यासाठी ऐकून पूर्ण करील.
\v 8 आपण देवाचे अनुकरण करणार की नाही, ते असे लोक असून या बाबतीत संभ्रमात आहेत. हे लोक त्या सगळ्या गोष्टी करत नाहीत जसे ते बोलतात.
\s5
\v 9 जे विश्वासणारे असून गरीब आहेत त्यांनी आनंद करावा कारण देव त्यांचा आदर करतो.
\v 10 आणि जे विश्वासणारे श्रीमंत आहेत त्यांनी आनंद करावा कारण देवाने त्यांना नम्र केले आहे, जे त्यांना येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास मदत करते. कारण जसे राणातील फुल कोमेजते, त्याप्रमाणे त्यांची श्रीमंती निघून जाईल.
\v 11 सूर्य ऊगवल्यावर, ऊष्ण वाऱ्याने झाडे सुकून जातात व त्याची फुले कोमजतात आणि सुंदरता निघून जाते, अशाच प्रकारे श्रीमंतांचा नाश पैसे कमावून साठवतांना होईल.
\s5
\v 12 जे कठीण परिक्षेत टिकून रहातात, त्या लोकांचा देव आदर करतो व तो त्याच्यावर प्रेम करनाऱ्यांना बक्षिस म्हणून अनंतकाळचे जीवन त्याच्या वचनानुसार देईल.
\v 13 जेव्हा आम्ही पापाच्या मोहात पडतो, देव आम्हाला मोहात पाडत आहे असे समजू नका.
\s5
\v 14 परंतू प्रत्येकजण वाईट करू इच्छितो आणि ते करतात सुद्धा, जणूकाय ते जाळ्यात सापडले जात आहेत.
\v 15 त्यानंतर त्यांचे वाईट विचार त्यांना पाप करण्यास उद्भवते आणि हे पाप त्यांच्या मनावर असा ताबा मिळवते की ते त्यांचा नाश करून सोडते. त्यानंतर वाईट इच्छा एकत्र येऊन पापास जन्म देतात, याचा अर्थ असा की त्या व्यक्तिने पाप केले आणि आता फक्त येशूच्याद्वारेच त्याला क्षमा आहे. आणि सरते शेवटी पाप जेव्हा शरिराचे आणि आत्म्याचे मरण हे शेवटले फळ देते, तेव्हा याचा अर्थ असा होतो की आता पापी देवापासून सर्वकाळासाठी विभक्त झाला आहे. फक्त येशूच आपल्याला शेवटल्या मरणातून वाचवू शकतो.
\v 16 माझ्या प्रिय बंधूंनो, स्वत:ची फसवणूक होऊ देऊ नका.
\s5
\v 17 प्रत्येक उत्तम व परिपूर्ण देणगी देव जो आपला बाप जो स्वर्गात आहे त्यापासून येते. स्वर्गीय प्रकाश ज्याने निर्माण केला त्या पित्यापासून ती येते. त्याने तयार केलेल्या गोष्टींप्रमाणे तो कधीच बदलत नाही, जसे की सावली ती आता असते आणि दुसऱ्या क्षणी नाहीशी होते. देव कधीही न बदलणारा आणि तो सर्वदा चांगला आहे.
\v 18 सत्याच्या संदेशावर आपण विश्वास केल्याने देवाने आपल्यास आत्मिक जीवन देण्यासाठी निवडले. म्हणून आता येशूवर विश्वास ठेवणारे आत्मिक जीवन मिळवणारे असे पहिले लोक असतील, जे फक्त येशूच देऊ शकतो.
\s5
\v 19 माझ्या प्रिय बंधूंनो, हे जाणून घ्या की, तुमच्यापैकी प्रत्येकाने देवाकडील सत्य संदेशाकडे लक्ष देण्यास उत्सुक असावे. आपण आपले विचार लवकर बोलू नये, किंवा शिघ्रकोपी असू नये.
\v 20 कारण जेव्हा आपण क्रोधीत होतो तेव्हा नितिमत्वाच्या गोष्टी आपल्याच्याने होऊ शकत नाहीत, अशा गोष्टी ज्या देव आपल्याकडून अपेक्षा करतो.
\v 21 म्हणून सर्व अमंगऴ गोष्टी करणे पूर्णपणे थांबवा, आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या अंत:करणात मुळावलेली आहे ती लीनतेने स्विकारा.
