mr_udb/55-1TI.usfm

239 lines
52 KiB
Plaintext

\id 1TI - MARATHI_UDB_NT
\ide UTF-8
\h 1 तीमथ्याला
\toc1 1 तीमथ्याला
\toc2 1 तीमथ्याला
\toc3 1ti
\mt1 1 तीमथ्याला
\s5
\c 1
\s नमस्कार व खोट्या शिक्षणासंबंधाने इशारा
\p
\v 1-2 प्रिय तीमथ्य, आपला एकमेव देव आणि तारणारा येशू ख्रिस्त, ज्याच्याठायी आम्हाला विश्वास आहे, ज्याने मला त्याचा प्रेषित होण्यासाठी बोलावले आहे, तो मी पौल आहे. तू मला माझ्या खऱ्या पुत्रासारखा आहेस, कारण मी तुला प्रभूकडे वळवले आहे. देव जो पिता, आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त तुझ्यावर दया करो व तुझ्यावर कृपा असो आणि तुला शांती देवो.
\s5
\p
\v 3 मासेदोनियाच्या प्रवासात असता, मी तुला इफिसमध्ये राहण्यास विनंती केली कारण, जे काही आम्ही शिकविले त्याच्यापेक्षा वेगळे शिक्षण देणारे काही लोक आहेत त्यांनी असे शिक्षण देऊ नये या करीता तू त्यांना आज्ञा कर.
\v 4 त्यांनी निरुपयोगी कहाण्या आणि लोक ज्याविषयी विचार करणे थांबवत नाहीत अशा वंशावळ्याकडे लक्ष देऊ नये. या गोष्टींमुळे केवळ लोकांचा आपसात एकमेकांबरोबर वादविवाद होतो, परंतु देवाची तारणाची योजना समजण्यास त्यांना मदत होत नाही या योजनेवर आम्ही विश्वासाने भरवसा ठेवतो.
\s5
\p
\v 5 त्याऐवजी, शुद्ध अंतःकरणाने, चांगल्या विवेकभावाने, खऱ्या विश्वासाने देवावर प्रीती करण्यात यावी या उद्देशाने आम्ही तुला शिक्षण देण्याची आज्ञा करतो.
\v 6 काही लोकांनी या चांगल्या गोष्टी करण्याचे प्रयत्न थांबवले आहेत; त्याऐवजी, ते आता व्यर्थ गोष्टी बोलत आहेत.
\v 7 त्यांना नियमशास्त्राविषयी शिकवण्याची इच्छा आहे, परंतु त्यांना ते समजत नाही. तरीही. ते जे काही शिकवतात ते खरे आहे असा ते अट्टाहास करतात.
\p
\v 8 परंतु नियमशास्त्र काय सांगते, व ते कसे वापरावे हे जर आपल्याला समजले तर नियमशास्त्र उपयुक्त आहे हे आम्हाला ठाऊक आहे.
\s5
\p
\v 9 चागंल्या लोकांवर नियंत्रण ठेवण्यास नियमशास्त्र देण्यात आलेले नाही हे आम्हांला ठाऊक आहे, तर बंडखोर लोक आणि जे देवाचा सन्मान करत नाहीत, पाप्यांसाठी, उद्धट व्यक्ती, हत्या करणारे, तर जे स्वतःच्या आई वडिलांनाही ठार मारणारे आहेत, अशांना ताब्यात ठेवण्यासाठी बनवण्यात आले आहे.
\v 10 आणखी, समलैंगीक आणि अनैतिक लैंगिक आचरण करणारे सर्व लोक, इतरांची चोरी करून त्यांना गुलाम म्हणून विकणारे, कायद्याच्या न्यायालयात लबाडी करतात व खोटे साक्षीदार आहेत त्यांना नियंत्रित करण्यासाठी आणि जे काही आपल्या चांगल्या व निकोप शिक्षणाहून जे काही वेगळे आहे ते थांबवण्यासाठी ते देण्यात आले आहे.
\v 11 ज्या देवाची आम्ही स्तुती करतो, त्याने आम्हांला जे अद्भुत शुभवर्तमान शिकवले आहे, त्याच्याशी हे सर्व काही सहमत आहे, आणि ते इतरांना घोषित करण्यासाठी त्याने माझ्यावर विश्वास टाकला आहे.
\s ख्रिस्तकृपेबद्दल पौलाने दाखवलेली कृतज्ञता
\s5
\p
\v 12 आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे मी आभार मानतो, कारण त्याची सेवा करण्यासाठी त्याने मला सामर्थ्य दिले. त्याची सेवा करण्यासाठी तो माझ्यावर अवलंबून आहे.
