mr_udb/59-HEB.usfm

660 lines
153 KiB
Plaintext
Raw Permalink Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

\id HEB - MARATHI_UDB_NT
\ide UTF-8
\h इब्री लोकांस
\toc1 इब्री लोकांस
\toc2 इब्री लोकांस
\toc3 heb
\mt1 इब्री लोकांस
\s5
\c 1
\p
\v 1 परमेश्वराने प्राचिन काळी भविष्यवाद्यांच्या सांगण्याद्वारे आणि लिखाणाद्वारे आपल्या पूर्वजांशी विविध मार्गांनी वारंवार संवाद साधला.
\v 2 परंतू आता देव ह्या शेवटल्या काळाच्या आरंभी आपल्या पूत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. देवाने सर्व गोष्टींवर ताबा मिळवण्यासाठी त्याला निवडले आणि त्याच्याच द्वारे देवाने जग निर्माण केले आहे.
\v 3 देवाचा पूत्र हा देवाच्या सामर्थ्यशाली गौरवाचा प्रकाश आहे. त्याद्वारे त्याने देव तंतोतंत कसा आहे हे दाखवले. आपल्या आज्ञेद्वारे तो सर्व गोष्टी ज्या अस्तित्वात आहेत, त्यांना अस्तिवात ठेवतो. सर्व पापांची क्षमा मिळवल्यानंतर, तो स्वर्गात उचलला गेला आणि आदर योग्य अशा उच्च ठिकाणी देव पित्याच्या उजव्या बाजूस बसला, जेथे तो त्याच्या सोबत राज्य करणार.
\s5
\p
\v 4 देवाने आपल्या पुत्राला देवदूतांपेक्षा श्रेष्ठ बनवले आहे, ज्याप्रकारे त्याचे नाव आणि अधिकार त्यांपेक्षा फार श्रेष्ठ आहे.
\p
\v 5 कारण, शास्त्रात असे कोठेही आढळून आले नाही कि देवाने कोणा देवदूतास असे म्हटले असेल जे त्याने त्याच्या पूत्रास म्हटले.
\q की तू माझा पूत्र आहे!
\q आणि आज मी सर्वांना हे घोषीत करतो की मी तूझा पिता आहे.
\p तोच दूसऱ्या शास्त्रभागात असे म्हणतो,
\q मी त्याचा पिता,
\q आणि तो माझा पूत्र होईल.
\s5
\p
\v 6 कारण जेव्हा देवाने त्याच्या गौरवात, एकूलत्या एक पूत्रास जगात आणले तेव्हा त्याने आज्ञा केली,
\q माझ्या सर्व देवदूतांनी ह्याची उपासना करावी.
\p
\v 7 शास्त्रातही देवदूतांबद्दल असे लिहिलेले आहे,
\q देवाने त्याच्या देवदूतांस आत्म्यांत बनवले आहे, जे अग्निसारख्या सामर्थ्याने त्याच्या सोबत करतात.
\s5
\p
\v 8 परंतू देवपूत्राविषयी शास्त्रात असे लिहलेले आहे की,
\q सदासर्वकाळ राज्य करणारा परमेश्वर तूच आहे,
\q आणि तू न्यायाने तूझ्या राज्यावर राज्य करशील.
\q
\v 9 लोकांच्या न्यायी कृत्यांवर तू प्रिती केलीस परंतू
\q पापी लोकांच्या कृत्यांचा तूला राग केलास.
\s5
\p
\v 10 आणि देवाच्या पूत्रा विषयी पवित्रशास्त्रात असे लिहले आहे की, त्याचा पूत्र हा सर्व देवतूतांपेक्षा श्रेष्ठ आहे.
\q देवा, तूझ्याच द्वारे सर्व पृथ्वी निर्माण करण्यात आली,
\q आणि तूच आकाशाचा, अंतराळाचा आणि त्यातील ताऱ्यांचा निर्माणकर्ता आहेस.
\q
\v 11 जरी त्या गोष्टी सदासर्वकाळ टिकणाऱ्या नाहीत, परंतू तू सर्वकाळ जीवंत राहणारा देव आहेस.
\q जशी कपड्याची गूंडाळी केली जाते, त्याप्रमाणे ते सर्व गूंडाळले जाईल.
\q
\v 12 जणू काय एखादा जूना कपडा गूंडाळावा त्याप्रमाणे तू त्यांस गूंडाळशील.
\q त्यानंतर जसे नवीन कपडे परिधान करावे त्याप्रकारे तू जगातील सर्वकाही नवे असे करशील.
\q परंतू तू जसा आहेस तसाच सर्वकाळ असशील.
\s5
\p
\v 13 माझ्या सोबत सर्वोच्च स्थानी विराजमान हो, आणि तूझ्या सर्व शत्रूंवर तू राज्यकरण्यासाठी त्यांचा मी पराभव करत असता, माझ्या सोबत राज्य कर,
\q असे जे देवाने त्याच्या पूत्राविषयी म्हटले ते, कोणाही देवदूताविषयी त्याने म्हटले नाही.
\p
\v 14 देवदूत हे फक्त आत्मे आहेत, ज्यांना देवाने विश्वासणाऱ्यांची सेवा आणि त्यांची काळजी करण्यासाठी पाठवले आहेत आणि लवकरच देव त्यांचे तारण करणार आहे, जे त्याने त्यांना देण्याचे वचन दिले होते.
\s5
\c 2
\p
\v 1 म्हणून हे सत्य असल्या कारणाने, जे काही आपण देवाच्या पूत्राविषयी ऐकले आहे, त्याकडे आपण विषेश करूण लक्ष लावावे, म्हणजेच त्यामूळे आपला विश्वास कधिच डळमळणार नाही.
\s5
\v 2 जेव्हा इस्त्राएलाच्या लोकांस देवदूतांद्वारे देवाचा शूभवर्तमान सांगण्यास आला, तो तर कायदेशीर स्विकारण्याजोगा होता. कारण जे देवाची आज्ञा पाळत नाहीत आणि त्याच्या नियमांचे उल्लंघन करतात, तो त्यांना न्यायीपनाने शिक्षा करतो.
\v 3 तर आता हे सत्य आहे की, आपण देवापासून पळ काढू शकत नाही, त्याने आपणास कसे तारले आहे या त्याच्या शुभवर्तमानाकडे आपण दुर्लक्ष करतो, तर तो खचितच आपला न्याय करणार आहे. ह्याबद्दल प्रभू येशूने आपणास सांगितले आणि शिष्यांच्याद्वारे आपणास त्याची खात्री देण्यात आली की होय त्याने असेच केले आहे.
\v 4 आणखी ह्या वचनाद्वारे विश्वासणाऱ्यांना अद्भूत कृत्ये करण्याचे सामर्थ दिल्याद्वारे देवाने त्या वचनाबद्दल आपल्याला सिद्ध करून दाखवले आहे की ह्या गोष्टी खऱ्या आहेत. आणि पवित्र आत्म्याने जसे इच्छीले त्याप्रमाणे त्याने विश्वासणाऱ्यांना पूष्कळ दाने दिली.
\s5
\p
\v 5 देव तयार करत असलेल्या नव्या जगाचा ताबा देवदूतांकडे न देता, त्याउलट तो ख्रिस्ताकडे देण्यात आला आहे.
\v 6 ह्या बद्दल पवित्रशास्त्रात देवासोबत कोणीतरी कोठेतरी गंभीरतेने बोलले आहे, ते असे की,
\q मनुष्य प्राण्याची काय योग्यता आहे, की तू त्याची आठवण करावी.
\q तू मनुष्याची काळजी करावी इतका असा कोणीही योग्यतेचा नाही.
\s5
\p
\v 7 जरी त्याने मनुष्यास देवदूतांपेक्षा थोडेच कमी बनवले असले,
\q तरी त्याने ज्याप्रमाने एखाद्या राजाचा लोकसमूदाय आदर करतात त्याप्रमाने त्यांचा आदर केला.
\q
\v 8 तू सर्वकाही त्याच्या आधीन त्याच्या पायाखाली ठेवले आहे.
\q मुनष्यजाती प्रत्येकगोष्टीवर अधिकार करेल असे देवाने निर्धारित केले आहे.
\s5
\p
\v 9 तथापि, आम्ही येशूविषयी जाणतो की, जो देवदूतांपेक्षा थोड्याच कमी प्रमाणात या जगात आला. त्याने दु:ख सोसले आणि तो मरण पावला, ह्याच कारणास्तव देवाने त्याला सर्वात महत्वाची जागा दिली. येशू हा सर्व मानवजाती साठी मरण पावला ह्या कारणास्तव देवाने त्याला सर्व जगावर राजा असे केले. हे असे घडले कारण देव आपल्याप्रती फार दयाळू असा होता.
\p
\v 10 आपल्या करता येशू हा प्रत्येक गोष्टीत दु:ख सोसण्याद्वारे आणि मरणाद्वारे परिपूर्ण व्हावा असे देवाला योग्य वाटले. देवाने सर्व गोष्टींची निर्मीती केली, आणि तोच एक असा आहे की त्याच्यासाठी सर्व गोष्टी आहेत. कारण येशूच हा एक असा आहे की ज्याने देवाला आपणास तारावयास लावले.
\s5
\v 11 कारण, येशू, ज्याने देवाकरता त्याचे लोक वेगळे केले आणि त्याच लोकांना देवाने त्याच्यासमक्ष चांगले असे घोषीत केले, ते सर्व एकापासूनच म्हणजेच स्वत: देवापासून आहेत. या कारणामुळे तो त्यांना आपले भाऊ आणि बहिण म्हणायला लाजत नाही.
\v 12 स्तोत्रकार आपल्या स्तोत्रात असे म्हणतो की, ख्रिस्त देवाजवळ असे घोषीत करतो की,
\q तू किती महान आहेस असे मी माझ्या भावांना घोषीत करेन.
\q आणि विश्वासणाऱ्यांच्या मंडळीमध्ये मी तुझी स्तुति गाईन.
\p आणि दुसऱ्या एका वचनात संदेष्टा “ख्रिस्त देवाचे वर्णन करतो” त्याबद्दल लिहतो.
\q तो म्हणतो, मी त्याच्यावर भरवंसा ठेवीत जाईन.
\s5
\p
\v 13 आणि पुन: दुसऱ्या एका वचनात ख्रिस्त जे त्याच्या मुलांसारखे आहेत त्यांविषयी लिहीतो,
\q पाहा, मी व जी मुले मला देवाने दिली ती पण त्याच्यावर भरवंसा ठेवतील.
\p
\v 14 तर ज्यांना देवाने त्याची मुले होण्यास बोलावीले ती तर मनुष्यप्राणी होती, तेव्हा येशूही त्यांच्यासारखा मनुष्यप्राणी झाला. कारण मरणाच्या भयाने सैतानाने लोकांना ग्रासून टाकले आहे, परंतू ख्रिस्त हा मनुष्य झाला अशासाठी की त्याच्या मरण्याद्वारे आणि त्याद्वारे मृत्यूलाही जिंकण्याद्वारे सैतान हा सार्थ्यहीन व्हावा.
\v 15 येशूने हे अशासाठी केले की जे मरणाच्या भयाने ग्रासले होते त्या सर्वांच्या जीवाला सोडवावे आणि त्या सर्वांना मोकळे करावे.
\s5
\v 16 कारण येशू मनुष्य झाला, तो देवदूतांना मदत करण्यासाठी नव्हे, तर आपणासाठी जे देवावर आब्राहामा सारखा विश्वास ठेवतात त्यांच्याकरता तो मदत करू इच्छीतो.
\v 17 म्हणून देवाला येशूला अगदी आपल्या सारखे म्हणजेच भावासारखे निर्माण करायचे होते. यासाठी की लोकांच्या पापांबद्दल प्रायश्चीत्त करण्याकरता त्याने देवा संबंधीच्या गोष्टीविषयी दयाळू व विश्वासू असे प्रमूख याजक व्हावे. अशासाठी की लोकांच्या पापाकरता त्याने मृत्यूस स्विकारावे जेणेकरून देवासमोर त्यांना क्षमेस पात्र होण्यास मार्ग तयार करावा.
\v 18 कारण त्याची परिक्षा होत असता त्याने स्वत: दु:ख भोगले, म्हणून ज्याप्रमाणे आपण पापात भूलवले गेलो व ज्यांची परिक्षा होत आहे त्यांचे साहाय्य करायला तो समर्थ आहे.
\s5
\c 3
\p
\v 1 म्हणून विश्वासातील माझ्या प्रिय भावांनो, जे तुम्ही देवा करता बोलावलेले आणि त्याच्या करता निवडलेले, जो आमच्या करता देवाचा प्रेषीत आणि प्रमुख ज्यावर आपण विश्वास ठेवतो तो ख्रिस्त येशू याचे ध्यान करा.
\v 2 ज्याप्रमाणे मोशेने देवाची सेवा विश्वासयोग्यतेने केली व ज्याला आपण देवाचे घर असे म्हणतो, त्याचप्रामाणे त्याने देखील देवाला ज्याने त्याला नियूक्त केले होते त्याची सेवा विश्वासयोग्यतेने केली.
