mr_udb/54-2TH.usfm

99 lines
24 KiB
Plaintext

\id 2TH - MARATHI_UDB_NT
\ide UTF-8
\h 2 थेस्सलनीकाकरांस
\toc1 2 थेस्सलनीकाकरांस
\toc2 2 थेस्सलनीकाकरांस
\toc3 2th
\mt1 2 थेस्सलनीकाकरांस
\s5
\c 1
\p
\v 1 मी, जो पौल, तीमथ्य आणि सिल्वान, देव जो पिता आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याजबरोबर जुळलेल्या, थेस्सलनीका येथील विश्वासणाऱ्या मंडळीस, हे पत्र लिहत आहोत.
\p
\v 2 आपला देव जो पिता, आणि येशू ख्रिस्त आपला प्रभू, तुमच्यावर कृपा आणि तुम्हास शांती देवो.
\s5
\p
\v 3 विश्वासातील माझ्या बंधूंनो, तुमच्याकरता आम्ही देवाला धन्यवाद देत राहतो, कारण तुम्ही येशूवर अधिकाधिक विश्वास टाकत आहा, आणि त्यामुळे तुम्ही एकमेकांवर अधिक प्रेम करत आहात.
\v 4 परिणामस्वरुपी, आम्ही अभिमानाने देवावर विश्वास ठेवणाऱ्या इतर मंडळींना आपल्याबद्दल गर्वाने सांगत आहोत. आम्ही त्यांना सांगतो की इतर लोक तुम्हाला बऱ्याचदा त्रास देतात तरीसुद्धा तुम्ही कसे सहनशील झाला आणि कसा प्रभू येशूमध्ये तुम्ही भरवसा ठेवला आहे.
\p
\v 5 तुम्ही सर्व त्रास सहन करीत असल्याने, आम्ही स्पष्टपणे जाणतो की देव न्यायीपणे सर्व लोकांचा न्याय करेल. तुमच्या बाबतीत तो सर्वांना असे घोषीत करेल की, त्याच्या करीता सर्वकाळ राज्य करण्यास तुम्ही योग्य आहात, कारण त्याच्यामध्ये विश्वास ठेवल्याने तुम्ही त्रासाला कबूल केले.
\s5
\v 6 जे लोक तुम्हाला त्रास देत आहेत त्यांच्याकरता देव नक्कीच त्रासाचे कारण होईल, कारण त्याला असे करणे योग्य वाटते.
\v 7 त्याला असेही वाटते की तुमचे परिश्रम थांबवण्याद्वारे तुम्हास त्याने बक्षीस द्यावे. जेव्हा आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या सामर्थ्यशाली देवदूतांसह स्वर्गातून खाली येऊन स्वत:ला प्रत्येकासमोर प्रकट करील तेव्हा, तो आमच्या दोघांसाठी हे असे करील.
\v 8 मग तेजस्वी अग्नीने तो त्या लोकांना शिक्षा करील जे त्याच्याशी एकनिष्ठ नव्हते, ज्यांनी प्रभू येशू विषयीच्या सुवार्तेचे पालन केले नाही.
\s5
\v 9 तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यांत येऊन सर्वकाळचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल.
\v 10 देवाच्या निश्चीत केलेल्या समयी, प्रभू येशू स्वर्गातून परत आल्यावर असे करणार. याचा परिणाम असा होईल की, त्याच्यावर विश्वास ठेवणारे असे आम्ही, त्याचे आश्चर्य व स्तुति करू. आणि आम्ही सांगितलेल्यावर तुम्ही गंभीरतेने विश्वास ठेवल्या कारणाने तुम्ही ही तेथे असणार.
\s5
\p
\v 11 अशासाठी तुम्ही ह्या प्रकारे येशूची स्तुती करावी, आम्ही तुमच्यासाठी देखील प्रार्थना करत आहोत. आम्ही प्रार्थना करतो की देव तुम्हाला जगण्याकरता बोलाविलेल्या नवीन मार्गात तुम्हाला योग्य बनवेल. तुम्ही इच्छा केलेल्या मार्गात चांगले काम करावे ह्यासाठी तो तुम्हास सक्षम करेल. ज्या अर्थी तो सामर्थ्यशाली आहे आणि त्याच्या ठायी विश्वास ठेवला म्हणून तो तुम्हास सर्व चांगले काम करण्यास सक्षम करणार.