\s5
\v 22 देवाची शिकवण काय सांगते त्याप्रमाणे नेहमी करा व फक्त ऐकूच नका तर त्याप्रमाणे करा, कारण जर तुम्ही फक्त ऐकता आणि त्याचे पालन करत नाही तर ते तुम्ही देव आपल्याला तारील असे चूकीचे गृहीत धरून स्वत:ची फसवणूक करता.
\v 23 जो कोणी देवाचे वचन ऐकतो परंतु त्यानुसार वागत नाही, तो आरशामध्ये आपले नैसर्गिक तोंड पाहणाऱ्यासारखा आहे.
\v 24 तो मनुष्य स्वत:कडे लक्षपूर्वक पाहतो. नंतर निघून जातो आणि आपण कसे होतो ते लगेच विसरून जातो.
\v 25 परंतू इतर लोक देवाचे जे वचन परिपूर्ण असून त्यांना स्वेच्छेने देवाचे जे काम करण्यास लावते असे ते त्यांना मोकळे करते. आणि जर तो देवाचे वचन सतत पारखून पाहणारा आणि ऐकणारा न होता काम करणारा होतो आणि देवाने जे सांगितले तेच करणारा होतो, तर तो जे करणार त्यात देव त्याला आशिर्वादीत करतो.
\s5
\v 26 आपण धार्मिक आहोत असे जर कोणी मनुष्य समजतो, तथापी तो आपल्या जिभेला आळा घालत नाही पण आपल्या अंत:करणाला भूलवतो, त्याचा धर्म व्यर्थ आहे.
\v 27 तर अनाथ आणि विधवा यांचा समाचार त्यांच्या संकटात घेणे, ही एक गोष्ट देवाने आपल्याला सांगितली आहे. परंतू देव जो आपला बाप, ह्याची आज्ञा भंग करणाऱ्या प्रमाणे अनैतिक कृती न करता देव जो आपला बाप याची जे खरी उपासना करतात, असे देवाच्या पसंतीस उतरतात.
\s5
\c 2
\p
\v 1 माझ्या बंधूंनो आणि भगिणींनो, ज्याअर्थी तुम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता, जो सर्वाहून खूप उंच आहे, तर तुम्ही पक्षपाताने लोकांचा आदर करणे थांबवा.
\v 2 उदाहरणार्थ कोणी सोन्याची आंगठी घातलेला, शोभायमान वस्त्रे घातलेला असा माणूस जर तुमच्या सभास्थानांत आला, आणि फाटकी वस्त्रे घातलेला दरिद्रीहि जर आंत आला,
\v 3 आणि जर तुम्ही शोभायमान वस्त्रे घातलेल्या कडे लक्ष देऊन म्हणता की, तु येथे चांगल्या ठिकाणी बैस, परंतू दरिद्य्राला म्हणता की, तू तेथे उभा राहा, अथवा येथे माझ्या पदासनाजवळ खाली बैस,
\v 4 तर तुम्ही भेदभावाने एकमेकांचा न्याय करता.
\s5
\p
\v 5 माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिणींनो ऐका! ज्यांची कवडीमोल अशी देखील किंमत नाही अशा गरिब लोकांनाच देवाने विश्वासात श्रीमंत होण्यासाठी निवडले आहे. म्हणजेच तो जेव्हा सर्वांवर राज्य करेल तेव्हा त्यांना अद्भूत अशा गोष्टी देणार. त्याने त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी असे करण्याचे वचन दिले आहे.
\v 6 पण तुम्ही तर गरीब मनुष्याला तुच्छ लेखिले! जरा ह्या गोष्टीचा विचार करा, तुमची पिळवणूक करणारे श्रीमंत लोकच नाहीत काय आणि तुम्हांला न्यायालयात नेणारे तेच लोक नाहीत काय?
\v 7 आणि हेच ते लोक आहेत जे येशू ख्रिस्त, जो स्तुतिच्या योग्य आहे, आणि ज्याचे नाव तुम्हाला देण्यात आले त्याच्याबद्दल निंदा करतात.
\s5
\v 8 आपला येशू ख्रिस्त प्रभू ह्याने पवित्रशास्त्रात आज्ञा दिली आहे, की जशी तुम्ही स्वत:वर प्रीति करता तशीच तुम्ही इतरांवरही प्रीती करा.” याचा अर्थ असा की हे तुम्ही पाळता तर तुम्ही योग्य करता.