\v 13 पूर्वी, मी विश्वासणाऱ्यांचा छळ आणि अपमान केला, मी हिंसक कामे केली, परंतु देवाने माझ्यावर दया केली कारण मी विश्वास ठेवत नव्हतो, आणि मी काय करत होतो हे मला ठाऊक नव्हते.
\v 14 देवाने माझ्यावर अतिशय जास्त दया दाखवली आहे, यामुळे मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास आणि त्याच्यावर प्रेम करण्यास त्याने मला योग्य बनवले आहे.
\s5
\p
\v 15 यावर आपण पुर्णपणे भरवसा ठेवू शकतो म्हणून प्रत्येकाने हे सत्य स्वीकार करावे: पाप्यांना तारण्यासाठी येशू ख्रिस्त ह्या जगात आला. मी त्या सगळ्यांत सर्वात वाईट पापी आहे, हे खरे आहे.
\v 16 मी सर्वात जास्त पापी आहे म्हणून इतर पुष्कळांसमोर देवाने माझ्यावर दया केली हे यासाठी की त्याच्याठायी संयम आहे हे त्यांना दिसावे. जे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील त्यांना सार्वकालीक जीवन देण्यासाठी तो धीराने वाट पाहतो.
\p
\v 17 तो अनंतकाळचा राजा अदृश्य आहे, आणि तो अमर्त्य आहे. तोच केवळ देव आहे. हा तोच आहे ज्याची प्रत्येकजण नेहमी आणि सर्वकाळसाठी आदर व स्तुती करतील. आमेन.
\s5
\p
\v 18 तीमथ्य, माझ्या मुला, मी तुला आज्ञा करतो: काही विश्वासणाऱ्यांनी तुझ्या बाबतीत जी भविष्यवाणी केली त्याची आठवण ठेव. ह्या सर्वांचे पालन कर जसे तू देवासाठी कठीण श्रम करत आहेस.
\v 19 देवावर विश्वास ठेव आणि चांगली विवेकबुद्धी ठेव. काही लोकांनी त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासाचा नाश झाला.
\v 20 हुमनाय आणि आलेक्सांद्र हे दोघे पुरुष त्यांच्या सारखे आहेत. यासाठी मी त्यांना सैतानाकडे सोपवून दिले आहे की त्याने त्यांच्यावर हल्ला करावा, म्हणजे ते देवाचा अपमान न करण्यास शिकतील.
\s5
\c 2
\s सार्वजनिक उपासनेबाबत सूचना
\p
\v 1 अतिशय महत्वाचे म्हणजे, खोटे शिक्षक धोकादायक असल्या कारणाने, मी विश्वासणाऱ्यांना अशी विनंती करतो की, देवाने सर्व लोकांना मदत करावी यासाठी, त्याजकडे मागण्या, प्रार्थना, धन्यवाद करावा.
\v 2 राजांसाठी आणि इतरांवर ज्यांचा आधिकार आहे, त्या सर्वांसाठी प्रार्थना करा, जेणे करून आम्ही शांतीने व निवांतपणे जीवन जगावे, ज्याद्वारे आम्हांला देवाचा व इतर लोकांचा आदर करता येईल.
\v 3 देव, ज्याने आम्हांला वाचवले तो, जेव्हा आम्ही अशाप्रकारे प्रार्थना करतो तो आमचे ऐकतो. तो हे चांगल्या दृष्टिने पाहतो.
\v 4 सर्वांचे तारण व्हावे अशी त्याची इच्छा आहे. त्याच्याविषयीचे सत्य सर्वांनी शिकावे अशी त्याची इच्छा आहे.
\s5
\v 5 देव एकच आहे, तेथे केवळ एकच व्यक्ती असा आहे जो त्याने आमचा स्विकार करावा असे करतो. येशू ख्रिस्त हा मनुष्यच, तो एकच व्यक्ती होय, हेच सत्य आहे.
\v 6 त्याच्या स्वतःच्या इच्छेने तो सर्व लोकांना स्वतंत्र करण्यासाठी मरण पावला. देवाने ठरवलेल्या वेळेत त्याने हे घडवून आणले. हे दर्शवते की सर्वांचे तारण व्हावे अशी त्याची इच्छा आहे.
\v 7 हे सत्य घोषित करण्यासाठी, देवाने मला संदेष्टा आणि प्रेषित बनवले आहे. मी सत्य बोलतो; लबाड बोलत नाही. ज्या गोष्टींवर परराष्ट्रीयांनी खरोखर विश्वास ठेवावा असे सत्य मी शिकवतो.
\s5
\p
\v 8 म्हणूनच, पुरुषांनी सर्वत्र प्रार्थना करतेवेळी त्यांचे हात देवाकडे वर करावे जेणेकरून त्याने त्यांचा स्विकार करावा अशी माझी इच्छा आहे. देवाबद्दलचा राग किंवा संशय दर्शविण्यासाठी विश्वासणाऱ्यांनी प्रार्थना करू नये.
