mr_udb/52-COL.usfm

196 lines
50 KiB
Plaintext

\id COL - MARATHI_UDB_NT
\ide UTF-8
\h कलस्सैकरांस
\toc1 कलस्सैकरांस
\toc2 कलस्सैकरांस
\toc3 col
\mt1 कलस्सैकरांस
\s5
\c 1
\s नमस्कार
\p
\v 1 येशू ख्रिस्ताचा प्रेषित म्हणून तुमच्याकडे येण्यासाठी, ज्याला देवाने निवडले आहे तो मी पौल आहे, कलस्सै शहरातल्या प्रिय बंधुभगिनींनो, तीमथ्य ख्रिस्तातील आपल्या सहविश्वासू बांधवांबरोबर सामील झाला आहे. आम्ही हे पत्र तुम्हा सर्वांना लिहित आहोत.
\v 2 देवाने ज्यांना आपल्या स्वतःसाठी वेगळे करून ठेवले आहे, जे विश्वासू विश्वासणारे बांधव ख्रिस्ताचे आहेत अशा तुम्हा सर्वांना आम्ही हे पत्र पाठवत आहोत. देव जो आमचा पिता ह्याने तुम्हाला त्याचा दयाळूपणा आणि शांती द्यावी अशी आम्ही प्रार्थना करतो.
\s उपकारस्मरण व प्रार्थना
\p
\v 3 आम्ही जेव्हा तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तेंव्हा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव जो पिता, ह्याचे आम्ही निरंतर आभार मानतो.
\s5
\p
\v 4 कारण ज्यांना देवाने स्वतःसाठी वेगळे केले आहे त्या सर्वांवर तुम्ही प्रीती करता आणि तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता असे आम्ही ऐकले आहे.
\v 5 देवाने तुमच्यासाठी स्वर्गामध्ये ज्या गोष्टींचा साठा केला आहे त्याची तुम्ही आत्मविश्वासाने वाट पाहता म्हणून तुम्ही आपल्या विश्वासू बंधूंवर प्रीती करत आहात. ख्रिस्ता विषयीची शुभवार्ता हा खरा संदेश तुम्ही प्रथमच ऐकला होता, तेव्हाच तुम्ही ह्या गोष्टींविषयी ऐकले आहे.
\v 6 तुम्ही कलस्सैमध्ये ऐकलेल्या या सुवार्तेची घोषणा विश्वासणारे जगातील सर्वजणांकरिता करत आहेत. ज्याप्रमाणे पहिल्याने तुम्ही हे ऐकले आणि समजून घेतले की देव खरोखर किती दयाळू आहे, त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये देखील त्याने कार्य केले आहे. ही शुभवार्ता एका शेतात लागवड केलेले पिक वाढत जाऊन आणि त्या पिकाची मोठ्याप्रमाणात पुरेशी कापणी व्हावी अशी आहे.
\s5
\p
\v 7 हे घडून येईल ह्या विषयी एपफ्रासने तुम्हाला शिकवले आहे. तो विश्वासूपणे ख्रिस्तासाठी व तुमच्या चांगल्यासाठी, आमच्याबरोबर ख्रिस्ताची सेवा करत आहे, म्हणून आम्ही त्याच्यावर प्रीती करतो.
\v 8 त्यानेच आम्हाला सांगितले आहे की तुम्ही देवाच्या सर्व लोकांवर प्रीती करता, कारण देवाच्याच आत्म्याने तुम्हाला देवावर आणि इतरांवर प्रीती करण्यास सामर्थ्यशाली बनवले आहे.
\s5
\p
\v 9 तुम्ही कशी प्रीती करता हे आम्ही ऐकले तेव्हा पासून आम्ही सर्वदा तुमच्यासाठी प्रार्थना करत असतो. देवाला जे काही करायचे आहे त्या प्रत्येक गोष्टी त्याने तुम्हाला दाखवाव्या, आणि देवाचा आत्मा तुम्हाला काय शिकवत आहे हे समजण्यासाठी त्याने तुम्हाला ज्ञानी बनवावे अशी आम्ही प्रार्थना करत आहोत.
\v 10 आम्ही अशी प्रार्थना करत आहोत की तुम्ही अश्याप्रकारे जीवन जगावे ते पाहून इतरांनी देवाचा सन्मान करावा, जेणेकरून तो तुमचे समर्थन करील. त्याने तुम्हाला करण्यास सांगितलेल्या सर्व चांगल्या गोष्टी तुम्ही कराव्यात अशी आम्ही प्रार्थना करतो.