\v 3-4 तर आता ज्याप्रमाणे एखाद्या घराचा कोणीतरी बांधणारा असतो, तसेच देवाने सर्वकाही निर्माण केले. ज्याप्रमणाने जितक्याने घर बांधनाऱ्याला घरापेक्षा अधिक सन्मान आहे, तितक्याने येशू ख्रिस्त मोशे पेक्षाही राष्ट्रांद्वारे सन्मानास योग्य लेखलेला आहे.
\s5
\v 5 जसा एखादा चाकर आपल्या धन्याशी विश्वासयोग्य असतो, तसाच मोशेसूद्धा देवाच्या लोकांना मदत करण्याद्वारे देवाशी विश्वासयोग्य होता. तर ज्या गोष्टी पूढे सांगायच्या होत्या त्याबद्दल मोशे पारखला गेला.
\v 6 परंतू ख्रिस्त जो देवाचा पूत्र त्याच्या लोकांवर राज्य करणारा असेल, जर आम्ही त्याचे लोक धीराने ख्रिस्ताच्याठायी विश्वासयोग्य राहू आणि आत्मविश्वासाने देवाने जे आमच्या करता योजीले आहे त्याची अपेक्षा करू.
\s5
\v 7 आत्म्याने प्रेरित होऊन स्तोत्रकार इस्त्राएलाला दिलेल्या वचनात असे लिहतो,
\q जेव्हा देवाची वाणी तुम्ही ऐकाल,
\v 8 तेव्हा तुमच्या पूर्वजांप्रमाणे रानांत परिक्षेच्या दिवशी क्रोध चेतविण्याच्या वेळेस झाले तशी तुमची मने कठिण करू नका.
\s5
\p
\v 9 जेथे तुमच्या वाडवडिलांनी माझी परीक्षा पाहिली व मला कसोटीस लावले, अशासाठी की त्यांच्याप्रती मी सहणशील आहे की नाही ते पाहण्यासाठी, जरी तेथे त्यांनी चाळीस वर्षे सामर्थ्यशाली कामे पाहिली.
\v 10 म्हणून त्या पीढीवर मी रागवलो व म्हणालो, ते माझ्या सोबत कधीच विश्वासयोग्य राहिले नाही आणि त्यांनी कधीच जाणले नाही की माझ्याप्रमाणे त्यांनी आपले जीवन कसे जगावे.
\v 11 म्हणून रागाच्या भरात मी शपथ वाहून म्हणालो, हे लोक मी देऊ केलेल्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत.
\s5
\p
\v 12 यासाठी बंधूंनो, तुमच्यापैकी कोणाचीही अंत:करणे दुष्ट व अविश्वासू असू नयेत, ती जिवंत देवापासून दूर नेतात, ह्याचा परिणाम असा होतो की जो जीवंत देव त्याला तुम्ही नाकारता.
\v 13 उलट, तूम्हांस संधी आहे तोपर्यंत, प्रत्येक दिवशी एकमेकांना उत्तेजन द्या, यासाठी की तुमच्यापैकी कोणाचीही पापामुळे फसगत होऊन तुमची अंत:करणे कठीण होऊ नयेत.
\s5
\v 14 कारण आपण सर्व जण ख्रिस्तामध्ये त्याच्यावरील विश्वासाचे वाटेकरी आहोत. आम्ही सुरुवातीला धरलेला आमचा विश्वास मरेपर्यंत दृढ धरून राहवा.
\v 15 स्तोत्रकार देवाचे वचन स्तोत्रात लिहीतो, ते असे की,
\q तर आता मी तूमच्याशी बोलत असताना जेव्हा तूम्ही मला ऐकाल, तेव्हा ज्याप्रकारे तूमच्या वाडवडीलांनी माझ्याशी बंड करून माझ्या आज्ञा मोडल्या त्याप्रकारे करू नका.
\s5
\p
\v 16 लक्षात घ्या ज्यांनी देवाची वाणी ऐकली पण त्याच्याविरुद्ध बंड केले असे कोण होते? जरी त्यांनी देवाची वाणी ऐकली तरी ते तेच लोक नव्हते का, ज्यांना मोशेने मिसर देशातून बाहेर नेले होते?
\v 17 आणि लक्षात घ्या की तो कोणावर चाळीस वर्षे रागावला होता, ते सर्व तेच नव्हते काय? ज्यांनी पाप केले आणि ज्यांची प्रेते अरण्यात पडली होती.
\v 18 आणि लक्षात घ्या कोणाविषयी देवाने अशी शपथ वाहिली की ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार नाहीत; ज्यांनी त्याच्या आज्ञा मोडल्या तेच नव्हते काय?
\v 19 तर, त्या उदाहरणावरून आपल्याला हे कळते की ते लोक देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी त्यांच्या अविश्वासामुळे येऊ शकले नाहीत. जीथे देव त्यांना विसावा देणार होता.
\s5
\c 4
\p
\v 1 देवापासून मिळालेले अभिवचन जे त्याच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठीचे आहे, म्हणून तुमच्यापैकी कोणीही ते चुकवू नये म्हणून काळजी घ्या.
\v 2 कारण आम्हालासुद्धा देवाच्या विसाव्याबद्दल येशूकडून सुवार्ता सांगितली गेली आहे, ज्याप्रमाणे ती इस्राएल लोकांना सांगण्यात आली होती की ते कनान देशात विसावा पावतील. परंतु जो संदेश त्यांनी ऐकला त्यापासून त्यांना फायदा झाला नाही कारण त्यांनी यहोशवा आणि कालेबा प्रमाणे विश्वास ठेवला नाही, तर ज्याअर्थी आपण देवावर भरवसाच ठेवणार नाही तर येशू ख्रिस्ताबद्दलची सुवार्ता आपल्यासाठी मददगार ठरणार नाही.
\s5
\v 3 जे आम्ही विश्वास ठेवला ते देवाच्या सांगितल्याप्रमाणे त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार आहोत. जसे देवाने म्हटले आहे.
\q “म्हणून मी माझ्या रागाच्या भरात इस्त्राएलाच्या लोकांविरुध्द अशी शपथ वाहून म्हणालो, ‘ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत.’”
\p देवाचे जगाच्या निर्मितीपासूनचे काम संपलेले होते तरी तो असे म्हणाला.
\v 4 सहा दिवसांनी जगाची निर्मिती केल्यावर सातव्या दिवशी शास्त्रवचनांमध्ये काय लिहिले आहे, हे सत्य आहे हे दर्शविते, कारण पवित्र शास्त्रात तो सातव्या दिवसाबद्दल असे बोलला आहे की,
\q “आणि सातव्या दिवशी देवाने त्याच्या सर्व कामापासून विश्रांती घेतली.”
\p
\v 5 परंतु, मी पूर्वी सांगितलेल्या संदर्भात देवाने इस्राएलांविषयी काय म्हटले ते पुन्हा लक्षात ठेवा आणि पुन्हा या वचनांमध्ये तो काय म्हणतो,
\q “ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीही प्रवेश करणार नाहीत.”
\s5
\p
\v 6 काही लोक देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी आत जाऊ शकतात, परंतू इस्राएली लोक ज्यांना अगोदर सुवार्ता सांगण्यात आली होती त्यांचा त्यांच्या अविश्वासमुळे त्यात प्रवेश झाला नाही.
\v 7 परंतू आमच्यासाठी देवाने पुन्हा एक वेळ निश्चित केली आहे, ती वेळ “आज” आहे, अगोदरच सांगितलेल्या शास्त्रभागामध्ये म्हटल्याप्रमाणे देव त्या दिवसाविषयी पुष्कळ वर्षांनी दावीदाद्वारे बोलला,
\q “आज, जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर आपली अंत:करणे कठीण करु नका.”
\s5
\p
\v 8 कारण जर यहोशवा त्यांना देवाने दिलेल्या विसाव्याच्या ठिकाणी घेऊन गेला असता, तर देव पुन्हा विसाव्यात नेण्याबद्दल बोलला नसता. तर आपल्याला कळते की देव दुसऱ्या विसाव्या बद्दल बोलत आहे जीथे काही लोक सर्वकाळासाठी विसावा पावतील.
\v 9 म्हणून ज्याप्रकारे देवाने सर्वकाही निर्माण करून सातव्या दिवशी विसावा घेतला, त्याचप्रकारे एक अशी वेळ येत आहे जीथे देवाचे लोक सर्वकाळासाठी विसावा पावतील.
\v 10 कारण जो कोणी देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करतो, तो त्याच्या स्वतःच्या कामापासून विसावा घेतो. ज्याप्रमाणे देवाने त्याच्या कामापासून विसावा घेतला होता.
\v 11 म्हणून त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु या. यासाठी की, कोणीही इस्राएल लोकांनी आज्ञाभंग केल्याप्रमाणे त्यांचे अनुकरण करू नये.
\s5
\v 12 कारण देवाचे वचन जिवंत आणि कार्य करणारे आहे आणि कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा अधिक धारदार आहे. ते आपला आत्मा, जीव, सांधे, आणि मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आहे. ते अंत:करणाचे विचार व कल्पना यांचे परीक्षक असे आहे.
\v 13 आणि कोणतीही अशी निर्मित गोष्ट नाही की जी त्याच्यापासून लपलेली आहे आणि ज्याच्यापाशी आम्हांला सर्व गोष्टींचा हिशेब द्यावयाचा आहे. त्याच्यासमोर सर्व गोष्टी उघड व स्पष्ट अशा आहेत.
\s5
\v 14 म्हणून, ज्याअर्थी आम्हाला येशू देवाचा पुत्र हा महान मुख्य याजक लाभला आहे व जो स्वर्गात गेला आहे, असा जो विश्वास आपण गाजवितो तो अखंडपणे भक्कम धरू या.
\v 15 कारण आपल्याला लाभलेला महान याजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूति दर्शविण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे निष्पाप राहिला.
\v 16 म्हणून आपण त्याच्या कृपेच्या सिंहासनाजवळ ठाम निर्धाराने जाऊ या. यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून आम्हाला दया व कृपा प्राप्त व्हावी.
\s5
\c 5
\p
\v 1 प्रत्येक मुख्य याजकाची निवड लोकांमधून होते. आणि लोकांच्या वतीने त्यांच्या पापांसाठी जी दाने व अर्पणे देवाला सादर केली जातात, त्या कामाकरिता मुख्य याजक नेमलेला असतो.
\v 2 प्रत्येक मुख्य याजक हे जे चुका करतात व जे अज्ञानी आहेत त्यांच्याशी सौम्यपणे वागण्यास असमर्थ असतो कारण तो स्वत: दुबळा असतो.
\v 3 आणि त्या दुबळेपणामुळे त्याने त्याच्या पापांसाठी तसेच लोकांच्या पापांसाठी अर्पणे केलीच पाहिजेत.
\s5
\v 4 आणि कोणीही मुख्य याजकपणाचा बहुमान स्वतःच्या पुढाकाराने घेत नसतो, तर अहरोनाला होते तसे त्यालाही देवाचे पाचारण असणे आवश्यक असते.
\v 5 त्याचप्रमाणे, ख्रिस्ताने मुख्य याजक होण्याचा गौरव स्वत:हून आपणावर घेतले नाही, परंतु देव ख्रिस्ताला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस आज मी तुला जन्म दिला आहे.”
\s5
\v 6 दुसऱ्या शास्त्रभागात तो असे म्हणतो, “मलकीसदेकाप्रमाणे तू अनंतकाळासाठी याजक आहेस.”
\s5
\v 7 येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या काळात, त्याने देवाकडे मोठ्याने ओरडून आणि रडून प्रार्थना व विनंत्या केल्या. जो देव त्याला मृत्युपासून वाचवू शकत होता. आणि देवाविषयीच्या त्याच्या सन्माननीय आदरामुळे येशूच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या.
\v 8 जरी ख्रिस्त देवाचा पुत्र होता, तरी त्याने ज्या गोष्टी सोशिल्या त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला.
\s5
\v 9 आणि नंतर त्याला परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी अनंतकाळच्या तारणासाठी तो उगम झाला
\v 10 व मलकीसदेकाच्या संप्रदायास अनुसरून देवाकडून तो प्रमुख याजक म्हणून नियुक्त झाला.
\v 11 याविषयी सांगण्यासारखे पुष्कळ आहे, पण तुम्हांला ते स्पष्ट करणे कठीण आहे. कारण तुम्ही ऐकण्यात खूप मंद झाला आहात.
\s5
\v 12 आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला हवे होते, तरी देवाच्या शिक्षणाचे प्राथमीक धडे पुन्हा तुम्हाला कोणीतरी शिकविण्याची गरज आहे. तुम्हांला दूधाची गरज आहे, सकस अन्राची नव्हे!
\v 13 कारण जो कोणी अजून दुधावरच जगतो त्याला वचनाच्या पोक्त शिक्षणाची काहीही माहिती नसते. कारण अजून तो बाळच असतो.
\v 14 परंतु याउलट सकस अन्र हे प्रौढांसाठी योग्य असते. ख्रिस्ती लोकांची इंद्रिये ख्रिस्ती जीवनाच्या सरावामुळे चागंले व वाईट यांतील भेद ओळखण्यास तयार झालेली असतात.