\v 9 स्त्रियांनी काळजीपूर्वक वस्त्र घालावे अशी माझी इच्छा आहे. केसाची वेणी घालणे, सोने, मोती किंवा महागड्या वस्त्राऐवजी त्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवावे. जेणेकरून त्या इतरांना दाखविण्यासाठी वस्त्र परिधान करणार नाहीत.
\v 10 चांगली कामे करणाऱ्या व आम्ही देवाचा सन्मान करतो असे बोलणाऱ्या स्त्रियांना शोभते असे वस्त्र स्त्रियांनी परिधान करावे.
\s5
\p
\v 11 जेव्हा पुरूष विश्वासणाऱ्यांना शिकवितात तेव्हा, स्त्रियांनी शांतीने ऐकावे आणि जे त्यांनी ऐकले त्याविषयी त्यांनी प्रश्न विचारू नये.
\v 12 पुरुषांना शिकवण्याची व त्यांनी काय करावे असे सांगण्याची परवानगी मी स्त्रियांना देत नाही. विश्वासणारे शिकण्यासाठी येतात तेव्हा देवाचा सन्मान करणाऱ्या स्त्रियांनी शांत रहावे.
\s5
\p
\v 13 कारण प्रथम आदाम घडवला गेला, नंतर हव्वा.
\v 14 आणि तो आदाम नव्हता ज्याला सर्पाने फसवले. ती स्त्री होती जिला त्याने पुर्णपणे फसवले, व तिने पाप केले.
\v 15 परंतु जर त्या निरंतर देवामध्ये विश्वास करतील, त्याच्यावर प्रीती करतील, त्याला संतुष्ट करणारे जीवन जगतील, आणि आपल्या विचारात समंजस राहतील तर जसे स्त्रिया लेकरांना जन्म देतात व वाढवतात देव त्यांना सुरक्षित ठेवील.
\s5
\c 3
\s ख्रिस्ती मंडळीचे कामदार
\p
\v 1 जे मी तुला इथे सांगत आहे त्यावर तू अवलंबून रहावे: जर एखादा विश्वासनाऱ्यांवर देखरेख करावी अशी तीव्र इच्छा धरतो, तर त्याला खरोखर काहितरी चांगले करण्याची इच्छा आहे.
\v 2 तथापि ह्या कारणासाठी, देखरेख करणारा असा असावा, ज्याच्यावर कोणत्याही वाईट गोष्टीविषयी कोणीही आरोप लावू नये. त्याला केवळ एकच पत्नी असावी. त्याने कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये; त्याने शहाणपणाने विचार करावा. त्याने शिस्तीने वागावे, आणि खुप अनोळखी लोकांचे स्वागत करावे. इतरांना शिकवण्यासाठी तो सक्षम असावा.
\v 3 तो दारूडा आणि लवकर भांडण करणारा नसावा. त्या ऐवजी, तो इतरांसोबत धीराने व शांतीने राहणारा असावा. तो पैशांसाठी लोभी नसावा.
\s5
\v 4 त्याने स्वतःच्या घरातील लोकांवर चांगले नियंत्रण करावे. त्याच्या मुलांनी आदराने त्याच्या आज्ञा पाळाव्यात.
\v 5 मी हे सगळे सांगतो कारण ज्या व्यक्तीला स्वतःच्या घरातील लोकांवर कसे नियंत्रण करावे हे ठाऊक नाही, तर तो देवाच्या लोकांच्या गटाची काळजी कशी घेईल?
\s5
\v 6 देखरेख करण्यासाठी नविन विश्वासणारा नसावा, कारण तो इतरांपेक्षा स्वतःला चांगला समजेल. जर तसे घडले, तर जशी सैतानाला शिक्षा दिली तशी शिक्षा देव त्याला देईल.
\v 7 जे मंडळीच्या बाहेर आहेत त्यांनी देखील त्याच्या विषयी चांगला विचार करावा. नाहीतर कदाचित तो लज्जित होईल आणि सैतान त्याला पाप करण्यासाठी प्रवृत्त करील.
\s5
\p
\v 8 ह्याच प्रकारे, वडील, इतर लोक त्यांचा आदर करतील असे असावे. ज्या वेळेस ते बोलतील त्यांनी प्रामाणिक रहावे. त्यांनी जास्त प्रमाणात द्राक्षारस घेऊ नये, आणि ते पैशांसाठी लोभी नसावे.
\v 9 देवाने आपल्याला सांगितलेल्या सत्य गोष्टींवर त्यांनी विश्वास ठेवावा, आणि त्या वेळेस जे योग्य आहे ते समजून घ्यावे व ते करावे.