\v 9 पण जर तुम्ही पक्षपात करून इतरांपेक्षा काही लोकांचाच आदर करता तर तुम्ही देवाच्या आज्ञा मोडता व चूकीचे करता. आणि नियम मोडण्याचा दोष तुमच्यावर येतो.
\s5
\p
\v 10 कारण जर कोणी संपूर्ण नियमशास्त्राचे पालन करतो पण एका नियमाबाबतीत चुकतो, तर याचा अर्थ असा की तो देवाच्या संपूर्ण नियमशास्त्राबाबतीत दोषी ठरतो.
\v 11 उदाहरणार्थ, “व्यभिचार करू नको” असे जो देव म्हणाला, “तो असे सुद्धा म्हणाला की, “खून करू नको.” म्हणून जर तुम्ही व्यभिचार करीत नाही पण खून करता तर तुम्ही ती व्यक्ती बनता जी देवाचे नियमशास्त्र मोडते.
\s5
\v 12 तर नेहमी इतरांबद्दल अशा लोकांसारखे बोला व वागा की, ज्यांचा न्याय अशा नियमांमुळे होणार आहे की, ज्यामुळे शिक्षा होणाऱ्या आपल्याला पापांपासून स्वातंत्र्य मिळते.
\v 13 जो दयाळूपणे वागला नसेल त्याचा न्यायही देव त्याच्यावर दया न दाखविताच करील. पण जर आपण इतरांप्रती दयाळू असू तर देव आपला न्याय करेल तेव्हा आपणास घाबरण्याची गरज नाही.
\s5
\p
\v 14 माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिणींनो, जर कोणी असे म्हणतो की, मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो पण तो तशी कृती करीत नाही तर त्याचा काय उपयोग? त्यांच्या बोलण्याने काहीच चांगले होणार नाही, देव त्यांना तारण्यास असमर्थ असेल जर ते फक्त शब्दाने विश्वास ठेवणारे असतील.
\v 15 जर एखादा बंधू किंवा भगिनी यांना कपड्यांची आवश्यकता असेल व त्यांना रोजचे अन्नसुद्धा मिळत नसेल;
\v 16 आणि तुमच्यापैकी एखादा त्यांना म्हणतो, “देवबाप तुम्हांला आशीर्वाद देवो! उबदार कपडे घाला आणि चांगले खा.” पण तुम्ही त्यांच्या शरीराला जे आवश्यक ते देत नाही, तर तो काय चांगले करतो?
\v 17 त्याचप्रमाणे विश्वासाबरोबर जर कृतीची जोड नसेल तर तो केवळ एक मृत असाच विश्वास असेल, तर मग तुम्ही खरोखरच ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही.
\s5
\p
\v 18 पण एखादा मला म्हणेल, देवावर विश्वास ठेवल्याने आणि इतरांप्रती चांगली कृत्ये केल्याने देव काही लोकांचे तारण करेल. तेव्हा मी त्याला उत्तर देईन, “देवावर विश्वास ठेवणारे लोक जर इतरांसाठी चांगले कृत्य करीत नाहीत, तर ते देवामध्ये खरोखर विश्वास ठेवतात हे तुम्ही मला सिद्ध करून दाखवू शकत नाही. परंतु इतरांसाठी चांगले कार्य करण्याद्वारे मी हे सिद्ध करेन की मी खरोखर देवावर भरवसा ठेवतो.
\v 19 विचार करा, तुम्ही असा विश्वास धरता का की, फक्त एकच देव जो जिवंत असा आहे? आणि तुम्हाला असे वाटते की त्याच्यावर विश्वास ठेवणे हे बरोबर आहे? परंतू भुतेदेखील असा विश्वास धरतात व थरथर कापतात की एकच देव आहे आणि तो त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा करणार आहे.
\v 20 अरे मूढ माणसा, जो कोणी असे बोलतो की मी देवाच्याठायी विश्वास ठेवतो, परंतू चांगली कृत्ये करीत नाही, तर तो जे काही बोलतो ते वायफळ बोलने आहे.
\s5
\p
\v 21 आपला पूर्वज अब्राहाम ह्याला देवाने जे काही आज्ञापीले ते करण्याचा प्रयत्न केला, त्याने त्याचा पुत्र इसहाक याला वेदीवर परमेश्वराला अर्पण करण्याची तयारी दर्शविली, तेव्हा त्याच्या या कामामुळे तो देवाच्या दृष्टीत नीतिमान ठरला नाही काय?