\v 12 आम्ही प्रार्थना करतो कारण आपण आपल्या प्रभू येशूची स्तुती करावी अशी आमची इच्छा आहे, आणि त्यानेही तुमचा आदर करावा अशी आमची इच्छा आहे. हे कोणाद्वारे होईल, देव, ज्याची आम्ही आराधना करतो, आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रेमदये मुळे.
\s5
\c 2
\p
\v 1 आता आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची परत येण्याची वेळ आणि देव जेव्हा आपल्याला येशू ख्रिस्ता सोबत एकत्र करणार त्या संबंधाने मला तुम्हाला लिहायचे आहे. विश्वासातील माझ्या बंधूनो, मी तुम्हास विनंती करतो,
\v 2 की तुमच्या कडे येणाऱ्या कुठल्याही संदेशाकडे तुम्ही शांतपणे विचार करावा. मग तो कोणीतरी पवित्र आत्म्याकडून घोषीत करा अथवा तो कोणा व्यक्ती कडून येवो किंवा एखाद्या पत्राद्वारे जे मी लिहण्याचा दावा करत असेन. येशू पृथ्वीवर परतला आहे, ह्यावर तुम्ही विश्वास ठेवू नये अशी माझी इच्छा आहे.
\s5
\p
\v 3 अशा संदेशाने कोणीही तुमची फसवणूक करता कामा नये.
\p प्रभू (देव) लवकरच येणार नाही. प्रथम, बरेच लोक देवाविरुद्ध बंड करतील. ते एका विशिष्ट मनुष्याला मान्य करतील आणि त्यानूसार वागतील, जो देवाविरुद्ध खूप भयंकर पाप करणार, तोच एक देवाने बनविलेले सर्वकाही नष्ट करणार.
\v 4 तो देवाचा फार मोठा शत्रू होईल. आणि तो जे देवाला मानतात आणि त्याची उपासना करतात, त्या प्रत्येक गोष्टीच्या विरुध्द काम करणार. याचा परिणाम असा होईल की, देवाच्या मंदिरात तो बसेल आणि तेथून राज्य करेल. तो सर्व लोकांच्या समोर असे घोषीत करेल की तो स्वत: देव आहे.
\s5
\v 5 मी तुमच्याबरोबर थेस्सलनीकात असतांना हे तुम्हास सांगत असे ह्याची मला खात्री आहे.
\p
\v 6 तुम्हाला हे देखील माहिती आहे की काही गोष्टींमुळे हा माणूस प्रत्येकाला स्वतःला दर्शविण्यापासून रोखत आहे. देव त्याला अनुमती देईल त्या वेळेपर्यंत तो स्वत:ला दाखवू शकणार नाही.
\v 7 जरी सैतान आधीपासून गुप्तपणे लोकांना देवाच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे कारण देत आहे, जो मनुष्य या माणसाला आता प्रकट करण्यापासून रोखत आहे, देव जोपर्यंत त्याला काढून टाकत नाही तोपर्यंत तो त्याला रोखत राहिला.
\s5
\v 8 मग देव त्या व्यक्तीला, ज्याने देवाच्या नियमांना पूर्णपणे नाकारले, त्याने स्वत:ला जगामध्ये प्रगट करावे ह्याची अनुमती देईल. मग प्रभू येशू एक आज्ञा बोलेल जी त्याला नष्ट करेल. जेव्हा येशू परत येईल तेव्हा सर्व लोकांस स्वतःला दाखवून त्या मनुष्याला पूर्णपणे निर्बळ होण्यास कारणीभूत होईल.
\p
\v 9 परंतु येशू त्याला नष्ट करण्याआधी सैतान त्या माणसाला महान शक्ती देईल. याचा परिणाम असा होईल की, तो सर्व प्रकारचे अद्भुत चमत्कार आणि आश्चर्यकारक कृत्ये करील आणि अनेक लोक असा विश्वास करतील की देव त्याला ह्या गोष्टी करण्यास सक्षम करीत आहे.