\v 10 प्रथम त्यांच्यामध्ये अशा गुणधर्मांचा शोध कर, आणि नंतर सेवा करण्यासाठी त्यांची निवड कर जेणेकरून कोणालाही त्यांच्या विषयी काहीही चुकीचे आढळणार नाही.
\s5
\v 11 ह्याच प्रकारे, इतर लोकांनी वडील आहेत त्यांच्या पत्नींचा आदर करावा. इतर लोकांविषयी त्यांच्या पत्नींने वाईट बोलू नये. त्यांनी कोणत्याही गोष्टींचा अतिरेक करू नये, आणि त्या जे काही करतात त्यामध्ये त्यांनी प्रामाणिक राहावे.
\v 12 जो वडील आहे त्याला एकच पत्नी असावी आणि त्याची मुले व त्याच्या मालमत्तेवर त्याने चांगले नियंत्रण करावे.
\v 13 चांगल्या प्रकारे खास मदत करणारे ते असे मनुष्य असतात ज्यांचा विश्वासणारे अतिशय आदर करतात. जेणेकरून ते येशू ख्रिस्तावर अधिक विश्वास ठेवतात.
\s5
\p
\v 14 जसे मी तुला ह्या गोष्टी लिहितो, तुझ्याकडे लवकर येण्याची मी आशा धरतो.
\v 15 जर मी लवकर नाही आलो तर, जिवंत देवाच्या विश्वासणाऱ्यांचा जो गट आहे, त्या देवाच्या परिवाराला कसे चालवावे हे तुला माहित असायला हवे, म्हणून मी तुला आत्ताच लिहित आहे. हा तोच विश्वासणाऱ्यांचा गट आहे जो सत्य शिकवतो आणि हे सत्य आहे अशी साक्ष देतो.
\s5
\p
\v 16 आणि आम्ही सर्व मिळून म्हणतो,
\q जे सत्य देवाने आम्हांला सांगितले ते खुप महान आहे, आणि ते आम्हांला त्याचा आदर करण्याची परवानगी देते:
\q “देव मानवी शरीरामध्ये पाहिला आणि ओळखला गेला.”
\q “तो नीतिमान होता हे पवित्र आत्म्याने जाहिर केले.”
\q “देवदूतांनी त्याला पाहिले.”
\q “विश्वासणाऱ्यांनी राष्ट्रांमध्ये त्याची घोषणा केली.”
\q “जगातल्या पुष्कळ भागातील लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.”
\q “त्याच्याकडे देवाचे सामर्थ्य आहे आणि देवाने त्याला उंच केले.”
\s5
\c 4
\s खोटे शिक्षण देणाऱ्याविषयी
\p
\v 1 आता पुढील वेळात आत्मा स्पष्टपणे सांगतो, काही लोक ख्रिस्ता विषयीच्या सत्यावर विश्वास ठेवणे थांबवतील आणि विश्वासणाऱ्यांना फसवणाऱ्या आत्म्याकडे व चुकीच्या गोष्टी शिकवणाऱ्या भुतांकडे लक्ष लावतील.
\v 2 हे लोक एक गोष्ट सांगतात परंतु त्यांना आवडतात अशा कोणत्याही वाईट गोष्टी ते करतात, जणू काय तापलेल्या धातूने डाग दिल्यासारखे त्यांचे मन भ्रष्ट झाले आहे.
\s5
\p
\v 3 ते विश्वासणाऱ्यांना विवाह करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करतील. काही पदार्थ खाऊ नये असे ते त्यांना सांगतील, जरी त्या देवाने बनवल्या आहेत, तर ज्या विश्वासणाऱ्यांना सत्य समजून आले आहे त्यांनी स्वतःबद्दल देवाला धन्यवाद देत एकमेकांना सांगावे.
\v 4 मी हे सांगतो कारण जे सर्वकाही देवाने बनवले ते चांगले आहे. देवाला धन्यवाद देत असतांना जे काही त्याच्याकडून आम्हांला प्राप्त होते ते आम्ही नाकारत नाही.
\v 5 देवाकडे प्रार्थना करण्याद्वारे त्याच्या वचनावर विश्वास ठेवण्याद्वारे आम्ही त्याच्यासाठी वेगळे केले आहोत.
\s5
\p
\v 6 बंधू आणि भगिनींना जर तू हे सत्य सांगत राहशील, तर तू येशू ख्रिस्ताचा उत्तम सेवक होशील. तू त्याची चांगली सेवा करशील, कारण ज्या संदेशावर आम्ही विश्वास ठेवतो तो तुला प्रशिक्षीत करीत आहे, जसे देवाने तुला उत्तम गोष्टी शिकवल्या आणि ज्यांचे तू अनुकरण देखील करत आहेस त्या तुला प्रशिक्षीत करत आहे.