\v 22 अशाच तऱ्हेने, अब्राहामाच्या कृतीमध्ये देवासाठी विश्वाससुद्धा बरोबरीने कार्यरत होता व त्याचा विश्वास त्याच्या कृतीमुळे पूर्ण झाला.
\v 23 आणि अशा रीतीने पवित्र शास्त्र जे सांगते, ते परिपूणे झाले की,“अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास हा त्याचे नीतिमत्त्व मोजला गेला.” आणि त्या कारणामुळे त्याला “देवाचा मित्र” असे म्हटले गेले.
\v 24 अब्राहामाच्या उदाहरणावरून आपल्याला याची जाणिव होते की, केवळ विश्वासामुळे नव्हे, तर लोकांच्या चांगल्या कृत्यांमुळे मनुष्य देवासमोर नीतिमान ठरविला जातो.
\s5
\p
\v 25 त्याचप्रमाणे राहाब वेश्येने इस्राएली हेरांना आसरा देऊन, काही वेळानंतर निराळया वाटेने तेथून निसटून जाण्यासाठी मदत केली, कारण तीने जासूंदाप्रती काळजी व्यक्त केली जे त्या देशावर हेरगिरी करण्यास आले होते. तेव्हा ही कृती तिचे नीतिमत्त्व मानले गेले.
\v 26 म्हणून, ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती श्वासोच्छ्वास करत नसेल तर तो मृत असा आहे आणि त्याचे शरीर हे निरर्थक असे गणले जाते, त्याचप्रमाणे जो असे म्हणतो की माझा देवाच्याठायी विश्वास आहे परंतू तो कृत्यांवाचून मेलेला असेल तर तो देखील निरर्थक असा आहे.
\s5
\c 3
\p
\v 1 माझ्या बंधूंनो आणि भगिणींनो, तुमच्यापैकी पुष्कळजण देवाच्या वचनाचे शिक्षक होण्याची इच्छा धरतात, तर तुम्हांला माहीत असायला पाहिजे की जे आपण शिक्षक आहोत त्या आपला सर्वांचा इतरांपेक्षा काटेकोरपणे न्याय होईल.
\v 2 कारण आपण पुष्कळ पापे करतो परंतू जर कोणी त्याच्या बोलण्यात चुका करीत नाही तर तो जे उच्चारतो त्या प्रमाणे परिपूर्ण मनुष्य आहे. ते त्यांच्या सर्व कृत्यांना वश करू शकतील.
\s5
\p
\v 3 उदाहरणार्थ, आपण घोड्यांच्या तोंडांना लगाम घालतो यासाठी की, त्यांनी आपल्या आज्ञा पाळाव्यात आणि त्या लगामाने आपण त्याचे संपूर्ण शरीर नियंत्रणात करून जिथे पाहिजे तिथे वळवू शकतो,
\v 4 किंवा जहाजाचे उदाहरण घ्या. जरी ते खूप मोठे असले व जोरदार वाऱ्यामुळे चालविले जाते तरी ते लहान सुकाणूद्वारे ताब्यात ठेवता येते व त्याच्या साहाय्याने नावाड्याच्या इच्छेला येईल तिकडे नेता येते.
\s5
\p
\v 5 त्याचप्रकारे जीभ ही शरीराचा लहानसा भाग आहे, पण जर तिला ताब्यात ठेवता आले नाही तर तिच्या बोलण्याद्वारे आपण लोकांना जखमा करू शकतो. फक्त विचार करा, कितीतरी मोठे जंगल लहानशा आगीने पेट घेते!
\p
\v 6 होय, ज्या प्रकारे लहानशी आग ही जंगलास भस्म करते त्याच प्रकारे जीभ देखील पुष्कळ लोकांना नष्ट करणारी ज्वाला आहे. आपल्या बोलण्याद्वारे आपणाला किती वाईट हे प्रगट होते. आणि आपण जे काही बोलतो त्याद्वारे आपले विचार आणि कृती विटाळते. ज्या प्रकारे एक छोटीशी ठिणगी सभोवताल्या परिसरास भस्म करण्यासाठी कारणीभूत ठरते त्याच प्रकारे जीभ ही आपल्याला अपवित्र करते व आपल्या सर्व अस्तित्वालाच ती आग लावते, ती तर नरकाच्या ज्वालांनी जीवन पेटवते.