\s5
\c 6
\p
\v 1-3 म्हणून आपण जे विश्वासी ख्रिस्ताविषयीची प्राथमिक माहिती जी आपण पहिल्याने शिकलो ती मागे सोडून देऊ व प्रौढतेप्रत जाऊ. जसे की आपण पाप करणे कसे थांबवावे आणि देवामध्ये विश्वास कसा कराव्या ह्या अशा गोष्टी. त्यात काही महत्वाच्या गोष्टी देखील आहेत ज्या तुम्हास शिकवण्यात आल्या जसे की, पुन्हा एकदा देवावरचा विश्वास, बाप्तिस्म्याविषयीची शिकवण, डोक्यावर हात ठेवणे, मृतांचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचा न्यायनिवाडा, देवावरील विश्वास, आपल्या निर्जीव गतजीवनाचा पश्चाताप या मूलभूत गोष्टींचा पाया आपण पुन्हा घालू नये. आणि खचित जर देवाची इच्छा असेल तर आपण त्यावर बोलू. परंतू आता मात्र तुम्ही अशा गोष्टी बोलायला पहिजे ज्या समजण्यास कठीण आहेत. ह्या अशा गोष्टी आहेत ज्या काहीही झाले तरी आपला येशू वरिल विश्वास डळमळू देणार नाहीत.
\s5
\p
\v 4 असे करणे का महत्वाचे हे मी तुम्हाला समजावून सांगतो. ख्रिस्ताबद्दलचा संदेश काही लोकांना एका क्षणात कळतो की देवाला आपल्यास क्षमा करणे आणि ख्रिस्ताला आपल्यावर प्रेम करणे कसे होते, त्याच बरोबर ते पवित्र आत्म्याचे दानही प्राप्त करतात.
\v 5 देवाचे वचन हे चांगले आहे असे यांची त्यांना स्वत: जाणीव होते आणि देव भविष्यकाळात सामर्थ्यशाली कार्य करणार असे ही ते शिकतात.
\v 6 परंतू अशा स्थितीत, जर ह्या लोकांनी ख्रिस्तास नाकारले, तर त्यांना पापकरण्यापासून थांबण्यासाठी आणि ख्रिस्तामध्ये पून्हा विश्वास धरण्यास त्यांचे मन कोणालाही वळवता येणे अशक्य आहे. कारण त्याच्या स्वतःच्या हानीकरता ते देवाच्या पुत्राला पुन्हा वधस्तंभावर खिळतात व लोकांच्या अवकृपेच्या समोर त्याला आणतात.
\s5
\p
\v 7 ह्याचा विचार करा, जी जमीन वेळोवेळी पडणाऱ्या पावसाचे पाणी पिते व ज्या लोकांकडून तिची लागवड होते त्यांच्यासाठी धान्य उपजविते तिला देवाकडून आशीर्वाद प्राप्त होतो.
\v 8 पण अशा लोकांचे काय जे देवाला अनुसरत नाहीत, हे लोक अशा जमीनी प्रमाणे आहेत, जी जमीन काटे व कुसळे उपजविते, ती निरुपयोगी आहे व तिला शाप मिळण्याची भिति असते; तिचा अग्नीने नाश होईल.
\s5
\p
\v 9 माझ्या प्रिय मित्रांनो ख्रिस्ताला नाकारू नका ह्या बद्दल मी तुम्हास चेतावनी देत आहे हे तुम्ही पाहतच आहा. त्याचसोबत, आम्ही खरोखर तुमच्याकडून अधिक चांगल्याची अपेक्षा करतो. आम्हांला अशी खात्री आहे की, ज्यांना देवाने तारले अशांसाठी तुम्ही चांगल्या गोष्टी करत आहा, असा आमचा विश्वास आहे.
\v 10 कारण तुम्ही केलेली पवित्रजनांची सेवा, त्या सेवेत तुम्ही अजूनही दाखवीत असलेले सातत्य, तुमचे काम व त्याच्या लोकांना दानाद्वारे व इतर मदत करण्याद्वारे तुम्ही त्याच्यावर केलेले प्रेम हे सर्व विसरण्याइतका देव अन्यायी नाही.
\s5
\p
\v 11 पण आमची अशी इच्छा आहे की, तुमच्या आशेच्या पूर्तीची पूर्ण खात्री होण्याकरिता देवाने जे काही तुम्हासाठी ठेवले आहे, ते तुमच्यातील प्रत्येकाने शेवटपर्यंत मिळण्याची आशा धरावी.
\v 12 आम्हांला असे वाटते की, तुम्ही आळशी बनू नये, तर जे लोक विश्वासाद्वारे व धीराद्वारे देवाने दिलेल्या अभिवचनाचे फळ मिळवितात अशा लोकांचे अनुकरण करणारे तुम्ही व्हावे.
\s5
\p
\v 13 जेव्हा देवाने अब्राहामाला वचन दिले, तेव्हा त्याच्यापेक्षा कोणी मोठा नसल्याने देवाने स्वतःच्याच नावाने शपथ वाहिली.
\v 14 तो आब्राहामाला म्हणाला, “मी तुला भरपूर आशीर्वाद देईन आणि मी तुझ्या वंशजांना सतत बहुगुणित करीत राहीन.”
\v 15 त्यानंतर आब्राहामाने धीराने वाट पाहिल्यानंतर देवाने जे वचन त्याला दिले होते ते त्याला प्राप्त झाले.
\s5
\p
\v 16 लोक, नेहमी शपथ वाहताना आपल्यापेक्षा जो मोठा असतो त्याच्या नावाचा उपयोग करतात, अशासाठी की जी त्याने शपथ वाहिली ती पूर्ण न केल्यास त्या मोठ्या व्यक्तीद्वारे त्याला शिक्षा करावी व सर्व वादाचा शेवट करावा.
\v 17 आपल्या योजनेचे कधीही न बदलणारे स्वरूप वचनाच्या वारसदारांना कळावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणून त्याने वाहिलेल्या शपथेच्या द्वारे याबाबत हमी दिली.
\v 18 देवाने असे केले यासाठी की, ज्यांच्याविषयी लबाडी करणे देवासाठी अशक्य आहे अशा दोन न बदलणाऱ्या कृतींमुळे जे आपण आश्रयाकरिता निघालो आहोत, त्या आपणांस त्या आशेसंबधाने अधिक उत्तेजन प्राप्त व्हावे. म्हणून आपणास त्यावर विश्वास करण्यास आणि जे काम त्याने दिले ते पूर्ण करण्यास प्रत्येक गोष्ट कारणीभूत आहे.
\s5
\p
\v 19 देवाने आमच्यासाठी जे काही करण्याचे वचन दिले आहे त्याची आम्ही आत्मविश्वासाने आशा करतो. आम्हांला ही आशा जणू काय भक्कम, सुरक्षित अशा जहाजाच्या नांगरासारखी आहे जी आम्हाला एका ठिकाणी स्थिर उभे राहण्यास मदत करते. जो आम्हाला स्थिर करेल असा तो येशू आहे, ज्यावर आम्ही विश्वासाने आशा धरतो. ह्या कारणस्तव तो, देव जो मंदिराच्या पडद्यामागील पवित्र अशा आतील बाजूस विराजमान असतो, त्याजकडे जाणाऱ्या एका मोठ्या याजकाप्रमाणे आहे.
\v 20 जेथे येशू आमच्यापुढे धावत आमच्यासाठी आत गेलेला अशासाठी की त्या ठिकाणी आपणसुद्धा देवाबरोबर आत प्रवेश करावा. तो मलकीसदेकाप्रमाणे अनंतकाळासाठी मुख्य याजक झाला आहे.
\s5
\c 7
\p
\v 1 तर आता मी मलकीसदेक या मनुष्याबद्दल बोलीन, हा मलकीसदेक शालेमाचा राजा होता आणि तो सर्वोच्च देवाचा याजक होता. राजांचा पराभव करून अब्राहाम परतत असताना मलकीसदेक त्याला भेटला. मलकीसदेकाने अब्राहामाला आशीर्वाद दिला.
\v 2 व अब्राहामाने आपल्या सर्वस्वाचा दहावा भाग जो त्याने युद्धात जिंकला होता तो मलकीसदेकाला दिला. तर आता मलकीसदेकाच्या नावाचा अर्थ “नीतिमत्त्वाचा राजा” त्याचप्रमाणे तो शालेमाचा राजा असल्याने त्याचा अर्थ “शांतीचा राजा” असा होतो.
\v 3 शास्त्रवचनात मलकीसदेकाचे आईवडील किंवा त्याचे पूर्वज, त्याचा जन्म किंवा मृत्यूची नोंद आढळत नाही. देवपुत्राशी तो मिळताजुळता असल्यामुळे तो देखील अनंतकाळासाठी याजकच राहणार आहे.
\s5
\p
\v 4 यावरून तुम्ही पाहता की, मलकीसदेक किती महान पुरुष होता! मूऴ पुरुष अब्राहाम यानेसुद्धा आपल्या लुटीतील दहावा भाग त्याला दिला.
\v 5 आणि लेवीचे वंशज जे याजक झाले, त्यांनी मोशेच्या नियमशास्त्रातील आज्ञेप्रमाणे लोकांकडून, जरी ते अब्राहामाचे वंशज होते तरी, दशांश गोळा करावा.
\v 6 परंतू मलकीसदेक लेव्याच्या वंशजांपैकी नव्हता, पण तरीही त्याने अब्राहामाकडून दशमांश घेतला. आणि ज्याला देवाकडून अभिवचन मिळाले होते, त्या अब्राहामाला त्याने आशीर्वाद दिला.
\s5
\p
\v 7 तर आता हे प्रत्येकाला कळाले आहे की, ज्याप्रमाणे मलकीसदेकाने अब्राहामाला आशिर्वाद दिला, त्याचप्रमाणे श्रेष्ठ व्यक्तीने कनिष्ठ व्यक्तीला आशीर्वाद द्यावा.
\v 8 एका बाबतीत म्हणजेच लेव्यांच्या बाबतीत, जो मनुष्य मरतो तो दशमांश गोळा करतो, पण दुसऱ्या बाबतीत म्हणजे मलकीसदेकाच्या बाबतीत, पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे दशमांश अशा व्यक्तीने घेतला की जी अजूनही जिवंत आहे.
\v 9 स्वत: लेवी आणि त्याच्यापासून त्याचे याजक वंश, जे लोकांपासून दशमांश गोळा करीत, प्रत्यक्षात तेही अब्राहाम त्यांचा पूर्वज याप्रमाणे मलकीसदेकाला दशमांश देत. जरी याजक व लेवी हे अब्राहमाचे वंशज असून ते मलकीसदेकास दशमांश देत असत, तरी मलकीसदेक हा अब्राहमापेक्षा थोर समजला गेला.
\v 10 कारण जेव्हा मलकीसदेक अब्राहामाला भेटला त्यावेळी लेवी आणि त्याचा वंश जणूकाय त्याचा पूर्वज अब्राहाम याच्या शरीरात बीजरुपाने होता हे खचितच आहे.
\s5
\p
\v 11 देवाने त्याच्या लोकांस नियम दिले त्याच समयी त्याने लेवी वंशजांच्या याजकीय पद्धतीसाठीहि नियम दिले. म्हणून जर अहरोन आणि त्याचे पूर्वज लेवी यांच्याकडून याजक आले असते तर, कदाचीत त्यांनी देवाचे आज्ञाभंग करणाऱ्या लोकांची देवाने क्षमा करावी यासाठी मार्ग प्रदान केला असता आणि ते याजकच पूरेसे असते. याचा अर्थ असता की मलकीसदेकाप्रमाणे याजकाची काही गरजच भासली नसती.
\v 12 परंतू आपणाला ठाऊक आहे ते याजक पूरेसे असे नाहीत, कारण एक नविन याजक जो मलकीसदेकाप्रमाणे आहे, तो आला आहे. आणि जेव्हा देवाने त्या नविन याजकास नियूक्त केले, त्याने नियमशास्त्रात बदलसुद्धा केले.
\s5
\p
\v 13 कारण या सर्व गोष्टी ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, तो येशू असून तो लेवी वंशजाचा नव्हता. याउलट तो यहूदा वंशातून, ज्या वंशातून एकानेही याजक म्हणून सेवा केली नसेल त्या वंशातून आला.
\v 14 शास्त्रवचन स्पष्टपणे हे सांगते की, मोशेने कधीही असे म्हटले नाही की यहूदा वंशातील कोणी याजक बनतील.
\s5
\p
\v 15 आणखी आपल्याला पूढे पाहायला मिळते की, याजक जे लेवीय वंशातून आलेले आहेत ते पूर्ण असे नव्हते, तर जेव्हा या दुसऱ्या प्रकारचा नवीन याजक मलकीसदेकासारख येतो तेव्हा ही गोष्ट आणखी स्पष्ट होते.
\v 16 तो याजक म्हणजे येशू होय, तो याजक बनला, परंतु लेवीच्या वंशात असण्याविषयी देवाच्या नियमाची काय आवश्यकता होती हे त्याने पूर्ण केले म्हणून नव्हे. याउलट, ज्याला कोणीही नष्ट करू शकत नाही अशा जीवनाच्या सामर्थ्याच्या आधारे त्याला याजक करण्यात आले.
