mr_udb/58-PHM.usfm

57 lines
11 KiB
Plaintext

\id PHM - MARATHI_UDB_NT
\ide UTF-8
\h फिलेमोना
\toc1 फिलेमोना
\toc2 फिलेमोना
\toc3 phm
\mt1 फिलेमोना
\s5
\c 1
\s प्रस्तावना
\p
\v 1 मी, पौल, ख्रिस्त येशूची सेवा करणारा, एक कैदी आहे. आमचा सहविश्वासू बंधू, तीमथ्य याच्यासोबत मी येथे आहे. आमचा प्रिय मित्र आणि सोबतीचा कामकरी, फिलेमोना, हे पत्र मी तुला लिहित आहे.
\v 2 आमचा सहविश्वासू बांधव, अफ्फिया आणि आमच्या सोबत एका सैनिकासारखा आहे जो आमच्या सोबत सेवा करतो तो अर्खिप्पा, याला देखील मी हे लिहित आहे. आणि तुझ्या घरात भेटणाऱ्या विश्वासणाऱ्याच्या समूहाला हे मी लिहित आहे.
\v 3 आमचा देव पिता आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा तुमच्या सर्वांवर सतत प्रेमळपणाच्या कृती करत राहो ही मी प्रार्थना करतो. त्याने सतत तुमच्यावर शांती देत राहण्याचे त्याने कायम असावे ही मी प्रार्थना करतो.
\s एका पळून गेलेल्या गुलामातर्फे विनंती
\s5
\p
\v 4 मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा मी नेहमी देवाचे आभार मानतो,
\v 5 कारण प्रभू येशूमध्ये तुम्ही किती भरवसा ठेवता याबद्दल मी नेहमी ऐकत असतो. तुम्ही सतत किती प्रेमळपणे राहता आणि सर्व विश्वासणाऱ्यांना फार मदत करता याबद्दल देखील मी ऐकतो.
\v 6 ख्रिस्तामध्ये आम्ही विश्वास ठेवतो त्यासारखाच तुम्ही देखील ठेवत आहात, म्हणून ख्रिस्ता संबंधित असलेली प्रत्येक चांगली गोष्ट जी आम्हाला तुम्हाला द्यायची आहे ती जाणून घेण्यासाठी तुम्ही सक्षम व्हावे ही मी प्रार्थना करतो.
\v 7 माझ्या प्रिय मित्रा, तुझे देवाच्या लोकांवर प्रेम आहे आणि त्यांना तू मदत करत आहे, म्हणून मला खूप आनंद आणि खूप धीटपणा वाटत आहे.
\s5
\p
\v 8 तू काहीतरी करावे म्हणून मला तुम्हाला विचारायचे आहे. मी ख्रिस्ताचा एक प्रेषित आहे, म्हणून तुम्ही काय करायला हवे ही आज्ञा तुम्हाला करण्याचा मला अधिकार आहे याबद्दल मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे.
\v 9 पंरतु देवाच्या लोकांवर तू प्रेम करतो, हे मला माहिती आहे म्हणून आज्ञा करण्याऐवजी ते करण्याची तुम्हाला मी विनंती करतो. एक वृद्ध झालेला मनुष्य, मी पौल आहे, आणि मी ख्रिस्ताची सेवा करतो म्हणून आता एक बंदिवान देखील आहे, मी त्यासाठी विनंती करतो आहे.
\s5
\p
\v 10 अनेसिमबद्दल तू काहीतरी करावे ही मी विनंती करतो आहे. मी येथे तुरूंगात असता ख्रिस्ताबद्दल त्याला सांगितले म्हणून तो आता मला माझ्या मुलासारखा झाला आहे.
\v 11 तू ओळखत असल्याप्रमाणे त्याच्या नावाचा अर्थ, “उपयुक्त” असला तरी भूतकाळात तुमच्यासाठी तो निरूपयोगी असा होता. परंतु आता तो दोघांनाही माझ्यासाठी आणि तुझ्या उपयोगी आहे!
\p
\v 12 जरी तो मला फार प्रिय आहे तरी मी त्याला तुझ्याकडे परत पाठवत आहे.