\s5
\v 7 जरी पशू, पक्षी, सरपटणारे जीवजंतु, साप आणि समुद्रातील निरनिराळ्या जातीचे जीव माणूस पाळू शकतो आणि प्रत्यक्षात त्याने तसे केले आहे.
\v 8 पण कोणताही मनुष्य आपली जीभ ताब्यात ठेवू शकत नाही. आणि जेव्हा लोक आपल्या जीभेद्वारे वाईट बोलतात तेव्हा आपणास कळते की ते स्वत:वर ताबा न मिळवता येत असल्याने अशा वाईट गोष्टी बोलतात. जसे सापाचे विष लोकांना मारून टाकते, तसेच आपण जे काही बोलतो ते इतरांना हानी पोहचवू शकते.
\s5
\p
\v 9 देव जो आपला प्रभू आणि स्वर्गीय पिता याची स्तुती आपण आपल्या जिभेने करतो आणि त्याच जीभेने आपण इतरांचे वाईट व्हावे म्हणून देवाजवळ मागतो. जे की फार चूकाचे आहे, कारण देवाने मनुष्यास आपल्या सारखे बनवीले आहे.
\v 10 आम्ही देवाची स्तुती करतो, पण त्याच तोंडाने आपण इतरांबद्दल वाईट गोष्टींची मागणी देखील करतो, माझ्या बंधूंनो आणि भगिणींनो, हे असे असू नये.
\s5
\p
\v 11 एकाच झऱ्यातून गोड व कडू पाणी येऊ शकत नाही.
\v 12 माझ्या बंधूंनो आणि भगिणींनो, अंजिराच्या झाडाला जैतुनाची फळे येतील काय? किंवा द्राक्षवेलीला अंजिर लागतील काय? कधीच नाही. तसेच खारट पाण्याच्या झऱ्यातून गोड पाणी येऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे, आपण जे चांगले तेच आपण बोलले पाहिजे, आणि जे वाईट आहे ते तोंडातून बोलू नये.
\s5
\p
\v 13 तुमच्यामध्ये कोण शहाणा व ज्ञानाने भरलेला आहे? त्याने त्याचे शहाणपण त्याच्या चांगल्या वागणुकीने दाखवावे अशासाठी की आपल्या चांगल्या कृत्यांमुळे तुम्ही विवेकी आहात असे लोकांस दिसून यावे. कारण शाहाणपणाने राहणे हे आपल्याला इतरांशी प्रेमळपणे वागण्यास मदत करते.
\v 14 पण जर तुमच्या ह्रदयात कटूता, मत्सर व स्वार्थी उद्देश असतील तर तुम्ही तुमच्या शहाणपणाची फुशारकी मारू नका आणि खरेपणाविरुद्ध लबाडी करू नका.
\s5
\p
\v 15 जे अशा प्रकारचे शहाणपण विचारात आणतात, ते शहाणपण देवाकडून आलेले नाही, तर ते पृथ्वीवरचे आहे, जे फक्त विचारांद्वारे आणि कृतीद्वारे देवाला आदर न देणारे असे आहेत. ते त्यांच्या स्वतःच्या मनाला इच्छील असे आपल्या मनात विचार आणि कृती करतात. सैतान त्यांना जे करावयास लावतो तेच ते करतात.
\v 16 हे लक्षात ठेवा की जे लोक असे दृष्टिकोन बाळगतात ते स्वतःचे नियंत्रण करीत नाहीत. ते प्रत्येक प्रकारचे वाईट करतात, इतर लोकांकडून घेतात आणि असा देखावा करतात की ते बरोबर करत आहेत, जे की ते चूकीचे असतात.
\v 17 पण लोक जेव्हा देवाकडून लाभलेल्या शहाणपणाने शहाणे होतात, तेव्हा ते मुळात पवित्र जे की देवाच्या नजरेत खूप महत्वाचे असणारे, शांतीप्रीय जीवन जगण्यास इतरांची मदत करणारे, लोकांच्या काय गरजा आहेत त्याकडे ते आपले लक्ष केंद्रीत करणारे, समजूतदारपणाचे आणि मनमोकळे असून ते दयेचे व चांगली कामे यांना उत्तेजन देणारे, तसेच ते पक्षपात न करणारे व निष्कपट असे बनतात.