\v 17 कारण अशाप्रकारे त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे:
\q “तू मलकीसदेकासारखा अनंतकाळासाठी याजक आहेस.”
\s5
\p
\v 18 देवाने याजकांसाठी प्रथम जे काही आज्ञापीले होते, ते मागे घेतले, कारण ते याजक पापी लोकांस पालटून पवित्र करण्यास असमर्थ होते.
\v 19 कारण मोशेला दिलेल्या नियमांचे पालन करून चांगले व्हावे असा कोणीही नव्हता. तर आता देवाने एक अधिक चांगली आशा आम्हांला दिली आहे, कारण त्याच्यामुळे आम्ही देवाजवळ येतो.
\s5
\p
\v 20 आणखी देवाने येशूला मुख्य याजक करताना शपथ वाहिली, आणि जेव्हा इतरांना याजक करण्यात आले तेव्हा त्यांना शपथेशिवाय याजक करण्यात आले.
\v 21 परंतू त्याने येशू हा याजक म्हणून जेव्हा नियूक्त केले, तेव्हा स्तोत्रकार असे म्हणतो.
\q ‘प्रभूने शपथ वाहिली आहे,
\q आणि तो आपले मन बदलणार नाही:
\q तूच अनंतकाळचा याजक आहेस.
\s5
\p
\v 22 “याकारणास्तव, येशूने स्वतः अशी हमी दिली की नवीन करार हा जून्या करारा पेक्षा श्रेष्ठ असेल.”
\p
\v 23 आणि याजक हे मरणामुळे पुढे याजकपद चालवू शकत नव्हते, आणि म्हणून इतर याजक मरणाऱ्या याजकाची जागा घेत.
\v 24 परंतू येशूचे याजकपद कायमचे आहे, कारण तो सर्वकाळ राहणारा मुख्य याजक असा आहे.
\s5
\p
\v 25 म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे. कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास आणि त्यांना तारावयास तो सदैव जिवंत आहे.
\p
\v 26 म्हणून येशू अगदी आपल्या गरजांस अनुरूप असा मुख्य याजक आहे, ज्याची आम्हाला गरज आहे. तो पवित्र, निष्कपट आणि निष्कलंक आहे; दोषविरहित आणि शुद्ध आहे, देवाने त्याला पाण्यांपासून वेगळे केलेले आहे, व त्याला स्वर्गातील उंच ठिकाणी ठेवले आहे.
\s5
\p
\v 27 दुसरे मुख्य याजक जसे दररोज किंवा प्रत्येक वर्षी अर्पणे अर्पण करतात तसे करण्याची त्याला गरज नाही. जे इतर याजक पहिल्यांदा त्यांच्या पापांसाठी व मग लोकांच्या पापांसाठी जसे अर्पण करतात तसे त्याला करण्याची गरज नाही. परंतू त्याने जेव्हा स्वत:ला अर्पण केले त्याचवेळी एकदाच व कायमचेच लोकांच्या पापासाठी अर्पण केले आहे.
\v 28 आपणास येशू सारखा याजक पाहिजे, कारण नियमशास्त्रात लिहल्या प्रमाणे ज्या याजकास नियूक्त केले, त्यांनी मानवी दुर्बलता असलेल्या मनुष्याप्रमाणे पापे केलीत. परंतू मोशेला नियमशास्त्र दिल्यानंतर देवाने शपथ वाहिली की त्याचा पुत्र येशू हा सर्वकाळासाठी परिपूर्ण असा मुख्य याजक असेल.
\s5
\c 8
\p
\v 1 सर्वात महत्वाची गोष्ट जी मी लिहली आहे ती म्हणजे, आम्हाला स्वर्गात देवाच्या बाजूला, उच्च अशा ठिकाणी बसून राज्य करणारा असा एक याजक लाभलेला आहे.
\v 2 आणि तो मोशेने बनवलेल्या मानवनिर्मित मंडपात नव्हे, तर प्रभु परमेश्वारने बनविलेल्या खऱ्याखुऱ्या मंदिराच्या परमपवित्रस्थानात तो मुख्य याजकाची सेवा करतो.
\s5
\p
\v 3 देवाने प्रत्येक मुख्य याजकास, लोकांच्या पापांसाठी दाने व अर्पणे सादर करण्यास नियूक्त केले आहे. म्हणून ख्रिस्त हा मुख्य याजक झाला आणि या याजकालादेखील काहीतरी सादर करणे जरुरीचे होते.
\v 4 कारण आतापर्यंत तेथे अगोदरच्या नियमशास्त्राप्रमाणे दानांचे अर्पण करणारे याजक होते, म्हणून ख्रिस्त जर या पृथ्वीवर राहिला असता तर, तो कधीच मुख्य याजक झाला नसता.
\v 5 यरूशलेमधील याजक हे, स्वर्गातील ख्रिस्त जे काही करत असे त्याची नक्कल होती. हे असे का आहे कारण, जेव्हा मोशे परमेश्वराचा मंडप घालीत असताना, परमेश्वराने मोशेला जो आदेश दिला, तशी ही सेवा आहे, कारण देव म्हणाला, “तुला पर्वतावर मी जे सांगितले आहे अगदी त्याप्रमाणेच प्रत्येकगोष्ट कर.”
\s5
\p
\v 6 परंतु ख्रिस्त हा यहूदी याजकांच्या सेवेहून खूप चांगल्या प्रकारची सेवा करत आहे. त्याचप्रकारे येशू ज्या नवीन कराराचा मध्यस्थ आहे, तो करार मोशेला दिलेल्या अगोदरच्या कराराहून अधिक वरच्या दर्जाचा आहे, कारण तो करार अधिक चांगल्या वचनांच्या पायावर उभा आहे.
\p
\v 7 देवाला हा नविन करार तयार करण्याची गरज भासली, कारण पूर्वीच्या कराराद्वारे सर्वकाही ठिक झालेले नव्हते.
\s5
\p
\v 8 कारण इस्त्राएली लोक देवाच्या आज्ञा पाळत नसल्याने, देवाला लोकांमध्ये दोष आढळला, त्याला एक नविन करार पाहिजे होता. त्या कराराबद्दल संदेष्टा असे म्हणतो,
\q “परमेश्वर म्हणतो, असे दिवस येत आहेत,
\q जेव्हा मी इस्राएल लोकांबरोबर नवा करार करीन व यहूदाच्या लोकांबरोबर नवा करार करीन.”
\q
\v 9 ज्याप्रमाणे मी त्यांच्या पूर्वजांशी केला तशा प्रकारचा हा करार असणार नाही.
\q कारण त्या दिवशी मी त्यांच्या हाताला धरून मिसर देशातून बाहेर आणले, ते माझ्यासोबत केलेल्या कराराशी विश्वासू राहिले नाही, त्यामुळे मी त्यांच्याकडे पाठ फिरवली.
\s5
\q
\v 10 परमेश्वर म्हणतो, “पहिला करार संपल्यावर मी इस्राएल लोकांबरोबर असा करार करीन;
\q त्यांना माझे नियम समजावे असे मी त्यांना सक्षम करीन,
\q आणि त्यांनी त्या नियमाचे मनापासून पालन करावे, त्यासाठी त्यांना सामर्थ देईन.
\q मी त्यांचा देव आणि ते माझे लोक होतील.
\s5
\q
\v 11 तुमच्या प्रभूला ओळखा असे एखाद्या मनुष्याने आपल्या बंधूला अथवा आपल्या देशबांधवाला सांगण्याची गरज पडणार नाही,
\q कारण त्यांच्यातील लहानापासून थोरापर्यंत सर्वजण मला ओळखतील.
\q
\v 12 कारण मी दयाळूपणे यापुढे त्यांनी केलेल्या वाईटाबद्दल त्यांच्या अपराधाची क्षमा करीन.
\q आणि यापूढे त्यांच्या पापाबद्दल मी त्यांना कधीही दोषी ठरवणार नाही.”
\s5
\p
\v 13 ज्याअर्थी देवाने असे म्हटले की तो नविन करार तयार करत आहे, तर आपल्याला हे माहीत आहे की त्याने जूना रद्द केला आहे, लवकरच तो नाहीसा असा होईल.
\s5
\c 9
\p
\v 1 पहिल्या करारात देवाच्या उपासनेसंबंधी काही नियम त्याने लोकांना दिले होते, आणि त्याने सांगितले होते की त्याची उपासना करण्यास एक पवित्रस्थान तयार करा.
\v 2 कारण दीपस्तंभ व अर्पणाच्या विशेष भाकरी ठेवण्यासाठी पहिल्या मंडपामध्ये एक मेज ठेवण्यात आला होता. हा जो पहिला मंडप जो इस्त्राएलींनी बनवला होता त्याला पवित्र स्थान असे म्हणतात.
\s5
\p
\v 3 पवित्र स्थानात दुसऱ्या पडद्यामागे एक आणखी ठिकाण होते, त्याला परमपवित्रस्थान असे म्हणत.
\v 4 त्यामध्ये ऊद जाळण्यासाठी सोन्याची वेदी आणि कराराचा कोष होती. हा कोष संपूर्ण सोन्याने मढवलेला होता त्या कोषात एका सोन्याच्या भांड्यात ज्याला ते मान्ना म्हणत तो होता. तसेच त्यात अहरोनाची काठी जिला पाने फुटलेली, ज्याचा अर्थ देवच खरा याजक होतो ती काठी व कराराच्या दगडी पाट्या होत्या.
\v 5 या कोषावर देवाचे गौरवाचे कोरलेले करूबीम दयासनावर सावली करीत होते, जेथे लोकांच्या पापा करता मुख्य याजक रक्त शिंपडण्याद्वारे त्यांचे प्रायश्चीत्त करत होता ते होते, परंतु या गोष्टींबाबत सविस्तर मी तुम्हास लिहू शकत नाही.
\s5
\p
\v 6 या व्यवस्थेनुसार सर्वकाही नीट पार पडल्यानंतर, यहूदी याजक आपल्या कर्तव्यकर्मासाठी मंडपाच्या बाहेरील भागात प्रवेश करीत असत.
\v 7 पण केवळ एकटा मुख्य याजकच वर्षातून एकदाच आतील खोलीत जाई, शिवाय तो रक्त घेतल्याशिवाय आत जात नसे. ते रक्त तो स्वतःच्या पापांसाठी व इस्त्राएली लोकांच्या पापांसाठी त्यांच्याकडून कळत नकळत झालेल्या पापांसाठी अर्पण करायला आत जात असे.
\s5
\v 8 याद्वारे पवित्र आत्मा हे दर्शवितो की, पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत साधारण व्यक्तीला परमपवित्रस्थानात जाण्याचा मार्ग खुला नाही. त्याच प्रकारे, यहूद्यांच्या जून्या अर्पणाच्या पद्धतीद्वारे साधारण लोकांस देवाने त्याच्या परमपवित्रस्थानात येण्याचा मार्ग त्याने दाखवला नव्हता.
\v 9 कारण पवित्र मंडपात अर्पण केलेल्या भेटवस्तू किंवा अर्पणे हे त्या व्यक्तीला वाईट काय आणि चांगले काय किंवा चांगले केल्याने देव प्रसंन्न होईल काय ही समज त्याला येत नाही.
\v 10 हे विधी केवळ बाह्य बाबी म्हणजे अन्र व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या औपचारिक धुण्याबाबत संबंधित आहेत. हे सर्व विधी रद्द झाले कारण देवाने आपल्या सोबत एक नविन करार केला आहे. हा नविन करार एक उत्तम प्रकारचा विधी आहे.
\s5
\p
\v 11 परंतू जेव्हा ख्रिस्त हा मुख्य याजक म्हणून आला, तेव्हा त्याने आपल्या जवळ ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घेऊन आला. त्यानंतर तो जो मनुष्याच्या हातांनी बांधला नव्हता, असा पवित्रमंडप म्हटलेल्या देवाच्या पवित्र ठिकाणी गेला.
\v 12 जेव्हा महायाजक प्रत्येक वर्षी मंडपाच्या आतील खोलीत जात असे तेव्हा, तो अर्पण म्हणून बकऱ्याचे किंवा वासराचे रक्त घेऊन जात असे, परंतू ख्रिस्ताने असे केले नाही, तर तो आपले स्वत:चेच रक्त घेऊन परमपवित्रस्थानात गेला; व त्याने सर्व काळासाठी स्वत:ला कृसावर एकदाच अर्पण करून आपल्याला अनंतकाळासाठी तारण मिळवून दिले.
\s5
\p
\v 13 कारण बकरे व बैल यांचे रक्त; तसेच जीला पूर्णपणे जाळलेले असेल अशा लाल रंगाच्या कालवडीच्या राखेद्वारे गाळलेले पाणी त्यांच्यावर शिंपडावे, अशा तऱ्हेच्या विधी करून मग ते म्हणत की आता देव आम्हा लोकांची आराधना मान्य करेल.