\v 7 परंतु म्हाताऱ्या स्त्रियांच्या गोष्टी आणि ज्या निरर्थक अशा गोष्टी ऐकू नकोस. त्या ऐवजी, देवाचा आदर करण्यासाठी स्वतःला प्रशिक्षीत कर.
\v 8 शारिरीक कसरतीने फक्त थोडीशी मदत होते, परंतु जर तू देवाचा आदर करशील, जसे तू आता पृथ्वीवर राहत आहे आणि भविष्यात देवासोबत राहतांनी ह्या सर्वांसोबत हे तुला मदत करतील.
\s5
\p
\v 9 मी जे काही लिहिले आहे त्याच्यावर तू पूर्णपणे अवलंबून राहू शकतोस. हे पूर्णपणे विश्वास ठेवण्यास योग्य आहे.
\v 10 ह्याच कारणासाठी आम्ही जेवढे करता येईल तितके कठीण परिश्रम करतो, कारण सर्व मानव जातीचा तारणारा विशेष करून जे विश्वास ठेवतात त्यांच्या तारणाऱ्या जिवंत देवामध्ये आमची आशा आहे.
\s तीमथ्याचा खाजगी जीवनक्रम व शिक्षण
\s5
\p
\v 11 ह्या गोष्टी विश्वासणाऱ्यांना घोषणा करून शिकव.
\p
\v 12 तू काहीतरी विशेष होण्यास अजून तरुण आहेस हे कोणालाही म्हणू देवू नकोस. त्याऐवजी, कसे जीवन जगावे हे इतर विश्वासणाऱ्यांना दाखवून दे, तुझ्या बोलण्यातून, तू कसा राहतोस, तू कशी प्रीती करतोस, तू देवावर विश्वास कसा ठेवतोस, आणि वाईट कृत्ये करण्यापासून तू कसा दूर राहतोस ह्या द्वारे त्यांना दाखवून दे.
\v 13 मी तुझ्याकडे येईपर्यंत, विश्वासणाऱ्यां लोकांमध्ये देवाचे वचन वाचले ह्याची खात्री कर, आणि तुच विश्वासणाऱ्यांना देवाचे वचन स्पष्टकरून शिकवावे.
\s5
\p
\v 14 वरिष्ठांनी तुझ्यावर हाथ ठेऊन जो देवाचा संदेश तुला सांगितला तेव्हा जे काही देवाने तुला दिले, ते दान तुझ्यामध्ये आहे ते वापरण्याची खात्री कर.
\v 15 ह्या सर्व गोष्टी प्रमाणे राहण्याची आणि त्यानूसार करण्याची खात्री कर. अशाच प्रकारे, सर्व विश्वासणाऱ्यांना दिसून येईल की तू उत्तमातले-उत्तम करत आहेस.
\p
\v 16 काळजीपूर्वक स्वतःवर नियंत्रण कर आणि जे काही आम्ही शिकवले ते कर. या गोष्टी करत रहा. जर ते असे करशील तर तू स्वतःचे रक्षण करशील आणि जे तुझे ऐकतात त्यांचे देखील.
\s5
\c 5
\p
\v 1 तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या मनुष्यासोबत कठोर संभाषण करू नकोस. त्या ऐवजी, त्याला आपला पिता समजून प्रोत्साहन दे. अशाच प्रकारे तरुण माणसांसोबत करावे जणू काय ते तुझे भाऊ आहेत.
\v 2 वृद्ध स्त्रियांना आई समान प्रोत्साहन कर, आणि तरुण स्त्रियांना जसे त्या तुझ्या बहिणी आहेत. त्याच्या सोबत अशी वागणुक ठेव जेणेकरून कोणीही दोष लावू शकणार नाही.
\s ख्रिस्ती मंडळीतील विधवांचा परामर्ष
\s5
\p
\v 3 विधवांचा आदर कर जर त्या खरोखर विधवा आहेत.
\v 4 जर एखाद्या विधवेला मुले आणि नातवंडे असतील, तर त्यांनी घरी आपल्या मातेचा आदर करावा आणि जे काही तिने त्यांच्यासाठी केले आहे त्या सर्वांची तिला परत फेड करावी. जर ते असे करतील, तर ते देवाला प्रसन्न करतील.
\s5
\p
\v 5 आता, ती खरी विधवा आहे जिच्या कुटूंबात कोणीही सदस्य नाही. तर ती देवावर अवलंबून आहे आणि निरंतर दिवस व रात्र त्याच्याकडे प्रार्थना करून ती जे काही मागणार तेव्हा तो जे काही तिला देईल त्यावर ती अवलंबून आहे.
\v 6 जर जी विधवा स्वतःला कसे संतुष्ट करता येईल यासाठी जगते तर, ती जिवंत असली तरी मेलेली आहे.