\v 18 जे लोक शांततेच्या मार्गाने शांती स्थापन करण्याचा प्रयत्न करतात ते इतरांना शांतीने वागण्यास कारणीभूत ठरतात. याचा परिणाम असा होती की ते सर्व नीतिपूर्ण कृत्यांनी वागतात.
\s5
\c 4
\p
\v 1 तर आता तुमच्यामध्ये भांडणे व कलह का आहे हे मी तुम्हास सांगतो, त्याचे कारण असे आहे की तुम्ही वाईट गोष्ट करण्याची आवड धरली आहे, ज्या की तुमच्या सोबतीच्या बांधवांना न आवडणाऱ्या अशा आहेत.
\v 2 तुम्ही अशा काही गोष्टींची इच्छा केली आहे ज्या तुम्हाला भेटू शकत नाहीत, ह्यास्तव तुम्ही त्या इच्छांना अडथळा निर्माण करणाऱ्या लोकांना ठार मारता. जे इतरांकडे आहे त्याची इच्छा तुम्ही धरता त्या कारणाने तुमचे मनोरथ पूर्ण न झाल्याने तुम्ही ऐकमेकांशी भांडण व वाद करता. तर तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी मिळत नाहीत कारण तुम्ही देवाला मागत नाही.
\v 3 आणि जरी तुम्ही देवाकडे मागता, तेव्हा तुम्हाला काहीही मिळत नाही, कारण तुम्ही चुकीच्या उद्देशाने मागता, यासाठी की तुम्हाला जे काही मिळेल ते तुमच्या स्वतःच्या सुखासाठी वाईट रितीने वापरावे.
\p .
\s5
\v 4 आपल्या नवऱ्याशी अप्रामाणिक अशी जी स्त्री असते, तिच्या सारखे तुम्ही झाला आहात, जे देवाचे काहीच ऐकत नाहीत आणि त्याच्या आज्ञाहि पाळत नाहीत. तुम्हाला हे माहीत नाही का की, जे वाईट आचरतात ते या जगाचे असून देवाचे वैरी आहेत. जो मनुष्य जगाशी मैत्री करतो तो देवाशी वैर करतो.
\v 5 खचित पवित्र शास्त्र सांगते त्यात काही अर्थ नाही काय? जेव्हा ते म्हणते, की देवाने जो आत्मा आमच्यात ठेवला आहे तो आम्ही काही गोष्टी कराव्यात ह्यासाठी मनापासून इच्छूक आहे.
\s5
\p
\v 6 परंतू देव सामर्थ्यशाली व आपल्या करता फार दयाळू असा आहे, आपण पाप करणे थांबवावे ह्यासाठी तो आपल्यास मदत करू इच्छितो. त्यासाठीच पवित्र शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठाचा विरोध करतो, पण नम्र जनांवर तो दया करतो.”
\p
\v 7 म्हणून स्वत:ला देवाच्या स्वाधीन करा. सैतानाला विरोध करा. आणि तो तुमच्यापासून पळून जाईल.
\s5
\p
\v 8 आत्मिकतेने देवाजवळ या, आणि तो देखील तुमच्याजवळ येईल. अहो पाप्यांनो, जे तुम्ही स्वत:ला देवाच्या स्वाधीन करण्यास द्विबुद्धीचे आहा, ते तुम्ही जे वाईट व चूकीचे विचार करणे थांबवा व जे चांगले ते करत देवाचीच आठवण करा व आपली अंत:करणे शुद्ध करा.
\v 9 तुम्ही केलेल्या वाईटाबद्दल दु:खी व्हा, शोक करा, आणि रडा! तुमचे हसणे दु:खात बदलो. तुमच्या आनंदाचे खेदात रूपांतर होवो.
\v 10 तुम्ही प्रभूसमोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हांला उच्च स्थान देईल.
\s5
\p
\v 11 माझ्या बंधूंनो आणि भगिणींनो एकमेकांविरुद्ध वाईट बोलण्याचे थांबवा, कारण जो त्याच्या भावाविरुद्ध बोलतो किंवा जो त्याच्या भावाचा न्याय करतो तो देवाने आपल्याला पाळण्यास दिलेल्या नियमशास्त्राविरुद्ध बोलतो. आणि जर तुम्ही नियम शास्त्राचा न्याय करता तर तुम्ही नियमशास्त्र जे सांगते ते करीत नाही तर तुम्ही एका न्यायाधीशाप्रमाणे वागत आहा.