\v 14 जर हे सर्व खरे असेल तर ख्रिस्ताचे रक्त देवासाठी त्याहून कितीतरी अधिक परिणामकारक अर्पण ठरले आहे, ख्रिस्ताने सार्वकालीक आत्म्याद्वारे आपल्या स्वत:चे डागविरहित आणि परिपूर्ण असे अर्पण केले. तो कृसावर खिळला गेल्याने, देवाने आपल्या पापांची, जे पाप आपल्याला सार्वकालीक मरण देणार होते त्यापासून क्षमा केली. आता आपण कधीच पापात पडलो नाही असे शुद्ध झालो आहोत व त्याद्वारे आपण जिवंत देवाची उपासना करू शकतो.
\p
\v 15 ख्रिस्त आपल्या करता मरण पावल्याने, त्याने देवा संगती एक नविन करार केला आहे. कारण आपण पहिल्या कराराद्वारे देवाला संतोषविण्याचा प्रयत्न करत होतो, परंतू तरीहि आपण दोषी असे ठरत होतो. म्हणून जेव्हा ख्रिस्त कृसावर मरण पावला तेव्हा त्याने आमच्या पापांपासून होणारा मृत्यू यापासूम स्वतंत्र केले. याचा परिणाम असा झाला की, देवाने ज्यांना बोलावले त्या आपणासाठी त्याने जे सर्वकालचे वचन दिले होते ते आपणास मिळणार आहे.
\s5
\p
\v 16 करार हा मृत्यूपत्रासारखा आहे, जेथे मृत्यूपत्र केलेले आहे तेथे ते करून ठेवणाऱ्याच्या तरतुदी लागू करण्यास त्याचा मृत्यू झाला आहे, हे सिद्ध होणे जरुरीचे असते.
\v 17 कारण मृत्युपत्र करणारा जिवंत आहे तोपर्यंत मृत्युपत्र अंमलात येऊ शकत नाही. ते मृत्युपत्र तेव्हाच अंमलात येऊ शकते जेव्हा तो मृत्यूपत्र बणवणारा व्यक्ती हा मृत झाला असेल.
\s5
\p
\v 18 म्हणून देवाने जनावरांचे रक्त याजकाद्वारे सांडवल्याशिवाय पहिला करारदेखील अंमलात आला नव्हता.
\v 19 कारण नियमशास्त्राची प्रत्येक आज्ञा सर्व लोकांसमोर जाहीर केल्यानंतर मोशेने पाण्याबरोबर वासराचे व बकऱ्याचे रक्त मिश्रीत केले, तसेच किरमीजी लोकर आणि एजोबाच्या फांद्या हे सर्व बरोबर घेतले; त्याने ते किरमीजी लोकर त्या रक्तात बूचकळले आणि ते त्या एजोबाच्या फांदीवर बांधले, आणि त्यातील काही रक्त त्याने नियमशास्त्राच्या पुस्तकावर आणि सर्व लोकांवर शिंपडले.
\v 20 आणि तो म्हणाला, “जो करार पाळण्याची देवाने तुम्हाला आज्ञा केली होती त्या कराराचे हे रक्त आहे.”
\s5
\p
\v 21 त्याचप्रमाणे त्याने मंडपावर व उपासनेसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तूंवर ते रक्त शिंपडले.
\v 22 खरे पाहता, नियमशास्त्राप्रमाणे जवळजवळ प्रत्येक गोष्ट रक्ताने धुतलीच पाहिजे आणि रक्त सांडल्याशिवाय क्षमा मिळत नाही. आणि जर अर्पण करत असता जनावराचे रक्त वाहले नाही तर, देव त्या लोकांच्या पापांची क्षमा करत नसे.
\s5
\p
\v 23 म्हणूनच, ज्या गोष्टींकरून स्वर्गात ख्रिस्ताने जे भाकीत केले आहे त्या गोष्टी जनावरांच्या अर्पणाद्वारे शुद्ध करणे याजकांना आवश्यक होते. पण त्याहूनही अधिक चांगल्या यज्ञाने स्वर्गीय गोष्टीच्या गोष्टी शुद्ध केल्या आहेत.
\v 24 कारण ख्रिस्ताने मानवी हातांनी केलेल्या पवित्रस्थानात पाऊल ठेवले असे नाही, तर ते स्थान खऱ्या वस्तूची केवळ प्रतिमाच आहे. देवाच्या समोर हजर होण्यासाठी खुद्द स्वर्गात त्याने प्रवेश केला अशासाठी की त्याने आपल्यासाठी देवाजवळ विणवनी करावी.
\s5
\p
\v 25 जे त्याचे स्वत:चे नाही असे रक्त घेऊन जसा मुख्य याजक परमपवित्रस्थानात दरवर्षी जातो तसा ख्रिस्त पुन्हा पुन्हा परमपवित्रस्थानात गेला नाही. परंतू जेव्हा ख्रिस्त स्वर्गात गेला तेव्ह तो, तर तो एकदाच अर्पिला गेला.
\v 26 तसे असते तर ख्रिस्ताला जगाच्या स्थापनेपासून स्वत:चे अर्पण करून आपले रक्त पुष्कळ वेळा शिंपडावे लागले असते. परंतु आता युगाच्या शेवटी ख्रिस्ताने आपल्या स्वत:ला अर्पण करून पाप नाहीसे करण्यासाठी एकदाच अर्पण झाला आहे. ज्यामुळे देवाने आपल्या सर्व पापांची क्षमा करून आपल्या ठायी काही दोष गणला नाही.
\s5
\p
\v 27 आणि जसे लोकांना एकदाच मरण व नंतर न्यासानासमोर येणे नेमून ठेवलेले असते,
\v 28 तसाच जेव्हा ख्रिस्त मरण पावला, देवाने त्याला पुष्कळ लोकांची पापे नाहीशी करण्याकरिता अर्पणरूपाने केवळ एका वेळेस दिला गेला आणि तो एकदा पून्हा या पृथ्वीवर येणार आहे, ज्यांनी पापे केली त्यांची पापे नाहीशी करावी म्हणून नव्हे, परंतु जे त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत व तो येण्याची आशा धरत आहे त्यांच्यासाठी येणार आहे.
\s5
\c 10
\p
\v 1 कारण नियमशास्त्र हे भविष्यकाळात येणाऱ्या चांगल्या गोष्टीं आपल्याला दाखवत नाही. नियम हे केवळ एका गोष्टीची छाया असे आहेत, कारण देवाची उपासना करण्यासाठी जे त्याच्याजवळ येतात त्यांना नियमशास्त्र त्याच अर्पणांमुळे जी वर्षानुवर्षे पुन्हा पुन्हा केली जातात, ते त्यांना कदापि परिपूर्ण करू शकत नाही.
\v 2 जर नियमशास्त्र लोकांना परिपूर्ण करू शकले असते तर यज्ञ अर्पण करण्याचे थांबले नसते का? कारण उपासना करणारे, कायमचेच शुद्ध झाले असते आणि त्यानंतर आपल्या पापांच्या बाबतीत दोषी ठरले नसते.
\v 3 पण त्याऐवजी ते यज्ञ दरवर्षी पापांची आठवण करून देतात की ते आताही दोषी असे आहेत.
\v 4 याचा अर्थ असा की देवाने आपण दिलेल्या बैलांची किंवा बकऱ्यांची बळी किंवा त्यांचे रक्त त्याने वाहताना पाहिले असता, तरी ते देखील आपल्याला दोषी ठरण्यापासून थांबवू शकणार नाही.
\s5
\p
\v 5 म्हणून ख्रिस्त जेव्हा या जगात आला, तेव्हा तो आपल्या पित्याला म्हणाला,
\q “तुला यज्ञ किंवा अर्पणे नको होती,
\q पण तू माझ्यासाठी अर्पण म्हणून शरीर तयार केले.
\q
\v 6 आणि लोकांनी जनावरांची पूर्ण जळालेली अर्पणे तुझ्यासाठी दिली, पण ह्या
\q जनावरांची अर्पणानेसुद्धा तुला प्रसन्न नाही करू शकले.
\q व इतर कोणत्याही अर्पणांनी तुला आनंद वाटला नाही.
\q
\v 7 हे असे असल्याने मी म्हणालो, ‘माझ्या देवा ऐक!
\q नियमशास्त्राच्या गुंडाळ्यामध्ये माझ्याबद्दल लिहून ठेवले आहे त्याप्रमाणेच,
\q देवा, तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.’”
\s5
\p
\v 8 पहिल्याने ख्रिस्त बोलला, “तुला यज्ञांनी, अर्पणांनी, होमार्पणांनी किंवा याजकांनी पूर्ण भस्म केलेली जनावरांची अर्पणे ह्यांनी आणि इतर कोणतेही अर्पण जे पापाचे प्रायश्चीत्त असे आणले असेल त्याने तुला संतोष वाटत नाही.” आणखी तो म्हणाला जरी ह्या गोष्टी मोशेला दिलेल्या नियमांप्रमाणे आहेत, तरी त्याने मला संतोष होत नाही.
\v 9 त्या नंतर वेदीवर स्वत:ला अर्पण असे मानून आणि लोकांची पापे लक्षात घेऊन, तो म्हणाला, “ऐक, तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.” अशा रीतीने त्याने पापांपासून सुटका व्हावी यासाठी, दुसरी व्यवस्था करण्यासाठी पहिली रद्द केली.
\v 10 देवाच्या इच्छेनुसार करण्याद्वारे, देवाने आपल्यास त्यासाठी वेगळे असे केले आहे. येशू ख्रिस्ताच्या देहाच्या एकदाच झालेल्या अर्पणाद्वारे आपण शुद्ध करण्यात आलो. हे असे अर्पण आहे की जे पून्हा पून्हा करण्याची गरज नाही.
\s5
\p
\v 11 प्रत्येक यहूदी याजक वेदीसमोर उभा राहतो आणि दररोज त्याची धार्मिक कामे करत असतो आणि ज्यामुळे पाप नाहीसे होत नाही असे यज्ञ तो वारंवार अर्पण करतो.
\v 12 परंतु आपल्या पापांसाठी येशूने त्याच्या देहाचे एकमेव अर्पण केले. कारण ते सर्वकाळासाठी चांगले होते. आणि तो आता देवाच्या उजवीकडे सर्वोच्च स्थानी बसला आहे.
\v 13 आणि आता देव त्याच्या शत्रूला त्याच्या पायाखाली घालीपर्यंत तो वाट पाहत आहे.
\v 14 तर आता त्याच्या पापासाठी केलेल्या एकदाच्याच अर्पणाने, त्याने ज्यांना देवाने शुद्ध आणि पवित्र केले आहे, त्यांना अनंतकाळासाठी परिपूर्ण केले.
\s5
\p
\v 15 पवित्र आत्माही याबाबत आपल्याला साक्ष देतो. पहिल्यांदा तो असे म्हणतो,
\q
\v 16 जेव्हा मी माझ्या लोकांशी केलाला पहिला करार समाप्त होईल,
\q मी त्यांच्याशी नविन करार करिन,
\q मी हे त्यांच्यासाठीच करिन,
\q मी माझे नियम त्यांना कळवीन,
\q आणि ते त्यांना पाळण्यास लावीन.
\s5
\q
\v 17 मग तो म्हणतो,
\q आणि मी त्यांची पापे व नियमविरहित कृत्यांची,
\p क्षमा करणार आणि ते कधिही आठवणार नाही.
\p
\v 18 म्हणजेच देवाने जर एखाद्याच्या पापांची क्षमा केली आहे, तर त्या पापाबद्दल त्या व्यक्तीला आणखी अर्पण करण्याची आवश्यकता भासणार नाही.
\s5
\p
\v 19 म्हणून माझ्या बंधुनो, येशूने वाहवलेल्या रक्ताद्वारे त्याने जे काही मिळवले त्यावर विश्वास ठेवू शकतो. यास्तव आपण बिनधास्तपणे परमपवित्रस्थान म्हटलेल्या तंबूत प्रवेश करू शकतो.
\v 20 त्याने तयार केलेल्या नवीन अशा मार्गामुळे आपणास सर्वकाळ जीवन मिळाले आहे, ज्यामुळे आपण न भीता परमपवित्रस्तथानात पाऊल ठेवू शकतो.
\v 21 जे आम्ही देवाचे लोक आहो, त्यांच्यावर ख्रिस्त हा आपल्याला महान असा मुख्य याजक मिळाला आहे.
\v 22 तर म्हणून आता आपण, ज्याने आपली मळीन ह्रदये शुद्ध केली, ज्याने आपले स्वत:चे रक्त आमच्या ह्रदयावर शिंपडले, आणि ज्याने आपली शरीरे पवित्र पाण्याने धुतली आहेत, त्या येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे, विश्वासाने तसेच तळमळीने भरलेल्या अंत:करणाने देवाच्या जवळ जाऊ.
\s5
\p
\v 23 म्हणून देवाने जे काही अभिवचन विश्वासाने देऊ केले आहे, त्याबद्दल आपल्याला जी आशा आहे तिला आपण चिकटून राहू, आणि न डळमळता ज्यावर आपण विश्वास केला आहे ते घोषीत करू. कारण ज्याने आपल्याला अभिवचन दिले, तो विश्वासू आहे.
\v 24 आणि आपण एकमेकांस समजून घेऊ व प्रेम आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ.