\s5
\p
\v 11 देवाने त्याच्या सर्व महान सामर्थ्याने तुम्हाला मजबूत करावे, म्हणजे तुम्ही प्रत्येक कठीण प्रसंगाला धीराने सहन करावे अशी आम्ही प्रार्थना करतो.
\v 12 आपला देव जो पिता ह्याने इतरांसोबत म्हणजे ज्यांना त्याने त्याचे स्वतःचे लोक होण्यासाठी वेगळे केले आहे, त्यांच्यासोबत आम्हाला योग्य केल्याची घोषणा त्याने केली आहे, म्हणून तुम्ही ह्यासाठी त्याचा धन्यवाद करावा आणि आनंद करावा अशी आम्ही प्रार्थना करतो; हे यासाठी की आम्ही त्याच्यासोबत त्याच्या प्रकाशाच्या उपस्थिती मध्ये राहू तेव्हा त्याने आमच्यासाठी राखून ठेवलेल्या सर्व गोष्टी आम्हाला द्याव्या.
\s5
\p
\v 13 आम्हाला नियंत्रित करणाऱ्या वाईटापासून आमचा देव पित्याने आमची सुटका केली आहे; आता त्याचा पुत्र जो त्याला प्रिय आहे, त्याने आमच्यावर राज्य करावे, असे त्याने केले आहे.
\v 14 त्याच्या पुत्राच्याद्वारे त्याने आम्हाला त्या वाईटापासून सोडविले आहे; ते असे की, त्याने आमच्या अपराधांची क्षमा केली आहे.
\s प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वरूप व त्याचे कार्य
\s5
\p
\v 15 आपण पुत्राला ओळखतो तेव्हा आपण देवाला पाहू शकत नसलो तरी देखील देव कशासारखा आहे हे आपल्याला समजते. त्याने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींवर पुत्राचे प्रथम स्थान आहे.
\v 16 कारण जशी पित्याची इच्छा होती की त्याने करावे: आकाशातील सर्वगोष्टी आणि पृथ्वीवरील सर्वगोष्टी, आणि त्या सर्वगोष्टी ज्या आपण पाहू शकतो आणि ज्या आपण पाहू शकत नाही अशा सर्व गोष्टी, जसे की सर्व प्रकारचे देवदूत आणि सामर्थ्य व अधिकार, अशा सर्व गोष्टी पुत्रानेच निर्माण केल्या आहेत. ज्या सर्व गोष्टी अस्तित्वात आहेत त्या पुत्राद्वारेच निर्माण झाल्या आहेत कारण त्याने त्या कराव्यात अशी पित्याची इच्छा होती. त्या सर्व त्याच्यासाठीच अस्तित्वात आहेत.
\v 17 काहीही अस्तित्वात येण्याअगोदर पुत्र स्वतःहा होता, आणि तो सर्वकाही एकत्रित करतो.
\s5
\p
\v 18 जसे एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर त्याचे मस्तक राज्य करते तसे तो विश्वासणाऱ्यांवर, मंडळीवर राज्य करतो. कारण त्यानेच मंडळीची सुरुवात केली आहे, म्हणून तो मंडळीवर राज्य करतो. एका परिपूर्ण शरीरासह पुन्हा जिवंत होणारा तो प्रथम व्यक्ती होता. म्हणून तो सर्व गोष्टी पेक्षा जास्त महान आहे.
\v 19 त्याने ख्रिस्तामध्ये राहावे म्हणून सर्वकाही तयार करण्यास देव जो पिता संतुष्ट होता.
\v 20 येशू द्वारे सर्वकाही शांततेत आपल्या स्वतःकडे परत आणावे ह्यामध्ये देखील देव संतुष्ट आहे. देवाने सर्व लोकांना, आणि पृथ्वीवर आणि स्वर्गात, सर्वत्र ज्या गोष्टी आहेत त्यांना शांतीचा प्रस्ताव दिला आहे. पुत्राला यज्ञ रुपात वधस्तंभावर मरण्यासाठी देऊन, तो मरत असता त्याचे रक्त शिंपडण्याद्वारे त्याने असे केले आहे.
\s5
\p
\v 21 तुम्ही ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवण्याआधी, तुम्ही वाईट गोष्टी शिकवल्या आणि तुम्ही वाईट गोष्टी केल्या ह्या मुळे तुम्ही देवासाठी मैत्रीपूर्ण नव्हता, म्हणून देव तुम्हाला त्याचे शत्रू समजत होता.