\s5
\p
\v 7 तू ह्या गोष्टी जाहिर कर जेणेकरून ह्या विधवा आणि त्यांचे कुटूंबीय काहीही चुकीचे करणार नाही.
\v 8 जर कोणी त्याच्या स्वतःच्या नातेवाईकांना मदत करण्याचा प्रयत्न करत नाही, विशेषतः जो त्याच्या स्वतःच्या घरात राहतो, आम्ही जो विश्वास ठेवतो तो त्याने नाकारला आहे. खरे तर, तो अविश्वासणाऱ्या पेक्षा वाईट आहे.
\s5
\p
\v 9 खरोखरीच्या विधवांच्या यादीत साठ वर्षा पेक्षा अधिक असलेल्या विधवांचे नाव नोंदवावे. ती केवळ एकाच पतीची पत्नी असावी, ज्याच्या सोबत ती विश्वासू होती.
\v 10 ती चांगली कामे करते ह्याची लोकांना माहिती असावी: जसे की ती मुलाबाळांची काळजी घेते; ती अनोळखी लोकांचे स्वागत करते; ती विश्वासणाऱ्यांना किंवा जे लोक त्रासात आहेत त्यांना मदत करते; मोठी विविध प्रकारची चांगली कामे करणारी असे तिला ओळखतात.
\s5
\v 11 विधवांच्या यादीत तरुण विधवांची नोंद करू नये, कारण त्यांचे मन बदलून त्या विवाह करण्यास प्रवृत्त होतात आणि ख्रिस्तापेक्षा जास्त विवाहाच्या प्रेमाला महत्व देतात.
\v 12 जेव्हा त्या असे करतात, तेव्हा त्या विधवा असण्याच्या समर्पणापासून मागे फिरून दोषीपणाकडे जातात.
\v 13 आणखी, त्या घरोघरी जातात व काहीच न करण्याची त्यांना सवय लागते. आणखी त्या, व्यर्थपणाच्या आणि मूर्खपणाच्या कार्यात व्यस्त होतात आणि त्यांनी ज्या गोष्टी बोलू नये अशा गोष्टी त्या बोलतात.
\s5
\v 14 तरुण विधवांनी विवाह करावा, त्यांना लेकरे व्हावी, आणि त्यांचे घर चालवावे, हे मला बरे वाटते, जेणे करून सैतान, जो शत्रू आहे, त्याला त्यांच्यावर दोषारोप ठेवण्याची संधी मिळू नये.
\v 15 मी ह्या गोष्टी लिहित आहे कारण काही तरुण विधवांनी सैतानाच्या मागे जाण्यासाठी ख्रिस्ताचा मार्ग अगोदरच सोडला आहे.
\p
\v 16 जर एखादी विश्वासणारी स्त्री जिच्या नातेसंबंधामध्ये विधवा आहे, तिने त्यांना मदत करावी, तर अशा विधवांचा मंडळीला त्रास होणार नाही. ह्याच प्रकारे मंडळीला खऱ्या विधवांची मदत करण्यास साहाय्य होईल.
\s वडील
\s5
\p
\v 17 विश्वासणाऱ्यांनी वडीलजण जे त्यांना चांगल्या प्रकारे चालवतात, आणि विशेषकरून जे संदेश सांगतात व देवाचे वचन शिकवतात त्यांना दुप्पट आदर द्यावा.
\v 18 कारण शास्त्रलेख असे सांगते, “बैलाने मळनी केलेले धान्य खाण्यापासून तू त्याला थांबवू नकोस,” आणि “मजुरी करणाऱ्याला त्याची मजुरी मिळणे गरजेचे आहे.”
\s5
\p
\v 19 जो पर्यंत दोन किंवा तीन लोक कोणत्याही बाबतीत साक्ष देत नाहीत, तो पर्यंत जो कोणी एखाद्या वडीलाला दोष लावतो तर त्याचे ऐकू नकोस.
\v 20 जे पाप करत राहतात, त्यांची तिथे सुधारणा कर जेथे सर्वजण बघू शकतील, ज्यामुळे इतर लोकांना पाप करण्यासाठी भीती वाटेल.
\s5
\p
\v 21 देव, येशू ख्रिस्त, आणि निवडलेल्या दूतांसमोर मी तुला ह्या गोष्टी करण्यासाठी गंभीरतेणे आदेश देत आहे. कोणाचाही न्याय करण्याची वेळ येण्या अगोदर न्याय करण्याची घाई करू नको. विश्वासणाऱ्यांना चालवतांना कोणाचाही पक्षपात करू नको.
\p
\v 22 जेव्हा तुला वाटते की कोणीतरी विश्वासणाऱ्यांची सेवा करण्याची सुवार्ता करावी तर, लवकर निर्णय घेऊ नकोस, फार लवकर त्यांची निवड करू नकोस. आणि पाप करणाऱ्यांचा भागीदार होऊ नकोस. तू स्वतःला निर्दोष ठेव.