\v 10 आणि दुष्ट कृत्यांद्वारे, तो माणूस जे नाश पावत आहेत त्यांना पूर्णपणे फसवेल. येशू त्यांना वाचवू शकतो या खऱ्या संदेशावर प्रेम न केल्याने तो त्यांना फसवेल.
\s5
\v 11 म्हणून देव ह्या मनुष्यास सहजपणे त्यांना फसवावे यासाठी सक्षम करेल. म्हणजे हा मनुष्य खोटा आहे का असा दावा करतो यावर ते विश्वास ठेवतील.
\v 12 याचा परिणाम असा होईल की जे लोक ख्रिस्ताबद्दलच्या सत्यावर विश्वास ठेवण्यास नकारतात आणि उलट ज्यांनी सर्व वाईट करण्यात आनंद केला त्या सर्वांचा देव न्याय करील आणि त्यांचा धिक्कार करील.
\s5
\p
\v 13 विश्वासातील माझ्या बंधूंनो, जे तुम्ही देवाच्या पसंतीस पडलेले आहा, तुमच्यासाठी आम्ही देवाला धन्यवाद देतो. कारण त्याने तुम्हाला येशूविषयीच्या सत्यावर विश्वास ठेवण्यासाठी प्रथम लोकांमध्ये सामील केले आहे. असे लोक जे प्रथम तारले जातील, आणि त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही त्याच्या करता वेगळे केलेले असे व्हाल.
\v 14 आमच्याद्वारे ख्रिस्ताविषयीची सुवार्ता तुम्हास घोषीत केल्याने, आम्ही देवाला धन्यवाद देतो की त्याने तुम्हास निवडले आहे, अशासाठी की, ज्या प्रकारे देवाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा सन्मान केला, त्याच प्रकारे तो तुमचा देखील सन्मान करील.
\p
\v 15 म्हणजे, आपले सहविश्वासी बंधू, ख्रिस्तामध्ये आणखी दृढपणे विश्वास ठेवतील. तर आता आम्ही बोलल्याद्वारे शिकवलेल्या आणि पत्राद्वारे सांगितलेल्या सत्याच्या गोष्टींवर तुम्ही विश्वास करत रहा.
\s5
\p
\v 16 आम्ही अशी प्रार्थना करतो की, आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून सर्वकालचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता,
\v 17 तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व गोष्टीत तुम्हास स्थिर करो.
\s5
\c 3
\p
\v 1 इतर गोष्टींबद्दल सांगायचेच झाले तर, विश्वासातील माझ्या बंधूंनो, प्रभू येशू विषयीची सुवार्ता अधिकाधिक लोकांनी ऐकावी आणि त्याचा सन्मान करावा, याकरता आम्हासाठी प्रार्थना करा.
\v 2 ह्यासाठी ही प्रार्थना करा की देव दुष्टांना व जे आम्हास नुकसान पोहचू पाहतात, अशांना आम्हांपासून दूर ठेवो, कारण प्रत्येकजण प्रभूवर विश्वास ठेवत नाही.
\p
\v 3 तरीसुद्धा, प्रभू येशू विश्वासयोग्य आहे, यामुळे आम्हास खात्री आहे की दृढ होण्यासाठी तो तुम्हास कारण असे होईल. आम्हांला याचीही खात्री आहे की तो तुमचे सैतान, जो दुष्ट आहे, त्यापासून रक्षण करणार.
\s5
\v 4 कारण आपण सर्व जण आमच्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सहभागी झाले आहात, तर आमचा असा विश्वास आहे की आम्ही आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही त्याचे पालन करत आहा, त्याचेही पालन करत आहा जे आम्ही ह्या पत्रात लिहत आहे.
\v 5 आम्ही प्रार्थना करतो की आपला प्रभू येशू तुम्हाला नेहमी मदत करत राहो अशासाठी की देव तुमच्यावर किती प्रेम करतो आणि तुमच्यासाठी ख्रिस्ताने किती सहन केले, हे तुम्ही जाणावे.