\v 22 परंतु आता देवाने तुम्हामध्ये व त्याच्यामध्ये शांतता प्रदान करून तुम्हाला त्याचे मित्र बनविले आहे. येशूने आपल्यासाठी त्याचे शरीर जीवन मरणासाठी दिले तेव्हा त्याने हे केले आहे.
\v 23 परंतु तुम्ही ख्रिस्तावर पूर्णपणे विश्वास ठेवत राहिले पाहिजे; मगच तुम्ही जसे काही त्यांनी एका मजबूत खडकावर बनविलेल्या घरासारखे व्हाल. तुम्ही व जगातील सर्व लोकांनी ऐकलेल्या शुभवार्तेमध्ये देवाने जे काही करण्यासाठी दिलेल्या अभिवचनावर कोणत्याही कारणाने विश्वास ठेवने थांबवू नये. मी पौल, ह्याच शुभवार्तेची लोकांना घोषणा करून, देवाची सेवा करत आहे.
\s ख्रिस्ती मंडळीच्या वाढीसाठी पौल ख्रिस्ताचा सहकारी
\s5
\p
\v 24 तुमच्या फायद्यासाठी मला जो त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे मी आता आनंद करत आहे. होय, मंडळीची मदत करण्यासाठी, जे ख्रिस्ताचे शरीर आहे, ज्या गोष्टी अजून घडायलाच हव्या त्या मी सहन करत आहे.
\v 25 देवाने मला त्याचा सेवक करून मला एका विशिष्ट काम करण्यासाठी दिले आहे, ते म्हणजे तुमच्या सारख्या परराष्ट्रीय लोकांना शुभवर्तमानाची घोषणा करावी.
\v 26 प्राचीन काळापासून, पिढ्यां-पिढ्यांसाठी, देवाने ही शुभवार्ता सांगितली नाही, परंतु ज्यांना देवाने त्याचे स्वतःचे लोक होण्यासाठी वेगळे केले आहे त्यांना त्याने हे रहस्य प्रकट केले आहे.
\v 27 देवाने हे अद्भुत गुपित सांगण्याची योजना जे तुमच्या सारखेच यहूदी आणि गैर यहूदी आहेत, अशा लोकांसाठी केली. ती अशी: ख्रिस्त तुम्हामध्ये राहिल आणि तुम्ही देवाच्या गौरवाचे वाटेकरी होण्याची आत्मविश्वासाने अपेक्षा करावी असे करील!
\s5
\p
\v 28 आम्ही सुज्ञपणे इशारा देत आहोत आणि प्रत्येक व्यक्तीला ख्रिस्ताविषयी शिकवत आहोत जेणेकरून आम्हाला ख्रिस्ताशी जोडलेले आणि देवाला पूर्णपणे ओळखणाऱ्या अशा प्रत्येकाला देवाच्या उपस्थिती मध्ये आणता यावे!
\v 29 हे करण्यासाठी ख्रिस्त मला सामर्थ्य देतो म्हणून, मी होईल तितके कठीण परिश्रम करतो.
\s5
\c 2
\p
\v 1 तुम्हाला आणि जे लावदिकीयात राहतात आणि ज्यांनी मला वैयक्तिकरित्या पाहिले नाही अशा विश्वासणाऱ्यांना देखील मदत करण्यासाठी मी सर्वोत्तम प्रयत्न करीत आहे, हे तुम्ही लक्षात घ्यावे अशी माझी इच्छा आहे.
\v 2 मला तुम्हाला आणि त्यांना एकमेकांवर प्रीती करण्यासाठी आणि तुम्हाला एकजूट करण्यासाठी प्रोत्साहन देता यावे म्हणून मी हे करत आहे. मी अशी इच्छा करतो की तुम्ही सर्वांनी खात्रीने हे समजून घ्यावे, आणि देवा विषयीचे गुपित रहस्य पूर्णपणे समजून घ्यावे आणि ते सत्य म्हणजे ख्रिस्त आहे!
\s ख्रिस्ताशी संयुक्त होणे
\p
\v 3 देव काय विचार करतो आणि तो किती ज्ञानी आहे, हे आपण केवळ ख्रिस्ताद्वारेच ओळखू शकतो.
\s5
\p
\v 4 कोणीही तुम्हाला फसवू नये म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे.
\v 5 मी शारीरिकदृष्टया जरी तुम्हामध्ये उपस्थित नसलो तरी, जसा मी तुम्हामध्ये असल्याप्रमाणे, मला तुम्हाविषयी खुप काळजी वाटते, जसा मी खरोखर तुमच्या सोबतच आहे. असे असून सुध्दा मी तुम्हामुळे आनंद करतो कारण कोणीही थांबवू शकत नाही अशा प्रकारे तुम्ही ख्रिस्ताचे अनुकरण करता, व तुम्ही न थांबता ख्रिस्तावर विश्वास ठेवता.