\s5
\v 23 तीमथ्य, फक्त पाणीच पित राहू नकोस, त्याऐवजी, तुझ्या पोटाच्या दुखण्यासाठी थोडयाशा द्राक्षारसाचे सेवन कर.
\v 24 काही लोकांची पापे सर्वांना स्पष्ट असतात, मंडळीला त्यांचा न्याय करण्यासाठी जास्त वेळेची गरज नाही. परंतु काही पापे उशिराने मंडळीच्या लक्षात येतात.
\v 25 याच प्रकारे, काही चांगली कृत्ये सर्वांना उघड असतात, परंतु इतर काही चांगली कृत्ये काही वेळाने भविष्यात उघड होतात.
\s5
\c 6
\s दास
\p
\v 1 जसे विश्वासणाऱ्यांसाठी जे दास आहेत, त्यांनी सर्व मार्गात आपापल्या धन्याचा आदर करावा, म्हणून कोणीही देवाचा व जे आम्ही शिकवितो त्याचा अपमान करणार नाही.
\p
\v 2 ज्या दासांचे धनी विश्वासणारे आहेत त्यांनी त्यांचा आदर करण्यात कमी करू नये, कारण ते बंधू आहेत. इतकेच नाहीतर, त्यांनी त्यांच्या धन्याची अधिक उत्तम प्रकारे सेवा करावी, कारण ज्यांची ते सेवा करतात ते त्यांचे बंधू आहेत ज्यांच्यावर त्यांनी प्रीती करावी. ह्या गोष्टी विश्वासणाऱ्यांना शिकव आणि जाहिर कर.
\s खोटे शिक्षण व खरी संपत्ती ह्यांविषयी
\s5
\p
\v 3 ज्या योग्य गोष्टी आम्ही लिहिल्या जे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हांला शिकवल्या आणि ज्या देवाचा आदर करतात, काही लोक हे वेगळे शिक्षण देत आहेत
\v 4 अशा प्रकारचे लोक फार गर्विष्ठ असतात आणि काहीही समजून घेत नाहीत. इतकेच नाहीतर, निरर्थक बाब आणि व्यर्थ शब्दांविषयी वादविवाद करत राहणे त्यांना आवडते. परिणामी, त्यांचे ऐकून घेणारे लोक इतरांचा द्वेष करतात. ते इतरांबरोबर आणि आपसामध्ये देखील भांडत राहतात. ते इतरांविषयी वाईट गोष्टी बोलतात. इतर लोकांचे वाईट हेतू आहे त्यांना अशी शंका असते.
\v 5 त्यांनी सत्य गोष्टींना नाकार दिला म्हणून त्यांची विचार करण्याची पद्धत पुर्णपणे चुकीची झाली. परिणामी धार्मिक गोष्टी करून त्यांना भरपुर पैसा मिळेल, असे त्यांनी चूकीचे विचार केले.
\s5
\p
\v 6 परंतु, जेव्हा आपण देवाचा सन्मान होईल अशा पद्धतीने जीवन जगतो तेव्हा आपल्याला खरोखरच मोठा लाभ होतो आणि जेव्हा आम्ही हे करतो त्यात समाधानी असतो.
\v 7 हे खरे आहे, जेव्हा आमचा जन्म झाला तेव्हा आम्ही ह्या जगात काहीच आणले नाही, आणि जेव्हा आमचा मृत्यु होईल त्यावेळेस आम्ही ह्यातून बाहेर काहीच घेऊन जाऊ शकत नाही.
\v 8 ह्यामुळे जर आमच्याकडे जेवण आणि घालण्यासाठी कपडे असले, त्यात आम्ही संतुष्ट असलो पाहिजे.
\s5
\p
\v 9 पण काही लोक धनवान होण्याची तीव्र इच्छा बाळगतात. याचा परिणाम असा होतो, ते पैसे मिळविण्यासाठी चुकीचे काम करतात, आणि ह्याचे निमित्त जसे प्राणी सापळ्या मध्ये फसतात तसे तेही फसतील. ते मूर्खपणे पुष्कळ गोष्टींची इच्छा बाळगतात, आणि ते दुखावले जातात देव त्यांना पुर्णपणे नष्ट करील!
\v 10 ज्यावेळेस लोकांना पुष्कळसा पैसा हवा असतो तेव्हा ते सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी करतात. कारण काही लोक पैशांसाठी तरसतात, त्यांनी सत्यावर विश्वास ठेवणे थांबवले ज्यावर आम्ही सर्वजण विश्वास करतो आणि ह्याला त्यांनी स्वतःला खुप दुःखी होण्याचे निमित्त बनवले आहे.