\v 13 तुझ्या जागी तो माझी सेवा करू शकेल त्या अनुसार त्याला माझ्या सोबत ठेवायला मला आवडेल. ख्रिस्ताबद्दलच्या माझ्या उपदेशामुळे मी तुरूंगात आहे म्हणून मला त्याची गरज आहे.
\s5
\p
\v 14 तथापि, मी अजून तुला विचारले नाही आणि तू त्याला माझ्याबरोबर येथे ठेवण्याची अजून परवानगी दिली नाही म्हणून त्याला येथे न ठेवण्याचे मी ठरविले आहे. तुम्हाला खरोखर माझी मदत करण्याची इच्छा असेल तरच केवळ तुम्ही माझी मदत केली पाहिजे हे मी ठरविले आहे.
\v 15 देवाने अनेसिमला तुझ्यापासून वेगळे होण्याची परवानगी दिली जेणेकरून त्याने सर्वकाळासाठी परत तुझा व्हावा म्हणून कदाचित हे कारण आहे!
\v 16 केवळ एक दास म्हणून तो आता तुमच्याकडे असणार नाही. त्याऐवजी, तो एका दासापेक्षा आधिक कोणीतरी असा तूला असेल. एक सहविश्वासू बंधू म्हणून आता तो तुझ्यापाशी असणार आहे! माझ्यासाठी तो खूप प्रिय आहे, पंरतु नक्कीच तो तुला देखील अधिक प्रिय होईल. आता तो केवळ एक दास म्हणून तुझ्या संबंधित नाही, परंतु तो प्रभूच्या देखील संबंधित आहे हे त्याचे कारण आहे.
\s5
\p
\v 17 म्हणून तू आणि मी एकत्र मिळून देवाचे कार्य करत आहोत हा विश्वास तू ठेवत आहे, तर तू माझे स्वागत केले तसेच त्याचे देखील करा.
\v 18 जर त्याने तुला कोणत्याही प्रकारे हानी केली असेल किंवा जर त्याला तुझे काही देणे लागत असेल, तर त्याबद्दलची ती जबाबदारी माझ्यावर सोड.
\v 19 मी पौल हे मी आता स्वहस्ते लिहित आहे; तुझे जे त्याचे देणे आहे त्याची मी तुला परतफेड करीन. अनेसिमने तुझे जे देणे आहे त्यापेक्षा तुला माझे देणे जास्त आहे, कारण ज्या गोष्टी मी तुला सांगितल्या आहे त्यामुळे तू तुझे स्वतःचे जीवन वाचविले आहे असे मी तुला म्हणू शकतो.
\p
\v 20 होय बंधु, प्रभूच्या ठायी माझ्यावर एवढा उपकार कर, आम्ही दोघेही ख्रिस्तामध्ये सामील झालेलो आहोत, माझे मन आनंदित कर.
\s समाप्ती
\s5
\p
\v 21 मी तुला जे काही करण्यास सांगेन ते तू करशील ह्याची मला खात्री आहे, म्हणून मी हे पत्र तुला लिहित आहे. खरं तर, मी तूला जे काही करण्यास सांगणार आहे त्यापेक्षा अधिक तू करशील हे मला माहिती आहे.
\p
\v 22 तसेच, मला तुरुंगातून सोडले जाईल आणि मी तुमच्या सर्वांकडे येईल ह्या तुमच्या प्रार्थनेच्या परिणामाची आशा मी आत्मविश्वासाने धरत आहे म्हणून मला राहण्यासाठी एक पाहूण्याची खोली तयार करा.
\s5
\p
\v 23 एपफ्रास, ख्रिस्त येशूला तो एकत्र झाला आहे म्हणून तो माझ्यासोबत तुरूंगात दुःख सोशीत आहे, तो देखील तुला त्याचे अभिवादन पाठवत आहे.
\v 24 माझे इतर सह कामकरी असणारे मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे देखील त्यांचे अभिवादन तुला पाठवत आहे.
\v 25 प्रभू येशू ख्रिस्त तुझ्यावर सतत दयाळू राहो ही मी प्रार्थना करतो.