\v 12 पण खरं तर ज्याला आमच्या पापांना क्षमा करण्याचा आणि लोकांना दोष लावण्याचा अधिकार आहे तो असा एकच देव आहे. फक्त देवच लोकांचे तारण किंवा त्यांचा नाश करण्यास समर्थ आहे. खचित आपणास देवाचे स्थान घेण्याचा आणि इतरांचा न्याय करण्याचा काहीच अधिकार नाही.
\s5
\p
\v 13 तुमच्यातील काही असे म्हणतात, “आज किंवा उद्या आपण या शहरी किंवा त्या शहरी जाऊ व तेथे आपण एक वर्ष घालवू आणि आपण तेथे व्यापार करू व पुष्कळ पैसा कमवू.”
\v 14 ते तुम्ही आता माझे ऐका, तुला हे देखील माहीत नाही की, उद्या तुझे काय होईल किंवा तू किती काळ जगशील, अखेर तुझे जीवन तरी काय आहे? कारण थोड्या काळपर्यंत दिसणारे आणि मग अदृष्य होणारे असे धुके तुम्ही आहात.
\s5
\v 15 त्याऐवजी, तुम्ही नेहमी असे म्हणा, “जर प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू आणि आपण हे किंवा ते करू.”
\v 16 पण तुम्ही तर जे काही करता त्या सर्वात फुशारकी मिरवता आणि बढाई मारता. अशी बढाई मारणे हे वाईट आहे.
\p
\v 17 म्हणून जर तुम्हांला चांगले कसे करायचे हे माहीत असूनही जर ते तुम्ही करीत नाही, तर तुम्ही पाप करता.
\s5
\c 5
\p
\v 1 जे ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाहीत आणि तुमचा छळ करतात! अशा श्रीमंत लोकांबद्दल मला काही बोलायचे आहे, अहो श्रीमंतांनो ऐका! जी संकटे तुम्ही अनुभवाल त्याबद्दल रडा व आक्रोश करा.
\v 2 तुमची संपत्ती निरुपयोगी अशी आहे, व तुमच्या कपड्यांना कसर खाऊन टाकीत आहेत.
\v 3 तुमचे सोने व चांदी निरुपयोगी अशी आहेत, त्यांच्यावर जंग चढला आहे. जेव्हा देव तुमचा न्याय करेल, तेव्हा हेच सोने व चांदी तुम्ही लोभी असल्याचा पूरावा देतील आणि जशी जळण व अग्नी नष्ट करतात, तशी देव तुम्हास कडक शिक्षा देईल. अशा युगामध्ये तुम्ही तुमचे धन साठवून वेगळे ठेवले आहे, ज्याचा देव न्याय करणार आहे.
\s5
\p
\v 4 तुमच्या शेतात कापणी करणाऱ्या मजुरांची मजुरी जी तुम्ही अडवून धरलीत ती ओरडून दु:ख करीत आहे आणि कापणी करणाऱ्यांचे रडणे सर्वसामर्थी प्रभू परमेश्वराच्या कानी पोहोंचले आहे. ह्या गोष्टीचा नीट विचार करा.
\v 5 तुमच्या मनात येईल ते तुम्ही मिळवले, जसे एखादा राजा करतो. तर पाहा जसे वधावयाच्या दिवसासाठी खाऊनपिऊन तयार केलेल्या पशूसारखे तुम्ही पुष्ट झालात, तुम्ही आपले जीवन मौज मस्तीने जगलात, परंतू तुमच्या हे लक्षात येत नाही की देव तुम्हास कठोर शिक्षा करणार.
\v 6 तुम्ही निरपराध लोकांना जे तुमच्यापासून त्यांच्या स्वत:चे रक्षण करू शकत नाहीत आणि ज्यांनी तुमचे काही वाईटहि केले नाही, त्यांना तुम्ही दोषी ठरविले आणि त्यांची हत्या केली आहे. माझ्या भावांनो आणि भगिणींनो, असे जे श्रीमंत लोक तुमचा छळ करतात त्यांना मला हेच सांगायचे आहे.
\s5
\p
\v 7 यासाठी माझ्या भावांनो आणि भगिणींनो, जरी श्रीमंत लोक तुम्हाला छळतात, तरी प्रभूच्या येण्यापर्यंत धीर धरा, लक्षात ठेवा की, शेतकरी आपल्या शेतातील मोलवान पिकाची वाट पाहतो. तो धीराने त्याची वाट पाहतो. पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत वाट पाहतो. तो पीकाची पूर्ण वाढ होईपर्यंत त्याची वाट पाहतो.