\s5
\p
\v 6 तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर भरवसा ठेवण्याद्वारे त्याच्यावर विश्वास ठेवण्यास सुरवात केली, व तसेच भरवसा ठेवून जीवन जगत आहात.
\v 7 एखादे झाड आपली मुळे जमिनीत खोलवर पसरवते, तसेच तुम्हीही प्रभू येशू ख्रिस्तावर पूर्णपणे अवलंबून राहिले पाहिजे. एखाद्या मनुष्याने जसे चांगल्या पायावर घर बनवावे, तसेच तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर खुप जास्त भरवसा ठेवणे शिकले पाहिजे. आणि तुम्ही नेहमीच देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे.
\s खोट्या शिक्षणाविरुद्ध इशारा
\s5
\p
\v 8 देवाचा सन्मान कसा करावा किंवा ह्या जगात ज्याची ते उपासना करतात त्याचे तुम्ही आज्ञापालन करावे ह्या विषयी शिकवणाऱ्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवावा असे सांगणाऱ्या कोणावर ही विश्वास ठेऊ नका. त्याऐवजी, ख्रिस्ताचे आज्ञापालन करा,
\v 9 कारण येशू ख्रिस्त हा मनुष्य पुर्णतः देव आहे.
\s5
\p
\v 10 आता देवाने तुम्हाला ख्रिस्तासोबत जोडले आहे म्हणून तुम्हाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी त्याने तुम्हाला दिल्या आहेत, आणि तो इतर प्रत्येक व्यक्ती, आत्मा, आणि देवदूत ह्यांच्यावर राज्य करतो.
\v 11 जणुकाय देवाने देखील तुमची सुंता केली असे हे आहे. परंतु त्याने तुमच्यामधून कोणतेही मांस काढून टाकले नाही. त्याऐवजी ज्या गोष्टी तुम्हाला पापी ठरवतात त्या येशूने तुमच्यापासून दूर केल्या आहेत.
\v 12 कारण त्या मनुष्यांनी ख्रिस्ताला पुरले तेव्हा त्यांनी तुमचा बाप्तिस्मा होत असता तुम्हालाही त्याच्या सोबत पुरले, असे देव समजतो. त्याने ख्रिस्ताला पुन्हा जिवंत केले, तेव्हा तो तुम्हाला देखील पुन्हा जिवंत करील असे तो समजतो, कारण तो तुम्हाला पुन्हा जिवंत करू शकतो असा तुम्ही विश्वास ठेवला आहे.
\s5
\p
\v 13 तुम्ही देवा विरोधात पाप करत होता, म्हणून तो तुम्हाला मृत समजत होता, आणि तुम्ही यहूदी नव्हता, म्हणून तुम्ही त्याची उपासना केली नाही. परंतु तुम्ही ख्रिस्तासोबत पुन्हा जगावे असे त्याने केले आहे; त्याने आमच्या सर्वांच्या पापांची क्षमा केली आहे.
\v 14 आम्ही सर्वांनी पुष्कळ पापे केली आहेत, परंतु देवाने आमच्या पापांची क्षमा केली आहे. ते असे की एखाद्या मनुष्याला ज्या लोकांकडून पैसे घेणे आहे त्यांना त्याने क्षमा करावी, मग तो त्यांना पैसे दिल्यानंतर त्यांनी सह्या केलेले कागदपत्र फाडून टाकतो असे हे आहे. परंतु जसे देवासाठी, हे असे आहे जणुकाय त्याने आपली सर्व पापे आणि आपण मोडलेले सर्व नियम त्या कागदपत्रावर लिहून त्यांना त्याने ज्या वधस्तंभावर ख्रिस्त मरण पावला त्यावर खिळीले.
\v 15 आणखी, देवाने ह्या जगामधील लोकांवर राज्य करणाऱ्या दुष्ट आत्म्यांना पराभूत केले आहे, आणि त्याने त्यांना पराभूत केले आहे हे त्याने सर्वांना दाखवून दिले आहे. कैद्यांची जशी रस्त्यामधून धिंड काढतात तशीच त्याने त्यांची रस्त्यावरून धिंड काढली!