\v 25 आणि काही जणांना जी वाईट सवय असते तसे आपण एकत्र येण्याचे बंद करू नये, परंतु एकमेकांना उत्तजेन देऊ या, आणि तो दिवसजवळ येत असताना तसे उत्तेजन देण्याचे कार्य अधिकाधीक करूया.
\s5
\p
\v 26 ख्रिस्ताने सत्य वचन प्राप्त झाल्यानंतरसुद्धा जर आपण जाणूनबुजून पाप करीत राहिलो, तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही.
\v 27 उलट देव आपला न्याय करणार आहे, असे जाणून आपण त्याची भीती बाळगून ग्रहन करावे. आणि जे त्याचे शत्रू आहेत त्यांचा न्याय तो नितीमत्तेने करणार असून, त्याचे सर्व शत्रू भयंकर अशा भस्म करणाऱ्या अग्नीने नाश केले जातील.
\s5
\p
\v 28 देवाने मोशेला दिलेले नियमशास्त्र ज्या कोणी नाकारले त्याला दोघा किंवा तिघांच्या साक्षीच्या आधारे कसलीही दया न दाखविता मारले जातील.
\v 29 ही एक कठोर शिक्षा होती, तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले, ज्या रक्ताने त्याला शुद्ध केले त्या रक्ताला अपवित्र ठरविले आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला असा आत्मा जो त्याच्याशी अगदी सौम्यतेने वागला, त्या मनुष्याला देव कितीतरी अधिक शिक्षा देईल याचा विचार करा.
\s5
\p
\v 30 तर ह्या बद्दल आपली खात्री असायला पाहिजे की देवाने असे म्हटले आहे की, लोकांच्या पापांबद्दल त्यांना काय शिक्षा द्यावी हा अधिकार आणि हे सामर्थ्य माझ्याकडे आहे, त्यांना जी उचीत शिक्षा होईल ती मी त्यांना देईन, सूड घेणे माझ्या हाती आहे; मी परतफेड करीन, पुन्हा तो असे म्हणतो. आणखी मोशे म्हणाला, “प्रभू आपल्या लोकांचा न्याय करील.”
\v 31 तर जीवंत देवाच्या हाती सापडणे किती भयंकर गोष्ट आहे.
\s5
\p
\v 32 ते पूर्वीचे दिवस आठवा, जेव्हा नुकताच तुम्हाला ख्रिस्ताबद्दलचा सुवार्तेचा प्रकाश प्राप्त झाला होता, तेव्हा तुम्ही भयंकर दु:खे सोसली. आणि जेव्हा तूम्ही दु:खे सोसली, तरिही तूम्ही देवाच्याठायी विश्वास ठेवला.
\v 33 काही वेळा जाहीरपणे तुमचा अपमान करण्यात आला. तर काही वेळा ते तुमच्या दु:खाला कारणीभूत झाले, तर काही वेळा इतर विश्वासणाऱ्यांच्या दु:खात तुम्हाला दु:खे सोसावी लागली,
\v 34 एवढेच नाही, तर त्यांच्यासाठी तुम्ही झीजदेखील सोसली जे तुरूंगात ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने होते, त्यांना तुम्ही मदत केली. आणि जे तुमच्याकडे होते ते तुमच्याकडून अविश्वासणाऱ्यांनी घेतले तरी तुम्ही आनंद केला. तुम्ही हे स्वत: का सोसले कारण तुम्हाला महित होते की तुमच्याजवळ स्वर्गात अधिक चांगली व सर्वकाळ टिकणारी संपत्ती आहे. अशी संपत्ती जी तुमच्याजवळून कधीच काढून घेण्यात येणार नाही.
\s5
\p
\v 35 म्हणून जरी ते तुम्हाला दु:ख सोसण्यास भाग पाडत असतील, तरी तुमच्यामध्ये जो दृढ विश्वास आहे तो सोडू नका. कारण तुम्ही देवाच्याठायी निरंतर विश्वास ठेवला तर, तो तुम्हाला मोठे असे बक्षिस देणार आहे.
\v 36 म्हणून तुम्ही देवाच्याठायी विश्वासाने धीर धरणे जरूरीचे आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करून त्याने तुम्हांला दिलेल्या त्याच्या वचनाप्रमाणे तुम्ही प्रतिफळ मिळवावे.
\v 37 देवाने भाकीत केलेल्या मसीहा बद्दल एक संदेष्टा वचनात असे लिहतो,
\q आता अगदी थोडक्या अवधीनंतर,
\q जो येणारा आहे, असे जे वचन मी दिले होते,
\q तो येईल, तो उशीर लावणार नाही.
\s5
\p
\v 38 परंतु जे माझे आहेत, जे नितीमत्तेने वागतात, ते माझ्याठायी निरंतर विश्वास करतील.
\q धार्मिक पुरुष विश्वासाने वाचेल
\q आणि जर तो पाठ फिरवील तर माझ्या जिवाला संतोष होणार नाही.
\p
\v 39 पंरतु पाठ फिरवून देवाने नष्ट केलेल्यांपैकी आपण नाही, तर आपल्या जिवाचे तारण साधून विश्वास बागळणाऱ्यांपैकी अनंत काळ जगणारे असे आपण आहोत.
\s5
\c 11
\p
\v 1 यास्तव लोक देवावर विश्वास ठेवतात कारण त्यांना खात्री आहे की त्यांना त्याने ज्या गोष्टी देण्याचे ठरविले आहे, त्या गोष्टी विश्वासाने तो त्यांना नक्कीच देईल. आणि त्यांना ह्याची देखील खात्री आहे की, जरी ते काही गोष्टी पाहू शकत नाही, तरी त्याबद्दल त्यांना देवावर भरंवसा आहे.
\v 2 कारण आपल्या पूर्वजांनी विश्वास केला म्हणूनच ते देवाच्या पसंतीस पडले.
\v 3 देवाच्याठायी आपला विश्वास असल्यामुळेच आम्हांला समजते की, या जगाची निर्मिती जे सद्ध्या आहे, देवाच्या आज्ञेनेच झाली आहे. म्हणून जे काही आता दिसते ते जे दिसत नव्हते त्यापासून निर्माण केले गेले.
\s5
\p
\v 4 देवाच्याठायी असलेल्या विश्वासामुळेच हाबेलाने काईनापेक्षा जो त्याच्या मोठा भाऊ होता, अधिक चांगला यज्ञ देवाला अर्पण केला. देवाने हाबेलाची दाने मान्य केल्यामुळे विश्वासाच्याद्वारे तो धार्मिक म्हणून उंचावण्यात आला, आणि जरी तो मेला असला तरी तो आपल्या विश्वासामुळे अजून बोलतो हे आपणास शिकायला मिळते.
\s5
\p
\v 5 देवाच्याठायी असलेल्या विश्वासमुळेच हनोखाला वर स्वर्गात उचलण्यात आले, यासाठी की, त्याला मरणाचा अनुभव आला नाही व तो कोणाला सापडला जाऊ नये म्हणून देवाने त्याला दूर नेले. पण तो वर घेतला जाण्यापूर्वी त्याच्याबद्दल साक्ष देण्यात आली की, तो देवाला संतोषवीणारा होता.
\v 6 तर आता लोकांना हे शक्य आहे, देवाच्याठायी विश्वास ठेवून तुम्ही देवाला संतोषविणारे असे बनू शकता. कारण जो कोणी देवाकडे येतो त्याने असा विश्वास धरला पाहिजे की देव आहे आणि जे त्याला शोधतात त्यांना तो बक्षीस देतो.
\s5
\p
\v 7 नोहाला देवाने सांगितले की तो महापूर पाठवणार आहे, तेव्हा त्याने विश्वासाने त्याची दखल घेतली. त्याने आपल्या कुटूंबाला वाचविण्यास जहाज बांधण्याद्वारे देवाला आदर दिला. विश्वासामुळेच त्याने दाखवून दिले की राहीलेले लोक हे देवाच्या शिक्षेस पात्र आहेत आणि विश्वासामुळे लाभणाऱ्या धार्मिकतेचा तो देवासोबत वारस बनला.
\s5
\p
\v 8 जेव्हा देवाने अब्राहामाला पाचारण केले तेव्हा विश्वासानेच त्याने आज्ञापालन केले. आणि त्याला वतन म्हणून जी जागा मिळणार होती त्या देशात तो आपला देश सोडून गेला. आपण कोठे जात आहोत हे त्याला ठाऊक नसतानादेखील तो बाहेर पडला.
\v 9 देवाच्याठायी असलेल्या विश्वासानेच अब्राहाम वचनदत्त देशात जो त्याच्या वंशजाला देव देणार होता त्या देशात एखाद्या उपऱ्यासारखा राहिला. अब्राहाम तंबूत राहिला, आणि त्याचा मुलगा इसहाक व त्याचा नातू याकोब त्यांनी देखील असेच केले. कारण ते दोघेही अब्राहामाला दिलेल्या त्याच वचनाचे वारसदार होते.
\v 10 ज्या नगराला मजबूत पाया आहे व ज्याचा प्रयोजक बांधकाम कारागीर स्वत:देव आहे अशा नगरामध्ये अब्राहाम राहण्याची वाट पाहात होता.
\s5
\p
\v 11 आपण दिलेल्या वचनाबाबत देव विश्वासू आहे हे जाणून सारा ही जरी वांझ होती आणि अब्राहामाचे वय लेकरे होण्याच्या अगदी मर्यादेपलीकडे गेले होते, तरी विश्वासाने मुलाला जन्म देण्याची शक्ति त्यांना मिळाली. देवाने वचन दिले की तो तिला एक मुलगा देईल, आणि अब्राहामाने विश्वास धरला की देवाने जे वचन दिले ते तो पूर्ण करेल.
\v 12 आणि जरी तो फार वयातीत झाला असून तरी अशा एका अब्राहामापासून आकाशातील ताऱ्यांच्या संख्येएवढी आणि समुद्रकिनाऱ्यावरील वाळूच्या कणांइतकी अगणित संतति जन्मास आली. कारण देवाने त्याला तसे वचन दिले होते.
\s5
\p
\v 13 आणि हे सर्व लोक विश्वासात मरण पावले. देण्यात आलेल्या वचनांचे प्रतिफळ त्यांना प्राप्त झाले नव्हते. परंतु त्यांनी विश्वासाने ते दुरूनच पाहिले व त्याबद्दला आनंद केला आणि त्यांनी उघडपणे कबूल केले की ते या पृथ्वीचे रहिवासी नसून फक्त प्रवासी आहेत.
\v 14 जे लोक अशा गोष्टी बोलतात ते हेच दर्शवितात की ते त्यांच्या वतनासाठी देश पाहत आहेत. असा देश जो त्यांचा स्वत:चा असणार.
\s5
\p
\v 15 ते जर त्यांनी सोडून आलेल्या देशाबद्दल विचार करीत असते तर ते आपल्या त्या देशात परत गेले असते.
\v 16 परंतु ते लोक त्याहून अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गातील घराची, तेथील वतनाची इच्छा धरुन होते. म्हणून देवाने त्यांच्यासोबत राहावे यासाठी त्यांच्यासाठी एक शहर तयार केले आहे, आणि तो त्यांचा देव आहे, असे त्यांना म्हणने त्याला आनंदाचे वाटले.
\s5
\p
\v 17 कारण देवाने जेव्हा अब्राहामाची परीक्षा पाहिली, तेव्हा त्याने विश्वासाने आपला पुत्र इसहाक याला अर्पण करण्याची तयारी दर्शवली. होय, तोच अब्राहाम ज्याला अभिवचन दिले होती की तो त्याला एक पूत्र देणार, आणि त्याच आपल्या एकुलत्या एक पुत्राला जो त्याची पत्नी सारा हीला झाला होता, त्याला अर्पण करण्यास तयार झाला.
\v 18 आणि देवाने त्याच इसहाका बद्दल सांगितले की, “इसहाकाकडूनच तुइया वंशाची वाढ होईल.”
\v 19 अब्राहामाचा असा विश्वास होता की, जरी त्याने इसहाकाला अर्पणासाठी मारले, तरी देव त्याला मरणातून पुन्हा उठवू शकेल. आणि याचा परिणाम असा झाला की अब्राहामाला इसहाक परत मिळाला जेव्हा देवाने म्हटले की त्याला काही हाणी नको करू, म्हणजेच इसहाक त्याला जसा काय मरणातून परत मिळाला.
\s5
\p
\v 20 इसहाकाने देवावर भरवसा ठेवला म्हणून त्याने देवाला प्रार्थना केली की मृत्यूनंतर देव त्याचे पुत्र याकोब व एसाव यांना आशीर्वादित करेल.
\p
\v 21 आणि विश्वासानेच याकोब, जेव्हा तो मरत होता, तेव्हा त्याने योसेफाच्या प्रत्येक मुलाला आशीर्वाद दिला आणि आपल्या चालण्याच्या काठीवर तो टेकला असताना त्याने देवाची उपासना केली.