\s सदबोध
\s5
\p
\v 11 परंतु तुझ्यासाठी, तू देवाची सेवा करणारा मनुष्य असल्याने पैश्यांच्या प्रेमापासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेव. जे योग्य आहे ते करण्याचे तू निर्णय कर, आणि देवाचा आदर कर. देवावर विश्वास ठेव, आणि इतरांवर प्रीती कर. सर्व कठीण परिस्थितीला सहन कर. इतरांबरोबर सर्वदा सभ्यतेने रहा.
\v 12 जसा तू विश्वास ठेवतोस त्यानूसार जगण्याचा तुझ्या पूर्ण शक्तीने आणि कळकळीने प्रयत्न कर. तू अनंत काळासाठी जगशील ह्याची खात्री होण्याकरता तुला दिलेली कामे निरंतर योग्य रितीने करत रहा. देवाने तुला त्याच्या सोबत राहण्याकरीता निवडले आहे ह्याची आठवण ठेव, आणि पुष्कळ वडील तुझे ऐकतील तेव्हा जो विश्वास तू ठेवलास तो त्यांना ठामपणे सांग.
\s5
\p
\v 13 देव, ज्याने सर्वांना जीवन दिले, त्याला तुम्ही जे सर्व काही करता ते ठाऊक आहे. येशू ख्रिस्तलाही तुम्ही जे काही करता ते ठाऊक आहे. सत्य काय आहे हे त्याने पंत पिलाता समोर त्याची परीक्षा होत असता ठामपणे घोषणा देऊन सांगितले.
\v 14 जसे त्या सर्व गोष्टींची तू आठवण ठेवतोस, म्हणून मी तुला आज्ञा देतो की ख्रिस्ताने प्रत्येक मार्गात जे काही आज्ञापीले ते तू दृढ धरून ठेव. ह्या शिक्षणाला अशा प्रकारे दृढ धरून ठेव आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने जे काही चुकीचे आहे त्या बद्दल तो पुन्हा येईपर्यंत तुला दोषी ठरवू नये.
\s5
\v 15 लक्षात असू दे की येशूने योग्य वेळेत पुन्हा यावे असे देव करील. देव अद्भुत आहे! फक्त तोच राज्यकर्ता आहे! इतर सर्वलोक जे राज्य करतात त्यांच्यावर तो राज्य करतो!
\v 16 तोच एकमेव आहे जो कधीही मरणार नाही, तो स्वर्गामध्ये प्रकाशात राहतो तो इतका प्रकाशमय आहे की त्याच्या जवळ कोणीही जाऊ शकत नाही! तोच एक असा आहे ज्याला कोणत्याही व्यक्तीने पाहिले नाही आणि कोणतीही व्यक्ती त्याला पाहू शकत नाही! सर्वलोक त्याचा आदर करतील अशी माझी इच्छा आहे आणि तो सामर्थ्याने सर्वकाळ राज्य करील! असेच हो!
\s5
\p
\v 17 ह्या युगातील विश्वासणारे जे धनवान आहे त्यांना सांग की अभिमान बाळगू नये, त्यांनी आपल्या मालमत्तेवर भरवसा टाकू नये, कारण किती जास्त काळ ती त्यांच्या सोबत आहे हे त्यांना निश्चित माहित नाही. त्याऐवजी, त्यांनी देवावर भरवसा ठेवावा. तोच एक असा आहे जो आम्हांला आनंद घेता येईल असे सर्वकाही भरपुरतेने देईल.
\v 18 त्यांना, चांगली कामे करण्यास देखील सांग. हिच ती खरी संपत्ती आहे. जी खरोखर, त्यांच्याकडे जे काही आहे ते त्यांनी इतरांसोबत वाटून घ्यावे.
\v 19 जर ते असे करतील, तर हे असे होईल जणू काय ते स्वतःसाठी पुष्कळ गोष्टींचा साठा करतील जो देव त्यांना देईल. जेव्हा ते हे करतील, तेव्हा त्यांना जीवन प्राप्त होईल तेच खरे जीवन असेल.
\s5
\p
\v 20 तीमथ्या, येशूने तुला दिलेल्या संदेशाची विश्वासूपणे घोषणा कर. देवासाठी निरर्थक आहे अशा गप्पा गोष्टी करणाऱ्या लोकांना टाळ. अशा लोकांना टाळ जे म्हणतात की आम्हांला खरे ज्ञान आहे परंतु आम्ही शिकवलेल्या सत्य गोष्टींच्या विरोधात ते बोलतात.
\v 21 काही लोक ह्या गोष्टी शिकवतात आणि म्हणून त्यांनी सत्यावर विश्वास ठेवने थांबवले आहे. देव तुम्हा सर्वांवर दया करो.