\s5
\p
\v 16 म्हणून तुम्ही एखादे ठराविक अन्न खाल्यावर आणि एखादे ठराविक पेय पिल्यावर किंवा तुम्ही वार्षीक उत्सव किंवा जेव्हा नवीन चंद्र दिसतो त्याचे किंवा आठवड्याच्या शब्बाथाला साजरा करत नाही म्हणून देव तुम्हाला शिक्षा करील असे जर कोणी म्हणत असेल त्याकडे दुर्लक्ष करा.
\v 17 ह्या प्रकारचे नियम व प्रसंग जे खरोखर येत आहे केवळ त्यालाच चित्रीत करतात. जे काही खरोखर येत आहे तो ख्रिस्त स्वतः असेल.
\s5
\p
\v 18 तुम्ही अतिशय नम्रतेने वागले पाहिजे आणि देवदूतांची उपासना केली पाहिजे, लोक बोलतात त्यावर तुम्ही विश्वास ठेवावा ह्याची खात्री पटवून देऊन देवाने तुमचे तारण करू नये असे होऊ देऊ नका. हे लोक नेहमीच दृष्टांताविषयी बोलतात देवानेच त्यांना तो दाखविला आहे असे ते म्हणतात. ते ह्या गोष्टींविषयी बढाई मारतात कारण देवाचा सन्मान न करणारे जे लोक इतरत्र आहेत त्यांच्या सारखेच हे लोकही बोलत राहतात.
\v 19 असे व्यक्ती ख्रिस्ताशी जोडलेले नाहीत. परंतु तो एका शरीराचे मस्तक असल्यासारखा आहे, आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो ते शरीर आहे. संपूर्ण शरीर हे मस्तकावर अवलंबून आहे. शरीराला हाडे आणि अस्थि एकत्रित धरून ठेवतात, परंतु देवच त्याची वाढ करतो, आणि जे त्याला पाहिजे ते पुरवणारे मस्तकच आहे.
\s5
\p
\v 20 ख्रिस्त मरण पावला तेव्हा तुम्ही ही त्याच्या सोबत मरण पावले असे देव समजतो. म्हणून आता आत्मा आणि लोकांनी देवाला कसे संतुष्ट करावे ह्यासाठी सर्व नियम बनविलेले आहे: येथून पूढे ह्या पैकी कोणत्याही गोष्टीने तुमच्यावर राज्य करू नये. मग तुम्ही अजुनही असे जीवन का जगत आहात जणुकाय ह्या गोष्टी खऱ्याच होत्या? अजुनही तुम्ही त्याच गोष्टींचे आज्ञापालन का करत आहात?
\v 21 हे नियम असे आहेत: “विशिष्ट गोष्टी हाताळू नका. विशिष्ट गोष्टींची चव घेऊ नका. ठराविक गोष्टींना स्पर्श करू नका.” तुम्हाला आता देखील ह्या नियमांचे आज्ञा पालन केलेच पाहिजे असा विचार करू नका.
\v 22 या जगात ज्या गोष्टी नाश पावतात जसे लोक त्यांचा वापर करतात त्या सर्वांबद्दल हे नियम आहेत.
\v 23 हे नियम चांगले असल्यासारखे दिसू शकतात. परंतु लोकांनीच ते देवाला संतोषविण्याच्या प्रयत्नात निर्माण केले आहेत. म्हणून ते नेहमीच खुप नम्र दिसतात; म्हणूनच ते नेहमी स्वतःच्या शरीराला दुःखापत करत असतात. परंतु जर आपण ह्या नियमांचे पालन केले, तर पाप करणे आपण खरोखर थांबवू शकत नाही.
\s5
\c 3
\s ख्रिस्ताबरोबर पुनरूत्थित होण्याचे परिणाम
\p
\v 1 ख्रिस्ताच्या मरणानंतर त्याने त्याला जिवंत केले तेव्हा त्याने तुम्हालाही पुन्हा जिवंत केले आहे हा विचार देव करतो. आणि महान सन्मान आणि सामर्थ्य असलेल्या व्यक्तीसाठी जी जागा आहे त्या जागी, ख्रिस्त देवाच्या उजव्या बाजूला, स्वर्गात बसला आहे. तुम्ही जसे काही आधीच तेथे जगत होता असे येथे देखील जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
\v 2 तुम्हाला येशू स्वर्गामध्ये काय देऊ इच्छितो याची इच्छा बाळगावी; येथे पृथ्वीवर असलेल्या गोष्टींवर इच्छा बाळगू नका.
\v 3 कारण तुम्ही मरण पावला आहात आणि या जगाशी तुमचा काहीही संबध राहिला नाही असा देव विचार करतो. तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याने तुम्हाला ख्रिस्ताबरोबर लपवून ठेवले आहे असा विचार तो करतो.