\v 8 त्याचप्रकारे तुम्हीसुद्धा प्रभू येशूची धीराने व विश्वासात खंबीरपणे वाट पाहा, धैर्य धरा, कारण प्रभूचे दुसरे आगमन जवळ आले आहे.
\s5
\p
\v 9 बंधूंनो, एकमेकांविरुद्ध कुरकुर करण्याचे थांबवा, यासाठी प्रभू येशूने तुम्हास दोषी ठरवू नये. तो न्यायधीश असा दाराजवळ आत येण्यासाठी तयारीत उभा आहे.
\v 10 माझ्या बंधूंनो आणि भगिणींनो, दु:ख सहन करीत देवाच्या नावाने लोकांशी धीर धरून बोलणाऱ्या संदेष्ट्याना देवाने फार पूर्वी वाचनातून बोलण्यास पाठवले त्यांचे उदाहरण तुम्ही आपल्यासमोर ठेवा. त्यांना पुष्कळ त्रास देण्यात आला तरी त्यांनी धीराने दु:ख सहन केले.
\v 11 त्यांनी दु:ख सहन केले म्हणून देवाने त्यांचा आदर केला हे आपल्यास इथे कळते. तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि तुम्हांला माहीत आहे की, ईयोबाने जे दु:ख सहन केले त्याकारणाने देवाने त्याच्यासाठी चांगले तेच केले. आणि म्हणून प्रभू दयाळू आणि खूप कनवाळू आहे, ह्या गोष्टीचे त्याने प्रात्यक्षिक दाखविले.
\s5
\p
\v 12 माझ्या बंधूंनो आणि भगिणींनो, याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे, स्वर्गाच्या किंवा पृथ्वीच्या नावाने शपथ वाहायचे थांबवा किंवा इतर कोणत्याही प्रकारची शपथ वाहू नका. जर मी बोलून ते करत नाही तर कदाचीत पृथ्वीवर कोणी ऐकेल आणि मी तसे करताना नाही आढळल्यास तो मला शिक्षा करेल. काही देखील बोलू नका, जर मी बोलून ते करत नाही तर कदाचीत देव मला शिक्षा करेल. तुमचे बोलने “होय” तर “होयच” असू द्या. “नाही” तर “नाहीच” असू द्या, यासाठी की तुम्ही देवाच्या परीक्षेत येऊ नये.
\s5
\p
\v 13 तुमच्यातील कोणी संकटात असेल तर त्याने देवाच्या सहाय्यासाठी प्रार्थना करावी. कोणी आनंदी असेल तर त्याने देवाचे स्तुतिगान करावे.
\v 14 तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? तर त्याने मंडळीतील वडिलांना बोलवावे व त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे, आणि प्रभूच्या नावाने त्याच्यावर जैतूनाचे तेल लावावे ज्याने तो बरा होईल.
\v 15 त्यांच्या विश्वासाने केलेल्या प्रार्थनेने आजारी मनुष्य बरा केला जाईल व प्रभू त्याला उठविल. जर त्याचे पाप त्याच्या आजाराचे कारण असेल तर, आणि त्याने आपले पाप कबूल करावे म्हणजे प्रभू त्याची क्षमा करेल.
\s5
\v 16 म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते.
\v 17 एलीया हा आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. पाऊस पडू नये म्हणून त्याने कळकळीने प्रार्थना केली आणि नंतरची सोडेतीन वर्षे देशात पाऊस पडला नाही.
\v 18 मग त्याने पुन्हा देवाजवळ प्रार्थना केली व आकाशाने पाऊस दिला आणि पृथ्वीने आपले धान्य उपजविले.
\s5
\p
\v 19 माझ्या बंधूंनो आणि भगिणींनो, जर तुमच्यापैकी कोणी देवाच्या सत्य आज्ञा पाळण्यास चुकत असेल किंवा सत्यापासून दूर भटकला असेल तर तुमच्यातील ऐकाला देवाने आपणास काय करण्यास सांगितले त्याकडे पून्हा एकदा त्याचे मन वळवा.
\v 20 आणि ज्याने त्याला वाईट करण्यापासून थांबवले, देव त्या व्यक्तीला आत्मिक मरणातून सोडवेल आणि त्याच्या पुष्कळ पापांची क्षमा करेल.