\v 22 कारण योसेफाचा देवावर विश्वास होता म्हणून त्याने आपल्या आयुष्याच्या शेवटी विश्वासाने इस्राएल लोक इजिप्त देशाच्या बाहेर जाण्याबाबत बोलला आणि जेव्हा ते इस्राएल सोडतील तेव्हा त्याच्या अस्थिही सोबत नेण्यात याव्या अशी सुचना त्याने दिली.
\s5
\p
\v 23 मोशेच्या आईवडिलांनी देवावर भरवंसा ठेवल्या कारणाने, जेव्हा मोशे जन्मला तेव्हा विश्वासाने त्याच्या आईवडिलांनी त्याला तीन महिने लपवून ठेवले, कारण त्यांनी पाहिले की ते बाळ सुंदर आहे आणि राजाज्ञेची, जे की सर्व यहूदी बालकांना मारण्यात यावे, ह्याची त्यांना भीति वाटली नाही.
\v 24 ज्याला ते फारोह असे म्हणत आणि त्या राजाची मुलगी,, तीने त्याला मोठे केले, परंतू मोशे जेव्हा मोठा झाला, तेव्हा देवाच्याठायी विश्वास असल्या कारणानेच त्याने फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवून घेण्याचे नाकारले.
\v 25 राजाच्या महालात पापाचे अल्पकाळ टिकणारे सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोवर मीसुद्धा इतरांची वाईट वागनूक सोसावी हे निवडने त्याला बरे वाटले.
\v 26 त्याने ठरविले की जर तो ख्रिस्तामध्ये दुःख सोसेल तर, त्याला फारोच्या कुटूंबातील एक सदस्य असल्या कारणाने मिळणाऱ्या संपत्तीपेक्षाही अधिक मौल्यवान संपत्ती मिळणार आहे. कारण तो पुढे देवाकडून मिळणाऱ्या बक्षीसाकडे पाहत होता.
\s5
\p
\v 27 देवाच्याठायी असलेल्या विश्वासानेच, मोशेने मिसर देश सोडला. त्याने देश सोडला म्हणून राजा त्याच्यावर क्रोधीत होईल याची पर्वा न करता त्याने देश सोडला. कारण न दिसणाऱ्या देवाला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला आणि तो पुढे चालत गेला.
\v 28 मोशेचा देवाच्याठायी असलेल्या विश्वासानेच तो त्याच्या लोकांचा बचाव करू शकला, नाश करणाऱ्या देवदूताने इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या मुलांपैकी एकालाही हात लावू नये म्हणून त्याने विश्वासाने वल्हांडण सण पाळला आणि रक्त शिंपडले, जो की पूढे चालून वल्हांडणाचा सन असा बनला. त्याने आज्ञा केली की कोकरू मारून त्याचे रक्त आपल्या दारावर शिंपडावे.
\s5
\p
\v 29 इस्राएली लोकांनी देवावर विश्वास ठेवल्या कारणाने त्यांनी जणू काय कोरड्या जमिनीवरुन चालावे, तसा तांबडा समुद्र पार केला. पण जेव्हा मिसरच्या सैंन्याने समुद्रपार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते बुडाले. कारण समुद्र त्यांच्यावर जल प्रवाहाने वापस आला.
\p
\v 30 इस्राएली लोकांनी देवावर विश्वास ठेवल्या कारणाने सात दिवस फेऱ्या मारल्यावर यरीहोची भिंत पडली.
\p
\v 31 आणि राहाब वेश्येचा देवाच्याठायी असलेल्या विश्वासामुळेच यरिहोत ज्या लोकांनी देवाची आज्ञा मोडली त्यांच्याबरोबर ती मारली गेली नाही, कारण यहोशवाने त्या शहराला नष्ट करण्यासाठी त्या शहरात काही मार्ग सापडतो का हे जाणण्यासाठी काही हेर पाठवले होते, परंतू देवाने राहाबेला वचवले कारण तिने हेरांचे शांतीने स्वागत केले.
\s5
\p
\v 32 मी आणखी ज्यांनी देवावर विश्वास ठेवला त्यांच्याबद्दल काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल आदि संदेष्टे यांच्याबाबत सांगू लागलो तर वेळ पुरणार नाही.
\v 33 कारण त्यांचा देवावर विश्वास होता, म्हणून त्यातील काहींनी त्याच्यासाठी महान कृत्ये केलीत. काहींनी बळकट अशा पूरूषांची राज्ये जिंकली, काहींनी इस्राएलावर राज्य केले आणि मनुष्यांशी आणि नगरांशी न्यायाने वागले, आणि काहींना देवाने देऊ केलेल्या गोष्टी मिळाल्या जे त्याने देण्याचे वचन दिले होते, काहींनी सिंहांची तोडे बंद केली.
\v 34 काही जण अग्नितून सूटले, काहीजण त्यांच्या मागे तरवारीने लागलेल्यांपासून बचावले. काही आजारी असताही बरे झाले, त्यांनी अशक्तपणात सामर्थ्य मिळविले. काही लढाईत सामर्थ्यशाली ठरले आणि त्यांनी परकी सेना मागे हटविली.
\s5
\p
\v 35 काही स्त्रियांना त्यांचे मरण पावलेले पुन्हा जिवंत असे मिळाले, कारण त्यांनी देवावर विश्वास केला. परंतू काहींना मरनोन्मूख वेदना सोसाव्या लागल्या. त्यांना छळले गेले कारण त्यांच्या शत्रूंनी जेव्हा सांगितले की, “देवावर विश्वास आहे असे आपण जर नाकारता तर आम्ही तुम्हाला मुक्त करू.” तेव्हा ते त्यांच्याशी सहमत न झाल्यामुळे त्यांनी त्यांना छळले, त्यांनी तसे केले नाही, कारण त्यांना पृथ्वीवर राहण्यापेक्षा देवासंगती सर्वकाळ राहणे अधिक चांगले वाटले.
\v 36 काहीं जे देवावरती विश्वास ठेवत होते, अशा कहीना निंदा व काहींना पाठीवरचे चामडे सोलेपर्यंत चाबकाचा मार सहन करावा लागला. तर काहींना बेड्या व तुरूगंवास भोगावे लागले.
\v 37 त्यातील काही विश्वासणाऱ्यांचा दगडमार करून जीव घेण्यात आला. तर काहींना करवतीने दोन भागात चिरण्यात आले, काहींना तरवारीने भोसकून मारण्यात आले. तर त्यातील काही विश्वासणारे मेंढ्यांचे व बकऱ्यांचे कातडे पांघरून फिरत राहिले. त्यांच्या जवळ पैसा देखील नव्हता. लोकांनी त्यांचा सतत छळ केला आणि त्यांना इजा पोहचवली.
\v 38 पृथ्वीवरील लोकांनी जे विश्वासणारे होते त्यांच्या इतका छळ केला, की त्यांना जे विश्वासणारे आहेत त्यांच्यासोबत राहणे योग्य नव्हते. तर त्यातील काहींनी जंगलात, डोंगरकपारीत, गुहांमधून व जमिनीतील बिळांतून लपून फिरत राहिले.
\s5
\p
\v 39 पण पाहा जरी त्यांचा विश्वास देवाच्या ठायी असल्याने ते देवाच्या पसंतीस पडले, परंतू जे अभिवचन दिले होते ते त्यांना मिळाले नाही.
\v 40 कारण देवाला माहीत होते की जे अभिवचन त्यांना मी दिले आहे ते लगेच परिपूर्ण न करता ते काही काळाने परिपूर्ण करणे हे चांगले होईल. देवाने आमच्यासाठी काहीतरी अधिक चांगली योजना तयार केली होती यासाठी की आमच्याबरोबर त्यांनाही परिपूर्ण करावे.
\s5
\c 12
\p
\v 1 आपल्या हे लक्षात येते की, विश्वास धरणाऱ्या पुष्कळ लोकांनी हे सिद्ध करून दाखवले की त्यांचा देवावर विश्वास आहे. म्हणून आपणास अडथळा निर्माण करणाऱ्या सर्व गोष्टी आपण दूर फेकून देऊया. खास करून सहजासहजी गुंतविणारे पाप जे आपल्याला मागे ठेवते ते आपण दूर फेकूया व जी शर्यत आपल्यासमोर देवाने ठेवली आहे ती शर्यत धिराणे आपण पूर्ण करूया.
\v 2 आणि जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर, जसा एखादा धावपटू निशाण्यावर लक्ष केंद्रित करतो, त्या प्रमाणे आपण लक्ष केंद्रित करूया. कारण त्याच्या कृसावर अती दु:ख सहन करण्याने आणि ज्यांनी त्याला निंदास्पद केले, त्यांना त्याने क्षमा केल्याने तोच आपणास विश्वास ठेवण्या जोगा बनला आहे, हे त्याने केले कारण इतरांना हर्षीत करणे हे कीती आनंददायी आहे हे त्याला ठाऊक होते. तर आता तो स्वर्गात जेथे देव राज्य करतो, त्याच्या सिंहासनाजवळील उजवीकडे अशा उच्च ठिकाणी बसला आहे.
\p
\v 3 पाहा, जेव्हा येशूविरूद्ध पापी लोक मत्सरतेने वागले, तेव्हा येशूने त्यांची ही वागनूक धिराने सहन केली. यास्तव येशूचे उदाहरण घेऊन तुम्ही आपल्या मनाला आणि ह्रदयाला बळकट करा, म्हणजे तुम्ही देवावर विश्वास ठेवण्यात खचून जाऊ नये.
\s5
\p
\v 4 कारण पापाविरुद्धच्या तुमच्या युद्धात तुम्ही येशूसारखे रक्त सांडेपर्यंत अजून झगडा दिला नाही, किंवा सैतानाला अडवण्यासाठी तुम्ही मरण पावला नाहीत.
\v 5 तर पाहा शलमोन राज्याने आपल्या मुलास म्हटलेले शब्द तुम्ही विसरू नका. कारण देवाची मुले म्हणून तो उत्साहीत करू इच्छीत आहे:
\q “माइया मुला, प्रभू तुला शिस्त लावत असता त्याच्याकडे लक्ष दे,
\q आणि जेव्हा तो तुला शिक्षा करतो, तेव्हा तू धीर सोडू नको;
\q
\v 6 कारण ज्याच्यावर प्रभु प्रीती करतो, त्यांना तो शिस्त लावतो आणि ज्यांना तो आपले पुत्र म्हणून स्वीकारतो, त्यांना तो शिक्षाही करतो.”
\s5
\p
\v 7 म्हणून ह्या कठीण समयी ज्या गोष्टी तुमच्या सोबत होत आहेत, त्या सहन करण्याची शिस्त देव तुम्हाला देवो. पाहा जसा एखाद बाप आपल्या मुलास वळन लावतो, त्याच प्रकारे देव तुम्हास वळन लावत आहे. कारण सर्वच बाप आपल्या मुलांना वळन लावतात.
\v 8 म्हणून जर देवाने त्याच्या मुलांसारखी शिस्त लावण्याचा अनूभव तुम्हाला आला नसेल, तर तुम्ही देवाचे आणि तुम्ही खरे पुत्र नसून, तुम्ही बाप नसलेल्या मुलासारखे आहात, ज्याला शिस्त लावण्यास कोणी बाप नाही.
\s5
\p
\v 9 याशिवाय आम्हा सर्वांना जगिक पिता असताना त्यांनी आम्हाला शिस्त लावली असता त्याबद्दल आम्ही त्यांचा आदर राखतो. तर मग आम्हास सार्वकालीक जीवन मिळावे ह्यासाठी आमच्या आध्यात्मिक देव पित्याच्या किती तरी अधिक प्रमाणात अधीन राहायला हवे.
\v 10 आमच्या मानवी वडिलांनी त्यांच्या दृष्टीने अती उत्तम अशी शिस्त थोड्या काळासाठी लावली. पण देव आम्हाला आमच्या चांगल्यासाठी शिस्त लावतो, यासाठी की, त्याच्या सर्वकालीक पवित्रपणात आपणही वाटेकरी व्हावे.
\v 11 देव शिस्त लावतो त्यावेळेस कोणतीही शिक्षा चांगली वाटत नाही, उलट दु:खाची वाटते, पण नंतर ज्या लोकांना शिस्तीचे धडे शिकायला मिळाले आहेत, ते त्यांना धर्मिकतेने जगण्यास शिकवते जे आपल्याठायी शांती उत्पन्न करते.
\s5
\p
\v 12 म्हणून आता आत्मिकरित्या गळून गेलेल्या सारखे न करता, तुमचे नविनीकरण व्हावे यासाठी देवाच्या शिस्तीमध्ये विश्वास ठेवा.
\v 13 यास्तव ख्रिस्ताचे अनूकरण करत तुम्ही सरळ चाला, म्हणजे जे ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यात करजोर असे असणार ते तुमच्या कडून सामर्थ मिळवतील आणि देवाचा मार्ग सोडणार नाहीत. उलट ते ज्याप्रमाणे जखमी अवयवांना बरे केले जाते, त्याप्रमाणे ते आत्मिकरित्या नविन केले जातील.
\s5
\p
\v 14 सर्व लोकांबरोबर शांतीने राहण्याचा प्रयत्न करा व पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करा. कारण पवित्रते शिवाय कोणालाही प्रभूला पाहता येणार नाही.