\v 4 देव त्याच्या चमकणाऱ्या प्रकाशात पृथ्वीवरील प्रत्येकाला ख्रिस्त प्रकट करतो, तेव्हा ख्रिस्ताने तुम्हाला जिवंत केले आहे, म्हणून तुम्हाला देखील तो त्याच चमकणाऱ्या प्रकाशात प्रकट करेल!
\s5
\p
\v 5 म्हणूनच, तुम्ही ह्या जगात करू इच्छित आहात त्या सर्व वाईट गोष्टींना तुमचे शत्रू माना आणि त्यांनी अवश्य मेले पाहिजे असा विचार करा. तुम्ही त्यांना अंमलात आणले पाहिजे: लैंगिकरित्या अनैतिक गोष्टी किंवा अपवित्र कृत्ये करण्याचा प्रयत्न करू नका. कामवासनेत किंवा वाईट मार्गांनी विचार करू नका. आणि लोभी होऊ नका, कारण ते मूर्तींची उपासना करण्यासारखे समान आहे.
\v 6 यासारख्या गोष्टी लोक करून ते त्याचे ऐकत नाहीत म्हणून देव त्याच्यांशी क्रोधीत होतो.
\v 7 जे अशांसारखे वागत होते त्यांच्यामध्ये तुम्ही सहभागी होत असत तेव्हा तुम्ही स्वतः देखील पूर्वी असेच जीवन जगत होता.
\v 8 परंतु आता तुम्ही या गोष्टी करण्याचे थांबविले पाहिजे. एकमेकांवर रागावू नका; एकमेकांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. एकमेकांचा अपमान करू नका किंवा लज्जास्पद, तिरस्करणीय मार्गांनी बोलू नका.
\s5
\p
\v 9 आणि एकमेकांना खोटे बोलू नका. एखादा व्यक्ती जो नवीन झालेला असतो तो यापुढे अशा वाईट गोष्टी करत नाही, त्याचसारखे तुम्ही देखील एक नवीन व्यक्ती झाला आहात म्हणून या गोष्टींपैकी काहीही करू नका.
\v 10 ज्याने तुम्हाला स्वत:सारखे एक नवीन व्यक्ती म्हणून निर्माण केले आहे, जेणेकरून देवाला तुम्ही अधिक चांगल्याप्रकारे ओळखू शकाल, म्हणून तो नेहमीच तुम्हाला नवीन बनवत असतो.
\v 11 ख्रिस्तामध्ये सामील करून देवाने आम्हाला एक नवीन व्यक्ती बनविले आहे, आणि तो नेहमी आम्हाला नवीन बनवित आहे. म्हणून यापुढे कोणीही तो यहूदी किंवा तो परराष्ट्रीय, किंवा कोणीही सुंता झालेला किंवा सुंता न झालेला, किंवा कोणीही एक परदेशी आहे, किंवा अगदी असभ्य, किंवा कोणीही एक गुलाम किंवा एक स्वतंत्र, हे यापुढे महत्वाचे नाही. परंतु त्याऐवजी तुमच्या सर्वांमध्ये सर्व गोष्टीत जो आहे, जे महत्वाचे आहे तो ख्रिस्त आहे.
\s5
\p
\v 12 कारण देवाने तुम्हाला निवडले आहे आणि त्याचे लोक म्हणून तुम्हास वेगळे केले आहे, कारण तो तुमच्यावर प्रीती करतो, म्हणून करुणास्पदरीतीने आणि क्षमाशीलतेने आणि दयाळूपणाने इतरांची सेवा करा. नम्रपणे आणि हळुवारपणे धीराने एकमेकांकडे लक्ष द्या
\v 13 आणि एकमेकांचे सहन करा. कोणी दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध तक्रार करत असेल तर, एकमेकांना क्षमा करा. प्रभू येशूने तुमची क्षमा केली, म्हणून तुम्ही देखील तसेच एकमेकांना क्षमा केली पाहिजे.
\v 14 आणि सर्वात महत्त्वाचे काय आहे तर ते म्हणजे एकमेकांवर प्रेम करणे होय, कारण असे केल्याने तुम्ही उत्तम प्रकारे एकत्रपणे स्वतःला बांधू शकाल.