\s5
\p
\v 6 माझ्या विश्वासातील बंधूनो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करतो की, तुम्ही आळशी आणि कामास नकार देणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्या बंधू संगती संबंध ठेवू नका. सांगायचेच झाले तर, ज्या गोष्टी आम्हास शिकवण्यात आल्या आणि ज्या आम्ही तुम्हास शिकवल्या, त्याप्रकारे जर कोणी जीवन जगत नसेल तर, तुम्ही त्याच्यापासून दूर राहायलाच हवे.
\v 7 कारण तुमचे तुम्हालाच कळते की आम्ही ज्याप्रकारे तुमच्याशी वागलो, तसेच तुम्हीही वागायला हवे. तुमच्या मध्ये असतांना आम्ही स्वत:ला काम करण्यापासून कधीच आवरले नाही.
\v 8 सांगायच तात्पर्य हे आहे की, आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही. उलट, आम्हांला लागणाऱ्या गरजांसाठी तुम्हापैकी कोणावरही भार टाकू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले.
\v 9 जरी मी प्रेषित असल्या कारणाने नेहमीच तुमच्यावर अवलंबून राहण्याचा आम्हांस अधिकार आहे, परंतु त्या ऐवजी, तुमच्यासाठी चांगले उदाहरण व्हावे याकरता आम्ही कष्टाने काम केले, अशासाठी की ज्याप्रकारे आम्ही वागलो, तसेच तुम्हीही आपल्या आचरणात आणावे.
\s5
\v 10 आठवण करा की तुमच्यामध्ये असतांना आम्ही हीच आज्ञा देत आलो की, जो कोणी विश्वासणारा काम करण्याचे नकारतो, तुम्ही त्याला खाण्यास अन्नही देऊ नये.
\v 11 तर आता आम्ही हे पुन्हा सांगतो की, कारण कोणीतरी आम्हास हे सांगितले आहे की आपल्यापैकी काही आळशी आहेत आणि काहीच काम करत नाहीत. हेच नाही तर, तुमच्यातील काही जण इतर लोकांच्या कामामध्ये हस्तक्षेप देखील करतात.
\p
\v 12 जे कार्य करत नाहीत अशा विश्वासातील बंधूंसोबत जणूकाय प्रभू बोलावा अशी आम्ही आज्ञा आणि विनंती करतो की, त्यांनी स्वत:पुरते आणि आपल्या कामापुरते मर्यादित असावे, त्यांना जे हवे आहे हे ते त्यांनी कमवावे आणि स्वत:लाच हातभार लावावा.
\s5
\p
\v 13 बंधूंनो, जे योग्य ते करतांना खचून जाऊ नका.
\p
\v 14 जर एखाद्या विश्वासणाऱ्याने या पत्रात जे लिहिले आहे त्याप्रमाणे वागत नाही, तर त्या व्यक्तीस सार्वजनिकरित्या ओळखा. आणि त्यानंतर त्याच्याबरोबर संगती करू नका, अशासाठी की त्याला लाज वाटावी.
\v 15 तो तुमचा शत्रू आहे असा मनात विचार करू नका, उलट, ज्या प्रकारे तुम्ही इतर विश्वासी बांधवांना ताकीद देता, त्या प्रकारे त्याला सावध करा.
\s5
\p
\v 16 आपल्या लोकांना शांती देणाऱ्या प्रभू येशू जवळ मी प्रार्थना करतो की, तो तुम्हास प्रत्येक परिस्थितीत नेहमी शांती देवो. आणि तो तुमची सतत मदत करत राहो.
\v 17 मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला नमस्कार; ही प्रत्येक पत्रांत खूण आहे. मी अशा रीतीने लिहित असतो. मी माझ्या प्रत्येक पत्रात असेच करतो, अशासाठी की तुम्हाला कळावे की हे पत्र खरोखर मीच लिहून पाठवले आहे.
\v 18 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो अशी मी प्रभू येशू ख्रिस्ताजवळ प्रार्थना करतो.