\v 15 ज्याने आमची लायकी नसताही आमच्यावर दया केली, त्या देवावर विश्वास करणे थांबवू नका, इतरांप्रती तुमचे अंतकरण वाईट असू नये या बाबत लक्ष ठेवा, कारण ते वाईटाचे मुळ वाढून एक मोठे झाड होऊ शकते, ज्याच्या द्वारे पूष्कळ विश्वसणारे पापात पडू शकतात.
\v 16 कोणीही व्यभिचारी असू नये किंवा एका जेवणापायी आपला वडीलकीचा हक्क विकून टाकणाऱ्या एसावासारखे जगिक विचाराचे असू नये याकडे लक्ष द्या.
\v 17 नंतर त्याच्या वडीलाने इसहाकास दिलेला आशिर्वाद आणि त्याचे जेष्ठपण त्याने परत मिळवू इच्छीले, परंतू इसहाकाने तसे करण्यास एसावाला नाही म्हटले. म्हणजेच एसावाला त्याचा जन्महक्क आणि आशिर्वाद मिळण्याला काही मार्गच नव्हता, जरी तो खूप पस्तावा करून रडला पण तसे झाले नाही.
\s5
\p
\v 18 तर इस्राएली लोकांना सिनाय पर्वतावर जो अनुभव आला, त्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला अजून झाला नाही. त्या पर्वताला देवाने स्पर्श न करण्याची आज्ञा केली होती, कारण तो स्वत: तेथे खाली आला होता, त्या पर्वतकडे ते गेले, जो अग्नीच्या ज्वालांनी पेटलेला आहे, जो अंधार, दु:ख व वादळ यांनी भरलेला आहे, अशा पर्वताकडे ते गेले.
\v 19 त्यांनी कर्ण्याचा आवाज ऐकला, आणि त्यांनी ऐकले की देव वचन सांगत आहे. ते इतके सामर्थशाली होते की असा आवाज ज्यानी ऐकला त्यानी त्याजकडे अशी विनंती केली की, त्याने यापुढे आणखी वाणी ऐकवू नये.
\v 20 कारण देवाने त्यांना आज्ञा केली की, “जर एखाद्या व्यक्तीने किंवा प्राण्याने जर या पर्वताला स्पर्श केला, तर त्याला मारण्यात यावे.” त्याने तेथील लोक घाबरले.
\v 21 खरोखर ते दृश्य इतके भयंकर होते की, मोशे देखील सिनाय पर्वतावर काय घडले त्यामुळे घाबरला होता, तो म्हणाला, “भीतीमुळे मी थरथर कांपत आहे.”
\s5
\p
\v 22 परंतु याउलट तुम्ही जो खरोखर स्वर्गात राहतो, त्या जिवंत देवाच्या समक्ष, नविन यरुशलेमे समक्ष आला आहात. आणि तुम्ही आनंदाने जमा झालेल्या अगिणत देवदूतांजवळ आलेले आहात. हे असेच आहे ज्याप्रमाणे तुमचे पूर्वज सिनाय पर्वतावर देवाची उपासना करण्यास जमले होते, ज्यावर त्यांनी पृथ्वीवरील यरूशलेम बांधले.
\v 23 आणि ज्यांना प्रथम जन्मलेल्या मुलांचा अधिकार आहे, ज्यांची नावे स्वर्गात लिहली गेली आहेत, अशा सर्व विश्वासणाऱ्या मंडळींशी तुम्ही जूळले गेले आहात, तुम्ही देव जो सर्वांचा न्यायाधीश आहे त्याच्याकडे आला आहात. आणि तुम्ही नीतिमान लोकांच्या आत्म्यांकडे जे पूर्ण आहेत, जे लोक मरण्याआधी धार्मिक जीवन जगले, त्यांच्याकडे आला आहात.
\v 24 आणि देवामध्ये आणि आपल्यामध्ये कृसावर रक्त सांडवण्याद्वारे ज्याने नविन करार स्थापिला, त्या मध्यस्थाकडे, म्हणजेच येशूकडे तुम्ही आला आहात. येशूच्या रक्तद्वारे देवाने आपल्याला क्षमा केली आहे, कारण त्याचे रक्त हाबेलाच्या रक्तापेक्षा अधिक चांगले होते.
\s5
\p
\v 25 तर देव जो तुमच्याशी बोलत आहे, त्याला तुम्ही नाकारत आहात का याविषयी सावध असा. पाहा जेव्हा मोशेने इस्राएली लोकांना पृथ्वीवर ताकिद दिली असता, तरी ते देवाच्या शिक्षेपासून सुटले नाहीत, तर तो जो स्वर्गातून सावध करतो, त्याला जर आपण नकार दिला तर त्याच्या शिक्षेपासून अपण खचितच सुटणार नाही.
\v 26 ज्यावेळेस सिनाय पर्वतावर तो बोलला, तर त्याच्या आवाजाने पृथ्वी हादरली. पण आता त्याने असे अभिवचन दिले आहे की, “पुन्हा एकदा मी केवळ पृथ्वीच नव्हे तर आकाशही हादरवून टाकीन.”
\s5
\v 27 “पुन्हा एकदा” हे शब्द हेच दर्शवितात की, ज्या गोष्टी उत्पन्न केलेल्या आहेत त्यातून ज्यागोष्टी हलविल्या जातील त्या काढून टाकण्यास येतील. तो हे अशासाठी करणार आहे की स्वर्गात न हालवीता येणाऱ्या गोष्टी तशाच सर्वकाल रहाव्या.
\v 28 म्हणून, आम्हाला अढळ असे राज्य देण्यात आले म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊ आणि आदराने व प्रीतीने व त्याच्या सामर्थ्याला भयभीत होऊन देवाला मान्य होईल अशी त्याची उपासना करू.
\v 29 कारण लक्षात असूद्या की ज्या देवाची आपण उपासना करतो तो देव जे अशूद्ध आहे त्यास भस्म करणारा अग्नि आहे.
\s5
\c 13
\p
\v 1 आपल्या विश्वासणाऱ्या बंधुवर प्रीति करत राहा.
\v 2 जे गरजू प्रवासी आहेत त्यांचा पाहुणचार करण्याचे विसरू नका. कारण असे करण्याने काहींनी नकळत देवदूतांचा पाहूणचार केला आहे.
\s5
\p
\v 3 तुम्ही स्वत: त्यांच्याबरोबर तुरुंगात होता असे समजून जे तुरुंगात आहेत, अशा विश्वासणाऱ्यांची आठवण करा. कारण आपणही त्यांच्याबरोबर तुरुंगात होता आणि जसे ते आहेत त्याप्रमाणे दु:ख भोगीत होता.
\p
\v 4 एकमेकांशी विवाहबद्ध झालेल्या पुरुष आणि स्त्रिया, यांनी एकमेकांचा आदर करवा आणि एकमेकांशी विश्वासू असावे. वैवाहिक अशुद्धता असू नये, कारण जे व्यभिचारी व विषयवासनेबद्दल भ्रष्ट आहेत अशा लोकांचा देव न्याय करील.
\s5
\p
\v 5 आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यातच समाधान माना.
\q कारण देवाने जे मोशेला लिहीले ते आठवा, “मी कधीही तुला सोडणार नाही,
\q मी तुला पुरवठा करणे कधिही थांबवणार नाही.”
\q
\v 6 म्हणून आपण स्रोत्रकर्त्याने जे म्हटले ते खात्रीने म्हणू शकतो, की
\q “देव माझा साहायकर्ता असल्याने, मी भिणार नाही. देवाची मदत मला मिळण्यापासून कोण रोखेल?”
\s5
\p
\v 7 तुमच्या आत्मिक पुढाऱ्यांची ख्रिस्ताचा संदेश तुम्हांस दिला आहे, तर त्यांनी कसे ख्रिस्ताचे विश्वासाने अनूकरण केले आणि त्यांनी कसे आपले जीवन व्यतीत केले याची आठवण करा.
\v 8 येशू ख्रिस्त जो काल होता, तोच आज आणि युगानुयुग सारखाच आहे.
\s5
\p
\v 9 म्हणून आमच्याद्वारे शिकवण्यात न आलेल्या अशा देवाच्या निरनिराळ्या गोष्टींवर विश्वास करण्याबद्दल तुम्हाला कोणीही बहकू नये याची काळजी घ्या. उदा, आपण काय खावे आणि काय प्यावे याबद्दल कोणी तुम्हाला आज्ञांकीत करू नये, हे नियम आपल्याला काहीच उपयोगाचे नाहीत.
\p
\v 10 जे पवित्र मंडपात सेवा करतात, त्यांना पवित्र वेदीवरचे खाण्याचा काही अधिकार नाही.
\v 11 ज्याप्रकारे मुख्य याजक प्राण्यांचे रक्त परमपवित्रस्थानात पापाचे अर्पण म्हणून घेऊन जात असे, आणि दुसरे लोक त्या प्राण्यांचे शरिरे जाळत असत,
\s5
\p
\v 12 त्याच प्रकारे येशूने सुद्धा स्वतःच्या रक्ताने लोकांना शुद्ध करावे यासाठी यरूशलेमेच्या वेशी बाहेर दु:ख सोसले, अशासाठी की आपण त्याचे, म्हणजेच देवासाठी महत्वाचे असे असावे.
\v 13 म्हणून आपले तारण व्हावे यासाठी आपण येशूकडे जाऊया, आणि छावणीच्या बाहेर जाऊन येशूच्या अपमानाचे वाटेकरी होऊ.
\v 14 कारण पृथ्वीवर आपण विश्वासणाऱ्यांस यरूशलेमेसारखी नगरी नाही, परंतू आपण जी सर्वकाळ टिकणारी अशी स्वर्गातील नगरी तीची वाट पाहत आहोत.
\s5
\p
\v 15 कारण येशू आपल्यासाठी मरण पावला आहे, यासाठी आपण कोणत्याही परिस्थीतीत देवाची सतत स्तुती केली पाहिजे. हे जनावरांची बळी देण्यापेक्षा चांगले अर्पण आहे. आपण ख्रिस्तावर भरवसा ठेवतो, हे इतरांना उघडपणे सांगण्यास आपण तयार असले पाहिजे.
\p
\v 16 आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका. कारण असे करण्याने तुम्ही देवाला संतोषविणारे अर्पण देत आहा.
\p
\v 17 आपल्या पुढाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन असा, कारण तेच असे आहेत जे तुमच्या सुस्थिचे रक्षण करत आहेत. त्यांना एके दिवशी देवासमोर उभे राहून देवाची परवानगी दिली तर त्यांनी काय केले त्याचे ते साक्षी असतील. त्यांच्या आज्ञा पाळा, तुमचे रक्षक समजून त्यांची कामे दु:खाने न करता आनंदाने करावे. कारण जर तुम्ही त्यांना वाईट वागणूक देता, तर ह्या गोष्टी नक्कीच तुम्हाला मदत करणार नाही.
\s5
\p
\v 18 माझ्यासाठी आणि माझ्यासोबत जे आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा, कारण मला याची खात्री आहे जे देवाली आवडत नाही असे मी काहीएक केले नसेल. आम्ही सर्व बाबतीत जे नेहमी बरोबर तेच तुमच्याबाबतीत आम्ही करत आलो आहे.
\v 19 मी तुम्हांला विनंती करतो की, देवाने मला लवकरच तुमच्याकडे परत पाठवावे म्हणून अडखळणे दूर व्हावे यासाठी प्रार्थना करा.
\s5
\p
\v 20 येशू आपल्या गरजा पुरवतो, आपले संरक्षण करतो आणि आपल्या मेंढरांसाठी एक महान मेंढपाळ म्हणून आपले मार्गदर्शन करतो, ज्या शांतीच्या देवाने आपला प्रभु येशू ख्रिस्त याला रक्ताच्या युगानुयुगाच्या नव्या कराराद्धारे उठविले, त्याच्या कृसावर रक्त सांडण्याद्वारे त्याने सर्वकालच्या कराराची पुष्टी आपल्याशी केली आहे.
\v 21 तर आता त्याची इच्छा पूर्ण करायला देव तुम्हांला चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याला संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो. ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. आमेन.
\s5
\p
\v 22 विश्वासातील माझ्या बंधूंनो, हा जो बोधपर संदेश मी थोडक्यात लिहिला आहे, तो धीर धरून ऐका अशी विनंती मी तुम्हांला करतो अशासाठी की तुम्ही उत्साहित व्हावे.
\p
\v 23 मला तुम्हास कळवायचे आहे की आपला बंधु तीमथ्य हा तुरुंगातून सुटला आहे. जर तो लवकर माझ्याकडे आला, तर तुम्हाला भेटायला मी येईन तेव्हा तो माझा सोबत येईल.
\s5
\p
\v 24 तुमच्या सर्व आध्यात्मिक पुढाऱ्यांना व जे देवाच्या ठायी विश्वास ठेवतात त्या सर्वांना माझा सलाम सांगा, इटली येथून जे सर्वजण आले आहेत ते देखील तुम्हांला सलाम सांगतात.
\v 25 देव सदैव तुम्हांवर प्रीती व त्याच्या कृपेने तुमचे रक्षण करो.