\s5
\p
\v 15 देव आणि एक दुसऱ्यांबरोबर शांतीने जगण्यासाठी केवळ ख्रिस्त हाच एक आहे जो तुम्हांला तयार करतो, म्हणून शांततेत जगता यावे म्हणून नेहमी तशी वागणूक ठेवा. तुम्ही एकत्र असावे म्हणूनच त्याने तुम्हाला पाचारण केले आहे. आणि सर्व गोष्टींसाठी नेहमी देवाचे आभार माना.
\v 16 तुम्ही जसे जगत आहात आणि देवाची सेवा करत आहात, तसेच ख्रिस्ताने तुम्हाला जे काय शिकवले आहे ते नेहमी एकत्रितपणे पालन करा. सुज्ञपणाने एकमेकांना शिकवा आणि मार्गदर्शन करा; जसे तुम्ही स्तोत्रे, भजन, आणि त्याची स्तुती करणारे गीते म्हणाल तेव्हा प्रामाणिकपणे देवाचे आभार माना आणि स्तुती करा.
\p
\v 17 आणि जे काही तुम्ही म्हणाल, किंवा जे काही तुम्ही कराल, प्रभू येशूचे गौरव होण्याकरता हे सर्व करा, आणि हे करत असतांना ख्रिस्ताच्याद्वारे तुम्ही देवाचे आभार माना.
\s ख्रिस्ती मनुष्याचे गृहजीवन
\s5
\p
\v 18 पत्नींनो, आपल्या पतींच्या आज्ञेत राहा; प्रभू येशूने आज्ञा दिली आहे; त्यानुसार हे योग्य आहे.
\v 19 पतींनो, आपल्या पत्नीवर प्रेम करा आणि त्यांच्याबरोबर कठोर होऊ नका.
\p
\v 20 मुलांनो, प्रत्येक मार्गात आपल्या पालकांच्या आज्ञा पाळा, कारण जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा प्रभू देव खूष होतो.
\v 21 वडिलांनो, आपल्या मुलांमध्ये राग निर्माण होईल म्हणून कारण होऊ नका, नाही तर, कदाचित ते निराश होतील.
\s5
\p
\v 22 दासांनो, या जगामध्ये प्रत्येक मार्गात आपल्या मालकाच्या आज्ञेचे पालन करा. आपला मालक पाहत असतो तेव्हाच ते त्याच्या समोर काम करतात जेणेकरून मालकाला वाटावे की ते नेहमीच त्याची आज्ञा पाळतात, त्यासारखे तुमचा मालक पाहतो तेव्हाच तुम्ही त्याची आज्ञा पाळता असे करू नका. त्याऐवजी, प्रभू येशूचा तुम्ही सन्मान करता म्हणून अंतःकरणातून प्रामाणिकपणे आपल्या मालकाची आज्ञा पाळा.
\v 23 तुम्ही जे काही कार्य करता, लोकांकरिता नव्हे तर प्रभू येशूसाठी मनापासून कार्य करा. जे केवळ त्यांच्या मानवी मालकासाठी काम करतात त्यांच्याप्रमाणे केवळ काम करू नका,
\v 24 कारण प्रभू तुमची परतफेड करेल हे तुम्हाला ठाऊक आहे; प्रभूने जे काही तुम्हांला वचन दिले आहे तो तुमचा भाग तुम्हास प्राप्त होईल. ज्याची तुम्ही सेवा करत आहात तो येशू ख्रिस्त हा खरा मालक आहे.
\v 25 जे लोक दुष्ट विचार करतात म्हणून ते शिक्षेस पात्र आहेत म्हणून तो शिक्षा करील; परंतु देव प्रत्येकाला त्याच मार्गाने न्याय करेल.
\s5
\c 4
\p
\v 1 मालकांनो, तुमच्या दासांबरोबर न्यायाने वागा आणि त्यांना ज्याची गरज आहे ते पुरवा, कारण स्वर्गामध्ये तुम्हाला देखील एक मालक आहे हे तुम्हास ठाऊकच आहे.
\s प्रार्थना व रोजची वागणूक
\s5
\p
\v 2 न थांबता प्रार्थना करत रहा. आळशी होऊ नका, परंतु त्याऐवजी, प्रार्थना आणि देवाचे आभार मानत राहा.
\v 3 देव सर्व प्रगट करीत आहे त्या ख्रिस्ताबद्दलच्या रहस्याला, आणि शुभवर्तमानाला मुक्तपणे समजून सांगण्यासाठी देवाने आम्हास ते शक्य करावे, म्हणून आम्हासाठी देखील एकत्रितपणे प्रार्थना करा. मी आता तुरुंगात आहे याचे कारण म्हणजे आम्ही ह्या शुभवर्तमानाची घोषणा केली आहे.
\v 4 शुभवर्तमाला पूर्णपणे स्पष्टरीतीने समजावून सांगण्यासाठी मी सक्षम व्हावे म्हणून प्रार्थना करा.
\s5
\p
\v 5 जे विश्वास ठेवत नाहीत त्यांच्याबरोबर सुज्ञपणे वागा, आणि सुज्ञपणाने वागून प्रत्येक क्षणाला मौल्यवान बनवा.
\v 6 जे प्रभू येशूवर विश्वास ठेवीत नाही त्यांच्याशी नेहमी दयाळूपणे आणि आंनददायीपणे आणि चित्तवेधक मार्गाने बोला. मग प्रभूबद्दल प्रत्येक व्यक्तीशी कसे बोलावे हे तुम्हाला कळेल.
\s नमस्कार व समाप्ती
\s5
\p
\v 7 माझ्या बाबतीत जे काही घडत आहे ती प्रत्येक गोष्ट तुखिक तुम्हाला सांगेल. माझ्यासोबत जो प्रभू येशू याची सेवा करतो, आणि ज्याने विश्वासाने मला मदत केली, आणि मी ज्यावर प्रेम करतो असा तो एक विश्वासू बंधू आहे.
\v 8 तुम्हाला कदाचित प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला कदाचित आमच्याविषयीची माहिती कळेल याच कारणामुळे ह्या पत्रासह मी तुखिकाला तुमच्याकडे पाठवत आहे.
\v 9 जो तुमचाच नगरवासी मित्र आहे आणि ज्यावर मी प्रीती करतो; तो एक विश्वासू बंधू आहे. त्या अनेसिमला मी त्याच्या बरोबर तुमच्याकडे पाठवीत आहे. येथे काय घडत गेले आहे त्याबद्दल ते सर्व तुम्हाला सांगतील.
\s5
\p
\v 10 अरिस्तार्ख, जो माझ्या सोबत तुरूंगात आहे, आणि बर्णबाचा चुलत भाऊ मार्क, तुम्हाला सलाम सांगतात. मी मार्कबद्दल आधीच तुम्हाला सूचित केले आहे, मग जर तो तुमच्याकडे आला, तर त्याचे स्वागत करा.
\v 11 येशू, ज्याचे नाव युस्त असेही आहे तो सुध्दा तुम्हाला सलाम सांगतो. ख्रिस्त येशूच्याद्वारे देव हा राजा आहे ह्याची घोषणा करण्यासाठी केवळ हेच एवढे यहूदी विश्वासणारे तीन पुरुष आहेत जे माझ्याबरोबर काम करतात. त्यांनी मला खूप मदत आणि प्रोत्साहन दिले आहे.
\s5
\p
\v 12 ख्रिस्त येशूचा एक दास एपफ्रास, आणि जो तुमचाच नगरवासी आहे, तो तुम्हाला सलाम सांगतो.
\p देव आम्हाला शिकवतो आणि आम्हाला वचन देतो त्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवावा आणि तुम्ही मजबूत व्हावे म्हणून तुमच्यासाठी तो खूप वेळा कळकळीने प्रार्थना करतो.
\v 13 लावदिकिया ह्या शहरात राहणाऱ्यांसाठी, आणि हेरापलीत ह्या शहरात राहणाऱ्या, तुम्हासाठी त्याने फार मेहनत घेतली आहे ही साक्ष मी त्याच्याविषयी देतो.
\v 14 मी ज्यावर प्रीती करतो तो वैद्य लूक आणि देमास हे तुम्हाला सलाम सांगतात.
\s5
\p
\v 15 लावदिकीयात राहणाऱ्या सहविश्वासू बांधवांना सलाम, आणि नुंफाला सलाम आणि तिच्या घरी जमणारी विश्वासणाऱ्या मंडळीला सलाम द्या.
\v 16 तुमच्यांत हे पत्र वाचून झाल्यावर, लावदिकियातील सभेत देखील कोणीतरी ते वाचावे. आणि लावदिकियाकडील पत्र देखील वाचावे.
\v 17 अर्खिप्पाला सांगा की, देवाने त्याला जे काम दिले ते त्याने पूर्ण करावे याची खात्री बाळगावी.
\s5
\p
\v 18 मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी लिहून तुम्हाला सलाम सांगत आहे. मी तुरूंगात आहे ह्याची आठवण ठेवा आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा तुम्हा सर्वांवर सदोदीत दयाळूपणे कृती करीत राहो अशी मी प्रार्थना करतो.